तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 December 2017

ट्रिपल तलाक विरोधात लढा देणा-या इशरत जहाँ यांचा भाजपा प्रवेश!

________________________________

ट्रिपल तलाक विरोधात याचिका दाखल करणा-यांपैकी एक असलेल्या इशरत जहाँ यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. ट्रिपल तलाक ही प्रथा बेकायदेशीर आणि मुस्लिम महिलांसाठी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची गळचेपी असल्याचे सांगत पश्चिम बंगालमधील हावडा येथील इशरत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
इशरत जहाँहावडा येथील कार्यालयात येऊन भाजपामध्ये सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे पश्चिम बंगालमधील सरचिटणीस सायंतन बस यांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या हावडा येथील शाखेने शनिवारी इशरत जहाँ यांना सन्मानित करुन पक्षात प्रवेश दिला. बसू पुढे असेही म्हणाले की, इशरत यांचा सन्मान करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कोण आहेत इशरत जहाँ?

तिहेरी तलाक विरोधात कोर्टात जाणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालच्या हावडा मधील इशरत जहाँ यांचाही समावेश आहे. इशरत यांच्या पतीने दुबईतून फोन वरून त्यांना तलाक दिला होता. इशरत जहाँ यांना लग्नानंतर 15 वर्षांनी पतीने तिहेरी तलाक दिला. त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं, 2001 मध्ये त्यांचं लग्न झालं असून त्यांना मुलं आहेत. त्या मुलांना त्यांच्या पतीने जबरदस्तीने त्यांच्याकडे ठेवलं आहे. आपली मुलं परत मिळावी तसंच पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी इशरत यांनी याचिकेत केली. तिहेरी तलाक बेकायदेशीर असून मुस्लिम महिलांच्या अधिकाराची गळचेपी असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं. तिहेरी तलाक विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाचप्रमुख महिलांमध्ये इशरत जहाँ यांच्यासह शायरा बानो, आफरीन रहमान, अतिया साबरी, गुलशन परवीन यांचा समावेश आहे.

38 महामंडळे बरखास्त करण्याच्या निर्णय!

_________________________________

नवीन वर्षात 38 महामंडळे बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. अनेक महामंडळात चाललेला भ्रष्टाचारी कारभार पाहता ही महामंडळे बंद करण्याच्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत केले जात आहे. महाराष्ट्रातील कृष्णा खोरे विकास महामंडळ झाल्यापासून माण, खटाव, सांगोला, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर हे तालुके दुष्काळीच राहिले. त्यामुळे हे महामंडळ बंद करून दुष्काळी तालुक्यांसाठी नवीन प्राधिकरण करा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचे मत व्यक्त होत असून या महामंडळांवर कायम काँग्रेस-राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीचे रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय महामंडळात केलेल्या भ्रष्टाचारामुळे या महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याचप्रमाणे 2000 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या सहकार विकास मंडळाच्याही मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आले. 12 सहकारी साखर कारखाने आणि एका सूतगिरणीला 94 कोटींची खैरात वाटली गेली व त्याची वसुलीच केली गेली नाही. त्याच प्रमाणे सुरक्षा महामंडळातील जवान सातत्याने हे महामंडळ बरखास्त करून ते गृह खात्यामार्फत चालवण्याची मागणी करीत आहेत. महामंडळांच्या कोटय़वधींचा भ्रष्टाचार आणि यामुळे राज्याला होणारा आर्थिक तोटा पाहता ही महामंडळे बंद करण्याच्या बाजूने कौल दिला जात आहे. 5 हजार कोटींवर तोटा,

मालमत्ता विकून महामंडळांचे कर्ज फेडणार...

तोटय़ातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर सरकारला नाहक खर्च करावा लागत आहे. तो बंद करून तिजोरीवरील भार सरकार कमी करू इच्छित आहे, असेही सूत्रांनी सांगितले. मिटकॉन, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ यासह काही महामंडळे नफ्यात असली तरी अन्य महामंडळांनी सरकारला 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा करून ठेकला आहे. या महामंडळांच्या मालमत्ता विकून कर्ज फेडले जाणार आहे.

नए साल पर किम की अमेरिका को धमकी- मेरी टेबल पर ही है परमाणु मिसाइल का बटन.

