तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 15 April 2017

बिटोडा भोयर येथे भिमजयंती ऊत्साहात साजरी

फुलचंद भगत
मंगरुळपीर-तालुक्यातील मौजे बीटोडा भोयर
येथे याही वर्षि डाँ बाबासाहेब आंबेडकर जंयती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.
ह्या वर्षि जयंती नीमित्त भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते आणि व्याख्यानाचा विषय होता छञपती शिवराय व डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंञ्य व बंधुताचे विचार व त्याच विचारापासुन भुरकडलेली आजची तरुन पिढी.
आनी हेच विचार मांडायाला व्याख्याते होते प्रा कानकिरड सर. विचारा सह बुलंद आवाजाचे धनी.
प्रा देवा भोयर सर. जिल्ह्यातुन पहीले व कमी वयात नेट प्राविन्या सह शिनीयर लेक्चरर लातुर
आनी शिवश्री श्रीकांतभाऊ ठाकरे विधर्भाची मुलुख मैदानी तोफ.
यांनी बिटोड्यासह पंचक्रोशितील लोकांना छञपती शिवराय व डाँ बाबासाहेबांच्या विचाराने मंञमुग्त करुन चार घंटे खीळऊन ठेवले होते.
व्याखान आयकायला बिटोड्यासह. सार्शि. चिंचखेडा. शिवनी. आसेगांव. नांदगाव, धानोरा, मसोला. कळंबा, कासोडा, रामगाव. मोतसावंगा. सायखेडा. ईचोरी. पार्डी. तेलीबिटोडा. जांभरुन. काजळंबा अदी गावच्या मंडळीने ऊपस्थीती दर्षवली होती.
कार्यक्रामाचे सुञसंचालन हे आमच्या गावचे व आमचे मिञ श्री संदिप महल्ले सरांनी केले होते.
दुसर्या दीवशी गावातुन डाँ बाबासाहेबांच्या प्रतीमे सह मिरवनुक काढण्यात आली. या ही वर्षि मिरवनुकिची सुरवात हे तथागत गौतम बुद्धांच्या मुर्ती जवडुन सरंपच, ऊपसरपंच. तं,मु. अध्यक्ष तथा सर्व ग्रां पं सदश्यासह गावातील प्रतीष्ट मंडळीच्या हस्ते नीळी फीत कापुन सुरवात करण्यात आली.
गावात छञपती शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन करुन हार अर्पण करण्यात आले होते आनी
छञपती शीवरायांच्या पुतळ्या जवळ सर्व ग्रां,पं च्या वतीने नास्ता,चहा.पाणी ठेवन्यात आले होते. समोर गावात  जागोजागी मिरवनुकिचे पुजन करण्यात आली आणी बर्याच जागेवर पुजन करण्यात आले होते.
या वर्षि मिरवनुकिचे विषेस्ता मंचे मिरवनुकित लहान मुलासह तरुन मंडळी व वयस्कर पुरुषांसह महीलांनेही पांढरे कपडे परीधान करुन. मिरवनुकीत फक्त आनी फक्त शिवबा.भिमबाबा. व तथागत गौतम बुद्धाच्यांचा गाण्यावर तरुन मंडळीने ठेका धरला होता.
व्याख्यानेचे आयोजन व मिरवनुकिचे आयोजन राजुभाऊ पडघान यांच्या अध्यक्षेत भिमक्रांती नवयुवक मंडळाने केले होते

सीरियामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 100 जणांचा मृत्यू .

