तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 25 February 2017

सैन्यभरतीचा पेपर फुटला, ठाणे क्राईम ब्रांचने केली 18 आरोपींसह 350 विद्यार्थ्यांना अटक.

-------------------------------------------------

देशभरातील विविध केंद्रांवर आज होत असलेल्या सैन्यभरतीचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने 18 आरोपींसह 350 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. राज्याच्या नागपूर,पुणे,नाशिक आणि गोवा येथे परिक्षा केंद्रांवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा क्राईम ब्रांचने कारवाईला सुरुवात केली असून सकाळपर्यंत छापेमारी सुरु होती.आज सकाळी 9 वाजता सैन्य भरतीची लेखी परीक्षा होत आहे. मात्र, आदल्या दिवशी रात्रीच हॉटेल आणि लॉज मध्ये विद्यार्थ्यांना गोळा करुन आरोपी त्यांच्या कडून परीक्षेचा पेपर  लिहून घेत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

पिण्याच्या पाण्यातून विषबाधा, 40 जणांची प्रकृती अस्वस्थ.

-------------------------------------------------

पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याने 40 जणांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे, तर इतर 20 जणांवर उपचार करून घरी पाठवण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या केंद्रेवाडी येथील ही घटना आहे.हौदातून गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. या गावात पाण्याची सरकारी टाकीनाही. हौदातून गावाला पुरवण्यात आलेल्या पाण्याने अचानक अनेकांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरु झाला.तर काही जण चक्कर येऊन कोसळले.या प्रकारानंतर 40 जणांना तातडीने अहमदपूर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं.या हौदात कुणीतरी सूडबुद्धीने थायमेट हे विषारी औषध मिसळले असल्याचा गावकऱ्यांचा अंदाज आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकाला नंतर सूडबुद्धीने हे कृत्य केल्याचा पोलिसांनाही संशय आहे.

पुर्णेत अल्पभुधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून केली आत्महत्या


-चौधरी दिनेश
पुर्णा/तालुक्यात आठवड्यातील शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना घडली असून सततची नापिकी व डोक्यावर साचलेला कर्जाचा डोंगर व नवीन कर्जासाठी बँकेतून होणारी अडवणूक यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत असून तालुक्यातील आवई येथील कर्जबाजारी शेतकरी शिवाजी पवार यांनी दि.19 फेब्रुवारी रोजी सततची नापिकी व कर्जबाजारी पणालि कंटाळून स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती सदरील घटनेला आठही दिवस होत नाही तोच पुर्णेतील अल्पभुधारक शेतकरी गंगाधर मोतीराम कदम या शहरातील गवळी गल्ली परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्याने स्वतःच्या मालकीच्या सर्वे नं.113/4 या शेतामध्ये दि.22 फेब्रुवारी रोजी जाळून घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून मयत शेतकरी गंगाधर कदम हे घटनेच्या दिवशी सकाळी 07-00 वाजता राहत्या घरुन बाहेर जाऊन येतो म्हणून गेले होते बराच शोध घेतल्यानंतर ही ते मिळाले नाही परंतु शनिवार दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 09-00 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गणेश हा शेतात गेला असता त्यास गंगाधर कदम यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला मुलगा याने तात्काळ पुर्णा पोलीस प्रशासनास लेखी स्वरुपात अर्ज देऊन आपल्या वडिलांनी मागील तिन ते चार वर्षापासून होत असलेल्या नापिकीस कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे तालुक्यात सततची नापिकी व राष्ट्रीयकृत बँकांतून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे आठवड्यात कर्जबाजारी व नापिकी मुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी उपविभागीय पो.अ.ए.जी.खान यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.एस.आर.कोल्हे हे करीत आहेत
तालुक्यातील मौ.आवई येथील कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेले शेतकरी शिवाजी पवार व पुर्णेतील आत्महत्या केलेले अल्पभुधारक शेतकरी गंगाधर कदम यांचे कुटुंब उघड्यावर आले असून जिल्ह्यातील प्रसासनासह लोकप्रतिनिधींनीही दुर्दैवी कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे

वंशाच्या दिव्यांना संस्कारक्षम बनवा अन्यथा केव्हा त्यांचा टेंभा होईल कळणार नाही-बाल वक्ते शिवतेज शेंडगे

कार्तिक पाटील
शरीराची उंची वाढवण्या पेक्षा बुध्दीची उंची वाढली पाहीजे त्याच बरोबर मुलांना संस्कारक्षम बनवा अन्यथा वंशाचे दिवे म्हणवनारे आपले पाल्य केव्हा टेंभे होतील हे कळणार नसल्याचे उपदेश डोस अवघ्या ११ वर्ष वयाचे बाल वक्ते शिवतेज शेंडगे यांनी बाभळगांव येथील शिवजन्मोत्सवात बोलतांना उपस्थीत बाभळगावकर श्रोत्यांना दिले.
या वेळी या कार्यक्रमाला नव निर्वाचीत जि प सदस्य सोगे,  पाथरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन आशोकराव गिराम ,कृउबासचे माजी उपसभापती संजय रणेर, सरपंच कांबळे, उपसरपंच लव्हाळे, ग्रामविकास अधिकारी संदिपान घुंबरे, तुकाराम पौळ, प्रा मधूकर ठोंबरे अतुल शेंडगे, किरण घुंबरे, डोंगरे, विठ्ठलराव गिराम आदींची या वेळी उपस्थिती होती. पुढे बोलतांना बाल वक्ते शिवतेज शेंडगे म्हणाले की, आजचे शिक्षण म्हणजे निव्वळ बनाव आहे मराठीचे शिक्षक सांगतात ज्ञानेश्वरांनी चालवली तर विज्ञानाचे शिक्षक़ सांगतात निर्जिव वस्तू हालचाल करत नसते.मग आम्ही काय खरं समजायचं आजच्या पालकांना आमचा पाल्य शिवाजी व्हावा असे वाटते मात्र तेच पालक हे करू नको ते करू नको असा सुरक्षेचा सल्ला ही देतात अशाने पाल्य कसा शिवाजी होईल असा प्रश्न ही त्यांनी या वेळी उपस्थित केला. त्या साठी आजच्या बालकांनी शिवचरीत्र वाचले पाहीजे आणि त्याचे आचरण करण्याचा सल्लाही दिला.शेतक-यांना आत्मबळ देतांना ते म्हणाले की त्या काळात शिवाजी महाराजांना किती संकटे आली त्यांनी प्रत्येक संकटाला हिंमतीने आणि डोक्याने सामना करत तोंड दिले आणि स्वराज्य निर्माण केले आपण मात्र थोडे संकट आले की आत्महात्या करतो छत्रपतींचा आदर्श समोर ठेवा आणि हिंमतीने जगा असे म्हणत कवी भालेराव यांची लढायला शीक ही कवीता सादर करून दाखवली. या बरोबरच या राज्यात छत्रपतींचा खरा इतीहास समोर आणणा-यांना ठार मारले जाते आणि  आणि छत्रपतींचा अपमान करणा-यांना पुरस्कार दिला जातो अशी खंत ही व्यक्त केली. या सोबतच महा मानवांना जाती जातीत न वाटता त्यांचा आदर्श सर्वांनी डोळ्या समोर ठेऊन माणूस ही जात आणि माणवता धर्म माणला पाहीजे असे ही प्रतिपादन केले. या वेळी रक्तदान करणा-या गावातील ५३ युवकांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्य क्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव गिराम यांनी केले या वेळी जि प सदस्य सोगे ,गावातील बालगोपाल ,निकिता गिराम यांनी शिवचरीत्रावर मनोगते व्यक्त केली कार्यकेरमाचे सुत्र संचलन डोंगरे यांनी केले तर आभार विठ्ठल गिराम यांनी मानले कार्यक्रमा साठी गावातील महीला मुले,आणि पुरूष मंडळी हजारोंच्या संखेने उपस्थित होते.

