तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 30 November 2017

जिंतुरात रविवारी मोफत डॉ आम्हला आई-बाबा व्हयचय शिबिर

जिंतूर
प्रदिप कोकडवार
वंध्यत्व असलेल्या जोडप्या साठी जिंतूर येथे दि 3 डिसेंबर रोजी मोफत वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन शिबीर च आयोजन केले आहे
औरंगाबाद येथील सु प्रसिद्ध वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी स्पेशालिस्ट व स्त्री रोग तज्ञ डॉ सौ प्रगती ताई राहुल शिरपेवार औरंगाबाद यांच मार्गदर्शन लाभनार आहे
जिंतूर येथील बालाजी मंदिर येथे हा मोफत सल्ला दिला जानार असून दि 3 डिसेंबर रोजी सकाळी 10ते 3 या वेळेत गरजू रुगणांनी सम्पर्क करावा असा आवाहन केलं आहे

दलित चळवळीची बुलंद तोफ गोंविदराव थिटे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन पालम तालुका शोकाकुळ

अरुणा शर्मा

पालम :- येथील रहिवाशी उपासक गोंविदराव नागोराव थिटे (दादा) वय 67 वर्ष यांचे दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. निधनाची बातमी कळताच तालुक्यात शोकाकुळ पसरली. दादा हे आर.पि.आय. जिल्हा उपध्यक्ष, दलीत चळवळीचे जेष्ठ नेते, शांतता कमेटी सदस्य असे अनेक पदे त्यांनी भुषविले त्यांची सर्वे धर्मीय समभाव चि ख्याती होती. शहरातील प्रत्येक मोहत्सवात ते वेळोवेळी हाजर रहात होते. समाजिक क्षेत्रात ते अंग्रेसर होते. दलित चळवळीची बुलंद तोफ मोडेल पण वाकणार नाही असा बाणा असणारे गोंविदराव थिटे यांची फक्त किर्ती राहिली. त्याच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, 5 बहिणी, 2 भाऊ, नातु, पंतु असा त्याच्या मागे मोठा परीवार आहे. त्यांची 1 डिसेंबर रोजी सायकाळी 4 वाजता पालम तहसिल कार्यालयाच्या शेजारी असलेले सम्शान भुमित अंत्य संस्कार होणार आहे.

विज्ञानाला चालना दिली तर तंत्रज्ञान विकसीत होईल.. उपेंद्र कदम


अरुणा शर्मा

पालम :- विज्ञानाला चालना दिली तर तंत्रज्ञान विकसीत होईल व त्यामुळे देश समृध्द होईल असे मत पालम तहसिलचे नायब तहसिलदार उपेंद्र कदम यांनी मांडले ममता विद्यालय पालम येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 29 नोंव्हेबर रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य आर.के. क्षीरसागर होते. यावेळी नायब तहसिलदार उपेंद्र कदम यांच्या हस्ते टाकाउ प्लाष्टीक व वाळू तापवून प्लाष्टीक कव्हर करुन रोड करणे या प्रयोगाचे उदघाटन केले. यावेळी पंचायत समितीचे सभापती आत्माराम सोडनर, कृ.उ.बा. उपसभापती तुषार भैया गोळेगावकर, केंद्रप्रमुख प्रकाश कोकाटे, ता.निरक्षक प्रा.डॉ.शिवाजीराव पौळ, प्रा.डॉ.जाधव एस.एन.,प्रा.डॉ.गडगीळ हे व्यास पिठावर उपस्थित होते. यावेळी कदम यांनी बाल वैज्ञानीकास चालना दिली तरच तंत्रज्ञान विकसित होईल व त्यामुळे देश समृध्द होईल असे मत मांडत तर विज्ञान व तंत्रज्ञानातुन प्रयोगाचा अवलंब केल्यास प्रदूषण मुक्त वातावरण निर्मिती होईल. टाकावूवस्तू पासून टिकावू साधने निर्माण करता येतील. व पर्यावरणाचे संतूलन राखले जाईल असे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणातुन क्षीरसागर यांनी वैज्ञानीक जागृती निर्माण होउन विद्यार्थी मध्ये बौध्दिक चालना वाढावी व विद्यार्थी दिशाभिमूख व्हावा असे मत मांडले. कार्यक्रमाची प्रस्ताविक पौळ गोविंद यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचलन एस.एन.अंबोरे यांनी केले. यावेळी तालुक्यातील 25 शाळेने सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी ममता विद्यालयातील सर्व कर्मचारयानी प्रयन्न केले. यावेळी माध्यमिक गटातून सर्व प्रथम नाईक विद्यामंदीर चाटोरी, द्वितीय राजमाता जीजाबाई भोसले पालम, तृतीय जी.प. प्रशाळा बनवस, प्राथमिक गटातून प्रथम नाईक विद्यामंदिर चाटोरी, द्वितीय बळीराजा विद्यालय भोपाळगड, तृतीय ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी. शिक्षकातून शिक्षकाचे शैक्षणिक साहित्य सर्व प्रथम काजी एन.एस., जि.प.प्रा.शा. आनंदवाडी प्राथमिक व माध्यमिक गटातून गलांडे एन.डी. आहिल्यादेवी होळकर विद्यालय शेखराजूर प्रथम आले.

