तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 18 March 2017

तहसीलदार झाला एक गरीब शेतकरयाचा मुलगा


अरुणा शर्मा

पालम:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अंतिम निकाल गुरूवारी जाहीर झाला असून या परीक्षेत पालम तालुक्यातील दोघांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये पालम तालूक्यातील खडी येथील श्रीकांत रामचंद्र निळे यांनीही लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्यांची एन.टी.प्रवर्गातून तहसीलदारपदी निवड झाली आहे. मुलगा श्रीकांत याच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडु नये म्हणून त्याचे वडील रामचंद्र निळे यांनी त्यांच्याकडील 7 एकर जमीनीपैकी 5 एकर जमीन विक्री करून मुलगा श्रीकांतला परीक्षेच्या तयारीसाठी व शिक्षणासाठी पैसे पुरविले. वडिलांनी घेतलेली मेहनत श्रीकांतनेही सार्थ ठरवत या परीक्षेत यश संपादन केले आहे. श्रीकांत निळे यांचे प्राथमिक शिक्षण खडी येथील जि.प.शाळेत झाले असून पालम येथे इतर शिक्षण झाले आहे. पुणे येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी कॉम्प्यूटर इंजिनिअरिगची पदवी मिळविली. त्यानंतर ते स्पर्धा परीक्षेकडे वळले व यावर्षी झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 491 गुण मिळवित त्यांनी यश संपादन केले. त्याने मिळवलेल्या यशाबदल सर्वत्र कौतुक होत आहे.विमा कंपनीने सहा लाख व्याजासह द्यावे : ग्राहक मंचचा दनका


मोईन खान
परभणी : प्रतिनिधी
भारतीय जीवन विमा शाखा सेलू यांच्याकडे मानवत तालुक्यातील सारंगपुरयेथील शेतकरी पंडीतराव चोखट यांनी १ कोटी रुपायाची विमा पॉलीसी काढली होती तीन हप्ते भरल्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे हप्ते न भरल्याने पॉलीसी खंडीत झाली. भरलेली रक्कम परत देण्यात नकार देणाºया विमा कंपनीला सहा लाख रुपए सह व्याज देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले .
हा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच परभणी फोरम अध्यक्ष श्रीमती ए.जी.सातपुते व सदस्या अनिता ओस्तवाल यांनी दिले. मानवत तालुक्यातील सारंगपुरयेथील शेतकरी पंडीतराव चोखट यांनी १ कोटी रुपायाची विमा पॉलीसी काढली होती ओनलाईफ प्लॅनटर्म १४९-४४ या योजनेत ही पॉलीसी काढली होती. त्याचा तीमाही हप्ता २ लाख १७२८१ एवढा आहे. पॉलीसी काढल्यानंतर सलग तीन हप्ते शेतकरी पंडीतराव चोखट यांनी भरले होते. नतर ही पॉलीसी खंडीत झाली. सप्टेंबर २०१५ मध्ये थकीत हप्ता भरण्याची तयारी दर्शवली असता विमा कंपनीने वैद्यकीय चाचणी करण्यास सांगीतले डॉ. मनियार यांच्याकडे  तपासणी आणि शिसोदिया पॅथालॉजीमध्ये रक्त तपासणी केली. डॉ. जी.एम.चांडक यांच्याकडे वैद्यकीय चाचण्या केल्या असून डॉक्टर हे एलआयसीने नियुक्त केलेले आहेत.  कोणताही आजार नसल्याचे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल घेवून हप्ते भरून घेण्याची विनंती केली. नंतर हे प्रकरण नांदेड येथील विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आले. विमा हप्त्याचे पैसे घ्यायचे किंवा नाही हा अधिकार विभागीय कार्यालयास आहे.
मराठवाड्यात तीव्र दु्ष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने हप्ता खंडीत झाला होता. विभागीय कार्यालयाने अर्जदाराची प्रकृती समाधानकारण नसल्याचे सांगत पॉलीसी पुनर्रुजीवन करण्यास व हप्ते भरून घेण्यास नकार दिला तसेच रक्कम परत करण्यासही नकार दिला. या प्रकरणी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून घेण्यात आला.पैसेही परत दिले नाही अन पॉलीसी ही चालु करण्यातआली नाही त्यामुळे शेतकरी पंडीतराव चोखट यांनी अ‍ॅड.कपील मुडपे यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे दाद मागीतली. भारतीय जीवन विमा निगम क डे हप्ते भरून घेण्यासाठी किंवा पॉलीसी अंतर्गत भरलेली रक्कम परत द्यावी यासाठी वेळोवेळी अर्ज केले होते.परंतू त्यास दाद देण्यात आली नाही. ग्राहकमंचाने सेलू शाखाधिकारी व विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक यांना नोटीसा बजावल्या दोन्ही बाजु ऐकू न घेतल्यानंतर ६ लाख रु. व्याजासह परत देण्याचा आदेश मंचाचे अध्यक्ष श्रीमती ए.जी.सातपुते व सदस्या अनिता ओस्तवाल यांनी दिला. तसेच  सहा लाख रुपयावर नऊ टक्के व्याज आकारण्यात येऊन ही रक्कम द्यावी असे आदेशात म्हटले. या प्रकरणी पंडीतराव चोखट यांच्यातर्फे अ‍ॅड.कपील मुडपे व अ‍ॅड.अरुण खापरे यांनी काम पाहीले.

मोफत दंत चिकीत्सा शिबीराचे आयोजन

परभणी : प्रतिनिधी
 मैत्री गु्रपच्या वतीने 20 मार्च रोजी जागतिक ओरल हेल्थ डे च्या निमित्ताने 20 मार्च रोजी पत्रकार, कुटूंबिय आणि सहर्का­यांसाठी मोफत दंत चिकीत्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
परभणी येथील मैत्री गु्रप आणि श्री ंिचतामणी सुपर स्पेशालिटी क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ओरल हेल्थ डे च्या निमित्ताने 20 मार्च 2017 रोजी सकाळी 11 ते 4 या दरम्यान मोफत दंत चिकीत्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर श्री ंिचतामणी सुपर स्पेशालिटी क्लिनीक वसमत रोड परभणी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात पत्रकार, त्यांचे सहकारी व कुटूंबियांची मोफत दंत तपासणी करण्यात येणार असून या तपासणी नंतर माऊथ वॉश, पेस्ट व औषधी मोफत दिल्या जाणार असल्याची माहिती मैत्री ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सरोज गट्टाणी यांनी दिली आहे. या शिबीरात डॉ. स्रेहल लाभशेटवार या दंत चिकीत्सा करणार आहेत. या शिबीरात जिल्‘ातील जास्तीत जास्त पत्रकार व त्यांचे सहकारी आणि कुटूंबियांनी सहभागी होण्याचे आवाहन मैत्री ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

जलयुक्तच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश;आ दुर्रांनींच्या प्रश्नाला मंत्री शिंदेंचे उत्तर

परभणी : प्रतिनिधी
दर्जाहीन पध्दतीने कामे करून बीले उचलण्याचा प्रकार करणाºया रत्नापूर ता.मानवत येथील जलयुक्ताच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आ.दुर्रानी यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर दिला. या कामाबाबत अनेक वृत्तपत्रांनी आवाज उठवला होता.
सविस्तर वृत्त असे की, मानवत  तालु्क्यातील रत्नापूर येथील सिमेंटनाला बांध खोलीकरणाच्या १२ लाख रुपयापैकी ५ लाख रुपए उचलून किरकोळ, बोगस काम करून उर्वरीत काम न करताच बीले उचलण्याचा प्रकार पाथरी येथील एका गुत्तेदाराकडून करण्यात येत होता. त्या विरोधात आ.दुर्रानी यांनी तारांकीत प्रश्न क्र. २९३९९ उपस्थित केला होता. त्यास जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी लेवी उत्तर दिले. सदरील काम दहा दिवसात पूर्ण करणे बंधनकारक होते परंतू सुमेर १० महिन्यानंतरही हे काम पूर्ण नकरता नियमभंग व अटी शर्तीचा भंग झाल्याचे गंगाखेड येथील तालुका कृषि अधिकाºयाकडून पुर्वीच चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. त्या कामाचा दर्जा व इतर गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी गुजरात येथील वॅप्कोस या संस्थेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे ना.शिंदे यांनी सांगीतले, जिल्हयातील जलयुक्ताचे अनेक कामे दर्जाहीन करून थातूर मातूर पध्दतीने उरकून लाखो रुपायाचे बील उचलण्याचा आरोप आ.दुर्रानी यांनी केला आहे.

विषारी औषधाच्या सेवनाने विवाहीतेचा मृत्यू


गंगाखेड:-
पालम तालुक्यातील व गंगाखेड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नाव्हा येथील एका विवाहीतेने उंदराचे विषारी औषध सेवन केल्याने उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाल्याची घटना घडली.
  नाव्ह येथील मयत विवाहीता नंदिनी पवन काचोळे वय २५ ही विवाहीता काही कामानिमित्त शेतात गेली आसता दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोट दुखत आसल्याने ती घराकडे आली होती.तिला तिच्या आईने तात्काळ गंगाखेड येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आसता. त्या महीलेने उंदीर मारण्याचे औषध घेतल्याचे डॉक्टरांना समजले.यावरुन वैद्यकिय अधिकारी डॉ.देशमुख,अधिपरीचारीका श्रीमती माला घोबाळे,परिचारक विश्वजीत मठपती यांनी त्या महीलेवर प्राण वाचविण्याचे अथक प्रयत्न केले.मात्र उपचारा दरम्यान दुपारी ३ वाजणेच्या सुमारास तिचा मृत्यु झाला.त्या विवाहीतेस दोन मुली असून एक ,एक वषार्ची व दुसरी दोन वषीर्ची आहेत.या चिमुरड्या आईविना अनाथ झाल्या. या प्रकरणी पो.ना.वसंत निळे, पो.सि.सचिन भदरगे यांनी प़ंचनामा करुन तिच्या पित्याचा जबाब नोदवून घेत श्वविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाइकांच्या  स्वाधीन केला.उंदराचे औषध घेण्याचे कारण मात्र रात्री उशिरा पर्यंत समजू शकले नाही. रात्री उशिरा पर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.पोलीस अधिक तपास करत आहेत.

मनपाच्या वतीने अत्याधुनिक सुविधेसह रूग्णवाहिका

परभणी : प्रतिनिधी
 परभणी शहरातील अत्यावस्थ रूग्णांना तात्काळ सेवा मिळावी या उद्देशाने मनपाच्या वतीने अत्याधुनिक सुविधेसह रूग्णवाहिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त जगदीश मानमोठे यांनी दिली आहे.
परभणी शहरातील अत्यावस्थ रूग्णांना ऐनवेळी औरंगाबाद, हैद्राबाद, मुंबई आदी ठिकाणी पोहोचविण्यासाठी सर्व सुविधांयुक्त रूग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर रूग्णांना मर्यादेपेक्षा जास्त रूग्णवाहिकेवर खर्च करावा लागतो.ही अडचण लक्षात घेवून महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक सुविधांसह रूग्णवाहिका खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कार्डिओ सुविधा, व्हेंटिलेटर, आॅक्सीजन मॉनिटर आदी सुविधा उपलब्ध आहेत.नागरिकांसाठी २४ तास ही सेवा उपलब्ध करून दिली असून ज्या रूग्णांना रूग्णवाहिकेची सेवा पाहिजे असून त्यांनी संबंधित डॉक्टरच्या पत्रासह महानगरपालिका परभणी येथील अभियांत्रिकी विभागात अर्ज करावा. आॅक्सीजन मॉनिटर आदी सुविधा  इंधनरहित केवळ दोन हजार पाचशे  रूपयांत उपलब्ध करून देण्यात येईल.शहरातील  अर्ज करुन या रूग्णवाहिकेच्या सेवेचा अधिकाधिक लाभ रूग्णांनी घ्यावा असे आवाहन मनपा उपायुक्त जगदिश मानमोठे यांनी केले आहे.

तहसिलदार झाला शेतक-याचा मुलगा

मोईन खान

परभणी : प्रतिनिधी
पालम तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील खडी या गावातील शेतक-यांने मुलाच्या शिक्षणासाठी शेती विकून एम.पी.एस.सी.च्या डावावर पैसा लावला होता. मुलानेही परिस्थितीची जाणीव ठेवत अहोरात्र मेहनत केली आणि डाव जिंकला. त्याची तहसीलदार या पदासाठी निवड झाली आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पालम तालुक्यातील खडी हे लहान गाव आहे त्याच गावातील शेतकरी रामचंद्र ग्यानदेव निळे यांना वडीलोपार्जीत शेती हा व्यवसाय जेमतेम त्यांना ८ एकर जमीन होती. आरोरात्र शेतात कष्ट करून कसे तरी पोट भरण्यापुरता माल शेतात व्हायचा. यासाठी करावे लागणारे कष्ट आणि निसर्गाचा लहरीपणी यामुळे शेतीत फारसे उत्पन्नही व्हायचे नाही. त्यामुळे मुलाला शेतीकडे वळायचे नाही असा विचार केला.
बारावी विज्ञानची परिक्षा परभणीच्या शिवाजी महाविद्यालयातून उत्तीर्ण केली. नंतर पुण्याच्या सिंहगड या खाजगी महाविद्यालयात अभियांत्रीकी संगणक शाखेत नंबर लावला. नौकरी मिळत नसल्याने त्याने एम.पी.एस.सी.महाराष्टÑ लोकसेवा परिक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. याबाबत वडीलांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.२०१६ च्या राज्यसेवा परिक्षेची तयारी केली आणि तो लेखी परिक्षेत राज्यात प्रथम आला. त्यांनतर त्याची मुलाखत होऊन अखेरीस त्याची तहसीलदारपदी निवड करण्यात आली.

