तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 11 February 2017

फाॅरेन पोलिसांच्या धरतीवर हदगांव पोलिसांनी बसवले पोलीस गाडीवर सी.सी.टी.व्ही.कॅमेरे महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

सुधीर बागुल
वैजापूर :सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका होऊ घातल्या अाहेत.हदगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून ठाणेदार ओमकांत चिंचोलकर यांनी कॅमेर्‍यासह पोलीस गाडी सज्ज केली अाहे.
  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या समाज कंटकांना,वाहतूक विस्कळीत करणे,भांडणे करणे ,रोडवर अतिरीक्त जमाव जमविने या सर्व गोष्टीला पोलीस कॅमेरा गाडीमूळे जरब बसणार अाहे.गुन्हेगारांच्या मनात वचक निर्माण होऊन सर्व महिला,नागरीक,शाळकरी मुले-मुली सुरक्षित व बिनधास्त रहावी,म्हणूनच 'पोलीसांचा तिसरा डोळा' म्हणून ही गाडी कामात येणार अाहे. या अगोदर पोलीस गाडी विविध गुन्ह्यातील तपासासाठी ने-अाण करत होते.परंतू हदगांव पोलीसांनी सदर गाडीला ताकतवर बनवत,गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनविले अाहे.ही गाडी शहरातील ज्या मार्गाने मार्गक्रमण करेल तेव्हा गुन्हेगारांचा थरकाप उडेल व गुन्हा घडविण्याची हिंमत करणार नाही.
शहरात एखादी अनुचीत घटना घडल्यास सदर प्रकरणातील,दंगलीतील अारोपी कॅमेर्‍यामध्ये चित्रीत झालेल्या व्हीडीओमूळे  ओळखता येतील.व कोर्टात पुरावा म्हणून उपयोग होईल.ठाणेदार ओमकांत चिंचोलकर यांनी राबविलेला प्रयोग महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग मानल्या जात अाहे. हा कॅमेरा वायफायनेटशी जोडलेला असल्यामूळे  ठाणेदाराच्या मोबाईलवरुन थेट पोलीस ठाण्यातील टीव्हीवर पोलीस गाडीसमोरील दृष्य पाहता येतील. या अगोदर अनेक घटनेतील जमावाकडून पोलीस वाहन व पोलीसावर हल्ला होण्यापर्यंत घटना घडल्या.परंतू यापुढ अश्या घटनेला प्रतिबंध बसेल,असा विश्वास ठाणेदार ओमकांत चिंचोलकर यांनी व्यक्त केला.

भरसभेत अशोक चव्हाणांवर शाईहल्ला.

नागपूर:-पूर्व नागपुरातील हसनबाग येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मंचावर उपस्थित नेत्यांवर एका असंतुष्ट कार्यकर्त्याने शाई फेकली. काही असंतुष्टांनी लांबून अंडेही फेकले. यामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी शाही फेकणा-याला बोदम चोप दिला. या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. ललित बघे असे शाईहल्ला करणा-याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या सभेत माजी मंत्री नसीम खान यांचे भाषण सुरू असताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मंचावर आले. मंचावर माजी मंत्री विलास मुत्तेमवार, आ. भाई जगताप, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, शेख हुसैन, अशोक धवड आदी नेते उपस्थित होते.रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माथाडी कामगारांचे नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदीयांचे खंदे समर्थक असलेले ललित बघेल हे एकाएक मंचावर आले. त्यांनी खिशातून एक बॉटल काढत अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकली. याच वेळी लांबून काही कार्यकर्त्यांनी मंचाच्या दिशेने अंडे फेकले. एवढ्याच मंचावर उपस्थित पदाधिका-यांनी शाई फेकणा-याला पडकले व चोप देण्यास सुरुवात केली. यानंतर समर्थकांनीही बेदम चोप दिला. या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. चव्हाण सभा सोडून निघून गेले. काही वेळांनी तणाव निवळल्यावर चव्हाण पुन्हा मंचावर आले व भाषण ही दिले. जी मंडळी छुप्या पद्धतीने शिवसेना-भाजपाला मदत करत आहेत, त्यांनी सभे मध्ये विघ्न आणण्याचे प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. दरम्यान, सभा उधळण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला, असेही ते म्हणालेत. शाईफेक करणार नेमका माणूस कोण होता, या बाबतची माहिती घेतल्या नंतर तक्रार नोंदवणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
-------------------------------------------------

