तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 October 2017

रिसोड शहरात हुंबाड (पाटील ) बंधु यांचे नविन पाटील मल्टी सव्हिर्ससे चा प्रारंभ

रिसोड प्रतिनिधी महेंद्रकुमार महाजन

मूळचे महागाव येथिल नामदेवराव   हुंबाड (पाटील ) यांनी ग्रामीण जनतेचा त्रास पाहता काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनाशी ठेवुन रिसोड शहरात पाऊल ठेवले शिवसेना उपतालुका प्रमुख चे पद तसेच संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष पद एकेकाळी सांभाळीत राजकीय व सामाजिक कार्यात नेहमी सिहांचा  वाटा उचलणारे असे हे व्यक्तिमत्व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवित स्वामी विवेकानंद आर्दश माननारे त्यांचे चिरंजीव अनिल नामदेवराव  हुंबाड (पाटील )गेली अनेक वर्षे  रिसोड मध्ये वास्तव्यास आहेत ते मागील 12 पासुन पाटील झेराॅव्स  माध्यमातून जनतेची सेवा करीत आहेत
              आज 21 व्या शतकात युग खुप पुढे जात आहे त्याला अनुसरून पाटील मल्टी सव्हिर्स सुरुकरण्याचा मानस पूर्णत्वाकडे जात आहे या ऑनलाईन चे सर्व फार्म ,मोबाईल रिचार्ज झेराॅव्स फोन बिल पॅन कार्ड नोकरी विषयक माहिती रबर स्टॅम्प  ग्राम पंचायत स्टेशनरि उपलब्ध ठेवल्या आहेत 
             अधिक माहिती साठी 9970428115 अनिल पाटील महेंद्रकुमार महाजन 9960292121,9420352121 या क्रमांकावर आपण संपर्क साधु शकता 
         भरपुर सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस हुंबाड (पाटील ) नेहमी मनशी बाळगत त्यानुसार परिवर्तन घडवित

दिंनाक  4/11/2017 गुरुनायक जयंती दिवशी रिसोडकरांच्या सेवेत पाटील मल्टी सव्हिर्स करण्याचा संकल्प पुर्ण होत आहे आपल्या वडिल धार्याच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आपण या व्यवसाया मध्ये प्रगती करीत आहोत ग्राहकांचे मन दुखणार नाही त्यांचा विश्वास कायम राहावा या साठीच अल्पसा प्रयत्न 
           रिसोड च्या जनते नी व ग्राहकांनी आम्हास भरभरून प्रेम दिले त्यांच्या सहकार्याने व पाठिंब्याने एक पाऊल पुढे टाकतांना मनापासून आनंद होत आहे पाटील मल्टी सव्हिर्स सुरु करुण काहिअंशी ग्राहकांना सेवा देण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून पाटील मल्टी सव्हिर्स  सेवा मुंदडा  काॅम्प्लेव्स वाशिम नाका रिसोड येथे शुभारंभाच्या दिशेने वाटचाल करीत आहे सर्व ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही सतत  करीत राहु रिसोड शहाने आम्हाला नाव किर्ती सोबतच प्रतिष्ठा दिली रिसोड नगरीने भरभरून न दिलेल्या प्रेमाचे मुल्यांकन कधीही होणार नाही आणि रिसोड करांचे ऋण आम्हा कडुन कदापी फिटणार नाही  शासकीय व खाजगी सेवाचा लाभ आपण घ्यावा 

महेंद्रकुमार महाजन जैन
      रिसोड प्रतिनिधी
मो 9960292121

'सत्ता आणणाऱ्यांऐवजी राणेंना पक्षात स्थान

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

पक्षासाठी ज्यांनी उभं आयुष्य घालवून सत्ता खेचून आणली, ते आज पक्षाबाहेर आहेत आणि  नारायण राणें सारखे ‘त्यागी’ नेत्यांना पक्षात स्थान आहे, अशा बोचऱ्या शब्दात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.धुळे शहरात ‘आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकनाथ खडसें सोबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हेही उपस्थित होते. यावेळी पक्षाबाहेर ठेवल्याची आपल्या मनातील खंत एकनाथ खडसे यांनी श्याम जाजू यांच्या समोर व्यक्त केली. ज्यांना आणीबाणीचा काळ माहित असलेले मोजकेच नेते सध्या भाजपात आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाची असल्याचा टोला एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांना लगावला.

सरकारी रूग्णालयात डॉक्टर नसल्यास 104 क्रमांकावर करा तक्रार


_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

अनेकदा सरकारी रूग्णालयांमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याने अनेक रूग्णांना उपचारा अभावी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप बघायला मिळतो.मात्र अशा डॉक्टरांची तक्रार कुणाकडे करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. पण या प्रश्नाचे निरसन झाले आहे. आता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यास आरोग्य सल्ला संपर्क केंद्राच्या 104 क्रमांकावर नागरिक तक्रार करू शकतील. ही सुविधा 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. केंद्राच्या माध्यमातून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांना त्वरीत रुग्णालयात उपस्थित राहण्याबाबत कळविले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी दिली.आपत्कालीन परिस्थितीत पहिला अर्धातास हा अमूल्य असतो. या कालावधीत रुग्णांवर उपचार झाल्यास त्यांना होणारा त्रास, मृत्यूदर कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णांचा सार्वजनिक आरोग्य सेवेवरचा विश्वास अधिकाधिक दृढ होण्यास मदत होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या सेवेमुळे रूग्णांना गरजेनुसार वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

संपक-यांची पगारकपात; एसटीचे नमते धोरण, निर्णय बदलला.

_________________________

नंदु नाईक, तेज न्युज हेडलाईंस, मुंबई

एसटी कर्मचा-यांच्या चार दिवसांच्या संपप्रकरणी 36 दिवसांचे वेतन कपात करण्याच्या निर्णयावर महामंडळाने अखेर नमते धोरण घेतले. एसटी महामंडळाच्या तुघलकी निर्णयामुळे कर्मचा-यांमध्ये नाराजी वाढत असल्याने संप काळातील 4 दिवसांसाठी 8 दिवसांची अर्जित रजा समर्पित केल्यास पगारकपात होणार नाही. अन्यथा संपकालीन कर्मचा-यांचे चार दिवसांचे वेतन कपात होईल, अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे. चार महिने टप्प्याटप्याने ही कपात करण्यात येईल. एसटी महामंडळ कर्मचा-यांच्या सोबत असून संपकाळात कर्मचा-यांनी एसटीच्या मालमत्तेचे किंवा वाहनांचे नुकसान केलेले नाही, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. याआधी चार दिवसीय संपाची नुकसान भरपाई म्हणून कर्मचा-यांचे 36 दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. संप काळात एसटी महामंडळाचे 125 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा महामंडळाने केला. त्यानुसार नुकसान भरपाईसाठी तब्बल 311 कोटी वसुलीचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला. हा प्रकार म्हणजे दुस-या संपाची नांदी असल्याची कबुली महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 17 ते 20 आॅक्टोबर दरम्यान संपामुळे, दर दिवशी 22 कोटींचे नुकसान झाले. दिवाळीच्या दिवसांमधील उत्पन्नातील वाढ लक्षात घेता, चार दिवसांत 125 कोटींचे नुकसान झाल्याचे महामंडळाचे म्हणणे होते. मुळात 18 महिने उलटूनही वेतनवाढ न मिळाल्यामुळे कर्मचारी नाराज आहेत. त्यातच संपक-यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याने कर्मचा-यांमध्ये नाराजी होती. ती लक्षात घेता अखेर महांडळाने नमते धोरण घेतले. त्यानुसार 4 दिवसांसाठी 8 दिवसांची अर्जित रजा समर्पित केल्यास पगारकपात होणार नसल्याचे जाहीर केले.

