तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 29 April 2017

अंबाजोगाई परिसरात बिबट्या आढळला


अनिल घोरड
परिसरात वनसंपदा वाढल्याचे शुभसंकेत

बीड : आंबीजोगाई} तालुक्यातील येल्डा परिसरात आज दुपारी बिबट्या आढळून आल्याचे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मात्र बिबट्याचा वावर म्हणजे परिसरात वनसंपदा आणि पशुधन वाढल्याचे लक्षण असल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केला.

अंबाजोगाईपासून सहा किमी अंतरावर असलेल्या येल्डा परिसरातील शेंडगे वस्तीत आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सर्जेराव शेंडगे, व्यंकटेश चामनर, अशोक खोडवे, तुकाराम शेंडगे, कालिदास खोडवे या ग्रामस्थांनी बिबट्यास पाहिले. क्षणार्धात तो नजरेआड झाला आणि नंतर ओढ्याशेजारील झाडीत लपून बसला. सुरूवातीस हा वाघच आहे अशी अफवा पसरली. याची खबर मिळताच वनविभागाचे अधिकारी शंकर वरवडे, जी.बी. कस्तुरे आणि वनसेवक ज्ञानोबा हेडे तातडीने येल्ड्याकडे रवाना झाले आणि पाळत ठेऊन पाहणी केली असता त्यांना सदर प्राणी बिबट्या असल्याची खात्री झाली. गर्दी वाढताच बिबट्या पुन्हा शेजारच्या वनपरिसरात निघून गेला. मागील महिनाभरात बीड जिल्ह्यात बिबट्या दिसण्याची हि दुसरी वेळ आहे. मागील महिन्यातच आष्टी तालुक्यात बिबट्या आढळून आला होता, परंतु दोन दिवसातच तो निघून गेला.

दरम्यान, बिबट्याची उपस्थिती म्हणजे अंबाजोगाई परिसरातील वनसंपदा वाढल्याचे शुभलक्षण असल्याचा दावा वनाधिकाऱ्यांनी केला. सहसा बिबट्याचा वावर वनसंपदा आणि तृणभक्षी प्राणी असलेल्या क्षेत्रात असतो. अंबाजोगाईच्या आजूबाजूला विपुल वनसंपदा तर आहेच, परंतु हरिण, रानडुक्कर अश्या शेतीची नासधूस करणाऱ्या प्राण्यांचीही प्रचंड संख्या आहे. हेच प्राणी बिबट्याचे प्रमुख भक्ष्य आहे. बिबट्याच्या आगमनामुळे शेतकऱ्यांचे शत्रू असलेल्या हरीण, रानडुकरांच्या त्रासापासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा वनाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे बिबट्या आल्यामुळे घाबरून जाऊ नये. बिबट्या सहसा मनुष्यप्राण्यावर हल्ला करत नाही, त्यामुळे त्याचा पाठलाग करू नका अथवा त्याला छेडू नका असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. जर एखाद्यावेळेस बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला तर त्याचीही योग्य ती नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यास मिळेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

पाच वर्षापासून सुरू होता शोध

अज्ञात प्राण्याने शेळी, मेंढ्या, गायीसारख्या फडशा पाडण्याच्या सततच्या घटनांमुळे पाच वर्षापासून या परिसरात वाघ असल्याची चर्चा होती. सदरील प्राणी पकडण्यासाठी वनविभागाने बुट्टेनाथ परिसरात पिंजराही लावला होता, पण तो प्राणी हाती आला नाही, जनावरांचे बळी जातच राहिले. नंतर काही दिवसा तडस आढळून आला होता. त्यानंतर आजच बिबट्या ठळकपणे समोर आला.

बिबट्याचा वावर हा शुभसंकेत

"बिबट्या स्वत:हून माणसावर हल्ला करत नाही, त्यामुळे विनाकारण त्याला छेडू नये. उलट बिबट्याचा शेतकऱ्यांना फायदाच होईल. हरीण, रानडुक्कर आदी शेतीची नासधूस करणाऱ्या प्राण्यांना आळा बसेल. जर बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला केला तर त्याची नुकसानभरपाई देण्यात येईल."

