तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 December 2017

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड


सेलू:प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या  कालावधीत सांगली येथे  संपन्न होणाऱ्या14 वर्षा आतील राष्ट्रिय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू च्या कु  .पूजा श्याम उगले  हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे जिल्हा हिंगोली , जवळाबाजार  येथे संपन्न झालेल्या राज्य स्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत प्रशालेच्या संघाने औरंगाबाद  विभाग चे नेतृत्व करत उपांत्य फेरी मजल मारली या उत्कृष्ट खेळातून पुजा उगले निवड  महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली,
राष्ट्रिय शालेय   बेसबॉल स्पर्धा  पुर्वप्रशिक्षण शिबीर सांगली येथे दि. 7 ते 11 डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे.
या  खेळाडूस क्रीडा विभाग प्रमुख सौ. संगीता खराबे श्री. किशोर ढोके व श्री.प्रकाश खराटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
ह्या विद्यार्थिनीच्या यशबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, उपाध्यक्ष अँड़ वसंतराव खारकर ,चिटणीस श्री. डी. के.देशपांडे सहसचिव श्री. व्ही. के.कोठेकर सहसचिव जयप्रकाश बिहाणी शालेय समितीचे अध्यक्ष  नंदकिशोर बाहेती प्रशालेच्या मुख्याध्यापिका  सौ.एस.एम्. चाटे उपमुख्यध्यापक सुरेश रणखांबे,  पर्यवेक्षक  अशोक वानरे, तसेच प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment