तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 25 March 2017

पी.शिवशंकर परभणीचे नवे जिल्हाअधिकारी

परभणी  : जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची बदली.
- कोल्हापूर मनपाचे आयूक्त पी. शिवशंकर परभणीचे नवे जिल्हाधिकारी.
- शिवशंकर 2011 च्या बॅचचे अधिकारी

संघर्ष यात्रेत बडेजाव टाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना आदेश.


____________________________

विरोधी पक्षांकडून 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या संघर्ष यात्रेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वपक्षीय नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. संघर्षयात्रे दरम्यान आमदारांनी काय करावे, आणि काय करु नये, यासंबंधीची नियमावलीच तयार केल्याचं समजतंय. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 29 मार्च पासून संपूर्ण राज्यभर संघर्ष यात्रेचं आयोजन केलं आहे. या संघर्षयात्रेचं स्वरुप पाहता, माध्यमातून यावर टीका होऊ नये, यासाठी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय करावं आणि काय करु नये, यासंबंधीचे आदेश सर्व आमदारांना दिले आहेत. यामध्ये संघर्ष यात्रेसाठी सर्वांनी पांढरे कपडे घालावे, गॉगल घालू नये, बडेजावपणा करू नये, असे आदेश देण्यात आल्याचं समजतंय.दरम्यान, या संघर्षयात्रेची सुरुवात 29 तारखे पासून होणार असून, याचा विस्तारीत मसूदा तयार झालेला असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच या संघर्ष यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

आयकरच्या कारवाईत 49 हजार 247 कोटींची काळी संपत्ती उघड.

____________

गेल्या चार वर्षात आयकर विभागानं केलेल्या कारवाईत तब्बल 49 हजार 247 कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिली.2013-14 ते 2015-16 या वर्षात आयकर विभागानं एकूण दोन हजार 534 जणांवर कारवाई केली. त्यात 45 हजार 622 कोटी रुपयांच्या उत्पन्ना सोबतच 3 हजार 625 कोटींची अवैध संपत्ती जप्त करण्यात आली. 2 हजार 432 प्रकरणां मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर 116 जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे. करचोरी रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात येत आहेत.दरम्यान आपली अघोषित संपत्ती उघड करण्यासाठी सरकारनं 31 मार्च पर्यंत दुसरी संधी दिली आहे. त्यानंतर या संपत्तीची माहिती समोर आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.

श्रमदान करुन दुष्काळमुक्त होणार्‍या दोन हजार गावांना कठीण काम मशीनव्दारे करुन देण्याचा उपक्रम


