तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 18 February 2017

खंडाळा ग्राम पंचायत कार्यालयात 387 वी जयंती साजरी


सुधीर बागुल
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिन्दवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 387 व्या जयंती वैजापुर तालुक्यातील खंडाळा येथील ग्रामपंचायत कार्यक्रम साजरा करण्यात आला या प्रसंगी सरपंच जमुनाबाई संजय सूर्यवंशी, उपसरपंच साजिद खान, ग्राम विकास अधिकारी आर बी निकम,राजेंद्र मगर, विजय मगर,पंढरीनाथ मगर, धोंडीराम पवार,रहीम बागवान, राजेंद्र जानराव, सुभाष बहाळस्कर, गोरखनाथ शिंदे, रतन म्हस्के, सतीश बागुल, अर्जुन मगर,भागवत घोडेकर, विजय त्रिभुवन,सुनिल गायकवाड़,रफिक कुरैशी,दशरथ दारवंटे, संजय थोरात,कैलास बागुल,योगेश पवार आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

जवळा जिवाजी येथे शिवजयंती उत्साहात संपन्न


प्रदीप खरात
जवळा जिवाजी :-येथे  आज 19 फेब्रुवारी  रोजी सामाजिक  बांधिलकी जपून  तरुणांनी  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली  डिजे बॅन्जो गुलाल या सर्व खर्चाला फाटा देवुन यातुन उरलेली वर्गणी चे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून शिवजयंती साजरी केली त्या बद्दल गावकर्या कडुन सर्व तरुणांचे कौतुक केले जात आहे या कार्यक्रमासाठी सरपंच अशोकराव खरात  रामराव खरात जगन्नाथ भुजबळ प्रदीप खरात अनंत राव भुजबळ  शिवाजी खरात  अॅड बजरंगराव खरात हे मान्यवर उपस्थित होते या शिवजयंती उत्सवा साठी
हणमान भुजबळ सोनु खरात कुमार सरकटे कल्याण खरात संजय भुजबळ  गोरखनाथ खरात भरत झोल  सिद्धेश्वर खरात योगेश भुजबळ आदी तरूणांनी परिश्रम घेतले

शिवजयंती निमित्य रिसोड बसस्थानक मध्ये स्वच्छता अभियान

महेंद्र महाजन
रिसोड ता 18
बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८७ व्या जयंती निमित्त रिसोड शहरातील बस स्थानक मध्ये अतिशय घाण झाली होती त्याची आपल्या तेज न्युज हेडलाइन्स  ला बातमी सुद्धा प्रकाशित झाली होती शिव जयंती निमित्याने मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ए एन बी अकॅडमी कृषी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड येथील बस स्थानक साफसफाई करण्यात आली प्रसंगी श्री शिवाजी विद्यालय रिसोड नगर परिषद रिसोड आणि ए एन बी अकॅडमी  रिसोड बस स्थानक चे आहिरे यांनी या साफसफाई ला मदत केली साफसफाई करता वेळेस नगर परिषद रिसोड चे मुख्याधिकारी पान झाडे नगर अध्यक्ष यशवंत देशमुख मराठा सेवा संघ अरुण झुंगरे धनंजय देशमुख विजय बोरकर मराठा सेवा संघ ता अध्यक्ष सचिन देशमुख संभाजी ब्रिगेड विनोद पाटील अर्जुन पाटील रमेश पाटील रिसोड आणि ए एन बी अकॅडमी चे बोनडे सर,अरुण मगर अलंकार खैरे रवी अंभोरे शेख अन्सार सुरेश गिरी  कृषी परिषद चे अध्यक्ष रुपेश पाटील महेंद्र महाजन  व शेकडो शिव भक्त हजर होते

जिंतुरात बिकट आर्थिक परिस्थितीतही सक्तीने वीजबिल वसुली


* पूर्व कल्पना न देताच केली जाते वीज जोडणी खंडित
नियमबाह्य कामासाठी सहायक अभियंत्याची मनमानी

