तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 6 May 2017

वालुर ग्रा.पं.चे 5 विरोधी सदस्य व जिल्हा परिषद सदस्य कुठे आहेत?

प्रतिनिधि.वालूर.वालुर ग्रामपंचायत मधे सत्ता धारी यांचे 12सदस्य आहे व विरोधि 5 सदस्य आहे.असे एकुन 17 सदस्य आहे .5 विरोधि सदस्य फक्त नावालाच आहे.विरोधि सदस्याचि नेमकी भुमिका का असते हे याना माहित आहे की नाहि असा प्रश्न निरमान झालेला आहे.कारन ज्या वार्ड मधुन हे निवडुण अलेत तेथील नागरीकना पिण्याच्या पाण्याचि समस्या गंभीर असताना विरोधि सदस्य मात्र शांत आहे .येनारया काळात याना धडा शिकऊ आशी चर्चा होत आहे .व त्याच प्रमाने जि.पं.निवडणुकित नवा  उमेदवार निवडून येऊन सुद्धा वालुरची परीस्थीती पाण्यासाठी जैसे-थे तशीचं आहे.कुठे चार दिवसाला,कुठे आठ दिवसाला तर कुठे काहीचं नाही.निवडणुकीत विद्यमान जिल्हा परीषद भाषणात बोलले होते *मला बोलता येत नाही पण मी काम करणारा माणुस आहे* माञ मागील तिन महीण्यात सप्त्याला,लग्नाला आणि जयंतीला सोडलं तर नागरीकांच्या समस्या जाणुन घ्यायला यांना एकदाही वेळ मिळाला नाही.पिण्याच्या पाण्यासाठी सामाण्य वालुरकर परेशान असताना विद्यमान जिल्हा परीषद सदस्य कुठे आहेत? असा संतप्त सवाल येथील जनता विचारत आहे.

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला, दोन पोलिसांना वीरमरण.


____________________________

गेल्या काही महिन्यांपासून अशांत असलेल्या काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. शनिवारी संध्याकाळी कुलगाम जिल्ह्यातील मीरबाजार येथे पोलिसांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन पोलिसांना वीरमरण आले. तर यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये दोन नागरिकही ठार झाले. कुलगाम जिल्ह्यातील मीरबाजार येथे पोलिसांचे पथक गस्तीवर असताना दहशवाद्यांनी या पथकावर अंधाधुंद गोळीबार केला. त्याला पोलिसांकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत दोन पोलीस धारातीर्थी पडले. दोन नागरिकांचाही मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले.  दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. मात्र हल्ल्यामागे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उस्ताद रईस खान यांचे निधन.


____________________________

सितार वादनाचे जादूगर उस्ताद रईस खान यांचे शनिवारी रात्री पाकिस्तान मध्ये निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. स्वातंत्र्य पूर्व भारतातील इंदूर येथे जन्मलेले खान हे पाकिस्तानात स्थायिक झाले होते. रस्म-ए-उलफत, नैनो मे बदरा छाये... आणि इतर अनेक गाण्यातील त्यांचे सितारवादन, शास्त्रीय संगीता मधील जादू अविस्मरणीय ठरली आहे.

मुंबईतील एलफिन्स्टन आणि सीएसटी स्टेशन ही नावं इतिहासजमा. !


____________________________

मुंबईतील सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोड या रेल्वे स्टेशनचं नाव लवकरच बदलणार आहे. नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. एलफिन्स्टन रोडऐवजी ‘प्रभादेवी’ तर छत्रपती शिवाजी टर्मिनस ऐवजी आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असंनामकरण होणार आहे.1991 साली दिवाकर रावते महापौर असतांना मुंबई महापालिका सभागृहात पहिल्यांदा हा नामांतराचा ठराव मांडण्यात आला होता. तेव्हापासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला दोन दशकांनंतर यश आलं आहे.काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.

रेल्वे महाव्यवस्थापक जैन यांचा प्रवाशांशी संवाद


धर्माबाद/ प्रतिनिधी

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन धर्माबाद रेल्वे स्थानकाला भेट दिली. तसेच प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सखाराम निलावार यांनी मागण्यांचे निवेदन दिले. त्यात धर्माबाद रेल्वे स्थानकावर लांब पल्लय़ाच्या गाड्यांना थांबा देण्यात यावा, पोलीस चौकी उभारण्यात यावी, पार्किंग ची व्यवस्था करण्यात यावी, तात्काळ तिकीट मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मध्ये काही दलाल तिकीट देणार्‍याशी हाताशी धरून चालू असलेला गोरख धंदा रोखण्यात यावा. 

