तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 27 May 2017

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाला तहासिलदारांची सदिच्छा भेट


                         रिसोड महेद्र महाजन जैन रिसोड- वाशिम
-प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा रिसोड येथे तहसीलदार सुरडकर यांनी सदिच्छा भेट दिली.संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व विद्यालयाला प्रथम भेटीची आठवण म्हणून श्रीकृष्णाची प्रतिमा भेट दिली. विद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनात विविध अध्यात्मिक कार्यक्रम नित्याने संपन्न होत असतात  .ज्योतिदिदींना ब्रह्माकुमारी गीता दीदी, ब्रह्माकुमारी वंदना दीदी व ब्रह्माकुमारी वर्षा दीदी यांचे सहकार्य मिळते. ईश्वरीय ज्ञान सामान्य व्यक्तीपर्यंत पोहचवून आत्म्याचा संबंध परमात्म्याशी असून ज्ञान मार्गाने राजयोगाच्या माध्यमातून ज्ञान देण्याचे कार्य विद्यालयात दिले जाते.विद्यालयातील नियमित वर्गात उपस्थित राहल्याने तणावमुक्त,व्यसनमुक्त, ईर्षामुक्त जीवन जगणे साध्य होते.ईश्वराचे स्वरूप, आगमन,समज गैरसमज या ज्ञानमार्गातून स्पष्ट होतात. सात दिवसीय राजयोग शिबीर या ज्ञानाचा पाया असून ते शिबीर सतत विद्यालयात ज्योती दिदींच्या  मार्गदर्शनात सुरू असते.अनेक उपक्रमापैकी ब्रह्माभोजना चे औचित्य साधून तहसीलदार यांनी दिलेली भेट त्यांना प्रसन्नता देणारी वाटली.प्रसंगी अशोक निचळ,भागवत घुगे, नागप्पा चौरे, धीरज भाई, महादेव लोणकर, सोनू डाखोरे, खराडे भाई, भिंगे भाई इत्यादी उपस्थित होते

फेसबुकवर निच राणाची बाजु मांडत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न


--------------------------------
कृष्णा लोंढे, कोळगाव
समाजात ज्या क्षेत्रातील लोकांचा मोठा मान सन्मान आणि आदर केला जातो त्याच क्षेत्रात शेन खाणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालपरवाच बीड जवळ असलेल्या, आई बद्दल मोठ्या आदराच्या नावाने असलेल्या विठाई  नर्सिंग महाविद्यालयात स्वतच्या विद्यार्थीनींकडूनच शरीर सुखाची स्वप्ने पाहणार्या आणि स्वतच्या हव्यासासाठी विद्यार्थींनीना वेगवेगळे धाक दाखवून दबावाखाली घेण्याचा निच प्रकार करून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम राणा डोईफोडेने केले आहे.त्याच्या या बदमाश कृत्याने संपूर्ण बिड जिल्ह्यात संतापाची लाट पसरलेली आहे तर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राच्या आब्रुवर संपूर्ण महाराष्ट्रातुन  शिंतोडे उडवले जात आहेत.  अशा घृणास्पद आणि निच कृत्याचा सर्वत्र निषेध होत असुन  जनतेच्या मनातील राणा बद्दलचा राग अजून शांत झालेला नसतानाच फेसबुक या सोशीअल नेटवर्किंग साईटवर प्रेम मुंडे या नावे असलेल्या फेक अकाउंटच्या माध्यमातून राणाचा गाजावाजा करत , त्याच्या कृत्याला समर्थन देत दोन जातीमध्ये आणि राजकीय पक्षामध्ये भयंकर वाद लावण्याचा प्रकार सुरू आहे. राणाचा फोटो हा मुद्दाम भाजप समर्थक असल्याचा फोटो आहे ज्यातून राजकीय पक्षात वाद लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी निच कृत्य करणार्या राणाचा निषेध करणारी एखादी पोस्ट टाकल्यास त्याला एकदम खालच्या थराला जाऊन शिव्या देण्यात येत आहेत. फेसबुकवर राजकारणाचा फड या नावे असलेल्या ग्रुपवर प्रेम मुंडे या नावे असलेल्या अकाउंटने वाद लावला असून तरुणांच्या मनात अजुनच राग निर्माण होण्याचे काम केले जात आहे. त्याचे आडनाव हे मुंडे असल्याने वंजारी समाजात आणि इतर समाजात तेढ निर्माण होण्याचे कारण बनत आहे. हा वाद खूप अंतिम टोकापर्यंत पोहचत आहे त्यामुळेच जाती -जाती मध्ये भांडणे लावणाराला आणि तरुणांच्या भावनांवर मिठ चोळणाराला  तात्काळ लगाम घालून त्याच्यावर आय टी अॅक्ट नुसार कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार कृतीत उतरवा: गणेश पाटील

