तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 13 May 2017

पुर्णा पोलीस प्रशासन व विशेष पथकाची धाडसी कार्यवाही 39 किलो गांजासह दोन आरोपी ताब्यात

चौधरी दिनेश

पुर्णा/शहरातील विजय नगर च्या पश्चिमेस असलेल्या प्लाटींगच्या मोकळ्या जागेत शुक्रवार  दि.12 मे रोजी एक स्ञी व एक पुरुष बेकायदेशीर पणे गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन आलेले असल्याची माहीती शहारात अवैध धंद्याच्या विरोधात केसेस करणे कामी आलेल्या परभणी स्थानिक गुन्हें शाखेच्या विशेष पथकास येथील डॉ.आंबेडकर चौक पुतळ्या जवळ गुप्त बातमीदारा मार्फत मिळाले वरुन राञी 09-59 वाजेच्या सुमारास पथकातील स.पो.नि.भागोजी चोरमले,पो.हे.काँ.डोंगरे,यशवंत वाघमारे,व अन्य एक कर्मचारी यांनी पुर्णा पोलीस स्थानकात जाऊन सदरील माहिती दिली यावेळी उप वि.पो.अधिकारी ए.जी.खान हे तात्काळ पोलीस स्थानकात हजर झाले यावेळी नगर परिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना छाप्यातील पंचाचे काम करण्यासाठी लेखी पञक देऊन बोलावून घेऊन त्याची लेखी संमती घेण्यात आली तसेच छाप्यात अंमली पदार्थ मिळून आल्यास त्याचे वजन करण्यासाठी वजन काट्यासह एका व्यक्तीस बोलावून त्यांनी ही संमती दिल्यानंतर त्यांचेही लेखी संमतीपञ घेण्यात आले व पुढील  कार्यवाही साठी स्थागुशा पथकासह पंचनाम्यातील पंच उप वि.पो.अधिकारी ए.जी.खान सपोनि एम.बी.मंडले,पो.उप.नि.गणेश राठौड,स.पो.उप.नि.घरजाळे,पो.काँ.डोंगरे,पो.काँ.यशवंत वाघमारे,अन्य तिन कर्मचारी सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण करुन शासकीय वाहनांद्वारे विजयनगर च्या पश्चिमेस असलेल्या आवेश नगरच्या प्रवेश द्वारातून मोकळ्या शेतातून कच्च्या रस्त्याने शे.अयुब शे.सरवर खुरेशी यांच्या कुटुंबाच्या मालकीतील प्लाटींगच्या मोकळ्या जागेत राञी 10-55 वाजेच्या सुमारास पथक पोहोचले असता तेथे एक स्ञी व एक पुरुष दोन पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या थैल्या व पोत्यासह मिळून आले यावेळी पोलीसांनी त्यांची झडती घेतली असता त्यात त्यात भांग पत्ती नावाचा (गांजा) या नावाचा अंमली पदार्थ त्यात मिळून आला या मिळून आलेल्या सर्व अंमली पदार्थाचे वजन 39 किलो 332 ग्राम एवढे असून ज्याची किंमत 1,95000/-रुपये आहे गांजासह ताब्यात घेण्यात आलेले गांजा तस्कर अनिल कुमार श्रीनेफसिंह तवर व बन्ती भ्र.हरद्वारी पनवार हे हरियाना राज्यातील पिनीपत जिल्ह्यातील आहेत तालुक्यात गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होते परंतु या विरोधात एकदाही एवढी मोठी धाडसी कार्यवाही यापुर्वी एकदा ही झाली नाही सदरील धाडसी कार्यवाही स्थानिक पोलीस प्रशासन व परभणी स्थागुशा पथकाने संयुक्त पणे केली असून यामुळे अंमली पदार्थाची स्थानिक विक्रेत्यांचे व अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणानले असुन सदरील अंमली पदार्थ तस्करांचे फार मोठे जाळे तालुक्यात विनले गेले असल्याचे बोलले जात असुन या गांजा व अन्य अंमली पदार्थ तस्करीचा खरा सुञधार माञ पोलीस प्रशासनाच्या हाती अद्यापही हाती लागला नसल्याचे बोलले जात असुन सदरील गांजा अंमली पदार्थ धाड प्रकरणी स्थागुशाचे स.पो.नि.भागोजी चोरमले यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी अनिल कुमार तवर,बन्ती पनवार यांच्या विरोधात पुर्णा पोलीस स्थानकात नारकोटिक ड्रग्स अँड साइक्रोट्रोपिक सब्सटानसिस ॲक्ट 1985 चे कलम 20,22,29, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पुर्णा पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.अजयकुमार पांडे हे करीत आहेत

मोबाइल चोरी प्रकरणी  महिलासह दोन अल्पवयीन चोर लोकांनीचं दिले  पोलिसांच्या ताब्यात  तीन वर्षापासुन चोरलेले हजारो मोबाईल खरेदारांचे धाबे धनानले 


सेलु /प्रतिनिधी
शनिवार आठवडी बाजारात मोबाइल चोरांचा सुळसुळाट झाला असुन प्रत्येक शनिवार बाजारदिवशी नागरीकांचे मोबाइल चोरीच्या घटना घडत अाहेत.या मोबाइल चोरींच्या घटना मागील तीन वर्षापासुन घडत असुन या मध्ये प्रत्येक शनिवार बाजार दिवसी नागरीकांचे 30 ते 40 मोबाइल चोरीला जात आहेत. 
       शनिवार 13 मे रोजी आठवडी बाजारात मोबाइल चोरांनी मोबाइल चोरीचे सत्र सुरु केले असतांना एका नागरीकाच्या खिशातील मोबाइल फोन काढला असता त्या नागरीकांने प्रसंगअवधान राखत त्या चोरास पकडले असता त्या चोरासोबत असलेली एक महिला व एक मुलगा असे एकुण तीन मोबाइल चोर नागरीकांनी पकडले. परंतु त्यांनी त्यांच्याकडील मोबाइल इतर त्यांच्या साथीदारासोबत लंपास केला.  पकडलेले हे संशयित चोर नागरीकांनी पोलिसाच्या स्वाधिन केले असता त्या महिला मोबाइल चोरांनी आमची टोळी असल्याची माहिती दिली असुन सदरिल चोरलेले मोबाइल फोन त्या महिलेच्या जावयाकडे लंपास केले असल्याची कबुलीही दिली परंतु त्या दोन्ही चोरासह महिलेनेसुद्धा इतर साथीदांराची माहिती दिली नाही.अखेर या मोबाइल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधिन करण्यात येणार असल्याची माहीती पोलीसांनी  दिली आहे. शिवाय मोबाइल चोर पकडल्यानंतर चार नागरीकांनी आपले मोबाइल चोरी गेले असल्याची  तक्रार दाखल केली आहे. शनिवारी आठवडी बाजारात किमंती मोबाईल चोरल्यानंतर हे मोबाईल बेभावात  खरेदी करणारे पकडेल्या चोरापेक्षा हादरले असतील . या चोरी तशा लांबतच जाणार असून चोर व खरेदीदार तसेच मोबाईल शाॅपी चालक यात आडकण्याची शक्यता आहे. पोलिसांना  आठवडी बाजारातील मोबाईल चोरी आठवड्याला डोकेदुखी ठरायची आत्ता मात्र चोरट्यांच्या माध्यमातून खरेदी दाराला पिळून काढण्याची आयती  संधीच मिळाली आहे.    

रक्तदान शिबीरात 33 महिला व पुरुषांनी केले रक्तदान


विनोद तायडे
वाशीम - आपल्या रक्तदानाने कुणाचा तरी जीव वाचु शकतो. तसेच अनेक वेळा रक्तदान केल्याने शरीराला कोणताही आजार होत नाही. उलट एक चांगले कार्य केल्याचे समाधान मनाला लाभते. हाच विचार डोळ्यासमोर सामाजीक कार्यात सदैव अग्रेसर गुजराती समाज नवयुवक मंडळाच्या वतीने सलग दुसर्‍या वर्षी यशस्वीपणे राबविलेल्या रक्तदान शिबीराला तब्बल 33 महिला पुरुषांनी उपस्थिती दर्शवून आपले ऐच्छिक रक्तदान केले. हे शिबीर शनिवार, 13 मे रोजी सकाळी 8 वाजता स्थानिक पटेल लेआऊट स्थित जलाराम मंदिराच्या प्रांगणात आयोजीत करण्यात आले होते. 
    गुजराती समाज नवयुवक मंडळाच्या वतीने सामाजीक भान ठेवून रक्तदान शिबीरासोबतच वर्षभर विविध समाजीक उपक्रम राबविल्या जातात. उन्हाळ्याच्या दिवसात रुग्णांना रक्ताची सर्वाधिक गरज असते. अशा वेळी सामाजीकतेची जाणीव ठेवून दरवर्षी मंडळाच्या वतीने उन्हाळ्यातच रक्तदान शिबीर घेण्यात येते. मागील वर्षी झालेल्या रक्तदान शिबीरामध्ये 24 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. यावर्षी त्यामध्ये वाढ होत रक्तदात्यांची संख्या 33 वर पोहोचली. या रक्तदान शिबीराला भरभरुन प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 33 महिला व पुरुषांनी आपले ऐच्छिक रक्तदान करुन समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला. यामध्ये निलेश नथवाणी, धर्मित पटेल, मयुर पटेल, सुरज खिराडे, आशिष पटेल, सुशिल भीमजीयाणी, निकुंज देवाणी, विजय पटेल, जयश्री पटेल, तेजस परळकर, भावेश वढेरा, राजेश देवाणी, विनोद बोळे, प्रिती नथवाणी, ज्योती नथवाणी, कविता भिमजीयाणी, उमेश उबाळे, मोहीत पटेल, तेजस देवाणी, प्रमोद डोडवाडे, यश देवाणी, रामदास राऊत, मुकेश पटेल, मुकेश भाटी, निखिल खिरैया, शाम नप्ते, किशन देवाणी, भावेश देवाणी, राजु होळकर,जयेश देवाणी, कृणाल भुवा, ज्ञानेश्‍वर गायकवाड, आदेश बाहेकर आदींनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना रक्तदानानंतर प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबीरात रक्त संकलीत करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नेहा राठोड, रक्तपेढी तंत्रज्ञ डॅनियल लाड, सौ. एस.पी. जाधव, परिचर अमित बलखंडे, लक्ष्मण काळे यांच्यासह डॉ. पिनल मुकेश पटेल यांनी विशेष सहकार्य केले. तर रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेकरीता गुजराती समाज नवयुवक मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांसह गुजराती समाजातील महिला व पुरुषांनी अथक परिश्रम घेतले.

इस्लामिक संघर्ष म्हणा अन्यथा मुंडकी छाटू, हिजबुलची फुटीरतवाद्यांना धमकी.


____________________________

दहशतवादी बुरहान वानीची जागा घेणारा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी झाकीर भट्टने फुटीरतवादी हुर्रियतच्या नेत्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. काश्मीर मुद्याला राजकीय संघर्ष म्हणणे बंद करा अन्यथा तुम्हाला फासावर लटकवू अशी धमकी झाकीर भट्टने दिली आहे. काश्मीरमध्ये 27 वर्ष जो सशस्त्र लढा चालू आहे, तो इस्लामिक लढा आहे. त्याला राजकीय संघर्षाचे नाव देऊ नका. अन्यथा लाल चौकात तुमची मुंडकी छाटू अशी धमकीच झाकीरने दिली आहे. खास फुटीरतावाद्यांना दिलेला हा संदेश त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. काश्मीर मध्ये दहशतवादी संघटनांनी इस्लामिक दृष्टीने जी आखणी केलीय त्यात ढवळाढवळ करु नका. तुम्हाला काश्मीरचा संघर्ष राजकीय वाटतो तर, मशिदी. इस्लामिक चिन्ह आणि घोषणांचा वापर करु नका असा त्याने फुटीरतवाद्यांना इशारा दिला आहे. सय्यदअली गिलानी, मीरवाईज उमर फारुख आणि यासीन मलिक हे काश्मीर मधील फुटीरतवादी गटाचे नेते आहेत. मागच्यावर्षी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत बुरहान वानी मारला गेला. त्यानंतर काश्मीर मध्ये मोठा हिंसाचार झाला होता. आता त्याची जागा झाकीर भट्टने घेतली आहे. झाकीर पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे राहतो. जुलै 2016 मध्ये त्याने बंदुक हाती घेतली. त्याआधी त्याने चंदीगड कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मी उलेमा नाही. इथले विचारवंत भ्रष्ट आहेत. तुरुंगात रवानगी होईल म्हणून त्यांना मर्यादा ओलांडायला भिती वाटते. त्यामुळेच आम्हाला पुढे यावे लागले आहे असे झाकीर म्हणाला. इथे राजकीय नेते आहेत. ते आमचे नेतृत्व करु शकत नाहीत. आमचा संपूर्ण लढा इस्लामसाठी आहे आणि एकदिवस आम्ही काश्मीरमध्ये शरीयत लागू करु असे झाकीर भट्ट म्हणाला.

पेट्रोल पंपचालकांचे आंदोलन तूर्तास स्थगित.


____________________________

कमिशन वाढीची मागणी करत आंदोलन पुकारणाऱ्या पेट्रोल पंपचालकांनी आपलं आंदोलन तूर्तास स्थगित केलं आहे. त्यामुळे उद्यापासून पेट्रोल पंप नेहमीसारखेच सुरु राहणार आहेत.कमिशन वाढीची मागणी करत पंपचालकांनी रविवार बंद आणि एका शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. तो सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. 17 मे रोजी ऑईल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालक संघटनांना चर्चेसाठी बोलावल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.याबाबत बोलताना फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध म्हणाले की, “आमचं आंदोलन कॉस्ट कटिंग मोड्यूल होतं. कायद्याच्या चौकटीत राहूनच हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांशी चर्चा करुन, पेट्रोल पंपचालकांच्या समस्यांवर तोडगा काढावा अशी आमची प्रमुख मागणी होती. परंतु आम्हाला कोणतीही संधी दिली नाही. उलट शासनाकडून आम्हाला पेट्रोल पंप ताब्यात घेऊ, मेस्मा लावू असं सांगण्यात येत होतं. त्यामुळे आम्ही कायद्याचा आदर करण्यासाठी हे आंदोलन थांबवत आहोत. कायद्याचा पुन्हा अभ्यास करुन पुढील दिशा ठरवू” दरम्यान, पेट्रोल पंपधारकांनी येत्या 14 तारखेपासून केवळ एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा इशारा दिल्यानंतर काल प्रशासनानही आक्रमक भूमिका घेतली होती. पेट्रोल पंपचालकांनी आपला संप मागे न घेतल्यास त्यांची लायसन्स रद्द करु, असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काल दिला होता.सध्या पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रति लीटर एक रुपया 45 पैसे एवढे कमिशन मिळते. या उलट पेट्रोल पंपाचा व्यवस्थापन खर्च सोयी-सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत कमी असल्याने व्यवसाय करणं कठीण जात असल्याचं पेट्रोलपंप चालकांचं म्हणणं आहे. मागण्यांसदर्भात सरकारकडे पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याने पेट्रोल पंपचालकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं.

वाशिम येथे बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळा


विनोद तायडे
वाशिम
स्थानीक वाटणे  लॉन  मंगल कार्यालय येथे तुळसाई आरोग्य व रुग्णसेवा संस्थेच्या वतीने बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह  13 मे रोजी मोठया थाटामाटात पार पडला. वाशिम जिल्ह्यातील असा सामूहिक विवाह सोहळा पाहिल्यांदाच पाहायला मिळाला . दि 13 मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे  आयोजन मानसरोग तज्ञ डॉ नरेश इंगळे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सिद्धार्थ देवळे यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी,कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके,मंगरूळपीर नगराध्यक्ष डॉ गजाला खान,भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत, रिपाई अध्यक्ष तेजराव वानखडे,पिरिपा जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे ,सत्यमेव जयते अध्यक्ष परमेश्वर अंभोरे ,तहसीलदार बळवंत अरखंराव,डॉ नितीन ढोबळे,स अभियंता मिलिंद उके ,कृषी अधिकारी मिलिंद उके,अभियंता कुणाल तायडे,डॉ विलास इंगळे,प्रतिभाताई सोनोने,राजेंद्र अहिर,सह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली .मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार माजी तहसीलदार गोविंदराव इंगळे व  डॉ नरेश इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्रिशरन पंचशील पूज्य भन्ते प्रज्ञापालजी यांनी घेऊन बौद्ध धम्मीय   16 जोडप्याचा  विवाह सोहळा विधी  हरिश्चंद्र पोफळे ,विलास भालेराव,समाधान कांबळे ,अरविंद उचित  आदींनी पार पाडला .वर  वधू ना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बुद्ध आणि त्याच धम्म हा ग्रंथ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. विवाह सोहळ्याला हजारो लोकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलांनी अथक परिश्रम घेतले

विनोद तायडे वाशिम

विवेक ओबेरॉयने शहीदांच्या कुटुंबाला दिले 25 फ्लॅट.


____________________________

समाजातील अनेक नामवंत व्यक्ती शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार पाठोपाठ आता या यादीत अभिनेता विवेक ओबेरॉयचा समावेश झाला आहे. विवेक ओबेरॉयच्या कर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने शहीद जवानांच्या कुटुंबियांना हक्काचा निवारा दिला आहे. विवेकने केंद्रीय राखीव पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना ठाण्यात मोफत 25 फ्लॅट दिले आहेत. विवेकच्या संस्थेने सीआरपीएफला लिहीलेल्या पत्रामध्ये वेगवेगळया मोहिमांमध्ये देशासाठी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना फ्लॅट देणार असल्याचे जाहीर केले आहे. 25 पैकी चार फ्लॅटच्या चाव्याही कुटुंबियांकडे सोपवल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमारनेही सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना 1.08 कोटी रुपयांची मदत केली आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 11 मार्चला भेजी गावामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबाला अक्षयने आर्थिक मदतदिली आहे.

महापौर, नगरसेविका, सरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या पतिराजांना धोक्‍याची घंटा


सुभाष मुळे...
------------
गेवराई, दि. 13 : पत्नीऐवजी मीच महापौर किंवा नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य म्हणून रुबाब मारणाऱ्या पतिराजांना महापालिका, नगरपालिका किंवा ग्राम पंचायत, पंचायत समिती, नगर परिषदेच्या शासकीय कामकाजात हस्तक्षेप करता येणार नाही.
      महापालिका, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हस्तक्षेप करणे, गटार का उपसले नाही, पाणी का सोडले नाही, औषध का फवारले नाही, टॅंकर का पाठविला नाही, म्हणून शासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणे किंवा त्यांच्या कामात अडथळा आणल्यास त्यांच्या पत्नीला महापौर किंवा नगरसेविका पद गमवावे लागणार आहे. "महिला पदाधिकारी घरात आणि पतिराजांचा कारभार जोरात‘ अशी स्थिती असल्याने राज्यात याची अंमलबजावणी जोरदार सुरू झाली आहे. महिला पदाधिकाऱ्यांकडे निर्णय क्षमता यावी, एखादा निर्णय चुकला तरी चालेल; पण त्यांना निर्णय घेता यावा, यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण दिले असतानाही पदे केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली जाऊ नयेत, याचीही खबरदारी शासनाकडून घेतली जात आहे.
       ग्रामपंचायत असो किंवा महापालिका, सर्वच ठिकाणी महिला पदाधिकाऱ्यां ऐवजी त्यांचे "पती‘च कारभार करताना दिसतात. शासकीय कामात "महिला पदाधिकारी घरात आणि पतिराजांचा कारभार जोरात‘ अशी स्थिती असल्याने शासकीय कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे संबंधित महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा पालिका व नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ग्रां.प. च्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यास अशा महिला सरपंच, महापौर आणि नगरसेविकेला पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