            यावेळी नगराध्यक्षा अफजल बेगम यांचे प्रतिनिधी म्हणून अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, मोगला गौड, सखाराम निलावार, रमेश पाटील बाळापूरकर नगरसेवक निलेश पाटील, राजु सुरकुटवार, उमेश झंवर, गोविंद सोनटक्के, युनुस खान, आबेदआली, देवेंद्र चिद्रावार, बाबाराव भालेराव, ताहेर पठान, सतिश शिंदे, रवींद्र शेट्टी, मारोती माकणो, शंकर बोलमवाड, पत्रकार जि पी. मिसाळे, माधव हानमंते महेश जोशी, सुधीर येलमे, व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक आदींची उपस्थिती होती.


देसाई हाणमंतु
मो.8975623555
ता.धर्माबाद जि.नांदेड

बेटी बचाव बेटी पढाव अभीयानांतर्गत विद्यार्थीनींना परिक्षा केंद्रा पर्यंत मोफत जाण्याची व्यावस्था [पुर्णा शहर भाजपाचा कौतुकास्पद उपक्रम]

पुर्णा/येथील शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बेटी बचाव - बेटी पढाव अभीयाना अंतर्गत आज रविवार दि.7/5/2017 नेट परिक्षा  2017 साठी हुजूर साहीब नांदेड येथे परिक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विघार्थीनींना  परिक्षा केंद्रापर्यंत जाण्या येण्यासाठी मोफत व्यवस्था भाजपा शहर शाखेच्या वतीने  करण्यात आली होती या प्रसंगी सकाळी परिक्षार्थी विघार्थीनींना शुभेच्छांसह निरोप देण्यात आला यावेळी भाजपा शहराध्यक्ष डॉ .अजयसिंह ठाकुर व्यापारी हनुमान अग्रवाल मा.नगर सेवक चंद्रकांत टाकळकर प्रतिष्ठित व्यापारी मा.सुनिलजी डुब्बेवार मा. झेड.एम. शेख मा.राजुसेठ धूत मा. ईश्वर जी परडे .संतोष कदम आदी मान्यवरांसह भाजपाचे असंख्य कार्यकर्ते ऊपस्थीत होते

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे'वर अपघात, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.


____________________________

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान भरधाव वेगातील ट्रक समोर जाणार्या क्रेनवर मागून जोरात आदळल्याने अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह दोनजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहने व ट्रकमधील अंड्याचे ट्रे आणि अंडी रस्त्यामध्ये सर्वत्र पसरल्याने  सध्या रस्त्यामध्ये असल्याने मुंबईकडे जाणार्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर  मुंबईकडे जाणा-या दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने सकाळी सकाळीच कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गाने मुंबईच्या दिशेने एक क्रेन जात असताना मागून भरधाव वेगात आलेला अंड्याचा ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो क्रेनवर आदळल्याने हा अपघात झाला.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपिस्ट खंडणी प्रकरणी अटकेत.


____________________________

पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या महेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे. वाळू ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्याचा सावंत यांच्यावर आरोप आहे. महेश सावंत यांनी दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन विदर्भातील एका व्यावसायिकाला कारवाई टाळण्यासाठी खंडणी देण्याची मागणी सावंतांनी केल्याचं म्हटलं जातं.विशेष म्हणजे रामदास कदम यांनीच महेश सावंत यांना मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात दिलं. गुरुवारी महेश सावंतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. सावंत यांनी खंडणी मागितल्याची माहिती शिवसेना विभाग प्रमुखांनी कदम यांना दिली होती. त्यानंतर फोन टॅप करुन कदम यांनी याविषयी माहिती मिळवली. मलबार हिल पोलिसांना बोलावून सावंतां विरोधात पुरावे देण्यात आले. त्यानंतर महेश सावंतांना पोलिसांनी अटक केली.

शिवसंपर्क अभियानातून उद्धव ठाकरेंची विधानसभेची तयारी...?


____________________________

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतील संभाव्य उमेदवारांची यादी मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेआहेत, की मध्यावधी निवडणुकांच्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून रविवारी ते औरंगाबाद मध्ये कामाचा आढावा घेणार आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी विधानसभेची तयारीही सुरु केल्याचं चित्र आहे.उद्धव यांनी मतदारसंघ  निहाय शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यातील प्रत्येक मतदार संघातील संभाव्य उमेदवारांची यादी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना मध्यावधी निवडणुकांची तयारी करते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकुबाई हत्तीआबिरे याचे दु:खद निधन


