तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Thursday, 14 September 2017

शहरातील नागरीकांना वेठीस धरण्याचे काम

परभणी : प्रतिनिधी
 
शहराचा विकास होईल अशी आशा एक नागरीक म्हणून आम्हाला होत्या पण त्या फोल ठरल्या आहेत. असे प्रतिपादन महापालीकेचे राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते विजय जामकर यांनी पत्र परिषदेत व्यक्त केले.
     शहरात महापालीकेने वाढवलेल्या करवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महापालीकेच्या सदस्यांनी  नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात पत्र परिषद घेतली पत्र परिषदेस संबोधीत करतांना गटनेते विजय जामकर असे म्हणाले की सुरेश वरपूडकर यांनी आमदार, खासदार, माजीमंत्री ही पदे भोगलेली आहे. त्याच्या सौभाग्यवती ह्या  पपरभणीच्या महापौर झाल्या त्याच्या कार्यकाळात बरीच विकासाचे कामे होती असे वाटले होते पण त्यांनी चक्क परभणी शहरातील नागरीकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. अव्वाच्या सव्वा दराने घरपटी वाढवून सुख सुविधा न देता जनतेला आर्थिक भूर्दंड देण्याचे काम केले आहे. ही घरपट्टी आम्हाला मान्य नाही ती आम्ही सभागृहात पारीतही होऊ देणार नाही. करवाढ करायची असेल तर एका प्रमाणात वाढवावी त्यासाठी विशेष सभा बोलावण़्यात यावी व त्यातून  मनपाने निर्णय घ्यावा. कॉर्ग्रेस महापालीकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपासोबत जावून विकासाची काम करतील. महापालीकेला आर्थिक उत्पन्न मिळणारे साधने उभे करतील ते न करता नागरीकांचे खिशे कापण्याचे काम महापौरांनी चालवले आहे. भाडेवाढ ही अतिशय जाचक असून यामधून सर्व सामान्य माणूस मेटाकुटीला येत आहे. दोन खोल्या असलेल्या नागरीकालाही आव्वाच्या सव्वादराने घरपट्टी आकारली जात आहे. अनाधिकृत बांधकामे हा वेगळा मुद्दा असून अधिकृत आणि अनाधिकृत असे दोन गट पाडून त्यानुसार घरपट्टी मनपाने आकारावी. या संदर्भात शिवसेनाही आंदोलन करीत आहे. गरज पडल्यास परभणी शहराच्या विकासासाठी आम्ही वेळ प्रसंगी शिवसेनेसोबतही जावू अशी स्पष्टोक्ती विजय जामकर यांनी दिली. यावेळी जलालोद्दीन काजी, महेबुब अली पाशा,सय्यद इमरान हुसेनी,ॲड.नवले पाटील,बाळासाहेब बुलबूले, बाळासाहेब दुधगांवकर,अमोल जाधव,अली खान, आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment