तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (R.B.S.K ) अन्तर्गत,श्री छञपती संभाजी विद्यालयात 'शालेय आरोग्य तपासणी

प्रतिनिधी
भोकरदन:-तालुक्यातील श्री छञपती संभाजी विद्यालय तांदुळवाडी मध्ये आज दि 12 सप्टेंबर ला "राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (R.B.S.K ).अन्तरगत शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी वैद्यकिय अधिकारी डाॅ. रोहितकुमार अग्रवाल,डाॅ पियुष कुलवाल,डाॅ. नाजनिज देशमुख,डाॅ. धनश्री केंद्रे,शबाना मिर्झा,भाग्यश्री तळेकर  (आरोग्य सेविका).यांनी विद्यालयातील वर्ग पाचवी ते बारावी च्या  विद्यार्थीची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले.व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयक महत्वाच्या बाबी सांगण्यात आल्या. वैयक्तिक स्वच्छता व परीसर स्वच्छता या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचं प्रमाणे पोषनाहार विषयक सल्ला हि देण्यात आला. यावेळी प्राचार्य संजय पैठणकर,सह शिक्षक श्री डी बी ठाकरे,पी एम पाटील,व्ही. बी. कल्याणकर,प्रा समाधान सोनवणे,श्रीमती उषाताई खैरे मॅडम,सौ कमलाबाई सोनवणे मॅडम जे एच सुरासे, एच यु गव्हाड सह विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते

No comments:

Post a Comment