तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 14 January 2017

समाजवादी पार्टीचे साजिद दिवान यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

जावेद खान
बुलढाणा:-समाजवादी पक्षाचे राज्यस्तरीय पदाधिकारी मो. साजिद डाॅ दय्यान
यांनी आज सपा ला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
   मुळ देउळघाट येथील मो. साजिद दिवान यांनी बुलढाणा येथे आयोजित काँग्रेस च्या कार्यक्रमात बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांचे पुष्पहार व काँग्रेसचा रूमाल देउन सत्कार करण्यात आला. केवळ साजिद दिवानच नाहीतर त्यांचे बंधू फुरकान दिवान यांनी सुद्धा प्रवेश केला या वेळी माजी आमदार नानाभाऊ गावंडे, तालुका अध्यक्ष  सुनील तायडे, देउळघाट चे सरपंच आरिफ खान, माजी  पस उपसभापती मुश्ताक अहमद, युवक काँग्रेसचे  गजंनफर खान , गुलामरसूल खान, अनवर चौधरी, कौतिकराव पाटिल, सय्यद इमरान, वकील खान, तंटामुक्ति अध्यक्ष जुनेद खान, हमीद खान, शे दय्यान, शे इदरीस, पुरुषोत्तम देशमुख, युनुस खान, अज़ीज़ कुरैशी, चन्दू सपकाल, भीमराव लवंगे, इमरान खान, ज़ुबेर खान, इम्तियाज़ अंसारी, सय्यद जुनेद, युसूफ खान, शे अमान, सईद खान, आदी उपस्थित होते.

'भोगी' दिवशी विवाहितेवर बलात्कार !

गंगाखेड :महिलांसाठी भोगी आणि संक्रांत सणास अनण्यसाधारण महत्त्व आहे. सर्वत्र भोगी सण साजरा केला जात असताना विवाहितेवर जबरी बलात्काराची घटना घडलीय. गंगाखेड तालुक्यातल्या ऊखळी शिवारात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. 

काल दि. १३ जानेवारी रोजी महिलांची भोगी सण साजरा करण्याची आणि संक्रांतीच्या तयारीची लगबग सुरू होती. ऊखळी शिवारातील एक २५ वर्षीय विवाहिता शेतात गेली होती. आजूबाजूस कोणी नसल्याचा फायदा घेत ५५ वर्षीय नराधमानं तीला जबरदस्तीनं ज्वारीच्या शेतात नेलं. तीच्यावर बलात्कार केला. काल दुपारी दोन च्या सुमारास ही घटना घडली. ही घटना कोणाला न सांगण्याची तंबीही सदर ईसमानं दिली. रात्री ऊशीरा तीनं ही बाब घरातील नातेवाईकांना सांगीतली. 

आज देण्यात आलेल्या फिर्यादिवरून गंगाखेड पोलिसांनी लिंबाजी नारायण ऊबाळे या ५५ वर्षीय आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याला लगोलग अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केलीय. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. सुरेश थोरात हे करीत आहेत. दोनच दिवसांपूर्वी तालुक्यांतील सेलमोहा ईथं मतीमंद युवतीवर बलात्काराची घटना घडली होती. काल आणखी एक बलात्काराची घटना घडल्यामुळं महिलांच्या सुरक्षीततेबाबत चिंता व्यक्त केली जातेय.

जि.प.-पं.स.'चे सदस्य बनले 'पिंजर्‍यातील वाघ'

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा हक्काचा असलेला तेरावा वित्त आयोगाचा निधी राज्य सरकारने बंद करुन चौदावा वित्त आयोग थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर दिल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्हीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची अवस्था ही पिंजर्‍यातील वाघासारखी झाली आहे.

