तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा

विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 21 January 2017

आज ताडकळस ता.पुर्णा येथे कुणबी समाज मेळावा

प्रदीप खरात
जवळा जिवाजी:-आज ठीक 1 वाजता  कुणबी समाजाचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात सर्व पाहुणे सोयरे धायरे यांचा परिचय  आणि पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत पुढची दिशा या बद्दल तडकळस येथे कुणबी मेळावा घेण्यात येणार आहे  या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष  लक्ष्मण दादा शेरे व महिला अध्यक्ष जय श्री ताई खोबे  सुनील बावळे अॅड खरात
रामप्रसाद बोराडे
हे उपस्थिती  राहाणार आहेत या प्रसंगी मेरेथोन विजेती ज्योती गवते ही चा सत्कार  करण्यात येणार आहे

आंध्र प्रदेश मध्ये हिराखंड एक्सप्रेसला मोठा अपघात

नंदु नाईक, मुंबई -

जगदलपूर = भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे सात डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात झाला. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आंध्र प्रदेश मधील कुनेरू स्थानका जवळ झालेल्या या अपघातात 32 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 50 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रायगढच्या जिल्हाधिकारी पूनम गुहा यांनी दिली आहे.   आंध्र पदेशच्या विजय नगरम जिल्ह्यातील कुनेरु स्टेशन जवळ जगदलपूर- भुवनेश्वर हिराखंड एक्स्प्रेसचे इंजिनसह सात डबे रुळावरुन घसरुन अपघात झाला.  या अपघातात इंजिनच्या मागचा लगेजचा डबा, तसेच दोन जनरल डबे, दोन स्लिपरचे डबे, एक एसी थ्री टियर डबा  आणि एक सेकंड एसी डबा रुळावरून घसरला. हा अपघात शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास झाला असून यामध्ये आतापर्यंत 32 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, अपघातग्रस्त डबे रुळावरून हटवण्याचे काम सुरू असून, अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

पुर्णेत किरकोळ वादातून शेजाऱ्यानेच केला शैजाऱ्यावर जिवघेणा हल्ला

दिनेश चौधरी
[वृत्तपञ प्रतिनिधीसह कुटुंबातील अन्य दोघे गंभीर जख्मी]
पुर्णा/शेजारील कुटूंबाशी असलेला किरकोळ वाद गंभीर स्वरुप धारण करेल व अचानक शेजाऱ्याने केलेल्या जिवघेण्या हल्ल्यात  आपल्या वयोवृध्द मातेला अक्षरशः हाताचे बोट गमावण्याची वेळ येईल याची यत्किंचितही कल्पना नसलेल्या गोपाळ सोनटक्के नामक वृत्तपञ प्रतिनिधीवर एका शेजाऱ्यानेच भयंकर जिवघेणा हल्ला करुन जख्मी केल्याची घटना दि.18 जानेवारी रोजी सायं.07-20 वाजेच्या सुमारास शहरातील हिंगोलीगेट परीसरात घडली असून सदरील हल्ल्यातील शेजारीच राहणाऱ्या हल्लेखोर आरोपी शिवलींग तुरेराव याने त्याच्या जवळील स्टिलच्या नाईनचापने  गोपाल सोनटक्के यांच्या डोक्यावर,खांद्यावर भयंकर वार केल्याने गोपाल सोनटक्के यांच्या डोक्याला तब्बल अठरा टाके बसले असून मानेचा मनका सरकला आहे तर डाव्या हाताचा खांदाही सरकला आहे तसेच सोनटक्के यांच्या आई लक्ष्मीबाई यांच्या डाव्या हाताचे करंगळी जवळील बोट दाताने चावा घेऊन आरोपी शिवलींग याने अक्षरशः तोडून काढले असून त्यांची बहीन सुरेखा हिच्यासह त्यांच्या पत्नीसही लात्या बुक्यांनी मारहान करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची मानवतेला काळीमा फासनारी दुर्दैवी घटना घडली असून गोपाळ सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी शिवलींग बापूराव तुरेराव,बापुराव तुरेराव व अन्य दोघांच्या विरोधात पुर्णा पोलीस स्थानकामध्ये दि.19 जानेवारी रोजी कलम 326,324,323,294,34 भादवी व अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलम 3(1) (R)(S) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ए.जी.खान हे करीत आहेत

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार बसव महामोर्च्या

शिवानंद लांडगे,
गंगाखेड:-दि. 22 वार रविवार या दिवशी राष्ट्र संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या नेतृत्वाखालील "बसव महामोर्च्या" चे आयोजन केले आहे. हा महामोर्च्या नवीन मोंढा नांदेड ते जिल्हाधिकारी असा मार्गक्रमण करेल असे महात्मा  बसवेश्वर पुतळा कृती समिती कडून  कळवण्यात आले आहे.

