Breaking News
Loading...

Sunday, 10 September 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

श्रीलंकेचा संघ 8 वर्षानंतर पुन्हा पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यास तयार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंके विरुद्धच्या सीरिजची घोषणा केलीये. 28 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती(यूएई) ही सीरिज सुरु होतेय. यात दोन कसोटी सामन्यांचाही समावेश आहे. ज्यात पाच वनडे, आणि तीन टी-२० सामन्यांचा समावेश आहे.

ऑक्टोबर मध्ये कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होणार. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शताब्दी सांगता सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची माहिती. बँकेच्या कार्याची सीएम आणि पवारांकडून प्रशंसा.

सुट्टी संपवून हिंगोलीतील लष्कर सेवेत रुजू होणारा जवान गेल्या बावीस दिवसापासून गायब , पोलीस आणि रेल्वे पोलीसांचा निष्कळजी पणावर जवानाच्या कुटुंबियाचीही टीका.

भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन, मुंबईत अल्पशा आजारानं झालं निधन.

अमेरिकेची बिगर मानांकित स्लोआन स्टीफन्स अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीची नवी विजेती ठरली आहे. स्लोआन स्टीफन्सने अमेरिकेच्याच मॅडिसन कीजचा 6-3, 6-0 असा धुव्वा उडवून, महिला एकेरीच्या विजेतेपदावरआपलं नाव कोरलं.

औरंगाबाद = येत्या 72 तासांत मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता.

पूर्वी विक्रीकर असताना 70 हजार व्यापारी कर भरत होते, आता जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर ही संख्या अडीच लाखांवर जाऊन पोहचली आहे, जीएसटीमुळे आगामी काळात राज्याला 10 ते 15 हजार कोटी रुपये अधिकचे उत्त्पन्न मिळेल- देवेंद्र फडणवीस

पुणे शहरात ढगांच्या गडगडासह मुसळधार पावसाला सुरुवात. तर धुळे जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस.

उस्मानाबाद = तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास अनिवार्य केला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. कर्मचारी, भाविकांसह पुजार्यांनाही प्रवेशावेळी हा पास सक्तीचा असेल.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी विजेच्या गडगटासह मुसळधार पाऊस, काही भागातील वीज पुरवठाही खंडित, बीएसएनएलसह इंटरनेट सेवाही कोडमडली.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यूप्रकरणी विभागीय आयुक्त महेश झगडे यांची जिल्हा रुग्णालयाला भेट, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे यांच्या कडून संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरू.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 12 सप्टेंबरला बोलावली.

धुळे = शिंदखेडा तालुक्यातील आमराळे येथील 28 वर्षीय तरुण शेतक-यानं रविवारी कर्जबाजारी पणाला कंटाळून विषप्राशन करून आत्महत्या केली.

दुग्धविकास मंत्री, पालक मंत्री व अन्य मंत्र्यांच्या घरातील दूध पुरवठा बंद करू - अतुल खुपसे

सोलापूर = लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग सर्व्हे सुरू, खा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

यवतमाळ = गॅस सिलिंडर मध्ये गळती झाल्याने लागलेल्या आगीत दोन दुकानांसह एक घर भस्मसात. महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे रविवारी दुपारी 3.30 वाजताची घटना.

लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव सीबीआय समोर रेल्वे टेंडर प्रकरणात 11आणि 12 सप्टेंबरला हजर होणार नाहीत.

पुणे = महात्मा फुले कृषी विद्यापीठा तर्फे आयोजित कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

मुंबई = सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ. पीडब्ल्यूडी राज्यमंत्र्यांनी केली महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी

दिल्ली = पाच वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणाचा चौकशी करण्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश.

अकोला = पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह नायगाव डम्पिंग ग्राउंडमध्ये एका पोत्यात बांधून असलेला आढळला, मुलीच्या गुप्तांगावर प्रचंड जखमा आहेत, मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय.

वर्धा = देवळी पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सुधीर वैकुंठराव उईके (40) याने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट.

कल्याण = आईने दोन चिमुकल्या मुलांसह पेटवून घेत केली आत्महत्या, पश्चिमे कडील वाडेघर नायकवाडी परिसरातील घटना.

जालना = दाभाडी ता. बदनापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, पाच आरोपीवर गुन्हा दाखल.

औरंगाबाद = बँक अधिकारी जितेंद्र होळकर हत्या प्रकरणी पत्नीला अटक.

अखिल भारतीय साहित्य संमेलन यंदा विदर्भात, साहित्य संमेलनाच्या याजमानपदाचा मान हिवरा आश्रमाला.

अहमदनगर = संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथे बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून बहीण भावाचा मृत्यू.

No comments:

Post a Comment