तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 4 February 2017

पुर्णा शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लोअर दुधनाचे पाणी नदी पात्रात सोडणार.


◆लोअर दुधना प्रकल्पातुन आज सकाळी 9वाजता नादी पात्रात पाणी झेपवणार
◆दुधना नदी पात्रात पाणी न आडविण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना
◆दुधना नदी काठावरील विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचे  महावितरणला आदेश.
◆पंधरा दिवसात प्रकल्पातुन पाणी सोडण्याची दुसरी वेळ.

सेलु(प्रतिनिधि ):परभणी जिल्ह्याचे हरित क्रांतीचे स्वप्न पुर्ण करणा-या लोअर दुधना प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडवल्या जात आहे. जिल्ह्यातील पुर्णा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या हेतुने लोअर दुधना प्रकल्पातुन आज रविवार 5 फेब्रुवारी सकाळी 9वाजता 1200क्यसेकचा विसर्ग प्रकल्पातुन नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. राहटी मार्गे लोअर दुधना प्रकल्प ते पुर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधा-या पर्यंत पाणी पोहचणार आहे. पुर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधा-यातुन पुर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यात येतो .लोअर दुधना प्रकल्पातुन दुधना नदी द्वारे पुर्णा बंधा-यात पाणी पोहचण्यासाठी शंभर तासाचा अवधी लागतो त्यामुळे लोअर दुधना प्रकल्प हा संपुर्ण जिल्ह्यासाठी तारणहार ठरत असुन मागील तीन वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या दुष्काळजन्य परिस्थितित लोअर दुधना प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाणी प्रश्नाची तिव्रता कमी झाली होती. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातुन जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाला 5 फेब्रुवारी रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती देण्यात आली असुन प्रकल्पाच्या खालील भागात दुधना नदी पात्रामध्ये कोल्हापुरी बंधा-याद्वारे पाणी आडविण्यात येवु नये नदी पात्रातील पाणी वेगाने राहटी बंधा-याद्वारे पुर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधा-या पर्यंत पोहचावे जेणे करुन पुर्णा शहरास पाणी पुरवठा करण्यात येणा-या बंधा-या पर्यंत पाणी पोहचेल याच्या निगराणी साठी अधिका-याची नेमणुक करण्याचे सुचित करण्यात आले आहे.
◆विद्युत पुरवठा खंडित होणार.
पुर्णा शहराला पाणी पुरवठा करण्याच्या हेतुने आज रविवार 5 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. नदी पात्रात पाणी सोडल्यानंतर शंभर घंटे म्हणजेच तब्बल चार दिवसानंतर पुर्णा नदीवरील बंधा-यापर्यंत पाणी पोहचेल. दरम्यानच्या चार पाच दिवसाच्या कालावधी मध्ये दुधना काठावरील तसेच निम्म दुधना प्रकल्प ते राहटी व राहटी ते पुर्णा शहर कोल्हापुरी बंधा-या पर्यंत असलेल्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी विद्युत वितरण कंपनी ला दिल्या आहेत त्यामुळे दरम्यानच्या काळात दुधना नदी काठावरील सर्व विद्युत पंप बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नदीपात्राच्या दोन्ही काठावरील थ्री फेज विद्युत पुरवठा तात्काळ खंडीत करण्याचे आदेश विद्युत वितरण कंपनीला देण्यात आले आहेत. तसेच दुधना प्रकल्प ते पुर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधा-यातुन पुर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या बंधा-या पर्यंत नदी काठावरील नागरीकांनी दरम्यानच्या काळात नदीपात्रात प्रवेश करु नये तसेच जनावरांना मोकळे सोडु नये व नदी पात्रात असलेली मालमत्ता सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे देखील यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत आदेशीत करण्यात आले आहे.

