तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 3 June 2017

नांदेड मध्ये 15 शेतक-यांना अटक, जमावबंदीचं उल्लंघन केल्याचा गुन्हा.


____________________________

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. नांदेड मध्ये आंदोलन कर्त्या शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. जवळपास 15 शेतक-यांवर जमावबंदीचं उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.  येथील मालेगाव मार्गावर दौर व देगाव कुं. येथील शेतकरी रस्त्यावर भाजीपाला, दूध फेकून आंदोलन करत असताना अर्धापूर पोलिसांनी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. संपकरी शेतकऱ्यांची समिती व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीतील निर्णय मान्य न झाल्याचे सांगत रविवारी शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे संप मिटल्याची घोषणा आणि दुसरीकडे संप कायम ठेवण्याची भूमिका जाहीर झाल्याने संपात उभी फूट पडल्याचे चित्र आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य होई पर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. पुणतांब्यात शनिवारी ग्रामसभा झाली, त्यात संपाचा निर्धार कायम ठेवण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही आंदोलनाची धग कायम आहे. खान्देशातही संपाची धग कायम असली तरी बाजार समित्यां मध्ये अल्प प्रमाणात व्यवहार सुरू आहेत.

कुठल्याही पक्षाला नाही पेलवले मतदान यंत्राच्या हॅकींगचे आव्हान.


____________________________

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करुन दाखवण्यासाठी शनिवारी झालेल्या हॅकेथॉन चॅलेंजमध्ये एकही पक्ष सहभागी झाला नाही. हे आव्हान स्विकारण्याची तयारी दाखवणा-या सीपीएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्यक्षात मशीन हॅक करण्याचे चॅलेंज स्विकारलेच नाही. आपल्याला चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचे नसून, ईव्हीएमची कार्यपद्धती समजून घ्यायची आहे असे या दोन्ही पक्षांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी ही माहिती दिली. ईव्हीएमचे कार्य कसे चालते ते प्रात्यक्षिकासह दाखवल्यानंतर सीपीएमचे समाधान झाले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक होऊ शकते असा दावा करणारा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने हे आव्हान स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांनी नियम बदलण्याची मागणी केली होती.पण निवडणूक आयोगाने त्याची मागणी फेटाळून लावली.
मागच्या काही काळापासून प्रत्येक निवडणुकीत सातत्याने भाजपाचा विजय होत असल्याने काही पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर संशय व्यक्त केला होता. दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पार्टीने ईव्हीएमसोबत छेडछाड झाल्याचा आरोप केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीयांची बैठक घेऊन ईव्हीएम मध्ये छेडछाड करणं शक्य नसल्याचे सांगितले. भारतात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पूर्णपणे सुरक्षित आहेत व त्यात कोणतीही छेडछाड केली जाऊ शकत नाही, अशी ग्वाही निवडणूक आयोगाने दिली आणि तरीही विश्वास नसेल, तर ‘या आणि आमची मतदान यंत्रे हॅक करून दाखवा,’ असे आव्हान राजकीय पक्षांना दिले होते. इच्छुक राजकीय पक्षांना 26 मे रोजी सायंकाळी 5 पर्यंत नोंदणी करण्याची वेळ होती. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांच्या प्रत्येकी 3 प्रतिनिधींना यात भाग घेण्याची मुभा होती.  या प्रतिनिधींना त्यांच्या पसंतीची कोणतीही 4 मतदान यंत्रे हॅककरून दाखवण्यासाठी निवडता येणार होती असे  मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नस्सीम झैदी यांनी सांगितले होते. काय म्हणतो निवडणूक आयोग..?

- मतदान यंत्राचा कोणत्याही पक्षाच्या बाजूने अगर विरोधात वापर केला जाऊ शकत नाही. ईव्हीएम बनविताना किंवा मतदानासाठी त्यांचा वापर करताना हेराफेरी शक्य नाही. ही यंत्रे परदेशातून आयात केली जात नाहीत. सर्व यंत्रे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सार्वजनिक उपक्रमांकडून घेतो. त्याचे सॉफ्टवेअरही येथेच तयार केले जाते.- मतदानापूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमची तपासणी होते. ईव्हीएममध्ये दोष आहे किंवा काय, हे तपासण्यासाठी मतदानाची रंगीत तालीम घेण्यात येते. ही प्रक्रिया आटोपल्या नंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच ईव्हीएम सील केले जाते. सर्व यंत्रे स्ट्राँगरूम मध्ये ठेवण्यात येतात.