महादेव हरणे

मालेगांव :-
आगामी  15 ऑगस्ट पर्यंत मालेगाव तालुका हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार
कृतीत उतरविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी
उपस्थित सरपंच, ग्रामसेवक आणि व्हिलेज च्ॉम्पिअन यांना केले. ते तालुका
हागणदारीमुक्त करण्यासाठी मालेगाव येथील बालाजी मंगल कार्यालयात आयोजित
निर्धार सभेत गुरुवारी बोलत होते. यावेळी जि. प. च्या समाज कल्याण सभापती
पानुबाई जाधव, महिला व बाल कल्याण सभापती यमुनाबाई जाधव, मालेगाव पंचायत
समिती सभापती मंगलाताई गवई, पं. स. उपसभापती ज्ञानबा सावळे, जिल्हा परिषद
सदस्य विकास गवळी, मुंबई येथील वासो कार्यालयाचे समन्वयक अरुण रसाळ,
प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक साने, कोल्हापुरचे विजय
पाटील, गोपीचंद गवई, उध्दव राऊत, दिपक राऊत,गजानन शिंदे, गटविकास अधिकारी
थोरात आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सीईओ गणेश पाटील म्हणाले गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी
सरपंच, व्हिलेज च्ॉम्पिअन आणि ग्रामसेवक यांनी सुक्ष्म नियोजन करणे
आवश्यक आहे. गावातील जे सधन कुटंुबे आहेत त्यांना शौचालय बांधण्याबाबत
तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि ज्या कुटंुबांची आर्थिक परिस्थिती नाही
अशांना शौचालयाचे साहित्य जसे विटा, रेती, सिमेंट, प्रशिक्षित गवंडी
उपलब्ध करुन देणे हे काम ग्रामसेवक व ग्रामपंचायतच्या पदाधिकाज्यांनी
करणे अपेक्षित आहे. आपल्या गावात किती शौचालय बांधायचे यानुसार प्रत्येक
ग्रामसेवकांनी आपले नियोेजन करणे अपेक्षित असल्याचे सांगुन पाटील म्हणाले
कि सरपंच- ग्रामसेवक मंडळींनी शौचालय बांधणाज्या पात्र लाभार्थांना
बक्षीस  मिळण्याची हमी दिली तरी या कामाला गती येईल.
मालेगाव तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुक्यात मागील आठ दिवसांपासुन
कोल्हापुरची टीम प्रयत्नशिल आहे. गावकर्यांनी या संधीचा फायदा करुन
घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी निर्धार सभेचे आयोजन
करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानबा सावळे, जि. प.
सदस्य विकास गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. वासो चे समन्वयक अरुण रसाळ
यांनी हागणदारीमुक्त वातावरणात ध्वजारोहण करण्यासाठी येत्या 15 ऑगस्ट
पुर्वी तालुका हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी शौचालय
प्रोत्साहन अनुदानाच्या प्रस्तावाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी थोरात यांनी
केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी
गणेश पाटील यांनी प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक साने यांचे
कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजु
सरतापे यांनी तर आभार प्रदर्शन राम श्रंृगारे यांनी केले. प्रफुल्ल काळे,
शंकर आंबेकर, सुमेर चाणेकर, पुष्पलता अफुणे, विजय नागे, विस्तार अधिकारी
येनकर, अभिजित दुधाटे, रविचंद्र पडघान, गटसमन्वयक सदानंद राऊत, सुखदेव
पडघान, दत्ता चव्हाण आदिंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

ग्रामसेवक संघटनेचा पुढाकार:
तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने पुढाकार  घेतला असुन
याबाबतचे निवेदन या निर्धार सभेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए. जे. नवघरे आणि
सचिव अरुण इंगळे यांनी केले. प्रत्येक ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी
यांनी आपले गाव 15 ऑगस्ट पर्यंत हागणदारीमुक्त करुन सहकार्य करण्याचे
आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

ताडकळस येथे कडब्याच्या गंजीसआग लागून तीस ते पस्तीस हजाराचे नुकसान

प्रतिनिधी शेख शेहजाद      ताडकळस :: येथुन जवळच असलेल्या महातपुरी  शिवारातील   मोहन बाबुराव  होनमणे यांच्या शेतातील ज्वारीच्या कडब्याच्या गंजीस  शनिवार  27   मे रोजी  सायंकाळी  6   वाजेच्या सुमारास आचानक आग लागली. या आगीत सदरील शेतकऱ्याचे  तिन ते साडेतीन   हजार कडब्याच्या पेंड्या जळून   30 ते  35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.            याबाबत अधिक माहीती अशी कि,महातपुरी शिवारातील मोहन होनमणे यांच्या शेतात नुकतेच ज्वारी पिक काढुन वर्षभर जनावरांना वैरणीसाठी तीन  ते  साडेतीन  हजार कडब्याच्या पेंड्या शेतात रचून ठेवल्या होत्या. शनिवार  27  मे रोजी सायंकाळी  6   वाजेच्या सुमारास आचानक आग लागून या आगीत  30  ते  35 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना कळताच ञ्यंबक आंबोरे, ग्रामपंचायत सदस्य खंडेराव वावरे, कैलास होनमणे, सुरेश मगरे, पञकार धुराजी होनमणे, अशोक गाढवे, आदींनी घटना स्थळावर धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला. या आगीत मोठे नुकसान झाले असून शासनाकडून अर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

बसवेश्वरांची जयंती उत्साहात साजरी


परभणी : प्रतिनिधी
म.बसवेश्वर यांच्या ८८६ व्या जयंती निमीत्त शनिवार दि. २५ रोजी शिवा संघटनेच्या वतीने शोभायात्रा आणि गौरव सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांचाही शोभायात्रेत लक्षणीय सहभाग होता.
शनिवारी सकाळी शोभायात्रेची सुरुवात महापौर मिना वरपूडकर यांच्या हस्ते करण्यात आली. या शोभायात्रेत राष्टÑीय संत ष.ब्र.१०८ श्री सदगुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी शिवा संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष मनोहर धोंडे,ष.ब्र.१०८ श्री डॉ.नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णा, ष.ब्र. १०८ काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरी या शिवाचार्याची रथामधून मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेत परभणी जिल्हयातील १०८ कलशधारी महिला सहभागी झाल्या होत्या.या कार्यक्रमा दरम्यान शतकोत्तर गौरव सोहळ्याचे गुरुवर्य  राष्टÑीय संत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासह महाराष्टÑ राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवनकर, परभणी जिल्हा शिवा संघटनेचे प्रमुख डॉ. मदन लांडगे,शिवसेना आ. डॉ. राहुल पाटील, मराठवाडा अध्यक्ष अर्जुन शैदाने, विठ्ठल ताकभिडे आदींची उपस्थिती होती. यावेळी शिवलिंग शिवाचार्य महाराजांची विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने गौरव कऱण्यात आला. तसेच प्रा. मनोहर धोंडे यांचा विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने वाढदिवसानिमीत्त सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना धोंडे म्हणाले २००१ पासून महाराष्टÑात म.बसवेश्वर यांची  जयंती साजरी करण्यास शासनाला सुरुवात करण्यास शिवा संघटनेने भाग पाडले. शेजारच्या कर्नाटक राज्यात विरशैव लिंगायत स्मााजाचे  ८० आमदार असूनही त्यांना हे करता आले नाही असेही ते म्हणाले तसेच केंद्र सरकारच्या ओबीसी मध्ये विरशैव लिंगायत समाजाचा समावेश करण्याची मागणी शिवा संघटनेच्या वतीने करण्यात आली.