वाशिम येथे बुधवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

विनोद तायडे
वाशिम, : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयुएलएम) अंतर्गत कौशल्य प्राप्त केलेल्या बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि वाशिम नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम येथील स्वागत लॉन येथे होणाऱ्या या रोजगार मेळाव्यामध्ये ९ उद्योजक सहभागी होणार असून २७५ पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी कळविले आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये दि वाशिम अर्बन को-ऑप. बँक, औरंगाबाद येथील धुत ट्रान्समिशन, वाशिम येथील बी. एस. बाहेती अॅण्ड कंपनी, श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. केडीट सोसायटी, दि महाराष्ट्र अर्बन अॅण्ड रुरल को –ऑप. क्रेडीट सोसायटी, भोयर अॅण्ड कंपनी, विदर्भ अर्बन अॅण्ड रुरल को-ऑप. क्रेडीट सोसायटी, रेनॉल्ड हॉस्पिटल, युरेका फोर्ब्ज आदी उद्योजक सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, आय.टी.आय. (सर्व ट्रेड), टायपिंग, एम.सी.व्ही.सी., पदवीधर, ए.एन.एम., जी.एन.एम. उत्तीर्ण उद्योजकांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

इच्छुकांनी स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या सर्व कागदपत्रांसह मेळाव्यास उपस्थित रहावे. याबाबत काही अडचण किंवा अधिक माहितीसाठी नगरपरिषदेच्या कौशल्य व उपजीविका (एनयुएलएम) शाखेचे शहर व्यवस्थापक ए. एस. फसाटे (भ्रमणध्वनी क्र. ९४२१९४९९०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे वाशिम नगरपरिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

पीपल्स रिपब्लीकन पार्टीच्या महिला पदाधिकार्‍यांची निवड


विनोद तायडे
वाशिम - शाहु-फुले-आंबेडकरी विचारधारेवर चालुन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार्‍या पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या महिला पदाधिकार्‍यांची निवड लॉगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या आदेशावरुन व प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे तसेच जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे व महिला जिल्हाध्यक्ष सौ. वंदना राऊत यांनी केली. त्यामध्ये पीआरपीच्या महिला तालुकाध्यक्षपदी बेबी वाघमारे, महिला शहराध्यक्षपदी सुनिता सोनोने तर तालुका सचिवपदी छाया पडघान यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांना दौलतराव दिवराळे व वंदना राऊत यांच्या हस्ते पीआरपीच्या जिल्हा कार्यालयात नियुक्तीपत्र देवून त्यांच्यावर पदाचा पदभार सोपविण्यात आला. जिल्हाध्यक्षांनी आपल्यावर टाकलेला विश्‍वास खरा ठरवून जिल्हयातील गावागावात फिरुन जास्तीत जास्त संख्येने महिलांना पक्षात सामावून घेवून पक्ष संघटन वाढवू असा विश्‍वास नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. 
---------------------------------------------------

गुटखा खाऊन व दारु पिऊन आयुष्य बरबाद करु नका’


विनोद तायडे
वाशिम - ‘व्यसनाने आपले व आपल्या कुटुंबाचे हाल होतात. त्यामुळे मायबापहो ! गुटखा खाऊन व दारु पिऊन आपले आयुष्य बरबाद करु नका’ अशी विनवणी समता संदेश सांस्कृतीक कलापथकाच्या कलावंतांनी आपल्या संगीताच्या सुरातुन डव्हा यात्रेतील भाविकांना केली.
    संत नाथनंगे महाराज यांचे तिर्थक्षेत्र असलेल्या मालेगाव तालुक्यातील डव्हा येथे रथसप्तमी निमित्त यात्रेमध्ये नेहरु युवा केंद्र वाशीम, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय संलग्नीत नेहरु युवा बहूउद्देशिय मंडळ तसेच म. ज्योतीबा ङ्गुले शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहूउद्देशिय संस्था व्दारा संचालीत समता संदेश सांस्कृतीक कलासंच उमरा शम. च्या वतीने सामाजीक विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, पोलीस उपनिरिक्षक घुले यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष तथा वाशीम जिल्हा सांस्कृतीक कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष पी.एस. खंदारे, नाथनंगे महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. सविता अनिल बळी यांची उपस्थिती होती. यावेळी कलावंतांनी व्यसनमुक्ती, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, स्वच्छता अभियान अशा विविध विषयावर कलापथकाच्या माध्यमातुन तसेच गित व अभिनयाव्दारे भाविकांमध्ये जनजागृती त्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये कलावंत शाहीर संतोष खडसे, हार्मोनियम वादक डॉ. काशीराम खडसे, कवी गायक जनार्धन भालेराव, ढोलकीवादक समाधान भगत, गणेश राठोड, स्त्री अभिनय अमोल वानखडे, साहेबराव पडघान, विनोदी कलाकार गजानन खडसे, साथसंगत विशाल भगत, दत्ता वानखेडे आदींनी भाग घेतला. या कार्यक्रमाला स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी अमोल देशपांडे, विनोद पट्टेबहादूर, निर्मलसिंग राठोड, ऍड. भारत गवळी, पत्रकार वनस्कर, नेहरु युवा केंद्राचे युवा कोर पंकज गाडेकर, पत्रकार गजानन देशमुख, भास्कर गुडदे हे उपस्थित होते. यावेळी सहभागी कलावंतांचा प्रा.अनिल बळी यांनी सपत्नीक पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. या कार्यक्रमासाठी प्रा. अनिल बळी यांनी मोलाचे योगदान दिले.

