तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 1 April 2017

लोकवर्गणीतून काळमवाडी शाळेमध्ये उभा केला ई लर्निंग कक्ष.

सुजित सातपुते.
पिलीव:-भारतातील सर्व शाळा डिजीटल करण्याच्या पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या ध्येय धोरणानुसार माळशिरस तालुक्यातील काळमवाडी या अगदी लहान गावामध्येही शाळा डिजीटल करण्याच्या हेतूने लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेमध्ये ई लर्निंग कक्ष उभा केला असून या कक्षाचे उद्धघाटन थोर देणगीदार चंदूकाका सराफ & सन्स प्रायव्हेट  लिमिटेड बारामती यांच्या  वतीने निकेत फडे व नवनियुक्त डेप्युटी सी.ई.ओ अजय नष्टे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माळशिरस तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी धनंजय देशमुख साहेब यांनी भूषविले.यावेळी पिलीव पोलिस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत चौधरी,जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे, सरपंच दादासाहेब शिंगाडे,केंद्र प्रमुख महादेव नवले, कल्याण नष्टे, एकनाथ मगर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती. यावेळी आदर्श शिक्षक सचिन गाटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की या ई लर्निंग कक्षाच्यामाध्यमातून मुलांच्या बुध्दीला चालना मिळणार असून त्यांच्या गुणवत्तेतही वाढ होण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅक्टर प्रेमनाथ रामदासी & सचिन गाटे यांनी केले व सर्व देणगीदारांचा सत्कार करुन आभार मानले.

परतूर तालुक्यातील 18 दारू दूकाने व बार बंद


आशिष धुमाळ
परतूर: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार परतूर तालुक्यातील दुकाने ही 1 एप्रिलपासून बंद होणार असून यामुळे तालुक्यातील वाटुर,आष्टी,सातोना यासह परतूर शहराच्या आसपासच्या तब्बल 18 दारू दुकाने व बार बंद ठेवण्यात आल्या.
सर्वोच्च न्यायालयाने 8 डिसेंबर 2016 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात 1 एप्रिल 2017 पासून महामार्गावरील मद्य विक्री दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश दिलेले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर लांब अंतरापासून मद्य विक्री करणारी दुकाने असावीत, असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर परतूर येथील दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने आष्टी येथील 5 बार व 1 देशी दारू दुकान,वाटुर येथील 3 बार व 1 देशी दुकान,सातोना येथील 1 बार व परतूर येथील 4 बार व  2 देशी दुकान असे एकुण 12 बार व 4 देशी दारू दुकान व  वाईन शाॅप असे 18 दुकाने बंद करण्यात आली असे मोहन मातकर यांनी कळवले.

पुर्णेत पालकमंञी पाटील यांच्या उपस्थितीत सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन


चौधरी दिनेश
[पिपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थेची कौतुकास्पद कामगिरी]
पुर्णा/सर्वधर्मिय समाजातील गोरगरीब शेतकरी शेतमजूर मागील तिन वर्षापासून सततच्या दुश्काळात होरपळून निघाला असून कौटुंबिक जवाबदारी पार पाडणे तर सोडाच विवाहायोग्य झालेल्या आपल्या मुला-मुलींचे विवाह करणेही त्यांना अवघड झाल्याचे पाहावयास मिळत आहे अश्या सर्वधर्मिय गोरगरीबांना आधार द्यावा व त्यांच्या विवाहयोग्य झालेल्या मुला-मुलींचे विवाह थाटामाटात पार पडावे या करीता येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वतीने आज रविवार दि.02 एप्रिल रोजी दुपारी 12-35 वाजेच्या सुमारास शहरातील बुध्द विहार लगत असलेल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मैदान येथे जिल्ह्याचे पालकमंञी मा.ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील विवाह सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे राहणार असून या विवाह सोहळ्याचे स्वागताध्यक्षांची जवाबदारी मा.नगर सेवक संतोष एकलारे हे पार पाडणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून पुर्णा  नगरीच्या नगराध्यक्षा सौ.गंगाबाई एकलारे,उपनगराध्यक्ष विशाल कदम,उपविभागीय पो.अ.ए.जी.खान,तहसिलदार पांडुरंग माचेवाड,नगर सेवक उत्तम खंदारे,पो.नि.एस.आर.कोल्हे,पंचायत समितीचे सभापती अशोक बोकारे,भिमराव हत्तीहंबीरे,मोहन मोरे आदींसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून सदरील विवाह सोहळ्यास शहरवासीयांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून वधू-वरांना शुभ आशिर्वाद द्यावे असे आवाहन सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजक चंद्रकांत रोटे,शैलेंद्र कनकुटे निमंञक अरविंद पांडववीर,संयोजक राजेश्वर पाटील विनीत मोहन लोखंडे,चंद्रकांत उगले,सुभाष पांडववीर,ॲड्.बालासाहेब उगले आदींनी केले आहे