अंत्यविधीच्या राखेत लावली आब्यांची झाडे

प्रदिप कोकडवार
जिंतूर
माणसाच्या मरणानंतर त्या सरणाची राख हि कोणत्याही पवित्र नदीच्या पाञात धार्मिक विधी करत सोडण्यात येते. यामुळे नदीच्या पाञातील पाणी मोठ्या प्रमाणावर दुषित होते.यामुळे पाण्यातील जीवजंतू मरण पावतात. तर ज्या व्यक्तीनी जिवंत पणी साधा मच्धंर हि मारण्याचे पाप केले नाही त्यांची अस्थीविसर्जनासाची राख पवित्र नदीत मध्ये सोडून पाण्यातील जीवजंतू मारण्याचा आपल्या काय अधिकार ? असे त्याचे आजोबा नेहमीच सांगायचे तर मी मरणानंतर माझी राख पाण्यात न टाकता ती झाडांच्या बुडाला टाका या आजोबांच्या इच्छेनुसार पाण्यात राख विसर्जित करण्याच्या या पारंपारिक पद्धतीला फाटा देत तालुक्यातील अकोली येथील नातवंडांनी आपल्या आजोबा चा सहवास नेहमी मिळत राहावा या उद्देशाने आजोबांच्या राखेत शेतात आंब्यांच्या झाडांची लागवड करून समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला आहे.
माणसांनी जिवंत पणी केलेल्या कामांची आठवण त्यांच्या मुत्यूनंतर हि कायम स्मरणात राहावी यासाठी अनेकजण वेगवेगळे सामाजीक उपक्रम राबवितात. पण तालुक्यातील अकोली येथील आंशीरामजी रानोजी रोकडे यांचे वयाच्या 82 व्या वर्षी मंगळवार 24ऑक्टोबर रोजी वृध्पकाळाने निधन झाले. त्यांनी आपल्या छोट्याशा गावासाठी अमूल्य असे योगदान दिलेले होते.त्यांना धार्मिक संसाराचे मोठे वेड होते पण दुरदृष्टी हि तेवढी प्रखर होती .त्यांनी सलग 25वर्षे गावचे सरपंच पद भूषविले तर सन 1968 साली मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गावाला दिलेल्या पहिल्याच भेटीत त्यांच्या कडून गावांसाठी तब्बल 10एकर जमिनीवर गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी तत्काळ पूर्ण करून घेतली. त्यांनी त्यांचा राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे कामे केली आहेत . त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत अंत्यत हालाखीच्या परिस्थितीत हि संसाराचा गाडा तेवढाच जोमाने चालवला आज त्याच्या परिवारात 43 सदस्यांचा समावेश आहे. आपल्या नातवंडांना आजोबा सहवास दीर्घ लाभला असल्याने त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार अस्थीविसर्जनाची राख पाण्यात प्रवाहित न करता त्या सर्व राखेत आब्यांची झाडे लावली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या आजोबा चा सहवास एकप्रकारे नेहमीच मिळणारा असला तरी गंगेच्या निर्मळ पाण्यात राख विसर्जित करणार्यासाठी हि गोष्ट प्रेरणादायी ठरत आहे.

पोलीस दला तर्फे सरदार वल्लभ भाई पटेल यांना पथसंचल द्वारे अभिवादन


प्रदिप कोकडवार
जिंतूर
जिंतूर पोलीस दला कडून आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त शहरातून प्रमुख मार्गावर पथसंचल काढून अभिवादन करण्यात आले
पो नि प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सद्या जिंतूर पोलिसात अनेक बदल करण्यात येत आहे कर्मचारी सतत गणवेशात असणे सतर्क असणे बरोबरच मुख्यालयास उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे त्या मुळे पोलीस कर्माचार्यात पण चैतन्य निर्माण झाले असून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी सतत पो नि प्रयत्नात आसतात महापुरुष जयंती फक्त फोटो पूजना पुरती न करता आज लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त पोलीस दलाकडून प्रथमच पथसंचलन केल्या मुळे शहरात पोलीस दला च्या कार्या बद्दल समाधान व्यक्त होत आहे

माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह इतरांना जामीन

सुभाष मुळे....
----------------
गेवराई, दि. ३१ __ बीड जिल्हा बँकेच्या वतीने माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्यासह इतर २७ जणांच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात जिल्हाभरात निषेध व्यक्त करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी बीड जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित व इतरांना अंतरीम जामीन मंजुर करण्यात आला.
माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित व जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या इतर संचालकां विरुध्द बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सन २००५ मध्ये मागणी केलेल्या कर्जासोबत बोगस, बनावट व पोकळस्त कागदपत्रे देवून फसवणुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होत असताना केवळ राजकीय द्वेषातून हा कारखाना सुरु होवू नये म्हणून विरोधकांनी हा गुन्हा दाखल केल्याची चर्चा जिल्हाभर होती. विविध सामाजिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या घटनेचा तिव्र निषेध करण्यात आला. गेवराई शहरासह इतर ग्रामीण भागात ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी आपले व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी भाजपा नेतृत्वाचे पुतळे जाळून संताप व्यक्त केला. मंगळवार, दि.३१ ऑक्टोबर रोजी माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित, आ.अमरसिंह पंडित, कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंह पंडित, संचालक श्रीराम आरगडे, रमेशलाल जाजू आणि कुमारराव ढाकणे यांना बीड जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. गांधी यांच्या न्यायालयात अंतरीम जामीन मंजुर करण्यात आला. लवकरच गुन्ह्यातील इतरांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
      जामीन झाल्याचे समजताच गेवराई व तालुक्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला तसेच अनेक ठिकाणी फटाके आणि तोफा वाजवून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
--------------------------
न्याय व्यवस्थेवर विश्‍वास
- आ.अमरसिंह पंडित
============
केवळ विकृत मनोवृत्तीतून दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे विरोधकांची राजकीय पातळी किती घसरली आहे हे लक्षात येते. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्‍वास आहे, या प्रसंगात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी, विविध संघटनांनी तसेच शिवछत्र परिवारावर प्रेम करणार्‍या तमाम जनतेने माझ्यावर विश्‍वास व्यक्त करून माझे मनोबल वाढविले आहे. असल्या घटनांमुळे मी विचलित होणार नाही असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन आ. अमरसिंह पंडित यांनी या बाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

कानसुर येथे डेंग्यूचे अजुन दोन रुग्न आढळले

पंधरा दिवसा पुर्वी ४ वर्षीय चिमुलीचा डेंग्यूने झाला होता मृत्यू

प्रतिनिधी
पाथरी:-तालुक्यातील कान्सूर येथील विद्या कृष्णा कोल्हे या ४ वर्षीय बालीकेचा पंधरा दिवसा पुर्वी डेंगूची लागन झाल्याने परभणी येथील खाजगी रुग्नालयात एैन दिपावलीत मृत्यू झाला होता त्या नंतर पुन्हा कान्सूर गावात दोन बालकांना डेंग्यूची लागण झाल्याने या दोन्ही बालकांना औरंगाबाद येथिल खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आले असून ग्रामस्थां मध्ये भितीचे वातावरण पसरले अाहे.
कान्सूर येथील राणी जिवन शिंदे वय 5 वर्ष अौरंगाबाद येथील संजिवनी रुग्नालयात ऊपचार घेत आहे तर पुष्पक सर्जेराव शिंदे वय 7 वर्ष  परभणीला सिध्दिविनायक येथे ऊपचार चालु आहे.
आरोग्य केंद्रातील एकही अधिकारी येऊन पहाणी करत नाही तसेच ग्रामपंचायती कडून केवळ एक वेळ फवारणी झालेली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत .डेंग्यूचा नायनाट होत नाही तोपर्यंत 8ते10 दिवसाला फवारणी करणे गरजेचे असून गावात आरोग्य विभागा मार्फत कुठल्याही सुविधा मिळत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.या साठी गावात जनजागृती करून उपाय योजना करणे गरजेचे असतांना आरोग्य विभाग जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थ सांगत असून.एैन दिपावलीत डेंग्यू ची लागण झाल्याने बालीकेचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग लक्ष देईल अशी अपेक्षा होती मात्र या कडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करून नागरीकांच्या आरोग्याशी आरोग्य विभाग खेळत असल्याने नागरीकांच्या मनात प्रचंड भिती निर्माण झाली आहे. वरिष्ठांनी तात्काळ कान्सूर गावातील या प्रकारा कडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थां मधून होत आहे.

