तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 10 June 2017

रिसोड तालुक्यातील गोहगाव -वाकद रस्त्यावरील पुलांची अवस्था 2008 पासून पुलांचे दुर दशा

रिसोड प्रतिनिधि  महाजन
गोहगाव येथील गावकरी व शालेय मुलांचे पावसाळ्यात हाल
प्रशासन बघत आहे मुडदे पडण्याची वाट आणी पुलांचा दगडुबा करुन पैसा हाडप#

रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे हे गाव वाकद पासुन साहा किलो मिटर असलेले गोहगाव हाडे हे रिसोड तालुक्याच्या शेवटच्या  टोकावर वास्तव्य आहे या गावाची एकंदरीत लोक खंख्या 2500 पर्यंत असुन या गावाला ये जा करण्यासाठीच एकच मार्ग असुन त्या रस्त्यावरील पुलांची 2008 पासुन दुर अवस्था झाली असून त्यावर सबधीत अधिकारी व जिल्हाप्रशासन जानिव पुर्वक लक्ष देत नाहीत असे गोहगाव येथिल ग्रामस्थांनी रोष व्यक्त केले जात आहेत. तसेच गोहगाव ग्राम पंचायत सरपंच शालिनी ईगळे यांनी जिल्हा अधिकारी यांना रस्त्यावरील पुलंच्या अवस्थे बद्दल तक्रार दिली. परंतु त्यावर अध्यपही चौकशी सुध्दा झाली नाही  आता तर पावसाळ्याचे दिवस डोक्यावर येवुन ठेवलेले आहेत. गोहगाव ग्रामस्थनां व शालेय मुलांना ये जा करण्यास एकच मार्ग असल्याने रस्त्यावरील पुल पुर्णपने पावसाने वाहुन गेल्याने तो ग्रामस्थ व शालेय मुलांचा जिव घेवु बनला आहे  सद्यातर रिसोड बाजार पेठेतुन पेरणी  करण्याकरीती रासायनिक खत , बियाने  रस्त्या अभावी खरेदी  कराव कि नाही असा प्रश्न गोहगाव येथिल ग्रामस्थनां पडला आहेत. या वेळी गोहगाव येथिल ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन असा ईशारा दिला कि जर पंधरा दिवसांत पुल झाला नाही तर पुलावर रात्रंदिवस गावकरी धरणे आंदोलन करण्यात येईल त्या दरम्यान जर गावातील व ईतर कोणतीही हाणी त्याला सर्व जिल्हा प्रशासन जबाबदार राहील व धरणे आंदोलन दरम्यान रोज जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला दगडांचा हार घालण्यात येईल आसा यावेळेस गोहगाव येथिल गावकऱ्यांनी ईशारा देण्यात आला आहे.

कुरूंदा पोलिसांनी जुळवला तुटलेला संसार

वसमत :- रामु चव्हाण

वसमत तालुक्यातील डिग्रस येथील गोकर्णा यांचा विवाह एका वर्षांपूर्वी पुर्वी पांगरा बोखारे येथील मारोती बोखारे यांच्याशी झाला काही दिवस दोघांचा सुखी संसार चालला यात गोकर्णा व त्यांचे पती व सासू तिला त्रास देत असल्या बाबत तिने कुरूंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली यामध्ये महिला तक्रार दिनी कुरूंदा पोलीस स्टेशनचे सपोनी वाघमोडे यानी सदरील प्रकरण महिला दक्षता समिती समोर मांडून  त्या महिलेचे नातेवाईक, सासरचे नातेवाईक याना बोलावले व दोघांचाही वाद समारोपानी मिटवला सौ गोकर्णा बोखारे याना नांदावयासा सासरी नातेवाईकांन समक्ष पाठवले यावेळी कुरूंदा पोलीस स्टेशनचे सपोनी वाघमोडे, महिला दक्षता समितीच्या डाॅ. दासरे मॅडम , महिला पोलीस कर्मचारी भरांडे , कमलाबाई बोखारे, सेवानिवृत्त प्राचार्य जि.डी.बोखारे , बिट जमादार गजानन भोपे ,आनंद गोपगोडावार , तुकाराम आमले , ज्ञानेश्वर सावळे, अनिल डूकरे आदी उपस्थित होते  यामुळे कुरूंदा पोलीसानी तुटलेला संसार जुळवल्याने सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.

