तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 7 January 2017

विकास कामांचा सपाटा;हादगांव येथे नाली बांधकाम सुरू

कार्तिक पाटील
पाथरी:-तालुक्यातील हदगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्या मार्गदर्शना खाली  वस्ती योजने अंतर्गत धनगर गल्ली ते दवाखाना सिमेंट रस्ता आणि नाली बांधकामाचे भूमिपूजन विनायक दादा नखाते यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , गावकरी दिसत आहेत.

मुलीने जन्म घेतलेल्या पित्याची दाडी,कटींग मोफत

नंदू नाईक
बीड:-स्त्रीभ्रूण हत्येचा शिक्का बसलेल्या बीड जिल्ह्यात आता मुलींचा जन्मदर झपाट्याने वाढू लागलाय. जन्मलेल्या मुलींच्या वडिलांसाठी चक्क नाष्टा चहा आणि सलून मोफत करून मुलीच्या जन्माचं आणि मुलीच्या वडिलांना समाधानी करण्याचं काम बीड जिल्ह्यातील एका गावाने सुरु केलं आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी काही तरी करावं, अशी बीडच्या कुंभेफळ गावच्या अशोक पवार यांची इच्छा होती.मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने ते अस्वस्थ झाले. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली आणि गावात जन्मलेल्या मुलीचं स्वागत करण्यासाठी त्यांनी अनोखा उपक्रम सुरु केला आहे.अशोक पवार मुलीच्या जन्मा नंतर तब्बल सहा महिने तिच्या वडीलाची दाढी आणि कटिंग विनामूल्य करून त्या मुलीचे जावळंही मोफत काढून देणार येणार आहेत. मुलींचा जन्मदर वाढवा म्हणून पालकाला थोडा आधार मिळावा, यासाठी हा उपक्रम त्यांनी सुरु केलाय.कुंभेफळचा जन्मदर जुन्या जनगणने नुसार अत्यंत कमी होता. मात्र गेल्या वर्षीपासून गावातील मुलींच्या जन्म दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यातच अशोक पवार यांच्या उपक्रमाची चर्चा गावभर चालू आहे. ग्रामस्थ आणि मुलगी होणाऱ्या पालकां कडून या उपक्रमाचं स्वागत करण्यात येत आहे.याच गावच्या भागवत थोरात या हॉटेल चालकाने आपल्या हॉटेलवर ‘बेटी बचाव’ चा फलक लावून ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांच्या साठी चहा-नाश्ता सहा महिने मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.बीड जिल्ह्याला लागलेला स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसावा आणि मुलींच्या जन्माचं स्वागत व्हावं यासाठी या गावतले हे तरुण पुढे सरसावले आहेत. छोट्या व्यवसायात थोडं आर्थिक नुकसान जरी होत असलं तरी मुलीच्या जन्मान त्यांना समाधान मिळत आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या कुंभेफळ मध्ये या दोघांनी आपापल्या दुकानावर फलक लावून मुलींच्या जन्माचं स्वागत केलंय. भागवत थोरात यांनी तर मुलींच्या वडिलांना केवळ चहा नाष्टा मोफत देऊन थांबले नाहीत, गावातल्या मुलींच्या पहिल्या वाढदिवसाचा सगळा खर्च ते करणार आहेत. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ साठी अनेक योजना आल्या, मात्र या दोघांनी मुलींच्या जन्माचं ज्या पद्धतीने स्वागत केलं आहे, ते इतरांनाही प्रेरणा देणारं आहे.

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
-------------------------------------------------
नंदू नाईक
⭐आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी नेत्यांनी दबाव आणू नये असं मोदींनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं आहे.

⭐ कल्याण = बाळासाहेबांचा 22 फुटी पुतळा साकारणा-या कारागिरांचा उद्धव ठाकरेंनी केला सत्कार.

⭐ कल्याण = उद्धव ठाकरे यांचे काळा तलाव येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे होणार लोकार्पण.

⭐कोल्हापूर = इंडियन डेयरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची निवड. महाराष्ट्राला प्रथमच संधी.

⭐दांडेकर पुलाजवळ ओढयामध्ये बुडालेल्या मुलाचे शोधकार्य थांबवले, मुलगा अजून सापडला नाही.

⭐भाजपाची राष्ट्रीय कार्यकारीणीची पुढची बैठक 15 आणि 16 एप्रिलला.

⭐ नाशिक मध्ये पालिकेची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई, 800 दुकानं जमीनदोस्त.

⭐सीरीयात कार बॉम्बस्फोटात 14 मृत्यु.

