तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 22 April 2017

बीडचे जिल्हाधिकारी राम यांची औरंगाबाद बदली

सुभाष मुळे....
------------
बीड, दि. 22 : बीडचे जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांची औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
      नागपूर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाचे आयुक्त श्री. ए.ए. महाजन हे बीडचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणार आहेत.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

काश्मीर बडगाम मध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार.

जम्मू-काश्मीरच्या बडगाम हयातपूरा येथे सुरक्षा पथकाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. संध्याकाळी सहाच्या सुमारास ही चकमक झाली. बडगामपासून 18 किमी अंतरावर हयातपूरा येथे गस्तीवर असलेल्या 53 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरा दाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दहशतवादी ठार झाले. चकमक सुरु होताच अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आली. अजूनही ही चकमक सुरु असून, दहशतवादी लपलेल्या भागाला जवानांनी घेराव घातला आहे. एका दहशतवाद्याची ओळख पटली असून युनी मकबूल गानाय असे त्याचे नाव आहे. चादूरा पात्रीगाम येथे राहणार हा दहशतवादी आहे. दुस-या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. एके-47 रायफल आणि अन्य शस्त्रास्त्रे घटनास्थळावरुन जप्त करण्यात आली आहेत.

राज्यातील ६० आएएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई:-राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण 60 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांची बदली करण्यात आलीये.  डॉ. प्रशांत नारनवरे यांची पालघरचे जिल्हाधिकारी तर उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांची बदली करण्यात आलीये.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची संपूर्ण यादी

1. नितीन गद्रे, आयएएस (एमएच -1989), चौकशी अधिकारी जीएडी यांना प्रधान सचिव, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री

2.एस.व्ही.आर. श्रीनिवास, आयएएस (एमएच - 1991), एमडी, एसआयसीओएम ओएसडी, धारावी पुनर्विकास प्रकल्प

3.वलसा नायर सिंग, आयएएस (एमएच - 1991), पीएस टुरिझम अॅण्ड कल्चर यांना प्रधान सचिव, चौकशी अधिकारी, जीएडी, सिव्हिल एव्हिएशन आणि एक्साईज

4.सुरेंद्र बागडे, आयएएस (एमएच - 1993), सचिव समाजकल्याण, जीएम बेस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5.महेश झगडे, आयएएस (एमएच - 1993), मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए यांची विभागीय आयुक्त नाशिक म्हणून नियुक्ती केली आहे.

6.दिनेश वाघमारे, आयएएस (एमएच - 1900), महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सचिव, समाजकल्याण

7. के.एच. गोविंदराज, आयएएस (एमएच - 1995) एमडी, एमटीडीसीला एमडी, सिकॉम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. सी.एन.दळवी, आयएएस (एमएच - 1995), आयुक्त सहअपर यांची पुणे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

9. एस.चोकलिंगम, आयएएस (एमएच - 1996), विभागीय आयुक्त पुण्याला सेटलमेंट कमिशनर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे

10. एकनाथ डवले, आयएएस (एमएच - 1799), विभागीय आयुक्त नाशिक यांना सचिव, जल संरक्षण आणि ईजीएस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

11. आर.आर. जाधव, आयएएस (एमएच - 1998), आदिवासी आयुक्त यांना दुग्धशाळा आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे.

12. एस.पी. कडू-पाटील, आयएएस (एमएच - 1998), सेटलमेंट कमिशनर यांना आयुक्तालय म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

13. जे.डी.पाटील, आयएएस (एमएच - 199), जीएम बेस्ट यांना आयुक्त सहकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. आर.जी.कुलकर्णी, आयएएस (एमएच - 2000), दुग्धशाळा आयुक्तांना आदिवासी आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

15. निधी पांडे, आयएएस (एमएच - 2001), जिल्हाधिकारी औरंगाबाद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी आरोग्य योजना सोसायटी, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

16. श्राजाराम माने, आयएएस (एमएच - 2001), आयुक्त स्पोर्ट्स यांची महासंचालक, मेडा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

17. एस.एम. केंद्रेकर, आयएएस (एमएच - 2002), सहसंचालक सीडीसीओ, संयुक्त नियुक्त, एमएसईडीसीएल औरंगाबाद

18. विजय झाडे, आयएएस (पीबी - 2002), जिल्हाधिकारी बुलडाणा यांना आयुक्त, क्रीडा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

19. विजय वाघमारे, आयएएस (एमएच - 4004), आयुक्त कौशल्य विकास, एमडीडी, एमटीडीसी म्हणून नियुक्ती केली आहे.

20. सुरेश काकाणी, आयएएस (एमएच - 4007), जिल्हाधिकारी नांदेड यांची व्हीपी आणि एमडी, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी

21. अनिल कवडे, आयएएस (एमएच - 2004), जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची नोंदणी महानगर, पुणे

22.  पांडुरंग पोळे, आयएएस (जेके - 2004), जिल्हाधिकारी लातूर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी एसआरए, पुणे

23.  श्रावण हर्डीकर, आयएएस (एमएच - 2005), महानगर आयुक्त म्युनिसिपल आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे.

24. विपिन शर्मा, आयएएस (एमएच - 2005), आयुक्त शुगर यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

25. आर.व्ही. गमे, आयएएस (एमएच - 2005), एमडी, महाराष्ट्र राज्य बीज महामंडळाचे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

26. अविनाश सुभेदार आयएएस (एमएच - 2005), कंट्रोलर रेशनिंग आणि डायरेक्टर, नागरी पुरवठा, यांना जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर (उपाध्यक्ष अमित सैनी, आयएएस)

27. दिलीप शिंदे, आयएएस (एमएच - 2005), एमडी महिंद्रा, मुंबई नियंत्रक रेशनिंग आणि नागरी पुरवठा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

28. किरण गित्ते, आयएएस (एमटी - 2005), जिल्हाधिकारी अमरावती यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीए, पुणे

29. अश्विनी जोशी, आयएएस (एमएच - 2006), जिल्हाधिकारी, मुंबई शहर आयुक्त, अबकारी, मुंबई

30. ओ.पी.बकोरिया, आयएएस (एमएच - 2006), एमसी, औरंगाबाद यांची महाराष्ट्र राज्य बीज निगम, अकोला

31. डी.म.मुगलिकेर, आयएएस (एमएच - 2006), सहआयुक्त विक्रीकर औरंगाबाद एमसी, औरंगाबाद एमसी

32. आश्विन मुद्गल, आयएएस (एमएच - 2007), जिल्हाधिकारी सातारा एमसी नागपूर एमसी म्हणून बदली करण्यात आली आहे.

33. अभय महाजन आयएएस (एमएच -2007), एमजीएनआरजीएसचे आयुक्त, नागपूर यांना कलेक्टर, बीड

34. अभिजीत बांगर, आयएएस (एमएच - 2008), जिल्हाधिकारी, पालघर जिल्हाधिकारी, अमरावती

35. नवल किशोर राम, आयएएस (एमएच - 2008), जिल्हाधिकारी, बीड यांची जिल्हाधिकारी, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

36.  सी.एल. पुलकुंदवार, आयएएस (एमएच - 2008), सीईओ, जि.पी., गोंदिया यांची कलेक्टर, बुलडाणा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

37. श्वेता सिंघल, आयएएस (एमएच - 2009), उपसचिव, कामगार विभाग यांना जिल्हाधिकारी सातारा म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

38. शीतल उगले, आयएएस (एमएच - 2009), जिल्हाधिकारी, रायगड यांना मुख्य प्रशासक (नवीन टाउन) सिडको, औरंगाबाद येथे नियुक्त करण्यात आले आहे.

39. प्रशांत नारनवरे, आयएएस (एमएच - 2009), जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना जिल्हाधिकारी, पालघर म्हणून बदली करण्यात आली आहे.

