तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 13 September 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻


_________________________

शिंजो आबेंच्या स्वागतासाठी कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि देशाच्या विविध भागातून बौद्ध भिक्षूकही अहमदाबाद मध्ये दाखल झाले होते. त्यांनी पंतप्रधान शिंजो आबेयांचं विमानतळावर स्वागत केलं. जपान हा बौद्ध धर्मीय देश आहे. त्यामुळे जपानच्या लोकांच्या भावना या भारताशी देखील जुळलेल्या आहेत.

राज्यात मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. या मोर्चाची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. याचे अध्यक्षपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेय.

​नाशिक = ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी अधिका-यांनाच वीज चोरी करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक मध्ये उघड झाला. हा प्रकार प्रसार माध्यमांच्या लक्षात आल्यावर सारवासारव करताना या अधिका-यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले. मग केवळ अतिरिक्त कनेक्शन असल्याचा केविलवाणा दावा अधिका-यांनी केला.

मुंबई = आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी - दिवाकर रावते.

नाशिक जिल्हयात 776 ग्राम विद्युत व्यवस्थापकांची महिनाभरात नियुक्ती, ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचा आदेश.

कोल्हापूर = हातकणंगले लोकसभा मतदार संघातून धैर्यशाल माने यांनी उमेदवारी जाहीर केली. पक्ष नंतर ठरवू शेतकरी संघटना नव्हे राजकीय शेतकरी संघटना असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

अहमदनगर = अकोले येथील वैद्यकीय अधिकारी लाचेच्या जाळ्यात, कर्मचा-याची रजा मंजूर करण्यासाठी दीड हजार घेतले.

काबूल मधील क्रिकेट स्टेडियमकडे जाणाऱ्या मार्गावरील चेकपोस्टवर दहशतवादी हल्ला, 2 सुरक्षा रक्षक ठार. सर्व खेळाडू सुरक्षित : टोलो न्यूज

डोंबिवली = महानगर गॅस कंपनीतर्फे सुरु असलेल्या पाईप लाइनचे काम मिलापनगर, एमआयडीसी, डोंबिवली पर्यंत पूर्ण झाले आहे. या कामाचा शुभारंभ श्रीधर सुदामा इमारतीच्या जवळ उद्या 5 वाजता खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

उल्हासनगर महापालिका परिवहन सेवेचे सभापती म्हणून भाजपा आघाडीतील साई पक्षाचे भावेश चेलानी यांची निवड झाली. मात्र पालिका परिवहन सेवा गेल्या 4 वर्षांपासून बंद असून समितीवर मात्र लाखोंचा खर्च होत आहे.

पुणे = जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त, तोडगा न निघाल्यास देशव्यापी बंद, दि पूना मर्चंट चेंबरचा इशारा.

लातूर शहरालगत असलेल्या सारोला तलावात दोघा शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल.

अहमदनगर शहरातील एमआयडीसी जवळचं कोटक महिंद्रा बँकेचं एटीएम लुटण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीत कैद.

पुणे = डॉ. मेधा खोलेंवर कारवाई साठी मोर्चा काढणार. 25 सप्टेंबरला खोलेंविरोधात विविधसंघटनांचा मोर्चा. संभाजी ब्रिगेड, छावासह विविध संघटना घेणार सहभाग.

No comments:

Post a Comment