_________________________________

नए साल का आगाज़ हो गया है. लेकिन अमेरिका और नॉर्थ कोरिया की दुश्मनी में कोई बदलाव नहींआया है. नए साल के आगाज़ के साथ ही नॉर्थ कोरिया के तानाशाह किम जोंग उन ने अमेरिका को धमकी दे डाली है. अपने भाषण मेंकिम ने कहा है कि अमेरिका की पूरी ज़मीन हमारी परमाणु मिसाइलों की जद में है और इन मिसाइलों का बटन हमेशा ही मेरी टेबल पर रहता है. किम ने कहा है कि अमेरिका कभी भी मुझसे या हमारे देश से लड़ाई नहीं करेगा. उसने कहा कि ये मैं किसी को ब्लैकमेल नहीं कर रहा हूं बल्कि यही सच्चाई है. किम ने अपने भाषण में कहा कि हमारा देश सबसे बड़ी न्यूक्लियर शक्ति बनकर उभरेगा.आपको बता दें कि हाल ही में नॉर्थ कोरिया की सरकारी मीडिया की रिपोर्ट में सामने आया था कि 2018 में भी नॉर्थ कोरिया अपने परमाणु परीक्षण जारी रखेगा. उत्तर कोरिया की सरकारी समाचार एजेंसी ने कहा है कि प्योंगयांग अपने परमाणु कार्यक्रम का विकास जारी रखेगा, जिससे देश 'अजेय' परमाणु शक्ति तौर पर उभरे. रिपोर्ट में कहा गया, 'एक अजेय शक्ति के रूप में उत्तरी कोरिया के अस्तित्व को ना ही कमजोर किया जा सकता है और ना ही नकारा जा सकता है. एक जिम्मेदार परमाणु शक्ति के रूपमें उत्तर कोरिया सभी बाधाओं को पार करते हुए स्वतंत्रता औरन्याय की राह पर चलेगा.' रिपोर्ट में वर्ष 2017 के दौरान देश की परमाणु उपलब्धियों की भी जानकारी दी गई. उत्तर कोरिया ने 3 सितंबर, 2017 को अपने सबसे ताकतवर परमाणु हथियार परिक्षण की प्रशंसा करते हुए इसे एक बड़ी जीत बताया था. इसके बाद 28 नवंबर को उत्तर कोरिया ने अपने सबसे विकसित अंतरमहाद्वीपीय बैलिस्टिक मिसाइल ह्वासॉन्ग-15 का परीक्षण किया. प्योंगयांग के मुताबिक ये मिसाइल अमेरिका में किसी भी लक्ष्य तक पहुंचने में सक्षम है.आपको बता दें कि बीते गुरुवार को चीन पर निशाना साधते हुए ट्रंप ने ट्वीट किया था, ''रंगे हाथ पकड़ा गया- बेहद निराशाजनक है कि चीन उत्तर कोरिया को तेल ले जाने दे रहा है. अगर ऐसा होता रहा, तो उत्तर कोरिया की समस्या का कभी दोस्ताना तरीके से हल नहीं निकाला जा सकता.'' हालांकि, चीन ने ट्रंप के इस दावे को सीधे तौर पर खारिज कर दिया था.

एमबीबीएस झालात तरी प्रॅक्टिस करता येणार नाही, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ.


________________________________

केंद्र सरकार आता नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणायच्या तयारीत आहे. हे विधेयक जर आले तर वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे. कारण त्यामुळे देशातील एमबीबीएसची डिग्री असलेले डॉक्टर रुग्णांवर उपचार करू शकणार नाहीत. त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी नोंदणी क्रमांक मिळणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करता येणार नाही. त्यासाठी पात्रता परीक्षा द्यावी लागेल.केंद्र सरकाने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) ऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यांनी विरोध केला आहे. विधेयकामुळे एमबीबीएसची डिग्री घेतल्यानंतरही भावी डॉक्टरांना आणखीएक परीक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच डॉक्टरांना प्रॅक्टिस करता येईल. मात्र परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा परदेशातील डॉक्टरांना या नियमातून सूट मिळेल. याआधी परदेशात शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना हिंदुस्थानात पात्रता परीक्षा द्यावी लागत होती. मात्र नव्या प्रस्तावित कायद्यात त्यांना पात्रता परीक्षेतून वगळण्यात आले आहे.

भ्रष्टाचार वाढण्याची भीती....

प्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशन हे सरकार तर्फे चालवले जाईल आणि त्यामुळे भ्रष्टाचार वाढेल, असे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) सदस्यांचे म्हणणे आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. के. के अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित कायद्यामुळे अडचणी वाढतील. भ्रष्टाचार वाढेल. गेल्या वर्षभरापासून आम्ही केंद्र सरकारकडे आम्ही वेळ मागत आहोत, मात्र अद्याप त्यांनी बोलावले नाही. नॅशनल मेडिकल कमिशन मध्ये तीन सदस्यीय समिती असून ही समिती वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देईल. समितीत सदस्यांची नियुक्त केली जाईल. याआधी 130 सदस्यांपैकी 80 सदस्य निवडून जायचे. आता विधेयकानुसार सदस्यांवर कुणाचाही अंकुश नसेल. नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे सरकारच्या हातातील बाहुले बनेल, असा आरोप डॉ. के. के. अग्रवाल यांनी केला. डॉक्टरांना 5 ते 100 कोटी रुपयांपर्यंतचा दंड लावला जाईल. एवढ फरक कशासाठी? त्यामुळे कमिटीचे सदस्य मर्जीतल्या डॉक्टराला जास्त दंड तर दुसऱयाला कमी दंड लावू शकतात. त्याच पद्धतीने कॉलेजमधील 40 टक्के जागांवर एनएमसीचे लक्ष असेल तर उरलेल्या 60 टक्के जागांची निवड आणि शुल्क हे खाजगी कॉलेजवाले आपल्या पसंतीनुसार करतील. त्यामुळे खाजगी कॉलेजांचे फावेल.

– डॉ. के. के. अग्रवाल, अध्यक्ष, आयएमए

आज शेकडो जिंतुरकर सायकल वर धावले


प्रदिप कोकडवार
जिंतूर
सायकल रन फॉर जिंतूर या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन आज जिंतूर येथील शब्दसह्याद्री आणि पोलीस प्रशासन कडून करण्यात आले होते
आज दि 1 जानेवारी नववर्ष निमित्त शहरातील अण्णा भाऊ साठे चौक येथून सायकल रन फॉर रॅली ला परभणी जिल्हा सायकल असोसिएशनचे अध्यक्ष एस अशोक सोनी यांनी हिरवी झंडी दाखून प्रारंभ करण्यात आला शिवाजी चौक येलदरी रोड ते नेमगिरी रोड कमान पासून नेवाती मोहल्ला पितळी मारोती  मेंन चौक पोलीस ठाणे शिवाजी चौक ते परत साठे चौक या मार्गावरून रॅली सम्पन्न झाली या रॅलीत विध्यार्थी विध्यार्थीनी तरुण तरुणी सह व्यापारी डॉकटर वकील पत्रकार मंडळी आदी सायकल चालवत सहभागी झाले होते  समारोप डॉ वाघमारे हॉस्पिटल समोर येथे झाला समारोपात प्रा विठ्ठल भुसारे डॉ कालानी एड अशोक सोनी यांनी मार्गदर्शन केले
या वेळी ब्रिजगोपाल तोष्णीवाल तजमुल मौलाना झी 24 तास प्रतिनिधी गजानन देशमुख आदी उपस्थित होते प्रास्ताविक एड मनोज सारडा संचलन
मु अ के सी घुगे तर आभार डॉ वाघमारे यांनी मानले.