जिजाऊ रत्न पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन


बीड प्रतिनिधी

   निर्भीड (महिला एकता)पत्रकार संघ च्या वतीने प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी  विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील नामांकित व्यक्तींचं सन्मान करून त्यांना जिजाऊ रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आहे.
निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक कार्य करण्यात अग्रेसेन आहे  1) पत्रकारांच्या विविध समस्या सोडवणे व त्यासाठी मदत करणे 2)महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील रन राघिणीचा सन्मान 3)कामगार दिनानिमित्त कामगारचा सन्मान 4) ईद मिलाप असो वो दिवाळी निमित्त गरीब होतकुरु लोकांना साठी विविध उपक्रम राबले जातात तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करुन पुढील वाटचालीस मदत कार्यक्रम 5)कृषी दिनानिमित्त वृक्ष रोपण असे विविध क्षेत्रांतील मान्यवर डाँक्टर, वकील, शिक्षक,सामाजिक संस्था ,तसेच पत्रकार यांना संघटित करुन त्याच्या प्रश्न मागीँ लावणे व त्याच्यासाठी विशिष्ट कार्यक्रम राबवितआहोत तरी यावषीँही जिजाऊ रत्न पुरस्कार कार्यक्रमास आपल्या कार्याला यथोचित सत्कारीत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत सण 2018 साठी जिजाऊ रत्न पुरस्कारासाठी पत्रकार, शिक्षक,वाद्यकीय क्षेत्र,सामाजिक क्षेत्र,कला क्षेत्र,क्रीडा क्षेत्र,शेतकरी,सेवाभावी   संस्था,सामाजिक प्रतिष्ठाण ,लोक चळवळ,आणि दारू बंधी आदी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारांनी निर्भीड पत्रकार संघाच्या अध्यक्ष अनिल घोरड मो 8551005741आणि मराठवाडा अधेक्ष तालिब शेख मो नो 8668819359 समितीकडे संपर्क साधून प्रस्ताव पाठवावा असी माहिती संथापक अधेक्षा रुचिता मलबारी यांनी दिली आहे.
    आपला नम्र
अनिल घोरड
प्रदेश अधेक्ष
निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र

गेवराई शहरात डासांचा प्रादुर्भाव; फवारणी करा - बालाप्रसाद सोनी

सुभाष मुळे....
-----------------
गेवराई, दि. 31 __ शहर व परिसराच्या प्रदुषणात वाढ झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेवराई येथील नगर परिषदेने शहर डासमुक्त करण्याच्या दृष्टीने धूर फवारणी करावी अशी एकमुखी मागणी बजरंग ग्रुपच्या वतीने बालाप्रसाद सोनी यांनी केली आहे.
        बीड जिल्ह्य़ाच्या गेवराई शहर व परिसरात गवताचे प्रमाण वाढले आहे, ते नष्ट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी, मेन रोड भागातील मारोती मंदिर ते एजाज ड्राय फ्रूट पर्यंत असलेल्या दोन्ही साईडच्या नाल्यांचे कामे करुन त्यातील पाणी वाहते करावे, सर्व भागात फाॅगिंग मशिनने धूर फवारणी करुन शहर डासमुक्त करण्याच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने कटाक्षाने लक्ष केंद्रित करावे व वाढते व्हायरल आजारापासून गेवराईतील नागरिकांना मुक्त करण्याची मागणी बालाप्रसाद सोनी यांनी केली आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

ट्रॅक अभावी बीदच्या वाहनाची तपासणी आंबाजोगाईला होतील उप प्रदेशिक परिवहन अधिकारी नाकाते यांची माहिती


बीड प्रतिनीधी
बीड येथिल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात ट्रॅक उपलब्ध नसल्याने अंबाजोगाई येथील कार्यलयत वाहनाची तपासनि होणार आहे अशी माहिती बीड चे प्रभारी rto नकाते यांनी दिली आहे.

बीड कार्यालयातील फीटनेस करिताची वाहने अंबाजोगाईत वळविण्यात आली आहेत कारण मा उच्च न्यायालयाचे PIL क्र २८/२०१३ मधील आदेशाने ज्या कार्यालयात ब्रेक तपासणी ट्रॅक उपलब्ध नाही. त्या ठिकाणी फिटनेसचे काम 1/11/2017 पासून करता येणार नाही असा न्यायालयीन आदेश असून अंबाजोगाई येथे बीडचे मोटार वाहन निरीक्षक  समाधान जाधव मोवानि यांनी उदया सकाळ पासून अंबाजोगाई कार्यालयात कर्तव्यावर रुजू होतील .असा आदेश देण्यात आला आहे. श्री निकम ARTO & flying in चे काम पहाणार आहेत तरी बीड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाशी निगडित सर्व वाहन चालकांनी ,वाहन मालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन परिवहन अधिकारी नकाते यांनी केले आहे ते म्हणाले की  पुढील आदेश होईपर्यंत वाहनांचे फिटनेस अंबाजोगाईला होणार आहे  .