ताडकळस प्रतिनिधी
पूर्णा तालुक्यातील मौ कमलापुर येथील श्रीमती सखुबाई रेशमाजी हत्तीअंबीरे यांचे दु:खद निधन  दि.5/5/2017वार शुक्रवार रोजी 4:45 मिटानी दुखदनिधन झाले त्याच्या पशचात चार मुल चार सुना व नातरूड पतरूड आसा मोठा परीवार आहे त्या भिमशाहीर सुनिल हात्तिअबिरे याच्या आजी होत्या व अत्यम विधिस उपस्थिती स-अ-अदोलन जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत गांडे .पञकार धमपाल हानवते  गोविंद मठपती आरपिआय तालुकाअध्यक्ष देवराज तुपसुदर सामाजीक कार्यकते यंशवत गाडे संचालक साहेबराव खंदारे सभाजी कनकटे व परिसरातील सामाजीक व राजकीय व विहीध सघटनेचे पद आधीकारी व जन समुदाय मोठ्या संखेने उपथीत होता

शिवा संघटनेच्या परभणी शाखेची महत्वपुर्ण बैठक संपन्न


ताडकळस प्रतिनिधी

परभणी शहरात शिवा संघटनेतर्फे  क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमीत्य *महात्मा बसवेश्वर प्रतीमा मिरवणुक व राष्ट्रसंत शिवलींग शिवाचार्य अहमदपुरकर महाराज यांचा शतकोत्तर व प्रा. मनोहर धोंडे सरांचा सुवर्ण महोत्सव सत्कार* या कार्यक्रमांचे भव्य आयोजन दिनांक 25/05/2017 शुक्रवार रोजी करावयाचे आहे. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी शिवा संघटनेचे परभणीचे जिल्हाप्रमुख *डाँ. मदन लांडगे* यांच्या मार्गदर्शनाखाली शिवा संघटनेची बैठक आयोजीत करण्यात आलीे. दिनांक  05/05/2017 रोजी सायंकाळी 05.00 वाजता श्री. सारंगस्वामी विद्यालय, वसमत रोड, परभणी येथे ही बैठक संपन्न झाली. शिवा संघटनेचे परभणीचे जिल्हाप्रमुख *डाँ. मदन लांडगे* यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांनी मार्गदर्शनपर भाषणात नियोजीत कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. तसेच नियोजीत कार्यक्रमाचा ऊद्देश विषद केला. महात्मा बसवेश्वर जयंती समितीचे सचीव रामेश्वर कुबडे यांनी कार्यक्रमाच्या
नियोजनासाठीे विविध विभाग स्थापन करणे तथा कामाच्या जबाबदा-यांचे वाटप करणे , या विषयावर महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. शिवा संघटनेचे परभणीचे जिल्हाप्रमुख डाँ. मदन लांडगे यांनी अध्यक्षीय समारोपात , सर्व समाज बांधवांनी मोठ्या ऊत्साहाने कार्यक्रम साजरा करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला  शिवा संघटनेचे सोशल मेडीया जिल्हाप्रमुख जनार्दन खाकरे, ऊपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा संघटक महेश स्वामी, जिंतुर तालुकासचीव नावाडे अप्पा, सोशल मेडीया तालुकाप्रमुख शिवा दामोधर, शहर सचीव कोंडीराम नावकेकर, सुदामराव शिराळे,डाँ हुलसुरे सर, माधव सोनटक्के , गुलाब बीडकर, स्वामी, मिरजगावे, खेडकर सर,आदींची ऊपस्थी होती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संभाव्य वसमत - हिंगोली जिल्हादौरा

वसमत - रामु चव्हाण

वसमत येथे होणार संभाव्य बैठक ?

वसमत :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अध्यक्षतेखाली दि . 09 मे 2017 रोजी वसमत येथे संभाव्य   जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे ?
सदरील संभाव्य  जिल्हा आढावा बैठकीत जलयुक्तशिवार योजनेंतर्गत सन 2016-17 मधील गावांची 100% कामे पूर्ण करणे , मागेल त्याला शेततळे, कृषी पंपाना विज जोडणी देणे, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण व नागरी योजनेचा आढावा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आढावा, पिक कर्ज पुनर्रगठण , तुर खरेदी आढावा वरील सर्व विषयाच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्वात कमी कामगिरी असलेल्या गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी,मुख्याधिकारी यांच्या कामाचा आढावा तसेच यात मुख्यमंत्री जलयुक्तशिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कामाची पाहणी करणार आहेत तसेच या बैठकीस पालकमंत्री, खासदार, आमदार,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी, तहसलीदार, कृषी अधिकारी, कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता  (विद्युत वितरण कंपनी ) , जिल्हा उपनिबंधक, अग्रीण बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत यामुळे मुख्यमंत्री यांचा अध्यक्षतेखाली संभाव्य हिंगोली जिल्हादौरा वसमत येथे होत असल्याने प्रशासन कामाला लागले असल्याची प्राथमिक    माहिती आहे

पूर्णेत बेशिस्त वाहान चालकांवर कार्यवाही अवैध व्यवसायीक माफियांचे काय ?