जिल्हा कारागृह येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर


विनोद तायडे
वाशिम, : तालुका विधी सेवा समिती व जिल्हा वकील संघाच्यावतीने सोमवारी जिल्हा कारागृह येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्ली बार्गेनिंग, राईटस ऑफ प्रिजनर्स अँड अंडरट्रेलस, बेल प्रोव्हिजनस आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश-३ एस. बी. पराते हे होते.

यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. पी. आदमने, उपाध्यक्ष अॅड. जी. ए. अवस्थी, अॅड. जी. व्ही. मोरे यांच्यासह वकील मंडळी व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा वकील संघाचे सहसचिव अॅड. एस. पी. कुलकर्णी यांनी राईटस ऑफ प्रिजनर्स अँड अंडरट्रेलस या विषयावर तर जिल्हा वकील संघाचे कोषाध्यक्ष अॅड. धनराज पडघान यांनी प्ली बार्गेनिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अॅड. पी. व्ही. बाजड यांनी जमानातीचे अधिकार याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी वडीही स्वयंसेवक बाबाराव राजाराम घुगे, मोतीराम तुळशीराम खडसे, संजय श्रीराम बनसोडे, कु. संगीता ढोले, लक्ष्मी माहुरे, जया मंडोधरे, वनमालाबाई पेंढारकर, जोत्स्ना वाठोरे, विशाल ठाकूर, संध्या सरनाईक, मनीषा दाभाडे, प्रिया पाठक, युवराज पडघान, भीमराव धुळधुळे, मदन दहीसमुद्रे, विश्वनाथ इंगोले, सुनील लबडे, मधुकर इंगळे, दुर्गा इंगोले, सदानंद ताजणे, रवी जोगदंड व शाहीर उत्तम इंगोले यांनी प्रबोधनात्मक लघुनाटिका सादर केली.

दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोनाली शहा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. एस. पी. आरु यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक श्री. साबळे यांनी केले.