सीरिया मध्ये आत्मघाती कार बॉम्बस्फोटात 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आहे. यामध्ये नागरिकांना घेऊन जात असलेल्या बस गाड्यांना लक्ष्य करण्यात आलं. या नागरिकांना येथील दोन शहरांतून सुरक्षितपणे दुस-या ठिकाणी हलवण्यात येत होतं. द सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्सनुसार आत्मघाती हल्लेखोर एक व्हॅन चालवत होता. त्यामध्ये स्फोटाची सामग्री होती, नागरिकांना घेऊन जाणा-या बसेस जवळ येऊन त्याने स्फोट घडवून आणला. यामध्ये 100 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. सीरियन अपोजिशन रेस्क्यू सर्विस नुसार सरकार आणि कट्टरतावाद्यांमध्ये झालेल्या करारानुसार पश्चिमी अलेप्पो येथील फुआ आणि कफराया या शहरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत होतं, त्यावेळी हा हल्ला झाला.  जखमींची नेमकी आकडेवारी कळू शकलेली नाही. याघटनेत मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अजून या आत्मघाती हल्याची जबाबदारी घेतलेली नाही, मात्र येथील सरकारी टीव्हीने हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे.   एक आठवड्यापूर्वी सीरिया मध्ये रासायनिक हल्ला झाला होता. त्या मध्येही 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.

आंब्याच्या पेटीतून 12 लाखांची लाच,ठाण्यातील IAS अधिकारी अटकेत.

ठाण्यात आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त किरण माळी यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी 12 लाखांची लाच मागितली होती. आंब्याच्या पेटीमधून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना माळींना अटक करण्यात आली आहे. तसंच आयएएस अधिकारी मिलिंद गवादेंनाही अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने शनिवारी ही कारवाई केली आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या आयएएस अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांच्यासाठी सापळा लावण्यात आला होता. मात्र ही 12 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या किरण माळींना रंगेहाथ पकडण्यात आलं. रात्री उशिरा मिलिंद गवादे यांनाही पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. आदिवासी विकास खात्यातील एका कर्मचाऱ्याकडे पदोन्नतीसाठी 12 लाख रुपयांची लाच देण्याची मागणी गवादेंनी केली होती.

- काय आहे प्रकरण..?

ठाण्यातील आदिवासी विकास विभागातील 12 कर्मचाऱ्यांची आश्रम शाळांच्या रेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती. अधीक्षक पदावरुन आश्रम शाळांच्या रेक्टरपदी त्यांना काही वर्षांपूर्वी पदोन्नती देण्यात आली होती. ही पदोन्नती रद्द करण्याची धमकी देत 12 कर्मचाऱ्यांकडून 12 लाखांची लाच आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी मागितली होती. शैक्षणिक पात्रते अभावी पदोन्नती रद्द करण्याची धमकी देत प्रत्येकी एक लाखांची लाच कर्मचाऱ्यांकडून मागण्यात आली होती.एका कर्मचाऱ्यानं लाच लुचपत प्रतिबंधक खात्याला याची तक्रार दिल्यावर सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या किरण माळी आणि लाच मागणाऱ्या मिलिंद गवादे या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक -दीलीपराव घुगे

सुरज राठोड

हिंगोली. महाराष्ट्रावर "भगवा" फडकवायचा असेल. तर या दोन वर्षात गाव तेथे शाखा आणि घर तेथे "शिवसैनिक" तयार झाले पाहिजे. सर्व पदाधिकारी ग्रामीण भागात गावोगावी फिरले पाहिजे. लोकांसी संपर्क वाढवला पाहिजे. सर्व पदाधिकार्यानी शाखांना भेट देऊन कार्यकरत्यांना भेटले पाहिजे . कोण जर नाराज असेल तर त्यांचा मनमुटाव दूर केला पाहिजे. आणि हि सर्व मेहनत घ्यावीच लागेल . तर आणि तरच " भगवा" फडकवू शकेल.
नाहीतर नुसती पद घेऊन बसु नका लोकांत जाग आणा .
नसेल जमत तर पदातुन मुक्त व्हा . शिवसेना वाढीसाठी आम्ही ।। शिवसैनिक।। खंबीर आहोत . आम्हाला पद नको काही नको . आम्ही ।। शिवसैनिक।। आमच्या ताकतीवर या महाराष्ट्रावर " भगवा" फडकवणार.

                         

जगातील सर्वात वृद्ध महिलेचा मृत्यू, 117 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास.

जगातील सर्वात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. इटलीतील एमा मोरॅनोयांनी वयाच्या 117 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. एमा यांना एकोणिसाव्या शतकात जन्माला आलेली एकमेव व्यक्ती असल्याचं बोललं जात आहे. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1899 रोजी इटलीमध्ये झाला होता. एमा यांनी तीनही शतकं पाहिली आहेत. इटलीमध्ये जन्मलेल्या एमा यांनी दोन महायुद्ध, इटलीतील 90 हून अधिक राजकीय सत्ता पाहिल्या आहेत. त्या आपल्या 8 भावंडां मध्ये सर्वात जास्त आयुष्य जगलेल्या एकमेव आहेत. एमा रोज तीन अंड्याचा आपल्या आहारात समावेश करत होत्या. त्यातील दोन अंडीत्या कच्ची खात होत्या.एमा यांची आई सुद्धा 91 वर्षांचं आयुष्य जगली होती, तसंच त्यांच्या बहिणींनीही वयाची शंभरी ओलांडली होती.

मासापूर जवळा गावात चोरट्याने घर फोडले


अनिल घोरड
बीड : जिल्हा प्रतिनिधी
बीड तालुक्यातील मासापूर जवळा गावात रस्त्याच्या कडेला असलेले घर चोरट्याने फोडल्याची घटना रविवारी सकाळी पहाटेच्या  दरम्यान घर फोडी करून ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे दरम्यान पिंपळनेर पोलीस ठाण्याचे api गजानन जाधव यांना माहिती मिळताच तपास करण्याची सूत्रे चालू केली आहेत घटनास्थळी पोलीस पंचनामा करत आहेत

आमदार साहेबांना आली जाग... सेनगांव पं.स.मध्ये पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- सेनगांव पंचायत समिती मध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यात आमदारांच्या प्रमुख उपस्थित तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात येते यावर्षी मात्र एप्रिल महिना चालु असतांना ही ही बैठक न झाल्याने भाजपा चे आ.तान्हाजीराव मुटकुळे यांना पाणीटंचाई आढावा बैठकीचा विसर पडला अश्या मतळ्याखाली  तेज न्युज हेडलाईन्स ला बातमी झळकताच आमदार साहेबांना आली जाग. सेनगांव तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ एप्रिल सोमवार रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती मध्ये होणार आहे.
सेनगांव तालुक्यात यावर्षी कमालीचे तापमान वाढल्याने विहीरी, बोअर, हातपंप, व ईतर पाणीपुरवठ्याचे स्त्रोत आटल्याने तालुक्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हि बैठक जानेवारी महिन्यातच घ्यायला हवी होती आता एप्रिल महीना संपत आला असुन पावसाळा सुरु होण्यास दिडच महिनाचा कालावधी आहे या पाणीटंचाई आढावा बैठकीचा आढावा कधी निघणार व पाणी नियोजन केव्हा होणार असा भाबडा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला असावा. या बैठकीत माघील अपुर्ण राहीलेल्या पाणीपुरवठा योजनेबद्दल वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. पेयजल योजना, जलस्वराज्य योजना, भारत निर्माण आदी लाखो रुपये खर्चुन काही गावातील योजनेचा खर्च पाण्यात गेला आहे. याविषयासह हातपंप दुरुस्ती, बोअर अधिग्रहणासह विविध पाणीटंचाई वरील मुद्यावर या बैठकीत १३३ गावच्या पाणीटंचाई संदर्भात सविस्तर चर्चा रंगणार आहे. या बैठकीला सेनगांव तहसिलदार वैशाली पाटील, सेनगांव पं.स. चे गटविकास अधिकारी ढवळशंख आदीसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत राहणार आहेत. सर्व ग्रामसेवक व सरपंचानी उपस्थित राहण्याचे आवाहन सेनगांव पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

रेशन धान्य दुकानात आता ई-पॉज मशिन


कोल्हापुर,आजरा- गावोगावी सुरू असलेल्या रास्तभाव स्वस्त धान्य दुकानांमध्ये यापुढे अंगठा लावल्यानंतरच धान्य प्राप्त होणार आहे.

रेशन धान्याचा काळा बाजार या पद्धतीमुळे रोखला जाणार असून पारदर्शी व्यवहारासाठी प्रत्येक दुकानात लागणारे धान्य, होणारी उचल आणि शिल्लक साठा याची माहिती वरीष्ठ कार्यालयांकडे लागलीच उपलब्ध होणार आहे.

रेशनकार्डवर नाव असलेल्या व्यक्तींपैकी ज्या व्यक्तींचे आधार कार्ड लिंक केले गेले आहे त्यापैकी कोणाही व्यक्तीचा अंगठा मशिनला लावल्याखेरीज त्या कार्डची माहिती उपलब्ध होणार नाही.

रेशनकार्ड धारकांना धान्यसाठी स्वत: दुकानात जावे लागणार आहे. तालुक्यातील ८७ रेशन धान्य दुकानदारांना ई-पॉज मशिनचे वितरण गुरूवार (ता.१३) करण्यात आले.

तसेच सर्व दुकानदारांना हे मशिन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून १ मे पासून याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार आहे.

मंगळवारी विठाई हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबीराच्या नियोजनाची बैठक


अनिल घोरड
बीड:-काकू - नाना प्रतिष्ठाण बीडच्या वतीने दि.29 व 30 एप्रिल रोजी विठाई हॉस्पिटल जिरेवाडी जालना रोड बीड येथे भव्य मोफत महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराच्या पुर्व नियोजनासाठी आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.18 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  

बीड व शिरूर कासार तालुक्यातील जे रूग्ण खर्चिक उपचार घेऊ शकत नाहीत अशा गरजू रूग्णांसाठी विठाई हॉस्पिटल जालना रोड बीड येथे दि.29, 30 एप्रिल 2017 रोजी भव्य मोफत (महा) आरोग्य शिबीर आयोजीत केले असून या शिबीरासाठी जेे.जे. रूग्णालय मुंबई येथील नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ.तात्यासाहेब लहाने, के.ई.एम.रूग्णालय मुंबई, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड पुणे, सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद, शहा आयुर्वेदीक इन्स्टीट्यूट अहमदाबाद, एम.जी.एम.हॉस्पिटल औरंगाबाद, नारायण सेवा संस्थान उदयपूर (जयपूर फूट तज्ञ), माधवबाग मुंबई तसेच नांदेड, लातूर, बार्शी, पुणे येथील विशेष तज्ञ डॉक्टर येऊन विविध आजारांवर उपचार करणार आहेत. या शिबीराच्या पूर्व तयारीसाठी मंगळवार दि.18/04/2017 रोजी सायंकाळी 4.00 वा. विठाई हॉस्पिटल जालना रोड बीड येथे आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, काकू-नाना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अ‍ॅड.कालीदास थिगळे, सचिव डॉ.अरूण भस्मे यांनी केले आहे.

-----------------------------------------------------

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी

सुरज राठोड...
-----------
साखरा, दि. 16 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती आजी, सरपंच मधुकर चाकोते यांच्या उपस्थिती मध्ये साखरा गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
      साखरा येथे प्रतिवर्षाप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सव समितीच्या वतीने सर्व जाती धर्मातील समाज बांधव एकत्रित या जयंतीचे आयोजन केले होते. विविध सामाजिक उपक्रमांनी ही जयंती साजरी करण्यात आली. समाज प्रबोधन, , भीमगीतांची विविध कार्यक्रम घेऊन . दि. १४ रोजी सकाळी ८:३० वाजता जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाशा ईंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपस्थीत धोत्रे .अशोक ईंगळे सिध्दार्थ चवरे राहुल चवरे  यांच्यासह भिम सैनिक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
       साखरा गावातुन सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामधे महिला, युवकांसह सर्व जाती धर्मातील समाज बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते

शिऊर येथे जल्लोषात भीमजन्मोत्सव साजरा सकाळी सामूहिक अभिवादन, सायंकाळी उत्साहात मिरवणूक

