तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 17 June 2017

कुटुंब व्यवस्था

सुभाष मुळे...
------------
माझे मामा सासरे, रामनाथ देवराव सागडे खुपच संयमी... आदरयुक्त व जिज्ञासू देखिल. कामात रममान होणारे... आहे त्या स्थितीत आनंद मानणारे. धकाधकीच्या कार्यकाळातही सोशल मिडियाच्या माध्यमातून दररोज शुभ सकाळचा संदेश देऊन आपला वेळ कामात व्यतीत करणारे. अशीच त्यांची एक पोष्ट वाॅटसअॅपवर मिळाली आणि कुटुंब व्यवस्थेची प्रबोधनपर कहाणी फक्त आवश्यक वाटणार्‍यांसाठीच जशास तशी अर्पण...

:::::
पंचेचाळीशितल्या एका तरुणाच्या "पत्नीचा" आकस्मिक मृत्यु होतो...

      बर्‍याच लोकांनी त्याला दूसर्‍या लग्नाचा सल्ला दिला परंतु "माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन" असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने टाळले.

       बघता बघता दिवस, महीने, वर्षे निघून गेली. मुलगा मोठा झाला. आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले.

    हे पीता महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या आॅफिसमध्ये, तर कधी मुलाच्या आॅफिसमध्ये असा ईथे- तिथे आपला वेळ व्यतीत करु लागले. थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली. आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले.

     बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे पीता महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले. त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले. यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले.

    जेवण झाले. हे पीता महाशय हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बसले. मुलगा अजून जेवत होता. त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असता तीने लगेच कपाटातुन दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढून घेतले.

     जेवणानंतर मुलगा काही न बोलता आॅफिसला निघून गेला.

     दुसर्‍या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडीलांना म्हणाला "बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार अहोत" पीता महाशयांना आपले काय चुकले हे समजेना. सावरत ते मुलाला म्हणाले "बाळा आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे..? तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने, तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे. अर्थातच तुलाही आता दूसर्‍या आईची गरज नाही"

    यावर मुलगा म्हणाला "बाबा मला तुमचं लग्न करायच आहे, ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. उद्यापासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात रहायला जातोय आणि त्याचबरोबर... मी उद्यापासुन तुमची सारी मालमत्ता, तुमचा सारा व्यवसाय... तुमच्या नावावर करतोय आणि हो, तुमच्या आॅफिसमध्ये एका सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही."

    कथा संकलित आहे परंतु समस्या अगदी गंभिर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभिर मुलांची समाजास अत्यंत आवश्यकता आहे.

मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही !...
::::::::::::::::धन्यवाद. :::::::::::::::::::

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

____________________________

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पुरवठा विभागा मार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून वितरित होणारी "अंत्योदय' व "बी.पी.एल.' कार्डधारकांची साखर पाच रूपयांनी महागली आहे. याआधी 15 रूपये प्रतिकिलोनी या साखरेचे वितरण करण्यात येत होते.

सीएचा अभ्यासक्रम बदलणार; जुलै 2019 पासून नव्या अभ्यास क्रमानुसार परिक्षा होणार.

फलटण मधील देवेंद्र जगन्नाथ नलवडे (वय 45) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाल्यानंतर कुटुंबियांनी विविध अवयवदानाचा निर्णय घेऊन अनेकांना आधार दिलाच पण इतरांपुढेही आदर्श ठेवला.

भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यावर तब्बल 10 हजार कोटींचा सट्टा लागणार, बुकींची माहिती

विक्रीकर अधिकार संघटनांचा 1 जुलै पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय, प्रलंबित मागण्यांसाठी संपाचं हत्यार.

यावल येथील श्रीराम नगरातील 12 वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली, मृत बालकाचे नाव मयुर मधुकर पारधे आहे.

यवतमाळ = अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीचा रुमालाने गळा आवळून प्रियकराच्या मदतीने खून. पुसद येथील मधुकर नगरातील घटना.

तामिळनाड़ू विधानसभेत पुन्हा विश्वासदर्शक ठराव घेण्याच्या मागणीसाठी द्रमुक नेते एमके स्टालिन यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली.

जिंतूर = सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून दानपेटी मधील 19 हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास.

पिंपरी-चिंचवड = संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत जंगी स्वागत.

वर्धा = कारंज्यातील शेतकऱ्याने मागितली इच्छा मरणाची परवानगी. बँक खात्यातील रक्कम कर्जात कापल्याने शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली इच्छा मरणाची परवानगी.

बीड = नायब तहसीलदार माधव काळे अटकेत. पाच लाखांचं बील काढण्यासाठी लाच घेताना अटक.

दोन्ही संघांना चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आहे, उद्या सर्व खेळाडूंचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल - विराट कोहली.

ठराविक एक विचार डोक्यात ठेऊन आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळतोय, आम्ही तशाच प्रकारचे क्रिकेट अंतिम सामन्यातही खेळू - विराट कोहली.

पाकिस्तान विरुद्धच्या हॉकी सामन्यासाठी विराट कोहलीने भारतीय हॉकी संघाला दिल्या शुभेच्छा.

लंडन = कॅप्टन विराट कोहलीची लंडनमध्ये पत्रकार परिषद. पाकिस्तान विरूद्धची मॅच जिंकणं हे सगळ्यात पहिलं उद्दिष्ट.

राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात प्रत्येक पक्षाने दिलेल्या सल्ल्याबाबत विचार केला जाणार आहे. अमित शहा यांची पत्रकार परिषदे मध्ये माहिती.

मुंबई = केंद्रात मोदी सरकार आणि महाराष्ट्रात फडणवीस सरकार उत्तम काम करतं आहे- अमित शहा.

मुंबई शहरात 10 लाखापेक्षा जास्त विकास कामांचा विचार आहे. ती कामं सुरू आहेत- अमित शहा.

मुंबई = 2022 पर्यंत भारत एका वेगळ्या उंचीवर असेल. महत्त्वाच्या देशांमध्ये भारताचं नाव असेल. त्या दृष्टीने मोदींचे प्रयत्न.

मुंबई = शेती क्षेत्रात अनेक उपाययोजनांचा विचार आहे. शेतकऱ्यांसाठी सॉइल हेल्थ कार्डची योजना आखली आहे. अमित शाह

वन रॅंक पेशन्सच्या माध्यमातून एक लाख जवानांना त्यांचा हक्क मिळवून दिला. अमित शहा यांची पत्रकार परिषदेत माहिती.

नरेंद्र मोदींनी गरिबांच्या झोपड्यांना धुरापासून मुक्त केलं. अनेकांना नोकऱ्या दिल्या- अमित शहा.

मुंबई = अमित शहांची युपीए सरकारवर टीका. आधीच्या सरकार मध्ये सगळे पंतप्रधान असल्या सारखे वागायचे. अमित शहांची टीका.

मुंबई = भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा आणि वेग दिला. अमित शहा.

तीन वर्षात सरकारने अनेक योजना आखल्या-आमलातही आणल्या- अमित शहा. या सरकारने महिला, आदिवासी आणि गरीबांसाठी नव्या योजना दिल्या.

भुसावळ = पुरूषोत्तम नगरातून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा अवैध मद्य साठा जप्त. सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पथकाची कारवाई.

पुणे = देहु जवळील भंडारा डोंगरावर वारकऱ्यांच्या टेंम्पोला झालेल्या अपघातात 20 जखमी. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील 2 वारकरी गंभीर जखमी.

औरंगाबाद = पतिसह देवदर्शनासाठी भांगसी माता गडावर गेलेल्या विवाहितेने गडावरून उडी घेऊन केली आत्महत्या.

आपचे आरोप खोडसाळ आणि बिनबुडाचे- आशिष शेलार. रिद्धी, सर्वेश्र्व कंपनीशी माझा संबंध नाही. आशिष शेलारांनी फेटाळले प्रिती शर्मा-मेनन यांचे आरोप.