- शंकर वरवडे, वन परिमंडळ अधिकारी अंबाजोगाई

शहरातील नागरीक 1 मे ला करतील जयपुर श्रमदान फुलचंद भगत
मंगरुळपीर- दि. 29 पाणी फांउडेशन कडून राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेदरम्यान १ मे रोजी चला गावी या उपक्रमा अतंर्गत सत्यमेव जयते वाॅटर कप 2017 मध्ये सहभागी व्हा. गावात येउन श्रमदानात आपले योगदान नोंदवा आपला आवडता महाराप्ट्र दुप्काळमुक्त करण्यासाठी शहर आणि गाव एकत्र मिळून काम करूया असे आवाहन सिनेअभिनेता अमिर खान यांनी मीडीयाच्या माध्यमातून करीत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कारंजा तालुक्यातील 1 मे रोजीचे नोंदणी केलेल्या नागरीकांचे श्रमदान जयपुर येथे होणार आहे. श्रमदान करण्यासाठी शहरातील 190 पेक्षा जास्ता नागरीक आॅनलाईन नोंदणी केली आहे. 
1 मे महाराप्ट दिनी विदर्भातील निवडक तालुक्यात आॅनलाईन रजीप्टेशन बुकीग सुविधा करण्यात आली यामध्ये वाशिम जिल्हयातील कारंजा, यवतमाळ जिल्हयातील कळंब, अकोला जिल्हयातील अकोट, अमरावती जिल्हयातील वरूड, वर्धा जिल्हयातील आर्वी या तालुक्याची 1 मे रोजीच्या श्रमदानासाठी म्हणजे चला गावी करीता निवड करण्यात आली. त्यामुळे गावात श्रमदानासाठी येणा-यांचे स्वागत अविस्मरणीय पध्दतीने व्हावे या हेतूने गावकरी नियोजन करीत आहे. शहर आणि महानगरातील लोकांना दुष्काळा विरुद्धच्या लढ्यात समाविष्ट करून घेण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. श्रमदानाच्या माध्यमातून शहर आणि गावातील लोकांमध्ये संवाद साधून आणण्याचा प्रयत्न आहे. आॅनलाई श्रमदानासाठी पाणी फांउडेशन मुंबई कार्यालयात नोंदणी केल्यामध्ये श्रमदानासाठी महाराप्ट्रातील कोणताही व्यक्ती जयपुर येथे येणार पण तो कोण प्रतिप्ठीत आहे, की उघोगपती आहे की सिनेकलाकार आहे किंवा वर्ग 1 चे अधिकारी आहेत हे गावक-यांना माहीत नसणार आहे. ते 1 मे रोजी सकाळी 6 वाजता गावात ऐउन 9 वाजेपर्यंत गावक-यांनी दिलेले श्रमदान करणार आहे. यांच्या स्वागतासाठी विदर्भातील सर्वच गावे सज्ज झाली आहे. आतापर्यंत विदर्भातील पाच तालुक्यातील गावमध्ये जाण्यासाठी 1600 नागरीकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. 