प्रतिनिधी । शिऊर
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. शिऊर येथे सामूहिक अभिवादन करण्यात आले, तथागत भगवान बुद्ध , छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन अभिवादन करण्यात आले आणि येथील डॉ आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन मान्यवरांची भाषणे झाली.
     यावेळी  भाजपा जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, सरपंच नितीन चुडीवाल ,जि प सदस्य सपना  पवार, माजी जि प सदस्य सुनील पैठणपगारे,  पं स माजी उपसभापती सुभाषचंद्र जाधव, स पो नि धनंजय फराटे ,उपसरपंच जाकीर सैय्यद ,माजी सरपंच बबनराव जाधव, अशोक जाधव,  निलेश देशमुख, माजी उपसरपंच गिरीश भावसार, नंदू जाधव, नवनाथ आढाव ,चेतन दिवेकर ,डॉ ए जी जाधव ,तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्कर जाधव ,कांताबाई पगारे, कार्याध्यक्ष संजय जाधव, पवन चुडीवाल , प्रकाश लाखे, प्रा चंद्रशेखर देशमुख ,प्रकाश घोडके ,ग्रामसेवक जी आर गायकवाड, एल टी ठुबे , शिरीष चव्हाण, प्रकाश सुरासे, अय्युब सैय्यद , कमलाकर जाधव , महेंद्र देशमुख ,नितीन भावसार ,संदीप जाधव,सुनील सोनवणे ,अनिल भोसले, विवेक जाधव ,स्वप्नील श्रीवास्तव ,मंगेश जाधव, बाळू पवार, पो.हे.कॉ.रोहिदास तांदळे ,रज्जाक शेख ,लक्ष्मण धनेश्वर ,अशोक पगारे, बाबासाहेब पगारे ,गिरीश सोळसे , , प्रकाश पगारे, यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
प्रास्ताविक संजय पगारे यांनी सूत्रसंचालन प्रा कैलास जाधव यांनी केले .
          शिऊर येथील भिमटोला ग्रुप च्या वतीने सर्व धर्म समभाव या भावनेतून पुतळा परिसरात सर्व धर्मियांच्या झेंड्यासह समता दुचाकी रॅली काढण्यात आली. दरम्यान जयंती निमित्ताने शिऊर गावातून सायंकाळी डॉ आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.  यात गावातील सर्व धर्मिय सहभागी होऊन एक नवीन आदर्श निर्माण केला.यावेळी सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.
जयंती दिनी पुतळा आवारात जि.प.कला शिक्षक प्रकाश घोडके दाम्पत्याने शिका संघटित व्हा, संघर्ष करा, हा संदेश असलेली रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधले.

फोटो: शिऊर येथे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.

2.प्रकाश घोडके यांच्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधले

3 सरपंच चुडीवाल  यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने मिरवणुकीची सुरुवात झाली

शहिद बालाजी आंबोरे यांचे ताडकळसमध्ये स्मारक व्हावे; समता अधिकार आंदोलन

प्रतिनिधी
ताडकळस:- येथील नवतरूण भारतीय सैन्यातील जवान बालाजी अंबोरे यांचे देश सेवा करतांना दु:खद निधन झाले .ताडकळसच्या भुमीतील भुमीपुञ राष्ट्रासाठी अमर झाला.संपूर्ण ताडकळस व परिसरातील लोकांनी या विरगतीप्राप्त शहिद बालाजीस दु:खद अंत:करणान शेवटचा निरोप दिला.येणारया पिढीसाठी शहिद जवान बालाजी आंबोरे यांचे कर्तुत्व मुलांमध्ये तेवत राहावे. यासाठी शहिद बालाजी आंबोरे यांचे स्मारक ताडकळस नगरीत उभा करावे अशी मागणी समता अधिकार आंदोलनाचे शिष्टमंडळ प्रशासनाची भेट घेवून करणार आहे.विद्यार्थी व नवतरूणांमध्ये देश सेवा हिच ईश्वर सेवा हा आत्मसात व्हावा यासाठी बालाजी आंबोरे यांच्या सारखा जवान आपल्या प्रेरणास्थान झाली पाहिजे .सतत बालाजी आंबोरे यांची आठवण ताडकळस व परिसराला व्हावी यासाठी त्यांच्या पावनस्मृतीचे स्मारक होणे गरजेचे आहे .बालाजी आंबोरे यांचे स्मारक उभारण्यासाठी समता अधिकार आंदोलन पुढाकार घेणार असुन हे स्मारक ताडकळसच्या मुलांसाठी एक प्रेरणास्थान म्हणुन नावारूपास येईल .

