तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 8 April 2017

वडगाव रासई येथे अजितदादांच्या हस्ते ग्राम सचिवालयाचे उदघाटन

अमोल शिंदे
पारनेर:-काल  दि.०८ एप्रिल २०१७ रोजी वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे ग्राम सचिवालय या शासकीय इमारतीचे उदघाटन राज्याचे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते झाले.  उदघाटन प्रसंगी अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष मा.श्री. जालिंदरभाऊ कामठे, शिरूर-हवेलीचे मा आमदार मा.श्री. अशोकबापू पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.श्री. मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील, कृषि व पशुसंवर्धन सभापती मा. सौ. सुजाताभाभी पवार, शिरूर तालुका अध्यक्ष मा.श्री.रवीबापू काळे, तालुका युवक अध्यक्ष मा.श्री. कुंडलिक शितोळे, शहर अध्यक्ष मा.श्री. झाकीरखान पठाण, पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका मा.सौ.वर्षाताई शिवले, शिरूर पं.स.सभापती मा.श्री. सुभाष उमाप, शिरूर पं.स. उपसभापती मा.सौ. मोनिकाताई हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब नरके, शिरुर शहर युवक अध्यक्ष श्री. रंजन झांबरे कारखान्याचे संचालक मा.श्री.दिलीपदादा मोकाशी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. बाळासाहेब नागवडे, श्री. बाबासाहेब फराटे, श्री.दत्तात्रय फराटे, श्री.सुधीर फराटे, श्री. प्रशांत होळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

बसस्थानकाची सफाई करताना बिडच्या दबंग खासदार प्रितमताई गोपीनाथराव मुंडे.

प्रतिनिधी
बीड:-स्वछता आभियान रावबवताना कसलाही स्वाभिमान न बाळगता बिड बस्थानकाची साफ सफाई करताना बिडच्या स्वाभीमानी दबंग खासदार प्रितमताई गोपीनाथराव मुंडे

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
____________________________

बोगस कॉल सेंटर प्रकारणातील मुख्य आरोपी  सागर तथा शेगी ठक्कर याला ठाणे गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. जवळपास 500 कोटी कोटी रुपयांचा गंडा विदेशी नागरिकांना घातला होता.

शेती करत व्यायामाचा छंद जोपासणाऱ्या इंदापूरच्या एका तरुणाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. एक तासात तब्बल 2 हजार 993 पुशअप्स मारण्याचा पराक्रम केल्याने उमेश व्यवहारे यांची गोल्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे.

राम मंदिरासाठी तुरुंगात आणि फाशी वरही जाईन : उमा भारती

सोमवार पासून कांद्याचे पैसे रोख मिळणार, पिंपळगाव बाजार समितीचा निर्णय, नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना चेकने पैसे दिले जात होते.

राजस्थान = अलवर मधील गोरक्षेच्या नावाखाली झालेल्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक

जम्मू आणि काश्मीर = राजौरी जिल्ह्यातील नौशैरा विभागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, लष्कराकडून चोख प्रत्युत्तर

आयपीएल 10 : किंग्ज इलेव्हन पंजाबची पुणे सुपरजायंट्सवर 6 गडी राखून मात.

कर्नाटक मधील पोटनिवडणुकीत येडीयुरप्पा यांनी कथितरित्या पैसेवाटप केल्याने काँग्रेसने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार.

नवी दिल्ली = आपच्या कार्यालयाची मान्यता रद्द केल्याने दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल संतप्त, आपच्या विकास कामांमुळे भाजपाचा होतोय जळफळाट, पालिका निवडणुकां मध्ये जनताच भाजपाला धडा शिकवणार, केजरीवालांचा दावा

भारत एक प्रबळ आणि विश्वसनिय मित्रासारखा बांगलादेशच्या मागे उभा आहे आणि राहील - मोदी

भारत आणि बांगलादेश सुख-दु:खातले सोबती, दोन्ही देशातील जनता एकमेकांसोबत असल्याने भारत आणि बांगलादेश एकमेकां सोबत - मोदी

1971 साली भारताने दाखवलेली मानवता गेल्या शतकातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एक होती - मोदी

मुंबई मनपाच्या 2700 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा,कामगारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय.

अहमदनगर = कांदा पिकाचे कर्ज वाढल्यामुळे राहुरी येथील शेतकऱ्याने केली मुळा नदीच्या पाञात आत्महत्या.