विनोद तायडे
भारतीय जैन संघटनेचा पुढाकार : जिल्हयातील 130 गावांचा समावेश
वाशीम - भारतीय जैन संघटना गेल्या 32 वर्षापासून नैसर्गीक आपत्ती क्षेत्रात देशभरात कार्यरत आहे. 2013 मध्ये बिड जिल्हयात 117 तलावातील 20 लाख क्युबिक मिटर गाळ काढून तो पाच हजार एकर जमीनीवर पसरविण्यात आला होता. 2015-16 मध्ये सुध्दा बिड, लातुर व उस्मानाबाद या जिल्हयात कामे करण्यात आली. महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या 550 मुलामुलींचे शैक्षणिक पुनर्वसन पुणे येथे गेल्या 2 वर्षापासून करण्यात येत आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची तिव्रता गेल्या 5 वर्षात सातत्याने वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षापासून पाणी फाऊंडेशन वॉटरकप स्पर्धा सुरु केली आहे. यावर्षी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या 13 जिल्हयातील 30 तालुक्याची निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धेत दोन हजार पेक्षा जास्त गावांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधींच्या स्वावलंबनाला साजेशे स्वातंत्र्य काळानंतरचे हे सर्वात मोठे काम आहे. असे बिजेएसचे मत असून या चांगल्या कार्याला मदत म्हणून या दोन हजार गावांना कठीण काम मशीनव्दारे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा व राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारेख यांनी दिली आहे. सदर योजनेत वाशीम जिल्हयातील कारंजा तालुक्यातील 130 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. वॉटरकप स्पर्धेत गावकर्‍यांनी स्वत: या कार्यासाठी एकत्र यायचे, पाच लोकांना प्रशिक्षणाला पाठवायचे, आपल्या गावाचा वॉटरशेड मॅनेजमेंट प्लॉन आपणच तयार करायचा व श्रमदानाने करुन काम स्वावलंबी व्हायचे आहे. सदर कार्य हे परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. प्रत्येक गावात भरपुर श्रमदान करण्यात येणार असून श्रमदानानंतर सुध्दा काही काम गावकर्‍यांना श्रमदानाने करता येणे शक्य नाही. कारण प्रत्येक गावात माथ्यापासून पायथ्यापर्यत काम करावे लागते. काही काम खडकात करावे लागणार असल्याने ते काम श्रमदानाने होणार नसल्याचे बिजेएसचा अनुभव आहे. त्यामुळे बिजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी राज्यस्तरावर कार्यकर्त्यांची बैठक घेवून श्रमदान करुन दुष्काळमुक्त होणार्‍या 2000 गावांना कठीण काम मशीनव्दारे करुन देण्याचा उपक्रम हाती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्रङ्गुल्ल पारेख यांच्या नेतृत्वात सर्व जिल्हयात कार्यसमित्या व नियुक्त केलेल्या 50 तालुका सुपरवायझर कडून हे काम 400 पोकलॅन व 1200 जेसीबीच्या सहाय्याने एक महिन्यात पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन महिन्यात एकाच वेळी महाराष्ट्र राज्यातील दोन हजार गावांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कार्याचे नियोजन करुन ते यशस्वी करणे हे एक मोठे आव्हान आहे. मात्र गत 32 वर्षाचा अनुभव पाठीशी असल्याने हे काम जनतेच्या सहकार्याने व आशिर्वादाने नक्कीच पुर्ण करु असा विश्‍वास शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला आहे. गावकर्‍यांनी व जिल्हयातील दानशुरांनी या स्तुत्य उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलेे.
-------------------------------------------------------

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला बहूजन क्रांती मोर्चा


विनोद तायडे
वाशीम - ‘एकच पर्व बहूजन सर्व’ चा नारा देत बहूजन समाज घटकातील लोकांच्या विविध मागण्यांसाठी आज दि. 25 मार्च रोजी बहूजन क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या तालुकास्तरीय मोर्चाचे आयोजन बहूजन क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीने केले होते. विविध समाजघटकातील 45 सामाजीक संघटनांच्या सहकायाृतून हा मोर्चा निघाला.
    जूनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयासमोरील मैदानावरुन हा मोर्चा अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. उन्हाच्या तिव्रतेमुळे या मोर्चात पुरुष मंडळी मोटरसायकलवरुन तर महिला मंडळी ऍटोच्या सहाय्याने मोर्चात मार्गस्थ झाले. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी डॉ. अनिल माने यांनी मोर्चेकरुंना संबोधीत केले. बहूजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक डॉ. रवी जाधव यांनी मोर्चाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. याप्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधी, संजय वैरागडे, गजानन धामणे, सुभाष देवहंस, शरद कांबळे, धनंजय कांबळे, प्रा. संघर्षीत भदरगे, संजय पडघान आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी 27 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्ङ्गत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आले. 
    त्यामध्ये, ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच ऍट्रॉसिटी ऍक्ट साठी स्वतंत्र जिल्हानिहाय जलदगती न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा करुन सहा महिन्यात खटल्याचा निपटारा करण्यात यावा. हिंगोली जिल्हयातील बळसोंड (आनंदनगर) येथील अनुसुचित जातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी व पिडीतांना संरक्षण देवून न्याय देण्यात यावा.लोकशाही मजबूत करण्यासाठी सार्वत्रिक निवडणूका पारदर्शी व्हाव्यात म्हणून बॅलेट पेपरचाच वापर करण्यात यावा. इव्हीएम व्दारे निवडणूक आयोगाच्या माध्यमातुन भारतीय लोकशाहीवर बलात्कार तथा मानवाधिकाराचे उल्लंघन तात्काळ बंद करुन निवडणूक आयोगावर कारवाई करण्यात यावा. जिल्हानिहाय उर्दू आयटीआय व उर्दू सैनिक शाळा निर्माण करण्यात याव्यात. गोरगरीबांसाठी कर्ज वितरणाच्या जाचक अटी शिथील करुन कर्जपुरवठा करावा. याप्रमाणे उद्योगपतींना (रु. 48 हजार कोटी) कर्जमाङ्गी देण्यात आली त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना सुध्दा कर्जमाङ्गी देण्यात यावी. तसेच शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा तसेच शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद करण्यात यावी. 2005 पासून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी. भूमिहीनांना शासकीय जमिनीचे वाटप करण्यात यावी. महिला स्वयंसहायता बचत गटांना 50 टक्के अनुदान व 10 लाख पर्यत कर्जाचे वाटप करण्यात यावे. ग्रामपातळीवर सेवा देणारे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कामगार, ग्रामपंचायत शिपाई, रोजगार सेवक, आशासेविका, कोतवाल यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे. यासह 27 मागण्यांचा समावेश होता.
    या निवेदनात म्हटले आहे की, भारताला स्वातंत्र्य मिळून 68 वर्षे पुर्ण झाली. या 68 वर्षात बहूजन (ओबीसी, एस.सी., एस.टी, व्ही.जे.एन.टी, डी.एन.टी, बलुतेदार, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौध्द, लिंगायत, शिख, जैन) समाजातील समस्या  व अत्याचार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहेत. हे प्रमाण थांबविण्यासाठी व मागण्यांची पुर्तता करण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मागण्यांचे निवेदन मोर्चाच्या वतीने डॉ. रवी जाधव, गजानन धामणे, संजय वैरागडे, मंगल इंगोले, अशोक पखाले, सुभाष देवहंस, संजय पडघान, जनाबाई गायकवाड, गिताबाई कांबळे, मनकर्णाबाई भालेराव, सुमनबाई भालेराव, नंदाबाई कांबळे, रेखाबाई गुडदे आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इव्हएम मशीन हटवून बॅलेट पेपरव्दारे निवडणूका लढविण्याच्या मागणीसाठी तीन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ही मागणी मोर्चाच्या माध्यमातून जोरकसपणे मांडण्यात आली आहे. मोर्चात हिरवे, भगवे, निळे, पांढरे असे विविध प्रकारचे झेंडे आणण्यात आले होते. मोर्चादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पथनाट्यातून साकारले पाणी बचत व मुलगी वाचवाचे वास्तव चित्रण


विनोद तायडे
वाशीम - भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाईची दाहकता तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्याची गरज पथनाट्याव्दारे सादर करुन वाशीम येथील नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी अप्रतिम कला सादर केली. 23 मार्च रोजी तालुक्यातील सुरकंडी येथे जागृती सेवा केंद्र व ग्रामस्थांच्या वतीने वार्म मिशन अंतर्गत समारोपीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होत. यावेळी सदर विद्यार्थीनींनी आपल्या कलेचा अविष्कार घडविला.    
    जागृती सेवा केंद्राच्या वतीने पंचाळा गट ग्रामपंचायत मधील पंचाळा, सुरकंडी खुर्द, सुरकंडी बु, मोहगव्हाण या गावांमध्ये पाणी वाचवा, मुलगी वाचवा, शेती व शेतकरी कसा समृध्द होईल याबाबत वार्म मिशन राबविले गेले. या मिशनचा समारोपीय कार्यक्रम सुरकंडी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील पुंजाजी भोयर हेाते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेसचे समाजविकास अधिकारी मुकुंद देशमुख होते. यावेळी मंचावर सरपंचा सौ. सुरेखा डुबे, नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या प्राचार्या रजुला, शिक्षीका कॅरोलीन, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, सतिश डुबे, ईमाम दर्गीवाले, तंटामुक्ती अध्यक्ष उस्मान भवानीवाले, मुख्याध्यापक ताकवाले, पिरुभाई बेनिवाले, जागृती सेवा केंद्राच्या अर्शलता डिसुजा आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
    यावेळी नॅझरीन नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी विविध प्रकारचे पथनाट्य बहारदारपणे सादर करुन भविष्यात पाणीटंचाई किती उग्र रुप धारण करु शकते याची प्रचिती गावकर्‍यांसमोर मांडली. तसेच मुलींना वाचविण्याची गरज नाटकाव्दारे सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले. या विद्यार्थीनींनी तब्बल दोन तास गावकर्‍यांना खिळवून ठेवले. यावेळी जागृती सेवा केंद्राच्या अर्शलता यांनी गावात निस्वार्थपणे राबवि लेल्या जाणार्‍या मिशनची माहिती दिली. पथनाट्य सादरीकरणाचे सुत्रसंचालन खुशबु गुल्हाने या विद्यार्थीनीने केले तर एकूण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गजानन भोयर यांनी मानले. यावेळी गावातील जि.प. शाळा डिजीटल करण्यासाठी लोकवर्गणीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला गावकर्‍यांनी उत्तम प्रतिसाद देत लोकवर्गणी जाहीर केली. या कार्यक्रमाला शेकडो नागरीक उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी नंतर आता समित्यांच्या सभापतीपदाचे इच्छुकांना लागले वेध

अमोल शिंदे
पारनेर: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी नंतर आता समित्यांच्या सभापतीपदाचे इच्छुकांना  वेध लागले आहेत. ३ एप्रिलला होणाऱ्या या निवडीत पारनेर तालुक्याला सुप्रियाताई(माई) वसंतराव झावरे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद समिती मिळेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.त्यांची निवड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला उभारी देणारी ठरणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत टाकळी ढोकेश्वर गटात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा सुजित झावरे यांचा धक्कादायक पराभव झाला. मात्र भाळवणी गटात त्यांच्या मातोश्री सुप्रियाताई यांनी विजय मिळवला. सुजित जर विजयी झाले असते तर ते राष्ट्रवादीकडून उपाध्यक्ष वा अर्थ बांधकाम समितीचे प्रबळ दावेदार असते.ती उणीव आपल्या आईला समिती मिळवून देवून सुजित भरून काढतील अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. तशी त्यांनी आधीपासूनच तयारी चालवली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर नाउमेद न होता त्यांनी दोन्ही कॉंग्रेसची मोट बांधत पंचायत समिती सेनेच्या ताब्यात जाऊ दिली नाही.शिवाय उपसभापतीपद राष्ट्रवादीला मिळून दिले. जिल्हा परिषद मध्ये दोन्ही कॉंग्रेसची आघाडी व्हावी यासाठी पक्ष निरीक्षक दिलीप वळसे पाटील व राधाकृष्ण विखे यांच्यात सतत चर्चा घडवून आणण्यात सुजित पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली. हे  करत असताना  आपल्या मातोश्री सुप्रियाताई यांना जिल्हा परिषदेत एक समिती मिळावी याची पेरणीही ते करत होते.

सोनपेठ डि.सी.सी.बँकेची अनुदान वाटपासाठी होतेय कसरत.