नंदु नाईक, मुंबई -

मुंबई = बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्या नंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे.

बेळगावात मराठा मोर्चाच्या संयोजकांवर पोलिसांची दडपशाही.

उत्तर प्रदेश मध्ये पहिल्या टप्प्यासाठी 63 टक्के मतदान, 73 विधानसभांच्या जागांसाठी 839 उमेदवारांचा निकाल 11 मार्चला.

नागपुरातील सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर शाईफेक, शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला जोरदार मारहाण.

चाळीसगाव = जि. प. पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, चार फरार आरोपींना पकडण्यात यश.

मुंबई = महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्याला महापालिकेत नोकरी देणार- उद्धव ठाकरे

मुंबई = पुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणारच नाही, तर जिंकणारही -उद्धव ठाकरे

मेट्रोच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधानांच्या व्यासपीठावर जाण्याची इच्छा नव्हती - उद्धव ठाकरे

नागपूर = काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अंगावर प्रचार सभेत शाईहल्ला.

मुंबई = महाराष्ट्राचा एक इंचही तुकडा तुटू देणार नाही, भाजपाने शपथ घ्यावी - उद्धव ठाकरे

मुंबई = शिवसैनिक एकवटतो तेव्हा समोरचा भुईसपाट होतो - उद्धव ठाकरे

ठाणे = रिक्षाचालकांची एसटी बसचालकाला मारहाण, ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, कंडक्टरच्या तक्रारीवरुन रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल.

ठाणे = अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांना तुरूंगात टाकू, दिव्यातही परिवर्तन करा - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दिवा = एमएमआरडीएच्या माध्यमातून दिवा दत्तक घेऊन विकास करू - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दिवा हे ठाण्याचे डम्पिंग ग्राऊंड बनवले, येथील कचरा आम्ही संपत्तीत परावर्तीत करू. दिव्यात पैसा नसल्याने शिवसेनेने येथे कधी लक्ष दिले नाही, आमची सत्ता आली तर दिव्याचे डम्पिंग वर्ष भरात बंद करू - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

सिंधुदुर्ग = देवगड येथे पाच वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला,मुलगा गंभीर जखमी, हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू.

ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाची दिवा येथे सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभास्थानी आगमन. दिव्याला भेट देणारे पहिले मुख्यमंत्री,भाषणा दरम्यान आमदार संजय केळकर यांच्याकडून शिवसेना लक्ष्य. शिवसेनेला गाडून टाकण्याचे केले आवाहन. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका.

मुंबई = बीकेसी मधील शिवसेनेच्या सभेला भाजपा मुळे अडसर,सभांच्या जागा मिळवण्यासाठी भाजपाचं दबावतंत्र, सभेसाठी जागा मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांचा दबाव, शिवसेना नेते अनिल परब यांचा आरोप.

बिहार टॉपर घोटाळ्यात एसआयटीने रुबी रायचे वडील अवदेश राय यांना केली अटक.

लातूर = नांदेड-बिदर राज्य मार्गावरील सुकणी गावाजवळ नांदेडच्या व्यापाऱ्याची कार अडवून 6 लाख रुपयांची केली लूट, यातील पाचवा आरोपी अटकेत, सप्टेंबर 2016 मध्ये घडली होती घटना.

तामिळनाडूत उद्भवलेल्या राजकीय संकटानंतर राजभवना बाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली.