ग्रामसेवक व गावक-यांनी जयपुर येथे श्रमदानातून केली तीन एलबिएससी निर्मिती

फुलचंद भगत
मंगरुळपीर- पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वाॅटर स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेदरम्यान गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हा गावक-यांचा उत्साह वाढविण्यासाठी कारंजा पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी व ग्रामसवेक मंडळीनी 29 एप्रिल रोजी जयपुर गावक-यांच्या मदतीने गावातील नाल्यावर 4 हजार पाणी व माती साठा साठवेल अशी श्रमता असणा-या तिन एल.बि.एस.ची बांधाची निर्मीती श्रमदानातून करण्यात आली. 
गावात वेगवेगळया समाजिक, राजकीय संघटना पुढे येउन गावात श्रमदान करीत आहे. गाव पाणी दार करण्यासाठी आपली मदत व्हावी या हेतूने ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजेश हवा, विस्तार अधिकारी रवीद्र दहापुते, विनोद श्रीराव, ग्रामसेवक विनोद मोरे, डि.जी.निघोट, रामेश्वर सफकाळ, गजभिये तसेच पाणी फांउडेशने प्रशिक्षक दिलीप देवतळे, सुरज देशमुख यांच्या सह गावातील सरपंच ग्रामपचायत सदस्य व गावातील महीला व पुरूप वर्गानी श्रमदान केले. गावातील लहान लहान बालके आपली वानर सेना तयार करून गावातील नागरीकांना श्रमदानासाठी मदत करीत आहे. या सर्वाच्या मदतीने एकुण 29 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 या दोन तासच्या वेळात तिन एल.बी.एस. म्हणजेच दगडी बांध तयार करण्यात आले. या बांधामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी होउन शेतामधील सुपिक माती वाहुन जाणार नाही. पाण्याची साठवण श्रमता वाढून पाणी जमिनित मुरणार आहे. हा दगडी बांध नाल्यावर पावसाळयात उपयुक्त ठरतो. 

संतांचे विचार समाज उन्नतीसाठी प्रेरणादायी - शिवाजीराव पंडित

सुभाष मुळे...
------------
बीड, दि. 29 : अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संतसंगती घडत असून समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याचे काम या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे असे उपक्रम सातत्याने सुरु ठेवणे आवश्यक असून संतांचे विचार सदैव समाज उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरतात असे प्रतिपादन माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांनी केले.
       बीड तालुक्यातील मौजे येथे श्री. क्षेत्र संस्थान रामगडचा ३८ वा नारळी सप्ताह आणि श्री क्षेत्र गोरक्षनाथ येथील पुजनीय किसन महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षी आयोजित होणारा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांनी अखंड हरिनाम सप्ताहास भेट दिली, यावेळी श्री.क्षेत्र नारायणगड संस्थान येथील मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, रामगड येथील मठाधिपती महंत ह.भ.प.लक्ष्मण महाराज, सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे मौज ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले. यावेळी ह.भ.प.शिवाजी महाराज यांनी आशिर्वादपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना माजीमंत्री शिवाजीराव पंडित म्हणाले की, मौज हे माझे आजोळ असल्यामुळे येथे येताना मला आनंद होतो. या गावाला मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिक वारसा आहे. तो टिकविण्याचे काम पुढच्या पिढीने करण्याची आवश्यकता आहे. व्यसनाधितेकडे वळलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून समाजामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता साधु संतांमध्ये आहे. आपण सातत्याने नारायणगडावर जातो, त्याचे समाधान मिळते. गोरक्षनाथगड असेल, नारायणगड किंवा मच्छिंद्रनाथ गड याठिकाणी माझ्या कार्यकाळात शक्य तितकी विकास कामे करण्याचा मी प्रयत्न केला. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना माझ्या आजीच्या सांगण्यावरून गोरक्षनाथ टेकडीवर धर्मशाळेचे बांधकाम केल्याची आठवण त्यांनी आपल्या भाषणात सांगितली.
     यावेळी प्रकाशराव सुसकर, गोरखराव कोकाटे, बंडू मोहिते, जाहेर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मौज ग्रामस्थांच्या वतीने रणजितराव डावकर, भाऊसाहेब डावकर, प्रकाशराव डावकर, कैलासराव डावकर, प्रल्हादराव डावकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी व्यंकटराव डावकर, केशवराव डावकर, अंकुशराव डावकर, अरुणराव डावकर, नागोराव डावकर, शरद डावकर, मिठूआबा डावकर, आप्पासाहेब डावकर, रविंद्र डावकर, संत डावकर यांच्यासह पंचक्रोषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌

सुरेशराव काशीद यांना पुञशोक

सुभाष मुळे...
------------
गेवराई, दि. २९ : येथील प्रसिद्ध सत्यम हेअर कटींग सलुनचे मालक सुरेशराव काशीद यांचे चिरंजीव शाम काशीद वय २३ वर्षे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील नंदलाल धूत रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी निधन झाले.
      त्याच्या निधनाने काशीद कुटुंबियावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. शाम ने आयटी क्षेञात ईजिनिअरींग पुर्ण केले होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, आजोबा, चुलते असा मोाठा परिवार आहे त्याच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. शामच्या पार्थिवावर चिंतेश्वर स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

अवाजवी दरवाढ करणाऱ्या सिमेंट कंपनी मालकांना तुरुंगात टाकू : गडकरी

अवाजवी दरवाढ करणाऱ्या सिमेंट कंपनीच्या मालकांना तुरुंगात टाकू, असा सज्जड दम केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. दरवाढ नियंत्रणात नाही ठेवली तर बंद झालेल्या सरकारी सिमेंट कंपन्या पुन्हा सुरु करु, असंही गडकरी म्हणाले. उद्योगात नफा कमावणं स्वाभाविक असलंतरी ज्याप्रकारे सिमेंटचे दर वाढवून लोकांना वेठीस धरलं जातं, ते खपवून घेतलं जाणार नाही, असंही नितीन गडकरी म्हणाले.  नागपूरच्या मिहान येथे किशोर बियाणींच्या फ्युचर समूहातर्फे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचा भाग असलेल्या `क्रॉस बेल्ट सॉर्टेशन सिस्टिम’चं उदघाटन गडकरींच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.दरवाढ नियंत्रणात ठेवली नाहीत, तर रस्ते बांधताना बंद केलेल्या सरकारी सिमेंट कंपन्या परत सुरु करु आणि तिथूनच सिमेंट विकत घेऊ, असा इशारा गडकरींनी सिमेंट कंपनीच्या मालकांना दिला. रस्ते बांधकाम आणि इतर प्रकल्पांचे काम देशात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.ते पूर्ण होण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. असं असूनही या कंपन्यांनी सिमेंटच्या किमती वाढवल्या असून त्या मागे घ्याव्या ही मागणी गडकरींनी केली. तसं न झाल्यास सिमेंट कंपन्यांच्या मालकांना तुरुंगवास घडेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशात सरकारच्या मालकीचे 10 सिमेंट कारखाने बंद स्वरुपात आहेत. हे सर्व कारखाने आपण सुरु करु आणि सर्वसामान्यांना स्वस्त दारात सिमेंट उपलब्ध करुन देऊ, असंही गडकरींनी सांगितलं.

तर देशात FB, व्हॉट्सअॅपवर बंदी का आणली जाऊ नये...? - सुनील मित्तल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील भूमिपुत्रांसाठी अधिक संरक्षणवादी धोरणे आखताना दिसत आहेत. अमेरिकेने ‘एच-1बी’ व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्योजक सुनील भारती मित्तल यांना सांगितले की, भारतात 'फेसुबक', 'व्हॉट्सअॅप' आणि 'गुगल'ला या अमेरिकी कंपन्यांवरही बंदी का आणली जाऊ नये?, असा प्रश्न उपस्थित करत मित्तल ट्रम्प यांच्यावर बरसले आहेत.  आमचा उद्योगधंदा पूर्णतः भारतीय बाजारपेठेवर आधारित असल्याच्या कारणाने अमेरिकेच्या स्वदेशीच्या धोरणाबाबत चिंता नसल्याचे, मित्तल यांनी यावेळी सांगितले. मात्र जेव्हा परदेशी कंपन्या भारतात मोठा नफा मिळवत असलीत तर भारतीयांना अमेरिकेत जाण्यापासून रोखणं पूर्णतः अयोग्य आहे, असे मत मित्तल यांनी मांडले. गेल्या काही दिवसांत अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियानं देशातील व्हिसा नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतीय आयटी कंपन्यांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पत्रकारांनी सुनील मित्तल यांना एअरटेल कंपनीला परदेशात प्रवेश दिला नाही तर आपली काय प्रतिक्रिया असेल असे विचारले असते त्यांनी असे रोखठोक उत्तर दिले.भारतात गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या अॅपचे कोट्यवधी युझर्स आहेत. मात्र येथेही गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारखी अॅप्स आहेत, त्यामुळे या स्वदेसी अॅपचा वापर करायला हवा, असेही मित्तल यांनी म्हटले.