राधेश्याम वर्मा
--------------------------------------------------------
हैद्राबाद बँकेकडून अपुर्ण अर्थपुरवठा.
------------------------------------------------
सोनपेठ (प्रतिनिधी  )मागील वर्षीच्या दुष्काळामुळे सोनपेठ तालुक्यातील शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान भरपाईपोटी शासनाकडून पाञ शेतक-यांना अनुदान दिले जात आहे.शासन अनुदानाची पुरेशी  रक्कम सोनपेठ च्या स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेकडून मिळत नसल्यामुळे,तालुक्यातील सोनपेठ ,शेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तारेवरची कसरत सुरु आहे.
    मागील वर्षीच्या अल्पशा पावसामुळे  तालुक्यातील कापुस,सोयाबीन,तुर,मुग,संकरीत ज्वारी,बाजरी आदी पिके होरपळुन गेली होती.तसेच तालुक्यातील विहिर,बोअर,तलाव यांची पाणी पातळी खालावल्याने ऊस व फळ पिके करपुन गेली.परिनामी तालुक्यातील  शेतक-यांचे मोठे अर्थीक नुकसान झाले. त्यामुळे शासनाकडून शेतक-यांना अनुदानरुपी अर्थीक मदत देण्यात येत आहे.
यावेळी तालुक्यातील 51 गांवातील 13 हजार कापुस उत्पादक शेतक-यांना शासनाकडून 4 कोटी 38 लाख रुपयांचे अनुदान मंजुर करण्यात आले आहे.अनुदानाची ही रक्कम स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या सोनपेठ शाखेकडे सुपुर्द करण्यात आली आहे. तर अनुदान वाटपाची जबाबदारी तालुक्यातील दोन मंडळातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना देण्यात आली आहे. गेली 15 दिवसांपासुन तालुक्यातील शेतक-यांचे अनुदान वाटप सुरु आहे. शहरातील स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेकडून मागणी पेक्षा कमी  रक्कम मिळत असल्यामुळे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची अनुदान वाटपांसाठी तारेवरची कसरत सुरु आहे. एकुन शेतक-यांपैकी केवळ 30 टक्के शेतक-यांना अनुदान मिळाले असुन उर्वरीत 70 टक्के लाभार्थी वंचीत असुन ससे होलपट सुरू आहे.जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन अनुदान  वाटपासाठी हैद्राबाद बँकेला निर्देश द्यावे  अशी मागणी लाभार्थी शेतकरी करत आहेत.
----------------------------

प्रतिक्रीया :-
सोनपेठ तालुक्यातील लाभार्थी  शेतक-यांच्या अनुदानाची सर्वच रक्कम शासनाकडून स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या सोनपेठ शाखेकडे सुपुर्द करण्यात आली आहे. परंतू या बँकेकडून आजपर्यंत आमच्या बँकेला रोखीमध्ये एक रुपयाही देण्यात आला नाही. शेतक-यांना अडचन येऊ नये म्हणुन डि.डि.व चेक मार्ग अवलंबवून इतर बँकांकडून रक्कम पुरविली जात आहे.त्यामुळे शेतक-यांचे अनुदान वाटपासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे.

- अशोक सोळंके,शाखाधिकारी जि.म.स.बँक सोनपेठ.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
____________________________

नाफेडच्या तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात घोळ आणि गैरव्यवहार होत असल्याचं उघड झालंय. अमरावतीच्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून सुमारे 90 क्विंटल बेवारस तूर जप्त करण्यात आलीय.

कोकणातील शेतकरी, मच्छिमार सावकारी पाशात. रेवदंडातील सावकार पेढीवर पोलिसांची धाड. 2 कोटी 10 लाखाचे गहाण ठेवलेले दागिने जप्त.

पाटण्यात स्टेज कोसळल्याने लालूप्रसाद यादव जखमी.

पोस्ट ऑफिस मध्ये पासपोर्ट मिळण्याची सुविधा कोल्हापुरात सुरु झाली आहे. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं.