⭐ पिंपरी = तळवडे एमआयडीसी मध्ये भीषण अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू, एक जखमी, ट्रक चालकला पोलिसांनी घेतले ताब्यात.

⭐मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाला 6 किलो सोन्याच्या दागिन्यां सहित अटक, दुबई वरुन आली असताना अटक.

⭐दांडेकर पुलाजवळील आंबील वडा येथे 14 वर्षांचा मुलगा ड्रेनेज साठीच्या खड्ड्यात पडला.

⭐ नवी मुंबई = 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये पोलिसांची कामगिरी उंचावली 2015 वर्षी 5405 तर 2016 मध्ये 3384 गुन्हे दाखल एकूण 604 गुन्हे कमी तसेच गुन्हे उकल मध्ये 3%ची वाढ बहुतांश मुख्य गुन्ह्यात घट, वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी माहिती दिली.

⭐औरंगाबाद एएस क्लब जवळ दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात सुमित सुभाष पवार हा 23 वर्षीय तरुण ठार झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. अपघात ग्रस्त वाहन एमआयडीसी वाळूंज पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

⭐ काँग्रेसचा भंडा-यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा.

⭐समुद्र सीमा उल्लंघनाच्या आरोपावरुन श्रीलंकन नौदलाने एका बोटीसह आठ मच्छीमारांना ताब्यात घेतले.

⭐ सिमला, मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी, वाहतुकीवर परिणाम.

⭐मध्यप्रदेश हरदा महापालिका निवडणुकीत भाजपाने 30 जागा जिंकल्या, काँग्रेस 4 आणि अपक्ष एका जागेवर विजयी.

नातेवाईकांना तिकीट द्या म्हणत दबाव नको;मोदींचा सज्जड दम

दिल्ली:-आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी नेत्यांनी दबाव आणू नये असं मोदींनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कालपासून सुरु आहे. यात आगामी निवडणुकांसोबतच अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

नोटाबंदीनंतर भाजप कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे.  उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यावर चर्चा आणि नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकीआधी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. कार्यकारिणीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी पाच राज्यातील निवडणुका, नोटबंदी, भ्रष्टाचार आणि भारतीय संस्कृतीच्या मुद्द्यांना हात घातला. तसंच पाच राज्यातील निवडणुकीत कोणत्याही नेत्यानं नातेवाईकांना तिकीट देण्यासाठी दबाव आणू नये, असं मोदींनी ठणकावलं आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या भाषणातील मुद्दे स्पष्ट केले.

नोटबंदीला देशभरातून पाठिंबा मिळाला असून नोटबंदीचा निर्णय यशस्वी झाल्याचं मोदींनी म्हटलं आहे. मात्र अजूनही भ्रष्टाचार मोठी समस्या असून येणाऱ्या काळात आणखी कठोर निर्णय घेण्यात येतील, असे संकेतही मोदींनी दिल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे.

मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात काँग्रेसचे निदर्शने

औरंगाबाद:-मोदी सरकार च्या हूकुम शाही च्या विरोधात काँग्रेस च्या वातिने भव्य निदर्शने व धरने आंदोलन व रस्ता रोको केले त्या प्रसंगी आदोलकना शहराध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष मा.आ.नामदेवराव पवारसाहेब व पदाधिकारी ना अटक करून नेताना.जनतेच्या न्याय हकासाठी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने आज जिल्हा अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले

सिरपूर महिलांचा दारू बंदी विरूद्ध एल्गार

अरुणा शर्मा
पालम:-तालुक्यातील सिरपुर येथील महिलांनी अवैध दारूविक्रीबाबत कैफियत मांडीत दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली. तात्काळ गावातील दारूविक्री बंद करुन विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याची मागणी बुधवारी परभणी जिल्हाधिकारयांसह पोलीस अधीक्षकांकडे केली.
सिरपूर येथे अवैध दारूविक्री सुरु असल्याने गावात सहज दारू मिळत. त्यातून गावात व्यसनाधीनता वाढून पुरुषांबरोबर तरुण मंडळीही त्यात अडकत चालली आहेत.दारुमुळे घराघरात वितुष्ट निर्माण होऊन भांडण-तंटे वाढले आहेत. तळीरामांकडून महिलांना मारझोड होत असून अनेक संसार उदध्वस्त होत आहेत. महिलांना त्रास वाढत असून मुलांचे शिक्षण, आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. 17 डिसेंबर रोजी गावात भांडण झाल्याने महिलांना शिवीगाळ करण्यात आली. त्याचा जाब विचारण्यास गेल्यावर दारूविक्रेत्याने ग्रामस्थांना शिवीगाळ सुरु केली. या दारुविक्रीवर त्वरित आळा घालून गावातून दारु हद्दपार करण्याची मागणी केली. भविष्यात गावात दारु मिळणार नाही यासाठी विक्रेत्यांवर कार्यवाही जिल्हाधिकारयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दत्तराव गोविंदराव आवरगंड, बालासाहेब नागोराव बीडकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष व्यंकटराव शेवटे, पोलीस पाटील बापूराव पत्तेवार, सरपंच कल्पनाताई भाऊराव लांडे, उपसरपंच विष्णुकांत आरगंड, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा गौतम हनवते, सदस्या कोशल्याबाई सुधाकर शेवटे, सदस्या पार्वतीबाई भानुदास बचाटे, सदस्य अजय देशमुख, चेअरमन सुधाकर शेवटे, धोंडिबा लांडे, विद्या आवरगंड, मंडोदरी बिडकर, इंदुताई शेवटे, गोदावरी शेवटे, स्वाती शेवटे, प्रीती शेवटे, सावित्रीबाई शेवटे, भारतबाई शेवटे, वच्छलाबाई शेवटे, दीक्षा सुधाकर हनवते, कान्होपात्रा कदम, सरोजा कदम, सुलोचना कदम, यांच्यासह गावातील 140 महिलांच्या स्वाक्षरया निवेदनावर आहेत.

संभाजी ब्रिगेडच्या वतिने डिघोळ गणातून मिनाताई भोसले यांची उमेदवारी जाहीर

गणेश पाटील
सोनपेठ:-तालुक्यातील जिल्हा परिषेद व  पंचायत समितीच्या ईच्छुक उमेदवारांची आज महत्त्वपूर्ण झालेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेड ने गवळी पिंप्री येथील मिनाताई प्रकाश भोसले यांची पंचायत समितीच्या डिघोळ गणातुन ऊमेदवारी निश्चित केली आहे.
आज झालेल्या बैठकीत सर्व मतदार संघ निहाय उमेदवारांनी आपल्या इच्छूकांची नावे समितीकडे दिली आहेत.याबाबत निर्णय योग्य वेळी घेतला जाईल परंतू सर्वानुमते डिघोळ पं. स. गणाच्या उमेदवारीसाठी मिनाताई  भोसले यांच्या नावावर सर्वांनीच सहमती दर्शवल्याने त्यांची उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कदम, जिल्हा संघटक संजय मस्के, तालुकाध्यक्ष हनुमान मोरे,भगवान तात्या जोगदंड,बालासाहेब इंगोले,प्रकाश भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.

सोनपेठ तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

राधेशाम वर्मा
सोनपेठ:-शहरासह ग्रामीण भागात क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती  ठिकठिकाणी  मोठ्या  उत्साहात साजरी करण्यात आली

