तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 4 March 2017

डेंग्युने घेतला एका १६ वर्षीय मुलीचा बळी

मोईन खान
परभणी:-या ना त्या कारणावरून जिल्हा सामान्य रुग्णालय नेहमी चर्चेचा विषय बनला आहे. जिल्हयातील सामान्य रुग्णालयात येणाºया रुग्णासाठी सोयी सुविधा पुरविण्यात जिल्हा रुग्णालय असमर्थ ठरत आहे. शहरातील जमजम कॉलनीत राहणाºया कु.राहत या १६ वर्षीय मुलीचा डेंग्युमुळे मृत्यू झाल्याची घटना दि.३ मार्च रोजी घडली.
शहरात जमजम कॉलनीतील शेख मुख्तार यांच्या मुलीला ताप आल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवस परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तब्येतीत सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टरांनी तिला नांदेड येथे रेफर केले नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान तपासणी केली असता तिला डेंग्यू असल्याचे निर्दशनास आले नंतर डॉक्टरांनी उपचार करण्यास सुरुवात केली सदरील मुलगी मृत्यूशी झुंज देत होती अखेर तिची प्राणज्योत मावळली .
परभणी येथील डॉक्टरांना आजार कळू शकला नसल्याने तिला दोन दिवस योग्य उपचार मिळाला नसल्याचा आरोप मुलीचे वडील शेख मुख्तार यांनी केला. तिला योग्यवेळी परभणीतच उपचार मिळाला असता तर ती मेली नसती अशा प्रकारे मुलीच्या वडीलाचे म्हणे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार कमी व इतर ठिकाणी रेफर जास्त करण्यात येत आहे. त्यामुळे येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर केवळ शोभेची वस्तु आहे की काय असा प्रश्न जनसामान्याना पडत आहे. 
येथील शासकीय रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नाहीत जे आहेत ते नावालाच न्युरो सर्जन नाही सिटी स्कॅन मशीन बंद अवस्थेत कित्येक वर्षापासून धुळ खात पडलेली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक जावेद अथर, आरएमओ यांना विचारल्यास लवकरच सुरु होईल अशी प्रतिक्रिया मागील एक वर्षापासून देत आहे. या प्रकरणाकडे आरोग्यमंत्र्यानी गांभीर्याने दखल घेत सबंधीतावर कार्रवाही करण्याची मागणी शेख मुख्तार यांनी केली.

पाडेला शाळेत विज्ञान दिन साजरा

प्रतिनिधी
परभणी:-दि मेमन मर्चन्ट असोसिएशन संचलित हाजी मोहम्मद पाडेला शाळेत राष्टÑीय विज्ञान साजरा करण्यात आला.विज्ञान प्रदर्शनाच उदघाटन दि. मेमन मर्चन्ट असोसिएशनचे सचिव गुलाम मोहम्मद मिठू यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील कार्यक्रम मेमन मर्चंट असो.चे उपाध्यक्ष जान मोहम्मद जानू यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुसा नागानी, इम्तीयाज ममदानी, खमीसा मो. जुनैद, मुख्याध्याप मो. युसूफ, मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल बासीत, मनपा सदस्य मोहम्मद नईमुद्दीन,शकील मोहीयोद्दीन, हारूण गुत्तेदार ादी उपस्थित होते.
यावेळी मईदुल मुस्लीमीन शाळेचे मुख्याध्यापक मो.युसुफ यांनी विद्यार्थ्याना विज्ञानाचे महत्व सांगीतले खमिसा मो. जुनैद यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

जिंतूर ता भोगांव येथे शेतकर्याची आत्महत्या. विहिरीत जीव देऊन संपविली जीवन याञा.

प्रतिनिधी
जिंतूर:-तालुक्यातील भोगाव येथील रहिवासी मारोती चिमाजी पौवकर वय 65 वर्षे रा. भोगाव ता. जिंतूर या वयोवृद्ध  शेतकर्या ने बँकेच्या कर्जा मुळे विहिरीत जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार 4 मार्च रोजी घडली आहे.
सदरील शेतकरी गुरूवार 2 मार्च पासुन घरातुन निघुन गेले होते. त्यांचा मुतदेह शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास शेतातील विहिरीत तरंगताना दिसला.  ते नेहमी बँकेच्या कर्ज फेडण्याच्या विचारात असायचे.  याबाबत मुलाच्या तक्रारी वरून जिंतूर पोलिसांत आस्कमिक मुत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

रेऊलगाव पाटीवर अपघात;अपघातात सदरील व्यक्ती गंभीर जखमी

प्रतिनिधी
वसमत:-या बाबत सविस्तर माहिती अशी की अवघ्या अर्धा तासापुर्वी परभणी कडून वसमत कडे येत असलेली व्यक्ती ही HERO HONDA CD DELUXE  गाडी  क्र Mh -26 M - 8545 ही भरधाव वेगाने येत असताना रोडवर असलेल्या खड्ड्यात आधळून गाडीचे नियंत्रण सुटल्याने गाडी समोर असलेल्या दगडांच्या ढिगा-यावर आधळली हा अपघात एवढा भयानक होता की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.  यावेळी तेथे असलेल्या प्रत्यक्षदर्शी व पाठीमागून येणाया वाहनाचा चालकाने 108 रूग्ण वाहिकेस फोन करून ही माहिती दिली व त्यास तात्काळ वसमत उपिजल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलेपण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे पाठविण्यात आले आहेत.

सदर व्यक्तीला कोणीही व्यक्ती नातेवाईक ओळखत असेलतर नांदेड शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा* कारण सदरील व्यक्तीजवळ कूठलेहीओळखपत्र नव्हते किंवा सदरील गाडी क्रमांक कुणाच्या ओळखीचा असल्यास त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यानी नांदेड येथे शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा कारण सदरील व्यक्ती अती गंभीर आहे

(छाया - नागेश चव्हाण

महाराष्ट्राची ‘पारदर्शक’ फसवणूक, शिवसेनेच्या माफियाराजला ‘पारदर्शक’ संमती! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भाजपवर घणाघाती टीका


मुंबई, दि. 4 मार्च 2017:
भारतीय जनता पक्षाने शिवसेनेविरोधात मुंबईत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती,सुधार समिती अशी कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची ‘पारदर्शक’ फसवणूक आहे. भाजपने मांडवली करून शिवसेनेच्या माफियाराजला ‘पारदर्शक’ संमती दिल्याची घणाघाती टीका  विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
मुंबई मनपासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केल्यानंतर यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, कोणतीही निवडणूक न लढण्याच्या आणि विरोधी पक्षनेतेपद सुद्धा न स्वीकारण्याच्या भूमिकेतून भाजपची शिवसेनेला विरोध करण्याची मानसिकता नाही, हे स्पष्ट होते. निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने मुंबई मनपात शिवसेनेचे माफिया राज असल्याचा जाहीर आरोप केला होता आणि हीच भाजप शिवसेनेशी तह करते आहे. याचाच अर्थ शिवसेनेच्या माफियाराजला भाजपचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेला विरोध करण्याची कोणतीही भूमिका घ्यायला भाजप तयार नाही, याचाच अर्थ भाजपने शिवसेनेपुढे शरणागती पत्करली आहे.
निवडणुकीत जय-पराजय महत्वाचा नसतो. पराभव होणार याची जाणीव असतानाही लोकशाहीत अनेकदा केवळ वैचारिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी निवडणूक लढवायची असते. भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढवली असती आणि त्यांचा पराभव जरी झाला असता तरीही त्यांची अब्रू शिल्लक राहिली असती. शिवसेनेच्या माफियाराजला त्यांचा पाठिंबा नाही, हे दिसून आले असते. परंतु,  केवळ शिवसेनेलाच नव्हे तर आम्हालाही मांडवली करता येते, हे भाजपने महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. 'ये सब सत्ता का चमत्कार लगता है',अशा बोच-या शब्दांमध्ये विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला. निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना एकमेकांची ‘औकात’ काढत होते. पण् आजच्या घटनाक्रमातून या दोन्ही पक्षांची ‘औकात’महाराष्ट्राला दिसून आल्याचे विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
-------------------------------------------------
नंदु नाईक, मुंबई -

पुण्यातील ससून रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

हृतिक रोशन झळकणार  " हृदयांतर " या मराठी चित्रपटात.

मुंबई = भाजपची भूमिका स्वागत, आनंद देणारी आहे, सेनेचा महापौर होणार हे कदाचित त्यांना समजले असेल, मतदान कधीही झाले असते आमचे संख्याबळ कितीआहे हे समजले असते : शिवसेना खासदार संजय राऊत

बारावीच्या पेपर फुटीचं प्रकरण पुन्हा एकदा लातुरातून समोर आले आहे. पेपर सुरु असतानाच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. पुन्हा एकदा एकूण परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्हा निर्माण झाला आहे.