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंता'तूर', हजारो क्विंटल तुरीची नासाडी.

लातूर शहरासह जिल्हाभरात शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या वादळी वा-यासहीत झालेल्या पावसामुळे शेतक-यांसह ग्रामीण भागातील नागरिकांची धांदल उडाली. दरम्यान, चाकूर, जळकोट आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेली हजारो क्विंटल तूर या पावसामुळे भिजली. गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीच्या आवारात मापाविना पडून आहे. परिणामी, शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील रेणापूर, पानगाव, खरोळा नळेगाव, चाकूर, अहमदपूर, शिरूर ताजबंद, हडोळती, किनगाव, कोपरा, उदगीर, हाळी हंडरगुळी, वाढवणा, नळगीर, देवर्जन, देवणी, वलांडी, धनेगाव, जळकोट, नळगीर, घोणसी, निलंगा, औराद शहाजानी, औसा, किल्लारी, उजनी, भादा, आलमला, लामजना, शिरूर अनंतपाळ, साकोळ, येरोळ, कबनसांगवी, उजळंब, नळेगाव, मुरूड आदी परिसरात शनिवारी दुपारी अचानक वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला.या पावसामुळे ग्रामीण भागात आंबे आणि द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे़ तर चाकूर, जळकोट, लातूर, औसा, औराद शहाजानी आदी ठिकाणच्या बाजार समितीत विक्रीसाठी आलेली हजारो क्विंटल तूर भिजली आहे़ चाकूर, जळकोट बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून ही तूर उघड्यावर पडून आहे. त्यामुळे आर्थिक कोडींत अडकलेल्या शेतक-याला शनिवारच्या अवकाळी पावसाचा अधिक फटका बसला आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

नाशिक जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह तिघांवर गुन्हा.

नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणची फसवणूक केल्या प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेची तक्रार करण्यात आली होती. नाशिक मधील मुंबई नाका पोलिस स्टेशनला फसवणुकी प्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले होते. नाशिक जिल्हाबँकेने महावितरणचे 33 कोटी 22 लाख रुपये बुडवल्याचा आरोप होता. नाशिक आणि मालेगावला फसवणूक केल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नाशिक जिल्हा बँकेचे चेअरमन नरेंद्र दराडे यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. क्षीरसागर आणि बी. कांकरिया या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

परभणी विधानसभा मतदार संघाचे उच्चशिक्षीत आ.डॉ.पाटील यांची मंञीमंडळात वर्णी ?


[पुर्णेतील शिवसैनिक मोहन गुंजकरांचे उध्दव ठाकरेंना पञ]
पुर्णा/येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्र राज्य मंञीमंडळाचा विस्तार होणार असल्याने या मंञीमंडळ विस्तारात परभणी विधानसभा मतदार संघाचे तरुण तडफदार व उच्चशिक्षीत आ.डॉ.राहूल पाटील यांचा ही मंञीमंडळात समावेश करुन जिल्ह्यातील जनसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी येथील शिवसैनिक मोहन गुंजकर यांनी दि.25 एप्रिल 2017 रोजी शिवसेना पक्षाध्यक्ष उध्दवजी ठाकरे यांनी एका पञाद्वारे केली आहे श्री.ठाकरे यांना पाठवलेल्या पञात त्यांनी असेही नमूद केले आहे की आ.पाटील यांच्या मध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांना बरोबरीने सोबत घेऊन चालण्याचे कौशल्य असून त्यांच्या कडून जिल्ह्यास मोठ्या अपेक्षा आहेत त्यांना मंञीपद मिळाल्यास जिल्ह्याचा राहीलेला विकास होईल तसेच गेल्या काही दिवसांमध्ये महानगर पालीका निवडणूकी मध्ये पक्षाचा झालेला पराभव लक्षात घेता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी जिल्ह्यातील शिवसेने मध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी विकासाची जाण असणारे उच्चशिक्षीत आ.राहूल पाटील यांची मंञीमंडळात वर्णी लावण्यात यावी असेही शिवसैनिक मोहन गुंजकर यांनी पञात नमूद केले आहे