प्रदीप कोकडवार
जिंतूर शहरातील बाजारपेठेत नोटबंदीच्या निर्णयानंतर किरकोळ तसेच ठोक व्यापाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळल्याने शहरात बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतांना ही महावितरणचे शहर सहायक अभियंता स्वमनमानी करून सक्तीने वीजबिल वसुली मोहीम राबवत आहे व वीजबिल भरण्यास असमर्थ ठरत असलेल्या विजग्राहकाना पूर्व कल्पना न देताच विजजोडणी खंडीत करीत असल्याने ग्राहकांना अनंत अडचणींच्या सामोरे जावे लागत आहे.
                             मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी निसर्गाच्या कृपेमुळे शहरासह तालुक्यातील पिके जोमात अली पण नोव्हेम्बर महिन्यात केंद्र सरकारने अचानक ५०० तसेच १००० रुपयाच्या चलनी नोटा बाजारपेठेतून हद्दपार करण्याचा ऐतेहासिक निर्णय घेण्यात आल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांचे पुनश्च एकदा आर्थिक नियोजन पूर्णतः कोलमंडले परिणाम स्वरूप मागील दोन महिन्यांपासून बाजारपेठेत बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली. अन वर्षभरापासून कुंभकरणाची झोप घेत असलेले शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागताच खडाडून जागे झाले असून या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्च एंडचे स्वप्न पडण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी पदाचा गैरोपयोग करून बिकट आर्थिक परिस्थितीचे भान असतांना ही संबंधित खात्याची वसुली करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन थकीत बाकी वसुलीसाठी बाजारपेठेत मिरवत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे बाजारपेठेत कमालीची बिकट आर्थिक परिस्थिती असतांना ही महावितरण शहर शाखेचे सहायक अभियंता एन. ए. रायपुरे हे बाजारपेठेत बिकट आर्थिक परिस्थितीची जाणीव असतांना ही सक्तीने थकीत वीजबिल वसुली मोहीम राबवित आहे आणि जो विजग्राहक थकीत वीजबिल भरण्यास असमर्थ ठरत असेल त्याची विद्युत जोडणी पूर्वकल्पना न देताच पदाचा गैरोपयोग करून खंडित करीत असल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या विजग्राहकाना सहायक अभियंत्यांच्या मनमानीमुळे अनंत अडचणींच्या सामोरे जावे लागत आहे. म्हणून या गंभीर समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
धनदांडग्यांना अभय तर गोरगरिबांवर कारवाईचे सत्र
जिंतूर शहरात मार्च एंडच्या नावाखाली महावितरणाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सक्तीच्या वसुली मोहिमेत सहायक अभियंत्याकडून पक्षपात होत असल्याची चर्चा विजग्राहकामध्ये होत असून वीजबिल वसुलीत महावितरणाचे अधिकारी तसेच कर्मचारी शहरातील धनदांडग्यांना सक्तीच्या वीजबिल वसुलीत अभय देत आहे तर गोरगरिबांवार सक्तीची कारवाई करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत.

शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी का साजरी करतात..?

-------------------------------------------------

जगातले सर्व कारभार तारखेवर चालतात. ग्रामपंचायती पासून ते संसदे पर्यंत तसेच न्यायालयीन कारभारदेखील तारखेवर चालतो. जगात छत्रपती शिवाजी महाराज वगळता इतर कोणत्याच महापुरुषांची जयंती तिथीनुसार होत नाही मग एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार का करायची? १८६९ साली राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी रायगडा वरील शिवरायांची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला. शिवरायांचे जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीबा फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात सुरु झाली. शिवजयंतीचा शासकीय उत्सव नेमका कोणत्या तारखेला साजरा करायचा, म्हणजे तिथीनुसार दरवर्षी बदलणार्या तारखेस की इंग्रजी तारखेस असा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा.सी.बेंद्रे, न.र.फाटक, ग.ह.खरे, द.वा. पोतदार, डॉ.आप्पासाहेब पवार यांची एक समिती स्थापन केली. वादग्रस्त बाबींसाठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग इ.त्याप्रमाणे शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली. समितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली. देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात. तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये, शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात.

आपल्या सर्वाचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी विश्ववंदनीय छञपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त तेज न्युज हेडलाईंस कडून सर्व वाचकांना लाख लाख शिवमय शुभेच्छा...!

