Breaking News
Loading...

Thursday, 14 September 2017

आजाराला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्यांची आत्महत्या मुलाचा मृतदेह पाहून पित्याचिही आत्महत्या


परभणी : प्रतिनिधी
    येथील वांगी रोड वरील सरगम कॉलनीत राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. मुलाचा मृतदेह पाहून पित्याला अती दुख झाले त्यांनतर पित्यानेही गळफास घेतल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या नंतर घडली. या बद्दल सरगम कॉलनीसह परभणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
़   या बाबत मिळालेली माहीती अशी की , चंद्रकांत मरीबा गायकवाड हा पोलीस दलातील एस.़आर.पी.मध्ये कूक या पदावर गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कार्यरत होता.मात्र चंद्रकांत हा बऱ्याच दिवसापासून आजारी होता. गेल्या चार दिवसापासून चंद्रकांतने जेवणहंी सोडले होते सोमवारी सायंकाळी चंद्रकांतने जेवनाचा प्रयत्न केला परंतू त्याला जेवण गेले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास आजारास कंटाळून त्यांने गळफास घेतला. बाजुलाच एक हजार फुटावर त्याचे वडील मरीबा गायकवाड वय ६५ हे राहतात, सकाळी  ही परिस्थिती आणि मुलाचा मृतदेह पाहील्यानंतर मरीबा गायकवाड यांनाही मुलांच्या मृत्यूचा शोक अनावर झाला. आणि त्यांनी घरी जावून गळफास लावून घेतला.  या प्रकरणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून पुठील तपास पो.उप.निरीक्षक गिते करीत आहेत. 

No comments:

Post a Comment