*लालबहादुर शास्री वि.लासीना *
--------------------------------------
तालुक्यातील मौज लासीना येथील लालबहादुर शास्री विद्यालयात सावित्री बाई याची जंयती  साजरी केली  यावेळी अध्यक्षस्थानी विद्यार्थी नी गीता कदम हि होती तर प्रमुख पाहून म्हणून प्रणीता कोचे गीता भंडारे वैष्णवी भुजबळ आदी उपस्थित होत्या .सुत्रसंचलन कांचन कदम तर अभार पल्लवी परांडे हिने मानले
-----------------------------------------------------
व्हिजन स्कुल सोनपेठ
-------------------------------------------------
. शहरातील व्हिजन पब्लिक स्कुल मध्ये मोठ्या जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एय. जे. अजय हे होते प्रमुख पाहून म्हणून उपप्राचार्य अभिजीत हासे विनोद पवार  विकास सर आदी उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांना सावित्री बाई फुले यांचा देखावा सादर केला होता सुत्रसंचलन गोवर्धन यानी तर अभार राउत याने मानले.
-----------------------------------------------------
   जि.प.प्रा.शा.वाणीसंगम.
-----------------------------------------------------
शाळेत क्रांतीजोती,ज्यांनी संपूर्ण मानव जातीचे हित स्त्री शिक्षणात आहे हे ओळखले.व त्यासाठी धर्माच्या व वाईट परंपरेच्या गर्तेत अडकलेले महिलांचे शिक्षण सर्व स्त्रीजाती साठी मोकळे त्यांची जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करण्यात आली.यासाठी कार्यक्रमात शाळेतीलच सावित्री अध्यक्ष प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उभ्या राहिल्या.
घरातील एक मुलगी उभी राहिली तर संपूर्ण कुटूंब उभे राहते हाच संदेश या बालिका दिनी आमच्या चिमुकल्यांनी दिला.
----------------------------------------------------- कै.रमेश वरपूडकर महा सोनपेठ
-----------------------------------------------------  शहरातील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
सोनपेठ: येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध ऊपक्रमासह साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्वप्रथम सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पुजन सस्था  अध्यक्ष परमेश्वर कदम व प्राचार्य डाॅ. वसंत सातपुते यांनी केले.  समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डाॅ. सुनिता टेंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बनवलेल्या "क्रांतीज्योती सावित्री" या भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास अंधश्रध्दा निर्मूलन समिती सोनपेठच्या वतीने प्रा. आरती बोबडे व प्राचार्य शेख शकिला यांच्याकडून 'समग्र अंधश्रध्दा निर्मुलन' या ग्रंथाचे तीन खंड ग्रंथदान म्हणून देण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या महिला सशक्तिकरण समितीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी ग्रंथपाल प्रा.अनंत सरकाळे, महिला सशक्तीकरण समितीच्या डाॅ. वनिता कुलकर्णी व डाॅ. सुनिता टेंगसे मॅडम ऊपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी ऊपस्थित होते.
ज्या काळात स्त्री घराभाहेर पडणे हे पाप समजले जाई त्या काळत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सत्री शिक्षनाचा पाया रोवला. आज सर्व  क्षेत्रात सत्रीयांचा पुढाकार आहे. सत्रीला दुयम स्थान नसून ती पुर्णंता मुक्त आहे आजची स्त्री मुक्त हा सावित्रीबाई फुले यांच्या विचारंचाच विजय आहे. आसे प्रतीपादन सामाजीक कार्यकर्यत्या व जिजाऊ ब्रिगेड ता. अध्यक्ष गंगासागरताई शिंदे यांनी केले प्रस्थावीक पुष्पाताई इंगोले जिजाऊ ब्रिगेड परभणी जि . अध्यक्ष यांनी केले तर आभार वेक्त केले कुलकरनी मँडम यांनी केले सुत्रसंचालन सोमवशी मँडम यांनी केले  सर्व जिजाऊ ब्रिगेड महीला व मूली  उपस्थित होत्या राजेभाऊ कदम नगर सोनपेठ येथे संपन झाला
-----------------------------------------------------
डिघोळ येथे  सा.फुले जयंती साजरी
--------------------------------------------
सोनपेठ : तालुक्यातील डिघोळ येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सर्वोदय लोक संचलित साधन केंद्र सोनपेठ यांनी घेतलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात कै. रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केली.यावेळी पं.स. सभापती छायाताई शिंगाडे व प्राचार्य शेख शकीला यांची प्रमुख उपस्थिती होती.
डिघोळ येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले, यावेळी प्रबोधनात्मक कार्यक्रम म्हणून प्राचार्य शेख शकीला यांचे स्वलिखीत नाटक स्वच्छतेला जाणूया, विज्ञानाला मानुया याचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले, अभियानाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमासाठी सरपंच इंदुरकर, उपसरपंच द्रोपदी खलसे, ग्रामविकास अधिकारी मुंडे, गिता आंबुरे, कार्यक्रम व्यवस्थापक सय्यद नसिमा यांच्यासह सादरीकरणाचे विद्यार्थी गौरी कोल्हेकर, रामेश्वर पांडूळे, शे. शमशोद्दीन, श्वेता किरवले, अनिस शेख, योगेश परांडे, वैष्णवी उबाळे, आशोक पर्वत, मुकुंद आबुज, कल्याणी वाघमारे,पल्लवी चव्हाण, विकास साळवे आदींसह सयोगिनी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोणी खुर्द ग्रामपंच्यायतच्या वतीने पत्रकारांना केले सन्मानित