छाया - नागेश चव्हाण

स्वतःसह कुटुंबाची मराठा समाजाने उन्नती साधावी - पुरुषोत्तम खेडेकर

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 10 : व्यक्ती, कुटुंब व समाजाला केंद्रबिंदू समजून मराठा समाजाने साक्षरतेकडे झेप घेतली पाहिजे. स्वतःसह कुटुंबाची मराठा समाजाने सर्वार्थाने उन्नती साधावी असे मौलिक प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
      मराठा सेवा संघाच्या वतीने, गेवराई येथील सिंधी समाज भवनात आयोजित गुणवंतांचा गुणगौरव सोहळा शनिवार, दि. 10 रोजी सायंकाळी 5 वाजता घेण्यात आला, याप्रसंगी पुरुषोत्तम खेडेकर हे बोलत होते. यावेळी प्रा. तनपुरे सर, अॅड. कल्याणराव काळे, भगवानराव बेदरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. नागनाथ मोटे, प्रा. एल. आर. धुमाळ, डॉ. उध्दव घोडके, प्रभाकर पराड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, संगणकीय युगात आपण व समाजाने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून घेतले पाहिजेत. येणाऱ्या काळात मराठा सेवा संघ बलशाली, ताकदवान बनवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन करून विविधतेने समाज प्रगतीच्या दृष्टीने खेडेकर यांनी विचार व्यक्त केले. प्रा. तनपुरे सरांनी समर्पित भावनेने काम केल्यास ध्येय गाठणे शक्य असल्याचे सांगून समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्यांना बळ देण्याचे धोरण अवलंबवावे असे  सांगितले.
     कार्यक्रमास लहुराव माने, सतीश देशमुख, गंगाधर, मेघारे सर, प्रा. शामराव जरांगे, प्रशांत मस्के, संतोष कोठेकर, महेश मोटे, उबाळे, लोणकर, सखाराम कानगुडे, अर्जुन मस्के, दाभाडे आदींसह मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

ऊमरखेड येथे सर्व सामाजीक संघटना व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने ईफ्तार पार्टिचे आयोजन


यवतमाळ -ओमप्रकाश देशमुख, महागांव

संतांची भूमी व फकीरांची वस्तीअशी सर्वत्र ओळख असलेल्या आपल्या औदुंबर नगरीस काही समाजकंटकांच्या बेकायदेशीर वर्तणुकी मुळे जो कलंक लागला आहे तो पुसून परत आपल्या शहराचे गतवैभव परत मिळविण्यासाठी उमरखेड मधील सर्व सामाजिक कार्यकर्ते आपआपल्या सामाजिक संघटना द्वारे प्रयत्न करत आहे व ह्या सर्वाना मोलाची साथ मिळत आहे ती पोलीस स्टेशन उमरखेड ची आज
पवित्र रमझान महिन्याच्या निमित्ताने व शहरातील जातीय सलोखा अबाधित राहण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन उमरखेड तर्फे *इफ्तार पार्टी,अमन का पैगाम चे आयोजन ढाणकी रोड वरील श्रीराम टॉकीज येथे करण्यात आले होते,ह्यावेळी मंचावर SP श्री. राजकुमार,ASP श्री. अजयकुमार बंसल, उमरखेड चे विध्यमान आमदार श्री.राजेंद्र नजरधने, SDM श्री. कापडणीस साहेब,तहसीलदार श्री.कांबळे साहेब,माजी आमदार श्री.विजयराव खडसे,नगराध्यक्ष श्री.नामदेव ससाणे,जी.प.सदस्य श्री.चितांगराव कदम,श्री.रामभाऊ देवसरकर,नगरसेवक श्री. नितीनभाऊ भुतडा,श्री.दिलीपभाऊ सुरते,श्री. दत्तराव शिंदे,श्री.इनायत उल्ला जनाब,श्री.बळीराम मुटकुळे, श्री.नारायनदास भट्टड व इतर मान्यवर मंडळी उपस्थीत होती
               ह्या शुभ पर्वावर मागील 10 वर्षा पासून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या उद्देश सोशल फाऊंडेशनच्या उद्देश कपडा बँक द्वारे गरीब व गरजू मुस्लिम महिलांना नवीन साड्यांचे वाटप व त्यांच्या मुलांकरिता नवीन शर्ट,पॅन्ट चे वाटप मंचावर उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
             ह्याप्रसंगी उमरखेड शहरातील  सर्व सामाजिक संघटना,विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव,व्यापारी बांधव उपस्थीत होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गाझी सर ह्यांनी केले तर आभारप्रदर्शन लक्ष्मी मुकुलवार मॅडम नी मानले व इफ्तार पार्टी  निमित्त आयोजित फराळा नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी पो.नि.श्री.हनुमंत गायकवाड साहेब व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका पार पाडली