40. जी.श्रीकांत, आयएएस (एमएच - 2009), जिल्हाधिकारी अकोला जिल्हाधिकारी, नांदेड

41. एस.एल. अहिरे, आयएएस (एमएच - 2009), सीईओ, जि.पी., भंडारा, संचालक व्हीजेएनटी, पुणे

42. अरुण विधाले, आयएएस (एमएच - 2009), सीईओ, जिल्हा परिषद, अकोला यांची नियुक्ती खात्याचे सचिव, कामगार विभाग

43. दीपा मुधोळ मुंडे, आयएएस (एमएच - 2011), सीईओ, जि.प., बुलडाणा यांची विभागीय आयुक्त, विक्रीकर, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

44.  एम.देवेन्द्र सिंग, आयएएस (एमएच - 2011), सीईओ, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना जिल्हाधिकारी म्हणून लातूर नियुक्त करण्यात आले आहे.

45. अस्तिक पांडे, आयएएस (एमएच - 2011), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव जिल्हाधिकारी, अकोला

46. ​शनमुगाराजन, आयएएस (एमएच - 2013), सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पीओ, आयटीडीपी, धारणी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., बुलडाणा

47. विजय राठोड, आयएएस (एमएच - 2014), सहाय्यक जिल्हाधिकारी, दर्यापूर, अमरावती यांना सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पीओ, आयटीडीपी, धारणी, अमरावती

48. अमोल येडगे, आयएएस (एमएच - 2014), सहाय्यक कलेक्टर, कळमनुरी, हिंगोली यांना सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पीओ, आयटीडीपी, नाशिक

49. व्ही.व्ही. माने, आयएएस (एमएच - 99 99), अध्यक्ष, जात छाननी समिती, पुणे यांना सीईओ, जिल्हा परिषद, अकोला-ऑन प्रमोशन

50. एम.एम. सुर्यवंशी, आयएएस (एमएच - 99 99), अध्यक्ष, जातीची छाननी समिती, नागपूर यांना सीईओ, जिल्हा परिषद, भंडारा-ऑन प्रमोशन पद देण्यात आले आहे.

51. आर.एच.ठाकरे, आयएएस (एमएच - 99 99), अध्यक्ष, जात छाननी समिती, अमरावती यांची सीईओ, जिल्हा परिषद, गोंदिया-ऑन प्रमोशन

52. जे.एस. पापलकर, आयएएस (एमएच - 99 99), उपायुक्त, महसूल, नागपूर यांना सीएओ, जि.प., चंद्रपूर-ऑन प्रमोशनपद देण्यात आले आहे.

53. एस.डी. मांढरे, आयएएस (एमएच - 99 99), जेएस, सीएस ऑफिस यांना जेएस, सीएस ऑफिस-ऑन प्रमोशन म्हणून बदली करण्यात आली आहे

54. एस.जी. कोलते, आयएएस (एमएच - 99 99), उपायुक्त, महसूल, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव-ऑन प्रमोशन असे नोंदविण्यात आले आहे.

55. आर.डी. निवतकर, आयएएस (एमएच - 99 99), जेएस, आर अॅण्ड आर यांना संचालक, आपत्ती व्यवस्थापन, पदोन्नती संदर्भात

56. ए.के. ढाकणे, आयएएस (एमएच - 99 99), उप मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून सोलापूर एमसी-ऑन प्रमोशन (उपाध्यक्ष, व्ही.एन.कलाम, आयएएस)

57. ए ए. गुलहाणे, आयएएस (एमएच - 99 99), पी.एस., ऊर्जा मंत्री यांना संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई पदोन्नती देण्यात आली आहे.

58. कैलाश जाधव, आयएएस (एमएच - 99 99), अध्यक्ष, जातीची चौकशी समिती लातूर यांना उपनिरीक्षक, भूमी अभिलेख, पुणे-ऑन प्रमोशन असे नोंदविण्यात आले आहे.

59. जी.एम. बोडके, आयएएस (एमएच - 99 99), अतिरिक्त आयुक्त, औरंगाबाद यांना आयुक्त, मत्स्यव्यवसाय-पदोन्नती

60. सी.के. डांगे, आयएएस (एमएच - 99 99), सह मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, मुंबई यांना अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे-इन प्रमोशन म्हणून बदली करण्यात आली आहे.

पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा दौरा

कालिदास अनंतोजी
नांदेड:-राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोदयोग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर रविवार 23 एप्रिल 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे,
रविवार 23 एप्रिल 2017 रोजी जालना येथून मोटारीने नांदेड येथे सकाळी अकरा वाजता आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. स.11.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून अंसूली ता. नायगावकडे प्रयाण व दुपारी 1 वा. अंसुली येथे आगमन व आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्याकडील कार्यक्रमास उपस्थिती. अंसुली येथून सोईनुसार जालनाकडे प्रयाण करतील.

कालिदास आनंटोंजी
नांदेड 9921404070

नांदेड च्या जिल्हाधिकारी पदी जी.श्रीकांत यांची नियुक्ती

कालिदास अनंतोजी
नांदेड:- चे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांची भारतीय विमान उड्डाण प्राधिकरण च्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदी निवड झाली असून, त्यांच्या जागी नांदेड चे नूतन जिल्हाधिकारी म्हणून नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे माजी आयुक्त तथा भारतीय प्रशासन सेवेच्या 2009 च्या बॅच चे जी.श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
कालिदास अनंतोजी
नांदेड 9921404070

गेवराई तालुक्यात नाबार्डकडून तीस गावे वित्तीय साक्षर


अनिल घोरड

वंचित नागरिक बँकेशी सलंग्न, कॅशलेश व्यवहारासह जलसाक्षरतेचाही दिला संदेश

बीड:- राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक नाबार्ड अंतर्गत गेवराई तालुक्यातील 30 गावांमध्ये वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यात आले आहेत. जिल्हा विकास प्रबंधक एन.डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आले असुन या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड पुणेअंतर्गत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात द्वितीय सााक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले असुन 30 गावामध्ये हे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. नाबार्डचे बीड जिल्हा विकास अधिकारी एन.डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली थोर समाजसेवक गाडगे महाराज सेवाभावी संस्था टाकळवाडी ता. शिरूर कासार या संस्थेमार्फत हे वित्तीय साक्षरता कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमातून शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आली.जन धन योजना, अटल पेन्शन योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, कॅशलेश व्यवहार, मोबाईल बँकींग, इंटरनेट बँकींग व्यवहार, भिम अ‍ॅप, आधार कार्डचे महत्त्व आणि बँकेशी आधार लिंक करणे आदी विविध योजनेची माहिती य ावेळीदेण्यात आली. बँकींग क्षेत्राची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 

जलसाक्षरतेवरही जानजागरण

बीड जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी पाणीप्रश्‍न उद्भवतो. यामुळे वृक्षाची लागवड करून वृक्ष संवर्धनाचे काम केले पाहिजे. तसेच नाला बंदिस्त, बांद बंदीस्त, पाणलोट, जलशिवार योजना, पुनरभरण, ठिबक सिंचन आदी मुद्यावर या कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आले आहे.निवृत्त शाखा व्यवस्थापक बी.बी. तांबे, संस्था अध्यक्ष रमेश कदम, स्थानिक दत्तक बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी, बँक मित्र यांनी बँकेशी सलग्न योजना व बँकेच्या व्यवहाराची सविस्तर माहिती दिली. ग्रामिण जनतेला समजेल या भाषेत ही माहिती देण्यात आली असुन कलापथकाच्या माध्यमातूनही वित्तीय जनजागरण करण्यात आले आहे. या वित्तीय प्रशिक्षणामुळे बँकेपासुन वंचित असणारे नागरिक बँकेशी जोडले गेले आहेत. बँकेत खाते नसणार्‍या अनेक नागरिकांनी आपले बँक खाते खोले आहेत. तसेच बँकेशी व्यवहार न करणारे जनधन योजनेचे खातेधारक आता बँकेशी व्यवहार करू लागले असुन विविध विमा योजनेचे फॉर्म ही नागरिकांनी भरून दिले आहेत. गावामध्ये हे कार्यक्रम यशस्वी झाले असुन गावात तीन वेळेस कार्यक्रमाला गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, एम.एछ.जी. आणि जे.एल.जे.च्या महिला बचतगटाच्या महिला, शेतकरी गटाचे सदस्यांसह प्रतिष्ठीत नागरिक, गावकरी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमामध्ये उपस्थितांना बँकींग माहितीची पुस्तीका देण्यात आली.

कलापथकातून वित्तीय साक्षरता

वित्तीय साक्षरता प्रशिक्षक कार्यक्रमात कला पथकाच्या माध्यमातून जागृती करण्यात आली आहे. सावकरी पाश ही नाटीका सादर करून सावकाराचे नाते तोडा, बँकेशी नाते जोडा असा संदेश देण्यात आला आहे. कला पथकाचा कार्यक्रम हे या प्रशिक्षणाचे मुख्य आकर्षण होते.

तेज न्युज} हेडलाईन


अमर कारंजकर यांची तंत्रनिकेतन सेवेसाठी निवड

सुभाष मुळे...
-------------
गेवराई, दि. 22 :  तालुक्यातील पंचाळेश्वर येथील सर्वसामान्य कुटूंबातील अमर किसनराव कारंजकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची महाराष्ट्र तंत्रनिकेतन प्रथम वर्ग सेवेसाठी निवड झाली.
      अमर कारंजकर हे अतिशय बिकट परिस्थितीतून परिश्रम घेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांची नुकतीच महाराष्ट्र तंत्रनिकेतन वर्ग १ सेवेसाठी निवड झाली असून काही दिवसात ते या सेवेत रुजू होतील. अमर कारंजकर हे यापूर्वी कुडाळ येथील जलसंपदा विभागात उपअभियंता या पदावर कार्यरत होते. याठिकाणी नोकरी करत करत त्यांनी या परीक्षेची तयारी केली व ही परीक्षा ते एन.टी. 'ब' मधून राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळविले.
       महाराष्ट्र तंत्रनिकेतन वर्ग १ सेवेसाठी झालेल्या या निवडीबद्दल अमर कारंजकर यांचे गेवराई येथील र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या स्थानिक समितीचे सदस्य दत्ताभाऊ पिसाळ, आनंद सुतार, सुनिल पिसाळ, मोहन पिसाळ, संतोष पिसाळ, बाबासाहेब बनसोडे, गोपाल पिसाळ, विकास जाधव, अविनाश काकडे, राज पिसाळ, गजानन पिसाळ, गणेश पिसाळ, गणेश वाघमारे, शिवाजी वाघमारे, अभय कारंजकर, प्रसाद मुळे, राज शेजुळ, मनोज आनेराव, नवनाथ धापसे, सूर्यकांत माने, जमाल पठाण, बदाम कपाटे, बापुसाहेब शेळके, मदन पाटील, भागवत जाधव, मंगेश चोरमले, विनोद पौळ आदी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी अमर यांचे अभिनंदन केले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

आघाडीच्या पाठपुराव्यामुळे अमृत योजनेसाठी ४४ लाखाचा वाढीव निधी शहराच्या विकासासाठी आहोरात्र प्रयत्न करू - फारूक पटेल