पाक चाहत्यांची हुल्लडबाजी, गांगुलीची गाडी अडवून घोषणाबाजी.


____________________________

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रविवारी खेळवण्यात येत आहे. हा सामनासुरु होण्यास काही तास राहिले आहेत.महामुकाबल्या निमित्त दोन्ही बाजूचं वातावरण तापलं असताना, तिकडे पाकिस्तानी चाहत्यांची हुल्लडबाजी समोर आली आहे.पाकिस्तानी चाहत्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची गाडी अडवून ठेवली. इतकंच नाही तर त्यांनी घोषणाबाजी करत, गांगुलीच्या गाडीवर पाकिस्तानी झेंडे फडकावले.ही घटना 14 जूनला घडली. गांगुली पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी कार्डिफच्या मैदानावर गेला होता. सामना झाल्यानंतर तो मैदानावरुन बाहेर आला, त्यावेळी गाडीतून येणाऱ्या गांगुलीला पाहून, पाकिस्तानी चाहत्यांनी गांगुलीच्या गाडीला घेराव घातला. त्याची गाडी पुढेच जाऊ दिली नाही. शेकडो पाकिस्तानी चाहत्यांनी जवळपास 2 मिनिटे गांगुलीच्या गाडीला घेराव घातला. यावेळी पाक प्रेक्षकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत, गांगुलीच्या गाडीवर पाकिस्तानी झेंडे फडकावले. तसंच गांगुलीच्या गाडीवर थापाही मारल्या. हा सर्व प्रकार सुरु असताना, सौरव गांगुलीने एकदाही संयम ढळू दिला नाही. गांगुलीने पाकिस्तानी चाहत्यांकडे पाहून स्मित हास्य करत निघून जाणं पसंत केलं.

अवैध सावकारी प्रकरणात नागरगोजे यांच्या घरावर धाड सावकारी प्रतिबंधक भरारी पथकाची धाड


ओमप्रकाश देशमुख-महागांव
महागांव तालुक्यात अवैध सावकारीचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहेत.अवैध सावकारीची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आले आहे .सावकारग्रस्त शेतकर्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवैध सावकारी  प्रतिबंधक पथकाने आज महागाव येथील अनंता उत्तमराव नागरगोजे यांच्या घरावर धाड टाकली. यात तीन खरेदी खत ,दोन सौदेपत्र ,तीन कोरे स्टॅप पेपर आणि काही अक्षेपार्ह दस्तावेज भरारी पथकाच्या हाती लागले.हिवरा येथील सावकारग्रस्त शेतकरी सौ .लक्ष्मीबाई वसंतराव अडकीने आणि इजनी येथील अनिल तोलाराम राठोड यांनी अनंता नागरगोजे यांच्या विरोधात जिल्हा निबंधकांकडे वर्षाभरापुर्वी तक्रार दाखल केली होती .अनंता नागरगोजे यांनी अवैध सावकारी व्यवहारात आपले शेत पोकळ खरेदी खताव्दारे लिहुन घेतले व कर्जाची रक्कम परत केल्यानंतरही शेतीची खरेदी परत करण्यास नकार दिल्याची तक्रार जिल्हा निबंधकांकडे केली होती .अवैध सावकारी व्यवहारातुन आपली शेतजमीन अनंता नागरगोजे हडप करीत असल्याचेही तक्रारीत नमुद करण्यात आले होते .सावकारग्रस्त शेतकर्यांच्या तक्रारीची दखल घेत आज महागाव येथे आनंता नागरगोजे यांच्या घरावर धाड टाकली .या पथकात सहकारी अधिकारी आर .ए .गुजर, सहकारी अधिकारी डी. यु .खुरसडे ,सहाय्यक निबंधक गटारे, सहकारी अमोल नाईक ,आर टी शेंद्रे तथा पोलीसांचा समावेश होता .आनंता नागरगोजे यांच्या घराची झाडाझडती घेतली .असता तीन खरेदी खत, दोन सौदेपत्र,तीन कोरे स्टॅप पेपर आणि काही आक्षेपार्ह कागदोपत्र आढळून आली.हे दस्तावेज तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले .या प्रकारे काही महिण्यापुर्वी वडद येथील सावकार लक्ष्मण देवकते यांच्या घरी पथकाने छापा मारला होता .त्यापाठोपाठ आज महागाव येथे आनंता नागरगोजे यांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याने तालुक्यातील अवैध सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत .

गिताबाई चारठाणकर यांचे कार्य महिलांसाठी आदर्श जि.प.उपाध्यक्षा ॕभावनाताई नखाते यांचे प्रतिपादन पुरस्कार वितरण समारंभ

सेलू   (प्रतिनिधी )
स्वातंत्र्य सैनिक कै सौ गिताबाई चारठाणकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वपुर्ण कामगीरी केली त्यांचे कार्य महिलांसाठी एक आदर्श आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा महिलांनी घ्यावी यासाठी महिला मंडाळाच्या वतीने सलग 23 वर्षापासुन दिला जाणारा स्वातंत्र्यसैनिक विर महिला कै सौ गिताबाई चारठाणाकर  पुरस्काराचे आयोजन हि महिलांसाठी  परीवर्तनाची नांदी ठरणारी बाब आहे असे प्रतिपादन जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी केले .
       नुतन विद्यालय येथील सभागृहात 16 जुन रोजी दुपारी 5वा स्वातंत्र्य विर महिला कै सौ गिताबाई चारठाणर पुरस्कार  वितरण समारंभात अध्यक्षीय समारोप प्रसंगी  जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते  बोलत होत्या
याप्रसंगी प्रमुख पाहूण्या म्हणुन स्त्रीरोग तज्ञ  डॉ  मिनाताई परतानी पुरस्कारमुर्ती कंधार येथील महिला समुपदेशक साधना एंगडे महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर चिटनिस ललीता गिल्डा यांची व्यासपिठावर  उपस्थीती होती
         यावेळी बोलतांना भावना नखाते म्हणाल्या की मुलींचा जन्मदर घटत जाने हिबाब चिंतेची आसुन महिलांनी मुलीचा जन्मदर वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे प्रत्येक स्त्रीने आपली व आपल्या कुटुंबाची आरोग्याची  काळजी घेतली पाहिजे तसेच सुनेला सासुने मुलीप्रमाणे वागवले पाहिजे व सुनेनेही सासुचा आईप्रमाणे आदर केला पाहिजे  असे त्या म्हणाल्या
               सामाजिक शैक्षणीक साहित्यीक सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल कार्य करणार्या व तेराशे महिलांचे संसार जुळविणार्या कंधार येथील महिला समुपदेशक साधना एंगडे याचां रोख 1111रूपये शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन स्वातंत्र्यसैनीक विर महिला गिताबाई चारठाणकर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले
            यावेळी बोलतांना डॉ मिना परतानी म्हणाल्या की आपण समाजाचे काही देणं लागतो हि सामाजीक बांधीलकीची भावना प्रत्येक महिलेने मनात रूजवीली पाहीजे असे झाले तरच समाजातील विषमता दुर होईल व माजी राष्ट्रपती आब्दुल कलाम यांचे भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पुर्ण होईल महीलांनी काळाप्रमाणे बदलले पाहिजे बलत्काराच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या मुलावर अंकूश ठेवला पाहीजे  असे सांगून त्यांनी  वृक्ष संवर्धन चा उपदेश केला
              प्रारंभी वर्षा जोशी यांनी सुगम गीत सादर केले रोहीणी कुलकर्णी कांचन बाहेती शैलजा वसेकर यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला तर किर्ती राऊत यांनी सन्मानपत्राचे वाचन केले
सुत्रसंचलन किर्ती देऊळगाँवकर यांनी केले तर मनिषा खारकर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसूधा खारकर वरूणा कुलकर्णी सुभदा चारठाणकर वर्षा डोंगरजकर रजनी सुभेदार बाबासाहेब चारठाणकर यांनी परीश्रम घेतले

