तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

कल्याणच्या भाजपा नगरसेवका विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल, वर्तकनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल


_________________________

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक दया गायकवाड यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दया गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी धुमाळ व त्यांच्या पतीवर देखील इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून बलात्कार करण्यास मदत केल्याबद्दल दोघांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  पीडित तरुणीने ठाणे पोलीस आयक्तांकडे लेखी तक्रार केली होती. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असल्याचा आरोप ठाण्यातील एका तरुणीने केला आहे. याप्रकरणी तरुणीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता. बलात्काराच्या गंभीर आरोपामुळे भाजप नगरसेवक वादाच्या भोवर्यात सापडले आहे. गायकवाड यांना अन्य दोन जणांनी मदत केल्याचाही उल्लेख तरुणीने तक्रार अर्जात केला होता. दरम्यान नगरसेवकाच्या पत्नीने तरुणीच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

काय म्हटले होते तक्रार करणा-या तरूणीने....

तरुणीने केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, तरुणीशी दया गायकवाड सोबत फेसबूकवर ओळख झाली. त्यानंतर ते एका ठिकाणी भेटले. त्यानंतर दया गायकवाडने तिला टिटवाळा व बदलापूर येथे लॉजवर नेऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. लग्नाचेआमिष दाखवून दयाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. दया व त्याचे अन्य दोन साथीदार तरुणीचा छळ करीत आहे. या प्रकरणी दयासह अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास करण्याचा तक्रार अर्ज तरुणीने केला होता. दरम्यान यासंदर्भात नगरसेवक दया गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधीत तरुणीने फेसबूकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली होती. तेवढीच तिच्या सोबत माझी ओळख आहे. त्यानंतर तिची आई व तिने माझ्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर मला ती फोन करुन धमाकावत राहिली. या प्रकरणी माझ्या पत्नीने तिच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. तिच्याकडून ब्लॅकमेल सुरु असल्याचा उलट आरोप गायकवाड यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment