तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 28 January 2017

राकाँचा हादगाव गटातील समस्या निवारण मेळावा संपन्न


कार्तिक पाटील
पाथरी:- संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहीलेल्या हादगाव जि प गटात मागील दोन अडीच महिण्या पासून विविध समस्या तात्काळ सोडऊन नागरीकांना दिलासा देण्याचे काम राकाँच्या वतिने केले जात आहे त्या मुळे जि प, पं स निवडणूकीची रणधूमाळी या गटात दोन अडीच महीण्या पुर्वीच सुरू झाली असून आता मेळाव्याच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक केली जात आहे शुक्रवारी हादगाव जि प गटाच्या समस्या निवारण मेळाव्या साठी आ बाबाजानी दुर्रांनी यांनी प्रत्येक गावच्या समस्या जानुन घेत तात्काळ सोडवणूकीच्या सुचना दिल्या या वेळी राकाँ चे मराठवाडा प्रचार प्रमुख सारंगधर महाराज ,जि प सदस्य चक्रधर उगले,कृऊबास सभापती अनिलराव नखाते, राजेश ढगे,राधाकिशन डूकरे यांची या वेळी उपस्थिती होती.
राकाँ च्या वतिने नियोजनबद्ध प्रचार सुरू असून जनतेचा सत्ताधा-यां वरील नोट बंदी चा रोष,एैन सुगीत शेतमालाचे नोट बंदीने झालेले हाल या मुळे तीन वर्षा पासून दुष्काचा सामना करत अलेला शेतकरी हवालदील झाला आहे हीच स्थिती  पाहाता गावा गावात चालू स्थितीत कोणत्या समस्या आहेत हे राकाँच्या वतीने जाणून घेत त्यांचे तात्काळ निवारण करण्यात येत असून याचा परिणाम निवडणुनिकत दिसून येणार हे नक्की या मेळाव्यांना हजारोंच्या संखेने मतदार उपस्थित राहात असून शुक्रवारी हादगाव जि प गटाचा मेळावा संपन्न झाला त्यात गावागावातील मतदारां कडून विद्यमान समस्या आ बाबाजानी दुर्रांनी यांनी जानुन घेलल्या आणि त्यांच्या निराकरणा साठी तात्काळ कार्यवाही च्या सुचना केल्याने मतदारां मध्ये उत्साह दिसून येत होता.अनेक गावात सहा सहा महिण्या पासून डिपी जळाले आहेत,काही ठिकाणी रस्त्याची कामे, अश्या समस्या गावागावातून पुढे येत आहेत त्यांचे निराकरण तात्काळ करण्यात येत आहे.काल झालेल्या लिंबा गटाच्या समस्या निवारण मेळाव्याला जवळ पास अडीच तीन हजार मतदार उपस्थित होते. स्वत: आमदार दुर्रांनी यांनी जनतेचे प्रश्न जाणुन घेत या निवडणुकीत ते तात्काळ सोडवण्या साठी पुढाकार घेतल्याने गावा गावातील मतदार समाधान व्यक्त करत आहेत. हादगाव जि प गटात गेली दोन महीण्या पासून शेत रस्ते ,पानंद रस्ते सिमेंट रस्ते अशी कामे गतीने होत आहेत. या नंतर गुरूवारी " राष्ट्रवादी पुन्हा..." म्हणत तगडे शक्ती प्रदर्शन तरत राकाँ च्या सर्व उमेदवारांचे अर्ज भरणार असल्याचे राकाँ गोटातून सांगण्यात येत आहे.