पात्र  मजूर सहकारी संस्थांना कामाची मागणी दाखल करण्याचे आवाहन

 मोईन खान

        परभणी   ः- परभणी जिल्ह्यातील सेलू,पाथरी,गंगाखेड,सोनपेठ ,परभणी, पूर्णा, जिंतूर तालुक्यातील मजूर सहकारी संस्थांचे चेअरमन यांना सूचित करण्यात येते की, विविध विभागाकडील कामे अध्यक्ष, काम वाटप समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, परभणी यांच्याकडे प्राप्त झाली आहेत. ही कामे कार्यालयाने दि१५ मार्च २०१७  रोजी परभणी जिल्हा मजूर सहकारी संस्थांचे फेडरेशन म. परभणी तसेच संबंधित तालुका सहायक निबंधक , सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रसिध्दीस दिलेली आहेत. तरी सर्व पात्र मजूर सहकारी संस्थांनी कामाची मागणी परभणी जिल्हा मजूर फेडरेशन म. परभणीकडे दिनांक २० मार्च २०१७ पर्यंत दाखल करावी असे आवाहन अध्यक्ष, काम वाटप समिती तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी यांनी केले आहे. 

 

सार्वजनिक सुटी १९,२५,२६,व २८ मार्च रोजी 'आरटीओ' कार्यालय सुरु राहणार

मोईन खान
 

        परभणी   ः- यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याचा सण दि. २८ मार्च २०१७ रोजी आहे.या सणा निमित् मोठ्या प्रमाणावर नवीन वाहनांची नोंदणी होते. या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालय, परभणी येथे दि. १९,२५,२६ आणि २८ मार्च २०१७ या सर्व शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी दुचाकी, चारचाकी वाहनांसहित सर्व नवीन वाहनांच्या नोंदणीचे काम सुरू राहील. यादिवशी नोंदणी शुल्क आणि कर भरणा सकाळी १०. ०० ते दुपारी २. ३० या वेळेत सुरु असेल. संबंधित वाहनधारकांनी आणि वाहन वितरकांनी याची नोंद घ्यावी आणि उपलब्ध व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पी.बी. जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ,परभणी यांनी केले आहे

पल्स पोलिओ लसीकरण मोहिम – २०१७.- दुसरे सत्र २ एप्रिल रोजी

        परभणी   ः राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-२०१७ अंतर्गत २ एप्रिल २०१७ रोजी दुसरे सत्र राबविण्यात येणार आहे. परभणी जिल्हयात ग्रामीण, शहरी व महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

        पल्स पोलिओ लसीकरण मोहिम- 2017 संदर्भात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ जावेद अथर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ व्हि आर मेकाने, डाॅ कल्पना सावंत, डाॅ मुजिब खान तसेच संबंधित विभाग व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-2017 अंतर्गत जिल्ह्यातील एकही लाभार्थी बालक या लसीवाचून वंचित राहू नये यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांनी मोहिम कालावधीत आपापल्या मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री महिवाल यांनी दिले.      

        नियमित लसीकरण कार्यक्रमाचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष लसीकरण सप्ताहाचे  आयोजन करण्यासाठी जिल्हास्तरावर तयार करण्यात आलेल्या सूक्ष्म कृती आराखडयाचा विचार  करुन स्थलांतरीत/भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच बाॅयव्हॅलन्ट (bopv) पोलिओ लस वापरण्यात येणार आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरावरील कृतीनियोजनः-

अपेक्षीत लाभार्थी (० ते ५ वर्ष) ग्रामीण- १३८६४६, शहरी- ४१२७५, मनपा- ५६०००,

जिल्हा एकुण- २३५९२१, बुथ केंद्र संख्या:- ग्रामीण- १०४६,शहरी- १३८, मनपा- २००,

जिल्हा एकुण- १३८४, उपलब्ध मनुष्यबळ:- ग्रामीण- २८७४, शहरी- ४०२, मनपा- ६००,

जिल्हा एकुण- ३८७६,टीमची संख्या:- ग्रामीण- १५३४,शहरी- ७४,मनपा- १००,

जिल्हा एकुण- १७०८, लागणारी लस:-ग्रामीण- १८४३९९,शहरी- ५४८९५,मनपा- ७४४८०,

जिल्हा एकुण- ३१३७७४, लस व्हायल्समध्ये:-ग्रामीण- ९२२०,शहरी- २७४५,मनपा-३७२४,    जिल्हा एकुण- १५६८९,

        मोहिमेच्या अनुषंगाने वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालये/ग्रामीण रुग्णालये,  तालुका आरोग्य अधिकारी, प्रभारी वैद्यकिय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हास्तरीय  पर्यवेक्षक यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर  द्वितीय वैद्यकियअधिकारी व कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, यांचे प्रशिक्षण वैद्यकिय  अधिका-यांमार्फत व जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत घेण्यात येत आहे. तालुकास्तरीय समन्वय समितीच्या बैठकाही घेण्यात आहेत. मोहिमेच्या प्रसिध्दीकरीता सिनेमागृहामध्ये  स्लाईड शो प्रदर्शित करणे, आकाशवाणीवरुन जिंगल्स, विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

----- 000 -----

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सन 2016 - 17 चा अर्थसंकल्प मांडला , अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये


1. पालकमंत्री पांदण रस्ते जेसीबी मशिन खरेदी योजना - शेतांमध्ये जाणारे वर्षानुवर्षे नादुरुस्त असलेले पांदण रस्ते दुरुस्तीसाठी तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी पालकमंत्री पांदण रस्ते जेसीबी मशिन खरेदी योजना, या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना जेसीबी खरेदीसाठी राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्जपुरवठा, या कर्जावरील व्याजाची हमी शासन घेणार, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद. 
2. कृषी प्रक्रीया उद्योग योजना–  कृषी प्रक्रीया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान, प्रकल्प खर्चाच्या 25 % किंवा जास्तीत जास्त 50 लाख मर्यादेत, यासाठी  50 कोटी रुपयांची तरतुद
3. पंडीत दिनदयाळ उपाध्याय कृषी मार्गदर्शन योजना – या योजनेअंतर्गत कृषी विषयक उपक्रम, घडामोडी, संशोधन, समुपदेशन यासाठी  एकत्रितपणे मार्गदर्शन शेतक-यांना देण्यात येईल, यासाठी  60 कोटी रुपयांची तरतुद
4. कृषी गुरुकुल योजना – शासनाद्वारे सन्मानित आदर्श शेतक-यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ राज्यातील इतर शेतक-यांना  देण्याची योजना.
5. जिल्हा कृषी महोत्सव योजना - प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी कृषी महोत्सव भरविण्यात येईल. या माध्यमातून कृषी  विषयक योजनांची माहीती व मार्गदर्शन, यासाठी 20 लाख रु. प्रति जिल्हा प्रति वर्ष, यासाठी एकूण 6.80 कोटी रुपयांची तरतुद
6.  कृषी विद्यापिठांमध्ये सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना - सेंद्रीय शेतीचे महत्व लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या चार कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रीय शेती, संशोधन व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना
7. गोवर्धन – गोवंश रक्षा केंद्रांची निर्मीती -  गोवंश रक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात भाकड व गोवंश संगोपन करण्यासाठी गोवंश गोवर्धन केंद्र स्थापन करणार, अनुभवी स्वयंसेवी संस्था मार्फत राबविण्यात येणार, यासाठी 1 कोटी रुपये एकरकमी देणार,  यासाठी 34 कोटी रुपयांची तरतुद
8. जल साक्षरता व जलजागृती कक्षांची स्थापना - भविष्यात पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी जल साक्षरता व जलजागृती केंद्रांची स्थापना करण्यात  येणार, कायमस्वरूपी केंद्र यशदा पुणे येथे, उपकेंद्र – चंद्रपुर, अमरावती व औरंगाबाद येथे स्थापन करणार
9. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम – राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात समाविष्ट नसणा-या योजना व बंद असणा-या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यांचे पुनरुज्जीवन यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना राबविणार , यासाठी  2500 कोटी रु. ची तरतुद, या वर्षी 500 कोटी रु. उपलब्ध करणार.
10. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियान- ग्रामपंचायती अधिक सक्षम होण्यासाठी, या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवित ग्रामपंचायतींचा विकास साधण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियान राबविणार, यासाठी  1 कोटी रुपयांची तरतुद.
11.  स्व. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमिकरण योजना-महिला स्वयं सहायता बचत गटांना 0 टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्व. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमिकरण योजना राबविणार , यासाठी  10 कोटी रुपयांची तरतुद.

12. मुद्रा बँक कर्ज पुरवठा जिल्हास्तरीय समितीचे गठन – मुद्रा बॅंक योजनेच्या प्रसार व प्रसिद्धी साठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयात समिती स्थापन करणार, यामुळे जास्तीत जास्त तरुणांना योजनेचा लाभ मिळणार, यासाठी 20 कोटी रुपयांची तरतुद.
13. राज्य महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे - राज्य महामार्गावर दर 100 कि.मी. ला एक या प्रमाणे 400 स्वच्छतागृहे बांधण्यात येणार,  यासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद.
14. स्वत: चे घर नसलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक किंवा त्यांच्या हयात विधवांना घरे - स्वत: चे घर नसलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक किंवा त्यांच्या हयात विधवा यांना स्वत:चे घर बांधण्यासाठी 10 लाख रु पर्यत मदत, यसाठी स्वत:चे नावे किंवा पत्नीच्या नावे किंवा निकटवर्तीयांच्या नावे घर नाही अश्या स्वातंत्र्यसैनिकांना किंवा त्यांच्या हयात पत्नीला घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य.
15. महिलांसाठी स्वतंत्र ‘तेजस्विनी’ बसेस – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबीवली, पुणे ,नागपुर या शहरातील महिलांना बस प्रवास सुखकर होण्यासाठी 300 बस स्थानिक प्राधिकरणामार्फत उपलब्ध करणार, यासाठी  50 कोटी रुपयांची तरतुद
16. ई ग्रंथालये - 43 सार्वजनिक ग्रंथालयांचे रुपांतरण ई ग्रंथालयात करण्यात  येणार, प्रत्येकी 40 लाख अशी एकूण 17.20 कोटी रुपयांची तरतुद.
17. 2 कोटी वृक्ष लागवड - 1 जुलै कृषि दिन व वन महोत्सव यांचे औचित्य साधत राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड करणार.
18. नमामि चंद्रभागा- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात लीन होणा-या चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचे अभियान, चंद्रभागा नदी 2022 पर्यंत प्रदुषण मुक्त करणार,  शासन व लोकसहभाग  सदर अभियान राबविणार, यसाठी 20 कोटी रुपयांची तरतुद.
19. आदर्श अंगणवाडी योजना – राज्यातील बालकांचा विकास करण्याच्या प्रक्रियेत महत्वपुर्ण भुमिका बजावणा-या 10,000 अंगणवाड्या आदर्श करणार, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद.
20.  अंगणवाडी सेविका व मदतनिसांना विमा संरक्षण- प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचा लाभ अंगणवाडी सेविका व मदतनिसांना देण्यात येणार, विम्याचा  हफ्ता शासन भरणार,  प्रत्येक योजनेअंतर्गत रु. 2 लाखाचे विमासंरक्षण.
21. सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांच्या अनुदानात वाढ - संजय गांधी निराधार  योजना , श्रावणबाळ योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्या इतर योजनांच्या अनुदानात वाढ करणार,  दोन अपत्य असणा-या लाभार्थींना 1000 रुपये, एक अपत्य असणा-यांना 850रुपये , अपत्यहिन लाभार्थ्यांना 700 रुपये, यामुळे शासनावर 332  कोटी रुपयांचा अतिरिक्त भार
22.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना- अनुसुचित जातीच्या शेतक-यांना विहिर खोदण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान, या विहिरीवर विद्युत पंप बसविणार, ज्याठिकाणी विद्युत पंप उपलब्ध नाही अशा ठिकाणी सौर ऊर्जा पंप बसविणार
23. सार्वजनिक धोरण संस्थेची स्थापना - शासनाच्या ध्येय धोरणांसंदर्भात शास्त्रशुध्द विश्लेषण संशोधन व मुल्यमापन यासाठी जागतीक मानांकनाची महाराष्ट्र धोरण संशोधन  परीषद स्थापन करणार
24. स्व. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या रकमेत वाढ व प्रतिपुर्तीच्या नियमात कुटुंबियांचा समावेश -अधिस्विकृती धारक पत्रकारांना आजार व मृत्युपश्चात देण्यात येणा-या मदतीच्या निकषात कुटूंबीयांचा समावेश, योजनेसाठीच्या मदत ठेवीत 5 कोटीवरुन 10 कोटी इतकी वाढ
25. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम - लोकमान्य टिळकांच्या “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” या घोषणेला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकमान्यांच्या स्मृतीला अभिवादन करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविणार, यासाठी 5 कोटी रुपयांची तरतुद.
26. जागतिक दर्जाची भास्कराचार्य गणित नगरी  - जळगांव जिल्हयात चाळीसगांव तालुक्यात पाटणदेवी येथे जागतिक दर्जाची भास्कराचार्य गणित नगरी स्थापन करणार
27. ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकार भवनाचे बांधकाम - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे पत्रकार भवनाचे बांधकाम करणार.
28. स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृती सभागृहाचे बांधकाम -  माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगली जिल्हयात सभागृहाचे बांधकाम  करणार, यासाठी 5 कोटी रुपयांची तरतुद.
29. राज्यनाटय स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत तसेच सादरीकरणाच्या खर्चात वाढ – सांस्कृतिक कार्य संचालनाद्वारे आयोजित होणा-या राज्य नाटय महोत्सवाअंतर्गत घेण्यात येणा-या मराठी, हिंदी हौशी नाटय स्पर्धा, व्यावसायिक, संस्कृत, संगीत, बाल नाटय स्पर्धाच्या पारितोषिकांच्या रकमेत तसेच सहभागी संस्थांना देण्यात येणा-या सादरीकरण खर्च तसेच दैनिक प्रवास भत्ता यात वाढ करणार
30. स्मार्ट गाव योजना – राज्यामध्ये यावर्षीपासून स्मार्ट गाव  ही नविन योजना जाहिर करण्यात येत आहे. याद्वारे राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याचा पध्दतशीर प्रयत्न. जिल्हास्तर, तालुकास्तर व पंचायत समिती गण स्तरावर ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा घेण्यात येणार. स्पर्धेतील विजेत्या गावांना विकास कामांसाठी प्रोत्साहनपर निधी.