वाशिम जिल्ह्यातील 3 ग्रामसेवकाना अटक,3 फरार

जिल्हाधिकाऱयांची राज्यातील पहिलीच कार्यवाही

वाशिम- विनोद तायडे
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायतसमिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत चे दस्तावेज गत तीन वर्षांपासून जमा न करणाऱ्या सहा  ग्रामसेवकच्या अटकेचे आदेश जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्याने 3 ग्रामसेवकाना अटक करण्यात आली असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे तर  तीन ग्रामसेवक फरार असून त्यांचा शोध  पोलीस घेत आहेत. 25 ग्रामसेवकावर अटकेची टांगती तलवार असल्याची गोपनीय माहिती प्रत झाली आहे.
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मेडशी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अशोक साठे,दुबलवेल येथील ग्रामसेवक एस एम कांबळे,झोडगा बुजरूक चे ग्रामसेवक एस एच अंभोरे,डोंगरकिन्हीचे व्ही पी चिकटे,पांगराबंदीचे पी यु चिकटे,ग्रामसेवक एस एम ठाकरे आदी सहा ग्रासेवकांनी गत 3 वर्षांपासून ग्रामपंचायतचे दस्तावेज  मालेगाव पंचायत समितीला जमा न केल्याने  विविध निधी विनियोगाचा हिशोब लागत नव्हता ,मालेगाव गटविकास अधिकाऱयांनी गत 3 वर्षांपासून सहाही ग्रामसेवकाना वेळोवेळी नोटीस व स्मरणपत्र  देऊनही ग्रामसेवकांनी   दस्तावेज जमा केले नाही .मालेगाव गटविकास अधिकारी यांनी  प्रकरण वाशीम जिल्हा परिषद  मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याकडे  पाठविले,सी ई ओ नी दस्तावेज जमा करण्याची नोटीस बजाऊनही सहा ग्रामसेवकानी दस्तावेज जमा न केल्याने सी ई ओ नी सरळ प्रकरणाचा अहवाल  जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे पाठविला .खुद्द जिल्ह्याधिकार्याच्या आदेशाला सहाही ग्राम सेवकांनी  केराची टोपली दाखविली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सहाही ग्रामसेवकावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 179 नुसार कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.  पोलिसांनी एस एम कांबळे, एस एम ठाकरे,एस एच अंभोरे यांना अटक करून त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली .ग्रामसेवक व्ही पी चिकटे,अशोक साठे,पी यु चिकटे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, महाराष्ट्रात पाहिल्यांदाच  ग्रामसेवकावर अशा प्रकारची कार्यवाही झाल्याची  माहिती प्राप्त झाली आहे.आणखी 25 ग्राम सेवकावर कार्यवाहीची टांगती तलवार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली आहे
वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील  धडक कार्यवाही करत असल्याने जिल्ह्यात विकासकामांना गती आली आहे.राजकारणी नेत्यांची मात्र हवा टाईट झाली आहे

या आठवड्यात तीन दिवसच सुरु राहणार बँका.

-------------------------------------------------

चालू आठवड्यात म्हणजेच 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2017 दरम्यान बँकांना 4 दिवस सुट्टी आहे. त्यामुळे बँका फक्त तीन दिवसच सुरु असतील. तुमची जर बँकेची काही कामे असतील तर ती या तीन दिवसात करावी लागतील. मुंबई आणि महाराष्ट्रात मतदानासाठी मंगळवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस बँका सुरु राहतील. त्यानंतर शुक्रवार महाशिवरात्री असल्याने बँक बंद त्यासोबतच चौथा शनिवार आल्याने ती सुट्टी आणि रविवार. अशी सलग 3 दिवस बँकेला सुट्टी असणार आहे. त्या या पुढील आठवड्यात तुमची बँकेची काही कामे असतील तर ती सोमवारी, बुधवार आणि गुरुवारीच आटोपून घ्या.

ब्रेकींग

मुंबई = कुर्ला-कमानी भागात प्रार्थना स्थळाची नासधूस , परिसरात काही काळ तणावाचे वातावरण, घटणास्थळी पोलिस पथक दाखल.

पाकचे सर्जिकल स्ट्राईक? अफगाणिस्तानातील दहशतवादी तळ केले नष्ट.


-------------------------------------------------

इस्लामाबाद = इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघातीहल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यां विरुद्ध देशव्यापी धडक 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच अफगाणिस्तानच्या दुतावासाला पाकिस्तानने 76 दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पाकने दहशतवाद्याला कंटाळत अफगाणिस्तान मध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहेत. मिळालेल्या माहितेनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तान मध्ये घुसून तेथील चार दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानने 76 दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, या अतिरेक्यांचा पाकिस्तान मधील दहशतवादी हल्ल्यामध्ये हात असल्याचे म्हटले होते. अशी मागणी 17 तारखेला पाकने केली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार खैबर पख्तूनख्वा प्रांतातदेखील 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीने सैन्य दलातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तान मधील जमात उल अहरारच्या चार दहशतवादी तळांवर काल रात्री हल्ले करण्यात आले. परंतु या बाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. जरया हल्ल्याला दुजोरा मिळाला तर अफगाणिस्तानच्या जमिनीवर पाकिस्तानी सैन्याने केलेली अशाप्रकारची ही पहिलीच मोहिम असेल.

वाघाळा येथे शिवजन्मोत्सवाला प्रारंभ

कार्तिक पाटील

पाथरी:- तालुक्यातील वाघाळा येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सवाला आज शनीवार १८ फेब्रूवारी पासून प्रारंभ झाला असून दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सार्वजनिक शिवजन्मोत्सव आणि कला मोहत्सव २०१७  निमित्य शनीवारी सायंकाळी सात वाजता विद्यार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे उदघाटन पोलीस निरिक्षक सोहन माच्छरे यांच्या हस्ते करण्यात आले असून या वेळी डॉ जी आर सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  तर  प्रा डॉ संतोष रणखांब यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव कदम हे  होते तर प्रमुख पाहूने म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव दिनकर गरूड  सपोनी पांडे ,गावातींल प्रतिष्ठीत मंडळी यांची या व्ळी उपस्थिती होती. रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता बहूजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार असून सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या नंतर सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखितून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या नंतर सायंकाळी ८ वा वक्तृत्व स्पर्धा , सामुहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य स्पर्धांचा कार्यक्रमाणे या शिवजन्मोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजीत करण्यात आले आहेत.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
-------------------------------------------------

रिलायन्स जिओ 4जीच्या ग्राहकांना कंपनीनं आणखी एक गुड न्यूज दिलीय.'ईटी' वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चनंतर आणल्या जाणाऱ्या नव्या टेरिफ प्लाननुसार, ग्राहकांना कॉलिंगसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. जिओच्या ग्राहकांना केवळ इंटरनेटच्या वापरासाठी 100 रुपयांचं शुल्क भरावं लागेल. हे तीन महिन्यांसाठी वैध असेल म्हणजेच 30 जूनपर्यंत ते वैध राहील.

केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड सक्तीचं.

बारामती नगरपरिषदेच्या प्रवेश द्वाराला आज फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली. स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्याच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उडवलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागली.

केंद्र सरकार कडून तुरीची खरेदी आजपासून बंद.

हाफिज सईद दहशतवाद्यांच्या यादीत, पाकिस्तानच्या पंजाब सरकारची कारवाई

अहमदनगर =  दहाव्या राष्ट्रीय प्रतिबिंब लघुपट महोत्सवातील खुल्या विभागातील विभागातून 'सावट' तर विद्यार्थी विभागातून 'दिसाड दिस' या हा लघुपट ठरला सर्वोत्कृष्ट .

मी काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा विरोध करणार आणि सत्यासाठी, चांगल्यासाठी भाजपचाही विरोध करणार - उद्धव ठाकरे

स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या क्रांती कारकांचं दालन मुंबईत बनवणार - उद्धव ठाकरे

शरद पवारांना पद्मविभूषण देऊ शकतामग स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजून पर्यंत 'भारतरत्न' का दिले नाही - उद्धव यांचा मोदींना सवाल

नाशिक शहरात राज ठाकरेच्या नावाची एक इंच जमीन आढळली तर राजकारण सोडेन - राज ठाकरे

तुम्ही म्हणता की, औकात दाखवू, आमचे कपडे उतरवू, 23 तारखेला बघा मुंबईकर तुमचं काय करतात - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे नरेंद्र मोदीं बाबत भाषण करतात, पण पंतप्रधान मोदींची महापालिकेशी काय संबध? - राज ठाकरे

भिवंडीतील म्हात्रेंच्या मारेकरी अद्यापही मोकाट का? - उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबईत जोवर शिवसेना आहे तोवर मुबंई सुरक्षित राहणार - उद्धव ठाकरे

राजीनामे का खिशात घेऊन फिरता बाहेर काढा - राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका

नाशिक मध्ये आम्ही विकास केला पण हे दोन्ही पक्ष भांडतात. अमित शहा म्हणतात, ही फ्रेंडली मॅच आहे, मग फ्रेंडली मॅच मध्ये एकमेकांची आई-बहीण कशी काढतात - राज ठाकरे

मुंबई = पुण्यातील मुख्यमंत्र्यांची आजची सभा पारदर्शी होती, लोक खुर्च्यांवर बसले होते, पण दिसतच नव्हते - उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई = सामनावर बंदी टाकणं इतकं सोपं नाही, सामना म्हणजे अंगार आहे, हात लावाल तर खाक व्हाल - संजय राऊत.

नाशिक = हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देईल आणि त्यांना कर्ज मुक्त देखील करेल. पण उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी मला सांगावे आपण कधी ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांशी कधी संवाद साधलाय का?- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल.

सिंधुदुर्ग = जिल्ह्यात एकही संवेदनशील मतदार संघ नाही- जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची माहिती.

अनसिंग (वाशिम ) = येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित काल्याचे किर्तन करीत असतांना बुलढाणा जिल्हयातील लांजुड येथील दासमधु महाराजांचा मृत्यू शनिवारी झाला .

मरीना बीचवर आंदोलन करणारे द्रमुकचे नेते एमके स्टालिन आणि अन्य आमदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अमर मनी त्रिपाठी यांचा मुलगा अमन मनी विरोधात पत्नीच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले.

लातूर = दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक, 1 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 1582 ठिकाणी 7304 मतदान केंद्र उभारणार.

भाजपाने 'चल हट'ची नवीन जाहिरात घेतली मागे, नकारात्मक प्रतिसाद आल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जाहिरात मागे.

जय भवानी मित्र मंडळ शिवजन्मोत्सव निमित्य भव्य रक्तदान,रँली,शोभायात्रा व व्याख्यान


सोनपेठ /
जय भवानी मित्र मंडळ शिवजन्मोत्सव निमित्य पाचवे पुष्प भव्य रक्तदान आज
दि.२० सोमवार रोजी श्री नंदिकेश्वर मठ संस्थान येथे कार्येक्रामाचे
अध्यक्ष प्रा.डॉ.मारोती कच्छवे,प्रमुख पाहुणे श्री गुरु १०८ ष.ब्र
नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज,शिवाजी कदम,मोहन खोडवे,नागनाथ
सातभाई,अशोकराव मस्के,बाळासाहेब इंगोले,राधाकिशन हिक्के पाटील,डॉ.दीपक
वडकर,डॉ.पारसेवार आदींची उपस्थिती राहणार असून दि.२१ मंगळवार रोजी सकाळी
ठीक ९ वाजता भव्य-दिव्य मोटारसायकल रँली आहिल्याबाई होळकर चौकातून
संपूर्ण शहर भर सहभाग जय भवानी मित्र मंडळ,राजे संभाजी मित्र
मंडळ,सोमेश्वर मित्र मंडळ,महारुद्र प्रतिष्ठान,इखरा मित्र मंडळ,अल-कुरेश
मित्र मंडळ,जय हो मित्र मंडळ,संभाजीनगर मित्र मंडळ,लहुजीनगर मित्र
मंडळ,रुद्र प्रतिष्ठान,भीमगड मित्र मंडळ,गोपीनाथराव मुंडे मित्र
मंडळ,अष्ठविनायक मित्र मंडळ,रंगभवाणी मित्र मंडळ,एकता मित्र मंडळ,युवा
मित्र मंडळ तसेच शिवशक्ती मित्र मंडळासह शहरातील सर्व पक्षीय,सर्व
जाती,सर्व सामाजिक संघटना आदींनी सहभाग नोंदवावा तसेच दुपारी ४ वाजता
राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज भव्य मूर्ती ची ढोल-ताशाच्या गजरात शोभा
यात्रा व समारोप शिव व्याख्यानाने होणार आहे,यावेळी सर्व डॉक्टर,सर्व
वकील,सर्व पत्रकार बांधवांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सर्व
पंचक्रोशीतील नागरिकांनी सर्व कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे अवाहन जय
भवानी मित्र मंडळाने केले आहे.
8 ५२६,बूथ क्र.२८
जी.प.प्रा.शाळा बोंदर गाव,खोली क्र.१ एकून मतदान ८२४ झालेले मतदान
६०९,असे एकून सर्व मतदान ५१,६६५ पैकी झालेले एकून  सर्व मतदान ३६,१२२ असे
टक्केवारीत ६९:९१ % आहे अशी माहिती निवडणूक विभाग तहसील कार्यालय सोनपेठ
येथेच अधिकृत माहिती उपलब्द एखाद्या ठिकाणी चूक-भूल हि नजर चुकीने आहे
म्हणून सर्व माहितीसाठी निवडणूक विभाग तहसील कार्यालय सोनपेठ याच्याशी
संपर्क साधावा खास आपल्या वाचाकांसाठी प्रस्तुत प्रतिनिधीने हि दिलेली
सोनपेठ जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदानाची बुथवार आकडेवारी
होय.सर्वस्वी निकाल आता  दि.२३ फेब्रुवारी २०१७ गुरुवार रोजी लागणार
आहे.तोपर्यंत मतदार राजा साठी सखोल माहिती दिली आहे.