पुणे = नांदेड गावातील माकडाला पकडण्यात ग्रामस्थ आणि वन विभागाला यश, गेल्यादीड महिन्यात 25 ते 30 नागरिकांना माकडाचा चावा.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान संपले.

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना - तिस-या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेशने 6 विकेट्स गमावत केल्या 322 धावा, भारताला कडवी झुंज.

नागपूर = पॉलिटेक्निक प्रथम वर्षात शिकणा-या विद्यार्थिनीची आत्महत्या, बुटीबोरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळघाट येथील घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

जळगाव = राज्यात सत्तारुढ सैराट सरकारचा झिंगाट कारभार, लाभदायी योजनांची नावे बदलण्याचे कामं सुरु आहेत, अडीच वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची सत्ताधा-यांवर टीका.

नाशिक = रेल्वे रुळावर आढळला 5 फुटांचा दगड, खेरवाडी-ओढादरम्यान आढळला मोठा दगड, काल मध्यरात्री 1 वाजताची घटना, रेल्वे रुळावर अवजड वस्तू ठेवण्याची पाचवी घटना.

मुंडे साहेब तारीख बदलणारे नव्हते, इतिहास बदलणारे होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

उद्धव ठाकरे बोलतात ते करुन दाखवतात का, ते 18 तारखेनंतर पाहू - नारायण राणे.

नगराध्यक्ष बोराडेंना भाजपात येण्यासाठी ना. लोणीकरांनी घातली साद.

राम सोनवणे
सेलू:-जिल्ह्यात जि.प.व प.स. च्या निवडणुकीतील प्रचारातुन वेळ काढत ना.बबनराव लोणीकर यांनी सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. परभणी जिल्ह्यात सत्तेत असणा-या पक्षात जाण्यासाठी स्पर्धाच लागली असताना खुद लोणीकर यांनी नगराध्यक्ष बोराडे यांना भाजपात येण्यासाठी दिलेले निमंत्रण आणि बोराडेंचा निर्णय याकडे मात्र सर्वाचे लक्ष लागलेआहे.ज्यांना भाजपात यावे वाटते अश्यांचे प्रवेशाचे काहीच खरे नसतांना लोणीकरांनी पक्षात येण्यासाठी घातलेले साकडे त्याच बरोबर शहराच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची कबूली दिल्यामुळे नगराध्यक्ष बोराडे हे भाजपात जातील काय? हे मात्र लवकरच कळेल .

प्राथमिक स्थरावर कृतियुक्त अध्यापनाचा आवश्यकता  - गटशिक्षणाधिकारी पाटील

परतूर/ प्रतिनिधी : प्राथमिक स्थरावर कृतियुक्त अध्ययन- अध्यापनाची पद्धती राबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी आधुनिक साधनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. दैनंदिन व्यवहारातील संबोध कृतीयुक्त अध्यापनाचा माध्यमातून चांगल्या प्रकारे स्पष्ट होऊ शकतात असे मत गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी व्यक्त केले.
> येथील द्रौपदाबाई आकात इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाजार समितीचे सभापती कपिल आकात यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सिलजा के. सिबी, गटसमन्वयक कल्याण बागल, व्ही.बी.काळुंके, सर्फराज कायमखानी, संजय चव्हाण, स्मिता रोडगे, एल.के.बिरादार, शेषराव वायाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
>      प्राथमिक स्थरावर बालकाच्या अंगभूत क्षमता वेगाने विकसित होत असल्याने शिक्षकाने बाल मानसशास्त्राचा उपयोग आपल्या अध्यापणा दरम्यान करावयास हवा.असेही पुढे बोलताना ते म्हणाले.
>    कोणताही व्यवसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. यासाठी संस्था बदलत्या काळातील बालकाच्या गरजा ओळखून त्याच्या प्रमाणे आपल्या शिक्षण पद्धतीत सातत्याने सकारात्मक बदल सातत्याने घडवत असते. आता पर्यंतच्या स्पर्धा परिक्षामधील शाळेचे यश या वरून अधोरेखित होते. असे मत सभापती कपिल आकात यांनी व्यक्त केले.
>     यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष गारकर यांनी केले तर आभार सनील सोमण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती पांगारकर, अनिता झोल, वासिम शेख, स्वाती कुरे, सिमा बारवाल, अशोक येवले, गुल्फराज शेख, बनसोड, देशमुख, कविता वैष्णव, बळीराम शेळके यांनी परिश्रम घेतले.