चौधरी दिनेश
पूर्णा/पोलीस स्थानकाचे प्रभारी स.पो.नि.अजयकुमार पांडे यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात धडक मोहीम राबवण्या ऐवजी शहरातील बेशीस्त वाहन चालकांनाच शिस्त लावण्याला प्राथमिकता दिल्याने तालुक्यातील अवैध धंद्यात गुंतलेल्या व कायदा व सुव्यवस्थेला वेळोवेळी आव्हान देणाऱ्या वाळू माफिया,गुटखा माफिया,भुखंड माफिया,राशन माफिया अवैध देशी विदेशी दारु माफिया या माफिया शाहीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतात की काय ? असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित होत असून स.पो.नि.पांडे यांनी पोलीस स्विकारताच रेल्वे शहरातील पंचशील नगर परिसरातील विनोद संग्रेल यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दि.28 एप्रिल ते 30 एप्रिल 2017 च्या दरम्यान 2,52,250/-रुपयांची धाडसी चोरी केल्याची घटना घडली होती या घटने नंतर दि.04 में रोजी शहरातील रेल्वे स्टेशन समोरून मोटारसायकल वरुन जाणाऱ्या मौ.भाटेगाव येथील विश्वनाथ सखाराम कऱ्हाळे यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचा एक अट्टल गुन्हेगार व त्याच्या अन्य तिन साथीदारांनी अडवून दारु पिण्यास पैसाची मागणी करुन लुटण्याचा प्रयत्न केला परंतु कऱ्हाळे यांनी विरोध करताच त्यांच्या डोक्यात विट मारुन त्यांना गंभीर जख्मी करण्यात आले सदरील घटने मुळे परिसरात जनसामान्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले परंतु या नंतरही गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात व अनैतिक व्यावसायिक माफियाशाही विरोधात कोणती ठोस पावले उचलन्यात आली या विषयी पञकारांना माहिती देण्या ऐवजी पोलीस स्थानकाचे प्रभारी स.पो.नि.अजयकुमार पांडे यांनी दि.01 में ते 05 मे 2017 दरम्यान केवळ पाच दिवसात विविध कलमाखाली 32 वाहन चालकावर दंडात्मक कार्यवाही करुन 16 हजार 900 रुपए दंड वसुल केल्याची माहीती पूर्णा पोलिस ठाण्याचे सपोनि अजय कुमार पांडे यांनी आज शनिवार दि.06 मे रोजी दुपारी 12-30 वाजता पोलीस स्थानकात घेतलेल्या पञकार परिषदेत सांगीतली या कार्यवाहीत रस्त्यावर बेशिस्त व बेदरकार वाहन चालवणे,टिबल सीट,रस्त्यावर वाहाने उभी करुन ट्राफीक रस्त्यावर अडथडा निर्माण करणे,विनापरवाना वाहन चालवणे,क्षमतेपेक्षा जास्त आँटोत प्रवाशी भरणे आदी वाहन चालकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलतांना पांडे म्हणाले कि 14 एप्रिल रोजी शहरात घडलेल्या दंगली मुळे गेल्या काही दिवसापासुन समाजामध्ये कटुता निर्माण झाली .ही कटुता दुर करण्यासाठी व जातीय सलोखा वाढीस मदत करणाऱ्या विविध समाजातील प्रत्येक व्यक्तींच्या भेटीघाठी घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्था पुर्ववत निर्माण करण्याचा मानस असल्याचे सांगुन ते म्हणाले की कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही बुध्द जयंती नंतर शहरात अवैधरित्या चालणारे धंदे यात अवैध प्रवासी वाहातूक,अवैध देशी विदेशी दारु विक्री,तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालणारी रेती तस्करी,मटका,जुगार अड्डे,अवैध गुटखा विक्री आदी अवैध व्यावसायांविरोधात ठोस कार्यवाही करणार असल्याचे ही त्यांनी सांगीतले या वेळी शहरातील अनेक पत्रकार यावेळी उपस्तीत होते

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻


____________________________

'विप्रो' कंपनीला धमकीचे पत्र; सर्व कार्यालयांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) वाद सुरु असला तरी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार हे निश्चित झाले आहे. या स्पर्धेसाठी सोमवारी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.

धुळे = 1965 पासून कॅनडा स्थित आणि सामाजिक कार्यातून भारतासह कॅनडात ठसा उमटविणारे, दानशूरतेतून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविणारे प्रा. डॉ. जगन्नाथ काशिनाथ वाणी (वय 83 रा. धुळे) यांचे भारतीय आज सकाळी 10.30 कर्करोगाने कॅलगरी (कॅनडा) येथे निधन झाले. त्यांच्यावर  कॅनडामध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत.

पीओके मध्ये पाकिस्तान विरोधात डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्याचे स्वतंत्रतेचे नारे.

नाफेडच्या खरेदी केंद्रावर आंध्र आणि कर्नाटक मधील तूरीची विक्री, शेतक-यांच्या आरोपानंतर पालकमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, तर उत्तर महाराष्ट्रसह विदर्भात सूर्यनारायण कोपले, राज्यात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता.

घरकुलासाठी दीड लाखांऐवजी फक्त 30 हजार, बुलाडण्याच्या लाभार्थीचा दावा.

लोणावळा दुहेरी हत्याप्रकरणाचा तपास एसआयटीकडे वर्ग, सात अधिकारी- कर्मचारी करणार तपास, गुप्त माहिती देणाऱ्याला 50 हजाराचं बक्षीस.

मुंबईतील एल्फिन्सटन रोड स्टेशनचं नाव 'प्रभादेवी', तर छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस', केंद्र सरकारची अधिसूचना.

नाशिक = अॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे समीर कांबळे व नयुष कडलग यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी.

सोलापूर = 36 लाखांच्या वाळुचोरी प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील शेगावदुमाला येथील 59 जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समितीला मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावून भेट नाकारल्याने समितीने केला मुख्यमंत्रांचा निषेध.

सुलतान अझलान शाह कप - न्यूझीलंडचापराभव करत भारताने जिंकलं कांस्य.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ललिता सेठ यांचा नोएडा येथे राहत्या घऱी निधन.

पिंपरी = दिघीतील एका घरात पुरुष आणि महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, हत्या की आत्महत्या याबाबत अस्पष्टता.

छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यात पोलिसांनी दोन नक्षलींना केलं ठार, हत्यारे आणि शस्त्रसाठा जप्त.

जम्मू काश्मीर = पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणा-या 12 वर्षीय मुलाला लष्कराने घेतलं ताब्यात, राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टर मधून घेतलं ताब्यात, चौकशी सुरु.

धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांचे वक्तव्य.

नवी मुंबई = तुर्भे एमआयडीसी मध्ये अज्ञात महिलेच्या मृतदेहाचे आढळले केवळ धड, पोलीस घटनास्थळी दाखल.

वर्धा नदीच्या पुलावरून एक कार नदीपात्रात कोसळली. पती पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. राळेगाव तालुक्यातील कारेगाव नजीकची घटना. अपघातात मृत्यू पावलेला पुरुष पोलीस अधिकारी असल्याची माहिती.

नवी दिल्ली = तुघलकाबाद वायूगळती अपघात, आतापर्यंत 310 विद्यार्थिनींना उपचारांसाठी हॉस्पिटल मध्ये केले दाखल.

मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासह 6 अधिका-यांची केंद्र सरकारमध्ये होणार प्रतिनियुक्ती. मेहता यांची केंद्रीय नगरविकास मंत्री व्यकंय्या नायडू यांच्या मंत्रालयात होणार नियुक्ती. यू.पी.एस मदान नवेमुंबई मनपा आयुक्त होण्याची शक्यता.

दगडफेकीला उत्तर दगडफेकीनेच... जनसेनेचा इशारा.

____________________________

कानपूर = काश्मीर मध्ये दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अशा तरुणांवरच दगडफेक करण्याचा विडा एका संघटनेनं उचललाय. 'जनसेना' संघटनाचे प्रमुख चेतन महापुरी यांनी काश्मीर मध्ये दगडफेक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण जवळपास 1000 सहकाऱ्यांसोबत खोऱ्यात जाणार असल्याचं म्हटलंय. हे सगळे कार्यकर्ते आपल्या सोबत एक ट्रक भरून दगडही आपल्या सोबत घेऊन जाणार आहेत.या दगड फेकीसाठी कार्येकर्त्यांना खास ट्रेनिंग देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. देशाच्या अखंडतेला धक्का लावणाऱ्यांवर काश्मीर खोऱ्यात जाऊन दगडफेक केली जाईल, असा इशाराच महापुरी यांनी दिलाय. आपल्या 1000 सहकाऱ्यांसोबत 7 मे रोजी ते काश्मीरसाठी रवाना होणार आहेत.