तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Friday, 8 September 2017

आजचे राशीभविष्य, शनिवार, ०९ सप्टेंबर २०१७


आजचे बारा राशींचे राशीभविष्य
मेष
गणपतीचे आणि मारूतीचे दर्शन घ्यावे, लाल फुले अर्पण करावी. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टीने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी
वृषभ
गुरूचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. गुरू मंत्राचा जप करावा. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. महत्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – हिरवा
मिथुन
दत्त महाराजांच्या आणि शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग – आकाशी
कर्क
शनि मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवसा लावावा. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडी-अडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – पिवळा
सिंह
ओमकार या मंत्राचा जप करावा. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटुंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – नारंगी
कन्या
शनिला तेल अर्पण करावे. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – गुलाबी
तुळ
पुरूष सुक्ताचे पाठ करावेत. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पती, पत्नीमधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – नारंगी
वृश्चिक
शनि, मारूती मंदिरात शेंदूर आणि तेल अर्पण करावे. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग – पांढरा
धनु
ओम शनेश्वराय नम: या मंत्राचा जप करावा. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – निळा
मकर
शनि, मारूती मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहील. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – तपकिरी
कुंभ
मारूती मंदिरात शेंदूर अर्पण करावे. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. वादविवाद टाळावेत. व्यवसायामध्ये मोठे निर्णय घेताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कमोडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग- पांढरा
मीन
गणपती व मारूतीचे दर्शन घ्यावे. आज ११.४३ नंतर चंद्राचे भ्रमण मेष राशीत असेल. व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कमोडिटी, शेअर्स, शेतीशी निगडीत व्यवसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – पांढरा

No comments:

Post a Comment