मध्य प्रदेश = जबलपूर मध्ये कारखान्यात स्फोट, 6 जण जखमी, काही लोकं कारखान्यात अडकल्याची भीती.

कोल्हापूर = निमशिरगाव येथे वास्तूशांतीच्या जेवणातून 22 जणांना विषबाधा.

गोरखपूर = लखनौ, गाझियाबाद किंवा नोएडा मध्ये एका जागेवर कैलास मानसरोवर भवन बांधणार - योगी आदित्यनाथ.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे गोरखपूर मध्ये भव्यदिव्य स्वागत.

उत्तर प्रदेश = सितापूर परिसरात भीषण आग, 2 लाखांपर्यंतचे नुकसान झाल्याचा अंदाज, 9 घरं आगीत भस्मसात झाल्याची माहिती.

मुंबई = मुंबई विद्यापीठाने कॉ. डांगे यांना मरणोतर डिलीट पदवी द्यावी असे पत्र मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि कुलगुरूंना दिले, 'एस ए डांगे - एक इतिहास' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भाजपाचे नेते आशिष शेलार यांची माहिती.

लखनौ = आजम खान यांचे सचिव एसपी सिंह यांची तीन वर्षांनंतर बदली, कुमार कमलेश घेणार हाती कारभार.

यवतमाळ = महागाव तहसीलदारांनी अवैध गौण खनिज प्रकरणी 2 कंपन्यांना ठोठावला 25 लाख रुपयांचा दंड.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच गोरखपूरमध्ये.

नवी दिल्ली = मानहानी खटल्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात ट्रायल घेण्याचे कोर्टाचे आदेश. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केला खटला.

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, यासाठी सात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून दोन बंदूकधारी पोलीस आहेत.

ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवशी सर्व बाद 300 धावा.

29 तारखेला विरोधी पक्षांनी सभागृहात सन्मानाने यावं, एकत्रित बसून निर्णय घेऊ : गिरीष बापट.

कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदावर नियुक्ती.

उस्मानाबाद = थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी गाळे सिल करण्याची करवाई सुरु, मुख्याधिकारी यांच्यासह पालिकेच्या पथकाकडून करवाई.

विरोधी पक्षातील 19 आमदारांपैकी काही आमदारांचं निलंबन मागे घेण्याची शक्यता,सुत्रांची माहिती.

नाशिक येथील सटाणा तालुक्यातील चिर्राई मढ आणि बैराना मड येथे कुल्फी खाल्ल्याने सुमारे 40 विद्यार्थी तसेच काही महिलांना विषबाधा, उपचारासाठी नामपुर रुग्णालयात केले दाखल.

तुकाराम मुंढे यांची नवी मुंबईतून पुण्यात बदली, मुंढेंची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नेमणूक.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने झळकवले शानदार शतक.

फिफा 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता नवी मुंबई येथील डी. वाय.पाटील स्टेडियमवर करण्यात आली आहे, पाटील स्टेडियम हे देशातील दर्जेदार स्टेडियम असल्याचा शेरा शनिवारी फिफा पाहणी पथकाने दिला.

वाशिम = बाळापूर वरून मालेगावकडे येणा-या ट्रकला मेडशी गावाजवळ अपघात झाला, यामध्ये तीन जण जखमी झाले असून उपचारार्थ जखमींना अकोला येथे हलवण्यात आले आहे.

मराठवाडयाच्या रस्त्यांची 5 वर्षात 60 हजार कोटींची कामे करणार, विमानतळावर शेतकऱ्यांना फळे विक्रीसाठी जागा देणार - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.

औरंगाबाद = डॉ. हेडगेवार रुग्णालयास जेएनपीटी पोर्टच्या सीएसआर मधून 5 कोटिंची मदत, केवळ यंत्रसामुग्री घेण्यासाठी देणार मदत, नितिन गडकरी यांची औरंगाबादेत घोषणा.

मुंबई = इंदू मिलची जमीन राज्य सरकारला हस्तांतरीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा.