तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 20 May 2017

दादर मध्ये खासगी बस उलटली, एकाचा मृत्यू तर 35 प्रवासी जखमी.


____________________________

मुंबईतल्या दादर टीटी भागात एक खासगी बस पटली झाली आहे. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. मुंबईतल्या दादर टीटी भागातून बोरिवलीहून रत्नागिरीला जाणारी एक खासगी बस पटली झाली. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दरम्यान, सध्या खासगी बसच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण गेल्या दोन दिवसांत खासगी बसच्या अपघातात दोनजणदगावले आहेत. तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.काल विक्रोळी जवळच्या गांधीनगर फ्लायओव्हर जवळ बस उलटून एकाचा मृत्यू झाला होता. दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारा ही घटना घडली होती. या अपघातानंतर गांधीनगर फ्लायओव्हरवर मोठी वाहतूककोंडी झाली होती.

वसमत येथील इंडिया बॅकेतुन भरदिवसा मोबाईल पळवला

वसमत :- रामु चव्हाण

   वसमत शहरातील आसेगाव काॅर्नर येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतुन एका शेतकऱ्याचा मोबाईल भरदिवसा चोरट्यांनी पळवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
  या बाबत सविस्तर माहिती अशी की सातेफळ  ता वसमत येथील शेतकरी प्रल्हाद रामराव बोरगड हे व विजय बेंडे  दि 19 मे रोजी सुर्या फार्मसी कंपनीच्या कामासाठी वसमत येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आले व या शाखेतील खात्यातून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सभासदांचा खात्यावर  90000 रू पाठविण्यासाठी आले असता त्यांचा मोबाईल टेबलवर ठेऊन स्लीप भरली व या पैशासाठी कमीशन किती लागेल  हे विचारण्यासाठी कॅश काऊंटरवर गेले असता तेथून परत आले असता त्यांचा मोबाईल मिळून आला नाही त्यानी या बाबत शाखा व्यवस्थापक याना सांगितले असता बॅकेतील CCTV चेक करण्यात आले असता त्यात अंदाजे 22 ते  24 वयाच्या युवकाने सदरील मोबाईल फोन चोरून नेल्याचे दिसून आले यामुळे स्टेट बँक ऑफ इंडीया चा कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या बाबत बोरगड यानी वसमत  पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे. सदरील चोरटा हा CCTV कॅमेर्‍यात कैद झाल्याने हा चोरटा सापडेल का असा सवाल उपस्थित होत आहे

चिंतन काय करता, शेतक-यांना तत्काळ कर्जमाफी द्या- प्रवीण तोगडिया


____________________________

राज्यात कर्जमाफी बाबत मुख्यमंत्र्यांनी अभ्यास, चिंतन करण्याऐवजी तातडीने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा. तसेच उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाचा दर शेतक-यांना मिळावा, सिंचनासाठी सुविधा अधिकच्या वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने तातडीने कृती कार्यक्रम (अॅक्शन प्लान) राबवावा, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना मांडले.  जळगावात आयोजित विश्व हिंदू परिषदेचा शिक्षा वर्ग व बजरंग दलाचा शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमानंतर तोगडिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काश्मीर मध्ये सैनिकांवर हल्ले होत आहे. ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. सैनिक सुरक्षित नाही तर देशातील सर्वसामान्य काय सुरक्षित असतील..? असा प्रश्न उपस्थित करत तोगडिया यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर टीका केली. तर दुसरीकडे, जीएसटीसोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठीही विशेष अधिवेशन का आयोजित केले नाही...? शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सरकारला जीएसटीपेक्षा कमी महत्त्वाचा आहे का...? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केला. जीएसटी संदर्भात आयोजित विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, जीएसटीसाठी विशेष अधिवेशन जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्यपालांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठीही विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. परंतु, आजपर्यंत सरकारने या मागणी बाबत साधे उत्तरही दिलेले नाही.जीएसटीचे विधेयक मंजूर झाले पाहिजे, याबाबत दुमत नाही. शेवटी जीएसटी हे आम्हीच आणलेले विधेयक आहे. परंतु, त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणाही तेवढीच महत्त्वाची आहे. मागील अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षातील 19 आमदारांचे निलंबन झाले होते. शेतकरी कर्जमाफीची मागणी करणेही आता गुन्हा झाला आहे. आम्ही राज्यातील 27 जिल्ह्यात संघर्ष यात्रा काढली. या यात्रेतून शेतकऱ्यांचा सरकार विरोधात किती प्रक्षोभ आहे, ते आम्हाला प्रकर्षाने दिसून आले, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे सांगितले.गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला होता. आज दीड महिना झाला. अजून अभ्यास पूर्ण झालेला नाही. परंतु, आता अभ्यासासाठी अधिक वेळ राहिलेला नाही. राज्यात केवळ शेतकरी आत्महत्यांचाच नव्हे तर शेतमालाच्या खरेदीचा प्रश्न चिघळला आहे. सरकारने शासकीय खरेदी केंद्राबाहेर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी केली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे काँग्रेसचे चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे उपोषणाला बसले आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेत्यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारने बहुमताच्या जोरावर अधिक मुस्कटदाबी करू नये. जीएसटी अधिवेशऩाच्या निमित्ताने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी मांडली.

गावागावात शाहीरी कला पथके स्थापन करनार ज्योतीताई जगताप (कबीर कला मंच )


बार्शी प्रतिनिधी
आज बार्शी येथे मानव मुक्ती मिशन या संघटनेचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आज शनिवार  दिनांक २० मे २०१७ रोजी शिबिराच्या उद्घााटन  सत्राचा  समारोप करताना कबीर कला मंचाच्या शाहीर ज्योतीताई जगताप म्हनाल्या की सध्या सांस्कृतिक आघाडिची नितांत गरज आहे. समताधिश्टित लोकशाही समाजवादी क्रांतीसाठी जनतेचे मनपरिवर्तन करण्यासाठी गावागावात शाहीरी कलापथके स्थापन करण्यासाठी काम करु

आष्टी रोडवर मोटार सायकल आयशर आपघातात एक ठार तीघे जखमी

पाथरी:- तालुक्यातील आष्टी रोड वर सारोळा फट्या नजीक झालेल्या मोटार सायकल आयशरच्या समोरा समोरील धडकेत एक जन ठार तर तीघे गंभिर जखमी झाल्याची घटना शनिवार २० मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडली
शहरातील सागर कॉलनी येथील आशा दत्ता पवार ४० वर्ष, अरून दत्ता पवार १० वर्ष अंकूश शामराव मोहीते, बाळू सुखदेव पवार हे चौघे मोटार सायकल वरून पाथरी कडे येत असतांना आष्टी कडे जाणा-या आयशर वर समोरा समोर धडकल्याने यातील बाळू सुखदेव पवार ३० यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकलचा चकनाचूर झाला

आगीत भस्मसात झालेल्या शिंदे कुंटुंबाला बियाणे व खत वाटप


आशिष धुमाळ

परतूर
तालुक्यातील सुंरुमगाव येथील शेतकरी मधुकरराव शिंदे ह्यांच्या घराला ३० एप्रील २०१७ रोजी अकस्मात आग लागली होती. त्यामध्ये त्यांचे खुप संसार उपयोगी साहित्यासह ,कपड्यासह, अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले होते. या कुंटुंबाला माणुसकीचा हात देत आज दिनांक २० मे शनिवार रोजी 'आधारवड फाऊंडेशन' तर्फे त्यांना तातडीची मदत म्हणुन मान्सुन पुर्व शेतात पेरण्यासाठी कपाशी बीयाणे व रासायणीक खते मोफत देण्यात आली. पुढे त्यांना किटनाषक औषधी व इतर आवश्यक गोष्टी देखील पुरवण्यात येतील. संकट समयी प्रशासन व राजकारण्यांकडुन दुर्लक्षीत शेतकरी बांधवांना 'आधारवड फाऊंडेशन' ने दाखवलेल्या आपुलकीच्या भावनेने मोठा दिलासा वाटतो आहे. या प्रसंगी उपस्थीत मा. श्याम वाढेकर (अध्यक्ष आधारवड फाऊंडेशन), मधुकरराव खरात, संतोष खंडागले, शेख निहाल सर, बालुकाका ढवले, जगदिश चांदर, अमोल खरात, संपत ईरकर, संदानंद चिखले, नागेश चिखले इत्यादी उपस्थित होते.