पिंप्री येथे कुटार गंजीला आग

विनोद तायडे
वाशिम
रिसोड .तालुक्यातील पिंप्री सरहद्द.येथे नारायण लोडजी गवळी या शेतकऱ्याच्या कुटार गंजीला लागलेल्या आगीत आठ ते दहा  हजाराचा चारा जळुन खाक झाल्याची घटना दि 3 जून ला रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली .शिरपूर पोलीस स्टेशन चे पी एस आय तोगरवाड ,जमादार रमेश मोरे घटनास्थळी दाखल झाले   आग विझविण्यासाठी  ग्रामस्थाची एकच धावपळ उडाली . येथील पत्रकार प्रभाकर  नाईकवाडे यानी रिसोड अग्निशामक दलाला आग लागल्याची  माहिती  भ्रमणध्वनीवरून दिली .घटनास्थळावर अग्निशामक दल दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला
आगीत शेतकऱ्याचा आठ ते  दहा  हजार रुपयाचा चारा जळुन खाक झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.आता पेरणी  पाऊसाचे  दिवस असल्याने  जनावरांपुढे टाकाचे तरी काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला  आहे.

विनोद तायडे वाशिम
8888277765

प्रशासकीय गुणांचा उचित गौरव पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अच्युतराव हांगे यांची नियुक्ती


        (कालिदास अनंतोजी)
नांदेड (प्रतिनिधी) - मिरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्त श्री. अच्युतराव हांगे यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राज्य सरकारने नियुक्ती करून त्यांच्या उचित प्रशासनाचा गौरव केला आहे.
महाराष्ट्र नगर विकास विभागाने महापालिका आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून त्यात श्री. हांगे यांचा समावेश आहे.
परभणी येथी कृषी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले श्री. अच्युतराव हांगे यांनी अनुक्रमे पैठण, हिंगोली, देगलूरसह भिवंडी, निजामपूर येथे आयुक्त म्हणून तर नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना श्री. हांगे यांना मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती दिली. ३ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देवून त्यांच्या प्रशासकीय वकूबाचा शासनाने उचित गौरव केल्याचे यातून स्पष्ट होते.

कालिदास अनंतोजी
नांदेड़ 9921404070

आज गोळेगाव ता.परतूर येथे श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान


आशिष धुमाळ
परतूर
तालुक्यातील गोळेगाव येथे राष्ट्रमाता आहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त मा. श्रीमंत कोकाटे यांचे आज दिनांक 4 जुन रविवार रोजी सायंकाळी 7:00 वाजता जाहीर व्याखान आयोजीत केले आहे. तरी या कार्यक्रमाला हाजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सोनं आणि हिऱ्यावर 3 टक्के जीएसटी, 1जुलैपासून जीएसटी लागू .


____________________________

जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्यावर किती टक्के कर लागणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर जीएसटी समितीनं सोन्यावर 3 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच हिऱ्यांच्या दागिन्यावरही 3 टक्के जीएसटी लावण्यात येईल. कर रचनेसाठी 5, 12, 18 आणि 28 टक्के असा स्लॅब निश्चित करण्यात आला होता.मात्र, सोन्यासाठी 3 टक्क्याचा नवीन स्लॅब तयार करण्यात आला आहे. आज चपला,विडी, रेडिमेड गारमेंट्स इत्यादी वस्तूंसाठीही जीएसटी निश्चित करण्यात आला आहे. 500 रुपये किंमती खालील चपलांसाठी 5टक्के तर त्यापेक्षा महाग चप्पलांसाठी 18 टक्के जीएसटी लावण्यात येईल. तर बीडीवर 28 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. सर्व राज्यांनी मंजुरी दिल्यामुळं 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्याचं जेटलींनी सांगितलं आहे.

शेतकरी संपात फूट पाडल्याच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर ..........

                                      बीड : शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडल्याचा आरोप करणाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे बुद्धीभेद करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. बीडच्या परळीमध्ये आज रेल्वे प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, यूपीए सरकारने केलेल्या कर्जमाफीपेक्षा राज्य सरकार दुप्पट ते तिप्पट कर्जमाफी करणार आहे. त्यामुळे काही लोक बुद्धीभेद करतील, कोणाला किती मदत मिळणार. पण त्यांना सांगू इच्छितो की, सगळ्यात आधी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातील अल्पकर्जधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. ”काही राजकीय पक्ष मुद्दाम या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी प्रयत्न करत होते. पण हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. जोपर्यंत सत्तेत आहोत, तोपर्यंत शेतकरी आणि शेतमजूर वंचितांसाठी काम करत आहोत.”

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालाच उल्लेख करुन, गेल्या अडीच ते तीन वर्षात मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचं सरकार करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, काल मुख्यमंत्री आणि संपकरी शेतकऱ्यांच्या बैठकीनंतर पुणताब्यांतील कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमधील मतभेद समोर आले आहेत. तर नाशिकमधील किसान क्रांतीनेही शेतकरी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकमध्ये आज कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संप सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर उद्या राज्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या संध्याकाळी 4 वाजता नाशिक बाजार समितीत ही बैठक होणार आहे.

मध्यम तीव्रतेच्या भूकंपानं पश्चिम महाराष्ट्र हादरला.


____________________________

कोयना धरण परिसरासह कोकण किनारपट्टी, दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र शनिवारी रात्री झालेल्या भुकंपाच्या जोरदार धक्कयाने हादरला आहे. भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल नोंदली गेली. या जोरदार  धक्कयानंतर कोयना परिसरात पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे.पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांना शनिवारी मध्यरात्री भूकंपाच्या मध्यम स्वरूपाच्या धक्क्याने हादरवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.8 इतकी नोंदली गेली आहे. मध्यरात्री 11 वाजून 44 मिनिटे आणि 52 सेकंदांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सांगलीपासून पश्चिमेला84 किलोमीटर आणि राजगड पासून दक्षिणेकडे 133 किलोमीटर अंतरावर कोयना धरणाच्या परिसरात असल्याचं सांगण्यात येत आहे.या भूकंपाचे धक्के प्रामुख्यानं सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना बसला. भूकंपामुळे काही काळ रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. अनेकांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून घरांमधून बाहेर पडून मोकळ्याजागी धाव घेतली. या भूकंपामुळे कुठलीहानी झाली नसल्याची खातरजमा प्रशासनाकडून केली जात आहे.

लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, एकाचा मृत्यू.


____________________________

शनिवार लंडन वासियांसाठी घातवार ठरला आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. प्रशासनानं अधिकृतरित्या या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू तर जवळपास 20 जण गंभीररित्या जखमी झालेआहेत. प्रसिद्ध लंडन ब्रिजवर एका भरधाव कारनं फूटपाथवरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना चिरडलं आहे, तर दुसऱ्या घटनेत लंडन ब्रिज जवळील एका हॉटेल मध्ये एका व्यक्तीनं त्याठिकाणी खात असलेल्या ग्राहकांवर चाकूहल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य एका घटनेत वॉक्सहॉल परिसरात गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

खामगांव-शेलोडी-जवळा रस्त्यावरील जवळा गावाजवळील पुलावरून वाहतूक बंद     बुलडाणा, प्रतिनिधी(जावेद खान) : खामगांव-शेलोडी-तिंत्रव- जवळा रस्त्यावरील 13/600 किलोमीटर मध्ये जवळा गावाजवळील क्षतिग्रस्त पुल असल्यामुळे या पूलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पूलावरून वाहतूक बंद केल्यामुळे वाहतुकीच्या सोयीसाठी तात्पुरता वळण मार्ग तयार करणे व माहिती फलक लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या सूचनाही उपविभागीय अधिकारी, जि.प बांधकाम उपविभाग, खामगांव यांना कार्यकारी अभियंता, जि.प बांधकाम विभाग यांनी दिल्या आहेत, असे कार्यकारी अभियंता, जि.प बांधकाम विभाग बुलडाणा यांनी कळविले आहे.
*****

पोलीस निरक्षक प्रदिप पालीवाल याचा निरोप संमारंभ कार्यक्रम पालम पो.स्टे.येथे संपन्न

अरुणा शर्मा

पालम :- पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक प्रदिप पालीवाल याची नुक्तीच मानवत येथे बदली झाली. आसल्याने पोलीस स्टेशनच्या कर्मचारयानी निरोप संमारंभाचा कार्यक्रम दिनांक 3 जून रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आसून त्याना पोलीस स्टेशन कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पोलीस स्टेशनचे  पोलीस उप निरक्षक श्रीधर तरडे, पोलीस जमादार गोरे, शिनगारे, लक्ष्मण मुंडे, रंगनाथ दुधाटे, दिपक जाधव, रामप्रसाद कोकाटे, केजगीर, महिला पोलीस पाटवदे, चॉदमारे, पत्रकार शांतीलाल शर्मा, ताहेर चाऊस आदी उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी संपत टकले यांची नियुक्ती


आशिष धुमाळ
परतूर

तालुक्यातील दैठणा खुर्दचे सरपंच तथा युवानेते संपत भानुदासराव टकले पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या परतूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.येथील पक्ष कार्यालयात 3 जून रोजी एका कार्यक्रमात माजी जि.प उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या हस्ते नियुक्ती पञक देऊन निवड करण्यात आली.नामदार बबनराव  लोणीकर यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम तळागळातील कार्यकर्ता पर्यंत पोहचवण्याचे काम करावे.यासाठी पक्ष आपल्यावर हि जबाबदारी टाकत आहे.असे नियुक्ती पञकात म्हटले आहे.यानिवडी बद्दल माजी जि.प उपाध्यक्ष राहुल लोणीकर,ता.अध्यक्ष रमेश भापकर,भगवानराव मोरे,रामेश्वर तनपुरे,विशाल कदम,नगरसेवक कृष्णा अरगडे,जगनराव बागल,विठ्ठल ठोंबरे,अमर बगडिया,अंगद खालापुरे,सह मिञांनी आभिनंदन केले आहे.

सेनगांवात पाऊसासह चक्रीवादळाने अनेक झाडे व विद्युत पोल पडुन नुकसान

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- शहरात आज दि.०३ जुन शनिवार रोजी सायंकाळी ०५ वाजता अचानक पाऊसासह चक्रीवादळ झाले यामध्ये सेनगांव ते जिंतुर व सेनगांव ते हिंगोली रोडवरील अनेक झाडे व विद्युत पोल पडल्याने खुप मोठे नुकसान झाले असुन विद्युत पुरवठा ही बंद पडला आहे.
सेनगांव शहरात आज सायंकाळी अचानक तुफान पाऊसासह चक्रीवादळास सुरुवात झाली. सेनगांव शहरात आप्पास्वामी मंदिरामध्ये आज लग्नसोहळा होता मंदिरा जवळील वडाच्या झाडीची एक मोठी फांटी लग्नमंडपावर  मोडुन पडल्याने पाहुणे मंडमंळी सैरावरा पळत होती सुदैवाने यामध्ये जिवीत हानी झाली नाही. आठवडी बाजारात आप्पास्वामी गेटजवळ एक निंबाचे झाड कोसळले तर साईलिला पेट्रोलपंपा जवळ दिलीपराव देशमुख यांच्या घराजवल एक बाभळीचे झाड रोडवरच कोसळल्याने वाहतुकीस अडथला निर्माण झाला.शहरातील धुमाळगल्लीत अनेक जणाच्या घरावरील पत्रे उडुन गेल्याने नागरीक भर पाऊसात आप आपली पत्रे गोळा करण्यासाठी धडपडत होती. सेनगांव ते जिंतुर रोडवर देखील  अनेक झाडे व विद्युत पोल पडले तर सेनगांव ते हिंगोली रोडवर देखील अनेक झाडे व विद्युत पोल पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन पुर्ण विद्यूत पुरवठा बंद आहे. बातमी लिहीपर्यंत सेनगांव शहराचा विद्यूत पुरवठा बंद होता आज विद्युत पुरवठा चालू न झाल्यास रात्रभर सेनगांवकरांना जागुनच काढावी लागणार हे मात्र नक्की.

कु. शितल लांडगे विज्ञान शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र परीक्षेत परभणी जिल्ह्यातील मौजे बनवस येथील आचार्य विनोबा भावे महाविद्यालयातून कु. शितल पुरूषोत्तम लांडगे या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून  67. 38 % गुण प्राप्त केले आहेत.
या विद्यार्थिनीने मिळवलेल्या यशाबद्दल आईवडील, संस्थाचालक ज्ञानोबा ढेले, प्राचार्य प्रा. कावर सर, प्रा. सुनिल लांडगे सर, प्रा. वाडेवाले, प्रा. आरसले, प्रा. कासले, प्रा. सोनटक्के, प्रा. आंधळे, प्रा. सोनकांबळे इ. ने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

____________________________

चॅंपियन्स करंडक : श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचे शतक; 'वन-डे'मधील आमलाचे 25 वे शतक

आत्महत्या विदर्भ-मराठवाड्यात आणि कर्जमाफी सरसकट हे अन्यायकारक आहे. गेल्या वेळी कर्जमाफीचा विदर्भाला केवळ 18% लाभ झाला होता; रविकांत तुपेकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक

चँपियन्स करंडक : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेचे 300 धावांचे आव्हान

कर्जमाफीच्या निर्णया नंतर दुधाचे दरही लवकरच वाढविणार; पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर

शेतक-यांना आत्ता पर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर यापुलाचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. 5 जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंढरपूरला वादळी पावसाचा जोरदार तडाखा, सलग दोन तासांच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत, भाविकांचे हाल, वादळामुळे मंदिरा शेजारील काही दुकानांचे नुकसान.

भंडारदरा = धरणाच्या पाणलोटात मुसळधार पाऊस, अवघ्या दोन तासांत 47 मी.मी पावसाची नोंद, धरणात 38 द.ल.घ.फुट नविन पाण्याची आवक, धरणातील पाणीसाठ्यात झाली वाढ

चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध आहे. आता या सामन्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. पण इंग्लंडमधील हवामान विभागाच्या वेबसाईटनं बर्मिंगहम मधील सामन्यात पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे.

शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरविण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप

वाशिम भर जहाँगीर गावा नजिक वेळूच्या झाडाची कटाई करण्यासाठी आलेल्या दोन मजुरांचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.

जीएसटी अंतर्गत सौर पॅनलवर 5 टक्के, बिडीवर 2 टक्के कर - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.

काँग्रेस कार्यकारी समितीची 6 जूनला बैठक होणार असून, या बैठकीत राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती, राष्ट्रपती निवडणूक या मुद्यांवर चर्चा होईल.

अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस, झाडे पडली, वीड खंडित, वीज पडून पारनेर तालुक्यात दोन बैल ठार.

संघ एकत्रित असून सर्व अफवा आहेत, कुंबळेसोबत कोणताही वाद नाही - विराट कोहली.

शेतकरी संप यापुढेही सुरूच राहणार असून ग्रामीण भागातून पुणे-मुंबईकडे जाणारा कृषिमाल, दुधाचे टँकर अडविण्यात येतील - बळीराजा शेतकरी संघटना.

अहमदनगर -= सुकाणू समितीने विश्वासघात केल्याचा पुणतांबा ग्रामस्थांचा आरोप, सर्व शेतक-यांचा सातबारा कोरा होई पर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार.

दहावी सीबीएसईचा निकाल जाहीर, सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूलचा विनीत डोके देशात तिसरा.

