तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 17 September 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

सातारा जिल्हा बार असोशियनचे अध्यक्ष अॅड दीपक गाडे व जलतरणपटू अर्थव शिंदे यांचा अपघाती मृत्यू.

गोवा = राय-मडगाव येथील 5 जण नागामड्डी कारवार येथील धबधब्यात बुडाले. 3 महिलांचा मृत्यू; एक पुरुष, एक महिला बेपत्ता.सहलीला गेला होता 50 जणांचा गट.

कोल्हापूर = खानविलकर पेट्रोल पंपानजीक ड्रेनेज पाईपवर दुचाकी आदळल्याने अपघात, दोन जण ठार.

2 वर्षात 40 टक्के शेत जमीन सिंचनाखाली आणणार, सिंचन वाढले तर शेतकरी आत्महत्या कमी होतील - नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन वाहिली श्रद्धांजली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरूवात, सखल भागात पाणी साचलं.

भारत- ऑस्ट्रेलिया वनडे - सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय, ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू होण्यास विलंब.

धुळे = शिदखेड़ा तालुक्यातील दताणे येथे शेतात थ्रेशर मशिनमध्ये साडीचे पदर अडकून गळफास लागल्याने 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना.


अमरावती = उपचाराच्या नावावर विवाहितेला मध्यप्रदेशात विकले, शेंदूरजनाघाट येथील घटना,दोन महिलांसह चार गजाआड.

भिवंडीतील वऱ्हाळादेवी तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या 13 वर्षाच्या मुलाचाबुडून मृत्यू

महाराष्ट्र हे भिकरचोट राज्य, त्यांच्याकडून विदर्भाच्या विकासाची अपेक्षा करणे मूर्खपणा - श्रीहरी अणे

भारत- ऑस्ट्रेलिया वनडे : भारताने ऑस्ट्रेलियाला दिलं 282 धावांचं आव्हान.

आमचा भारत आता कमकुवत राहिलेला नाही, जगातला शक्तीशाली भारत बनला आहे - राजनाथ सिंग


कोपर्डी अत्याचार प्रकरण,11 आॅक्टोबर पासून अंतिम युक्तिवाद - उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती.

दिवाळीमध्ये 14 ते 31 ऑक्टोबर याकालावधीत बस भाड्यामध्ये 10 ते 20 टक्के होणार वाढ. एसटी महामंडळाचा निर्णय.

मुंबई = 'शहर प्रवेश बंदी' विरोधात खासगी बस चालकांनी 19-20 सप्टेंबरचा नियोजित संप तात्पुरता पुढे ढकलला.

चेन्नई = आरजेडीचे खासदार मोदम्मद तस्लिमुद्दीन यांचे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात निधन.

कोलंबो = गैरवर्तन व खिलाडूवृत्तीचे उल्लंघन केल्या प्रकरणी फलंदाज चामरा सिल्वावर 2 वर्षांची बंदी, श्रीलंकन क्रिकेट मंडळाचा निर्णय.

नाशिक  = आई सोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू, घोटी येथील घटना, नेहा जगदीश लहामगे (14) आणि साहिल जगदीश लहामगे (10) अशी मृतांची नावे.

No comments:

Post a Comment