आमदार अमरसिंह पंडित यांच्या कार्याला सलाम - नविद मशायक

सुभाष मुळे...
----------------
गेवराई, दि. 31 __ जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे प्रश्न विधान परिषदेत मांडून त्यांची सोडवणूक करणारे आ. अमरसिंह पंडित यांचे मुस्लिम समाजातून आभार व्यक्त करण्यात येत असून गेवराई येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नवीद मशायक यांनी आ. अमरसिंह पंडित यांच्या कार्याला दरम्यान सलाम केला आहे.
       सुमारे सतरा वर्षापासुन गेवराई शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत, या जिल्हा परिषदेच्या शाळेला अनुदान असतांनाही शिक्षकांची भरती का होत नाही ? असा सवाल आ. अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत उपस्थित करुन बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व दहा उर्दु माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याची आग्रही मागणी केली. यावर शालेय शिक्षण मंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व उर्दु शाळांना आवश्‍यक असणारी शिक्षकांची पदे दिड महिण्यात भरली जातील असे आश्‍वासन दिले. आ. अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नावर ही चर्चा झाली. दरम्यान जिल्ह्यातील उर्दु माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्‍न कायम स्वरुपी सोडविल्याबद्दल अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने आ. अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
     यावेळी गेवराई येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नवीद मशायक म्हणाले की, आ. अमरसिंह पंडित यांच्यामुळे मुस्लिम समाजाला न्याय मिळाला असुन उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आ.अमरसिंह पंडित यांच्या कार्याला आपला सलाम आहे असेही ते यावेळी म्हणाले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गेवराई तालुका कार्यकारीणी जाहिर

सुभाष मुळे....
------------------
गेवराई, दि. 31 __ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा गेवराई तालुक्याची कार्यकारणी अधिकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंढे यांच्या आदेशाने व मार्गदर्शक संतोष मानुरकर तसेच जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 डिसेंबर शुक्रवार रोजी पत्रकार संघाच्या कार्यालयात बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                  दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शाखा गेवराई तालुक्याच्या पदाधिकारी यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. यावेळी सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी अंकुश आतकरे ( साय.दै. सुर्योदय ) यांची फेर निवड करण्यात आली असुन शहराध्यक्षपदी प्रदिप जोशी ( हिंद जागृती ), उपाध्यक्षपदी राजेंद्र नाटकर ( दै. पुढारी ), भागवत देशपांडे ( सायं.दै. अभिमान ), कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घाडगे ( दै. लोकाशा ), सचिवपदी तुळशीराम वाघमारे ( दै. लोकाशा ), सहसचिवपदी वाल्मिक कदम ( हिंद जागृती, सुर्योदय ), कोषाध्यक्षपदी सचिन नाटकर ( दै. कार्यारंभ ), संघटकपदी गणेश वीर ( साय.दै. सुर्योदय ) सहसंघटकपदी शिवनाथ काळे ( दै. मराठवाडा साथी ) तर प्रसिद्धी प्रमुखपदी शांताराम बांगर ( दै. पार्श्वभूमी ) यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश आतकरे म्हणाले कि, आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत मला सलग तिसऱ्यांदा बिनविरोध तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. यापुढे देखिल आपली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना आणखी वाढवून नावारुपाला आणण्यासाठी व अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीत राहील. शहराध्यक्ष प्रदिप जोशी म्हणाले की, पत्रकारांवर हल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हे हल्ले रोखण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे म्हणाले.
      यावेळी संपादक अमोल वैद्य, शिवाजीमामा ढाकणे, सुनिल पोपळे, चंद्रकांत नवपुते, सिध्दार्थ मोरे, सुरेश नागरे, अरविंद कुलकर्णी, सखाराम पोहिकर, सुमित करडे, अर्जुन पवार, शेख अतिकभाई, सलमान शेख, प्रकाश राऊत, हनुमंत जवंजाळ, सचिन दाभाडे, जेष्ठ पत्रकार गणेश बेदरे, अंकुश पाचपुते, प्रकाश नरनाळे, सतिष पाठक, राम रुकर अदि पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

निसर्गाच्या सानिध्यात भरली शाळा !

केदारखेडा येथील श्री.रामेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

   प्रतिनिधी : भोकरदन

 “हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मग सरगम छेडा रे ...!” या निसर्गाच्या व त्यातही पर्यटनाची आठवण करुन देणाऱ्या आणि प्रसिध्द गायक सोनू निगम यांनी गायलेल्या ओळी प्रत्येकाच्याच ओठांवर येऊ लागताच आठवण होते ती सफर करण्याची. सध्या अभ्यासातुन थोडीशी विश्रांती म्हणुन तसेच एक शैक्षणिक उपक्रम म्हणुन शाळा-महाविद्यालयांच्या सहली वेगवेगळ्या पर्यटनस्थळी जात आहेत. असाच अनुभव केदारखेडा येथीलश्री रामेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलांनी घेतला. पण हासहलीचा अनुभव घेतांना त्यांना कुठेही बसने, रेल्वेने किंवा खाजगी वाहनानेजाण्याची गरज पडली नाही. याचे कारण होते निसर्ग सहलीचे. ही सहलपरिसरामध्येच असलेल्या गिरजा-पुर्णा संगमेश्वर येथे गेली होती. या ठिकाणी गिरजा व पुर्णा या दोन नद्यांचा संगम झाला असल्याने येथील वातावरण अतिशय निसर्गरम्य असते.