शेतक-यांनी पुकारलेला संप सुरूच राहणार असून 5 रोजी महाराष्ट्र बंदची हाक कायम आहे - किसान क्रांती शेतकरी कृती समिती.

जम्मू काश्मीर = पाकिस्तान कडून पुंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन स्थानिक नागरिक जखमी, फायरिंग अद्यापही सुरु.

मी उद्या औरंगाबादेत कोअर कमिटीची बैठक घेणार, त्यानंतर पुणतांब्यात जाणार - जयाजी सूर्यवंशी.

रत्नागिरी = कॉंग्रेसचे माजी आमदार, निवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार निशिकांत माधव तथा नाना जोशी यांचे वृद्धापकाळामुळे निधन.

सदाभाऊ खोत व देवेंद्र फडणवीस यांनी संदीप गिड्डे याला नियोजन पूर्वक शेतकरी आंदोलनात घुसवून संप मोडीत काढला - बळीराजा शेतकरी संघटनेचा आरोप.

चंद्रपूर = सावली येथे तोतया पोलिसांच्या 5 जणांच्या टोळीला अटक.

माझी चूक झाली, पण मी शेतकऱ्यांसोबत कायम - जयाजी सूर्यवंशी.

शेतक-यांचा संप मागे घेतलेला नाही तो अधिक तीव्र करण्यात येईल - अशोक ढवळे. राष्ट्रीय किसान सभेची मुंबईत घोषणा.

जळगाव = रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी आयुषी पायघन हिला दहावीच्या सीबीएसई परीक्षेत 99.60 टक्के, आयुषीला 500 पैकी 498 गुण मिळाले आहेत.

परभणी = गंगाखेड, पालम मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस.

वादळी वाऱ्यासह नाशिक मध्ये विविध भागात गारांचा पाऊस, मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ, उष्म्याने घामाघूम झालेल्या नाशिककरांना दिलासा, अनेक भागांचा वीजपुरवठा खंडीत.

संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरू राहणार, सरकार अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने शेतकर्यांत फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. - अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

यवतमाळ = ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थाना समोर लोकजागृती मंचच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन. भाजीपाला फेकून नोंदवला निषेध.

औरंगाबाद = सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे क्रांती चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयाजी सूर्यवंशी यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ,मुख्यमंत्री फडणवीस यांची परळीत गोपीनाथ गडावर घोषणा. राज्यात 35 ते 40 लाख अल्पभूधारक शेतकरी आहेत.

नागपूर = सीबीएसई दहावीचा निकाल, भवन्स विद्यामंदिरची कनक गजभिये आणि आयुषी अंबिलकर यांना प्रत्येकी 99.2 % गुण प्राप्त झाले.

नाशिक = शेतकऱ्यांनी मध्यस्थीसाठी गेलेल्या भाजप नेत्यांना परतवून लावलं. हरिश्चंद्र चव्हाण, बाळासाहेब सानपांसह नेते माघारी.

जळगाव = बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी असलेल्या श्रावण राठोड (वय 45) यांचा महात्मा गांधी उद्यानात आढळला संशयास्पदरित्या मृतदेह. घातपाताचा पोलिसांचा संशय.

मराठवाड्यात 17 हजार, विदर्भात 35 हजार कोटी रुपयांची रेल्वेची कामं सुरू, रेल्वेच्या माध्यमातून राज्याला एक नंबरवर आणू , 2019 पर्यंत मुंडेंचं रेल्वेचं स्वप्न पूर्ण करू- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मराठवाड्याचा विकास करणार : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

गोपीनाथ मुंडे यांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार, मुंडेंनी ज्यासाठी संघर्ष केला त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दहावी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर. देहरादून, दिल्ली, चेन्नई, अलाहाबाद, त्रिवेंद्रम या पाच विभागांचा निकाल जाहीर.

परळी = मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या उपस्थितीत परळी-बीड नवीन रेल्वे मार्गाच्या कामाचे पायाभरणी शुभारंभ व अन्य कामांचे उद्घाटन करण्यात आले.