डॉ. कृष्णा किरवले हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, रामदास आठवलेंची मागणी

भाजपचे ‘पहारेकरी’ असले, तरी आमची सिक्युरिटी टाईट असेल : अनिल परब

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघात, मुख्यमंत्र्यांना पारदर्शकते पेक्षा खुर्ची प्यारी - अशोक चव्हाण

साक्षी मलिकला अडीच कोटी रुपये दिले, त्यानंतर तिने नोकरी मागितली तिच्यासाठी पद तयार केले - हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांची साक्षीच्या टि्वटवर माहिती.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत सहाव्या टप्प्यात 57 टक्के तर, मणिपूरमध्ये 84 टक्के मतदान झाले, उत्तरप्रदेशात 49 जागांसाठी तर, मणिपूरमध्ये 38 जागांसाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जळगाव जिल्ह्यातील भिलाटी भागातील चार झोपडया आग लागून खाक झाल्या, यात संसारपयोगी साहित्यास जळून गेले, तर 15 ते 20 बक-या ठार झाल्या.

जम्मू-काश्मीरच्या त्राल मध्ये सुरक्षापथके आणि दहशतवाद्यां मध्ये चकमक सुरु आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकावडा तालुक्यातील कोद्दोरी गावातील पाच घरे व एक गोठा आगीत जळून खाक.

बलात्काराचा आरोप असलेले उत्तरप्रदेशचे मंत्री गायत्री प्रजापती यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले असून, त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शिवाजीपार्क परिसरातील सेल्फी पॉईंटला नाकारली परवानगी.

उल्हासनगर गोलमैदानात प्रेयसीचा गळा चिरून हत्या करणारा प्रियकर गजाआड, प्रेयसीमुळे एड्स झाल्याच्या रागातून केली हत्या,प्रियकर निघाला पाकिस्तानी.

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला, निवडणूक प्रचारा दरम्यान ओबामांनी आपले फोन टॅप केले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

वर्धा = ईव्हीएम व मतदार याद्यांतील घोळ काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत. न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार - चारूलता टोकस, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

यवतमाळ = आर्णीच्या भाजपा आमदाराची पक्षाच्याच सोशल मीडिया प्रमुखाला लाथा बुक्क्यांनी मारहाण.

नाशिक = बचत गटांच्या वस्तू खरेदी विक्रीसाठी लवकरच ई पोर्टल. महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती.

मुंबई = गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात वरळी नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन.

नंदुरबार = लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी महिलांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आंदोलन, वनहक्क कायद्या संदर्भात लेखी आश्वासन देऊन ही मागण्या मान्य होत नसल्याने मूक निषेध आंदोलन.

सिनेदिग्दर्शक महेश भट्ट यांना खंडणीसाठी धमकवणारा आरोपी संदीप साहूला 10 मार्च पर्यंत पोलीस कोठडी.

औरंगाबाद = सिडको मधील हॉटेल्स 10 दिवस बंद करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश, हुल्लडबाजी विरोधात स्थानिकांनी व दुकानदारांनी केली होती तक्रार.

पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून मुंबई मनपात बसणार - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करणार नाही - मुख्यमंत्री

मनपाचे कायदे, कार्यपद्धती पाहण्यासाठी, मनपाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करु, विरोधी पक्ष देणार नाही - देवेंद्र फडणवीस.

स्थायी समिती अध्यक्षपद, सुधार समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक भाजपा लढणार नाही - देवेंद्र फडणवीस.

मुंबईत महापौरपदाची निवडणूक भाजपा लढणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

भाजपा राज्यात नंबर एकचा पक्ष - देवेंद्र फडणवीस.

भाजपा पेक्षा शिवसेनेच्या दोन जागा जास्त मिळाल्या असल्या तरी, दोन्ही पक्षांना समान कौल आहे - देवेंद्र फडणवीस.

मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाला मोठ यश मिळाले, पारदर्शकतेला मुंबईने कौल दिला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

ओला, उबेर टॅक्सीसाठी ‘महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017’ लागू, किमान आणि कमाल भाडं सरकार ठरवणार,अॅप आधारीत टॅक्सी सेवांसाठी स्वतंत्र परवाना देणार.

वाराणासीच्या चौक घाटावर भाजपा आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यां मध्ये हाणामारी, पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद सोडवला.

पहिल्या पाच टप्प्यातच भाजपाने उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकलीय, आतासंपूर्ण बहुमतासाठी फक्त तुम्हाला आम्हाला बोनस द्यायचा आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

जे सर्जिकल स्ट्राईक बद्दल प्रश्न विचारतायत त्यांनी जौनपूर येथे येऊन शहीदांच्या कुटुंबियांना विचारावे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

बंगळुरू कसोटी : भारताचा पहिला डाव.189 धावांवर संपुष्टात. के.एल.राहुलने दिली (90) एकाकी झुंज. नॅथन लॉयनने टिपले 8 बळी. तर अॉस्ट्रेलिया बीन बाद 40 धावा.

भारता विरोधात सर्वाधिक 58 विकेट घेण्याचा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली चा विक्रम नाथान लेयॉनने मोडला.

कल्याण = चोरीच्या घटनांना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ स्थानिकांनी काढला मोर्चा, मनसेच्या नेतृत्त्वात पोलीस उपायुक्त कार्यालयावर काढला मोर्चा, मोर्चामध्ये महिलांचा लक्षनीय सहभाग.

लातूर = डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची टाऊन हॉलवर निदर्शनं.

कोल्हापूर = डॉ. कृष्णा किरवले हत्या प्रकरण, दलित नेते-कार्यकर्त्यांचे सी.पी.आर.मध्ये ठिय्या आंदोलन. आरोपीला अटक केल्या शिवाय किरवलेंचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, पोलीस प्रशासना विरोधात निदर्शने सुरू.

सोलापूर = न्यायाधीश मारहाण प्रकरणी वकिलांनी आज कामापासून अलिप्त राहण्याचा घेतला निर्णय, मारहाण करणा-या आरोपींचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये अशा सूचना, बार असोसिएशनच्या बैठकीतील निर्णय.

मोटार सायकल अपघातात विद्यार्थी ठार एक गम्भीर

प्रतिनिधी
वाशिम:- 12 वी चा पेपर सोडवून घराकडे जात असतांना विद्यार्थी ठार झाल्याची घटना काटा वाशिम मार्गावरील मालपानी यांच्या शेताजवल  आज  साय. 6 च्या सुमारास घडली एक विद्यार्थी गम्भीर असून त्याला अकोला येथे हलविले आहे.
सध्या 12 वी चे पेपर सगळी कडे सुरू झाले आहे काटा येथील विद्यालयात राज्यशास्त्र विषयाचा पेपर दुपारी 3 ते 6 पर्यंत होता. तालुक्यातील वाघजाली येथील वैभव इढोळे व चिखली सुर्वे येथील शंकर सुर्वे हे  विद्यार्थी पेपर देऊन घरी जात असतांना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करून उपचार करण्यात आला. उपचारादरम्याण शंकर सुर्वे याचा म्रुत्यू झाला. तर वैभव इढोळे याची प्रक्रुती गम्भीर असल्याने त्याला अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

  

हिंगोली, दि.4: दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, नगर परिषद, हिंगोली व जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार युवक - युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने रोजगार मेळावा दि. 7 मार्च, 2017 रोजी सकाळी 11-00 वाजता हा कार्यक्रम कल्याण मंडपम्, नगर परिषद कार्यालयाजवळ, हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 

या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी, नगर परिषदेचे अध्यक्ष बाबारावजी बांगर, उपाध्यक्ष तथा गट नेते, नगर परिषद, दिलीपराव चव्हाण, गटनेते नगर परिषद, शेख निहाल, श्रीराम बांगर, प्रमुख अतिथी म्हणून एम.आय.डी.सीचे उपअभियंता प्रताप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे श्रीमती रेणुका तम्मलवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी रामदास पाटील आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या रोजगार मेळाव्यास हिंगोली शहरातील युवक व युवतींनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे म्हणजेच बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, ओळखपत्र इत्यादी माहिती सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