सोनपेठ शहर हगंदारीमुक्त. शहराला मिळनार महाराष्ट्र शासनाकडुन एक कोटींचे बक्षीस

फोटो आहे..

जिल्ह्यातील सोनपेठ नगरपरिषेदेचा होनार महाराष्ट्र शासनाकडुन गौरव.

 
सोनपेठ  / प्रतिनिधी -:
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धरतीवर राज्यामध्ये सुध्दा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करनारया नगरपरिषद/ नगरपंचायतींची राज्यस्तरीय समितीकडून तपासणी करून महाराष्ट्रातील पंधरा नगरपरिषेदा महाराष्ट्र शासनाने निवडलेल्या आसुन परभणी जिल्ह्यातील सोनपेठ या नगरपरिषेदेची सुध्दा यात निवड झाली आसुन सोनपेठ नगरपरीषेधेला महाराष्ट्र शासनाकडुन प्रोत्साहनपर अनुदान म्हणुन एक कोटी रूपये मिळनार आसुन त्यातील पहिला हप्ता हा 30% म्हणजेच तीस लाख रूपयांचा आसनार आसल्याची माहिती सोनपेठ नगरपरिषेदेच्या नगराध्यक्षा सौ.जिजाबाई चंद्रकांत राठोड यांनी पञकार परिषेद घेउन सांगितले.
 स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोनपेठ नगरपरिषेदेमध्ये प्रभावीपणे राबविले आसल्याने सोनपेठ शहराला हा बहुमान मिळाला आहे.
 याच अभियानांतर्गत हागनदारी मुक्त होनारया शहरांसाठी महाराष्ट्र शासनाकडुन प्रोत्साहनपर अनुदान म्हणुन जो निधी दिला जानार आहे तो कोटी मध्ये आसनार आसुन यातील 30% रक्कम नुकतीच मंजुरी झाली आसल्याने ती सोनपेठ नगरपरीषेदेला 30 लाख रूपये पहिल्या हप्त्यात मिळनार आहे.
शहराच्या बाबतीत ही मोठी आनंदाची बाब आसुन संपूर्ण सोनपेठकरांचे आभार नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांनी पञकार परिषेदेत मानले या पञकार परिषेदेला,उपनगराध्यक्ष दत्तराव कदम,काॅग्रेसचे गटनेते चंद्रकांत राठोड,दिगांबर भाडुळेपाटील,रमाकांत राठोड,विनोद चिमनगुंडे, निलेश राठोड,जिलानीभाई कुरेशी,पिंटु कांदे आदी नगरसेवक उपस्थित होते.

[[[ शहरातील स्वच्छतेलाच प्राधान्य - सौ.जिजाबाई चंद्रकांत राठोड (नगराध्यक्षा सोनपेठ )

सोनपेठ शहराला हागंदारीमुक्त करन्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकार्य केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतिने मिळालेला हा मोठा बहुमान आसुन आता मी एक महिला नगराध्यक्षा आसल्याने माझ्यावर शहराच्या स्वच्छतेची मोठी जबाबदारी आसुन यापुढेही शहरातील स्वच्छतेलाच प्राधान्य देऊन या माध्यमातून मिळनारा संपूर्ण निधी शहराच्या स्वच्छतेलाच वापरून शहरात कचरा वाहन्यासाठी घंटागाड्या,आवश्यक आसतील तेथे सार्वजनिक शौचालय ऊभे करनार आसल्याचे नगराध्यक्षा जिजाबाई राठोड यांनी घेतलेल्या पञकार परिषेदेत सांगितले. ]]]

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नसता सत्तेवरून बाजुला व्हा - अजित पवार


गेवराईच्या सभेत सरकारवर हल्लाबोल
--------------------------------

सुभाष मुळे ....
-------------
गेवराई, दि. १ : सरकार चालवत असताना सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नाची जान ठेवली पाहिजे परंतु या सरकारने निराशा केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नसता सत्तेवरून बाजुला व्हावे, कर्जमाफी आम्ही देऊ असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शनिवार दि. १ एप्रील रोजी सायंकाळी ७:३० वा. जगदंबा आयटीआय मैदान, गेवराई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व सर्व विरोधी पक्ष यांनी एकत्र येवुन राज्यातील शेतकर्‍यांच्या संपुर्ण कर्ज माफीसाठी विराट जाहिर सभा झाली. यावेळी बोलताना म्हणाले की, या सरकाराकडुन शेतकर्‍यांच्या पिकांना चांगला भाव मिळत नाही व कर्जमाफी यासाठी आम्ही चांद्या पासुन बांद्या पर्यत संघर्ष यात्रा काढुन शेतकर्‍यांची कर्ज माफ झाले पाहिजे यासाठी आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत. ही संघर्ष यात्रा 19 आमदार यांच्या निलंबनासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी काढली असुन अनेक भागात आम्ही भेटी दिल्या आहेत. सगळीकडेच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुर खरेदीसाठी लागणारा बारदाना खरेदी करण्याची अक्कल या सरकारला नसुन कोणत्याही पिकांना हमी भाव या सरकाराकडुन शेतकर्‍यांना दिला जात नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आम्ही आमचे सरकार असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते आणि आम्ही करवुन दाखवले होते. आपण सर्वानी संघटीत होऊन रस्त्यावर उतरून पुढे यायला पाहिजे. काही भाजपचे नेते सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना राबवत आहोत पण  या लोकांना शिवार म्हणजे काय ते आधी माहित आहे का ते सांगा असा खोचक सवाल या ठिकाणी त्यांनी सत्ताधारी लोकांना केला व त्यांनी भाजपा सरकारला टोला लगवला की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या नसता सत्तास्थानावरून बाजुला व्हा आम्ही कर्जमाफी देवू तसेच या भाजपाचे मुख्यमंत्री यांना सत्तेची मस्ती चढली असल्याचे ही यावेळी संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, समाजवादी पार्टीचे नेते आबु आझमी, पंतगराव कदम, आ. जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे प्रविण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडचे नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर आदी उपस्थितांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुरेशराव हात्ते यांसह इतर पदाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. अमरसिंह पंडित यांनी यावेळी केले.
  यावेळी माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, संदिप क्षीरसागर, खरेदी विक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, कारखान्याचे जेष्ठ संचालक पाटीलबा मस्के, माजी सभापती आप्पासाहेब गव्हाणे, पांडुरंग कोळेकर, भरत खरात, कुमारराव ढाकणे, बबनराव मुळे, माजी उप सभापती जगन पाटील काळे, भवानी बँकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, राजेंद्र वारंगे, डॉ. घाडगे, डॉ. आसाराम मराठे, जालिंदर पिसाळ, प्रभाकर ससाणे, मुजीब पठाण, माऊली आबुज, वसंतराव उबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुरेशराव हात्ते यांनी मानले.