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत 4 लहान मुलांचा बुडून मृत्यू .


____________________________

पंढरपुरातील चंद्रभागा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.  ही घटना शनिवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास  घडली. सुट्टीचे  दिवस असल्याने पंढरपूर शहरातील चार लहान मुलं चंद्रभागा नदीवरील घाटाजवळ पाण्यात पोहोण्यसाठी गेले होते.  पाण्याचा अंदाज न आल्याने ही चारही मुले पाण्यात बुडाली. मृत पावलेली ही मुलं वयोवर्षे 6 ते 8 या गटातील होती. दरम्यान,  उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी चारही मुलांना मृत घोषित केले. घटनेचे वृत्त समजताच शहरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मृत पावलेल्या मुलांची नावे -

धीरज अप्पा जुमाळे,  (वय 8 वर्षे) श्रीपाद सुनील शहापुरकार, (वय 6 वर्षे)गणेश सिद्धप्पा जुमाळे, (वय 8 वर्षे)सौरभ अनिल शहापुरकार, (वय 6 वर्षे)

आयकर परताव्यासाठी 1 जुलैपासून आधारकार्ड बंधनकारक - सीबीडीटी

____________________________

आयकर परतावा भरण्यासाठी 1 जुलैपासून आधार कार्ड क्रमांक बंधनकारक असेल, असे केंद्रीय थेट कर मंडळाकडून (सीबीडीटी) शनिवारी स्पष्ट करण्यात आले आहे.सुप्रीम कोर्टाकडून  केंद्र सरकारचा ‘आधार’ सक्तीचा निर्णय रद्द ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्रीय थेट कर मंडळाकडून (सीबीडीटी) महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले. त्यानुसार आयकर भरताना आधार कार्ड सादर करणे सक्तीचे असेल. तसेच 1 जुलै पासून नवीन पॅनकार्ड मिळवण्यासाठीही आधार कार्डची गरज असेल, असेही ‘सीबीडीटी’नं स्पष्ट केले आहे.  तसेच 1 जुलै रोजी ज्यांना पॅनकार्ड आणि आधार क्रमांक मिळालेला असेल त्यांनी पॅनकार्ड व आधारकार्डाच्या जोडणीसाठी आयटी अधिकाऱ्यांकडे आपला आधार क्रमांक द्यावा. सध्या कोर्टाच्या निर्णयामुळे ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ज्यांना आधार कार्ड काढायचे नाही त्यांचे पॅनकार्ड तूर्तास तरी रद्द होणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारने बोगस पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार-पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला होता. सरकारच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आधार कार्ड ऐच्छिक असल्याची भूमिका घेणारं सरकार अचानक एवढा मोठा निर्णय कसं घेऊ शकतं, असा प्रश्न याचिका कर्त्यांनी उपस्थित केला होता. त्यावरील सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टानं आधार-पॅन जोडणीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139 अअ हा कायदा संमत करण्यात आला आहे. या कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणं सक्तीचं करण्यात आले आहे. बोगस कागदपत्राच्या आदारे पॅन कार्ड तयार केली जातात. त्या आधारे बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्रानं हा तोडगा काढला. त्यासाठीच, आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली.

