तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 16 September 2017

भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांच निधन.

_________________________

1965 साली भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंह यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी अर्जन सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा धक्का बसल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. लष्करी रुग्णालयातच संध्याकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्जन सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

कोण होते अर्जन सिंह...?

अर्जन सिंह हे पाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलाचे एकमेव अधिकारी होते. 1965 मध्ये त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी सर्वात तरुण वायुसेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. अर्जन सिंह यांचा जन्म 15 एप्रिल 1919 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील लिआलपूर मध्ये झाला. कॉलेज मध्ये शिकताना वयाच्या 19 व्या वर्षीच त्यांची निवड एम्पायर वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी झाली.15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन उडणाऱ्या भारतीय वायूदलाच्या शेकडो विमानांच्या अग्रभागी असलेल्या एअरक्राफ्टचं सारथ्य करण्याचा बहुमान त्यांना मिळाला.1 ऑगस्ट 1964 ते 15 जुलै 1969 या कालावधीत ते एअर स्टाफचे प्रमुख होते. 1965 मध्ये अर्जन सिंह यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. 1970 मध्ये वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली.1971 मध्ये अर्जन यांची स्वित्झर्लंड मध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी त्यांनी व्हॅटिकनचे राजदूत म्हणूनही काम पाहिलं.

No comments:

Post a Comment