हिंदवी परिवाराची तीन दिवसीय हिवाळी पदभ्रमती


विनोद तायडे
वाशिम : साहस, धाडस, आत्मविश्‍वास याची प्रचिती घेत वाशीम जिल्हयासह महाराष्ट्रातील पाचशे शिवभक्तांनी महाराष्ट्रातील लोहगड, विसापुर, राजमाची व कोरीगड ही खडतर पदभ्रमंती मोहीम यशस्वीरित्या फत्ते केली. हिंदवी परिवार महाराष्ट्र या अराजकीय सामाजीक संस्थेने ही अनोखी पर्वणी शिवभक्तांना उपलब्ध करुन दिली. हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेट्ये, इतिहासाचे आणि गडकोटांचे अभ्यासक श्रीकांत कासट यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजीत या मोहीमेत मुख्यमंत्री सहायता कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे, पुण्याचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार, मुंबईचे अतिरित्त कमिश्‍नर सोमनाथ घार्गे, वाशीमच्या परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, पारस विजनिर्मिती केंद्राचे कार्यकारी अभियंता शशिकांत गिरी यांच्यासह विद्यार्थी, युवक-युवती, डॉक्टर्स, प्राध्यापक, वकील, व्यवसायीक, शेतकरी आदी क्षेत्रातील युवक सहभागी झाली होती.
    पहिल्या दिवशी राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या आणि मोहीमेस सुरुवात झाली. लोहगड व विसापूर हा गड पाहण्यात आला. गडावर प्राचीन मंदिर, लेण्या इत्यादींची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी श्रीकांत कासट यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून गडकोटांची माहिती कथन केली. तसेच गिरीप्रेमी संस्थेचे उमेश झिरपे यांनी ट्रेकींग विषयी व हिमालयातील ट्रेकींगची माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली. दुसर्‍या दिवशी मावळ मतदार संघाचे खासदार श्रीकांत बारणे यांनी शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या आणि शिवप्रेमी राजमाचीकडे मार्गस्थ झाले. राजमाची या गडावील विहंगम परिसर पाहिला. रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून ‘आझादी के दिवाने’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावर्षीच्या मोहीमेत जात, धर्म, पंथ, प्रांत यापलीकडेही जावून जम्मु काश्मीर आणि पंजाब या प्रांतामधून सरदार दविंदरसिंग, सरदार एकाग्रचित्तसिंग, सरदार हरविंदरसिंग हे मान्यवर मोहीमेसाठी उपस्थित होते. शेवटच्या दिवशी प्रसिध्द उद्योजक मनिष मालपाणी उपस्थित होते. मोहीमेच्या तिसर्‍या दिवशी कोरीगडावर पदभ्रमंती करण्यात आली. त्यानंतर शिवभक्तांचे मनोगत, हिंदवी परिवाराच्या पदाधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली. शेवटी वंदेमातरमने मोहीमेची सांगता झाली. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी सरनौबत डॉ. संभाजी भोसले पंढरपुर, हिंदवी परिवाराचे कार्याध्यक्ष अमोल मोहीते, सचिव अभिजीत भडांगे, किर्तीकुमार शेटे, विकास मनुरकर, सिध्देश्‍वर टेंगळे, वाशीम जिल्हाप्रमुख दिलीप मेसरे, कोल्हापूर जिल्हाप्रमुख रामदास पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. या मोहीमेत वाशीम तालुक्यातुन देविदास धामणे, निखिल गोरे, विश्‍वंभरआप्पा महाजन, सौ. लताताई धामणे, लक्ष्मी महाजन, मारोती इंगोले, व्याससर, शाम दुरतकर, सुनिल कावरखे, कु. माधुरी नायक, सौ. अल्का गिर्‍हे, मकरंद जोशी, पंकज देशमुख, ऍड. भवानीपंत काळू, माधव इरतकर, प्रमोद राऊत, वैशाली चिल्लोरे, हेमंत रणदिवे, उल्हास वानखडे, अंकुश गावंडे कारंजा, सदानंद दाभाडकर, जगदीश धामणकर मानोरा, विष्णू गावंडे, निलेश पिंपळे मंगरुळपीर, किशोर शर्मा रिसोड, आनंद राजे, अजित सोनोने, संतोष जाधव, प्रा. रवी बावीस्कर, मुंजाळसर, सौ. श्रध्दा जाधव मालेगाव, डॉ. अश्‍वीन काटेकर, खंडाळकरसर शिरपुर आदींसह तब्बल 104 युवक युवतींनी सहभाग घेवून ही मोहीम ङ्गत्ते केली.
---------------------------------------------------------------
वाशीम जिल्हयातून 104 मावळ्यांच्या सहभागाचा विक्रम
    हिंदवी परिवाराचे प्रमुख डॉ.शिवरत्न शेट्ये यांचे मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली गडकोट पदभ्रमंती हिवाळी मोहीम अंतर्गत वाशीम जिल्हयातून तब्बल 104 मावळ्यांनी या मोहीमेत सहभागी होवून एक विक्रम केल्याची प्रतिक्रिया या मोहीमेत  सहभागी पारस विजनिर्मिती केंद्राचे कार्यकारी अभियंता शशिकांत गिरी यांनी दिली. ते पुढेे म्हणतात की, दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट यांनी सर्व किल्ल्यांची महत्वाची व मौलिक माहिती मोहीमेदरम्यान सांगीतली. प्रत्येक गडाचा इतिहास कासट सरांनी सांगीतला. माझे वय 57 पुर्ण होवून 58 वर्षात पदार्पण झाले आहे. मला मधुमेह व रक्तदाबाचा आजार आहे. तरी मोहीमेदरम्यान मला वाशीम विभागामार्ङ्गत प्रोत्साहन देवून गडकोट चढण्याकरीता मदत करण्यात आली. या मोहीमेनंतर माझा आत्मविश्‍वास वाढला आहे. तसेच मनामध्ये साहसी प्रवृत्ती निर्माण झाली व एक नवीन उर्जा या मोहीमेतून मिळाल्याची प्रतिक्रिया गिरी यांनी दिली.