गुन्हेगारीत उत्तर प्रदेश अव्वल, महाराष्ट्र देशात तिसरा.


_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक गुन्हेगारी माजल्याचं समोर आलं आहे. यूपीमध्ये 2016 मध्ये 9.5 टक्के गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खेदाची बाब म्हणजे गुन्हेगारीच्या यादीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्यूरो (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो – एनसीआरबी)ने 2016 सालातील जारी केलेली आकडेवारी जाहीर केली.
2016 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (9.5 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश (8.9 टक्के), महाराष्ट्र (8.8 टक्के) आणि केरळ (8.7 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या, तर अपहरणाच्या आणि लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.
48 लाख 31 हजार 515 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद गेल्या वर्षी झाली. त्यामध्ये 29 लाख 75 हजार 711 गुन्हे हे आयपीसी अंतर्गत तर 18 लाख 55 हजार 804 गुन्हे हे विशेष आणि स्थानिक कायद्यांअंतर्गत येतात. 2015 च्या तुलनेत (47 लाख 10 हजार 676 गुन्हे) यामध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, उत्तर प्रदेशात 50 टक्के गुन्हेगारांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रातील Rate of Conviction अवघा 11 टक्के आहे.

हत्येच्या गुन्ह्यांमध्ये घट...

2015 च्या तुलनेत देशात हत्यांच्या घटनांमध्ये 5.2 टक्क्यांनी घट झाली आहे. 2016 मध्ये 30 हजार 450 हत्यांचे गुन्हे नोंदवण्यात आले. दंगल (5 टक्के) आणि दरोडे (11.8 टक्के) या केसेस मध्येही गतवर्षीच्या तुलनेत घट आहे. मात्र अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 6 टक्क्यांनी वाढ आहे.

महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 2.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये पती किंवा सासरच्या मंडळींनी केलेला छळ (32.6 टक्के), विनयभंग (25 टक्के), महिलांचं अपहरण (19 टक्के) आणि बलात्कार (11.5 टक्के) यांचा समावेश आहे.

बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसरा....

2015 मध्ये बलात्काराच्या 34 हजार 651 गुन्ह्यांची नोंद झाली होती. ते 2016 मध्ये 12.4 टक्क्यांनी वाढून 38 हजार 947 वर पोहचले आहेत. बलात्काराच्या घटनांमध्ये मध्य प्रदेश (4 हजार 882 केसेस – 12. 5 टक्के) अव्वल असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश ( 4 हजार 816 केसेस – 12.4 टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र ( 4 हजार 189 केसेस – 10.7 टक्के) आहे.

लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांमध्येही उत्तर प्रदेश अव्वल आहे. महाराष्ट्र दुसऱ्या, तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अपहरणाच्या केसेस मध्येही उत्तर प्रदेश दबंग आहे. देशातील 54 हजार 723 घटनांपैकी 7 हजार 956 अपहरणाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या.

इथेही महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो....

2016 मध्ये अनुसूचित जाती किंवा जमातींतील नागरिकांविरोधातील अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 5.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
40 हजार 801 केसेस मध्ये उत्तर प्रदेश (20 हजार 426 केसेस – 25.6 टक्के) अव्वल असून त्यानंतर बिहार (5 हजार 701 केसेस – 14 टक्के) आणि राजस्थान ( 5 हजार 134 केसेस – 12.6 टक्के) यांचा क्रमांक लागतो

एका फाइल मध्ये बंद आहे नेताजींच्या मृत्यूचं रहस्य, इतिहासकाराचा दावा.

_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येच्या पुराव्यासंदर्भातील महत्त्वाची फाईल 100 वर्षांसाठी बंद करण्यात आली आहे. या फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं रहस्य दडलं असल्याचा दावा एका इतिहासकारानं केला आहे. पॅरिसमध्ये ख्यातनाम इतिहासकार जे. बी. पी. मोर यांनी फ्रान्सच्या लष्करी अधिका-यांकडे एक गुप्त फाईल पाहण्याची परवानगी मागितली होती. परंतु फ्रान्सच्या राष्ट्रीय अभिलेखाकार प्रशासनानं फाईल दाखवण्यास नकार दिला.
या फाईल मध्ये नेताजींच्या मृत्यू संदर्भातील अनेक रहस्य दडलेली आहेत. फ्रान्स लष्करानं ही फाईल 100 वर्षांसाठी बंद केली आहे, अशी माहिती जे. बी. पी. मोर यांनी दिली आहे. ते म्हणाले, बोस यांचा मृत्यू सायगॉन मध्ये झाल्याचा मी दाव्यानिशी सांगू शकतो. फ्रेंच सिक्रेट सर्व्हिसच्या रेकॉर्डच्या आधारे त्यांचा मृत्यू व्हिएतनामच्या बोट कॅटिनेट जेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली आहे. मोर हे पॅरिसमधील एका  कॉलेजमध्ये शिकवतात. फ्रेंच अधिका-यांच्या एका पत्रानं मी आश्चर्य चकितच झालो. त्यांनी मला सायगॉनमध्ये आयएनए आणि बोस यांच्याशी संबंधित माहिती असलेली फाईल पाहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळेच मी दाव्यानिशी सांगू शकतो की, सप्टेंबर 1945मध्ये बोस यांनी सायगॉन मध्ये अखेरचा श्वास घेतला.
या कारणामुळे ही फाईल गुप्त ठेवण्यात येत आहे. मोर यांच्या मते, आता बोस परिवारातील सदस्य किंवा भारत सरकारनं फ्रान्स सरकारशी ही फाईल पुन्हा उघड करण्याची मागणी केली पाहिजे. त्या फाईलला मोठ्या काळापासून जनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या फाईलमधून बोस यांच्या शेवटच्या दिवसांसंबंधीची महत्त्वाची माहिती मिळू शकते. खरं तर 11 डिसेंबर 1947च्या फ्रेंच सिक्रेट सर्व्हिसच्या रिपोर्टवरूनच मोरी यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय अभिलेखागारांकडे ही फाईल पाहण्याची परवानगी मागितली होती. बोस यांचा मृत्यू हवाई दुर्घटनेत झाल्याच नसल्याचा दावा मोर यांनी केला आहे. जर त्यांचा मृत्यू हवाई दुर्घटनेत झालाय, तर त्यांच्या अस्थींचं डीएनए चाचणी घेणं गरजेचं होतं. जेणेकरून बोस यांच्या मृत्यू हवाई दुर्घटनेतच झाल्याचं स्पष्ट झालं असतं. डीएनए चाचणी न झाल्यामुळे त्या बोस यांच्या अस्थी नसण्याची शक्यता आहे, असंही जे. बी. पी. मोर म्हणाले आहेत.

ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा, 8 जणांचा मृत्यू.


_________________________

नंदु नाईक, तेज न्यूज हेडलाईंस, मुंबई

दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, सर्व आपत्ती पुनर्वसन केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

तुफान वारा आणि मुसळधार पाऊस....