कृषी समृध्दी प्रकल्पामुळे विदर्भातील चार हजार गावांचा विकास-मुख्यमंत्री

राहुल निर्मळ
बुलढाणा :-विदर्भातील सहा जिल्ह्यासह बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्टयाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी समृध्दी प्रकल्प तयार करण्यात आला असून त्याला जागतिक बँकेकडून ५ हजार कोटी रूपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गंत नवीन पीक पध्दत पॅटर्न, जलसंधारण व जलयुक्त शिवार कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
त्याचा फायदा विदर्भातील चार हजार गावांमधील  शेतकºयांना होणार असून त्यांची खारपाणपट्टयातून मुक्तता होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्थानिक लहाने ले-आऊट येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ १० फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, योगेंद्र गोडे, विश्वनाथ माळी, श्वेता महाले, विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, नंदू अग्रवाल, मोहन शर्मा, सचिन देशमुख, जि.प.सदस्य नरहरी गवई आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्याचा ५० वर्षाचा इतिहास पाहिल्यास शेतक-यांना मिळाली नाही तेवढी मदत भाजपा सरकारने  गेल्या दोन वर्षात केली आहे. १७ हजार कोटी रूपयाची अप्रत्यक्ष मदत शासनाने शेतकºयांना केली असून पाणी, वीज व शेतकºयांच्या उत्पादन मालाला भाव देण्यात आला आहे. शासनाने महाराष्ट्र दुष्काळ मुक्तीचा संकल्प केला असून यासाठी राज्यात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली.
या योजनेअंतर्गंत ४ हजार गावे दुष्काळमुक्त, १२ लाख हेक्टर सिंचन क्षमता वाढली असून जिल्ह्यातील जिगांवसह रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार शेततळे तयार करण्यात आले असून ६ हजार सिंचन विहिरी देण्यात आल्या आहेत. दिवसा विजेची समस्या लक्षात घेता सोलर पंप प्रकल्प तयार करण्यात आला असून केंद्र शासनाच्या मदतीने शेतकºयांना सोलर पंप देण्यात येणार आहे. जो पर्यंत शेतकºयांची उत्पादकता वाढणार नाही, तो  पर्यंत शेतकºयांची समस्या सुटणार नाही. यासाठी २५ हजार कोटीचा शेतकरी अर्थ संकल्प सुरू केला असून शेतकºयांना अचूक हवामानाचा अंदाज घेण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक मंडळामध्ये हवामान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील गरिबांचा विविध योजनेच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न असून येणाºया दोन वर्षात गरिबांना त्यांच्या हक्काची घरे देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

