तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 September 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

मुंबईतल्या भेंडीबाजारातल दाऊदचं वडिलोपार्जित घर होणार जमीनदोस्त.  हुसेनी इमारत दुर्घटनेनंतर डांबरवाला इमारतीला धोकादायक असल्याची नोटीस.

खडसेंच्या कथित भ्रष्टाचार चौकशीसाठी नियुक्त केलेल्या झोटिंग समितीवर 13 महिन्यांत 45 लाख रूपयेखर्च. तर वेतनापोटी 28 लाखांचा खर्च. अहवालावर कारवाई मात्र शून्य

सैन्य दलात स्त्री-पुरुष भेदभाव संपवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सैन्यात जवळपास 800 महिलांची भरती केली जाणार आहे. यामध्ये 52 महिला जवानांची भरती दरवर्षी केली जाईल. देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी पदभार स्वीकारताच दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला.

रांगेत उभं राहून लालबागच्या राजाला फसवलं, दान पेटीत हजाराच्या जुन्या नोटा!

डेराने मृत्यू प्रमाणपत्रा शिवाय 14 मृतदेहांचं यूपीतील मेडिकल कॉलेजला केलं दान.

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान नरमलं, आता म्हणतात चर्चेने काढू शकतो तोडगा.

सलाम ! शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक सैन्यात रुजू, अंत्यविधीवेळी घेतलेली शपथ केली पुर्ण.

नोटाबंदी - तामिळनाडूत एका बेनामी खात्यात सापडलं 246 कोटी रुपयांचं घबाड.

पुणे = ट्रकची बाईकला धडक बसून झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू. हडपसर येथील वैदुवाडीमधील मेगासेंटरजवळ दुर्घटना. चंद्रकांत गायकवाड मृत व्यक्तीचे नाव.

सिंधुदुर्ग = देवगड मधील महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजारचा मुख्याध्यापक सदाशिव पाटील व सहआरोपी संतोष वरेरकर एसीबीच्या जाळ्यात, नोकरीत कायम स्वरूपी नेमणूक देण्यासाठी एकाकडे केली होती 10 लाख रुपयांची मागणी. 5 लाख रुपये स्वीकारताना अटक.

रत्नागिरी = रिफायनरी प्रकल्पा विरोधात जाणार, सागवे परिसरातील 14 गावातील लोकं एकवटली. ग्रामस्थांनी काढला राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा.

नाशिक = ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांना अटक करण्यासाठी पोलीस काजीपुरा चौकात दाखल, परिसरात तणाव.

पुणे = महात्मा कृषि विद्यापीठाच्या वतीने रविवार पासून 4 दिवस कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते महोत्सवाचे होणार उद्घाटन.

मंगरूळपीर = कंझरा येथे गणपती मिरवणुकीदरम्यान झाली होती हाणामारी, 8 ते 10 जण झाले जखमी. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून गावात दंगल नियंत्रण पथकाचे 23 कर्मचारी तैनात.

भाजपाध्यक्ष अमित शहा आज मुंबईत, राज्यातील आमदार - खासदारांची घेणार भेट.

जम्मू काश्मीर = बारामुल्लातील सोपोर येथे सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक.

औरंगाबाद = छत्रपती नगरात जिल्हा मध्यवर्ती बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांची राहत्या घरात गळा चिरून हत्या. पोलीस करत आहेत तपास.

सोलापूर = गर्भलिंग निदान करणारी मशिन ताब्यात, फलटण येथील डॉक्टर डेंभूर्णी यांच्या सोबत गर्भलिंग निदान करणारी महिला आणि नातेवाईकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

संजय देशमुख यांचे राज्यपालांना पत्र, मुंबई विद्यापीठाच्या सेवेत पुन्हा रूजू होण्याची इच्छा केली व्यक्त.

यूएस ओपन : सानिया मिर्झा व पेंग जोडीचा उपांत्य फेरीत पराभव, मार्टिना हिंगिस- युंग जान चान जोडीनं त्यांच्यावर 6-4,6-4 असा मिळवला विजय.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आजपासुन 4 दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौ-यावर.

भिवंडी =  रहानाळ गावाच्या हद्दीतील रस्त्यांमध्ये झालेल्या खड्डयात पडून दुचाकीचा अपघात , दुचाकीस्वार खाली पडल्यानंतर वेगाने जाणारा ट्रक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तरूण जागीच ठार.

No comments:

Post a Comment