गण गण गणात बोते च्या जयघोषात शेगावच्या "श्री"च्या पालखीचे सेनगांवात आगमन

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव:- आज दि.१० जुन शनिवार रोजी सकाळीच शेगांव येथील संत गजानन महाराज पालखीचे विदर्भ- मराठवाडा सरहद्दीवर गण गण गणात बोते च्या जयघोषात आगमन होताच हिंगोलीचे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी जल्लोषात स्वागत केले.
शेगांव येथील संत गजानन महाराज संस्थानला विदर्भातील प्रती पंढरपुर म्हणुन ही ओलखले जाते. संत गजानन महाराज यांच्या पालखीचे यावर्षी ५१ वर्ष असुन आज विदर्भ- मराठवाडा सरहद्दीवर सकाळीच  पालखीचे गण गण गणात बोते च्या जयघोषाने पालखीचे आगमन होताच हिंगोली चे आमदार तान्हाजीराव मुटकूळे, सेनगांव कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव बोरुडे, हिंगोली जिल्हा भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष गिरीधारीजी तोष्णीवाल, सेनगांव पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक मधुकर कारेगांवकर, पोलीस उपनिरीक्षक राजु मोरे यांनी जल्लोषात स्वागत केले. येथुन पालखी मार्गक्रम करीत पानकनेरगांव येथे आल्यानंतर  पानकनेरगांव मध्ये ही संत गजानन महाराज पालखीचे स्वागत करण्यात आले. महाप्रसादाचे वाटप झाल्यानंर लगेच "श्री" च्या पालखीचे सेनगांवकडे प्रस्थान झाले. संत गजानन महाराज पालखी सोहळ्यासोबत ५००-६०० भावीक भगव्या पथाका घेऊन व टाळ मृदंगाच्या गजरात घोड्यासह गण गण गणात बोते च्या जय घोषात सेनगांव येथे सायंकाळी ०६ च्या सुमारास पालखीचे आगमन झाले. सेनगांव शहरात पालखीच्या स्वागतासाठी  ठिकठिकाणी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. सेनगांव शहरात पालखीचे आगमन होताच सेनगांव नगरपंचायत कडुन स्वागत करण्यात आले. सेनगांव शहर भक्तीमय वातावरणात दुमदुमुन गेले. "श्री" च्या दर्शनासाठी जि.प.शालेत व्यवस्था करण्यात आली. सेनगांव परिसरातील भावीक भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागली असुन भावीक भक्तांचा दर्शनासाठी सागरच लोटला असल्याचे पाहावयास मिळत आहे. या पालखीसोबत दुकाने सुध्दा आली आहेत. या दुकानामध्ये "श्री" चे विविध प्रकारचे फोटो, लहान मुलांचे खेळणे, बच्चे कंपनीने खरेदीसाठी एकच झुंबड केली आहे. सेनगांवकरांनी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी आयोजन केले आहे. श्री च्या पालखीसोबतचे १००० भावीक व सेनगांव परिसरातील मकोडी, शिवणी (खु), शिवणी (बु) सिनगी (नागा) दाताडा, सुकळी (खु), सुकळी (बु), कारेगांव, पार्डी, कवठा, कापडसिंगी, हत्ता,साखरा, येथील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आज रात्री ०९ वाजता किर्तनाचा कार्यक्रम देखील आयोजीत केला आहे. आज संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम सेनगांवलाच असुन उद्या दि.११ जुन रविवार रोजी  सकाळी पाच वाजता "श्री" चीं आरती होणार असुन आरती झाल्यानंतर "श्री" च्या पालखीचे नर्सी (नामदेव) कडे प्रस्थान होणार आहे.