योजनानिहाय तरतुदी
1. सन 2016 हे शेतकरी स्वाभिमान वर्ष.
2. अर्थसंकल्पाचा भर शेतकरी व ग्रामविकास.
3. कृषी विषयक विविध योजनांसाठी 25000 कोटी एवढी भरीव तरतुद.
4. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी रु. 110 कोटी.
5. 2016 हे युनो ने आंतर राष्ट्रीय कडधान्य वर्ष जाहीर केले आहे.त्यामुळे तेल बिया व कडधान्य  उत्पन्नात वाढ करण्यासाठी रु. 80  कोटी.
6. नविन कृषी महाविद्यालये – बुलढ़ाणा, हळगाव त. जामखेड जि अहमदनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालये, पाल जि जळगाव येथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय, तर जळगांव आणि अकोला येथे पशुवैद्यकीय महाविद्यालये नव्याने स्थापन करणार.
7. 2065 महसुल मंडळस्तरावर स्वंयचलित हवामान केंद्र स्थापन करण्यसाठी रु. 107 कोटी.
8. राष्ट्रीय कृषी विकास  योजनेंतर्गत नाबार्डच्या सहाय्याने शेतक-यांची उत्पादक कंपनी स्थापन करुन 100 कोटी किंमतीचे दुग्धविकास प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यात उभारणार.
9. मागेल त्याला शेततळे  योजनेसाठी रु.2000 कोटी,
10. पिक विमा योजनेसाठी रु. 1855 कोटी,
11. विकेंद्रीत धान खरेदी योजनेसाठी रु. 62 कोटी.
12. जलयुक्त शिवार योजनेसाठी रु. 1000 कोटी,
13. 14 जिल्हयातील  शेतकर-यांना रास्त भावात धान्य देण्यासाठी रु. 1035.83 कोटी, 
14. माजी मालगुजारी तलावांची मस्त्य संवर्धन  खड्ड्यांसह दुरुस्ती,  संवर्धन व नुतनीकरण करण्यासाठी रु. 150 कोटी, शेतकरी व मासेमारी करणा-यांना दिलासा.
15. आदिवासी विद्यार्थांना नामांकीत शाळांमध्ये प्रवेशीतांसाठी रु. 290 कोटी,
16. आदिवासी विभागा अंतर्गत रस्ते विकासासाठी रु. 300 कोटी,
17. आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळा बांधकामासाठी रु. 370 कोटी,
18. आदिवासी पोषण आहार योजना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम योजनेसाठी रु. 112 कोटी,
19. वारली कला जोपासना व संवर्धन अंतर्गत वारली हाट उभारण्यासाठी रु. 60 कोटी,
20. अनुसुचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी साठी प्रमाण ऑनलाईन प्रणाली गुढी पाडव्यापासुन सुरु.
21. अनु्सुचित जातींसाठी घरकुल योजनेअंतर्गत सन 2019 पर्यंत अनुसूचित जातीचे एकही कुटूंब बेघर राहणार नाही, राहत्या ठिकाणी किंवा भुखंड विकत घेऊन घरकूल बांधुन देणार, यासाठी रु 320 कोटी
22. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमासाठी रु.170 कोटी.
23. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांसाठी रु. 405 कोटी
24. सिंचन प्रकल्पांसाठी रु. 7850कोटीची भरीव तरतुद, गेल्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी जाहिर केलेली  रु. 7272 कोटीची तरतुद पुर्णपणे वितरीत
25. सर्व ग्रामपंचायतींना डीजीटल बोर्ड बसवुन देणार, सर्वसामान्य नागरिकांना गावपातळीवरच सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची सर्वकष माहिती उपलब्ध होणार.
26. मुख्यमंत्री ग्रामसडक  योजनेसाठीरु. 500 कोटी.
27. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी रु. 170 कोटी.
28. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व राज्य रोजगार हमी  योजनेसाठी रु. 3473 कोटी
29. बी ओ टी तत्वावर रस्त्यांचे दुपदरी करण व चौपदरी करण करणेसाठी रु. 550 कोटी