मुंबई = 70 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त, चार जण ताब्यात. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचची कारवाई. जप्त केलेल्या सर्व दोन हजार रुपयांच्या नोटा

औरंगाबाद = विदेशी मद्यासह 9 लाखाचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज शिंगणापूर येथे शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले.

जम्मू काश्मीर = पीडीपी नेत्याची सभा सुरु असताना दहशतवाद्यांचा गोळीबार, पोलिसांनी परिसर केला सील.

विरार मध्ये 1 लाख 35 हजारांचा अवैध दारुसाठा जप्त, विविध कंपन्यांच्या दारुच्या बाटल्यांचा समावेश.

अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात, ट्रकचा टायर फुटल्यानं झाला अपघात, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी.

यवतमाळ = हळद उखळताना मोठ्या कढईत पडून शेतक-याचा मृत्यू, महागाव तालुक्यातील टेंभी (काळी) येथील घटना, सतीश मस्के असे मृत शेतक-याचे नाव.

पाकिस्तानी क्रिकेटपटू युनूस खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे, वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तो निवृत्त होईल.

एअर इंडियानंतर खासगी विमान कंपन्यांनीही शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्या वरील बंदी उठवली.

भारत आणि बांगलादेश मध्ये 22 करारांवर स्वाक्ष-या.

बांगलादेश भारताचा विश्वासू सहकारी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नागपूर विद्यापीठात सुरु असलेले जातीचे राजकारण दुर्दैवी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विद्यापीठातील.

सेनगांव शहरात नाल्या तुंबल्याने घाण पाणी येत आहे रोडवर!

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- सेनगांव शहरात ठिकठिकाणी नाल्या तुंबल्याने नाल्याचे घाणपाणी व संडासचे घाण पाणी रोडवर येत असल्याने सर्वत्र दुर्गंधी येत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
सेनगांव ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायत मध्ये झाले झाल्याने नागरीकातुन आनंद व्यक्त करण्यात आला ग्रामपंचायतच्या काळात नालीसफाई करणार्या कामगारांना पैसे न दिल्याने त्यांनी कामावर न येण्याचा निर्णय घेतला नगरपंचायत ची स्थापना होऊन ही अजुन ही नगरपंचायतने नालीसफाई कामगार न ठेवल्याने सेनगांव शहरातील ठिकठिकानच्या नाल्या तुंबल्या असुन त्या नालीतील घाणपाणी व संडासचे घाणपाणी रस्त्यावर येत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. प्रभाग क्रमांक ०२ मध्ये शहरातील ग्रामदैवत श्री.आप्पास्वामी महाराज यांचे मंदिर असुन या मदिरात दर्शनासाठी परिसरातील गांवासह शहरातील नागरीकांची नेहमीच गर्दी आसते याच मंदिर परीसरात मोठ्याप्रमात नाली तुंबल्याने नालीचे घाणपाणी व संडासचे घाणपाणी मंदिर परीसर रोडवर येत असल्याने भावीक भक्तांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुले भावीक भक्तातुन ग्रामपंचायतच बरी म्हणुन संतपाची लाट पसरल्याचे पाहावयास मिळत आहे. सेनगांव नगरपंचायत ला तरुण कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी लाभल्याने ते तरी लवकरात लवकर नालीसफाई कामगार रुजु करुन घेतील व नाल्या साफ होऊन शहरातील ठिकठिकाणी रोडवर घाणपाणी येणे बंद होईल अशी आशा सेनगांव शहरातील नागरीकांना आहे.