वृक्षारोपण करून केली वटपौर्णिमा साजरी... मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालनालयातील महिलांचा आदर्श उपक्रम


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

राज्यात सर्वत्र वटपौर्णिमेला सात हि जन्मात हाच पती मिळो यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधला जात असतांना अमरावतीच्या महिलांनी मात्र वडाला फेरे घालून धागे न बांधता वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी केली. समाजापुढे हा अभिनव आणि आदर्श उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालनालयातील महिलांनी ठेवला आहे.
सावित्री-जिजाऊच्या लेकी आज पुरुषांच्या खांद्याला-खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावीत असल्याने समाजातील चूल आणि मुलं हि संस्कृती लोप पावत चालली आहे. डोक्यावर पदर व मान खाली घालून घरातल्या घरात काम करून चूल आणि मुल सांभाळण्याची जबाबदारी ज्या महिलांवर पुरूष प्रधान संस्कृतीने लादली होती. ती मोडीत काढीत महिलांनी त्यांच्या कर्तत्वाने परिस्थितीत बदल घडवून आणण्याचे ठरविले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालनालयातील महिलानी वृक्षारोपण करून वटसावित्री साजरी केली. या महिलांनी घेतलेल्या पुढाकाराने व त्यांच्या कार्यकतृत्वाने महिलांनी पर्यावरण जतनासाठी घेतलेला पुढाकार समाजासमोर खरोखरचं आदर्शवत ठरला आहे
पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास यावर उपाय म्हणून राज्य शासनाने वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करण्यासाठी राज्यभरात ४ कोटी वृक्ष लागवडीचा संदेश घराघरात पोहचविला आहे. शासनाच्या हाकेला या महिलांनी देखील साद दिली आहे. महिलांनी घेतलेला पुढाकार खरोखरचं वाखान्याजोगा व आदर्शवत आहे.
आज आपल्या राज्यात आपण सर्व पाणीटंचाई व भीषण दुष्काळाचा सामना करत आहोत. ही भीषण परिस्थिती बदलण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे, या गोष्टीचा या महिलांनी सकारात्मक विचार करुन वटसावित्रीला वृक्षारोपण केले.
खरे तर असाच संदेश घेऊन लोकांनी पर्यावरण जपण्याचा प्रयत्न अशा कार्यक्रमातून  केला तर भविष्यात जल संकटासह भीषण दुष्काळी परिस्थितिला तोंड देण्याची वेळ येणार नाही, अशी भावना या महिलांनी व्यक्त केली आहे. यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्प संचालनालयातील लिपिक पल्लवी भोयर, रुचा कापशीकर, सुवर्ना देशमुख, रोहिणी गादे-जामखेडकर, भाग्यश्री गावंडे, आशिया बानो नुरी, किरण मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल धांडे, वनरक्षक कांचन तलवारे, कांबळे, मनाली यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक श्रीनिवासा रेड्डी यांनी कौतुक केले आहे.

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

____________________________

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली संदर्भात पंकजा मुंडे सचिवांशी चर्चा करणार.

शिवसेना अजून रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे फक्त कांदे फेकले जात आहेत. जर उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले तर भाजपच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, असा इशारा वजा धमकी आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलाय.

पुण्यातल्या शौचालयाच्या बांधकामातल्या भ्रष्टाचारा पर्दाफाश, शौचालय न बांधताच लाखोंची बिलं ठेकेदाराचे खिसे भरले.

90 टक्के मागण्या मान्य झाल्यावर रेले रोको करून काय मिळणार, उद्याच्या बैठकी आधी चंद्राकांत पाटलांचा शेतक-यांना प्रश्न, उद्या तोडगा निघण्याची आशा.

अंतिम तोडगा निघे पर्यंत आंदोलन सुरुच राहणार, सुकाणू समितीच्या बैठकी नंतर राजू शेट्टींची माहिती, सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार.

प्रतापगडावरील टेहळणी बुरुज कोसळण्याच्या स्थितीत, पावसामुळे बुरुजाची अवस्था आणखी बिकट, सरकार आणि पुरातत्व खात्यानं लक्ष देण्याची मागणी.

त्रंबकेश्वरहुन प्रस्थांन ठेवलेल्या संत श्रेष्ठ निवृत्ती नाथ महाराज यांच्या पालखीचं नाशिक मध्ये आगमन. विठुनामाच्या गजरात पालखीचे दिमाखदार स्वागत.

अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या राशीद खानच्या प्रभावी गोलंदाजी समोर वेस्ट इंडिजचे खेळाडू अक्षरश: नतमस्तक झाले. 18 धावांच्या बदल्यात 7 विकेट्स घेत राशीदने विक्रमाची नोंद केली. या धडाकेबाज कामगिरीमुळे अफागणिस्तानने वेस्ट इंडिजवर 63 धावांनी विजय मिळवला.

कॅनडातील ओंतारिओ मधील लाल कांदा कर्करोगावर गुणकारी असल्याचं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. हा कांदा स्तनाच्या आणि आतड्याच्या कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्यास प्रभावी असल्याचं संशोधन सांगतं.

जुलै महिन्यात राज्यात राजकीय भूकंप : संजय राऊत

शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नाहीत, प्रफुल्ल पटेलांची माहिती.

नाशिक = ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रामध्ये हरणाची शिकार, एक जण अटकेत, पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू.

जळगाव = धावत्या रेल्वेतून उतरताना विद्यार्थ्यांचा मृत्यू, शाहजेब खाटीक (वय 18) मृत विद्यार्थ्याचे नाव, अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी शाहजेब जळगावात येत असताना घडला अपघात.

जळगाव = वडील रागावल्याने तुषार सोनार (वय 23) तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, रामानंद नगरातील जागृती सोसायटीतील घटना. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद.

चॅम्पियन्स ट्रॉफी : ऑस्टेलिया विरूद्ध इंग्लंड सामना. विजयासाठी इंग्लंडसमोर 278 धावांचे आव्हान.

यवतमाळ = महागाव तालुक्यातील अनंतवाडी येथील शेतकरी हत्या प्रकरण, पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध दाखल केला गुन्हा. हत्या झालेल्या शेतक-याचं नाव श्रावण तुकाराम हनवते.

सुकाणू समितीचे प्रतिनिधी उद्या मंत्रिगटाशी चर्चा करतील - राजू शेट्टी

सुकाणू समितीची बैठकीनंतर पत्रकार परिषद, उद्या 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिगटासोबत बैठक - राजू शेट्टी

कोल्हापूर = पैशाचा पाऊस पाडतो असेसांगून लुटणा-या आठ जणांची टोळी गजाआड, टोळीतील सहा जण परप्रांतीय, वडणगे येथील घटना. वाहनासहीत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

यवतमाळ = शारदा चौकातील एका घरावर छापा टाकून वडगाव रोड पोलिसांनी अडीच किलो गांजा केला जप्त . जप्त केलेल्या गांजाची किमत 45 ते 40 हजार रुपये, एक जण अटकेत.

सिंधुदुर्ग = देश 15 ते 20 वर्षे मोदी विचाराने चालल्यास खऱ्या अर्थाने अच्छे दिन - मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा.

पंढरपूर = चंद्रभागा नदीत पोहोताना 4 लहान मुलांचा बुडून मृत्यू.

नाशिक = सिन्नर मधील चोंढी इथे वीज पडून वडील-मुलाचा मृत्यू. रघुनाथ मवाळ, मयूर मवाळ यांचा जागीच मृत्यू.

पंजाब = काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला दिली भेट.

मोहोळ = कोळेगाव येथील वर्धमान खत कारखान्यात 53 लाखाचा बेकायदेशिर खत विक्री प्रकरणी कारखान्याच्या मालकासह सहा जनावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

औरंगाबाद = बीड बायपास रोडवर ट्रकने ट्रॅफिक हवलदाराला उडवलं. हवलदार दिनकर सानप यांना हॉस्पिटल मध्ये केलं दाखल.

नाशिक = मनमाड रस्त्यावर सावरगावजवळ 40 लाख रूपयांची बनावट विदेशी दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.