राकाँचा लिंबा गटातील समस्या निवारण मेळावा संपन्न


कार्तिक पाटील
पाथरी:- जि प, पं स निवडणूकीची रणधूमाळी सुरू झाली असून राकाँ च्या वतिने नियोजनबद्ध प्रचार सुरू असून जनतेचा सत्ताधा-यां वरील नोट बंदी चा रोश पाहाता गावा गावात चालू स्थितीत कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेत त्यांचे तात्काळ निवारण करण्यात येत असून याचा परिणाम निवडणुनिक दिसून येणार हे नक्की या मेळाव्यांना हजारोंच्या संखेने मतदार उपस्थित राहात असून शुक्रवारी हादगाव जि प गटाचा मेळावा संपन्न झाल्या नंतर काल शनीवारी लिंबा गटाचा मेळावा संपन्न झाला त्यात गावागावातील मतदारां कडून विद्यमान समस्या आ बाबाजानी दुर्रांनी यांनी जानुन घेलल्या आणि त्यांच्या निराकरणा साठी तात्काळ कार्यवाही च्या सुचना केल्याने मतदारां मध्ये उत्साह दिसून येत होता.अनेक गावात सहा सहा महिण्या पासून डिपी जळाले आहेत,काही ठिकाणी रस्त्याची कामे, अश्या समस्या गावागावातून पुढे येत आहेत त्यांचे निराकरण तात्काळ करण्यात येत आहे.काल झालेल्या लिंबा गटाच्या समस्या निवारण मेळाव्याला जवळ पास अडीच तीन हजार मतदार उपस्थित होते. स्वत: आमदार दुर्रांनी यांनी जनतेचे प्रश्न जाणुन घेत या निवडणुकीत ते तात्काळ सोडवण्या साठी पुढाकार घेतल्याने गावा गावातील मतदार समाधान व्यक्त करत आहेत. या नंतर गुरूवारी " राष्ट्रवादी पुन्हा..." म्हणत तगडे शक्ती प्रदर्शन तरत राकाँ च्या सर्व उमेदवारांचे अर्ज भरणार असल्याचे राकाँ गोटातून सांगण्यात येत आहे.

तेजन्यूज,पंकजा मुंडेच्या सभेचे स्टेज कोसळले हेडलाईन्स

✍         ठळक           ✍

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेत स्टेज कोसळला; सर्वजण सुखरूप

राजकारण धंदा बनलाय : राजू शेट्टी

ठाकरे बंधू एकत्र आले, तर इतिहास घडेल : मनोहर जोशी

सेना-मनसे युतीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील : संजय राऊत

नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटनावर परिणाम नाही : मोदी

काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येणे महत्वाचे : पवार

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला पुण्यातून सुरुवात

पुणे मॅरेथॉन उद्या रंगणार

पोलिओ डोस साठी पालकांना तेजन्युज तर्फे आव्हान


सुधीर बागुल
वैजापुर - सर्व  ०ते५ वर्ष वयोगटातील  बालकांच्या पालकांना जाहिर आवाहन करण्यात येते की आपल्या  बालकांना पोलिअोचा डोस न चुकता दिनांक २९/०१/२०१७ रविवार रोजी आपल्या जवळच्या बुथवर अगंणवाडी, शाळा , बस स्टँड, रेल्वे स्टेशन ,टोलनाके, सर्व  रुग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे या सर्व ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजुन
बाळ नुकतेच जन्मलेले असेल
यापुर्वि डोस  दिला असेल तरीही 
बाळ आजारी असेल तरीही (वैदयकिय अधिकारी यांच्या सल्याने द्यावा)                           
(वय वर्ष ० ते ५  सर्व बालके )
   दोन  थेंब जिवनाचे
चला तर मग,
रविवार
दि:  २९/०१/२०१७ 
वेळ: सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

तेजन्यूज;आज पाणी पितोय २१ तारखेला पाणी पाजतो-मुख्यमंत्री; हेडलाईन्स

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
-------------------------------------------------

उल्हासनगर साई पक्षाचे अंकुश म्हस्के, आरपीआयच्या गटनेत्या पुष्पा बागुल, काँग्रेसच्या मीना सोंडे, अपक्ष विजय पाटील आणि आरपीआयच्या माजी आध्यक्ष नाना बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत.

आज पाणी पितो आहे, 21 तारखेला पाणी पाजणार - मुख्यमंत्री

आमचं हिंदुत्त्व संकुचित हिंदुत्त्व नाही - मुख्यमंत्री फडणवीस.