सोनपेठ बसस्थानकात बसच्या चाकाखाली आल्याने मुलगा जखमी

प्रतिनिधी
सोनपेठ -:येथील बसस्थानकात आज दिनांक 8 एप्रिल शनिवार रोजी दुपारी एक वाजता परळी-सोनपेठ बसेस मागच्या चाकाखाली येऊन तेरा वर्षाचा ओम सुरवसे हा गंभीर जखमी झाल्याची घटणा घडली.
ओम सुरवसे हा मुळचा खपाट पिंप्री येथील रहिवासी आसुन तो सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालय या शाळेत ईयत्ता सातवी मध्ये आसल्याने त्याची परिक्षा सुरू आहे.परिक्षेचा पेपर होताच तो ईतर विद्यार्थ्यांसोबत आपल्या गावाकडे खपाट पिंप्री ला जान्यासाठी बसस्थानकात नेमक्याच चालु झालेल्या बसेसच्या मागच्या चाकावर   ऊभे राहुन जागा पकढत होता त्याचवेळी त्याचा तोल गेला व तो बसेसच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाला.
आजुबाजुच्या प्रवाशांनी आरडाओरड केल्याने बस खाली आडकलेल्या ओम ला बाहेर काढुन त्याला पुढील ऊपचारासाठी आंबाजोगाई येथील शासकीय आरोग्य केंद्रात दाखल केले आसुन त्याच्या दोन्ही पायावरून बसच्या मागचे चाक गेल्याने त्याच्या दोन्ही पायांना मोठी ईजा पोहचली आहे.
येथील बसस्थानक परिसरात ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात आणि बस येताच हे विद्यार्थी बसमध्ये जागा पकडन्यासाठी बसेसच्या चचाकावर,चालकाच्या कॅबेनमधुन,मागे आसलेल्या आपत्कालिन खिडकीतुन आत शिरत आसतात आज घडलेल्या या घटणेमुळे पालखासह,शिक्षकांनी व परिवहन विभागातील कर्मचारयांनी थोड लक्ष देण्याची गरज आहे.

सोनपेठ पत्रकारांचे वतीने अनंदोत्सव साजरा

प्रतिनिधी
सोनपेठ-:महाराष्ट्र शासनाने पत्रकार संरक्षण कायदा मंजुर केल्यामुळे मागील एक तपापासुन प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांनी शनिवार रोजी सोनपेठ शहरातील शिवाजी चौक येथे फटाके फोडून अनंदोत्सव साजरा केला.
राज्यासह देशातील लोकशाहीचा चौथा अधार स्तंभ असलेल्या पत्रकारांवर स्वातंत्र्यापासुन आनेकवेळा किरकोळ व गंभीर हल्ले झाले होते.यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ,पत्रकार संरक्षन कायदा करण्याची मागणी राज्यातील पत्रकारांकडून गेली बारा वर्षांपासुन केली जात होती.यावेळी सुरु असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात भाजपा सरकारने पत्रकार संरक्षन कायदा पारीत करुन मंजुर केला आहे.मागील आनेक दिवसांच्या मागनीला आखेर फडनविस सरकारने आखेर मान्यता दिल्यामुळे सोनपेठ येथील पत्रकारांचे वतीने शहरातील चौकांचौकात फटाके फोडून,मिठाई वाठूुन अनंदोत्सव साजरा करन्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुग्रीव दाढेल,शिवमल्हार वाघे,बाबासाहेब गर्जे, खदिर विटेकर,मंजूर मुल्ला,राधेश्याम वर्मा,
सुभाष सुरवसे,
माणिक केंद्रे,कृष्णा पिंगळे, माधव जगताप,यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थीत होते.

पालम तालुक्यातील पारवा येथील अंगणवाडी मदतनीस चा विनय भंग आरोपी वर गुन्हा दाखल आरोपी अटक

अरूना शर्मा

पालम :- पालम तालुक्यातील पारवा येथे दि.8 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता मदतनिस व तिची सहकारी अंगणवाडी सेविका ह्या दोन्ही महिला गावातील अंगणवाडीत लहान मुलांसाठी मटकी वाटप करत होत्या वाटप करत असतांना पारवा गावातील गोपाळ दत्तराव कऱ्हाळे हा जि.प.शाळेतील खोली समोर हा दारू पिऊन अंगणवाडी मदतनीस यास म्हणाला की मला खाऊ खाण्यास द्या असे म्हणाला नंतर मदतनिस महिलेने कऱ्हाळे यांच्या हातावर मटकी दिली. व रिकामी झालेली पळी खोलीत ठेवण्यासाठी गेली असता त्या आरोपीने हातातील मटकी फेकून त्या महिलेच्या मागे खोलीत गेला व वाईट हेतूने खोलीचा दरवाजा लावून घेतला तेव्हा त्या मदतनीस ची सहकारी अंगणवाडी सेविका हिने दरवाजा जोरात ढकलून त्या मदतनिस महिलेची सुटका केली तेव्हा हा झालेला प्रकार अंगणवाडी सेविका व गावातील बापूराव इरबाजी कऱ्हाळे यांनी हा सर्व प्रकार बघितला त्या नंतर त्या मदतनीस व अंगणवाडी सेविका व गावातील बापूराव कऱ्हाळे यांनी पालम पोलीस स्टेशन गाठले व त्या महिलेने रीतसर तक्रार दिल्या वरून गोपाळ दत्तराव कऱ्हाळे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कलम 353, 354 (3) (1) 342 भा.द.वि.प्रमाणे दाखल करण्यात आला असून तातडीने पालम सहा पो.निरीक्षक रवींद्र बोरसे यांनी पारवा येथे जाऊन आरोपी गोपाळ कऱ्हाळे यास तातडीने आटक करून जेर बंद केले.