शाळेची निसर्ग सहल निघणार म्हणुन मुले अतिशय उत्साही होती. आज त्यांना दप्तरांपासुन सुटी मिळाली होती. विद्यालयाच्या प्रांगणापासुन एका रांगेत गिरजा-पुर्णा संगमेश्वराच्या पायथ्यापर्यंत अंदाजे 2 किमी अंतर विद्यार्थी पाई-पाई चालत गेली. पण यात त्यांना कुठलाही थकवा जाणवत नव्हता. उलट उतिशय उत्साहाने ते यात सहभागी झाले होते. मुलांनी सोबत जेवणाचे डबे, पाण्याच्याबाटल्या घेतल्या होत्या तर काहींनी कानाला एअर फोन लावुन गाणे ऐकत यासहलीचा आस्वाद घेतला. संगमेश्वरावर पोहोचल्यावर सर्वांनी येथील परिसराचे निरीक्षण केले. यावेळी शिक्षकांनी मुलांना या परिसराच्या अवती भोवती असलेल्या वनस्पतींची माहिती करुन दिली. त्यांचे वनस्पती शास्त्रामध्ये असलेले महत्व समजावुन सांगितले. एरवी पर्यावरण हा विषय फक्त पुस्तकातच शिकणारे विद्यार्थी आज प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात हा विषय एकरुप होऊन समजुन घेत होते.

विविध वनस्पतींची माहिती जाणुन घेतल्यानंतर सर्व मुलांनी आपल्या डब्यातील पदार्थ एकमेकांना देत एकत्रीत जेवण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. यावेळी शिक्षक सुध्दा मुलांमध्ये मित्रांप्रमाणेच मिसळुण गेले होते. यावेळी मुख्याध्यापक एस.एन.बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशश्वी करण्यासाठी जी.आर.प्रधान, व्ही.एन.धसाळ, आर.के.जाधव, एन.एस.तळेकर, एम.एन.सुटे, ए.एस.सोनुने, टी.आर.फोलाने, एस.एल.गिऱ्हे, एस.बी.पोटे, व्ही.यु.तांगडे, आर.टी.बटुळे, ए.एन.सोनवणे, के.ए.खेडेकर, व्ही.पी.वाघ, डी.जे.काळे, एस.एस.आडे, गणेश एन. सोळुंके, एस.आर.पंडीत, श्रीराम मुरकुटे यांनी परिश्रम घेतले.

   प्रतिक्रीया :

पर्यावरण हा विषय मुळातच पुस्तकांमध्ये शिकण्याचा नसुन तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. त्यामुळे मुलांना केवळ पुस्तकात अडकवून ठेवुन आपण निसर्गालाही याच चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी निसर्ग संशोधन शाळा, निसर्ग वाचन, निसर्ग शाळा, निसर्ग परिचय केंद्र यांसारख्या संकल्पना पुढे येण्याची गरज आहे. अशा अनोख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनासुध्दा खुप फायदा होऊ शकतो. 

एस.एन.बोर्डे: मुख्याध्यापक, श्री.रामेश्वर विद्यालय केदारखेडा.

    
     ╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 
9637599472 ...
                          ╰════════════╯

नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचा सत्कार

महादेव गित्ते
-------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- डिघोळअंबा येथील नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. 

अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील विक्रमी मतांनी निवडून आलेले विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचा बालाजी अ‍ॅटा पार्टस अ‍ॅण्ड एन्टरप्रायजे येथे शाल श्रीफळ पुष्पहार घालुन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी  माणिकभाऊ फड, सुरेश (नाना) फड, बालाजी (भाऊ) फड, लतिफभाई, संजय कराड, अंकुश फड,  गजानन घुगे, गजानन मनाळे  यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

  ╭════════════╮
   ▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114
संपर्क ः- 9623921114
                          ╰════════════╯