तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 12 September 2017

कायगाव येथे युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

   संपत रोडगे गंगापुर प्रतिनिधी
  
गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे एका​ युवकाने राहत्या घरातील पत्र्यांच्या पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना१२ सप्टेंबर रोजी दुपारी  साडे चार ते पाच वाजेदरम्यान  दरम्यान घडली.
    पोलिसांकाडुन  मिळालेल्या माहितीनुसार, कायगाव येथील प्रभाकर उत्तम फाजगे  वय (३०)वर्षे या तरुणाने मंगळवारी दुपारी  साडे चार ते पाच च्या दरम्यान राहत्या घरातील पत्र्यांच्या पाईपला दोरीने फाशी घेवुन आत्महत्या केली. त्याची आई प्रभाकर यास आवाज देत त्याच्या खोलीत गेली असता मुलगा फासावर लटकल्याचे पाहील्यावर तिने आरडाओरडा केला असता आजुबाजुला असलेल्या नागरीकांनी त्याला खाली घेऊन गंगापूर येथील  उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत झाल्याचे घोषित केले.
       या घटनेची गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद  करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेडकांस्टेबल बी.के.कासोदे ,पोलिस नाईक जे.पी पाटील हे करत आहे.

No comments:

Post a Comment