शिवसेना जिल्ह्य़ात मजबूत करणार - युधाजित पंडित

सुभाष मुळे...
-------------
गेवराई, दि. 8 : बीड जिल्हा परिषदे मध्ये मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून, दर्जेदार विकासात्मक कामे केली जातील. सामान्यांच्या कामाला प्राधान्य देऊन, सबंध जिल्ह्यात शिवसेना मजबूत करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे नूतन अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली आहे.
          बीड जिल्हा परिषदेत पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी राज्यमंत्री सुरेश धस, आ. विनायकराव मेटे यांच्याशी आलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे शिवसेना, भाजप, शिवसंग्राम अशी युती करून सत्ता स्थापन केल्यानंतर, उपाध्यक्षपद नाकारून, अर्थ व बांधकाम विभाग शिवसेनेकडे घेऊन बदामराव पंडित यांनी आपले राजकीय प्राबल्य दाखवून दिले आहे. राज्यात कोठेही भाजप व शिवसेना अशी युती झाली नाही, मात्र बीड जिल्ह्यात अपवाद म्हणून ही युती पहायला मिळाली. गेवराई पंचायत समितीत कमी संख्याबळ असूनही शिवसेनेने सभापदी व उपसभापती ही दोन्ही पदे आपल्या ताब्यात ठेऊन पहिल्यांदाच येथील पंचायत समितीवर भगवा फडकवला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये सत्ता स्थापन करण्यात युधाजित पंडित यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. कार्य पद्धती आणि संघटन कौशल्य पाहूनच युधाजित पंडित यांच्याकडे अर्थ व बांधकाम या महत्वाच्या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागाचा पदभार स्विकारताच माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह मुंबई येथील मातोश्रीवर जाऊन युधाजित पंडित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या वतीने त्यांचा हृदयसत्कार केला.
      आपल्या पदाचा व सत्तेचा उपयोग सामान्य जनतेच्या हितासाठीच केला जाईल तसेच दर्जेदार विकासात्मक कामांसह, जिल्ह्यात शिवसेना मजबूत करणार असल्याची ग्वाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांनी दिली आहे.

╭════════════╮
       ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

पालम भाजपा कडून उपजिल्हाधिकारी संदिप भस्के यांचा जंगी सत्कार

अरुणा शर्मा

पालम :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत पालम तालुक्यातील वाडी (खुर्द) येथील संदीप सदाशिवराव भस्के यानी 511 गुण मिळउन उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्या बदल पालम येथील भारतीय जनता पार्टीचे जेष्ट नेते व माझी जिल्हा परिषद सभापती गणेशरावजी रोकडे (दादा) यानी उपजिल्हाधिकारी श्री संदिप भस्के याचा शाल श्रीफळ व हार घालून त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगर पंचायतचे नगर अध्यक्ष बालासाहेब रोकडे, अशोकराव पौळ, माजी सरपंच लक्ष्मणराव रोकडे, भागवत बाजगिर, गजानंद रोकडे, लीबाजी टोले, शिवाजीराव दिवटे, सोपानराव कराळे, बाबासाहेब ऐगडे, दत्तराव   घोरपडे, डॉ.शेख बडेसाहेब, विजयकुमार शिंदे, गणेश घोरपडे, डॉ.उदरे, नरहारी घोरपडे, जळबाजी फुले, अमोल सुपेकर, ताहेर भाई तसेच गाधी विद्यालयाचे सर्व कर्मचारी व शहरातील अंसख्य नागरीक या कार्यक्रमात उपस्थित होते.

बीएमसीचे 2700 कंत्राटी सफाई कामगार कायम होणार.