प्रदिप जाधव
वैजापूर:-आद्य पञकार बाळशास्ञी जाभेंकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोणी खुर्द येथे ग्रामपंचायतच्या वतीने परिसरातील पञकारांचा सत्कार  सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते. शांताराम मगर, भिकन सोमासे, सोमनाथ तांबे, राधाकृष्ण सोनवणे, जगदीश निकम, तैमुर सैय्यद,  तान्हाजी शिंदे, हसन सैय्यद, प्रदिप जाधव, सरपंच रिखबशेठ पाटणी यांची प्रमुख  उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित पत्रकारांना ग्रामपंचायत च्या वतीने  शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तान्हाजी शिंदे यांना बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने समाजरत्न पुरस्कार घोषित झाल्याने यावेळी त्यांचा हि शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी लोणी खुर्द सरपंच श्री. रिखबशेठ पाटणी यांनी प्रास्ताविक भाषणात बोलताना म्हणाले कि पञकार हा समाजाचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकार आपल्या लेखणीतून समाजातील समस्या  शासनासमोर मांडतात, शासनाच्या कोणत्या योजना किती प्रभावी पने राबवल्या गेल्या व जनतेला त्या योजना किती फायदेशीर ठरणार हे देखील पत्रकार समाजासमोर मांडतात असे पाटणी म्हणाले. यावेळी सर्व पत्रकारांनी आपआपल्या भाषणात सरपंच व सर्व सदस्य यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री अरुणभाऊ सोनवणे यांनी केले तर आभार श्री भिमराज जाधव यांनी मानले,
यावेळी लोणी खुर्द सरपंच रिखबशेठ पाटणी, ग्रामसेवक साहेबराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य अरुणभाऊ सोनवणे, बाळू बागुल, भीमराज जाधव, गोरख जाधव आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

मराठा आरक्षण लांबणीवर?

मुंबई:-मराठा आरक्षणाच्या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच, राज्य सरकारने महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना केली असल्याने आरक्षणाला आता आणखी एक वळसा मिळणार आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा राज्य सरकार आयोगाकडे जाणार आहे. आयोगाच्या शिफारशीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचे भवितव्य ठरणार आहे. आयोगाचा निर्णय होईपर्यंत उच्च न्यायालयातील आरक्षणाबाबतची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
देशात इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण देण्याच्या मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर त्याला आव्हान देणारी अनेक प्रकरणे न्यायालयात गेली. एका प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या जातीचा अनुसूचित जाती व जमाती वगळून इतर मागास वर्गात (ओबीसी) समावेश करणे किंवा मागास यादीतून एखाद्या जातीला वगळणे, याचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी सर्व राज्यांनी मागासवर्ग आयोग स्थापन करावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने २००५ मध्ये कायद्यातील तरतुदीनुसार मागासवर्ग आयोगाची स्थापना केली.

मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र त्यासाठी हा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास आहे व त्याचा इतर मागासवर्गात समावेश करावा, अशी शिफारस आयोगाकडून केली जाणे आवश्यक आहे. मात्र यापूर्वी बापट आयोगाने मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश करण्यास नकार दिला होता व तशी शिफारस राज्य सरकारला केली होती. त्यामुळे मराठा आरक्षणापुढे कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्यानंतर काँग्रेस आघाडी सरकारने आयोगापुढे हा विषय न ठेवता २०१४ मध्ये अध्यादेश काढून मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. परंतु न्यायालयात त्याचा टिकाव लागला नाही. नव्याने सत्तेवर आलेल्या युती सरकारनेही आयोगाला डावलून मराठा आरक्षणाचा कायदा केला. त्यालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

कोणत्या जातीचा मागास यादीत समावेश करायचा व कोणत्या जातीला त्यातून वगळायचे याचा अभ्यास करून राज्य सरकारला शिफारशी करण्याचा अधिकार आयोगाला आहे. आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याचे सरकारला बंधनकारक आहे. मात्र त्या अंशत: किंवा पूर्ण फेटाळायच्या असतील तर सरकारला तशी सबळ कारणे द्यावी लागणार आहेत, तशी कायद्यात तरतूद आहे. त्यामुळेच उशिरा का होईना राज्य सरकारच्या ही बाब लक्षात आली आणि बुधवारी निवृत्त न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना केली.

*आयोगाबाबत पुन्हा वाद?*

माजी न्यायमूर्ती संभाजी म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना करण्यात आली असून आयोगाच्या रचनेबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळी आक्षेप घेतले जाण्याची शक्यता आहे. राज्यघटनेतील व कायद्यातील तरतुदींनुसारच आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे उच्चपदस्थ शासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यास नकार दिल्यावर तत्कालीन मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र आयोगाची शिफारस बंधनकारक असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असून उच्च न्यायालयाकडूनही तेच आदेश दिले जातील, असे सरकारला अपेक्षित आहे. जोपर्यंत आयोगाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू होणे अवघड आहे. आयोगाचा अभ्यास व उच्च न्यायालयातील सुनावणी दोन्ही सुरू ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. मात्र जोपर्यंत आयोगाच्या शिफारशी उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत उच्च न्यायालय सुनावणी घेणार नाही. त्यामुळे पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयाचे आदेश घेऊन आयोगाचे कामकाज सुरू होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची आयोगापुढेच कसोटी लागणार आहे व आरक्षणाचे भवितव्यही आयोगाच्या शिफारशींवर ठरणार आहे.