संस्कृतीच्या रक्षणाकरीता लोकसंख्या वाढविणे गरजेचे उपाध्याय निर्भयसागरजी महाराज

विनोद तायडे
वाशिम:-आज जैन समाज भौतीक सुखसुविधेत लिप्त झालेला आहे. सुखसुविधेच्या गर्तेत चेतनाचा विकास झालेला नाही. जोपर्यत व्यापार, पैसा, घर, दुकानाचा विकास होईल, लोकसंख्येचा विकास होणार नाही तोपर्यत आपली संस्कृती सुरक्षीत राहू शकत नाही. मंदिर, धर्मशाळेविना धर्मसंस्कृती सुरक्षीत राहील. मात्र धार्मिक व्यक्ती नसेल तर जैनत्वाची प्राचीन संस्कृती जीवंत राहणार नाही. जैन समाजाने आपली लोकसंख्या वाढवावी व हम दो हमारा एक याच्यापेक्षा हम दोन हमारे चार हे तत्व अंगीकारावे असे आवाहन वैज्ञानिक संत, प्रखर वक्ते उपाध्याय श्री निर्भयसागरजी महाराज यांनी केले.
    स्थानिक न.प. जवळील महावीर भवन येथे आयोजीत प्रवचनात त्यांनी वरील मार्गदर्शन केले. आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य मुनीश्री उपाध्याय निर्भयसागरजी महाराज यांच्यासमवेत मुनीश्री शिवदत्त सागर महाराज, एलक सुदत्तसागर महाराज, क्ष्ाुल्लक तत्वसागर महाराज, क्ष्ाुल्लक चंद्रदत्तसागर महाराज यांचे आज वाशीम येथे आगमन झाले. मुनीसंघाचे सकल जैन समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. मुनीसंघ मांगीतुंगी येथे जाणार आहेत. तीन दिवस वाशीम शहरात त्यांच्या प्रवचनाचा लाभ भक्तांना मिळणार असून आज झालेल्या प्रवचनात मुनीश्री निर्भयसागरजी महाराज यांनी सांगीतले की, चार मुलांची परंपरा सुरु करु. एक देशासाठी देशभुषण, दुसरा समाजासाठी समाजभुषण, तिसरा परिवार परंपरेसाठी कुलभुषण व चौथा धर्मासाठी धर्मभुषण राहील. मात्र आम्ही फक्त हम दो हमारा एक ही संस्कृती आत्मसात केल्याने तो केवळ प्रदुषण निर्माण करणार आहे. सर्वांनी आपल्या शक्तीला ओळखून सामाजीक एकता, पारिवारीक एकता बनवून धर्म, समाजाची सुरक्षा व संस्कृती यांना योगदान देणे जरुरी आहे. आज साठ वर्षावरील सर्व महिला, पुरुष शनिदेवता आहे. आम्ही शनीला तेल अर्पण करतो, पुजा करतो. मात्र आईवडीलांची सेवा, सन्मान करीत नाही. जर आपण आपल्या घरातील वयोवृध्द आजोबा, आजी, आईवडील यांची सेवा केली तर तुम्हाला शनीची साडेसाती कधीच लागु शकत नाही. तो कधीही त्रास देणार नाही. यावेळी मंगलाचरण, भजन झाले. प्रवचनाला सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्वामी विवेकानंद संस्थेला राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर

विनोद तायडे
वाशिम:-शिरपूर जैन येथील गत सात वर्षापासून सामाजीक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वामी विवेकानंद बहूउद्देशिय संस्थेला नुकताच राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारा 2015-16 चा राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. अमरावती विभागातुन वाशीम जिल्हयातील ह्या एकाच संस्थेला हा बहूमान मिळाला असल्यामुळे या पुरस्कारामुळे सामाजीक क्षेत्रात जिल्हयाचा नावलौकीक झाला आहे.
    राज्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वाना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात येतात. गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पुरस्कार एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वामी विवेकानंद बहूउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष अमोल देशपांडे आणि पदाधिकारी संस्थेच्या माध्यमातुन गेल्या सात वर्षापासून सामाजीक, पर्यावरण क्षेत्रात भरीव असे कार्य करत आहे. संस्थेने केलेल्या सामाजीक कार्याची दखल घेवून हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे संस्थेवर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया देतांना संस्थेचे अध्यक्ष अमोल देशपांडे म्हणाले की, या पुरस्कारामागे संस्थेच्या पदाधिकार्‍यांची अविश्रांत मेहनत असुन आईवडील, गुरुजन, हितचिंतक, संस्था सदस्य, मित्रमंडळी तसेच जिल्हयातील युवा मंडळाचे कार्यकत्यार्र्ंचे मोलाचे सहकार्य मिळाले.

 महाविद्यालयांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचे वेळेत सादर करावेत  -- प्रकल्प अधिकारी विशाल राठोड

प्रतिनिधी

हिंगोली, दि. 4 : हिंगोली व परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे सन 2016-17 चे भारत सरकार शिष्यवृत्ती किंवा फ्रिशीपचे अर्ज दि. 10 मार्च, 2017 पर्यंत भरून घ्यावेत.

महाविद्यालयांनी ई-ट्रायबल संकेतस्थळावर ऑनलाईन फिस विवरण भरून प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली येथे दि. 10 मार्च, 2017 पर्यंत सादर करून मंजुर करून घ्यावेत.

भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे सर्व परिपुर्ण प्रस्ताव छाननी करून दि. 15 मार्च, 2017 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली येथे सादर करावे. दि. 15 मार्च, 2017 नंतर भारत सरकार शिष्यवृत्ती व फ्रिशीपचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. तसेच विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास सर्व जबाबदारी महाविद्यालयाची राहील.

वरील कार्यवाही बाबत सर्व महाविद्यालयांनी सहकार्य करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.