एकीकडे कोस्टल रोडची मागणी करायची, दुसरीकडे त्याविरोधात कोळी बांधवांना आंदोलनासाठी उभं करायचं ही कुठली दुटप्पी भूमिका ? - मुख्यमंत्री फडणवीसांचा सेनेला सवाल

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सागरी सेतू आपण बांधतोय, येत्या काही वर्षांत हे काम होईल - मुख्यमंत्री फडणवीस

आम्हाला गगनचुंबी इमारती नको, आम्हाला गरिबांना घर द्यायचं आहे - मुख्यमंत्री फडणवीस

25 वर्षे महापालिका शिवसेनेच्या हातात दिल्याने मुंबईचं नुकसान झालं - मुख्यमंत्री फडणवीस

भाजपची औकात काय आणि तुमची औकात काय हे आम्ही २१ तारखेला दाखवून देऊ - मुख्यमंत्री फडणवीस

प्रश्न जागांचा नव्हता, ५-६ जागा इकडे-तिकडे झाल्या तरी चालतील. पण पारदर्शिकतेच्या मुद्यावर तडजोड करणार नाही -मुख्यमंत्री फडणवीस

सत्तेत येऊन हाती भगवा घेऊन खंडणी वसुली करणं हे कदापी खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतून भाजपची ताकद दिसली, पण तरीही मनपा युतीसाठी माघार घेतली- मुख्यमंत्री फडणवीस.

विधानसभेत युती तुटली नसती, तर कधीच मुख्यमंत्री झालो नसतो - मुख्यमंत्री फडणवीस.

भाजपाला १२७, शिवसेनेला १४७ आणि इतरांसाठी १८ जागा देण्याचा निर्णय झाला होचा. मात्र शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळेच ही युती तुटली - मुख्यमंत्री

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांनी काँग्रेस कार्यकारी समितीचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणा-या दादरमधील नेत्यासोबत (राज ठाकरे) हे (शिवसेना) युती करणार असल्यामुळेच वचननाम्यात स्मारकाचा उल्लेख टाळला का ? - आशिष शेलार यांची शिवसेनेवर टीका.

शिवसेनेच्या वचननाम्यात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा उल्लेखही केलेला नाही - आशिष शेलार

मुंबईतील अंडरवर्ल्डचा खात्मा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी केला – आशिश शेलार

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची दुर्योधनाशी तर शिवसेनेची कौरवांशी केली तुलना

मुंबई = अहंकारामुळे युती तुटली, महाभारताचा दाखला देत मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांची शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका.

माचिल मध्ये बर्फाखाली अडकलेल्या जवानांच्या बचावकार्याला यश, पाचही जवानांची सुखरुप सुटका.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा मतदारसंघ अमेठी आणि रायबरेली मध्ये काँग्रेस सर्वच्या सर्व 10 जागांवर उमेदवार उभे करणार.

सोलापूर = सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवाराने उघडले अर्ज दाखल करण्याचे खाते. योगेश नागनाथ पवार यांनी प्रभाग सहामधून दाखल केली उमेदवारी.

औरंगाबाद मध्ये पंकजा मुंडेच्या सभेत स्टेज कोसळले, वैजापूर तालुक्यात महलगावला सुरु होती सभा, गर्दी झाल्याने स्टेज कोसळले.

औरंगाबाद = वाळू माफियाने केला महसूल पथकाला जीवे मारण्याचा प्रयत्न; देवलाइ चौकातील घटना.

पंजाब मधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील गावातून बीएसएफने मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला.

संविधानाच्या चौकटीत राहून राम मंदिर बांधू - अमित शहा

कुठलाही भेदभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊ - अमित शहा, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रेडिओवरुन प्रसारीत होणा-या मन की बात कार्यक्रमाला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल.

वडीलांच्या प्रित्यार्थ दिली रुग्नास दहा हजार रुपये मदत


सुधीर बागुल
वैजापुर - वैजापुर तालुक्यातील खंडाळा येथील संजय पाटणे, रविंद्र पाटणे, राजेंद्र पाटणे या तिघांनी मिळुन आपल्या वडीलांच्या सहाव्या पित्यर्थ शुभम अशोक बागुल ह्यास उपचार करण्यासाठी दहा हजार रुपयेची मदत पाटणे कुटुंबाकडुन देण्यात आली आहे
शुभमच्या किडनीवर सध्या औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार चालु आहेत

फैजान ए रहेमत उर्दू प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शेख अथर

