तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 17 September 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांनी केलेल्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्या विरोधाच आज पहाटे एफआयआर दाखल करण्यात आली.

आठवड्याभरात लोडशेडिंग बंद, ऊर्जामंत्री बावनकुळेंचं आश्वासन.

शनिवारी लोअर परळ मधील सेंट रेजिस हॉटेल मधे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंची भेट, दोघांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा.

कोरिया ओपन फायनल - पी. व्ही. सिंधूनं पहिला सेट 22-20 अशा फरकानं जिंकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सरदार सरोवरचं लोकार्पण झालंय. पंतप्रधान नेहरूंनी तब्बल 56 वर्षांपूर्वी भूमीपूजन केलेल्या या प्रकल्पाचं आज लोकार्पण झालं आहे.

औरंगाबाद = वेदांतनगर आणि पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन .

मराठवाडा मुक्ति संग्राम राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील  जनतेला राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या शुभेच्छा.

औरंगाबाद = दमणगंगा-पिंजारचे पाणी मराठवाड्यात आणणार, वॉटर ग्रीडकरून मराठवाडा सुजलाम सुफलाम करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

मध्य प्रदेश = भाजपचे अल्वर येथील खासदार महंत चंद्रनाथ यांचं वयाच्या 61 व्या वर्षी निधन.

मोदींचा वाढदिवस देशभरात 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार; ठिकठिकाणी रक्तदान आणि स्वच्छता शिबिरांचं आयोजन.

आॅस्ट्रेलिया विरुद्ध आज पहिली वन-डे, विराटसेनेचे विजयाचे लक्ष.

बांगलादेशात रोहिंग्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये चेंगराचेंगरी, तीन ठार.

No comments:

Post a Comment