::: ✍ :::
प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787

धनगर समाजाचे जोडे मारो आंदोलन 

सुजित शिंदे
उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांची बैठक त्यांच्या निवासस्थानी घेतली होती. त्यात धनगर समाज आरक्षणास व स्वतंत्र ओबीसी मंत्रालयास नकार दर्शविला. त्यास विरोध म्हणून उस्मानाबाद येथील धनगर समाजाच्या वतीने शिवाजी चौकात सकाळी 11 वाजता मोदी व फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन त्यांचे दहन करण्यात आले. तसेच सकारात्मक निर्णय लवकरात लवकर न झाल्यास तीव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.

सध्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आंदोलनात आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनमध्ये धनगर समाजास आरक्षण देवू, तो तुमचा घटनात्मक अधिकार आहे असे सांगितले होते. त्यानंतर सोलापूरच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाज खूप मागास आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते एस.टी. चे आरक्षण आम्ही देणारच, ही भूमिका मांडली होती. नंतर महाराष्ट्रात जे सत्ता परीवर्तन झाले ते धनगर समाजामूळे व मला पदही मिळाले तेही धनगर समाजामूळेच. अशी भूमिका नागपूर मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. 

पण सरकार येवून निम्मा कार्यकाळ संपला तरी आरक्षण दूरच पण आरक्षणाच्या विरोधात सरकारचे सूर उमटत आहेत. म्हणून धनगर समाजाने जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी श्री.भारत आप्पा डोलारे, सक्षणा सलगर, युवराज शिंदे, बालाजी तेरकर, गोरोबा पंचमहालकर, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.मनोज डोलारे, संदीप वाघमोडे, देवा काकडे, बालाजी वगरे, प्रा.बालाजी काकडे, सुरेश शिंदे, वसंत करडे, श्रीकांत तेरकर, प्रशांत थोरात, प्रशांत सोनटक्के, गणेश एडके, शाम तेरकर, ज्ञानेश्वर सोनटक्के, दीपक फोलाणे, सचिन कसपटे, शंकर ठोंबरे, सचिन वाघमारे, सुनील घायाळ, मारुती काकडे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर


विनोद तायडे
वाशिम,  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, दि. २ एप्रिल २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. समस्त बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा) येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री पोहरादेवी येथे येणार आहेत.
बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे प्रत्येक वर्षी गुढी पडावा ते रामनवमी या कालावधीत मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आदी राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पोहरादेवीमध्ये येणार आहेत. दि. २ एप्रिल २०१७ रोजी सकाळी १०.२५ वाजता ते अकोला जिल्ह्यातील शिवनी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने पोहरादेवीकडे प्रयाण करतील. सकाळी १०.४५ वाजता त्यांचे पोहरादेवी येथील हेलिपॅडवर आगमन होईल. येथून मुख्यमंत्री फडणवीस सेवालाल महाराज मंदिराकडे प्रयाण करतील. सकाळी १०.५५ वाजता त्यांचे संत सेवालाल महाराज मंदिर येथे आगमन होईल. याठिकाणी आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर ते हेलिपॅडकडे व तेथून हेलिकॉप्टरने माळीण (जि. पुणे) कडे प्रयाण करतील.
*****

सोलापूर जिल्ह्यातील 654 दारू दुकाने आजपासून बंद

कालिदास अनंतोजी
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सोलापूर जिल्ह्यातील 895 दारू दुकानांपैकी 654 दारू दुकाने ही 1 एप्रिलपासून बंद होणार असून यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 8 कोटी 66 लाखांचा महसूल बुडणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 8 डिसेंबर 2016 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात एप्रिल 2017 पासून महामार्गावरील मद्य विक्री दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश दिलेले आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटर लांब अंतरापासून मद्य विक्री करणारी दुकाने असावीत, असेही न्यायालयाच्या आदेशात म्हणण्यात आलेले आहे.