प्रारंभी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी शासनाने आतापर्यंत राज्याच्या विकासाचे चांगले निर्णय घेतले असून केंद्र सरकार व राज्य सरकारने विविध आराखडे तयार करून गरिबांसाठी योजना राबविल्या आहेत. भविष्यात ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविला पाहिजे, यासाठी भाजपाच्या उमेदवारांच्या पाठिशी उभे रहा, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष पदाच्या आठ महिन्याच्या कार्यकाळात जिल्ह्यात २४५ गावात भाजपाच्या शाखा स्थापन केल्या असून गावागावात केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे घाटावरील ३० पैकी २० जागा निवडून आणू, असे आश्वासन देवून यावेळी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवू, असा विश्वास व्यक्त केला. आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होत नाही. भविष्यात शेतकºयांचे प्रश्न सुटले पाहिजेत, उद्योग वाढले पाहिजे, दिल्ली ते गल्ली पर्यंतचे आराखडे मंजूर झाले पाहिजेत. यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून  द्या, असे आवाहन केले.कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर म्हणाले की, मागिल ७० वर्षात ग्रामीण भागात कोणताच विकास झाला नाही, शिक्षण, पिण्याचे पाणी, आरोग्याची दूरवस्था झाली आहे. आता परिवर्तनाची लाट आली आहे. राज्य शासनाच्या दोन वर्षाच्या काळात शेतकºयांसाठी १८० कोटी रूपयांचा विमा, ३ हजार ५०० कोटी रूपयांचे दुष्काळाचे अनुदान देण्यात आले आहे.  आता शेतक-यांनी मागणी केल्यास आठ दिवसात वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार संपवून विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
-------------------------------------------------

पाकिस्तानचे दोन क्रिकेटर खालिद लतीफ आणि शरजील खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं निलंबित केलंय. या दोघांनाही दुबईहून परत पाठवण्यात आलंय. खालिद आणि शरजील यांच्यावर पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे.

मध्यप्रदेश मधून आयएसआयच्या तब्बल 11 हेरांनाअटक करण्यात आली आहे. एटीएसनं ही कारवाई केलीय.हे 11 हेर कॉल सेंटर चालवत होते. या कॉल सेंटरच्या नावाखाली ते भारतीय लष्कराची गोपनीय माहिती फोडून, पाकिस्तानला पुरवत होते. या कामासाठी त्यांना पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय कडून पगार मिळत होता.

हावडा कुर्ला एक्सप्रेसच्या घातपाताचा कट फसला... नाशिक मध्ये रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, रुळावर ठेवलेल्या दगडा मुळे इंजिनाचा पुढचा भाग खराब.

सुपरस्टार रजनीकांत राजकीय पक्ष काढण्याची शक्यता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक गुरुमूर्ती प्रयत्नशील असल्याच्या चर्चांना उधाण... दक्षिणेतल्या राजकारणाला कलाटणी मिळण्याचा अंदाज.

957 दिवसात 25 कोटी प्रवासी, मुंबई मेट्रोची विक्रमी वाटचाल.

राष्ट्रवादीचा भाजपला कदापि पाठिंबा नाही : सुप्रिया सुळे

मुंबई विमानतळावर 54 लाखांची 18 सोन्याची बिस्किटं जप्त.

उद्धव ठाकरे बोलतात ते करुन दाखवतात का, ते 18 तारखेनंतर पाहू - नारायण राणे.

जे लोक आमच्या पक्षामध्ये फुट पाडण्याचा विचार करत आहेत, तो दीडकोटी लोकांचा पराभव असेल - व्हीके. शशिकला.

उस्मानाबाद = सोन्याच्या ताटात जेवणारे गरिबांना न्याय काय देणार. पन्नास वर्ष सत्ता उपभोगूनही जनतेचे मुलभूत प्रश्न सोडविता आले नाहीत, त्यांना मते मागण्यांचाही अधिकार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसवर टीका.

शशिकला यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करण्यासाठी भेटीची वेळ मागितली.

ठाणे = धावत्या लोकलवर दगड आणि बाटली फेकून मारणारी महिला गजाआड, रात्रीच्या वेळी मुंब्रा बोगदा पास करताना होत होती दगड व बाटली फेक, चार महिला झाल्या होत्या जखमी, लोहमार्ग पोलिसांची कारवाई.

औरंगाबाद = बहुजन क्रांती युवक मोर्चा व अभाविप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, कुलगुरू दालनाची तोडफोड.

सोलापूर = मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेला सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली, बाळीवेस मध्ये 14 तारखेला सायंकाळी होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे.