तेलंगानात जाणरा घरगुती रॉकेल पोलिसांनी पकडल्याने अर्धघाऊक रॉकेल गोदामाला सील    

दोन जनावर गुन्हा,  आरोपी अटक

धर्माबाद.कलिदास अनंतोजी

धर्माबाद येथून घरगुती वापरासाठी असलेला रॉकेल   तेलंगणातील  काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना दिनांक  20-5-2017 रोजी दुपारी   स्थानिक पोलिसांनी  रंगे हात पकडून  जप्त केला असून दोन आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आले.

धर्माबाद तालुक्यात घरगुती वापराचे राॅकेल मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करित असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरवारकर यांनी तेलंगणात जात असलेला  शहरांतील  राहेर नाका येथे  राॅकेलचा ऑटो पकडला. ऑटो   क्रमांक  AP 01-B-7367 या  मध्ये राॅकेल चे पाच टाक्या( एकून 1000 हजार लिटर ) माल मिळाला . किंमती ऑटोसह  एक लाख  दोन हजार रपयेचा  मुद्देमाल जप्त करण्यात आले  आरोपी अब्दुल बारी रा.फुलेनगर धर्माबाद, गणेश शिंदे रा. पाटोदा  या दोघांना अटक करण्यात आली.

सदरील राॅकेल चा साठा कोणाचा आहे असे आरोपींना   पोलिसा समक्ष पञकारांनी विचारले असता ,अर्धघाऊक राॅकेल विक्रेता शिवनाथ बन्सीलाल इनानी यांचे असल्याचे सांगितले त्यांवरून  तहसील कार्यालयातील नायबतहसिलदार सुनील माचेवाड यांनी इमानी यांच्या राॅकेल गोदामास  सिल ठोकले. या वेळी मराठी पत्रककार संघाचे अध्यक्ष जी.पि.मिसाळे,  कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार लक्ष्मण तुरेराव, सुधीर येलमे, म.मुबशिर, अक्षय जोशी,  बालाजी  कुदाळे, भगवान् कांबले,अहमद लड्डा, विजयालक्ष्मी  सोनटक्के, शिवराज  गाड़ीवान, गणपत जटालकर, गणेश वाघमारे, किशन काबंळे  उपस्थित होते 
अर्धघाऊक राॅकेल विक्रेता ईनाणी यांची कसुन चौकशी केल्यास मोठे गौडबंगाल दिसुन येईल यात पाच अर्धघाऊक राॅकेल विक्रेतेचे काळा बाजार केलेले उघडकीस येतील. संबंधित राॅकेल विक्रेता ईनाणी यांचे  दुकानांचे परवाने रद्द करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पञकारनी केली आहे. यावर कारवाई नाही झाल्यास पञकार शिष्टमंडळ पोलिस जिल्हा अधिक्षक  व जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत.

कलिदास अनंतोजी
नांदेड 9921404070

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

____________________________

नांदेड येथील नवीन मोंढ्यातील सायकल गाेदामाला आग, आगीत लाखोंच्या सायकली जळून खाक.

दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांनी केलाय. आणि आता तर योगेश कदमांनी अधिकारी कसे पैसे लाटतात, त्याची एक ऑडिओ क्लीपच पुढे आणलीय.

19 वर्षांची अमरावतीतील तरुणी मरणाच्या दारातून परत आली. जन्मदात्या बापानंच तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. कारण काय, तर दुसऱ्या जातीतील तरुणावर तिचा जीव जडला.