मुंबई:-महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांना 10 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर अखेर न्याय मिळाला आहे. मुंबई महापालिकेतील 2 हजार 700 कंत्राटी सफाई कामगारांना सुप्रीम कोर्टाने सेवेत कायम करण्याचा निर्णय दिला आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता या सर्व सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाणार आहे. तसेच त्यांना 2014 पासूनचा वेतन फरकही महापालिकेकडून मिळणार आहे. कामगार कायद्यानुसार कंत्राटी कामगारांचे सलग 240 दिवस भरल्यानंतर त्याला सेवेत कायम करावं लागतं. परंतु महापालिकेने तसं न केल्याने कचरा वाहतूक श्रमिक संघाने कामगार लवादाकडे न्याय मागितला होता.कामगार लवादा बरोबरच हायकोर्टानेही कामगारांच्या बाजूने न्याय दिला असतानाही याविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात गेली होती. अखेर सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला.

सेनगांवात महाविर जयंत्तीनिमित्त मांसाहार विक्री बंद करण्याची जैन बांधवांची मागणी!

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- अंहीसेचे पुजारी महाविर यांच्या जयंत्तीनिमित्त सेनगांव शहरात दि.०९ एप्रिल रविवार व १० एप्रिल सोमवार पर्यंत पुर्णत: मांस विक्री बंद करण्याची मागणी आज दि.०८ एप्रिल शनिवार रोजी दुपारी नगरपंचायत चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे निवेदन देऊन जैन बांधवांनी केली आहे.
जैन समाजाचे आराध्य दैवत व अंहीसेचे पुजारी महावीर यांची जयंत्ती दि.०९ एप्रिलला असुन या दिवशी अंहीसा दिन म्हणुन ही पाळल्या जातो  त्यामुळे दि.०९ एप्रिल व १० एप्रिल सोमवार पर्यंत सेनगाव शहरातील मांसविक्री बंद ठेवण्यात येऊन जैन समाजाचा आदर ठेवावा या मागणीचे निवेदन सेनगांव शहरातील जैन समाजबांधवानी आज दि.०८ एप्रिल शनिवार रोजी नगरपंचायतचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर शरद संघ ई, सुशील उखळकर, आदेश पंचवाटकर, प्रफुल्ल बोराळकर, संतोष उखळकर, संजय जोगी, हेमंत सघ ई, बबलु उखळकर, संदिप जैन आदीसह बहुसंख्येने जैन समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.

प्रारंभ...

╭════════════╮
       ▌ संकलन...
'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे - वाईट जीवन त्याच्या आई बापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत; रानावनांतील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील; परंतु मानव जातीस त्यांचे अद्यापही दर्शन नाही. वरती आकाशात असे अनंत तारे असतील, की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे, असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे. हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे, तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करितात. आई बापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगीच होय. माय बापच कळत वा, नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात.
         मनुष्य जन्मतो.. त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला. त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात, असे नाही; आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव व निर्जीव सृष्टी शिकवीत असते; परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे, हे आईबापच शिकवितात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला; जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो; आईजवळ रडतो; आईजवळ खातोपितो; आईजवळ खेळतो-खिदळतो, झोपतो, झोपी जातो, आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय.
        आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात, ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला, चार दिवसांच्या उपाश्याला, ज्याप्रमाणे मिळेल तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल, त्याची निवडा निवड न करता अधाशा सारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान दोनचार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले, तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो, की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात.- याचा अर्थ एवढाच, की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल.
       आईने तेलकट खाल्ले, तर मुलाला खोकला होईल, आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला, तर मुलाला थंडी होईल, त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळ आपट केली, भांडण तंडण केले, तर मुलाच्या मनास खोकला होईल, परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे सवरणे, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रीया, म्हणजे मुलाच्या मनाचे, बुध्दीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील, तर मुलाचे मनही रागीट होईल.
       अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो; त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात, ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो; त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळया फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे मनुष्याचे व्यवहार, आई-बापांची कृत्ये, स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील, तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील; नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील.
       मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठऋषी वेदामध्ये वरूण देवाला म्हणतात, "हे वरूणदेवा.. ! माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल, तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर.'