जालना:-शहरातील मदरसा फैजान ए रहेमत उर्दू प्राथमिक शाळा ट्टूपूरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सस्थे चे अध्यक्ष महमद खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील थोर विचारवंत जफर सर हे उपस्थित होते
तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विध्यार्थयानि  देशभक्ति पर गित, भाषण, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेवून उपस्थितानचि मने जिंकली
या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक खान यांनी केले आभार प्रदर्शन मुख्याध्यापक  शेख रियाज़ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतिल शिक्षिका,शिक्षक, व कर्मचारी यांनी प्रयत्न केले

हॅप्पी फेसेस च्या वतीने साहित्य वाटप


विनोद तायडे
वाशिम:-मालेगाव येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून व सामाजीक बांधीलकी जपत स्थानिक हॅप्पी फेसेस शाळेच्या कर्मचारी वृंदांनी स्थानिक गांधीनगर व अशोकनगर भागात गरीब विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजावे या उद्देशाने 108 स्वच्छता किटचे वितरण 26 जानेवारीला केले. याशिवाय कर्मचारीवृंद व शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जुने पण चांगल्या स्थितीतील वापरण्यायोग्य कपड्यांचा वाटपही यावेळी करण्यात आले.
    या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून अचानक मिळालेल्या या भेटवस्तुमुळे गोरगरीब विद्यार्थी आनंदीत झाले. या स्वच्छता किटमध्ये नेलकटर, टूथपेस्ट, टुथब्रश व आंघोळीच्या साबणाचा समावेश आहे. संस्था संचालक दिलीप हेडा व प्रशासकीय अधिकारी सुशील भिमजीयाणी यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे मालेगाव शहरात सर्वत्र कौतूक होत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सतिश कुलकर्णी, जेष्ठ शिक्षीका ममता जोशी, सुशील भिमजीयाणी, विठ्ठल गौरकर, सागर रोकडे, गोपाल पाटील, पि.ए. विजयम, वसुधा पिंपरकर, वंदना ताकतोडे, तृष्णा जोहरे, कल्याणी जोशी, निशा यादव, सायली जोशी, सिमा ईटाल, सुमन अडोणी, संगीता वानखेडे, पूनम लाहोटी, प्रिती शर्मा, शुभांगी वैद्य, दिपा शर्मा, पल्लवी कापसे, धनश्री काबरा, उमा शर्मा, संदीप काळबांडे, अनिल गायकवाड, श्रीकांत वैद्य, गजानन देशमुख, रामेश्‍वर कड, अलोक बांडे, सुंदर डोंगरदिवे, देवानंद वैद्य, विनोद सदार, संतोष पंडीत यांनी परिश्रम घेतले. तसेच पालकांमधून किशोर मोरे, विनोद टिकाईत, प्रदीप साखरे, सुभाष मुंदडा, अमोघ माने आदींचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
------------------------------------------------

मॉ साहेब मीनाताई ठाकरे प्राथमिक आश्रम शाळेत वार्षिक स्नेहसमनेलन उत्साहात सापन्न

बालाजी फुकटे
हिवरा राळा:-बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथील मॉ साहेब मीनाताई ठाकरे प्राथमिक आश्रम शाळेत वार्षिक स्नेहसमनेलन उत्साहात सापन्न या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन ऐश्वर्या म्हस्के या विद्यार्थिनीच्या हस्ते झाले यावेळी मुख्याध्यापक बालाजी चव्हाण गणेश डोळस  दत्ता पडुळ गोरख राठोड यांच्यासह शाळेचे कर्मचारी वर्ग व समस्त गावकरी मंडळी मोठ्या सख्येने उपस्थित होते *****

डिग्रस बंधारयातील नांदेड कडे पाणी सोडण्यासाठी तूर्त स्थगीती

अरुणा शर्मा

पालम :- पालम पोलीस स्टेशन येथे दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता तालुक्यातील डिग्रस बंधारयातील पाणी सोडण्यासाठी अधिकारयात व शेतकरयात बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील डिग्रस बंधारयातून नांदेडला पाणी सोडण्यासाठी शेतकरया कडुन विरोध केला होता. डिग्रस बंधारयात सध्या 23 दलघमी पाणी साठा आहे. यापैकी नांदेडला 14 दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय दिनांक 29 जानेवारी रोजी प्रशासनाने घेतला होता. या सदर्भात शेतकरयात व अधिकारयात दिनांक 27 जानेवारी रोजी पालम तहसील कार्यालयात एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत गंगाखेड उपविभागीय अधिकारी गौरी सावंत व तहसिलदार आर.के.मेंडके व वंसतराव सिरस्कर, रत्नाकर शिंदे, यांच्यासह शेतकरयांची उपस्थिती होती. या बैठकीत शेतकरयांनी विष्णुपुरी बंधारयात पाणीसाठा असून डिग्रस बंधारयातून नांदेड शहराला पाणी का सोडायचे असा संतप्त सवाल करीत अधिकारी वर्गाला धारेवर धरले.   बैठकित शेतकरयानी पाणी सोडण्या साठी कडाडुन विरोध केल्या नंतर आज दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता  पाणी सोडण्याच्या सर्धबात अधिकारयात व शेतकरयात बैठकिचे आयोजन केले. या बैठकित परभणी पोलीस अधिक्षक मा.नियती ठकर उपविभागिय अधिकारी अब्दुल गण्णी खान, तहसिलदार आर.के.मेंडके, कार्यकारी अभियता एम.टि.लव्हराळे, एन.पि.गव्हाणे उपकार्यकारी अभियता नांदेड यावेळी बैठकित उपस्थित होते. यात अधिकारयाना शेतकरयानी संगितले कि बंधारयातून नांदेड जिल्हा साठी व कारखानदारी साठी पाणी वापरु नये सध्या पालम, गंगाखेड, पुर्णा तालुक्यात बरयाच गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली दिसून येत आहे. त्या मुळे सध्या तरी पालम तालुक्यातील डिग्रस बंधारयातून नांदेड जिल्हा साठी पाणी सोडण्यात येऊ नेय. असे या बैठकित सर्वानुमते सांगण्यात आले व पाणी पिण्या साठी दोन्ही जिल्हाला प्राधाण्य देण्यात यावे असे बैठकित आधिकारी व शेतकरीयांच्यात चर्चा झाली. त्या वरुन दिनांक 29 जानेवारी रोजी नांदेड जिल्हा साठी पाणी सोडण्यात येणारे पाणी सध्या तरी रध झालेले आहे. त्यामुळे वरिल तालुक्यातील नागरीक समाधानव्यक्त होत आहे. यावेळी बैठकित भा.ज.पा.नेते गणेशराव रोकडे, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष प्रभाकराव सिरस्कर, शिवसेना तालुका प्रमुख हानुमंत पौळ, कृ.उ.बा.समिती मा.सभापती वसंतराव सिरस्कर, शंकराव वाघमारे, गोविद पौळ, शिवाजी साबळे, माधव वाघमारे, नारायन दुधाटे, अर्जन ढवळे, गजानंद पौळ, अशोक पौळ, सदाशिव पवार, सोपान कुरे या सह सा.पोलीस निरक्षक रविद्र बोरसे, पोलीस उपनिरक्षक श्रीधर तरडे, पि.सी.जाधव, पञकार शांतीलाल शर्मा, माधव गायकवाड, बब्रुवान कराळे सह पोलीस कर्मचारी व नागरीक, शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते. तब्बल हि बैठक तीन ते चार तास चालु होती. या बैठकित सध्या तरी पाणी सोडण्या साठी तुर्त स्थगिती मिळाली आसल्याचे चर्चातुन निष्पन झाल्याचे कळते.

सोनखास येथे बालोत्सव


विनोद तायडे
वाशिम-वाशिम जिल्ह्यातील
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ.शाळा सोनखास येथे दिनांक २७ जानेवारी रोजी सायं बालोत्सव७.००ते१०.००या वेळात *बालोत्सव* पार पडला या कार्यक्रमाचे ऊद्घाटन वीज वितरण कंपनीचे  ऊपकार्यकारी अभियंता पवनकुमार टिकार यांनी केले. सदरील कार्यक्रमात शाळेच्या चिमुकल्यानी विविध गीतांवर नृत्य सादर केली त्यात बाल कलाकारांनी बाई मी फसले पाटावर बसले,मला परीचे पंख मिळाले, नांदायला नांदायला,लोकधारा महाराष्ट्राची, मंग पाहा मले  ,छोटा बच्चा...सह शेतक-यांची व्यथा मांडणारा इमोशनल ड्रामा *खेळ मांडला* हा महत्वपूर्ण भाग होता.  तर स्वच्छेतेचा संदेश देणारा *झिंगाट*ड्रामा सर्व प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणारा होता, विनोदाच्या माध्यमातून रस्त्यावर हागणाराची फजिती गुडमाॅर्निंग पथकाकडून होते तेव्हा प्रेक्षकांच्या हास्याला पारावार राहत नाही. आणि आम्ही रस्त्यावर  हागून अशी फजिती करून घेणार नाही. व शौचालय बांधू हा नार्धार लोक करतात हेच या कार्यक्रमाचे फलीत होते. कार्यक्रमाचा मुख्य गाभा *याद करो कुर्बानी*हा होता यामध्ये  देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला ऊजाळा देण्यात आला. व त्यांना ब्रिटिश सरकारने केलेली फाशिची शिक्षा हा संपूर्ण प्रकार प्रत्यक्ष साकारण्यात आला. १८ मिनिटांचा  हा ड्रामा संपेपर्यंत सर्वञ स्मशान शांतता पसरली होती. फाशिची शिक्षा होत असतांना सर्व प्रेक्षक मुठीत जीव धरून बसले होते. फाशी दिल्यानंतर आणि फासावर लटकलेले वीर जवान पाहून तर संपूर्ण प्रेक्षक मन अती घाबरलेल्या अवस्थेत होते. अक्षरशः कळवळलेल्या मनात भावना दाटून आल्या होत्या. सर्वांनी  आपल्या या वीर जवानांना सलाम करत त्यांचे स्मरण केले..व याद करो कुर्बानी मध्ये त्यांना आठवले....संपूर्ण कार्यक्रमात सहभागी कलाकार हे फक्त जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ शाळा सोनखास येथील विद्यार्थीच होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली तर शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच गावातील आजी माजी पदाधिकारी व सर्व नवयुवक मंडळाने सहकार्य केले.

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी धीरज सोळंके

आशिष धुमाळ
परतूर:-येथील शासकीय विश्राम गृह येथे नुकतीच पार पडलेल्या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीची निवड करण्यात आली या बैठकीत अतिशय सकारात्मक- साधक बाधक चर्चा झाली.तालुक्यातील वाढोना गावाप्रमाणे "शिवजन्मोत्सव" साजरा करण्याचा यावेळी ठरवण्यात आले शहरातील वकील, प्राध्यापक , शिक्षक,व्यावसाईक,शेतकरी,विद्यार्थी,इत्यादी मंडळी तसेच राजकीय सामाजिक स्तरातील सर्वधर्मीय प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.सर्वानुमते खालील समितीची निवडण्यात आली                   अध्यक्ष-धीरज सोळंके
उपाध्यक्ष -चेतन चव्हाण
             -अभिषेक सोळंके
              -विजय यादव
सचिव     - रवि अंभूरे
सहसचिव-संदीप कांबळे
कार्याध्य -लक्ष्मण गावडे
कोषाध्यक्ष - दत्ता पाटील सुरुंग
सहकोषाध्यक्ष - संदीप पाचारे
संघटक    -विशाल पवार
              -योगेश दहीवाळ
प्रचारप्रसार-ओंकार माने
मार्गदर्शक -प्रकाश चव्हाण,कृष्णा आरगडे,राजेश भुजबळ ,दिपक कदम ,संपत टकले,शाम तेलगड,संदिप जगताप,पांडुरंग नवल ,भीसे सर ,राजेभाऊ जगताप,
आशिष धुमाळ,आशिष गारकर इत्यादीची निवड करण्यात आली.
प्रसिध्दी :- सर्व पञकार बांधव
या शिवजयंती मिरवणुकीला विशेष रूप देण्याचे ठरवण्यात आले मिरवणुक दरम्यान विशेष ढोल-ताशा पथक,लैझिम पथक,विविध सामाजिक देखावे,शहरात दिपोत्सव,रांगोळी,शाळेतील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत तसेच मिरवणुकी व्दारे सामाजिक संदेश देण्यात येणार आहे तसेच मिरवणुकीमध्ये कोणीही व्यसन करून सहभागी होऊ नये असे यावेळी सांगण्यात आले.