तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Friday, 15 September 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻


_________________________

पंतप्रधान नरेंद्र मोदीयांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्याचे आदेश भारतीय जनता पार्टीने सर्व खासदार आणि आमदारांना दिले आहेत. मोदींचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी हॉस्पिटल, बस स्टॅंड, तलाव, शाळा, महापुरूषांचे पुतळे, गार्डन, समाज भवन येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी. तसेच, वॉर्ड स्तरावर आणि झोपडपट्टी भागात मेडीकल कॅम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले अधिकारी, तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष  तुकाराम मुंढे यांनाजीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.तुकाराम मुंढेयांना पत्र लिहून पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली = पोट सुटलेल्या पोलीसांचा यापुढे राष्ट्रपती पोलीस पदकासाठी विचार केला जाणार नाही, केद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात नियमावली जारी.

भंडारा जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं तीन जणांचा मृत्यू , एकूण 19 रुग्णांवर उपचार सुरू.

राहुल गांधी महिन्याभरात निवडून येणार काँग्रेसच्या अध्यक्षपदी - वीरप्पा मोईली

BCCI मध्ये वशिला नसल्यामुळे मुख्य प्रशिक्षक झालो नाही, विरुचा गौप्यस्फोट.

सोलापूर = उजनी धरणातुन भीमा नदीत 70 हजाराचा विसर्ग, बेंबळेचा बंधारा पाण्याखाली.


पंढरपूर = उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. चंद्रभागेच्या काठावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

सोलापूर = काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा.


गाेंदिया = ग्रामपंचायत निवडणूकीच्या कामात हयगय केल्याप्रकरणी सडक अर्जुनी नगरपंचायतच्या एका कर्मचाऱ्यावर सीईओंनी केली निलंबनाची कारवाई.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय धान्य वितरण ठप्प, कुडाळात गोदामासमोर गाड्या उभ्या, बिले थकल्याने वाहतूकदारांचे काम बंद आंदोलन.

अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर येथील जवान दत्तात्रेय बाळासाहेब बनकर (वय 34) हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना शहीद, आज सायंकाळी अकोळनेरला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतली प्रद्युम्नच्या कुटुंबियांची भेट.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कायम कर्मचा-यांना 19 हजार व कंत्राटी कामगारांना 12 हजार रूपये सानुग्रह अनुदान स्थायी समिती मध्ये मंजूर

सोलापूर = एसटी चालकास पोलीसांची मारहाण, दगड मारून एसटीच्या काचाही पोलीसांनी फोडल्या़

पिंपरी-चिंचवड = राजकीय पूर्ववैमनस्यातून काँग्रेसचे माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खून करण्यासाठी त्या तीन आरोपीना जेलमधून पळवून लावल्याचे उघड झाले आहे, याप्रकरणी अॅड. सुशील मंचरकरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.


राजस्थान = बारमेर येथे सहा वर्षाच्या चिमुरडीवर शाळेत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना.


परभणी = घरकुल कामासाठी 2 हजार रुपयांची लाच घेताना गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील ग्रामसेवक चतुर्भुज.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.


पंढरपुरात पूर परिस्थिती, नदी पात्रातील अनेक मंदिरे पाण्याखाली


बीड = तत्कालीन शिवसेना बीड तालुका उपप्रमुख मधुकर शिंदे यांच्या खून प्रकरणात अशोक पवार, अनिल पवार व देविदास पवार या तीन आरोपीना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेप.

अकोला = बाळापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पुलिस उप निरीक्षक संजय पारस्कर यास 1500 रुपयांची लाच घेताना अटक.

नागपूर = आंतरधर्मीय विवाह प्रकरणात मुलीचे बयान नोंदवून रेकॉर्डवर आणण्याचे हायकोर्टाचे निर्देश.


नाशिक मनपात नवरात्री गाळ्यांच्या लिलावातून राडा. लिलावात सहभागी दोन गटात हाणामारी. भाजपा नगरसेवकाने मारहाण केल्याचा आरोप. 4 लाखांचा लिलाव 13 लाखांत गेल्याने वाद. नाशिक मनपात तणाव, पोलीस बंदोबस्त वाढवला.

औरंगाबाद = इमारतीचं बांधकाम सुरू असताना मजुराचा इमारतीवरून पडून मृत्यू. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं सुरू होतं बांधकाम. कल्याण नारायण आंबेकर असं मजुराचं नाव.


अकोला = भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू. ट्रक चालकाला अटक.

गडचिरोली = पोलीस व नक्षल्यांमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार. धानोरा तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रांतर्गत भेंडीकन्हार जंगलात घडली घटना.

लंडन मध्ये अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर स्फोट. काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती. पार्सन्स ग्रीन स्टेशनवर स्फोट झाल्याची माहिती. पांढऱ्या रंगाच्या बॉक्स मध्ये स्फोट.

मुंबई = मेट्रो 3 प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयार खोदण्यास हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती, हेरिटेज इमारतींना धोका पोहोचू शकतो, हायकोर्टाची भीती.

पुणे = सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची धारदार शस्त्राने हत्या, पुर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांनी केली हत्या.

जितेंद्र आव्हाडांच्या बनावट फेसबूक अकाऊंटवरुन अभिनेत्रीसह अनेकांना मेसेज, आव्हाडांची पोलिसात तक्रा दाखल.

मुंबई =  राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा पेट्रोल दरवाढी विरोधात मोर्चा.

चंद्रपूर = गडचांदूर जवळच्या अल्ट्राटेक वसाहतीत महिन्याभरा पासून वावरत असलेला बिबट्या जेलबंद. आज पहाटे बिबट्या जेलबंद.

नागपूर व हैद्राबाद येथून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राकडे दगडी कोळश्याचीआवक सुरु. दोन संचास 4 दिवस पुरेल ऐवढाच साठा शिल्लक.

गडचिरोली = सीआरपीएफ जवानाची छातीत गोळी झाडून आत्महत्या, अहेरी येथील कॅम्प मध्ये सकाळी 8 वाजताची घटना. अमीतकुमार असे त्याचे नाव असून तो हरियाणातील मूळ रहिवासी.


मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमाला महापौरच गैरहजर. महापौर-आयुक्तांमधील यांच्यातील कुरबुर उघड. आयुक्त पालिकेच्या कार्यक्रमाची माहिती देत नाही. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा आरोप.

No comments:

Post a Comment