"अस्ति ज्याजान् कनीयस उपारे"

कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरूजींनी -सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळयांसमोर ठेवून त्यांच्या जवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत; परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरेवाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्या वेळी स्वत:च्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. 'श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस; पण स्वत:चे मात्र का, रे, काहीच सांगत नाहीस ?' असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत.
       एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, 'माझ्या स्वत:च्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते, कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईट आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत, म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे, ही माझी तळमळ, हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न ! कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता ?'

"केव्हा होईल जीवन,
माझे निर्मळ ताऱ्यापरी ।
हुरहुर हीच एक अंतरी । '

"परंतु आम्हांला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो, असे तुम्हीच नेहमी म्हणता.' लहान गोविंदा म्हणाला. "परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले, तर आपण निर्दोष आहोत, असा अहंकारही जडावयाचा.' भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, 'मनुष्याला स्वत:चे अध:पतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत, हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते.'
       नारायण जरा हसत म्हणाला, 'मी निरहंकारी आहे. याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाचा, मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची !' श्याम म्हणाला, 'या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह आहेत. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे.' श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, 'आपण का एकमेकांस परके आहोत ? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो ? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही. आपण एक. जे आहे, ते सर्वांच्या मालकीचे, तू आपली अनुभवसंपत्ती का बरे चोरून ठेवतोस ? तुझ्याजवळ वादविवाद आम्हांला करावयाचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी ! कसला आहे गर्व ? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले.. ? ते सांग. आम्ही आजा-याची शुश्रूषा करतो, तूही करतोस; परंतु तू आजा-याची आई होतोस, आम्हांला का होता येत नाही ? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुस-याला आपलासा करतोस; परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून, बोलूनही त्याचे मन आम्हांला ओढून का घेता येत नाही.. ? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस..? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ? ही कस्तूरी कोणी ओतली ? श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का ? एकदा वऱ्हाडात एका श्रीमंत व्यापाऱ्याचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरी विक्या तेथे कस्तूरी विकावयास आला. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तूरी विक्यास भाव विचारला. तो कस्तूरी विक्या तिरस्काराने म्हणाला, 'तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी..? पुण्याला जाऊन काही खपली, तर पाहावयाचे !' त्या श्रीमंत व्यापाऱ्यास राग आला. तो म्हणाला, 'तुझी सारी कस्तूरी मोज. त्या मातीच्या गाऱ्यास  मिसळून देतो. कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे, उत्तरेस जाऊन सांग.' त्या व्यापाऱ्याने सारी कस्तूरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाड्यातील त्या घराच्या भिंतींना अजूनही कस्तूरीचा वास येतो, असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या वेळेस कोणी रे, तिथे कस्तूरी ओतली ? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध ! तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला ? हा रंग कोणी दिला, सांग. श्यामच्याने आता राहवेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, 'माझ्या आईचे हे देणे. गडयांनो ! माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई माझी कल्पतरू, तिने मला काय काय तरी दिले ! तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले ! प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावर नव्हे, तर गाईगुरांवर, फुलांपाखरांवर, झाडामाडांवर, प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकविले. कोंडयाचा मांडा करून कसा खावा व दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमविता कसे राहावे, हे तिनेच मला शिकविले. आईने जे शिकविले, त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केंव्हा बाहेर येईल, तो येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो,

"मदंतरंगी करूनी निवास,
सुवास देई मम जीवनास"

तीच वास देणारी, रंग देणारी, मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर माउलीचे. सारी माझी आई !आई !!आई !!!'

       असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळयातून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे ओठ, त्यांचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारेच शांत होते. ता-यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, 'गडयांनो! माझे असे काही सांगण्यासारखे नाही; परंतु माझी आई कशी होती, ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील, त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एकेक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का?'

"हो, चालेल!' सारे म्हणाले.

राम म्हणाला, 'देवाला मागितला
एक डोळा, देवाने दिले दोन !'

गोविंदा म्हणाला, 'रोजच सुधारस प्यावयास मिळणार. रोजच पावन गंगेत डुंबावयास मिळणार !'
       मित्रहो, हे वैचारिक कथा, बोधकथा कोणी लिहीली माहीत नाही, परंतू ज्यानेही लिहिली त्यांचे व ग्रुपवर पोष्ट करणारे दत्तात्रय पवार यांचे धन्यवाद मानणे योग्य ठरणारे होय.

╭════════════╮
       ▌ संकलन...
'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