संतांचे विचार समाज उन्नतीसाठी प्रेरणादायी - शिवाजीराव पंडित

सुभाष मुळे...
------------
बीड, दि. 29 : अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संतसंगती घडत असून समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याचे काम या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे असे उपक्रम सातत्याने सुरु ठेवणे आवश्यक असून संतांचे विचार सदैव समाज उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरतात असे प्रतिपादन माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांनी केले.
       बीड तालुक्यातील मौजे येथे श्री. क्षेत्र संस्थान रामगडचा ३८ वा नारळी सप्ताह आणि श्री क्षेत्र गोरक्षनाथ येथील पुजनीय किसन महाराज यांच्या प्रेरणेने दरवर्षी आयोजित होणारा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांनी अखंड हरिनाम सप्ताहास भेट दिली, यावेळी श्री.क्षेत्र नारायणगड संस्थान येथील मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, रामगड येथील मठाधिपती महंत ह.भ.प.लक्ष्मण महाराज, सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे मौज ग्रामस्थांनी भव्य स्वागत केले. यावेळी ह.भ.प.शिवाजी महाराज यांनी आशिर्वादपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना माजीमंत्री शिवाजीराव पंडित म्हणाले की, मौज हे माझे आजोळ असल्यामुळे येथे येताना मला आनंद होतो. या गावाला मोठ्या प्रमाणावर अध्यात्मिक वारसा आहे. तो टिकविण्याचे काम पुढच्या पिढीने करण्याची आवश्यकता आहे. व्यसनाधितेकडे वळलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून समाजामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता साधु संतांमध्ये आहे. आपण सातत्याने नारायणगडावर जातो, त्याचे समाधान मिळते. गोरक्षनाथगड असेल, नारायणगड किंवा मच्छिंद्रनाथ गड याठिकाणी माझ्या कार्यकाळात शक्य तितकी विकास कामे करण्याचा मी प्रयत्न केला. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना माझ्या आजीच्या सांगण्यावरून गोरक्षनाथ टेकडीवर धर्मशाळेचे बांधकाम केल्याची आठवण त्यांनी आपल्या भाषणात सांगितली.
     यावेळी प्रकाशराव सुसकर, गोरखराव कोकाटे, बंडू मोहिते, जाहेर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मौज ग्रामस्थांच्या वतीने रणजितराव डावकर, भाऊसाहेब डावकर, प्रकाशराव डावकर, कैलासराव डावकर, प्रल्हादराव डावकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी व्यंकटराव डावकर, केशवराव डावकर, अंकुशराव डावकर, अरुणराव डावकर, नागोराव डावकर, शरद डावकर, मिठूआबा डावकर, आप्पासाहेब डावकर, रविंद्र डावकर, संत डावकर यांच्यासह पंचक्रोषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌

सुरेशराव काशीद यांना पुञशोक

सुभाष मुळे...
------------
गेवराई, दि. २९ : येथील प्रसिद्ध सत्यम हेअर कटींग सलुनचे मालक सुरेशराव काशीद यांचे चिरंजीव शाम काशीद वय २३ वर्षे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील नंदलाल धूत रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी निधन झाले.
      त्याच्या निधनाने काशीद कुटुंबियावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. शाम ने आयटी क्षेञात ईजिनिअरींग पुर्ण केले होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, आजोबा, चुलते असा मोाठा परिवार आहे त्याच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. शामच्या पार्थिवावर चिंतेश्वर स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