दौलतराव हिवराळे यांना धम्मभूषण


विनोद तायडे
वाशिम - येथील पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष व सामाजीक कार्यकर्ते दौलतराव हिवराळे यांना महाबोधी बहूउद्देशिय संस्था अमरावतीच्या वतीने नेर तालुक्यातील वटफळी येथील महाबोधी बुध्दविहारामध्ये शुक्रवार, 3 फेबुवारी रोजी झालेल्या बौध्द धम्म परिषदेमध्ये संस्थेचे अध्यक्ष भन्ते प्रा. सुमेध बोधी महाथेरो यांच्या हस्ते ‘धम्मभुषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पीआरपीचे विदर्भ अध्यक्ष चरणदास इंगोले, डी.जे. खडसे गुरुजी, सौ. माया दौलत हिवराळे, सौ. आशा सिध्दार्थ गायकवाड यांची उपस्थिती होती. बौध्द धम्म चळवळीत सक्रीयपणे सहभागी होवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रबुध्द भारत करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल हिवराळे यांना हा पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान या गौरवाबद्दल हिवराळे यांचे अनिल कांबळे, जग्गु राऊत, सरकार इंगोले, गजानन केशवाणी, पांडूरंग अंभोरे, रवि भगत आदींनी अभिनंदन केले आहे

सुमेध खंडारे सरचिटनिस पदी


वाशिम -  रिपाइं (ए) कामगार आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदिआसेगाव पेन येथील सामाजीक कार्यकर्ते सुमेध खंडारे यांनी 1 फेब्रुवारी रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान झालेल्या झालेल्या बैठकीत नियुक्ती करण्यात आली.
    रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरुन रिपाइं कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पडघान यांनी केली. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते महेंद्र ताजणे, विलास मुळे, प्रविण पट्टेबहादूर, भगवान ढोले, गणेश जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. पक्षाने दिलेली जबाबदारी मी निष्ठेने पार पाडून पक्षाच्या ध्येयधोरणाला कुठेही तडा न जाऊ देता जनतेचे प्रश्‍न सोडविन अशी प्रतिक्रिया आपल्या निवडीनंतर सुमेध खंडारे यांनी दिली.

