Breaking News
Loading...

Wednesday, 13 September 2017

m-Aadhar रेल्वे प्रवासासाठी अधिकृत ओळखपत्र : रेल्वे मंत्रालय.

_________________________

रेल्वे प्रवास करताना तुम्हांला तिकीट तपासनीसाला अधिकृत ओळखपत्रदाखवणं सक्तीचे आहे. अशा वेळेस आधारकार्ड किंवा पॅनकार्ड याची फोटोकॉपी आणि मूळपत्र तुमच्या सोबत आठवणीने ठेवणं गरजेचे होते. पण तुमचा रेल्वेप्रवास थोडा सुकर करण्यासाठी आता m-Aadhar ची सोय करण्यात आली आहे. आधार कार्ड मोबाईल अॅपच्या स्वरूपात सादर करणे म्हणजेच m-Aadhar. या सोयीला आता रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. m-Aadhar या मोबाईल अॅपच्या माध्यमातून कोणीही आपले आधार कार्ड डाऊनलोड करु शकते. आधार क्रमांकाशी जो मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आला आहे  त्या मोबाईल क्रमांकावर हे अॅप वापरण्याची सोय उपलब्ध होणार आहे.रेल्वे प्रवासा दरम्यान, ओळखपत्राची मागणी केल्यानंतर प्रवाशाला आपल्या मोबाईल मधील हेअॅप ओपन करून त्यामध्ये पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर या अॅपमध्ये आधार कार्ड ओपन होईल. हे आधार कार्ड अधिकृत ओळखपत्राचा पुरावा म्हणून दाखवता येऊ शकणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आह

No comments:

Post a Comment