तेरावा वित्त आयोगाच्या माध्यमातून मतदार संघात विविध विकास कामांसाठी सदस्यांना निधी खर्च करण्याचे अधिकार होते. त्यामुळे गावचे ग्रामसेवक, सरपंच सदस्यांच्या शब्दाला मान देत होते. मात्र हा निधी बंद करुन शासनाने थेट ग्रामसभेला निधी खर्चाचे अधिकार दिल्याने सदस्य हे नामधारी बनले असून, या सदस्यांपेक्षा सरपंचाला जास्त अधिकार दिल्याने जिल्हा परिषद सदस्यांची अवस्था नामधारी सदस्यापुरती र्मयादित झाली आहे. सध्या या निवडणुका जाहीर झाल्याने या नामधारी सदस्यपदासाठी सुशिक्षित नेतेमंडळी चार हात दूरच असल्याचे दिसत असून, आर्थिक सक्षम असलेल्या बकर्‍याच्या शोधात काही नेतेमंडळी असल्याचे दिसत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना आपल्या मतदार संघात समावेश असलेल्या गावांतील रस्ते, गटार, पाणी, बोअर, नळ दुरूस्ती, किंवा समाजमंदिर शाळा दुरुस्ती अशा विविध विकासाच्या कामासाठी निधी देता येत असे. त्यामुळे सदस्य हे प्रत्येक गावच्या संपर्कात राहात होते. जिल्हा परिषदेच्या सदस्यांना तेरावा वित्त आयोगातून किमान वीस ते पंचवीस लाख रुपये तर पंचायत समितीच्या सदस्यांना दहा ते पंधरा लाख रुपये विकास कामांसाठी निधी मिळत असत. त्यातून लोकांनी मागणी केल्याप्रमाणो कामे केली जात असे. मात्र सदस्यांच्या या हक्काच्या निधीलाच राज्य सरकारने कात्री लावलेली आहे. आता तोच निधी चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्येप्रमाणो थेट ग्रामपंचायतीला दिलेला आहे. यामुळे सदस्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सेसमधून समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन विभागातून देण्यात येत असलेल्या शिलाई मशीन, सायकल, संसारोपयोगी भांडी, मिरची कांडप, गॅस जोडणी, तुषार संच, इलेक्ट्रीक पंप आदी सहित्यासाठी फक्त शिफारस पत्र देण्याचा अधिकार उरलेला आहे. त्यामुळे या नामधारी सदस्य पदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत तर काहीजण जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच झालेले बरे म्हणून आपल्या गावाकडे लक्ष देवून गावच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.

पेट्रोल पंपांवरील मोदींच्या जाहिराती हटविण्याची मनसेची मागणी


नवी मुंबई : कोकण विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाची आचारसंहीता ५ जानेवारी पासून लागू होऊनसुद्धा नवी मुंबईतील पेट्रोल पंप परिसरातील नोटाबंदीच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या जाहिरातींचे होर्डिंग न काढल्याबद्दल मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी या संदर्भात कोकण विभागीय आयुक्त व ठाणे जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून निवडणूक आचारसंहीतेचा भंग करणार्‍या या जाहिराती तात्काळ काढाव्यात अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नुकताच कोकण विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ५ जानेवारी पासूनच नवी मुंबईसहित ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आचारसंहिता लागू होऊन सुद्धा नोटबंदी निर्णयाच्या वित्त मंत्रालय, भारत सरकार तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या जाहिरातींचे फलक नवी मुंबई शहरातील सर्वच पेट्रोल पंप परिसरात झळकत आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडत असून मतदारांना आकर्षित करण्याचे हे एक माध्यम होत असल्याचे मत मनसेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
हा आचारसंहितेचा भंग असून याची तात्काळ दखल घेऊन निवडणूक आचार संहिता नियमांची कडक अंमलबजावणी करून सदर जाहिरात फलक तात्काळ काढावेत अशी मागणी निवेदनाद्वारे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे.

नारायण राणे आणि जितेंद्र आव्हाड शिवसेना-भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पण, आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र नंतर ठरणार आहे. भाजपाला हद्दपार करण्यासाठी ठाण्यात आघाडी झाली आहे.

ठाणे पालिकेत 25 वर्ष सत्ता सेना-भाजपाची आहे. अनेक भ्रष्टाचार झाले. अनधिकृत बांधकामे, टेंडर भ्रष्टाचार,नोटबंदी आणि विकासात केलेला भ्रष्टाचार हा निवडणुकीचे मुद्दे राहणार असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. तर, आमचे फॉर्म्युले फक्त मनाने एकत्र येणे असे असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

महावितरणच्या ॲपमुळे ग्राहकही स्मार्ट!

