तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 7 September 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढतं वजन पाहता ट्रम्प प्रशासनाने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.ट्रम्प प्रशासनाची अशी इच्छा आहे की, भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रात मोठी ताकद व्हावा.

मुंबईतल्या 29 ऑगस्टच्या पावसातील पूरग्रस्तांना राज्य सरकारची मदत

ब्ल्यू व्हेल गेमसाठी सरकारला दोषी ठरवणार का? : मुंबई हायकोर्ट

एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्कान लावता आर्थिकदृष्ट्या मागासांना सर्वसामान्य कोट्यातून 25 टक्के आरक्षण द्यावे - रामदास आठवले.देशात काम करा कोणी म्हणत नाही. जो तो काम बंद करा म्हणतो. हे गंभीर आहे - गडकरींचा एनजीओना टोला


डहाणू येथे अजून एका मालगाडीचे डबे रुळावरून घसरले, चर्चगेटच्या दिशेने वाहतूक उशिराने, लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता.

पंतप्रधान ऐकून घेत नाहीत हे चुकीचे, महात्मा गांधीनी काँग्रेस बरखास्त करा म्हटलंय त्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत असावेत - गडकरी


असंभव काम सांगा दोन वर्षात करतो असं आश्वासन पंतप्रधानांना दिलं, त्यामुळे त्यांनी गंगा शुद्धीकरण प्रकल्पाची जबाबदारी दिली - नितीन गडकरी

एकनाथ खडसेंविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल.

गोव्याला वीस हजार कोटी माझ्या खात्यातून दिले, सर्व मागण्या मान्य, विशेष दर्जाची गरज नाही एवढं केंद्र सरकार देतेय - नितीन गडकरी

लोकमत कडून नेहमीच टॅलेंटला प्रोत्साहन, पुरस्कार प्रेरणा देण्याचे काम करतात - नितीन गडकरी.

मी राजकारणात अनिच्छेने आलो, ज्या क्षणी मी इथे राहायला अयोग्य वाटेन त्या क्षणी राजकारण सोडेन- मनोहर पर्रिकर

दिल्लीची हवा मानवली नाही, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केली भावना.

श्रीनगर = सीआरपीएफच्या कॅम्पवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू, 8 जण जखमी

माझ्यातील हेकेखोरपणा आईच्या वडिलांकडून आलाय, मला साडेचार वाजता अॉफिसला यायचं असतं पण स्टाफला अडचण होते म्हणून थोडा उशिरा येतो - मनोहर पर्रिकर.


सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील तलाठी संजय गावडे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.


गाेंदिया = खुनाच्या प्रकरणातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा. जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. गोरेगाव तालुक्यातील गहेलाटाेला येथे दोन वर्षांपूर्वी एका इसमाची हत्या केल्याची घटना घडली होती.

नगर-औरंगाबाद रोडवर एसटी-कारचा अपघात, दोन जणांचा मृत्यू.


नागपूर = आंतर धर्मीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला हायकोर्टाचा दिलासा, मुलीच्या पालकांचे लव्ह जिहादचे आरोप फेटाळले, मुलगी पती सोबतच राहणार.

खंडाळयाजवळ मालगाडीचे दोन डब्बे घसरले, पुण्याला जाणारी वाहतूक ठप्प. अनेक गाड्या रद्द.


भुवनेश्वर = ओदिशा मध्ये स्वबळावर निवडणुका लढणार, अमित शाह यांनी केली घोषणा

औरंगाबाद = अनधिकृत वाहन पार्किंग प्रकरणी प्रोझोन मॉलच्या एजन्सी विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई


कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नवीन पक्ष स्थापन करणार, स्वाभिमानीला सोडचिठ्ठी नंतर खोत यांचा मोठा निर्णय.

जालना = डॉ. अंकुश बागल यांची आत्महत्या, परतूर तालुक्यातील चिंचोली शिवारात आढळला मृतदेह, मंठा येथे होता दवाखाना.

पंढरपूर = विठू माउलीच्या दर्शनासाठी आता टोकन पद्धत लागू करणार, मंदिर समितीची माहिती.

औरंगाबाद = कुत्रा मध्ये आल्याने रिक्षा उलटली, अपघातात शेख जावेद शेख हमीद या रिक्षा चालकाचा मृत्यू , जालना रोडवरील चिकलठाणा येथील घटना.

नाशिक = ब्रह्मदेशातील मुस्लिमांवर झालेल्या अन्याय अत्याचार विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती मुस्लिम ब्रिग्रेडच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

गोंदिया = किटकनाशक प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या, ही घटना आमगाव तालुक्यातील चिखली येथे गुरुवारी घडली.

टाडा कोर्टात शिक्षा सुनावली गेल्यानंतर अबू सालेम आणि फिरोज खान मध्ये बाचाबाची.

अहमदनगर  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बन्सीभाऊ तुकाराम आठरे यांची, तर उपसभापतीपदी मंगल राजेंद्र गर्जे यांची बिनविरोध निवड.

महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या आत्महत्ये प्रकरणी एसीपी निपुंजे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर आता ज्या कॉन्स्टेबल बरोबर लग्न होणार होते त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई = माझ्या जीवाला महाराष्ट्रात धोका, दिल्लीच्या तुरुंगात पाठवण्यासाठी अबू सालेमची न्यायालयात याचिका.

यवतमाळ = गणेशोत्सवातील बंदोबस्ताचा क्षीण घालविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलिसांसाठी खास ‘बादशाहो’ चित्रपटाच्या खेळाचे आयोजन केले होते.

कुडाळ येथील दहावीत शिक्षण घेत असलेल्या शुभम दिंगबर नार्वेकर वय वर्षे 16 या मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

यवतमाळ येथील गोदनी रोड स्थित माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपिक उमेश गावंडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, लाच स्वीकारताना केली रंगेहात अटक.

1993 मुंबई साखळी स्फोट : फिरोज खान व ताहिर मर्चंटला फाशीची शिक्षा तर रियाज सिद्दीकाला 10 वर्षांची शिक्षा.

जळगावच्या महापौरपदी ललित कोल्हे यांची बिनविरोध निवड, कोल्हे हे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीचे उमेदवार आहेत.

1993 मुंबई साखळी स्फोट : अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा, दोन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे तर करीमुल्लाह खानला जन्मठेपेची शिक्षा.

सीबीआयचे लालू प्रसाद यादव यांना 11 सप्टेंबरला तर त्यांचा मुलाला 12 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश.

राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले यांची शिष्यवृत्ती सोडण्याची तयारी, शिष्यवृत्ती निवडीवरुन वाद सुरु असल्याने निर्णय.

शिर्डी = संगमनेरच्या पोखरी बाळेश्वर येथे मुलाची हत्या करुन वडिलांची आत्महत्या.

यवतमाळ = कर्जमाफीचे फॉर्म मिळवण्यासाठी तसेच आधारकार्डाचा क्रमांक मोबाईलशी लिंक करण्यासाठी पहाटे पासूनच शेतकरी आणि विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात रांग.

यू एस ओपन टेनिस टुर्नामेंट. रॉजर फेडररचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव. युआन डेल पोत्रोकडून रॉजरचा पराभव.

यवतमाळ = लालगुडा येथील सरपंच मिना बुरडकर (35) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला, चंद्रपुरात सुरू होते उपचार.

काश्मीर =  बडगाम मध्ये हुर्रियत नेते आगा सैयद हुसैनच्या घरावर एनआयएचा छापा.

ब्लू व्हेलच्या नादात आत्महत्या करण्यापासून वाचवलेल्या जोधपूर मधील मुलीचा पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न.

No comments:

Post a Comment