राज्यात नीट साठी फक्त सहाच परीक्षा केंद्र..!


-------------------------------------------------

नीटसाठी 21 जानेवारी पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. 1 मार्च शेवटची तारीख आहे. परंतु परीक्षा केंद्राच्या घोळामुळं अजूनही काही परिक्षार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नाहीत.
महाराष्ट्रातून यावर्षी 2 लाख 74 हजार विद्यार्थी नीटची परिक्षा देणार आहेत. एवढ्या विद्यार्थ्यासाठी नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी सहाच केंद्र मंजूर आहेत. परिक्षा 7 मे रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत होईल. म्हणजे या केंद्रावर आदल्या दिवशी मुक्कामी जावेच लागेल. लॉज वाल्यांची चांदी. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही ते विद्यार्थी रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर झोपलेली दिसू शकतात. आधीच नीटचं टेंशन त्यात परीक्षा केंद्र गाठण्याचा अतिरिक्त बोनस आहे.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
-------------------------------------------------

मुंबई = ठाणे महापालिका जनतेला दंडवत करण्यासाठी आभार मानावयास स्वत: ठाण्यात लवकर जाणार - उद्धव ठाकरे

‘युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करेन’, मुख्यमंत्र्यांचं आठवलेंना आश्वासन.

शिवसेनेला पाठिंबा दिल्यास लोक माफ करणार नाहीत, काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचा तीव्र विरोध.

कोल्हापूर : खोत-शेट्टीं मध्ये फूट पाडण्याचं भाजपचं षडयंत्र, मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपचा डाव: सतेज पाटील

अमरनाथ यात्रेसाठी 1 मार्चपासून नोंदणीला सुरुवात.

गुजरात = पोलिसांनी चार शार्प शूटरला केली अटक, एक पिस्तूल, सहा काडतुसं, दोन चाकू आणि मोबाईल फोन केले जप्त.

साई संस्थानच्या कर्मचा-यांना 40 टक्के वेतनवाढ, कुशल, अकुशल कंत्राटी कर्मचा-यांची वेतनवाढ, साई संस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय.

मुंबई = मतदार यादींमधील घोळाविरोधात शिवसेना न्यायालयात दाद मागणार.

सोलापूर महानगरपालिका महापौरांची निवड 6 मार्चला, विभागीय आयुक्तांकडे गेला प्रस्ताव - आयुक्तांची माहिती.

औरंगाबाद मध्ये विद्यापीठाच्या गेटबाहेर एसएफआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, अभाविप, विनोद तावडेंचा पुतळा जाळून निषेध.

नवी दिल्ली = वॉशिंग मशिन मध्ये पडल्याने दोन जुळ्या भावांचा मृत्यू, रोहिनी अवंतिका परिसरातील घटना.

यवतमाळमध्ये 24 तासांत तीन हत्या,हत्येमागे कोणतंही राजकीय कारण नाही - डीएसपी राज कुमार.

धुळे = दोंडाईचा नगर पालिकेचा 1 अब्ज 87 कोटी 64 लाखांचा अर्थसंकल्प सादर.

आम्ही काँग्रेसला कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही - संजय राऊत.

भाजपा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही, ज्याला त्यांच्यासोबत जायचं आहे ते जाऊ शकतात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

शिवसेना भवनातील बैठक संपली, मुंबईला शिवसेनेचाच महापौर मिळणार - संजय राऊत.

मोदींनी प्रामाणिकतेचं राजकारण सुरु केलं, देशभरातून त्यांना साथ मिळत आहे - देवेंद्र फडणवीस.

सेनेनं पाठिंब्यासाठी विचारलं, मात्र आमचा नकार, छोटे पक्ष मिळून उमेदवार देण्यचा विचार - संजय निरुपम.

मुंबई पालिकेसाठी शिवसेना भाजपानं एकत्र यावं - रामदास आठवले.

