तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 11 March 2017

कापड गोदामाला आग लागल्या प्रकरणी आमदार अमित झनक यांची भेट


विनोद तायडे
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे कापड टिनपत्राच्या गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे तयार कपडे आगीत जळून खाक झाल्याची घटना दि 8 मार्च ला सकाळी 7 वाजता सुमारास  घडली. त्यामध्ये   फूटपाथवर बसून तयार कापडची विक्री करणार्याचे   17 विक्रेत्यांचे 30 लाख   रुपयांचे नुकसान झाले आहे.   याबातची माहिती युवा आमदार अमीत झनक यांना मिळताच त्यानी दि 11 मार्च ला  घटना स्थळाला भेट दिली  शासनाच्या वतीने मदत मिळवून देणारा असल्याचे  विक्रेत्यांना आश्वासन दिले घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून गरिबांचे संसार उघड्यावर आले असल्याने  त्यांनी खंत व्यक्त केली यावेळी त्यांच्या सोबत भागवत गवळी,अरुण मगर,जितेंद्र बेलोकार,तयब खान आदी कार्यकर्ते होते

जागतिक महिला दिना निमित्त डिश डेकोरेशन स्पर्धा

महेंद्र महाजन

रिसोड कुसुम सोशल मल्टीपरपज फाऊंडेशन व प्रल्हाद महराज महिला भंजनी मंडळ यांच्या संयुक्त विघमाने जागतिक महिला दिना निमित्त डिश डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली महिलांनी चुल व मुल या मध्ये गुंतुन न राहता त्याचे जिवनात आनंदचे काही क्षण यावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कुसुम फाऊंडेशन ने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले महिलांनी बटाटा या फळभाजी पासून पदार्थ बनविले व थाळी मध्ये ठेवून डेकोरेशन करुन स्पर्धत आणले त्या स्पर्धकामधुन प्रथम क्रमांक सौ देव द्वितीय क्रमांक देशपांडे तुतिय क्रमांक  नरवाडे यांना मिळाला त्यांना बक्षीस व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले सहभागी महिला स्पर्धकांना सन्मान पत्र देण्यात आले या स्पर्धेचे परिक्षण प्रा सौ आडमने व प्रा सौ ठाकरे यांनी केले स्पर्धा यशवि करण्याकरिता महिला भंजनी मंडळचे  सभासदांनी सहकार्य केले

सोनपेठ येथे शिवसेनेचे रस्ता रोको अंदोलन


राधेश्याम वर्मा
सोनपेठः (  प्रतिनिधी .)  शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनेे सोनपेठ येथे रस्ता रोको  अंदोलन करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले शेतकरी गेली तीन वर्षापासून दुस्काळाचा सामना करत असुन,आज तो संपुर्ण कर्जबाजारी झाला आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत  या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचे संपुर्ण कर्ज माफ करावे.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे तालुका प्रमुख रंगनाथ रोडे, तालुका संघटक गणेश पांडुळे युवासेना तालुका प्रमुख रामेश्वर मोकाशे, कुमार चव्हाण भगवान पायघन रावसाहेव पांडुळे थोंडिराम राठोड, अविनाश जाधव,जनार्धन झिरपे मधुकर चतुर, अमरदिप नागुरे, श्रीराम मुंडे, संतोष गवळी सरपंच माणिक तेलभरे, पांडुरंग ढाकणे, कारभारी लोकरे ,विश्वनाथ दराडे, कारभारी चांभारे, महादु भोसले, रामेश्वर सोलापूरकर, ज्ञानेश्वर कदम,भागवत पोपडे, शिवाजी पायघन, भास्कर भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.फड यांचे वतिने उमेदवारांचा सत्कार


परभणी:-नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडनुकिमध्ये  शिवसेनेकडून निवडनुक लढविलोल्या सर्वच उमेदवारांचा शनिवार दि.11 रोजी आ.मोहण फड यांचे वतिने त्यांचे निवासस्थानी सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर खा.संजय जाधव,आ.राहुल पाटील,आ.मोहण फड,जिल्हा प्रमुख संजय कच्छवे,सह संपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर,रतन घाडगे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडनुका नुकत्याच गेल्य महिण्यात पार पडल्या या निवडनिकांमध्ये शिवसेनेकडून निवडनुक लढविलेल्या,विजयी व पराजीत सर्वच उमेदवारांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.या सत्कार प्रसंगी बोलतांना खा.संजय जाधव यांनी सांगीतले की,ही निवडनुक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होऊन यामध्ये धनशक्तीचा विजय झालेला आहे.शिवसेनेचे सर्वच उमेदवार हे सामान्य होते.त्यामुळे या निवडनुकिमध्ये पराभव झालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी खचुन न जाता पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावे.तसेच आ.मोहण फड यांनी आपल्या प्रस्तावीक भाषनातून बोलतांना विजयी व पराजीत सर्वच उमेदवारांचे अभिनंदन करुन, हार जित होतच अस्ते.परंतू पराजयावर मात करुन पुव्हा नव्या जोमाने कामाला लागा,भविष्यातील विजय आपलाच आहे असे सांगीतले.यावेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन उद्धव रामपुरीकर यांनी केले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील आनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.

शिवसेनेच्या उकळीपेन उपतालुका प्रमुखपदी गजानन जैताडे


विनोद तायडे
वाशीम - शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच वाशीम जिल्हा संपर्कप्रमुख विश्‍वनाथ नेरुळकर, खासदार भावनाताई गवळी, जिल्हा प्रमुख राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख रामदास मते पाटील यांनी वाशीम तालुक्यातील उकळीपेन सर्कलमधील पदाधिकार्‍यांची निवड केली. त्यामध्ये उकळीपेन उपतालुका प्रमुख पदी शिवसेनेचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते गजानन तुकाराम जैताडे पाटील यांची निवड करुन त्यांच्यावर पदाचा कार्यभार सोपविला. खासदारांच्या जनशिक्षण संस्थान या जनसंपर्क कार्यालयावर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, निलेश पंेंढारकर यांच्या हस्ते गजानन जैताडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी विठ्ठलराव चौधरी, निरंजन पाटील गावंडे प्रल्हादराव गावंडे, विनोद महल्ले, अनिल चव्हाण, दत्तराव भुसारे, भागवतराव हजबे, दत्तराव मोरे, वैजनाथ आखाडे, विश्‍वनाथ मुठाळ, उत्तम गोटे, कैलासराव चिपडे, नितीन जैताडे, रुपेश जैताडे, विलासराव जैताडे, कैलास महल्ले, गणेश जैताडे, महादेव खोडके, केशव खोडके, गजानन भोयर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हयातील तालुका कार्यक्षेत्रात वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पक्षशिस्तीचे पालन करुन जनतेच्या हितासाठी नियमित उत्कृष्ट कार्य करावे असे नियुक्तीपत्रात वरिष्ठांनी नमूद केले आहे.
--------------------------------------------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने किरवले यांना श्रध्दांजली


विनोद तायडे
वाशीम -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने कोल्हापुर येथील आंबेडकरी विचारवंत व लेखक डॉ. कृष्णा किरवले यांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम शहरात घेण्यात आला. शनिवार, 11 मार्च रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजीत या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ. अलका मकासरे ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये बुलडाणा येथील अशोक गवई, कवी शेषराव धांडे, महेंद्र ताजणे, सुनिल कांबळे, दिपक ढोले, नालंदा चक्रनारायण, प्रविण पट्टेबहादूर, राजकुमार पडघाण, बबन खिल्लारे, संतोष वानखडे, ऍड. पी.पी. अंभोरे, धम्मपाल पाईकराव, सहदेव चंद्रशेखर, प्रकाश पडघाण, वंदना भगत, महेंद्र खंडारे, संतोष इंगळे, मोतीराम पट्टेबहादूर यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. कृष्णा किरवले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दोन मिनीटे मौन पाळून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन डॉ. कृष्णा किरवले यांचे आंबेडकरी साहित्य लिखाण, चळवळी व त्यांनी केलेल्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली. किरवले हे आपल्यातुन जरी निघून गेले तरी त्यांचे विचार आजही आहेत. त्यांच्या हत्येचा निषेध आम्ही करत असुन त्यांच्या हत्येप्रकरणी दोषी मारेकर्‍यांना पकडून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राजकुमार पडघान तर आभार प्रविण पट्टेबहादूर यांनी मानले.

गंगाखेड "शिवसेनेचा नारा शेतकर्‍यांच्या सात बारा कोरा"

शिवानंद लांडगे,
गंगाखेड:-दि. 11 मार्च रोजी सकाळी ठिक दहा वाजता महाराणा प्रताप चौक परळी नाका गंगाखेड शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बळीराजा च्या डोक्यावरील कर्जाचे ओझे माफ करा आणि सात बारा कोरा केला पाहिजे या मागणीसाठी म्हणून हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब निरस, तालुका अध्यक्ष विष्णु भाऊ मुरकुटे, शामराव भोसले, महेश शाळापूरीकर , नामदेवराव निरस,धोंडीराम जाधव, राजे भाऊ वळवणे, जाणकिराम पवार, बालासाहेब पारवे, माधवराव शेंडगे, महिला संघटक सौ. सखुबाई लटपटे, तसेच सर्कल प्रमुख इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने 7/12 कोरा करावा असे निवेदन नायब तहसीलदार श्री श्रीरंग कदम यांना देण्यात आले आहे

पुर्णा तालुक्यातील पांढरी शिवारात रेल्वे लोहमार्गावर रेल्वे खाली पडून महिलेचा मृत्यु

पूर्णा/ तालूक्यातील रूपला पांढरी शिवारातील चुडावा वसमत रेल्वे लोहमार्गावर धावत्या रेल्वे खाली येवून एका ३१ वर्षिय महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना दि ११ मार्च रोजी १२:३० ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
सदरील दुर्दैवी महिला तालूक्यातील सोनखेड पांढरी येथील रहिवाशी असून महिलेचे नाव अनिता कोंडीबा सोमटक्के असल्याचे समजते.मागील अनेक दिवसापासूम मयत अनिता हिच्या डोक्यावर परिणाम होता असे पोलीस सुत्राकडून समजते.अनिताच्या दुर्दैवी मृत्यु संबंधी पती कोंडीबा सोनटक्के यांच्या कडून मिळालेल्या माहिती वरून चुडावा पोलीस स्थानका मध्ये आकस्मात मृत्यु क्रमांक ४/१७ कलम १७४ भादवी प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि शेजवळ यांच्या मार्गदर्शना खाली जमादार हरिभाऊ कदम हे करीत आहेत

पालम तालुक्यातील तलाठयाने तलाठी सज्जावर हजर राहून काम करावे

अरुणा शर्मा

पालम :-पालम तालुक्याती सर्व सज्जावरील तलाठी सज्जावर न राहता तालुक्यावरून कारभार करत असल्याचे निवेदन लाल सेनेच्या वतीने देण्यात आले.
दिनांक 8 मार्च रोजी पालम तहसिलदार साहेबाना निवेदन देण्यात आले की आपल्या कार्यालयाचे तलाठी सज्जावर न राहता तालुक्यातून खाजगी माणूस लावून काम पहात आहेत व खाजगी माणसे जनतेची लुटमार करत आहेत. तेंव्हा शासनाच्या जी.आर.प्रमाणे तलाठयाने आपला मोबाईल नंबर व मंडळ अधिकारी याचा मोबाईल नंबर व नायब तहसिलदार यांचा मोबाईल नंबर कार्यालयाच्या सुचना फलकावर दिसून येत नाही. व त्यांचा दौरा असल्यास सुचना फलकावर नोंदविला जात नाही. त्यामुळे जनतेचे कामे खोळंबून जात आहेत. तेंव्हा मे.साहेबांनी तलाठी यांना आपल्या सज्जावर उपस्थित राहण्यास बंधनकारक करुन जनतेचा त्रास कमी करावा व तलाठयाने तलाठी सज्जावर हजर राहून काम करावे. जर पालम तालुक्यातील तलाठी सज्जावर हजर राहीले नाहीत तर लाल सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. आशे निवेदन राज गायकवाड (ता.अध्यक्ष लालसेना), गंगाधर चुडाजी शिंदे (लाल सेना जिल्हा सरचिटणीस परभणी), लखन शिंदे (शहराध्यक्ष लालसेना), रामचंद्र पकानभेद लालसेना कार्यकर्ता, रतन लोंढे, प्रकाश गालफाडे आदिच्या स्वाक्षरी या निवेदनात आहे. हे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब परभणी व मा.उपजिल्हाधिकारी साहेब गंगाखेड यांना दीले आहे. तरी साहेबानी आमची मागणी पुर्ण करावी आन्यता तिव्र आंदोलन करण्यात येईल.

पालम तालुक्यातील पं.स.चे 5 सदस्य सहलीवर

अरुणा शर्मा

पालम :- पालम पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी घनदाट मित्रमंडळ आणि राष्ट्रवादी कॉग्रेसची युती झाली असून पाच सदस्य सहलीवर गेले आहेत. त्यामुळे सभापती पदी कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
पालम पंचायत समितीत 8 सदस्य संख्या असून 14 मार्च रोजी सभापती आणि उपसभापती पदाची निवड केली जाणार आहे. नवनिर्वीचित सदस्यांमध्ये घनदाट मित्रमंडळ 3, राष्ट्रवादी कॉग्रेस 2, भाजपा 2 आणि रासप 1 असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी पाच सदस्यांची गरज आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर माजी आ.सीताराम घनदाट, राष्ट्रवादीचे आ.डॉ.मधुसुदन केंद्रे, प्रभाकरराव सिरस्कर, वसंतराव सिरस्कर, शंकरराव वाघमारे यांनी एकत्र येऊन घनदाट मित्र मंडळ व राष्ट्रवादी अशी युती केली. घनदाट मित्रमंडळाला सभापतीपद तर राकॉला उपसभापतीपद असा समझोता झाल्याची चर्चा आहे. 14 मार्च रोजी सभापतीची निवड होणार असल्याने सदस्य सहलीवर गेले आहेत. सभापती पदासाठी सावित्रा आत्माराम सोडनर व जयश्री प्रशांत वाडेवाले ही नावे समोर आली असून सभापतीपदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.

पालम तालुक्यातील चार विटभटयांना तहसीलदारांने ठोकले सील

अरुणा शर्मा
पालम :-शासनाचा महसूल बुडविणारया 4 वीटभटीवर तहसीलदार आर.के.मेडके यांच्या पथकाने सील ठोकले आहे. ही कारवाई 6 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास तालुक्यातील गुळखंड येथे करण्यात आली. पालम तालुक्यात गोदावरी नदीकाठावर तसेच डोंगराळ भागामध्ये अनेक ठिकाणी विटभटया सुरू आहेत. गोदावरी नदी काठावर विटभटीसाठी लागणारी माती जमा करुन गोदावरी नदीच्या पाण्यावर विटभटीचा व्यवसाय अनेकांनी सुरु केला आहे. वीटभटी सुरु करताना बहुतांश विटभटीधारकांनी यासाठी लागणारया गौण खनिजाची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. तहसील प्रशासनाने गौण खनिजाची रक्कम न भरणारया विटभटीचालकांना वारंवार सूचना दिल्या. परंतू याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तहसीलदार आर.के.मेडके, पेशकार भराडे, विजय राठोड, तलाठी सतीश मुलगीर, बोंदाडे यांच्या पथकाने 6 मार्च रोजी तालुक्यातील गुळखंड शिवारातील 4 विटभटीवर कारवाई केली. पेठकर, गायकवाड व अन्य दोन अशा चार विटभटयांना सील ठोकण्यात आले.
या चार विटभटीधारकांना प्रत्येकी 25 हजार रूपये या प्रमाणे 1 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध विटभटीधारकांचे धाबे दणाणले आहेत.
तालुक्यातील विटभटयांची माहीती संकलित केली आहे. काही जण शासनाचा महसुल बुडवितआहेत त्याची गय केली जाणार नसल्याची माहिती तहसीलदार मेडके यांनी आमच्या प्रतिनिधीस  दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने किरवले यांना श्रध्दांजली


विनोद तायडे
वाशीम -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने कोल्हापुर येथील आंबेडकरी विचारवंत व लेखक डॉ. कृष्णा किरवले यांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम शहरात घेण्यात आला. शनिवार, 11 मार्च रोजी स्थानिक विश्रामगृहात आयोजीत या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ. अलका मकासरे ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये बुलडाणा येथील अशोक गवई, कवी शेषराव धांडे, महेंद्र ताजणे, सुनिल कांबळे, दिपक ढोले, नालंदा चक्रनारायण, प्रविण पट्टेबहादूर, राजकुमार पडघाण, बबन खिल्लारे, संतोष वानखडे, ऍड. पी.पी. अंभोरे, धम्मपाल पाईकराव, सहदेव चंद्रशेखर, प्रकाश पडघाण, वंदना भगत, महेंद्र खंडारे, संतोष इंगळे, मोतीराम पट्टेबहादूर यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. कृष्णा किरवले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दोन मिनीटे मौन पाळून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन डॉ. कृष्णा किरवले यांचे आंबेडकरी साहित्य लिखाण, चळवळी व त्यांनी केलेल्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली. किरवले हे आपल्यातुन जरी निघून गेले तरी त्यांचे विचार आजही आहेत. त्यांच्या हत्येचा निषेध आम्ही करत असुन त्यांच्या हत्येप्रकरणी दोषी मारेकर्‍यांना पकडून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राजकुमार पडघान तर आभार प्रविण पट्टेबहादूर यांनी मानले.