या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने     सोलापूर जिल्ह्यातील  दारु दुकानांचा सर्व्हे केला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील सर्व द्रुतगती महामार्गा, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग यांची माहिती संकलित करुन राष्ट्रीय व राज्य महामार्गांची पाहणी केली. या महामार्गावर असलेल्या देशी दारू, वाईन शॉप, परमिट रूम, बिअर शॉपी अशा दुकानांचा सर्व्हे केला.

सोलापूर जिल्ह्यात देशी दारू, वाईन शॉप, परमिट रूम, बिअर शॉपी  अशा दुकानांची संख्या ही 895 इतकी असून त्यातून सन 2016-17 या वर्षात फी स्वरूपात 11 कोटी 31 लाख रुपये महसूल उत्पादन शुल्क विभागाला मिळाला आहे.

न्यायालयाच्या निकालानुसार जिल्ह्यातील 895 पैकी 654 दुकाने बंद होणार असून त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. त्यामुळे उर्वरित 241 दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या निकालामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 8 कोटी 66 लाख रुपयांचा महसूल बुडणार असून केवळ 2 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा जवळपास 75 टक्के महसूल बुडणार आहे.

शहर आणि जिल्ह्यातील सर्वच मद्य विक्री करणार्‍या दुकानांना तसेच परमिट रुमधारकांना सन 2017-18 वर्षाच्या फी नूतनीकरणासाठी कळविण्यात आलेले असून महामार्गावरील 500 मीटरच्या आत असलेल्या दारु विक्री दुकानदारांना फी भरण्याचे चलन देण्यात आलेले नाही.
कालिदास आनंटोंजी
9921404070

उद्धव ठाकरेंकडून पक्षांतर्गत मोठ्या फेरबदलांचे संकेत : सूत्र

कालिदास स्नानतोजी
मुंबई : उद्धव ठाकरे पक्षांतर्गत मोठे बदल करण्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. यासाठी शिवसेनेच्या आमदारांशी फोनवर सविस्तर चर्चा करून, उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल आढावा घेतल्याचं समजतं आहे.

आमदारांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मंत्र्यांचे चेहरे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसंच यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना कळ सोसण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवरही कामालीचे नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत आमदारांनी आपल्याच मंत्र्यांना खडेबोल सुनावले होते. मतदारसंघात फिरताना लोकांनी आमदारांचे कपडे काढण्याचे बाकी राहिले आहे, अशा शब्दात सेनेच्या आमदारांनी मंत्र्यांवर संताप व्यक्त केला होता.

त्यानंतर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत ग्रामीण भागात नव्याने पक्षबांधणी, केंद्रातली भूमिका, आमदारांच्या मतदारसंघातील कामं आणि पुढच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी याबाबत बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीलाही सेनेचे सर्व मंत्री उपस्थीत होते.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास ग्रामीण भागातील नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल कि, पुन्हा मातोश्रीशी जवळीक असलेल्यांचीच वर्णी लागेल याची जोरदार चर्चा सध्या सेना आमदारांमध्ये सुरू आहे.

कालिदास अनंतोजी
नांदेड 9921404070

सुतगिरणी चौकातील कुंटणखाण्यावर छापा ; आंटीसह ग्राहक अटकेत

कालिदास अनंतोजी
औरंगाबाद - गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकाजवळील एका उच्चाभू्र वस्तीतल्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पुंडलीकनगर चौकी पोलिसांनी आज सांयकाळच्या सुमारास छापा मारला.

त्यात कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह पिडीता आणि ग्राहकाला ताब्यात घेतले. जया गणेश घाणे (२४, रा. अहमदनगर) असे आंटीचे नाव आहे. अठवडाभारात ही पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली दुसरी कारवाई आहे़.

