तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

पुरंदरेंनी एकट्यानं फिरून दाखवावं, नितेश राणेंची उघड धमकी"खोटा इतिहास लिहाणाऱ्यांना महाराष्ट्रात सुरक्षा घेऊनच फिरावे लागेल"

मुंबई :- सप्टेंबर : बाबासाहेब पुरंदरेंनी महाराष्ट्रात एकटं फिरून दाखवावं, त्यांच्या किती आरत्या आम्ही काढू ते बघा, अशी उघड धमकी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दिलीये.

वृद्ध व्यक्तींशी आपल्या समाजात साधारणतः आदरानं बोलतात. पण काँग्रेसचे आमदार नितेश राणेंचं तसं दिसत नाही. नव्वदीच्या वर असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना नितेश राणेंनी चक्क उघड धमकी दिलीय. औरंगाबादेत मराठा आरक्षणावर मार्गदर्शनापर भाषणात बोलत असताना "पुरंदरेंनी महाराष्ट्रात एकटं फिरून दाखवावं, त्यांच्या किती आरत्या आम्ही काढू ते बघा, अशी उघड धमकीच नितेश राणे यांनी दिली.

तसंच खोटा इतिहास लिहाणाऱ्यांना महाराष्ट्रात सुरक्षा घेऊनच फिरावे लागेल असंही ते पुढे म्हणाले. राणे एवढ्यावर थांबले नाहीतर त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेखही बाबा पुरंदरे असा केला.

मराठा समाजाचा वापर मराठी कलाकारांनी केला. तसाच राजकीय पक्षांनी सुद्धा केला आणि आपल्या झोळ्या भरल्या. मुंबई मोर्चाच्या वेळी मराठी कलाकार आणि राम-शाम कुठे होते असा सवाल उपस्थितीत करत नितेश राणेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

No comments:

Post a Comment