आधारवड बनन्याचा प्रेस क्लब चा प्रयत्न अभिनंदनीय

प्रदीप कोकडवार
जिंतूर:-कुटूंबाला जगण्यासाठी आधार देण्याचा छोटासा प्रयत्न.....

सांत्वनाच्या हजार शब्दांपेक्षा मदतीचा एक हात कितीतरी मोठा असतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज जिंतुर तालुक्यातील भोगाव या गावात  आम्ही  प्रेस क्लब जिंतुरचा माध्यमातुन अकाली निधन झालेल्या स्व प्रसादराव देशमुख या ग्रामीण पत्रकाराच्या कुटुंबाला उदरनिर्वाह भागविण्यासाठी मदत करून  पिठाची गिरणी, मिर्ची, मसाला, कांडप यंत्र देऊन  आधार देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. याकामी जिंतुर तालुका प्रेस क्लबचे मार्गदर्शक विजय चोरडिया प्रदिप कोकडवार अध्यक्ष शेहजाद पठाण, मंचक देशमुख,बालाजी शिंदे प्रा.राहुल वाव्हळे,सचीन रायपत्रीवार, रियाज चाऊस यांचासह सर्व प्रेस क्लबचा पदाधिकार्यानी प्रयत्न केले..

संगणक शिक्षकांचे प्रश्न लवकरच लागणार मार्गी


सुधीर बागुल
वैजापुर - आयसीटी अंतर्गत कार्यरत असलेले संगणक शिक्षकांचे प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने केला आहे
संगणक निदेशक यांच्या वर उपास मारीची वेळ येवून ठेपली असल्याने महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या वतीने एक शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे याची भेट घेऊन संगणक शिक्षक कायम होण्याबाबत चर्चा करण्यात आली या प्रसंगी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या वतीने सांगण्यात आले की मंत्रालयात तुमची फाईल पूर्ण काम होऊन तयार आहे आयसीटी योजनेसाठी निधी उपलब्ध करून येत्या काही दिवसात तुम्ही शाळेवर रुजू केले जाईल . तसेच सोबत नागपूर येथील शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांची भेट घेऊन आयसीटी शिक्षकांची मानधनाची शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा झाली असता कमीत कमी 12000रु मानधन देण्यात येणार आहे अशी ग्वाही दिली.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ
आमदार ना गो गाणार सह शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक चे अध्यक्ष कॉ.शरद संसारे,मराठवाडा विभाग प्रमुख योगेश काथार,जालना तालुका अध्यक्ष जयमाला दकणे,माया चांदणे इ शिक्षक

Friday, 10 March 2017

उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव अखेर निलंबीत

अहमदनगर - पांगरमल दारुकांड प्रकरण प्रकरणी प्रमुख दोषी असणार्‍या उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा पोलिस अधीक्षक भाग्यश्री ऊर्फ अश्‍विनी जाधव यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून याचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठविला आहे.

या प्रकरणात उत्पादन शुुल्क आणि पोलिस विभागातील चार अधिकारी आणि पाच कर्मचारी यापूर्वीच निलंबीत करण्यात आले आहेत.

आता बेनामी मालमत्तांवर येणार टाच?


मुंबई, दि. 11 - उत्तर प्रदेशमधला भाजपाचा विजय म्हणजे जनतेने मोदींच्या नोटाबंदीला दिलेला पाठिंबा मानला जात आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी कठोर उपाय योजण्याची ताकद मिळण्याची शक्यता आहे. नोटाबंदी केल्यानंतर मोदींनी आपण आणखी कठोर उपाय योजणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी बेनामी मालमत्ता, सोने खरेदीचे व्यवहार, विदेशी बँक खाती, राजकीय पक्षांना देणग्या आणि आयकराच्या जागी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स अशा अनेक गोष्टींचा समावेश असू शकतो.

नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास झाला आणि त्याचा फटका उत्तर प्रदेश निवडणुकीत बसेल अशी अनेकांची अटकळ होती. मात्र, मोदींनी युपीच्या निवडणुकीची सुत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली आणि अमित शहांच्या साथीने उत्तर प्रदेश पिंजून काढला. नोटाबंदीच्या मुद्याला स्पर्श करण्याचे टाळत त्यांनी लोकांनी विकासाची आश्वासने दिली, काही प्रमाणात मतांच्या ध्रुवीकरणाची वाट चोखाळली आणि अद्यापही सर्वसामान्यांच्या मनावर मोदींचं गारूड असल्याचं दिसून आलं.
या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं दिसून आल्यामुळे मोदी साहसी पावले नजीकच्या काळात उचलतील आणि उच्चवर्ग व गरीब यांचा विचार केला तर आपण गरीबांच्या बाजुने असल्याचं दाखवण्याची संधी ते सोडणार नाहीत. साहजिकच बेनामी मालमत्ता, सोन्याची खरेदी आणि विदेशी बँकांमधील खाती यासारख्या प्रकरणामध्ये कठोर कायदे उचलली जाण्याची शक्यता आहे. मोदी नजीकच्या सहकाऱ्यांनाही त्यांच्या मनात काय आहे हे सांगत नाहीत. त्यामुळे अत्यंत अचानकपणे ते मोठा धक्का देऊ शकतात. उत्तर प्रदेशच्या निवडणूक निकालामुळे आता असे काही धक्के येत्या काळात बघायला मिळतील अशी शक्यता आहे.

मराठवाड्यातील नवीन महसूल आयुक्तालय शासन स्तरावर रखडले

कार्तिक पाटील
पाथरी:-मराठवाड्यात निर्माण करावयाचे नवीन आयुक्तालय शासन स्तरा वरच रखडले आहे, आयुक्तालयाच्या निमितीसाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एक सदस्यीय समितीने डिसेंम्बर 2016 दरम्यान राज्य शासनाकडे अहवाल सादर केलेला असूनही, राज्य शासनाने अहवालाच्या अंमलबजावणी कडे  दुर्लक्ष केल्याने निर्णय रखडला आहे, मराठवाड्यात नवीन आयुक्तालय निमार्ण करण्या साठी लातूर, नांदेड व परभणी येतील जनतेने आंदोलने केली केली होती, आयुक्तालयाच्या निमितीसाठी सर्व बाजूने कोणते ठिकाण योग्य असेल, या साठी शासनाने तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ उमाकांत दांगट यांची एक सद्सयसीय समिती नियुक्त केली होती, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, व निवडणुका अशी कारणे दाखवीत  या समितीने वेळकाढू धोरण राबविले होते, त्या विरुद्ध आ बाबाजानी दुर्रानी यांनी जून 2016 दरम्यान विधान परिषेदेत नियम 93 द्वारे  शासनाचे लक्ष वेधले होते,  वेळोवेळी मुदत वाढीचे धोरण व  वेळकाढू पानाचे धोरण राबवित असल्या बाबत चा आक्षेप सभागृहात नोंदवला होता, त्या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी, यापुढे मुदतवाढ न देता डिसेंम्बर अखेर अहवाल सादर करण्याबाबत चे आदेश समितीस देण्यात येतील ,असे विधान परिषदेत उत्तरात सांगितले होते, त्या मुळे गती मिळाली व  त्या आश्वासना प्रमाणे दांगट समितीने फेर अभ्यास करून सुधारित अहवाल राज्य शासनाकडे डिसेंबर महिन्यात सादर केला         सादर केलेल्या अहवालाप्रमाणे राज्य शासनाने आयुक्तालयाच्या स्थापनेसाठी अंतिम कार्यवाही केली असेल, अशी शक्यता होती, परंतु त्यावर कोणतेही कार्यवाही झालेली नाही, असे आ दुर्रानी यांनी उपस्थित केलेल्या आजच्या तारांकित प्रश्नातून (  क्र 27841 दि 10 मार्च 2017, विधान परिषद ) स्पस्ट झालेले आहे .      वेळोवेळी मुदतवाढ देऊन केलेली दिरंगाई व आता अहवाल प्राप्त असूनही निर्णय होत नसल्याने  शासनाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे, यापुढे सर्व राजकीय  पक्ष, सामाजिक संघटना, व जनतेच्या जनांदोलना शिवाय पर्याय नसल्याचे जाणवत आहे ,