डॉ योगेश दहिफळेनां FCPS (MED)पदवी प्राप्त

प्रदिप कोकडवार
जिंतूर
जिंतूर शहरात गेल्या 15 वर्षा पासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असे प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी
डॉ योगेश जी दहिफळे यांनी नुकतीच
FCPS (MED) ही पदव्युत्तर पदवी यशस्वी रित्या पूर्ण केली आहे
महाराष्ट्रात अशी पदवी मिळवण्यासाठी 24 सिट्स असून औरंगाबादेतील एम जी एम मेडिकल कॉलेज कडून चार सिट्स असून यातून डॉ दहिफळे उत्तीर्ण झालेत तर राज्यभरातून 24 पैकी 12 व्यक्ती पास झाले असून ही पदवी प्राप्त झाल्यानंतर जिंतूर शहरातील आणि तालुक्यातील रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मिळणार आहे
गेल्या काही दिवसात  योग्य दर्जा आरोग्य सुविधा देऊन शहरातील ​प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिक श्री डॉ योगेश दहिफळे यांचे मान्यवरांनी  अभिनंदन केले आहे ..

दुषित पाण्यामुळे राधे-धामनगावात आजाराची लागन  सोमवारी दिवसभर आरोग्य पथकाने केले उपचार दोन दिवस उलटूनही आरोग्य,महसूल व पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष


सेलू/प्रतिनिधी तालुक्यातील राधे-धामनगाव येथे रविवार २९

ऑक्टोबर पासून गावातील अनेक नागरीकांना आजाराची लागन झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवार३१ऑक्टोबर रोजी देउळगाव गात येथील वैद्यकीय पथकाने धामनगाव येथे भेट देऊन  आजाराची लागन झालेल्या नागरीकावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.व दुशीत पाण्यामुळे आजाराची लागन झाल्याचा  प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.असे असताना आरोग्य,महसूल व पंचायत समिती प्रशासनाने राध-धामनगाव येथील घटने कडे दुर्लक्ष केले आहे. याबाबत राधे-धमनगाव येथील नागरीका कडून मिळालेल्या माहितीनुसार रविवार २९ऑक्टोबर पासून गावातील अनेक नागरीकांना पोट दुखने,उलटी,संडासचा त्रास होणे आशा आजाराची लागन झाली. रविवार पासूनआजाराची  लागन झालेल्या नागरीकांची संख्या वाढत जाऊन सोमवार पर्यंत १५०वर पोहचल्याचा प्राथमीक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.१००ते१५०नागरीकांना  त्रास होत असल्या कारणाने राधे-धामनगावात घबराट निर्माण झाली.यात महिला व मुलांचाही समावेश आहे.ज्या रुग्णांना जास्त त्रास जावला असे अनेक रुग्णांनी बाहेर गावी खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतले तर गावातील रुग्णांवर वैद्यकीय उपचार  करण्यासाठी देउळगाव येथील वैद्यकीय पथक राधे-धामनगावात दाखल झाले.सोमवार ३१ऑक्टोबर रोजी दिवसभर वैद्यकीय उपचार करून देखील काही रुग्णां पर्यंत पथक पोहचले नसल्यामुळे असे रुग्ण वैद्यकीय उपचारा पासुन  वंचित राहिले. तर ज्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले ते देखील उपचार पध्दतीवर संशय घेत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करित होते.  सदरिल आजाराची लागन आटोक्यात आणण्यासाठी मागील ३दिवसापासून कोणतेच प्रयत्न झालेले दिसत नाही. म्हणून पोटदुखी,उलटी संडास,याचे रुपांतर गॅस्ट्रोत होउन रुग्णांनाच्या संखेत पटीत  वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

◾तांत्रिक अडचणीचा परिणाम 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेचे सुत्र हाती घेतल्या पासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानमुळे साथीच्या आजाराचे उच्चाटन झाल्याचे दिसते.मात्र राधे-धामनगाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून ९९लाख रुपये मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अपुर्णअवस्थेत आहे.त्यामुळे पाणी पुरवठा साठी शासनाने ९९लाख रुपये एवढी मोठी रक्कम दिल्यानंतर टॅंकर,विहीर अधिग्रहन,इंधन विहीर यासाठी प्रशासकीय मान्यता मिळात नाही.हि तांत्रिक अडचण असल्याने नागरीकांना उपसा नसलेल्या विहीरतील दुषित पाणी प्यावे लागले. म्हणून मोठ्या प्रमाणावर  आजाराची  लागन 

 झाली

 असल्याची माहिती नागरीका कडून मिळाली.