डाँ.जाकीर हुसेन शाळेंच्या विद्यार्थांनी भरवली आनंद नगरी


पालकानी घेतला विविध पदार्थाचा आस्वाद
पूर्णा:-पूर्णा शहरातील नांमांकित डाँ.जाकीर हुसेन प्राथमिक ऊर्दु शाळेत पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थींना व्यावसायिक हिशोबाची माहीती व अनुभव  मिळावी म्हणून शाळेंच्या वतीने रेल्वे परीसरातील रेल्वे इन्सटयूटच्या प्रांगणात भव्य आनंदनगरीचे आयोन करण्यात आले.या आनंदनगरीत पहिली ते सातवीच्या विद्यार्थीनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थाचे स्टाँल लावले होते.निमंञीत नागरींकानी व विद्यार्थांच्या पालकानी विद्यार्थांनी बनवलेल्या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.सकाळी दहा वाजता पूर्णा येथील जामा मस्जिदीचे ईमाम शमीम अहेमद रीझवी,मस्जिदीचे सदस्य गणी भाई व शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मुणीर सर यांच्या हस्ते या आनंदनगरीचे उदघाटन करण्यात आले.तसेच शाळेंच्या काही बालक व बालीकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक जाकीर कुरेशी, नगर सेवक हाजी कुरेशी ,शेख चाँद बागवान,ईलियास चाऊस,जाँनी खाँन पठान,शेख सत्तार, आदींची उपस्थीती होती.आनंदनगरी भरवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मो.मुणीर,शिक्षक सय्यद कादर अली,मो.मुख्तार सर,शोएब रफीक सर,उमेर सर,सय्यद आलमगीर सर,मो.वसीम सर,अन्सारी अब्दुल कलीम आदींनी परीश्रम केले.

वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने आणले अनेक गुन्हे उघडकीस

विनोद तायडे
वाशिम:-स्थानिक गुन्हे शाखेने आठ दिवसात अनेक गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले. असून आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला असल्याने गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे .हिंगोली जिल्ह्यातील शिदेफळ येथील विकास हरिभाऊ सावळे वय 19 वर्ष या मोटार सायकल चोरास अटक करून विचार पूस केली असता त्याने मालेगाव येथील 2 मोटार सायकल व वाशिम येथील एक मोटारसायकल दोन साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली .त्याच्या कडून एक मोटार सायकल किंमत 22000 रुपये जप्त करण्यात आली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .दुसऱ्या  चोरीच्या गुन्ह्यात सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी अवघ्या 10 तासात गुन्ह्याचा तपास लावून संजय बबन खाडे वय 23 वर्ष रा करंजी ता मालेगाव जी वाशिम याला अटक करून  त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मालेगाव येथील मंदिरातील दान पेटी फोडून 2520 रुपये आणि टेलरच्या दुकानातील 6000 रुपयांचे कापड चोरी केल्याची कबुली दिली .त्याच्या कडून 8520 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर ,अप्पर पोलीस अधीक्षक सपना गोरे,पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण,सहायक पोलिस उपनिरीक्षक कातडे,पोलीस कर्मचारी कोल्हे व गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली

आजपासुन काळामाथा येथे अवलीया महाराज यात्रामहोत्सवास प्रारंभ

विनोद तायडे
वाशिम :-नवसाची भव्य यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली काळामाथा येथील अवलीया महाराज संस्थान येथे आज दि 4 /2/2017 पासुन भव्य यात्रामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तर भव्य महाप्रसादचा वाटप 10 फ्रेबुवारी रोजी होणार आहे तरी सर्व भाविक भक्तानी या कार्यक्रमाचा आवश्य लाभ घ्यावा.असे आवाहन संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.
मालेगांव तालुक्यातील काळामाथा
येथील अवलीया महाराज मंदिर हे भाविक भक्ताचे श्रध्दास्थान आहे.तर भक्ताच्या मनोकामना पूर्ण होऊन नवसाची यात्रा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे.त्या मुळे विविध ठिकाना वरून भाविक भक्तानी या ठिकाणी येत असतात दर वर्षी येथे संस्थानाच्या वतिने यात्रामहोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते या वर्षीही आज पासुन संगितमय भागवत सप्ताहास ह.भ.प डिगांबर महाराज पोफळे
यांच्या वाणीतुन प्रारंभ होत आहे त्याच बरोबर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. दररोज रात्री 9 ते 11 वाजेपर्यत किर्तनाचे कार्यक्रम आयोजित आहेत.अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष श्री रामेश्वरआप्पा गोंडाळ यांनी दिली आहे.