वसमत तालुक्यात अॅड शिवाजीराव जाधव यांचा भेटीचा धडाका

रामु चव्हाण

वसमत  :- पुर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक अवघ्या काही दिवसांनवर येवून ठेपली असताना भाजपाचे नेते यानी प्रचाराचा धडाका लावत गावोगावी भेट देत निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. वसमत तालुक्यातील काही गावांमध्ये सध्या अॅड शिवाजीराव जाधव हे स्वत भेटी देत आहेत यात त्यानी आडगाव रंजे येथे पुर्णा कारखान्यच्या सभासदांशी संवाद साधताना अँड शिवाजीराव जाधव साहेब यावेळी सभासद मोठया संख्येने उपिस्थत होते.अप्रतीम यावेळी रामचंद्र सोळन्के, नंदूकुमार डाखोरे , खोब्राजी पाटील भाजपl तालुकाध्यक्ष , प. स. सभापती चंद्रकांत दळवी,उपसभापती वैद्य साहेब. विठ्ठलराव चव्हान, प्रभाकर रेंगे,नाथराव कदम, जि. प. सदस्य बालाजी जाधव, िकशनराव देवरे, जितु महाजन,साई चव्हान विष्णु जाधव,काशिनाथराव चव्हान, भालेराव मामा व कार्यकर्ते. सभासद बाधंव व गावकरी मंडळी ची उपस्थिती होती तर पिपंळगाव कुटे येथे पुर्णा कारखान्यच्या सभासदांशी संवाद साधला  नंदूकुमार डाखोरे , खोब्राजी पाटील भाजपl तालुकाध्यक्ष , प. स. सभापती चंद्रकांत दळवी,उपसभापती वैद्य साहेब. विजय नरवाडे,  विलासराव नादरे विठ्ठलराव चव्हान, प्रभाकर रेंगे,नाथराव कदम, जि. प. सदस्य बालाजी जाधव, िकशनराव देवरे, जितु महाजन,साई चव्हान विष्णु जाधव,काशिनाथराव चव्हान, भालेराव मामा व कार्यकर्ते. सभासद बाधंव व गावकरी मंडळीचे मोठा संख्येने उपस्थित होते.

छाया - नागेश चव्हाण वसमत

उद्या रविवारी पेट्रोल पंप सुरू राहणार


खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने १४ मे, म्हणजेच उद्यापासून प्रत्येक रविवारी पेट्रोल-डिझेल पंपांना सुटी राहिल असा निर्णय पेट्रोल डिलर्सची संघटना फामफेडाने घेतला होता.
मात्र आता यासंदर्भात त्यांना ऑईल कंपन्यांकडून १७ मे रोजी चर्चेचे निमंत्रण आल्याने तसेच या निर्णयासंदर्भातील कायदेशीर बाजू तपासून पाहूनच पेट्रोल पंपाच्या सुटीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
लोड कराय साठी टैप करा
फामफेडा अध्यक्ष उदय लोध यांनी एका पत्रकाद्वारे हा निर्णय कळविला आहे.
या संदर्भात पुढील निर्णय होईपर्यंत पेट्रोल पंपांना रविवारी सुटी न घेण्याचा निर्णय पंपचालकांनी आज घेतला आहे

शिऊर ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीत एका जागेसाठी सहा जणांचे अर्ज दाखल

शिऊर । सतरा सदस्य असलेल्या शिऊर ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी शेवटच्या दिवसा अखेर शुक्रवारी एकूण सहा महिलांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. माजी उपसरपंच भागीरथी जाधव यांच्या निधनाने वार्ड क्रं.६ ची जागा जुलै २०१६ मध्ये रिक्त झाली होती. तब्बल दहा महिन्यानंतर होणार होत असलेल्या एक जागेच्या पोट निवडणुकीत सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या या जागेसाठी २७ मे रोजी निवडणूक होत असून दि ५ मे ते १२ मे दरम्यान वैजापूर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. यात माजी ग्रा.प.सदस्या कांताबाई अण्णासाहेब पगारे, सुनीता अशोक चव्हाण, अकिलाबी अकबर शेख, विमल भागीनाथ पगारे, कविता बाबासाहेब पगारे आणि सोनाली किशोर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सोमवारी १५ मे रोजी अर्जाची छाननी होणार असून दि १७ मे बुधवार रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. तसेच याच रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येऊन निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार दि २७ मे रोजी मतदान होणार असून २९ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. केवळ तीन वर्षासाठी ग्रा.पं.सदस्य पद उपभोगता येणार असल्याने सध्या तरी निवडणुकीचा उत्साह दिसून येत नसला तरी पुढील आठवड्यात मे च्या भर उन्हात प्रचाराचा धुरळा उडणार आहे.