हागणदारी मुक्त अभियान संपूर्ण मराठवाड्यात


परभणी : प्रतिनिधी
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तीक शौचालय व उघड्यावर शौचालय ४४ ठिकाणी संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान टेकाळे व त्यांच्या पथकाने शहरात पाहणी केली. यानंतर दि. २६ मे रोजी दुपारी ३ वाजता बी.रघुनाथ सभागृह येथे महिला बचत गटाचा मेळावा घेऊन महिलांना मार्गदर्शन केले. दुपारी ४ वाजता बी.रघुनाथ सभागृह येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बैठकीचे स्वागत केले होते.
या बैठकीत  उदय टेकाळे संचालक स्वच्छ महाराष्ट्र, महापौर सौ.मिनाताई वरपुडकर, आयुक्त राहुल रेखावार, उपायुक्त अनिल गिते, नगरसचिव चंद्रकांत पवार, नगरसेवक एस.एम.अली पाशा, मोहमद जानू, मो.गौस, विनोद कदम, पाशा कुरेशी, अखील काजी, सहाय्यक आयुक्त विजया घाडगे, राजस्थानच्या एनजीओ येथून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील नागरिकांची जनजागृती करण्यासाठी ओमप्रकाश शहा व पथक आलेली आहे. यावेळी संचालक टेकाळे यांनी परभणी शहराची लोकसंख्या ३ लाख १५ हजार ऐवढी आहे. ६५ नगरसेवक निवडणुन आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत २०१६-१७ ला चालू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३८४ नगर पंचात व महानगरपालिका आहेत. मराठवाड्यातील ३ महानगरपालिका २ नगरपरिषद हागणदारी मुक्त करण्यासाठी आम्ही मराठवाड्यात फिरत आहोत. यापुर्वी दि.१५ रोजी स्वच्छ अभियानांतर्गत बैठक घेण्यात आली. यानंतर ८ दिवसानंतर आढावा घेतला आहे. नगरसचिव मनिषा म्हैसकर यांच्या सुचनेनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियानंतर्गत  आज सकाळी शहरात ५ वाजल्यापासून फिरलो. प्रत्येक जागी मनपाचे कर्मचारी व अधिकारी फिरताना दिसले. शहरातील बचतगटाच्या महिला देखील काम करीत आहे. २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत हागणदारी मुक्त करावयाचे आहे. शहरात १२ हजार शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट पुर्ण करावयाचे आहे. नगरसेवकांनी पुढाकार घेऊन शहर हागणदारी मुक्त करावे. नागरिकांनी वैयक्तीक शौचालय बांधण्यास पुढाकार घ्यावा. मनपाअंतर्गत वैयक्तीक शौचालयाचे फॉर्म भरून त्यांच्या खात्यात पैसे जमा केला जातो. महाराष्ट्र शासन घनकचरा व्यवस्थापन या योजनेअंतर्गत सव्वा तिन लाख लोकसंख्येवर ३६ कोटी रूपये प्रकल्पासाठी मंजुर होऊ शकतो. त्यासाठी महानगरपालिकेला ५० टक्के निधी द्यावा लागेल. व केंद्र शासन व महाराष्ट्र शासन ५० टक्के निधी देणार आहे. शासन १८ कोटी रूपये देणार आहे. शहरात घनकचरा, वैयक्तीक शौचालय, सार्वजनिक शौचालय, पिण्याचे पाणी देण्यात यावे. विकास कामासाठी नगरसेवकांनी वेळ काढावा व वैयक्तीक शौचालय बांधवून घ्यावे. नगरसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली.

राज्यात 2 ते 4 जून सर्वदूर पावसाची शक्यता

- मान्सूननं केरळमध्ये प्रवेश केल्याने तो वेगाने पुढे सरकणार असून येत्या २, ३, ४ जून दरम्यान राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. साबळे हे कृषी हवामान शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख असून गेल्या १५ वर्षांपासून ते शेतीच्या दृष्टीने मान्सूनचा अंदाज व्यक्त करतात. त्यासाठी त्यांनी मॉडेल तयार केले असून हा अंदाज मार्च, एप्रिल व मे महिन्यातील कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वा-याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. त्यासाठी त्यांना डॉ. खासेराव गलांडे आणि अभियंता विलास नजन हे सहाय्य करीत आहेत.