पुंडलीकनगर पोलीस चौकीचे पोलीस निरिक्षक आशोक मुदीराज यांना एका रिक्षा चालकाने प्रत्यक्ष भेटून माहिती दिली की, सूतगिरणी चौकातील हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या अर्पामेंटच्या दुसऱ्या माळ्यावर कुंटनखाणा चालविल्या जात आहे़ या ठिकाणी शहरासह इतर जिल्ह्यातील गिऱ्हाईक आणि तरुणी येत असतात़

रिक्षा चालकाच्या माहिती नंतर मुदीराज यांनी त्याआधारे सहायक पोलिस आयुक्त माणिक बाखरे, पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज, उपनिरीक्षक रामचंद्र पवार, अनिता फसाटे, शिपाई विलास डोईफोडे, संतोष पारधे आणि कोमल तारे यांनी त्या घरावार छापा मारला. यावेळी ग्राहक अनिल विठ्ठलराव ठोंबे (३५, रा. विजयनगर) याच्यासह आंटी जया घाणे व पिडीतेला ताब्यात घेण्यात आले. तर घटनास्थळी असलेली कार एमएच-२०-सीएच-७८८५) देखील जप्त करण्यात आली आहे.

आंटी जयाच्या ताब्यातून पोलिसांनी तीन हजार रुपये हस्तगत केले. पीडित तरुणीची सुटका करण्यात आली़.

कालिदास अनंतोजी
नांदेड 9921404070

जिल्हा रुग्णालयात तोडफोड, महिलेवर चुकीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप

कालिदास अनंतोजी
औरंगाबाद : सिडको परिसरातील मोतीवालानगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेवर चुकीची शस्क्रीया केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली़ ही घटना काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली़

या प्रकरणी डॉ़. मंजुषा जिला यांच्या तक्ररीवरून रात्री बारा वाजेच्या सुमारास आठ ते दहा तरुणांच्या टोळक्यांवर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे़.

या संदर्भात जिन्सी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ़ मंजुषा जिल्ला यांच्या प्रसुती रुग्णालयात शुक्रवारी साजेद बेगम (वय ३६ रा़अलतमश कॉलनी) यांना पोटात त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला डॉ़ मंजूषा यांनी दिला होता़ त्यानुसार शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र रुग्णाला बीपी आणि शुगरचा त्रास असल्याचे लक्षात आल्याने शस्त्रक्रियेची तयारी सुरू असतांनाच त्यांची प्रकृती खालावली़ ही माहिती जिल्ला यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिली असता साजेदा यांच्या सोबत आलेल अफ्रिन अंजूम आणि मोहमंद मेहराज यांच्यासह नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली़

रुग्णांच्या नातेवाईकांची निवसास्थाने ही जिल्हा रुग्णालया जवळच असल्याने काही मिनीटात रुग्णालयात मोठा जमा जमला़, या जमावाने जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना माहरहाण करत शिविगाळ केली तर आठ ते दहा तरुणांच्या टोळक्याने रुग्णालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केली़

या घटनेनंतर डॉ़ जिल्ला यांनी तातडीने परिमंडळ दोनचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांना भ्रमण ध्वणीवर रुग्णालयात झालेल्या तोडफोडीची महिती दिली़

त्या नंतर काही मिनिटात रुग्णालयात जिन्सीसह सिडको पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता़

रुग्णांच्या नातवेईकांनी आरोप केला आहे की, साजेदा बेगम यांना त्यांच्या नातेवाईक असलेल्या महिला डॉक्टरनेच जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले होते़ येथील डॉक्टरांनी चुकीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे़ शास्त्रक्रिया करण्यापुर्वी त्यांनी कोणत्याही परवानगी पत्रावर स्वक्षरी घेतली नाही़, रुग्णाची प्रकृती खालवल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्ला यांनी रुग्णाला घाटीत हलविण्याचा सल्ला दिल्याचेही साजेदा यांचे नातेवाईक मोहमंद मेराज यांनी दिली आहे़