दक्षिण किनारपट्टीवर काल ओखी चक्रीवादळ धडकले. वादळामुळे कन्याकुमारी आणि थिरुअनंतपूरम या किनारपट्टीच्या भागात तुफान वारा आणि मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस आणि चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.

मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान...

ओखी चक्रीवादळ लक्षद्वीप बेटांकडे झेपापले आहे. त्यामुळे दक्षिणेकडील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे कन्याकुमारी, नागरकोलाई, थिरुअनंतपुरम आणि कोलाम या जिल्ह्यांसह लक्षद्वीपमधील काही भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आली आहे.  थिरुअनंतपुरमधील शाळा आज बंद राहणार आहेत. त्याचबरोबर कन्याकुमारी आणि थिरुअनंतपूरम दरम्यानच्या अनेक लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यात.
सहा मच्छिमारांच्या बोटी बेपत्ता
वादळ झाल्याने केरळ मधील कोलम शहरात एका रिक्षा चालकाच्या अंगावर झाड पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंद महासागरात अडकलेल्या सहा मच्छिमारांच्या बोटींच्या शोधकार्यासाठी नौदलाची तीन जहाजे आणि दोन विमाने रवाना झाली आहेत. तसेच एक मरिन इंजिनिअरिंग जहाज विझिंजम येथे भरकटले आहे.
केरळ मधील सुमारे ८० मच्छिमार बेपत्ता असल्याचे वृत्त असून एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

कपाशीवर बोंडअळीची ‘संक्रांत’ उत्पादन आले निम्यावर शेतकरी पुन्हा अर्थीक खाईत

अनवर पठाण.
प्रतिनिधी,  वालूर                           
-----------------------------------                                         दरवर्षी पर्जन्यमानाची अवकृपा, नैसर्गिक आपत्ती, सदोष बियाणे अशा या ना त्या कारणाने शेती व्यवसाय आणि शेतकरी संक्रमण काळातून वाटचाल करत आहे. यंदाही उशिरा पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांनी हंड्याने पाणी घालून कपाशीची रोपे जगवली. मात्र पिक पदरात आले तर त्यावर बोंडअळीची ‘संक्रांत’ आल्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाल्याची व्यथा सेलू तालुक्यातील शेतकरी बोलून दाखवत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली. सुरुवातीला पाऊस नसल्याने अगदी मोठ्या मेहनतीने रोपे जगवून मोठी केली. किटकनाशकांच्या महागड्या फवारण्यादेखील केल्या. या झाडांना कैरी लागुन त्यातुन कापूसही बाहेर पडला आहे. मात्र बोंडअळीचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कपाशीच्या क्षेत्रावर संक्रातच आली आहे. 
दरवर्षी एक एकर क्षेत्रात १५ ते १८ क्विंटल निघणारा कापूस अवघा ४ ते ७ क्विंटलवर येऊन ठेपला आहे. निघालेल्या कापसावरही रोगाच्या प्रादुर्भावामुळे तांबडा रंग चढल्यामुळे बाजारात व्यापारी ठरविल, त्या भावात विकावा लागत आहे. मात्र अशा दारुण परिस्थितीतही तालुक्याचा कृषी विभाग झोपलं आहे. कृषी विभागाच्या या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळे पंतप्रधान कृषी पिक विमा योजनेची रक्कम भरुनही पदरात काही पडेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहीली आहे.या वर्षी कपाशीच्या उत्पनात मोठी घट होणार आसल्याने पुन्हा शेतकरी अर्थीक विंवचनेतच राहण्याची पाळी आली आहे.या मुळे परिसरातील  सर्वच शेतकऱ्यांना कपाळाला हात लावण्याची वेळ आली आली आहे. मात्र अद्यापही कृषी विभागाचे कोणीही अधिकारी पाहणी करण्यास फिरकले नाही. त्यामुळे नुकसानीची ही गंभीर बाब विमा कंपनीच्या कानावर गेली नाही तर नुकसानभरपाई मिळणेही कठीण आहे.शेतातील उभ्या  पीकात बोंडअळीने संपूर्ण तालुक्यातीलच क्षेत्र बाधित केले आहे.कपाशीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन तालुका कृषी अधिकारी किंवा मंडलधिकारी यांनी त्वरीत कापुस उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधून  संबंधित क्षेत्राचे पंचनामे त्वरीत करावे अशी मांगणी शेतकऱ्यानेकडून होत आहे.

तेजन्यूज हेडलाइन्स. वेब वाहिनि ,प्रतिनिधी,
वालूर ता.सेलू.जि.परभणी.
मो.नं.8888375846

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मसुरे येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा शनिवार दि. २७ जानेवारी २०१८ रोजी होणार

यावर्षी २६ जानेवारीची सुट्टी आणि २७ ला शनिवार, २८ ला रविवार असल्याने देवी भरडी मातेच्या यात्रोत्सवाला होणार तुफान गर्दी.

सिंधुदुर्ग दि.आबा खवणेकर:-नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आंगणेवाडी (मसुरे, मालवण) येथील श्री भराडी देवीच्या २०१८ वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर झाली आहे.  श्री देवी भराडीची यात्रा  शनिवार  २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.  यावर्षी २६ जानेवारीची सुट्टी आणि २७ ला शनिवार, २८ ला रविवार असल्याने यात्रोत्सवाला तुफान गर्दी होणार आहे.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथे प्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. शुक्रवारी (१ डिसेंबर)  सकाळी देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख  निश्चित झाली आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा  शनिवार  २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेत कधीही बदल होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आगणे कुटुंबिय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने नरेश आगणे यांनी जाहीर केले आहे.

या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात.  देविला कौलप्रसाद लावून यात्रोत्सव ठरविला जातो. मुंबईकरांची प्रचंड गर्दी असते. महापालिका नगरसेवक, महापौर, सर्व पक्षांची नेतेमंडळी, सिनेस्टार दर्शन घेतात. यात्रोत्सव दीड दिवस चालतो. मंत्रिमहोदयही उपस्थित असतात. आंगणेवाडी गावकर मंडळ गावपारध करून (डुकराची शिकार) त्यानंतर पारंपारिक पद्धतीने तारीख ठरवितात.

दरवर्षी किमान १० लाख भाविक दोन दिवसात दर्शनासाठी येतात. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि स्थानिक मिळून १५०० कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतात. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या यात्रापूर्व नियोजनाच्या किमान ५ ते ६ बैठका होतात.

गेवराई येथे राष्ट्रवादी काॅग्रेसचा सरकार विरोधात हल्लाबोल मोर्चा

सुभाष मुळे...
---------------
गेवराई, दि. 30 __ शेतकर्‍यांच्या धोरणाबद्दल विरोधी पाऊल उचलणाऱ्या राज्य सरकारचा कडाडून विरोध करत राष्ट्रवादी काॅग्रेसच्या नेतृत्वाखाली कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व नागरीकांनी तहसिलवर प्रचंड मोर्चा काढून सरकारवर गेवराईत हल्लाबोल केला.
           भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येवुन तीन वर्ष झाली आहे. या सरकारने शेतकर्‍यांची क्रुर चेष्टा केल्यामुळे सर्वसामान्य जनतेसह शेतकर्‍यांमध्ये सरकार विषयी संताप असून कर्जमाफी, लोड शेडींग, हमीभाव, बोंड आळीचा प्रार्दुभाव, थकीत पिक विमा यांसह शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी गेवराईत हल्लाबोल अंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅलीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. सकाळपासूनच गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध सर्कल मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासह शेतकरी वाजत गाजत रॅलीत सहभाग दर्शविला. यावेळी सरकार विरोधी धोरणाबद्दल कार्यकर्त्यासह शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. संपुर्ण कर्जमाफी करा , लोड शेडींग बंद करा , हमीभाव जाहीर करा यासह बोंड आळीचा प्रार्दुभाव, थकीत पिक विमा, गेवराई शहरात पडलेल्या दरोड्यांचा तपास, नादुरुस्त डीपी, कापसाला ५०० रु. प्रति क्विंटल बोनस, थकीत नुकसान भरपाई, प्रलंबित भुसंपादन मावेजा आदी प्रमुख मागण्यां मोर्चेकरी मांडत होते. सरकारच्या निषेधाच्या घोषणानी गेवराई नगरी दणाणून गेली. विविध मागण्यांचे फलक, पक्षाचे झेंड हाती घेऊन मोर्चेकरी तहसील कार्यालयावर धडकले.
           यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भाऊसाहेब नाटकर, जालिंदर पिसाळ, पाटीलबा मस्के, संभाजी अण्णा पंडित, जिजा पंडित, ऋषिकेश बेदरे, समाधान मस्के, दत्ता दाभाडे, आनंद सुतार यांच्यासह बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, खरेदी विक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, उपसभापती शाम मुळे, बप्पासाहेब मोटे, फुलचंद बोरकर, महंमद गौस, माजी सभापती आप्पासाहेब.गव्हाणे, श्रीराम आरगडे, दत्ता पिसाळ, प्रताप पंडित, चंद्रकांत पंडित, अर्जुन चाळक, बब्बु बारुदवाले, गुफरान इनामदार, शेख मन्सुर, नविद मशायक, सय्यद नजीब, इर्शाद फारोकी, हन्नानसेठ, अब्दुलभाई, जिजा पंडित, रामनाथ दाभाडे, विलास ठाकुर, वसीम फारोकी, शेख नसिरभाई, शेख रहिम,
शाम पाटील, सुंदर काळे, माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, डॉ. विजयकुमार घाडगे, बाबासाहेब आठवले, डॉ.आसाराम मराठे, भरत खरात, साहेबराव पांढरे, नवनाथ वेताळ, राजेंद्र वारंगे, प्रभाकर ससाणे, मोतीराम गाडे, जयसिंह जाधव, लक्ष्मण देवकर, परमेश्‍वर खरात, तय्यबभाई, मनोहर पिसाळ, दिपक आतकरे, बंडु मोटे, गणेश धुमाळ, संजय तावस्कर, संदीप राजगुरु, शाम रुकर, आवेज शेट, तात्यासाहेब नाटकर, तुकाराम चाळक, सय्यद आलीम, बप्पासाहेब पंडित, हनुमंत सेवाळे, अर्जुन आडाळे, परमेश्वर शेळके, सुधिर फुलझळके, बाबुराव काकडे, विश्वंभर काकडे, दत्ता संत, अशोक काळे, माऊली डोंगरे, साहेबा कु-हाडे, अनिल पवार, रघुनाथ कोंडरे, अशोक नाईकवाडे, रामप्रसाद गव्हाणे, रुद्रा मुंजाळ, तुकाराम चाळक, आरुण चाळक, भारत शिंदे, परमेश्वर आमटे, मनोज शेंबडे, लहु करे, जगदीश वेताळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

साखरा व हिवरखेडा परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा

साखरा.प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे

साखरा परिसरात कमी दा बाने वीज पुरवठा होत असल्याने गाव कऱ्याना अडचणी येत आहेत हा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे येथे घोरदडी 33 केव्ही   उप केन्द्रा वरून वीज पुरवठा केला जातो  मागच्या काही दिवसा पासून  येथे कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने दळण व पाण्यासाठी गैर सोय होत आहे दूरदर्शन संच बन्द आहेत यामुळे गावकरी त्रस्त जाले आहेत या फिडरवर साखरा.हिवरखेडा केलसुला घोरदडी  खडकी बोरखेडी.सोनसंा वगि धोतरा आदि गावे या फिडवर येतात या सर्वच गावात हेच प्रकार चालू आहेत या कडे माहवितरण कंपनीच्या वरी ष्ट  आधीका ऱ्यानी लक्ष देऊन या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या परीसरतील नागरी का होत आहे

तेज न्यूज़ हेड लाइन्स ऑनलाइन वेब वहिनी
साखरा प्रतीनीधी शिवशंकर निरगुडे