अनिल घोरड

बीड:-अमृत अभियानामध्ये बीडचा समावेश झाल्यानंतर ई निविदा पुर्वतयारीची पारदर्शक इनकॅमरा बैठक नगर परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली़ अमृत योजनेचा जुन्या दराने आराखडा बनवण्यात आल्याने सध्या बाजार भावातील वस्तुची किंमतीतील तफावत लक्षात घेता या प्रश्न काकु- नाना विकास आघाडीने शासनाकडे सतत पाठपुरावा केला़ पाणी पुरवठा समितीने शासनाकडे पत्रव्यवहार केला़ या पत्रव्यवहारानंतर शासनाच्या सदरील बाब निदर्शनास आली़ राज्यभरातील अमृत योजनेत सहभागी असलेल्या नगर परिषदांनीही याबाबत आवाज उठवला़ बीड नगर परिषदेने तीन वेळा ई निविदा प्रसिध्द करूनही कोणत्याच गुत्तेदाराने या प्रक्रियेत भाग घेतला नाही़ शासनाने बीडसाठी ४४ लाख रूपयांचा वाढीव निधी जाहिर केला आहे़ ही ई निविदाची प्रक्रिया आता नव्याने होणार आहे़ परंतु नगराध्यक्षांना कुठलाही शासन निर्णय निघाला की आपली पाठ थोपटण्याची हौस आहे़ त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढुन फुकटचे श्रेय घेऊ नये व विकास कामात अडथळे आणु नयेत असा इशारा काकु- नाना विकास आघाडीचे गट नेते तथा पाणीपुरवठा सभापती फारूक पटेल यांनी दिला आहे़
बीड शहराचा अमृतमध्ये समावेश झाल्यानंतर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ११४़१९ कोटी रूपयांच्या निधीचा आराखडा मंजुर केला हा आराखडा मंजुर झाल्यानंतर दि़२२ फेब्रुवारी रोजी बीड नगर परिषदेच्या सभागृहात अमृत योजनेच्या ई निविदा पुर्व तयारीची इनकॅमेरा बैठक घेण्यात आली़ या बैठकीला उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी प्रशांत खांडकीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकारचे अभियंता पाटील, पाणीपुरवठा अभियंता दंडे यांच्यासह सदस्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ या बैठकीत अमृत योजनेसाठी आलेल्या गुत्तेदारांनी आराखड्यासंदर्भात आणि बाजार भावातील किंमती संदर्भात अनेक प्रश्न उपस्थितीत केले होते़ या प्रश्नी पाणी पुरवठा समितीच्या माध्यमातुन डीआय (के ७) पाईपच्या दरासंदर्भात अमृतच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत शासनाकडे पाठपुरावा केला़ हा पाठपुरावा करत असतांना या योजनेत सहभागी असलेल्या नगर परिषदांनीही आवाज उठवला़ कुठल्याच गुत्तेदाराने ई निविदा प्रक्रियेत भाग घेतला नाही म्हणुन शासनाच्या सदरील बाब निदर्शनास आली आणि तफावतीपोटी सर्वच नगर परिषदांना वाढीव निधी मिळाला़ त्यात बीडला ४४ लाख रूपये मिळाले़़ या संबंधीचा अध्यादेश नगर विकास विभागाचे सहसचिव जाधव यांनी दि़१९ एप्रिल रोजी जारी केला आहे़ नगराध्यक्षांनी आतापर्यंत आयत्या पिठावर रेघोट्या ओढुन जनतेची दिशाभुल केली आहे़ यापुढे असे चालणार नाही जनतेच्याही ही गोष्ट लक्षात असुन नगराध्यक्षांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असा इशारा पटेल यांनी दिला आहे़
चौकट
३१ लाख रूपयांचा प्रोत्साहनपर निधीही मंजुर

बीड नगर परिषदेचा अमृत योजनेत समावेश करण्यात आल्यानंतर ११४़१९ कोटी रूपयांचा डीपीआर मंजुर करण्यात आला होता़  हा डिपीआर जुन्या दरा नुसार असल्याची बाब महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे अभियंता पाटील यांच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणुन देण्यात आल्यानंतर ४४ लाख रूपयांचा वाढीव निधीचा अध्यादेश जारी झाला़ या बरोबरच बीड नगर परिषदेला या अमृत अभियानासाठी ३१ लाख रूपयांचा प्रोत्साहनपर निधी मंजुर झालेला आहे़ या निधीसाठी काकु- नाना विकास आघाडीने पाणी पुरवठा समितीच्या माध्यमातून शासनाकडे वेळो- वेळी पाठपुरावा केलेला आहे़ यामुळे आता शहरात पाणी पुरवठ्याची योजना राबवत असतांना सर्व बाबींचा विचार केला जाणार आहे़ विस्तारीत भागालाही येत्या काही दिवसात मुबलक पाणी मिळेल यासाठी आघाडी प्रयत्न करणार असल्याचेही पटेल यांनी म्हटले आहे़ 
चौकट
आघाडीच्या पाठपुराव्याने बिंदुसरेवरील पाईपलाईन होणार नव्याने