मुंबई:-ग्राहकसेवांना माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन या सेवा सुलभ आणि ग्राहकोपयोगी करण्याचा यशस्वी प्रयोग ‘महावितरण’ने मोबाईल ॲपच्या माध्यमातून केला आहे. वीज मीटर रीडिंगपासून त्याची छायाचित्रे काढण्यापर्यंतची सुविधा या ॲप्लिकेशनचा कणा ठरली आहे. शिवाय, मीटर रीडिंग झाल्यानंतरचा एसएमएस, देखभाल दुरुस्तीच्या कामाचा एसएमएस आणि मीटर रीडिंग पाठवण्याची ग्राहकांना दिलेल्या सुविधांचीही मोठी भर पडली आहे. केवळ मोबाईल ॲपवर वीजबिल भरण्यासाठी मर्यादित न राहता अनेक प्रयोगांची जोड या ॲप्लिकेशनमुळे मिळाली आहे. त्यामुळे ‘स्मार्ट’ झालेल्या महावितरणचे ग्राहकही ‘स्मार्ट’ झाले आहेत.

राज्यातील दोन कोटी ७० हजार ग्राहकांच्या मीटर रीडिंगचा डाटा मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळवण्याच्या प्रयोगाची सुरुवात सप्टेंबर २०१६ मध्ये झाली. मानवी हस्तक्षेप कमी करतानाच मीटर रीडिंगमधील चुका टाळणे आणि ग्राहकांच्या तक्रारी कमी करणे हा मुख्य उद्देश महावितरणने या ॲपचा ठेवला होता. पारंपरिक छायाचित्रे काढण्याची पद्धत मोबाईल ॲप्लिकेशनमुळे बदलली. तसेच मीटर रीडिंगचे भौगोलिक ठिकाणही घेण्याची सुविधा या ॲप्लिकेशनमध्ये देण्यात आली आहे. सुरुवातीला राज्यातील महावितरणच्या मोजक्‍याच परिमंडळात हे ॲप वापरायला सुरुवात झाली. भांडुप, कल्याण यांसारख्या मुख्य परिमंडळांनंतर इतर ठिकाणच्या परिमंडळात ॲप्लिकेशन वापराची सुरुवात झाली. सध्या राज्यातील १६ परिमंडळात ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाईलवर मीटर रीडिंग घेण्यात येते. राज्यातील एकूण ग्राहकांपैकी ९५ टक्के ग्राहकांचे मीटर रीडिंग ॲपवर घेतले जाते. ग्राहकांना आपल्या मोबाईल मीटरचे छायाचित्र आता वीजबिलावर पाहता येते. शिवाय मीटर रीडिंग झाल्यानंतर मोबाईलवर एसएमएसही येतो. मोबाईल रीडिंग घेतल्यानंतर ते रीडिंग सर्व्हरला तत्काळ अपलोड होते. राज्यात कोकण, गडचिरोली या भागात नेटवर्कची तांत्रिक अडचण आहे. त्यामुळेच महावितरणने या ठिकाणी ऑफलाईन मीटर रीडिंगचाही पर्याय दिला आहे. कार्यालयाच्या ठिकाणी आल्यानंतर मीटर रीडिंग अपलोड करण्याची सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

राज्यातील सुमारे ८५ लाख ग्राहकांचे मोबाईल क्रमांक मिळवण्यात महावितरणने काही महिन्यांत प्रयत्न केले आहेत. त्यापैकी रहिवासी ग्राहकांचे क्रमांक सर्वाधिक आहेत. विजेच्या बिलाशी संबंधित होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण यामुळे कमी होण्यासाठी एक प्रकारे मदत झाली आहे. ग्राहकांच्या अनेक तक्रारी या फोटो मीटर रीडिंगमुळे कमी होण्यासाठी मदत होत आहे. आपल्या मीटर रीडिंगमुळे अनेक ग्राहकांच्या शंकांचे समाधान होणे शक्‍य झाले आहे. अनेक ठिकाणी मीटर रीडिंग न होता सरासरी वीजबिल, अंदाजे वीजबिल देण्याचे प्रकार या फोटो मीटर रीडिंगमुळे बंद झाले आहेत.