मानधन मंडळाला परत दिले

     कार्यक्रमास उपस्थीत राहिल्या बद्दल महिला मंडळाने जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांना मानधन दिले होते परंतू हे मिळालेले मानधन भावना नखाते यांनी महिला मंडळाच्या उपक्रमासाठी महिला मंडळाला परत देऊन सामाजीक बांधीलकी जपली

पुर्णा कारखान्याच्या मतदाना साठी प्रशासन सज्ज - बानापूरे

वसमत :- रामु चव्हाण

वसमत :हिंगोली  जिल्यात:बहुचर्चित असलेल्या पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस असुन उद्या 18 जुन रोजी मतदान होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले असुन. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले असून पुर्णा कारखान्याच्या मतदानाचे एकूण 66 बुथ असुन एकुण 502 कर्मचारी नेमले आहेत त्यात 462 कर्मचारी बुथ वाईज पाठवले असुन  40 कर्मचारी राखीव आहेत. प्रत्येक  बुथवर 1 पोलीस कर्मचारी या नुकसान 66 पोलीस कर्मचारी व बुथच्या समंधीत पोलीस स्टेशन चे API नियंत्रक असतिल. असे जवळ पास एकूण 600 अधिकारी, कर्मचारी नेमले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी   तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर बानापूरे यांनी दिली. व कर्मचार्‍यांना बुथ वाईज सोडणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखवली. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर  बानापूरे, तहसीलदार उमाकांत पारधी,व कर्मचारी उपस्थित होते.

छाया:- नागेश चव्हाण, श्रीधर वाळवंटे.

खेर्डा येथे विज पडून गाईचा मृत्यू

पाथरी:- प्रतिनिधी:- तालुक्यातील खेर्डा येथे शनीवारी साडेचार च्या सुमारास विजांच्या कडकडाटा सह सुरू झालेल्या पावसात विज पडल्याने झाडा खाली असलेली गाय मृत्यू मुखी पडल्या ची घटना साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
या विषयी मिळालेल्या माहीती नुसार शे इब्राहीम शेख अहेमद यांचा गावाच्या दक्षीन दिशेला रामपुरी रस्त्या कडे जाणा-या रस्त्यावर शेत असून या ठिकाणी आखाडा आहे. शनीवार १७ जुन रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास विजांच्या कडकडाटा सह पावसाला सुरूवात झाली या वेळी शेख इब्राहीम हे शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बसलेले होते तर त्यांच्या कडे असलेली संकरीत गाय ही जवळच झाडा खाली बांधलेली होती या वेळी या झाडावर वीज कोसळली आणि त्यात गाईचा जागीच मृत्यू झाला ही गाय सात महीन्याची गाभण होती. या पडलेल्या विजेचा धक्का इब्राहीम यांना ही जाणवला. ईब्राहीम हे शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात या घटनेत त्यांचा ७० हजाराची गाय मृत झाल्याने त्यांचा आर्थिक आधार नाहीसा झाला आहे.

मंगरुळपीर येथे YCT चा आठवडीबाजारात जनजागृतीचा कार्यक्रम ऊत्साहात

मंगरुळपीर-येथील दर शनिवारी भरत असलेल्या आठवडी बाजाराचे औचित्य साधुन यंग सिटिझन टिमने लोकांची जनजागृती करन्याच्या दृष्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रम घेवुन रक्तदानाचे महत्व,शेतकर्‍यांमधील असणार्‍या अंधश्रध्दा तसेच सापाविषयी समज-गैरसमज यावर प्रकाश टाकला.
            सतत दोन वर्षापासुन सामाजीक भान जोपासत कार्यरत असलेली तरुण युवा पिढीची आणी ऊच्चशिक्षित युवकांची असलेली यंग सिटिझम टिम ने दि.१७ रोजी मंगरुळपीरच्या आठवडी बाजाराचे औचित्य साधुन बाजारासाठी खेड्यापाड्यातुन आलेल्या लोकांना माहीती देन्यासाठी रक्तदानाविषयीची माहीती देन्याच्या दृष्टीकोनातुन तसेच घरात व शेतात निघणारे साप आणी साप चावल्यावर घेन्यात येणारा अंधश्रध्देचा आडोसा याविषयीची जनजागृती त्याचप्रमाणे शेतकर्‍यांमध्ये असलेली अंधश्रध्दा वृत्ती याविषयी प्रबोधन करन्यासाठी यंग सिटिझन टिमने पुढाकार घेतला.आज वाढत असलेल्या टेक्नाॅलाॅजीच्या युगात YCT टिमने या तंञज्ञानाचा फायदा घेवून" Yct Life saver" या अॅप्सची निर्मीती केली आहे.या अॅप्सचे लांचिंग एकद्याा कार्यक्रमाचे औचित्य साधुन करन्यात येणार असल्याची माहीती या टिमचे अध्यक्ष सुचित देशमुख यांनी दिली.हे अॅप्लिकेशन लोकहितासाठी असुन ज्यांना रक्ताची गरज भासली त्यांनी कुठल्याही ब्लड बॅंकेमध्य ब्लडसाठीे पैसे न देता या Yct life sever या अॅप्सवर गरज असलेला ब्लड गृप टाकावा त्यानंतर ज्या शहरात तुम्ही राहता तिथले ब्लड गृप आणी रक्तदात्यांचे संपर्क नंबर मिळतील.सबंधीत रक्तदात्यांना संपर्क करुन त्यांचेकडुन ब्लड मिळवु शकता जेणेकरुन ब्लडसाठी होणारी लुबाडणूक थांबेल.Yct टिमकडुन नेहमी जनजागृती आणी प्रबोधनाचे कार्यक्रम होत असुन आठवडी बाजारात लोकांना याविषयी मार्गदर्शन करन्यात आले.यावेळी या टिमचे अध्यक्ष सुचित देशमुख,अनूप इंगळे,अतुल खोपडे,,करण मुंधरे,शुभम बोरकर,महेश बेंद्रे,संघदिप खिराडे,दिपक खांबलकर,मयुर पाटिल,पुरुषोत्तम शर्मा,तर सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची प्रमूख ऊपस्थीती होती.

साठेवाडी येथील अर्धवट खोदलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान


-----------------------------------
कृष्णा लोंढे, कोळगांव

गेवराई तालूक्यातील साठेवाडी येथील शिवारातील गट क्रमांक 89 मधे विशेष निधी अंतर्गत सुमारे  लक्ष रू.सिमेंट बंधारा मंजूर करण्यात आला आहे. पण गुत्तेदार यांनी काम करण्यासाठी पायाचे खोदकाम करून दोंन्ही बाजूने मीती टाकली. परतू दि.15जून रोजी जोरदार पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले पण  या पाण्यामुळे बंधारा परिसरातील चार ते पाच  शेतक-यांच्या शेतात घुसून नूकसान केले.
     गेवराई तालूक्यातील  साठेवाडी  शिवारातील गट क्र.  89 या शेतीनजीक  लक्ष रूपयाच्या सिमेंट बंधा-यांची मंजूरी मागिल काही दिवसापुर्वीची होती. पण सदर यंत्रणेने या सिमेंट बंधा-यांचे काम वेळेत सुरू केले नाही. तसेच सध्या पाऊसाळ्याचे दिवस सुरूअसतानाही पायाचे खोदकाम वीस ते पंचवीस दिवसापर्वी करण्यात आले. पण आजपर्यत सदर बंधा-यांचे काम झाले नसून फक्त पाया खोदून दोंन्ही बाजूनी माती  भरावा करून सिमेंट, वाळू, खडी आणून शेतात देखाव केला.
पण या अर्धवट खोललेल्या कामामुळे मात्र दि.15 जून रोजी जोरदार पाऊस पडला. पाणी जाण्यासाठी कोसल3च मार्ग नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले व मोठ्या प्रमाणात  पाणी साचल्याने  बंधारा परिसरातील चार ते पाच शेतक-यांच्या शेतात घुसून मोठ्या प्रमानात माती वाहून गेली तसेच पेरलेले पीक  वाहील्याने खुप नूकसान गुत्तेदारच्या हलगर्जीमुळे शेतक-यांचे केले आहे.