जम्मू काश्मिर = दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद, हंडवाडातील चकमकीत लष्कराकडून दोन अतिरेक्यांनाही कंठस्नान.

पुणे = बारावीची परीक्षा अवघड गेल्याने 18 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, मानसिक तणावातून टोकाचं पाऊल.

जम्मू काश्मीर = बडगाम जिल्ह्यात दगडफेक करणा-या दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात, पुढील तपास सुरू.

लखनौ येथे मृतावस्थेत आढळलेल्या IAS अधिकारी अनुराग तिवारींसाठी कॅन्डल मार्च, मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी.

भडगाव = राज्य महामार्ग 19 वरील लहान-मोठे 130 अतिक्रमणे हटवण्यात आली. वाहतुकीसाठी रस्ता मोकळा झाल्याने वाहनधारकांनी व्यक्त केले समाधान.

नाशिक = पंचवटीतील किरण निकम या युवकाच्या हत्येप्रकरणी चार संशयिता पैकी गणेश उघडेला अटक. कोर्टानं सुनावली 23 मे पर्यंत पोलीस कोठडी.

उत्तराखंड मध्ये अडकलेले जळगावातील 61 भाविक सुरक्षित.

भुसावळ = आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई 720 वा अंतर्धान समाधी सोहळा, 21 मे रोजी मुक्ताई समाधीस्थळी श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे परंपरेने साजरा होणार. पंढरपूर येथून पांडुरंगाच्या पादुका भुसावळकडे निघाल्या .

सोलापूर = अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यासाठी सतत घाई करणाऱ्या पत्नीची पतीनं केली हत्या, दिंडूर येथील घटना.

ठाणे = 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त.गुन्हे शाखेची कारवाई, दोन जण अटकेत.

कल्याण येथून 6 किमीवर सापड गावात 3 गुंठा जागेमध्ये नथुराम गोडसे यांचे स्मारक बांधण्याचा मानस, हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते पंडित जोशी यांची घोषणा. नव्या पिढीला गोडसेंचे विचार समजावेत आणि स्वावतंत्रवीर सावरकरांचे हिंदुत्व विचार कसे धगधगते होते हे माहिती व्हावे. हा विचार मनात ठेवून स्मारक बांधणार असल्याची माहिती.

चंद्रपूर = कर्जबाजारी पणामुळे महादेव मंदे (वय 46) या शेतक-याची विहिरीत उडीमारुन आत्महत्या, भोयगावातील घटना.

नवी दिल्ली = ईव्हीएम बाबत खोटी माहिती पसरवली, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.

नंदुरबार = शहादा नगरपालिकेतील रेकॉर्ड विभाग प्रमुख सुभाष मराठे यांना 500 रुपयांची लाच घेताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली अटक.

भाजपला सत्ता दिल्यास उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देवू, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते, माञ मोदी सत्तेत आल्यानंतर आश्वासन पूर्ती झाली नाही - खासदार,राजू शेट्टी.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, दुसरीकडे बाजारात शेतमालाल भाव नाही, तुरीला 3800 ते 4000 भाव अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी अडचणीत - खासदार राजू शेट्टी.

चंद्रपूर = ब्रम्हपुरीचे उपअधीक्षक भुमिलेख थॉमस यांना 15 हजाराची लाच घेताना अटक.

रत्नागिरी = संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील सात वर्षीय मुलीच्या खून प्रकरणी आरोपी रघुनाथ उर्फ राघो धनावडे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली जन्मठेप.

पंढरपूर = विठ्ठल मंदिरात भाविकाला मारहाण करणारे सरकारी पुजारी अशोक भंडगे यांचं निलंबन.

मुंबई = पोलीस अधिका-याला शिवीगाळ केल्या प्रकऱणी आमदार रमेश कदमविरोधात गुन्हा दाखल.

विठ्ठल तिडके दिसेल तिथे संभाजी ब्रिगेड धडा शिकवेल ---- बालाजी शिंदे

प्रदिप कोकडवार
जिंतूर
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले आहे त्यांचा स्वराज्यात सर्व लोक सुखी समाधानी होते म्हणून ते सर्व बहुजन समाजाचे आराध्य दैवत आहेत त्यांचा बदल अपशब्द वापरले जाणे चुकीचे आहे यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असल्या नीच मनोर्वतीचा आम्ही जाहीर निषेध करतो असल्या नीच माणसाला जिथे दिसेल तेथे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते धडा शिकवतील असे यावेळी तेज न्यूज शि बोलताना संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी स्पष्ट केले..

मांजरा नदि पाञातिल अवैध रेती उपसा बंद करा ... भ्रष्टाचार निर्मुलन समिती व तालुका शिवसेनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


           (कलिदास अनंतोजी)
-बिलोली
तालुक्यातील बोळेगाव ,गंजगाव , नागनी ,येसगी ,येथिल मांजरा नदि पाञातुन गेल्या दिड ते दोन महीण्यापासुन लिलावाच्या व खाजगी परवानाच्या नावाखाली महसुल प्रशासनाच्या आशिर्वादाने  ठेकेदारानी शासनाच्या कराराचा भंग करुन राञन-दिवस जेसिबि मशिनने रेती उपसा करुन पर्यावरणासह शासनाच्या महसुलीवर गंडातर ओढावले जात आहे.तात्काळ हा अवैध मार्गाचा अवलंब बंद करावा.आन्यथा तिवृ अंदोलन छेडण्याचा ईशारा काल दि.19 रोजी अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व तालुका शिवसेना प्रमुख यानी  निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे .
तालुक्यासाठी नैसर्गिक  वरद हस्त लाभलेल्या या मांजरा नदि पाञाच्या आशिर्वादाने सदरील  भागातिल हजारो हेक्टर शेती गेल्या सहा ते आठ वर्षापूर्वी  सिंचन क्षेञाखाली होती.परीणामी शासनाकडुन महसुलीच्या आपेक्षे पोटि या भागातिल सगरोळी  बोळेगाव ,गंजगाव ,येसगी ,नागनी ,माचनुर ,कार्ला या भागातिल रेती उपसा करण्यासाठी गेल्या दशकापासुन विविध अटि नियम घालुन शासकिय लिलावाच्या व खाजगी पट्ट्यातुन रेती उपसा परवाना दिला जात आहे .परंतु दिवसेंदिवस परवानाच्या नावाखाली आवैध उपस्याच्या प्रमाणात वाढ होत गेल्यामुळे या भागातिल दिवसेंदिवस जल पातळीवर दुष्परिणाम होत चाल्याने सिंचन शेती धोक्यात आली.
सध्या परस्थितित या भागातिल सहा तेआठ घाटाला रेती उपसा परवाना देण्यात आला.परंतु संबंधित ठेकेदार व महसुल प्रशासन यांच्या आर्थिक तडजोडीने शासकिय करारा भंग करीत राञन-दिवस प्रत्येकी घाटावर 3ते4जेसिबी मशिनचा सरासपणे वापर करित शेकडो फुट खोलीतून रेती उपसा केला जात आहे .यामुळे पर्यावरणासह महसुलीवर मोठे गंडातर ओढावले  जात आहेत .याबाबतीवर आळा बसवावा यासाठी अनेक पर्यावरण       प्रेमी व सामाजिक ,राजकीय पक्षाच्या वतिने व दैनिकाच्या माध्यमातून प्रशासनास जागे करण्याचे  आनेक प्रयत्न अपयशी ठरत चालले .आवैध मार्गाने राञन-दिवस कोठ्यावधी रुपयाची कीमती रेती हजारो वाहानाच्या सहायाने तेलंगना ,कर्नाटक राज्यात तस्करी होत आहे.
सदरील घाटावर्ती जेसिबि च्या सहायाने परवानाच्या नावाखालची तस्करी रोखावी यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समीतीचे विभागिय अध्यक्ष राजु पाटिल शिंपाळकर शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव रोकडे यानी दि.19 मे.रोजी जिल्हाधिकारी याना निवेदन देउन संबंधित दोषिवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली .अन्यथा तिवृ आदोंलन छेडण्याचा ईशाराही निवेदनावर देण्यात आला.या शिवाय सदर निवेदन महसुलमंञी महाराष्ट्र राज्य ,पालक मंञी ,विभागिय महसुल आयुक्त,यांच्याकडे ही देण्यात आल्या .सदरील निवेदनावर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतिल याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे .
कलिदास अनंतोजी
नांदेड 9921404070

पाकनं LoC वर तैनात केले शीर कापणारे कमांडो.


____________________________

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलासा देत पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाच शिवाय जागतिक पातळीवर पाकिस्तानची नाचक्कीही झाली. यामुळे बिथरलेला पाकिस्तान पुन्हा एकदा कुरापती करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा रेषेवर भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात रचला जात आहे.  पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ आपल्या बॉर्डर एक्शन टीमचे (BAT) कमांडो तैनात केले आहेत. याद्वारे भारतीय जवानांवर वारंवार विघातक हल्ले करुन जवानांच्या मृतदेहाची विटंबना करणे हा त्यांचा उद्देश आहे. दरम्यान, यापूर्वीही पाकिस्तानच्या बॉर्डर एक्शन टीमचा भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात समावेश राहिला आहे. 'टाइम्स नाउ' या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान बॉर्डर एक्शन टीम मध्ये केवळ सैन्यचं नाही तर दहशतवाद्यांचाही समावेश आहे.  गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषा आणि विशेष करुन हाजी पीर परिसराजवळ भारतीय जवानांना टार्गेट करण्याचं कटकारस्थान पाकिस्तानकडून रचण्यात येत आहे. कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगित देण्यात आली. यामुळे तिळपापड झालेल्या पाकिस्तान कडून भारतीय जवानांना निशाणा बनवण्यासाठी कट रचला जात आहे. 17 आणि 18 मे रोजी पाकिस्तान कडून करण्यात आलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले.  यावेळी भारताकडून झालेल्या गोळीबारात एक पाकिस्तानी एसएसजी कमांडो मारला गेला. एलओसी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कमांडो पाकिस्तानने सीमारेषेवर कातैनात केले आहेत..? याचा तपास करताना ‘बॅट’ची ही भयावह बाब समोर आली आहे.

उत्तराखंड मध्ये अडकलेले भाविक सुखरूप पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी दिला मदतीचा हात!


अनिल घोरड
बीड दि. 20 -------- उत्तराखंड येथे काल झालेल्या भूस्खलनामध्ये अडकलेले परळी मतदारसंघातील सातही भाविक सुखरूप आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी या सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना मदतीचा हात दिला.

   उत्तराखंड मधील बद्रीनाथ मार्गावर असलेल्या विष्णू प्रयागजवळ काल मोठे भूस्खलन झाल्याने हा मार्ग ठप्प झाला होता. सुमारे 15 हजार यात्रेकरू व अनेक वाहने मार्गावर अडकली होती. संभाव्य धोका पाहून जिल्हा प्रशासनाने भाविकांना आहे त्याच ठिकाणी थांबवले होते. जोशी मठ येथे अडकून पडलेल्या यात्रेकरूंमध्ये परळी मतदारसंघातील दामोदर तांदळे, उत्तम तांदळे रा. सारडगाव, दिनकर चव्हाण रा. वडखेल, सिताराम येवले, रमेश तिवार रा. परळी, सतीश शेप, रा. शेपवाडी, उत्तरेश्वर बनाळे रा. पोखरी यांचा समावेश होता.

   परळीचे भाविक संकटात सापडल्याचे समजताच पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तेथील प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था केली. आणखी काही मदत हवी असेल तर सांगा अशा शब्दांत       त्यांनी केलेल्या चौकशीमुळे भाविकांना मोठा धीर मिळाला. हे सर्व भाविक सध्या सुखरूप आहेत.