अनेक ग्राहकांचे मोबाईल क्रमांक उपलब्ध झाल्याने आता देखभाल दुरुस्तीसाठीचे कामही (आऊटेज) आगाऊ एसएमएसद्वारे कळवण्याची सुरुवात महावितरणमार्फत करण्यात आली आहे. महावितरणने ‘आऊटेज’साठी एसएमएस पाठवण्याची सुविधा ॲपमध्येच दिली आहे. मीटर रीडिंग, मोबाईलद्वारे वीजबिल भरणा; तसेच मीटर रीडिंग कळवण्यासाठीचीही सुविधा ॲपवर आहे. बंद दरवाजामुळे मीटर एजन्सीला रीडिंग घेणे शक्‍य झाले नाही, अशा अनेक कारणांमुळे एखाद्या ग्राहकाचे मीटर रीडिंग न झाल्यास महावितरणकडून एसएमएस पाठवण्यात येतो. ग्राहकांनी ॲप्लिकेशन डाऊनलोड करून आपल्या मीटरचे छायाचित्र काढून पाठवण्याची सुविधा ॲप्लिकेशनमध्ये आहे. या सुविधांमुळे महावितरणचा ग्राहक स्मार्ट झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पॅन कार्ड आता नव्या रुपात येणार!

नवी दिल्ली:-बनावट पॅन कार्डच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी आता केंद्र सरकारने पॅन कार्ड नव्या रुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाकडून नव्या स्वरुपातील पॅन कार्ड देणं सध्या सुरुही करण्यात आलं आहे, अशी माहिती आयकर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नवे पॅन कार्ड एनएसडीएल आणि यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून प्रिंट केले जाणार आहेत. या पॅन कार्डचं वितरण 1 जानेवारीपासून सुरु करण्यात आलं असून नवीन अर्ज करणाऱ्यांना यापुढे नवीन स्वरुपातील पॅन कार्ड मिळणार आहेत.

सरकारडून या नवीन पॅन कार्डमध्ये क्यूआर कोड म्हणजेच क्वीक रिस्पॉन्स कोडचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पॅन प्रणाली अधिक पारदर्शक होऊन गैरप्रकार थांबवता येतील, असा सरकारचा अंदाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात दरवर्षी अडीच कोटी नागरिक पॅन कार्डसाठी अर्ज करतात.

जुलै 2016 मध्ये सरकारने पॅन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता आणली होती. शिवाय बनावट पॅन कार्ड ओळखण्यासाठी देखील आयकर विभागाने नवी व्यवस्था केली होती.

पिंपरीत खादी कपडय़ांच्या मागणीत वाढ


महापालिका निवडणुकीचा फड रंगत चालला आहे. त्यामुळे एरवी सुटा बुटात वावरणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी खादीचे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीचे वातावरण तयार झाल्यापासून खादीच्या कपडय़ांना शहरात मागणी वाढली असून गेल्या दोन महिन्यांपासून विक्रीमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.

महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जाण्यासाठी सर्वप्रकारे तयार असलेल्या इच्छुकांनी प्रचार यंत्रणेपासून ते राहणीमानापर्यंतची सर्वच बाबींची तयारी केली आहे. त्यासाठी खास ‘इव्हेंट मॅनेजर्स’चीही मदत घेतली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बहुतांश इच्छुक उमेदवारांचा वावर सुरू आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी कोणते कपडे वापरावेत, केसरचना कशी असावी इथपासून नागरिकांशी संवाद, भाषण कसे असावे याचे मार्गदर्शन इच्छुक घेत आहेत. त्यामुळे एरवी मग्रुरीची भाषा करणारे काही इच्छुक खादीच्या पांढऱ्या शुभ्र कपडय़ांमध्ये मतदारांपुढे जाऊन नमस्कार करताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून खादीच्या तयार कपडय़ांची मागणी वाढल्याने विक्रीमध्येही वाढ झाली आहे. खादी कापडाचा दर ९० रुपये मीटर पासून ते ४१० रुपये मीटपर्यंत आहे. खादी शिल्क ‘टसर’, ‘मटका’, ‘कटिया’, ‘बापटा’ आणि ‘रॉ सिल्क’चे खादीचे कापड ६१० रुपये मीटर या दराने बाजारात उपलब्ध आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी लाट जोरात सुरू होती. त्यामुळे ‘मोदी जॅकेट’ला खूप मोठी मागणी होती. मोदी जॅकेटला विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मागणी होती. मात्र सध्या तेवढी मागणी नसल्याचे सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये मोदी जॅकेटची मागणी एक-दोन दिवसाला एखादे जॅकेट इतकीच असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले. मोदी जॅकेट्स ४८० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत आहेत. तर वूलनचे जॅकेट दीड हजार रुपयांना आहे.

निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तशी खादीच्या कपडय़ाला मागणी वाढू लागली आहे. गेल्या महिनाभरापासून खादीच्या विक्रीमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. त्यात खादीचे तयार कपडे घेण्याकडेही ग्राहकांचा कल आहे.

जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी


सोशल मीडियावर बीएसएफ जवानाचा व्हिडीओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर देशभर खळबळ माजली असतानाच, लष्करातील शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. निमलष्करी दलाच्या जवानांना सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे जवानांच्या काही तक्रारी असल्यास थेट मला सांगा, असे आवाहन काल, शुक्रवारी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केल्यानंतर गृहमंत्रालयाने जवानांच्या सोशल मीडियावरील वापराला चाप लावला आहे. दरम्यान, जवानांच्या स्मार्ट फोनच्या वापरावर कोणतीही बंदी घालण्यात आली नाही, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केले आहे.

बीएसएफच्या तेज बहादूर यादव या जवानाने जवानांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याची व्यथा मांडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. या व्हिडीओनंतर एकच खळबळ उडाली होती. याबाबत चौकशी करण्याचे आदेशही पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला दिले होते. तसेच अहवालही मागवला होता. मात्र, यादव याच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही, असा अहवाल गृहमंत्रालयाने दिला होता. याशिवाय शुक्रवारी नवनियुक्त लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी जवानांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी थेट मला सांगावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला काही तास उलटत नाहीत तोच केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन दिशानिर्देश जारी करत, निमलष्करी दलातील जवानांच्या सोशल मीडियाच्या वापराला बंदी घातली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. नव्याने जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार, कोणत्याही जवानाला विनापरवानगी छायाचित्र अथवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. जर एखाद्या जवानाला ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम यांसारख्या सामाजिक माध्यमांच्या मंचावर छायाचित्र अथवा व्हिडीओ टाकायचा असल्यास संबंधित दलाच्या महासंचालकांकडून परवानगी घ्यावी लागेल. दरम्यान, लष्करातील जवानांमध्ये शिस्त राखली जावी, यासाठी गृहमंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, व्यक्तिगत पोस्ट करण्यास कोणतीही बंदी नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले.

लासूरगांव येथे विज्ञान मेळावा संपन्न

सुधीर बागुल
वैजापुर - वैजापुर तालुक्यातील लासूरगांव येथील जिल्हा परिषद प्रशालेत अपुर्व विज्ञान मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विज्ञानातील अनेक
संबोध , संकल्पना प्रयोगांच्या मदतीने अतिशय सोप्या पद्धतीने उपलब्ध
साहित्य वापरून स्पष्ट केल्या, या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ध्वनी,
प्रकाश, चुंबकत्व, उर्जा, पर्यावरण अशाप्रकारचे पदार्थविज्ञान, रसायण,
जीवशास्त्र , पर्यावरण या विषयाच्या अनुषंगाने प्रयोगांचे सादरीकरण केले
होते. या मेळाव्यात १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, या प्रसंगी
शालेय समिती अध्यक्ष श्री. मच्छिंद्र नेटके, वृतपत्र प्रतिनिधी
रामेश्वर श्रीखंडे,  किशोरराव कुलकर्णी, प्रदिप संगेकर,
पवन कोचर यांचेसह अनेक पालकांनी मेळाव्यास भेट देऊन विद्यार्थ्यांशी
संवाद साधला, या अपुर्व विज्ञान मेळावा यशस्वी आयोजन करण्यात विज्ञान
विषय शिक्षक  मगर एस. एस.,  मुंजाळ सचिन,  यादव संतोष,
शाह निलेश, साळवे एल.एम.,  नरोडे विठ्ठलराव,
पानकर के.डी. , पपैय्या पी.सी. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रदिप
विसपुते व सर्व सहभागी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी विशेष परिश्रम
घेतले. मेळावा आयोजन करण्यात प्रशालेचे शिक्षक  सलिम पटेल,
जितेंद्र पाटील , वाकळे ज्ञानेश्वर, करंगळे कैलास, निकम
दिलीप, हरणे संजय,  आढाव संतोष, जाधव राहुल,
शिंदे के.डी. ,  कुलकर्णी प्रज्ञा, पाटील मनिषा,
भाले एम.के.,  ढोले एस.बी.,  खैरणार एस. के.,  हरकळ
बाबासाहेब, नवगिरे शारदा यांचे सहकार्य लाभले, या मेळाव्यात
सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन प्रशालेतर्फे मुख्याध्यापक
प्रदिप विसपुते यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

भिलवडी बलाल्कार खुन प्रकरणातील आरोपी अटकेत

सांगली:-  भिलवडी येथील अल्पवईन मुलींवरील बलात्कार आणि खून प्रकरण :  मुख्य आरोपीला अटक : आरोपीने बलात्कार करून खून केल्याचं निष्पन्न : आरोपी विरोधात 9 पुरावे मिळाले आहेत :- सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची माहिती :
         
      संवेदनशील आणि कठीण गुन्ह्याचा पोलिसांनी केला उलघडा :
प्रशांत उर्फ़ हिमेश सोंगटे अस आरोपीचे नाव :

          आठ दिवस पोलिसांनी अहोरात्र तपास करून, आरोपीला केलं जेरबंद : *एस पी, एडिशनल एस पी, तीन डी वाय एस पी, सहा सिनियर पी आय, दोन ए पी आय, 150 पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गुंडा विरोधी पोलीस पथक करत होते या प्रकरणाचा तपास
★ सोशल मीडियावरील वाचाळवीरांना चपराक ; अफवा पसरवून, सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा केला जात होता सोशल मीडिया वरून प्रयत्न : मात्र पोलिसांनी योग्य तपास करून या गुन्ह्यातील खरा आरोपी पकडला

विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न; सासू सासर्‍याला शिक्षा

नगर,नेवासा- विवाहितेने घर बांधणीसाठी माहेरून १ लाख रुपये आणावेत. यासाठी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश नावंदर यांनी अशोक शिवराम सकट (वय ५५),अलका अशोक सकट (वय ५५) यांना दोषी धरून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, मयत आरोपी सचिन अशोक सकट, अशोक शिवराम सकट, आणि आलका अशोक सकट (सर्व रा. खुपटी, ता. नेवासा) यांनी विवाहितेला माहेरून घर बांधणीसाठी एक लाख रुपये आणावेत यासाठी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. दि. १९/१/२०१५ रोजी रात्री २ वाजता आरोपींनी संगनमताने विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. त्यावेळी ती स्वत:च्या मुलीला घेऊन घटनास्थळावरून जीव वाचविण्यासाठी माहेरी पळून गेली.

दरम्यान पोलिसांनी तिची फिर्याद दाखल करून घेतली नाही त्यानंतर फिर्यादीने न्यायालयात १५६ (३) नुसार व्यक्तीगत फिर्याद दाखल केली. दरम्यान आरोपीविरुद्ध ३0७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश नावंदर यांचे समोर झाली. दरम्यानच्या कालावधीत सचिन अशोक सकट हा मयत झाला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे फक्त फिर्यादीचा पुरावा व वैद्यकीय प्रमाणपत्र यांची नोंद घेतली.

सरकार पक्षाचा पुरावा व भक्कम युक्तीवादाच्या आधारे न्यायालयाने आरोपी अशोक सकट व अलका सकट यांना दोषी धरून आरोपींच्या वयाचा विचार करता त्यांना भा. द. वि. क. ३०७ अन्वये कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ७ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अति. सरकारी वकील अँड़ अनिल डी. ढगे यांनी काम पाहिले.