हा महामोर्च्या लिंगायत धर्माला संविधानीक मान्यता द्या, कौठा नांदेड येथे महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळा उभारणी करावी यासाठी आणि इतर मागणी साठी आयोजित केला आहे असे सांगितले.

या महामोर्च्यासाठी जास्तीत जास्त लिंगायत बांधवांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

केंद्रीय पथकांकडून शहरात स्वच्छतेची पाहणी

परभणी:-शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण  2017 स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे तीन पथके  दोन दिवसापासून शहरातीळ स्वच्छतेची पाहणी करत आहेत. आज दिवसभरात या पथकांतील  गोरसिया उर्मिश, सितेंद्र त्रिवेदी, जितेंद्र यादव यांनी पाहणी केली. शहरातील सार्वजनिक शौचालय,वैयक्तिक शौचालयाची पाहणी केली. तसेच क्रांती नगर,भीम नगर,वर्मा नगर,कृषी नगर,अंबिका नगर,क्रांती चोक मार्केट,जुना मोंढा,भाजी मार्केट तसेच विविध ठिकाणी स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी पथक सोबत मनपाचे  सहाय्यक आयुक्त विजया घाडगे, सय्यद इमरान, धापकर, प्रकाश कुलकर्णी, मिर शाकेर अली, नागेश जोशी, बाळासाहेब मोरीर, केशव धोंडे, मिर्झा बेग, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेहराज अहेमद, अशोक स्वामी, राजु झोडपे, सुनिल वसमतकर, नागेश जोशी आदी उपस्तित होते. 

विक्रम काळे शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी लढणारे आमदार -आ.सतीश चव्हाण

औरंगाबाद- शिक्षकांचे प्रश्‍न सभागृहात पोटतिडकीने मांडून ते सोडवण्याचे काम आ. विक्रम काळे यांनी केले आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी सतत लढणारे आमदार म्हूणन त्यांनी आपली ओळख निर्माण केली असल्याचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले.

      मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३ ङ्गेबु‘वारी रोजी होत आहे. यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस तसेच विविध शिक्षक संघटनांचे अधिकृत उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आ.सतीश चव्हाण यांचा आज दि.२१  जिंतूर येथे शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. जवाहर विद्यालय, जिंतूर येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यास आ.सतीश चव्हाण यांच्यासह आ.विजय भांबळे, उप नगरअध्यक्ष बाळासाहेब भांबळे, संस्थेचे अध्यक्ष के.डी.वटाणे, उपेंद्र दूधगावकर, नारायण चौधरी, वसंत देशमुख आदींची उपस्थिती होती. आ.सतीश चव्हाण म्हणाले की, कै.वसंतराव काळे यांचा वारसा सक्षमपणे चालवण्याचे काम आ. विक्रम काळे करतायत. शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याचे काम त्यांनी केले आहे. आघाडी सरकार असताना आम्ही शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी सभागृहाच्या बाहेर अनेक वेळा धरणे आंदोलन केले. वैद्यकीय देयकाचा प्रश्‍न, कायम विनाअनुदानित मधील कायम हा शब्द काढण्यात विक्रम काळे यांचाच पुढाकार होता असेही आ.सतीश चव्हाण म्हणाले.

      तर आ. विक्रम काळे यांना कामाची पावती म्हणून जिंतूर तालुक्यातील सर्व शिक्षक मतदारांनी विक्रम काळे यांना विजयी करावे असे आवाहन केले.

जिंतुरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी भाजपात राष्ट्रवादीला मोठे खिंडार

जिंतुर :-  तालुक्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत आज जालना येथे भाजपात प्रवेश केला असल्याने आगामी जि प व प स निवडणुकित कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
जिंतुर तालुक्यात आगामी जि प व प स च्या निवडणुकीचे वारे वाहन्यास सुरुवात झाली असून राजकीय पुढारी आपापल्या परीने प्रचाराला लागले आहेत परंतु काही जि प व प स च्या टिकिट वाटपा वरुन नाराज झालेले कार्यकर्ते इतर पक्षाचा आधार घेत असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे यातूनच आज राष्ट्रवादीचे बंजारा सेल जिल्हा अध्यक्ष सखाराम राठोड माजी पंचायत समितीच्या सभापतीचे पती उत्तम जाधव माजी सरपंच देवीदास राठोड यांनी तर कॉंग्रेसचे माजी जि प सदस्य शाम पवार, राजेश चव्हाण यांनी आज जालना येथे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर प्रवेश करुण कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला येन निवडणुका तोंडावर असताना मोठा धक्का दिला आहे.
या प्रवेशा प्रसंगी राहुल लोणीकर जिंतुर बाजार समितीचे उपसभापती गणेश काजळे,माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, बंडू लांडगे,राजेश वट्टमवार हे उपस्थित होते.

वनामकृवि व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता सर्वेक्षण 2017 जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

मोईन खान
परभणी : परभणी शहर महानगरपालिका स्वच्छता सर्वेक्षण 2017 जनजागृती रॅली आयोजन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामार्फत आज दि. 21 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु यांच्या अध्यक्षतेखाली, उदघाटक मा. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, प्रमुख अतिथी महापौर सौ. संगिताताई वडकर, केंद्रीय पथकाचे प्रमुख गोरसियु उर्मिश, सितेंद्र त्रिवेदी, जितेंद्र यादव, अतिरिक्त आयुक्त अजीज कारचे, उपायुक्त अनिल गिते, माजी कुलगुरू डॉ. संतराम कदम, डॉ. अशोक ढवण, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. बालाजी भोसले, डॉ. प्रल्हाद शिवपुजे, डॉ. धनराज भोसले, प्रा. सदाशिवराव शिंदे, प्रा. मनोज पाटील, विलास पाटील, सर्व कृषि विद्यापीठातील फुड टेक्नॉलॉजी प्राचार्य, होम सायन्स प्राचार्य, कृषि महाविद्यालय प्राचार्य,प्रा.गोखले यांनी प्रास्ताविक केले स्वच्छते विषयी माहिती दिली आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु यांनी अध्यक्षस्थानी वसतंराव नाईक कृषी विद्यापीठ, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण 2017 याविषयी स्वच्छता मोहीम विद्यापीठाने राबविली आहे. तसेच विद्यापीठात ही मोहीम रोज राबविल्या जात आहे. परभणी शहर हे महाराष्ट्रात सातव्या क्रमांकावर आहे आणि देशात 52 वा नंबर आहे. तरी शहरातील नागरिकांनी आपल्या घरासमोरील कचरा कचराकुंडीत टाकावा व शहरातील व्यापार्यांनी डस्टबिन ठेवावे असे आवाहन केले. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विद्यापीठामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. याच कौतुक महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी केले असल्याची माहिती कुलगुरू यांनी दिली. स्वच्छता रॅली संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी यापूर्वी मी विद्यापीठात राज्यपालांच्या हस्ते कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस स्वच्छता अभियान राबविले होते. स्वच्छ भारत सर्वेक्षण 2017 या कार्यक्रमा निमित्त मनपाने पुढाकार घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येकाच्या घरी घंटागाडी पोहोचू शकत नाही. त्यासाठी महापालिकेने परिश्रम घ्यावे व नागरिकांनीही आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. विद्यापीठाने स्वच्छता रॅली काढल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करतो असे उदगार जिल्हाधिकार्यांनी काढले.अतिरिक्त आयुक्त अजीज कारचे यांनी परभणी शहर स्वच्छ करण्यासाठी शहरातील डॉक्टर, वकील, व्यापारी यांनी स्वच्छतेविषयी जागरण मोहीम. आपल शहर एक घर आहे आणि आपण या मोठ्या कुटूंबाचे सदस्य आहोत. हे मोठ घर स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो पण हे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. आम्ही कुठेतरी कमी पडतो हे खरच आहे. आम्ही कमी पडतो तुमची साथ मिळविण्यात, तुमच्या सहभागाशिवाय संपूर्ण स्वच्छता अशक्य आहे. यासाठी सर्वांनी स्वच्छता करावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्तांनी केले. कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्नतंत्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय या सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छता जनजागृतीसाठी रॅली काढली. त्यामध्ये मनपाच बचत गटाने सहभाग घेतला व मनपा अधिकारी, कर्मचारी या रॅलीत उपस्थित होते. शहरामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीइापासून स्वच्छता रॅली स्टेडियम येथे आणण्यात आली. त्यानंतर स्टेडियमपासून बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसर. समारोप स्टेडियम येथे. यावेळी महापौर सौ. संगिताताई वडकर, राजेंद्र वडकर, अतिरिक्त आयुक्त अजीज कारचे, केंद्र शासनाच्या पथकातील पथक प्रमुख गोरसियु उर्मिश, सितेंद्र त्रिवेदी, जितेंद्र यादव, हे उपस्थित होते. महागायक यज्ञकुमार लिंबेकर, मल्हारकांत देशमुख यांचे मनपाच्या वतीने स्वागत करण्यात आले.  आणि पथनाट्य प्रभावती विद्यातयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले. या सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या रॅलीसाठी परिश्रम घेणारे प्रा. कृषि महाविद्यालय डॉ. व्ही.एस. खंदारे,  प्रा. व्ही.बी. जाधव, प्रा. सावंत, प्रा. मंत्री, प्रा. सोनकांबळे, डॉ. डी.आर. कदम, डॉ. पी.एस. झंवर, डॉ. बागडे, सुभाष जगताप, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. साळुंके, प्रा. मुंढे, प्रा. रामटेके, प्रा. जाधव, प्रा. भोसले, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय प्रा. पाटील, पा. घाडगे, गृहविज्ञान महाविद्यालय प्रा. निता गायकवाड, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय प्रा. संजय पवार, उद्यानविद्या महाविद्यालय प्रा. सोळंके, तसेच मनपाचे सहायक आयुक्त विजया घाडगे, मलेरिया अधिकारी बाळासाहेब मोहरीर, धाबेकर, सयद इमरान, मिर शाकेर अली, प्रकाश कुलकर्णी, मिर्झा बेग, अरशद शेख, प्रकल्प अधिकारी मस्के, शेख,  शिक्षक प्रभावती विद्यालय मल्हारकांत देशमुख यांनी परिश्रम घेतले.

मतदानाविषयी जागृतीसाठी भावी मतदार सरसावले

मोईन खान
परभणी ः- मतदारांत मतदानाविषयी जागृती होण्याकरिता ज्ञानोपासक महाविद्यालय येथे ' ९ ते १२ वीमधिल भावी मतदारांशी संवाद-' हा कार्यक्रम झाला.    यावेळी मतदान, मतदान प्रक्रिया यासंदर्भात विद्यार्थ्यानी विविध प्रश्न विचारले व यासंदर्भातील माहितीही जाणून घेतली. 'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो', 'मी भावी मतदार' या घोषणांनी सभागृह दणाणले. मतदारांत मतदानाविषयी जागृती करण्याकरिता भावी मतदार उत्साहाने पुढे सरसावल्याचे उत्साहवर्धक चित्र परभणीत पहावयास मिळाले.   

      यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार महेश सावंत, अश्विनी जाधव, मुंबई मॅरेथॉन विजेती धावपटू ज्योती गवते, प्रा अरूण भांगे तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, सर्वांना मतदानाचा अधिकार समान असून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी शहरी व सुशिक्षित मतदार मतदानाबाबत उदासीन राहतात, ही नकारात्मकता बदलणे गरजेचे असून यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांत मतदानाबाबत जागृती करणे गरजेचे आहे. मतदार NOTA ( वरीलपैकी कोणत्याही उमेदवाराला मत नाही) या पर्यायाचाही वापर करू शकतात. प्रलोभनाव्दारे तसेच दबावाखाली येऊन मतदान करू नये. असेही जिल्हाधिकारी श्री महिवाल यांनी सांगितले.

      उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेश वडदकर म्हणाले, मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान ही लोकशाहीची ताकद असते. मतदार जागृतीसाठी विविध महाविद्यालयांत मतदान हक्काविषयी  व्याख्याने व परिसंवाद तसेच विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचेही श्री वडदकर यांनी सांगितले.  

      तहसिलदार महेश सावंत म्हणाले, मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेल्या मतदानाच्या या अधिकाराव्दारे आपण योग्य व्यक्तीची निवड करुन लोकशाही सुदृढ, सक्षम व अधिक बळकट करु शकतो असेही श्री सावंत यांनी सांगितले.  

      मतदार यादीमध्ये पात्र मतदारांचा, विशेषतः युवकांचा समावेश व्हावा यासाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्यामार्फत तसेच स्थानिक स्तरांवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार याद्यांच्या पुनर्निरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो अशी माहितीही यावेळी देण्यात आली. सूत्रसंचलन प्रा सुनिल मोडक यांनी केले.