तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 11 September 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻


_________________________

यंदा ऑक्टोबर मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सत्र परीक्षा होणार नाहीत; या परीक्षा नोव्हेंबर मध्ये सुरू होतील.

मुंबई = लालबाग राजाच्या मिरवणुकीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक: 40 मोबाईल हस्तगत; 5 आरोपींना अटक; कर्नाटक, मुंबई आणि आसपासच्या परिसरातील गुन्हेगार.

जर्मनीतील फ्रॅंकफर्ट विमानतळावर केमिकल हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे विमानतळ आणि परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. तर, अनेकांच्या डोळ्यांना इजा पोहोचली आहे.

सिंचन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सुनील तटकरेंना क्लीन चिट नाही... एसीबीची स्पेशल कोर्टाला माहिती. घोटाळा प्रकरणी 7 बड्या अधिका-यांविरोधात आरोपपत्र दाखल.

कच-यात डेब्रिसची भेसळ करून मुंबईत कंत्राटदारांचा कोट्यवधींचा घोटाळा. कंत्राटदारांनी अधिका-यांच्या संगनमतानं महापालिकेला लावला 160 कोटींचा चुना.

विवाहबाह्य संबंधांत अडसर ठरणाऱ्या दोन चिमुरड्यांची जन्मदात्या आईनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी माता सोनाली मिसाळला अटक करण्यात आली असून न्यायालयानं तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बीड = 106 बोगस स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांवर कारवाई, बडतर्फ करुन फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश.

पिंपरी = महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलाची हत्या, चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज समोर झालेल्या वादातून दोन अज्ञातांची मारहाण, रुग्णालयात मृत्यू.

अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद कोर्टाला 10 दिवसांत नवा पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे दिले निर्देश.

देशभरातील 7 खासदार आणि 98 आमदारांची संपत्ती प्राप्तिकर विभागाच्या रडारवर.

खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांना भेटणार, राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्याकडून मला ऑफर- नाना पटोले.


मुंबई आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात.

सिंधुदुर्ग = येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले सतर्कतेचे आदेश.

जम्मू-काश्मीर = पाकिस्तान लष्कराकडून पुंछ सेक्टर मध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराचंही चोख प्रत्युत्तर.

कोंढाणे धरण घोटाळ्यातील सात आरोपींना सशर्त जामीन मंजूर.

सोलापूर = जुनी मिल जागा फसवणूक प्रकरणी मुख्य आरोपी सुरेंद्र कर्णिक यास 17 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश़.

नाशिक = गणेशोत्सव मिरवणुकीत लाऊडस्पीकर लावून ध्वनिप्रदूषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी नामंजूर केला.

यवतमाळ = शस्त्रसाठा घेऊन उमरखेड शहरात आलेल्या पुसदच्या तरुणाला पोलिसांनी पकडले. एक बंदूक, पाच जीवंत काडतूस, एक वापरलेले काडतूस, तीन सु-या, फायटर जप्त करण्यात आले. मुबलिक कय्युम खान असे तरुणाचे नाव आहे.

मुंबई = 22275 उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी आल्या आहेत. तसेच, फोटो कॉपी 4920 आल्या आहेत - प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे

मुंबई = 35,188 उत्तर पत्रिकाचा शोध सुरु आहे- प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे


आता फक्त वाणिज्यचे आयडॉलचे निकाल बाकी आहेत - प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रजेवर असल्याने माझी नियुक्ती झाली आहे, माझ्यावर जबाबदारी विद्यापीठाचे निकाल लावणे ही आहे - प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे

मुंबई विद्यापीठात सुरु असलेल्या निकालाच्या गोंधळानंतर तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे माध्यमांशी बोलले आहेत.

परभणी = मनपाच्या वाढीव घरपट्टी व मालमत्ता कराच्या विरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, नागरिक, विविध संघटना शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.

हिंगोली = खटकाळी परिसरात महादेव असराजी बांगर यांचा मृतदेह आढळला, पोलिसांनी हत्या असल्याचा संशय व्यक्त केला.

एअर इंडियाच्या विमानातून दुबईहून आलेल्या दोघांकडून 3 किलो सोने जप्त केले, या सोन्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.


धुळे शहरातील रंगारी चाळीतील एका मंदिराला रंग देताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने दोन तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडे बारा वाजता घडली.

अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्या साठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला.

हिंगोली = शेतकरी कर्जमाफी तात्काळ करावी या मागणीसाठी सेनगाव तहसील कार्यालयावर काँग्रेसचा महामोर्चा.

नाशिक = पंचवटीतील सराईत गुन्हेगार सचिन रावसाहेब मोकळ याचा धारदार हत्याराने खून करणा-या तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बीड = 23 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडल्याने मॄत्यू, पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील घटना.

No comments:

Post a Comment