30. हजार किमी चे राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग हायब्रिड अन्युटी माध्यमातून ८ वर्षात टप्प्या टप्याने सुधारणार
31. केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधी योजने अंतर्गत सन 2015-16 मध्ये रु. 4665 कोटीची नविन कामे मंजुर , स्वातंत्र्यानंतरची राज्याला मिळालेली आत्ता पर्यंतची सर्वात मोठी रक्कम
32. सर्वांसाठी घरे 2022 – या केंद्रपुरस्कृत योजनेची काही सुधारणासह राज्यात अंमलबजावणी, राज्याचा सहभाग म्हणून रु. 700 कोटी.
33. नविन चंद्रपुर विकास योजनेसाठी रु. 100 कोटी.
34. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानासाठी रु. 100 कोटी.
35. नागपुर व पुणे मेट्रो प्रकल्पासाठी रु. 180 कोटी
36. मुंबई मेट्रो -3 प्रकल्पासाठी रु. 90 कोटी
37. ८ शहरांचे स्मार्ट सिटी प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातुन राबविणार
38. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान – माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकिकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रु. 137 कोटी.
39. मुला मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी रु. 220 कोटी.
40. सर्व शिक्षा अभियानासाठी रु. 740 कोटी,
41. शालेय शिक्षण विभागांतर्गत संगणक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रु. 180 कोटी
42. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती शताब्दी वर्षानिमित्त रु. 1 कोटीचे  अर्थसहाय्य.
43. पोलिस गृहनिर्माण मंडळास रु. 320 कोटी
44. सिसिटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविण्यासाठी रु. 350 कोटी
45. न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी व न्यायालयीन इमारतीसाठी रु. 491 कोटी
46. अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दर वर्षी 400 कोटी खर्च करण्यात येत आहे.
47. तिवर संवर्धन प्रतिष्ठाणाच्या माध्यमातून समुद्र किना-यावरील लोकांचे जिवनमान उंचावण्यासाठी व्यवसाय व रोजगार वृद्धी
48. माझी कन्या भाग्यश्री  या योजनेसाठी 25 कोटी
49. आपले सरकार पोर्टल मार्फत 156 सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
50. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर स्मारक उभारले जात असल्यास राज्य शासन आर्थिक व भावनिक सहभाग देणार, यासाठी रु 5 कोटी
51. महाराष्ट्र उद्योजकता  परीषद स्थापन करणार
52. राज्य शासनाच्या नविन औद्योगीक धोरणामुळे जाने 2016 पर्यंत 8497 प्रकल्पांनी उत्पादन सुरु केले आहे. यात 262631 कोटी रु. ची गुंतवणूक करण्यात आली आहे, 11.23 लाख थेट रोजगार निर्मिती.
53. उद्योग क्षेत्रातल्या सवलतीसाठी रु. 2650 कोटी
54. वस्त्रोद्योग – कापुस उत्पादक भागात वस्त्रोद्योगाचा विकास व्हावा म्हणून विशेष लक्ष , विविध योजनांसाठी रु. 265 कोटी.
55. कोकणातील विविध 5 जिल्हयातील जेट्टी विकास कार्यक्रमासाठी रु. 30 कोटी
56. ससुन गोदी नुतनीकरण करण्यासाठी रु. 15 कोटी
57. राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेसाठी रु. 300 कोटी
58. नविन पर्यटन धोरण जाहीर, यासाठी रु. 285 कोटी, औरंगाबाद परीसरातील म्हैसमाळ, वेरूळ, सुलिभंजन पर्यटन विकासावर विशेष लक्ष