डॉ. साबळे यांनी सांगितले की, दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो. त्याचे वितरणही वेगळे असते. त्यादृष्टीने राज्यात विभागवार नेमका किती पाऊस पडेल व खंड कधी असेल, याची माहिती शेतक-यांना मिळणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने तो पिकाचे नियोजन करु शकतो. स्थानिक पातळीवर अंदाज व्यक्त करायचा असेल तर किमान ३० वर्षांचा डाटा आवश्यक असतो. ज्या ठिकाणी सरासरी ऐवढा पाऊस पडेल असे म्हटले जाते, तेव्हा तेथे फरक पडू शकतो़ मध्ये खंड पडू शकतो व पुढच्या काळात कमी दिवसांत अधिक पाऊस पडून तो सरासरीएवढा येऊ शकतो.

राज्यात २, ३ व ४ जून दरम्यान सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी या काळात ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस होईल. तेथे पेरणी लवकर करण्यास हरकत नाही. पेरणी लवकर झाल्यास यंदा उत्पादन जास्त होईल. या वर्षी मान्सून कालावधीत एलनिनोचा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. वा-याचा वेग कमी आढळल्याने २० जून ते १० जूनच्या दरम्यान पावसात खंड पडतील. विदर्भ व मराठवाड्यात पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे. तसेच मार्च, एप्रिल व मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदविले गेल्याने मान्सूनचे आगमान वेळेपूर्वी होणे शक्य आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले

दोन दिवसात पाच शेतकरी आत्महत्या


परभणी : प्रतिनिधी
 पाथरी तालुक्यातील लोणी बु, सिमरगव्हाण आणि पाथरगव्हाण येथिल तीन शेतकºयांनी बँकेच्या कजार्ला कंटाळून एकाने विषारी औषध प्राशन करून तर दोघांनी गळा फास घेऊन जिवन यात्रा संपवली तसेच परभणी तालुक्यातील झाडगांव येथील एका शेतकºयांने विष प्राशन करून तर पुर्णा येथील देगाव येथील ४० वर्षीय शेतकºयांने आत्महत्या केली.
या विषयी मिळालेल्या माहिती नुसार लोणी बु येथिल मारोती निवृत्ती रासवे वय ५२ वर या शेतक-याने कजार्ला कंटाळून शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास घराच्या छतावर जाऊन तननाशक औषध प्राशन केले या वेळी रासवे हे जेवन करण्याच्या निमित्ताने घराच्या छतावर गेले होते या वेळी पत्नी त्या वाढण्या साठी गेल्याने त्याच्या हा प्रकार लक्षात आला त्या तात्काळ या विषयी घरच्यांना सांगितले असता उपचारा साठी तातडीने ९:००वा पाथरी थेथे प्रथमोपचार करून त्यांना परभणी येथिल सामान्य रुग्नालयात हलवण्यात आले या वेळी उपचार सुरू असतांना रात्री १ वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मारोती रासवे यांना ४एक्कर जमिन असून दोन मुले आहेत त्यात एकाचे लग्न झालेले असून दुसरा दिव्यांग आहे. रासवे यांच्या कडे बँक आॅफ महाराष्ट्र आणि सोसायटीचे कर्ज असल्याने ते सतत चिंतेत असत यातच त्यांनी शुक्रवारी विषारी औषध प्राशन केले शनीवारी सकाळी ९:०० वाजता त्यांच्यावर लोणी बु येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरी घटना तालुक्यातील सिमुरगव्हाण येथे घडली येथे कैलास बालासाहेब उगले या २५ वर्षीय तरून शेतक-याने आपल्या स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला शुक्रवारी सकाळी १०:३० वा गळाफास घेतला या वेळी ही घटना कैलास याचा लहान भाउ विकास दुस-या शेतात होता त्याच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने गळाफास घेतलेल्या आपल्या भावाला उचलून धरले आणि ईतरांच्या मदतीने गळा फास सोडऊन त्याला तातडीने पाथरी येथिल खाजगी रुग्नालयात दाखल केले त्या नंतर प्रकर्ती चिंताजनक झाल्याने कैलास उगले यांना मानवत येथिल खाजगी रुग्नालयात व्हेंटीलेटरवर ठेवण्या आले मात्र उपचार सुरू असतांनाच सायंकाळी ५.०७ मी. या तरून शेतक-याने शेवटचा श्वास घेतला सततची नापीकी शुभमंगल योजने अंतर्गत घेतलेल्या कर्जाच्या हप्त्या पोटी आई वडील कोर्ट कचेरी करत आहेत, त्याच बरोबर इतर बँकांचे कुटूंबावर असलेलो लाखोचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच हा तरून शेतकरी राहात होता यातच शुक्रवारी ही घटना घडल्याचे नातेवाईकां कडून सांगण्यात येत आहे. तरून शेतक-याने अशा प्रकारे जिवन यात्रा संपवल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून मानवत येथे सायंकाळी शव विच्छेदना नंतर रात्री साडे आठ वाजता शोकाकूल वातावरणात सिमुरगव्हाण येथे अंत्यविधी करण्यात आला. महीनाभरा पुर्वाच बांदवाडा येथे तरून शेतकरी याने गळा फास घेल्याची घटना ताजी असतांनाच एकाच दिवशी दोन शेतक-यांनी मरणाला कवटाळल्याने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तीसरी घटना शनीवारी सकाळच्या सुमारास पाथरगव्हाण येथे घडली असून येथिल ४५ वर्षीय शेतकरी परमेश्वर बन्सीधर घांडगे यांनी सकाळच्या सुमारास घरातील माळवदच्या कडीला गळाफास घेऊन जिवन यात्रा संपवली सततची नापीकी ने बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच ते राहात असत यातच शनीवारी सकाळी त्यांनी गळा फास घेऊन यातून स्वत:ची सुटका करून घेतली या विषयी अमोल रामेश्वर घांडगे यांच्या खबरे वरून पाथरी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या जननायक  पुरस्कार उत्साहात संपन्न

परभणी : प्रतिनिधी
येथील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी जनसहयोग सेवाभावी संस्थे वतीने देण्यात येणाºया पुरस्कार वितरण सोहळा बी. रघुनाथ सभागृह वसमतरोड परभणी येथे २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
 या वर्षीचे जननायक पुरस्काराचे मानकरी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, विशाल राठोड, राणा संजय नाईक, आर.डी. मगर, प्रकाश हरगावकर, प्रा. मुजाहेद अली, डॉ. मनोज सोनी, मनिषा उमरीकर, नुरुल्ला खान,हरकळ सर, अब्दुल वसीम, खंदारे बालीका,के.सी.आर.जिला,सौ.मनिषा उमरीकर,सौ.संगिता मुळे, शाहीन परवीन, ताज अहेमद हाशमी, खंदारे बालिका, पठाण अलीयार खान यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करणयात आले.
 पुरस्कार वितरण मनपा महापौर मिना वरपुडकर, कॉंग्रेस नेते गफार मास्टर, अ‍ॅड. अशोक सोनी, जान मनपा सदस्य महमद जानु, ज्येष्ठ पत्रकार रमाकांत अण्णा कुलकर्णी,मनपा सदस्य  सय्यद मोईन मौली, समाजवादी जिल्हांध्यक्ष मनसुर खान, शजी अहेमद खान,डॉ.अशोक सोनी,के.सी.आर.जिला, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मराठवाडा गीतगायन स्पर्धेत एकूण ३४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यात विभागून प्रथम पारीतोषीक सतीश अग्रवाल सिल्लोड,सय्यद पाशा परभणी,द्वितीय विभागून गणेश शर्मा जालना,शेख जलील औरंगाबाद, तृतीय अनील दाभाडकर,परभणी,साईराज घुगे परभणी तर उत्तेजनार्थ अब्दुल रहेमान कुरेशी परभणी यांनी पटकावीले . परिक्षक म्हणून प्रा.कलीम काजी,समी सौदागर यांनी काम केले.सुत्र संचलन मधुकर उमरीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकरण़़्यासाठी संयोजक महेमुद खान, सहसंयोजक मोईन खान, अमजद खान, फेरोज खान,अफरोज खान, मुन्ना हाशमी,शेख अझर,आसेफ अन्सारी,कलीम हाशमी,रहीम मास्टर,आबेद फारुखी,आदीनी परिश्रम घेतले.