मालदा टाऊन रेल्वे स्थानकावर आरपीएफने 35 बॅगेतून 1500 कासवं केली जप्त, तिघांना अटक.

गेल्या दोन वर्षातील आमची सर्वात खराब फलंदाजी, पराभवा नंतर कर्णधार विराट कोहलीचं वक्तव्य.

काँग्रेसला स्वार्थासाठी सरकार पाडायचं आहे - नितीन गडकरी.

पुणे = ऑस्ट्रेलिया संघाकडून भारताचं वस्त्रहरण, फक्त 107 धावांवर केलं ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाचा 333 धावांनी विजय.

नागपूर = काँग्रेसला राज्यात राजकीय अस्थिरता आणायची आहे. म्हणून मुंबईत शिवसेनेला पाठिंबा द्यायची काही नेते भाषा करत आहेत. शिवसेना-भाजपने एकत्र येणे फायद्याचे : नितीन गडकरी

दागिन्यापेक्षा शौचालयाला महत्व द्या -मुख्याधिकारी गणेश शेटे


वाशिम-विनोद तायडे- शहरातील भोईपुरा परिसरात नगरपरिषद कार्यालय व छत्रपती बहूउद्देशिय तरुणमित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 23फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती वत्यानिमित्ताने नागरीकांना शौचालय वस्वच्छतेविषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यातआला.
    या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी न.प.चेमुख्याधिकारी गणेश शेटे हे होते तर प्रमुखउपस्थितीमध्ये मित्रमंडळाचे अध्यक्ष दिलीपमेसरे, न.प. अभियंता डाखोरे, जितु बढेल,कलोसे आदींची उपस्थिती होती. प्रारंभीउपस्थितांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेची पुजाव पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहीली.तदनंतर आपल्या अध्यक्षीय भाषणातमुख्याधिकारी गणेश शेटे यांनी वैयक्तीकशौचालय व स्वच्छतेचे महत्व प्रतिपादीत केले. तेम्हणाले की, नागरीकांनी उघड्यावर शौचास बसुनये. घर तिथे शौचालय असणे आवश्यक असूनमहिलांनी दागिन्यांपेक्षा शौचालयाला महत्व देवूनआपल्या घराच्या परिसरात शौचालय बांधण्याचाआग्रह धरावा. तसेच शौचालयाविषयीशासनाच्या अनुदान योजनेचा लाभ तसेचप्रोत्साहनपर बक्षीस योजनेचा लाभ घेवूनलवकरात लवकर शौचालय बांधुन आपले घर,आपला परिसर व आपले गाव स्वच्छ ठेवण्यासनगर परिषदेला सहकार्य करावे. यासोबत त्यांनीन.प. च्या वतीने सुरु केलेल्या विविध योजनांचीमाहिती दिली. छत्रपती मित्रमंडळाचे अध्यक्षदिलीप मेसरे यांनी आपल्या भाषणातूनमित्रमंडळाने शहरात केलेल्या विविध सामाजीकउपक्रमाची माहिती दिली. छत्रपती बहूउद्देशियतरुण मित्रमंडळाच्या वतीने आपातकालीनपथक तैनात करण्यात आले असून जिल्हाप्रशासन, नगर परिषद व समाजसेवीनागरीकांच्या समन्वयातून विविध संकटकालीनपरिस्थितीमध्ये पथकातील सदस्य हे मोलाचीकामगिरी बजावत असल्याचे नमूद केले. तसेचन.प. च्या शौचालय योजनेतही मित्रमंडळाचाहातभार असून शौचालय बांधण्याविषयी जनतेतभरीव अशी जनजागृती करण्याकरीता आम्हीकटीबध्द असल्याचे ते म्हणाले. श्रीमतीबदामकर आजी यांनी शौचालयाचे महत्व जाणूनघेवून आपल्या घरामध्ये सर्वात आधी शौचालयबांधुन पुर्ण केले. त्याबद्दल त्यांचा मुख्याधिकारीशेटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कारकरण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन किशोरवाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप मेसरेयांनी केले. कार्यक्रमाला पंकज जगले, प्रशांतघुगे, महेश नेतनसकर, यशवंत महाजन, अक्षयविभूते, संतोष भाग्यवंत, सुरज इंगळे, महादेवचहारे, गणेश इंगळे, बबलु ढोेले, नितेश इंगोले,अनिल सहातोंडे, फकीरा सुरदुसे, उर्मिलासहातोंडे, अलका तुर्के, संगीता सहातोंडे,रुपाबाई घटमाळ, वर्षा सहातोंडे, वंदना बाभणे,जयश्री सहातोंडे, रेखा घटमाळ यांच्यासहपरिसरातील जेष्ठ नागरीक, महिला भगिनी,युवक, युवती आदींची बहूसंख्येने उपस्थितीहोती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजुसहातोंडे, विश्‍वंभरआप्पा महाजन, सुखदेवराजगुरु, दिलीप सहातोंडे, रामा राजगुरु, विजयधोंगडे, यांच्यासह छत्रपती तरुण मित्रमंडळाच्यासदस्यांनी अथक परिश्रम घेतले

महापौराची निवड कशी केली जाते...?


-------------------------------------------------
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यंदाच्या निवडणुकीत जनतेने कोणत्याच एका पक्षाच्या पारड्यात बहुमताचे दान दिले नाही. या महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ८४ + ४ अपक्षांची साथ =८८ आहे तर भाजपचे संख्याबळ ८२ आहे. कोणत्याही पक्षाला बहुमताचा ११४ हा जादुई आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी इतरांची मदत घेणे गरजेचे आहे.मात्र हा जादुई आकडा महापौर पदाच्या निवडीसाठी गरजेचा नाहीये. महापौरपदाची निवडणूक ९ मार्चला होणार आहे. या निवडणुकीत मुंबईच्या महापौराची निवड केली जाणार आहे. मात्र या निवडीसाठी बहुमताचा आकडा हवाच असं नाहीये. महापौराची निवड ही ११४ या आकड्यावर अवलंबून नसते. तर निवडणुकीच्या दिवशी सभागृहातील उपस्थित नगरसेवक ज्याला बहुमताने निवडून देतात त्याची महापौरपदी निवड होते. म्हणजेच निवडणुकीच्या दिवशी सभागृहात उपस्थित असलेल्यां पैकी सर्वाधिक मते ज्या उमेदवाराला त्याची निवड महापौर म्हणून केली जाते.
उदाहरणार्थ -  चार नगरसेवक महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यापैकी एका नगरसेवकाला ४० मते पडली, दुसऱ्या नगरसेवकाला ३०, तिसऱ्या नगरसेवकाला २० तर चौथ्या नगरसेवकाला १० मते पडली तर सर्वाधिक ४० मते पडलेल्या नगरसेवकाची निवड महापौर म्हणून केली जाते.

रिसोड नगरीत श्री ची पालखी सोहळा व महाप्रसाद वितरण

महेंद्र महाजन
रिसोड:-स्थानिक संत अमरदास बाबा संस्थान वतीने महाशिवरात्री भागवत सत्ताह तसेच श्री चा पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन दि 25 रोजी करण्यात आले आहे
     महाशिवरात्री निमित्त संस्थान विविध धर्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे होते यामध्ये दि 18 ते 25 कालावधीत शिवपुराण कथा अखंड हरिनाम सत्ताह व संगीतमय प्रवचन ज्ञानेश्वरी दिदि यांच्या मधुर वाणीतुन झाले आहे हरीनाम सत्ताहाची सांगता तसेच दि 25 रोजी सकाळी श्री ची नगर परिक्रम पालखी सोहळा हरिनामच्या गजरान भाविक भक्तांच्या उत्साहात पार पडला पालखी नगर परिक्रम नंतर संस्थान मध्ये आगमन होताच बालकथा राधास्वरुपादेवी यांच्या वाणीतुन महाआरती नंतर महाप्रसादाचे वितरण प्रकिया सुरु करण्यात आलीआहे

वाशिम जिल्ह्यातील पहाडावरील हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतीक जमालबाबा

वाशिम विनोद तायडे
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या गांगलवाडी पासून 3 किलोमीटर अंतरावर जंगल भागात  पहाडावर जमालबाबा चे जागृत देवस्थान असून येथे हिंदू मुस्लिम भाविक भक्त दर्शना येतात आणि नवस बोलतात.  देवस्थान गँगलवाडी लगत असूनही  त्याला मारसुळ येथील जमाल बाबाचे देवस्थान म्हणून ओळखले जाते . महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे हिंदू मुस्लिम भाविक भक्त दर्शनासाठी एकच गर्दी करतात .याच दिवशी येथे भव्य महाप्रसादाचा वाटप  करण्यात येतो . वाशिम जिल्ह्यातील पहाडावरील जमालबाबा व पहाडाची कपार म्हणून याचा नावलौकीक आहे. दोन दशकांपूर्वी  गांगलवाडी गावापासून 3 किलो मीटर अंतरावर असलेल्या  घनदाट जंगलात  पहाडावर पांढऱ्या धोड्यावर स्वार होत एक योगी पुरुष अवतरले .. हिंस्र पशु  योगीपुरुषाच्या जवळ खेळत असल्याची अख्यायिता आहे  .मोरणा  नदिवर पहाडी भाग असून मोठमोठे पहाड येथे पाहायला मिळतात. याच पहाडाला पडलेल्या एका कपारीत  जमालबाबा शरीराचा आकार लहान करून विश्रांती घेत असत . विश्रांती झाल्यावर बाबा  कपारी बाहेर येऊन  पूर्ववत शरीराचा आकार धारण करून पहाडावर येऊन बसत.असल्याची कथा आहे . जमालबाबानी भक्तांना अनेक चमत्कार दाखविल्याने  येथे हिंदू मुस्लिम भक्त घनदाट जंगलात बाबांच्या दर्शनाला येत असत .हिंस्त्र पशु भक्तांना कसल्याही प्रकारची इजा करत नसत . बाबांनी पहाडाच्या कपारीत समाधी घेण्याची घोषणा करून गावकार्यासमोर दोन दशकांपूर्वी  समाधी घेतली असल्याचे  भाविक सांगतात  मारसुळ येथील राजबा घुग यांनी जमालबाबाची सेवा केली  त्यांची समाधी पहाडावर बांधण्यात आली  70 ते 80 वर्षांपूर्वी  पातूर येथील गाडगीळ कुटुंब बाबाच्या दर्शनाला आले असता  पांडुरंग नावाचा त्यांचा 8 वर्षांचा मुलगा जमालबाबानी समाधी घेतलेल्या  पहाडाच्या कपारीत गेला तेव्हा पासून तो परत आलाच नाही .   पहाडात मोठे भुयार असल्याचे भावीक भक्त  सांगतात.  याच ठिकाणी समाधी स्थळावर लहानसे मंदिर उभारण्यात येऊन पांडुरंग  यांची मूर्ती उभारण्यात आली .हिंदू बांधव बाबाला जंगली बाबा म्हणत तर मुस्लिम बांधव जमालबाबा म्हणत कालांतराने बाबाला जमालबाबा म्हणूनच ओळखले जाऊ लागले . मारसुळ येथील एका भक्ताने नवस कबुल केला त्याची पूर्तता झाली बाबाने त्याच्या स्वप्नात जाऊन पहाडावर सात कळस उभारणाचे सांगितले भक्ताने बाबाचे स्वप्न काही भक्ताना सांगाताच भक्तांनी 70 ते 80 फूट खोल  मोरणा नदीतून रेती  पहाडावर चढविली. तेथे जमालबाबा याची शुभ्र पांढऱ्या घोडयावर स्वार मूर्ती बसविण्यात आली त्याच बाजूला दत्तत्रय,विठ्ठल रुख्मिणी, महादेव,गणपती, हनुमान ,मुंगासीजी महाराज असे 7 मंदिर उभारण्यात आले आठवे श्रीकुष्णा चे मोठे प्रवेश द्वार उभारले जाणार आहे . येथील वातावरण निसर्गरम्य असून येथील भाग वनविभागाच्या ताब्यात असल्याने मूलभूत सुखसुवेधे पासून वंचित आहे .या भागात जिल्ह्या परिषद सदस्यां रत्नप्रभाबाई घुगे यांचा दरारा असूनही  वनविभागामुळे त्यांना काही करता येत नाही आमदार खासदार,मंत्र्यानी  या बाबी कडे लक्ष देऊन येथील विकास करावा अशी बावीकभक्तांनी मागणी केली  महाशिव रात्रीच्या दुसऱ्या दिवशी येथे पंक्रोशीतील भावीकभक्त दर्याखोर्यातून नदीपार करत उंच पहाडावर दर्शनाला येतात पहाडात जमालबाबानी समाधी घेतली त्या ठिकाणी  लहानथोर, वयोवृद्ध. बाल गोपाल चढत दर्शनला येतात . समाधीस्थळावर पूजाअर्चा करतात .यावर्षीही    महाशिव रात्री च्या दुसऱ्या दिवशी दि 25 फेब्रुवारीला जमालबाबा देवस्थानात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारो  हिंदू मूस्लीम भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला

क्लास गायरान अतिक्रमणमुक्त करुन चरण्यास खुली करा

वाशिम - विनोद तायडे
तालुक्यातील मौजे शेलगाव येथील जनावरांच्या चार्‍यासाठी राखीव असलेल्या शासनाच्या ई-क्लास जमिनीचे अतिक्रमणात रुपांतर झाले असून त्यामुळे जनावरांच्या चार्‍यांचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून ही जमीन जनावरांना चरण्यासाठी मोकळी करण्याची मागणी बंडु गणपत गव्हाणे यांच्यासह गावकर्‍यांनी केली आहे. तसे निवेदन गुरुवार, 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.
    या निवेदनात म्हटले आहे की, गावातील काही लोकांनी गायरान ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे गायगुरांना चरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ब्रिटीश काळापासून गावागावात जनावरांना चरण्याकरीता गावातील इतर जमिनीच्या पाच टक्के जमीन राखीव ठेवली आहे. परंतु त्या संपूर्ण गायरान जमिनीचे अतिक्रमणात रुपांतर झाले आहे. त्या गायरान जमिनीतून हे लोक जनावरांना पाणी पिण्यासाठी सुध्दा जावु देत नाहीत. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
    याबाबत पुर्वी जिल्हाधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शेतकरी, गोरगरीबांना आपली दुधाळ जनावरे पाळण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आणि दुसरीकडे सेंद्रीय शेती करा, दुधाळ गाई, म्हशी, शेळीपालन करा असे शासन म्हणत आहे. गायरान जमीन अतिक्रमणमुक्त करण्याबाबत शासन निर्णयाव्दारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी व सचिवांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी जिल्हयातील हजारो हेक्टर गायरान जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. गावाचे गावपण असणारे गोधन त्यामुळे लयास गेले आहे. तरी या गाय-गुरांना वाचविण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी व गायरान जमिनीची मोजणी करुन सदर जमीनी गुरांना चरण्यासाठी मोकळी करण्याची मागणी  गव्हाणे यांच्यासह गावकर्‍यांनी केली आहे. निवेदनावर गव्हाणे यांच्यासह नितीन घुगे, विठ्ठल घुगे, एकनाथ बांगर, समाधान घुगे, पंजाब सोनुने, वैभव घुगे, रोहिदास धनगर, अनिल सोनुने, दुर्गेश बांगर, संगीता धनगर, विजय आघाव, अनिल घुगे, डिगांबर घाटोळकर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.