तामिळनाडूचे शिक्षणमंत्री आणि शशिकला यांचे जवळचे सहकारी पनीरसेल्वम यांच्या गटात सहभागी झाले.

बांगलादेशच्या 6 बाद 246 धावा झाल्या आहेत, पहिल्या डावात भारताने 6 बाद 687 धावांचा डोंगर.

टाटा रुग्णालयात औषधांचा साठा केलेल्या भागामध्ये आग लागली असून, कोणीही जखमी झालेले नाही अशी माहिती टाटा रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिक-यांनी दिली.

प्रभाकर गायकवाडांना श्रध्दांजली वाहून मुंबई सेंट्रल, परळ डेपोमध्ये एसटी कर्मचा-यांचे धरणे आंदोलन, दोन्ही आगरातील एसटी वाहतूक ठप्प.

इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर साठी 2018 पासून एकच प्रवेश परिक्षा द्यावी लागणार.

पुणे मावळ तालुक्यातील पाचाणे येथील ग्रामदैवत यात्रेमध्ये मिठाई दुकानातील पेढे प्रसाद म्हणून खाल्याने सुमारे 200 च्या आसपास लोकांना विषबाधा झाली,त्यामध्ये लहान मुलांना विषबाधा जास्त प्रमाणात आहे.

नवी दिल्ली = तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती संदर्भात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केंद्र सरकारला अद्याप कुठलाही अहवाल पाठविला नसल्याचे राजभवनातील जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

विधानसभेसाठी मतदान : यूपीत आज पहिला टप्पा - १५ जिल्ह्यातील ७३ मतदारसंघात विविध राजकीय पक्षांची प्रतिष्ठा आज पणाला लागणार आहे.

मुंबई = जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद शस्त्रक्रियेसाठी आज सकाळी मुंबईत दाखल होणार आहेत, त्यांचे वजन 500 किलो आहे.

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर दक्षिण आफ्रिकेची आयसीसी क्रमवारीत अग्रस्थानी, भारताची चौथ्या तर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानी घसरण.

तुर उत्पादक शेतक-यांची व्यापा-याकडुन लुट.


◆हमीभावाच्या तुलनेत प्रति क्विंटल 1 हजारची कमी.
सेलु(प्रतिनिधि) :येथील मोंढा परिसरात शनिवारी बाजार असल्या कारणाने तुर उत्पादक शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात आपली उत्पादीत तुर विक्रीसाठी बाजारात आणली असतांना प्रति क्विंटल 3900ते 4070 दरम्यान भाव मिळाला शासकीय तुर खरेदी केंद्रावर शासनाचा 5050 रुपये हमीभाव असतांना शेतक-यांना आपली तुर तब्बल 1000रुपयाच्या फरकाने कमी भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे नकळतपणे तुर उत्पादक शेतक-यांची व्यापा-या कडुन आर्थीकलुट होत आहे. केंद्र सरकारने नोटा बदलीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच क्षेत्रातला बाजार मंदावला होता. शेतक-यांचा दैनंदीन व्यवहार नडला होता .शेतक-याकडे उत्पादित माल असतांना देखिल केवळ रोख देवाणघेवाणी द्वारे शेतक-यांच्या गरजेसाठी माल विक्री होत नव्हता. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी तुरीचे पिक भरघोष प्रमाणात आलेले असतांना तुरीचे भाव मात्र पटीत कोसळले व्यापा-याकडुन शेतक-यांची लुट होवु नये म्हणुन केंद्र शासनाने 5050 रुपये प्रति क्विंटल हमीभावाने तुर खरेदी करण्याचा निर्णय घेतला शासकिय तुर खरेदी केंद्र सुरु झाले. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान दिसु लागले. मात्र शासनाने एकीकडे हमीभाव देत असतांना दुसरीकडे प्रतवारीची मेख मारुन ठेवली आहे. शेतक-याकडे उत्पादित तुर शासकिय प्रतवारीत बसत नसेल तर आशा शेतक-यांना खाजगी व्यापा-याकडे जाणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शासकिय खरेदी केंद्रावर तुर घेतली नाही तर शेतक-यांना प्रति क्विंटल 1हजार रुपये आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. म्हणुन शासकिय तुर खरेदी केंद्रावर केंद्र शासनाने प्रतवारीनुसार तीन हमीभाव निश्चित करणे गरजेचे आहे जेणे करुन शेतक-याकडील तुरीची प्रतवारी दुय्यम असेल अशा वेळी देखील केंद्र शासनाने दुय्यम भाव देवुन शेतक-याकडील तुर खरेदी करणे गरजेचे आहे जेणे, करुन तुर उत्पादक शेतक-याला शासकिय खरेदी केंद्रावरुन प्रतवारीच्या कारणाने माल परत आणावा लागणार नाही. त्यामुऴे शेतक-यावर वाहतुकीचा भुर्दंड बसणार नाही आणि व्यापा-याकडुन आर्थिक लुट देखिल होणार नाही

◆शासकिय खरेदी केंद्र बंद चे गौडबंगाल काय?
येथील पाथरी रोड परिसरातील शासकिय गोडावुन येथे केंद्र शासनाच्या भारतीय खाद्य निगम अंतर्गत शासकिय खरेदी तुर केंद्र सुरु होते शेतक-यांच्या उत्पादित तुरीला प्रति क्विंटल 5050रु हमी भाव मिळत होता यावर शेतकरी समाधान व्यक्त करत होते मात्र अशावेळी अचानकपणे भारतीय खाद्य निगमचा एक अधिकारी प्रशासानाला पत्र देवुन सुरक्षेच्या कारणावरुन तात्काळ तुर खरेदी केंद्र बंद करतो. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा निबंधक, सहाय्यक निबंधक व कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ना भारतीयखाद्य निगमचा अधिकारी पत्र देवुन कळवितो की 10 फेब्रुवारी पासुन, शासकिय तुर खरेदी बंद ठेवण्यात येईल यावर तहसिलदार पासुन जिल्हाधिका-यापर्यंत व बाजार समिती पासुन जिल्हा निबंधकापर्यंत कोणी ही तात्काळ दखल घेतली नाही भारतीय खाद्य निगमच्या अधिका-याने राजकीय दबाब व सुरक्षेचे कारण दाखवुन अचानकपणे शासकिय तुर खरेदी केंद्र बंद ठेवले केंद्र बंद ठेवत असतांना जबाबदार संबधित विभागाच्या अधिका-यांना लेखी कळविले मात्र एकाही संबधित अधिका-यांनी भारतीय खाद्य निगमच्या अधिका-यांना तात्काळ सुरक्षा पुरवुन तुर खरेदी केंद्र सुरु ठेवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही त्यामुळे नेमके कोणाचे हित समोर ठेवुन भारतीय खाद्य निगमच्या अधिका-यांने शासकिय तुर खरेदी केंद्र अचानक बंद ठेवले व त्यासाठी संबधित सर्व कार्यालयांनी मुक संमती दिली यांचे गौडबंगाल उकलेना मात्र याचा सर्व सामान्य शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला असुन शनिवार 11 फेब्रुवारी रोजी सेलु शहरातील खाजगी व्यापा-यांनी शेतक-यांच्या उत्पादित तुरीला प्रति क्विंटल 3हजार 900ते 4हजार असा भाव मिळाला शेतक-यांना प्रति क्विंटल 1हजार रुपये आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले शनिवारी दुपारपर्यंत मोंढ्यात जवळपास 1हजार क्विंटल तुरीची आवक होती. अनेक शेतकरी असे बोलत होते की व्यापा-यांनी आमच्याकडुन खरेदी केलेली तुर केंद्र शासनाच्या तुर खरेदी केंद्रावर विक्री होण्याची भिती व्यक्त केली