नाथ प्रतिष्ठानचा सोमवारी सामुदायीक विवाह सोहळा

घरचे कार्य समजुन सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत-ना.धनंजय मुंडे

    राहुल गायसमुद्रे

वडवणी:-हुंड्याच्या चिंतेमुळे गरिब शेतकर्‍यांच्या मुलीच्या आत्महत्या होत आहेत. असे प्रकार आपल्या भागात होऊ नयेत यासाठीच नाथ प्रतिष्ठानने सामुदायीक विवाह सोहळ्याच्या माध्यमातुन गरिब कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नाचा भार आपल्या खांद्यावर घेउन सामुदायीक विवाह सोहळ्याची चळवळ 11 वर्षापासुन राबवली आहे. यावर्षीचा सोमवारी होणार्‍या सोहळ्यातही प्रत्येक कार्यकर्त्यांने आपल्या घरचे कार्य समजुन सक्रिय सहभाग घेऊन सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन प्रतिष्ठाने अध्यक्ष तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे.  

सोमवार दि.17 एप्रिल रोजी परळी शहरातील हालगे गार्डन येथे होणार्‍या यावर्षीच्या सामुदायीक विवाह सोहळ्यात 76 वधु-वर विवाहबद्द होत असुन, या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. याच तयारीचा एक भाग म्हणुन परळी शहरातील कार्यकर्त्यांची एक बैठक आज जगमित्र संपर्क कार्यालयात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात सलग 12 वर्ष सामुदायीक विवाह सोहळ्याची चळवळ राबवुन त्याद्वारे 1200 मुलींचे कन्यादान करण्याचा विक्रम प्रतिष्ठानने केला आहे. या वर्षीचा सोहळा ही मागील आकरा वर्षी प्रमाणेच दिमाखदार आणि थाटात व्हावा आणि गरिब कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहाला प्रतिष्ठा आणि त्यांना ही अभिमान वाटेल अशाच पध्दतीने होणार असल्याचे सांगतानाच तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्व कार्यकर्त्यांची आहे याची आठवन करून देत या सोहळ्यासाठी संपुर्ण परळीतील नागरिकांना निमंत्रीत करावे, नेमुन दिलेल्या जबाबदार्‍या पार पाडाव्यात असे आवाहनही यावेळी श्री.मुंडे यांनी केले. 

यावेळी सोहळ्याच्या यशस्वीतेच्या दृष्टीकोनातुन विविध कमिट्यांची स्थापना करुन त्यांच्या जबाबदार्‍यांचे वाटप करण्यात आले. सकाळी मुस्लिम समाजातील व बौध्द समाजातील विवाह त्यांच्या धर्माच्या पध्दतीनुसार होणार आहेत. दुपारी वर्‍हाडी मंडळींची भोजन व्यवस्था त्यानंतर सर्व वधुंची शहरातुन शेवंती मिरवणुक व सायंकाळी 6.11 मिनिटांनी मुख्य विवाहाचा सोहळ संपन्न होणार आहे.

वाशिम ते किन्हीराजा मार्गावर झाडांची कत्तल

महादेव हरणे

मालेगांव :- शासन एकीकडे झाडे लावा झाडे जगवा व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लाखो रूपयाचा निधी खर्च करीत अाहे तर दुसरीकडे मोठमोठ्या झाडांची कत्तल करून नेस्तनाबूद केल्या जात असल्याचा प्रकार आज दि 15/4/2017 रोजी जोडगव्हाण तोरनाळा परीसरात पहावयास मिळत आहे रस्त्याच्या दुतर्फा मार्गावर निंब बाबुळ साग सह इतर अनेक प्रकार चे झाडे दिसुन येतात झाडांच्या बुंध्याला आग लाऊन बाभळीचे झाड पेटवुन देऊन नेस्तनाबूद करून रोडच्या मदोमद पडलेल्या अवस्थेत असुन रात्री अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याचबरोबर झाडांच्या बुंध्याला आग लावुन झाडांची कत्तल करून झाडे लंपास केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे राजरोजपणे झाडांची अवैध पणे कत्तल करण्याविरूध्द संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.