काकु- नाना विकास आघाडी बीड नगर परिषदेत आल्यापासुन अनेक कामांना गती मिळाली़ परंतु नगराध्यक्षांकडून आंधारातुन विकास कामांनाच विरोध केला जात आहे़ शहरातुन गेलेल्या धुळे- सोलापुर या महामार्गाचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे़ पाली येथील बिंदुसरा धरणावरून बीड शहराला पाणी पुरवठा होता़ ही पाईपलाईन फार पुर्वीची आहे़ अनेक ठिकाणी ती लिकेजही झालेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते़ त्यात या महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये ही पाईपलाईन जात असल्यामुळे ही पाईपलाईन नव्याने करून देण्यात यावी अशी मागणी आयआरबी या कंपनीकडे करण्यात आली होती़ महामार्गाच्या अभियंत्याकडे पत्रव्यवहार केलेले असतांना तसा ठराव आघाडीने घेतला आहे़ आघाडीच्या या पाठपुराव्यामुळे बिंदुरसरेवरील पाईपलाईनही नव्याने होत असतांना नगर परिषद त्यावर देखरेख करणार आहे़

बीड जिल्हा तेज न्यूज हेड लाईन न्यूज नेटवर्क बीड 8551005741 अनिल घोरड

खाजमापुर येथे सामाजीक वनिकर परिक्षेत्र वसमत यांच्या तर्फे जागतिक वसुंधरा दिन साजरा ..

रामु चव्हाण

वसमत:-तालुक्यातील गिरगांव पासुन जवळ आसलेल्या खाजमापुरवाडी येथिल सामाजीक वनिकर परिक्षेत्र वसमत विभागाच्या  रोपवाटीकेमध्ये  शनिवारी जागतिक वसुंधरा दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला .
याप्रसंगि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाजमापुरवाडी-डिग्रसचे संपरच रामु दळवि यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन सामाजीक वनिकरन परिक्षेत्र वसमत चे लागवड अधिकारी व्ही एन मिसाळ यांची तर प्रमुख पाहुने म्हणुन गिरगांव जि.प .गटाचे सदस्य विलास रायवाडे , गटविस्तार अधिकारी बी टी शिंदे , सहाय्यक लागवड अधिकारी अशोक दंडे खाजमापुरवाडीचे उपसंरपच , कैलासराव नरडेले , यांच्यासह धनाजी नादरे,जिवन  रायवाडे , सामाजीक वनिकरनचे कर्मचारी हरि बेले ,रामभाऊ निबांळकर , रामु राऊत , आदीची उपस्तीती होती .
यावेळी बोलताना व्ही एन मिसाळ यांनी सांगितले कि वसुंधरा म्हणजे आपली धरणी माता आणी आपल्या वसुंधरेचा मोठ्या प्रमाणात -हास होतानाचे चित्र सद्यास्तितीत आहे आणी याला पण आपणच जबाबदार आहोत कारण आपण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहोत आणी वसुंधरेचा -हास होत आहे .त्यामुळे वातावरनात लहरिपणा येऊन कधी पाऊसाची सुनामी येते तर कधी काळी या वृक्षतोडीमुळे पाऊसच पडत नाही त्यामुळे आज जागतिक वसुंधरा दिनानिमीत्त वसुंधरेचा दिवंसेंनदिवस होत आसलेला - हास थांबवण्यासाठी आज सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे आजच्या दिनी प्रत्येक व्यक्तीने पाच पाच झाडे लाऊन त्याचे संगोपण करण्याचा संकल्प केला पाहीजे ते गरजेचे आहे .
तसेच शेवटी मिसाळ यांनी सांगितले की पर्यावरणाचे रक्षण करणे  व पर्यावरणाचा  होत आसलेली हनी थांबवणे है प्रत्येक नागरिकांचे मुलभुत कर्तव्य आहे त्यामुळे आज घडीला वसुंधरा वाचली तर आपण वाचनार आहोत .आदीसह अनेक बाबीवर मिसाळ यांनी उपस्तीताना मार्गदर्शन केले .गटविस्तार अधिकारी बी टी शिंदे यांनीही यावेळी आपले विचार मांडुन प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये शौचालय बांधावे असे आवाहनही केले .
यावेळी नागोराव मारडे , मारोती राऊत ,मुंजाजी राऊत ,विश्वनाथ साखरे ,महादु दाळपुसे ,केशव पितळे ,पाडुरंग शिंदे ,शेषराव  साखरे , सोनाजी क-हाळे , बंडु मारडे ,बंडु मुक्के ,अनिल राऊत ,अर्जुन सांरग ,राज राऊत ,नागेश राऊत ,आदीसह महीलाची मोठ्यासंख्येने उपस्तीती होती