तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 24 June 2017

कुरूंदा येथे इफ्तार पार्टी संपन्न

कुरूंदा / रामु चव्हाण

कुरुंदा येथे ग्रामपंचायत कार्यालय कुरूंदा व पोलीस स्टेशन कुरूंदा  यांच्या तर्फे सर्व मुस्लिम बाधंवाना इफ़्तार पार्टीचे आयोजन वहिद शेट यांच्या दुकानासमोर करण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद,  कुरूंद्याचे पो.स्टे. प्रभारी अधिकारी शकंर वाघमोडे साहेब,कुरूंदानगरीचे सरपंच दत्तरामजी इंगोले,मार्केट क.संचालक राजेश इंगोले, भाजपचे ता.अध्यक्ष खोबराजी पाटील,राष्ट्रावादीचे यु.ता.मा.श्री.मुंजाजी दळवी,पं.स.वसमत सभापती मा.श्री.चंद्रकांत दळवी,जि.प.माजी.शि.सभापती मा.श्री.रंगराव कदम,मा.श्री.अशोकराव दळवी,प्रसिद्ध व्यापारी मा.श्री.वहिद शेट, वि.का.से.सो.चे अध्यक्ष मा.श्री.बाबुराव शेवाळकर, वि.का.से.सो.चे उपअध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब इंगोले,ग्रा.प.सदस्य मा.श्री.प्रभाकर आडणे,जेष्ठ शिवसेनिक मा.श्री.सिताराम तात्या इंगोले,शिवसेना शहर प्रमुख मा.श्री.प्रशांत दळवी, युवासेना शहर प्रमुख मा.श्री.घनश्याम भालेराव,शिवसेना प्रसिद्ध प्रमुख कुरूंदा मा.श्री.दिपक इंगोले,जेष्ठ शिवसेनिक मा.श्री.काळे मामा,आडत व्यापारी मा.श्री.मन्मथ सिध्देवार,मा.श्री.गवारे मामा,मा.श्री.गणेश वटमे, मा.श्री.शिवलिंग कुबडे, लोकमतचे वार्ताहर मा.श्री.इब्राईम जहगिरदार, दैश्नतीचे वार्ताहार मा.श्री.बालाजी काळे,फोटोग्राफर मा.श्री.रफिक शेख, व कुरूंद्यातील सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते .

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार.


____________________________

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मुंबई आणि उपनगरां मध्ये जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, वसई-विरार, पालघर आदी भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे  मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. पहाटेच्या वेळी कळवा स्थानकाजवळ आणि ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 2, 3 आणि 4 दरम्यान पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे धिम्या मार्गावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. चांगली सुरुवात केल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने चिंतेेचे वातावरण पसरले होते. दरम्यान, काल सकाळ पासून पावसाने मुंबई आणि परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. दरम्यान, रात्री पावसाचा जोर वाढला. मुंबई आणि उपनगरांच्या तुलनेत ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पालघर आदी भागात पावसाचा जोर अधिक होता. ठाण्यातील मानपाडा भागात पावसामुळे पालिका कार्यालयाची भिंत कोसळली. त्यात दोन वाहनांचे नुकसान झाले. कळवा आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुकही खोळंबली. कळवा स्थानकात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक थांबली. त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या. परिणामी मध्य रेल्वेच्या काही लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. काही वेळाने धिम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. पण लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

पाकिस्तान मध्ये तेलाच्या टँकरला आग लागून 100 जणांचा मृत्यू.


____________________________

पाकिस्तान मध्ये तेलाच्या टँकरला आग लागून आज झालेल्या मोठ्या दुर्घटनेत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील बहावलपूर शहरात हा अपघात झाला आहे. पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार बहावलपूर मधील अहमदपूर शरिका येथे राष्ट्रीय महामार्गावर तेल वाहून नेणारा टँकर पलटला. त्यानंतर या टँकरला आग लागली. हा टँकर भरधाव वेगाने जात असल्याने उलटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टँकर उलटल्या नंतर तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी टँकरजवळ गर्दी केली. त्याच दरम्यान ही आग लागल्याने लोक मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत  आहे.

वसमत शहरातील चार चोर व मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


       
वसमत :- रामु चव्हाण

वसमत : शहरात काही दिवसापूर्वी विविध भागात चोरी चे प्रमाण वाढले होते. त्यातील काही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आडकले असुन वसमत शहरातील विविध भागात चोर्‍या झाल्या होत्या. त्यातील मुख्य आरोपी अजय उर्फ हुडी सुखराम पवार रा आर्वी ता. हिंगणघाट जि. वर्धा हल्ली मुकाम आसेगाव कॉर्नर वसमत असुन त्याच्या सोबत अजय प्रकाश पवार, रा. आसेगाव कॉर्नर वसमत. आकाश गंगाधर भोसले रा. आसेगाव कॉर्नर वसमत सय्यद गफार सय्यद मनुमिया. रा. चंदगव्हान. आकाश बालाजी डोइजड रा. कोहिनूर नगर राजाराम टाॅकिज. सर्व वसमत येथील असुन त्याच्याकडून मुद्देमाल नेकलेस अंदाजे किमत 29,400 रुपये. दोन अंगठी किमत 20,350 हा गुन्हा नं 169/2017 कलम 457/380असुन दुसरा गुन्हा नं. 95/2017 कलम 457/380 यात मुद्देमाल गळ्यातील सोन्याचे पदक/पेंडाॅल किमत 9,184 रु. गळ्यातील पोगर किमत 2,100 रु. आंगठी 4,396 रु. लहान मुलांची आंगठी 1,624 असा एकूण 67,054 रु. मुद्देमाल हस्तगत केला असुन अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरील आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 26 जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदयसिंह  चंदेल यांनी दिली. हि कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक थोरात व पथकाने पूर्ण केली.


हृदयदावक! बळीराजानं औताला जुंपलं नातूआणि मुलाला.


____________________________

राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर बळीराजाने शेतीच्या मशागतीचं काम सुरु केलं आहे. शेतकामासाठी बैजजोडी नसल्याने जळगावात एका शेतक-यावर स्वत:च्या मुलाला आणि नातवाला औताला जुंपण्याची वेळ आल्याची धक्कादायक आणि हृदयदावक घटना समोर आली आहे. गरीबीमुळे बैलजोडी खरेदी करणे आणि पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे शेत जमिनीच्या मशागतीची कामं त्यांचा मुलगा आणि नातू करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटळे आहे. त्यामुळे सरकारनं काल कर्जमाफी केली असली तरी त्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न खरचं सुटला का असा प्रश्न उभा राहतोय. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील निंभोरा गावातील हिरामण पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्यावर आपल्या नातवाला आणि मुलाला औताला जुंपण्याची वेळ आली आहे. या तिघांचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरामण पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याकडे वडिलो पार्जित असलेल्या दीड एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी कापसाची लागवड केली आहे. मात्र अल्पभूधारक खातेदार असल्याने त्यांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नाही. परिणामी मशागतीसाठी लागणारी बैलजोडी पाळणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे हिरामण स्वतःच्या काळजावर दगड ठेवून बैलांऐवजी मुलगा आणि नातवंडाला औताला जुंपून शेतीच्या मशागतीची कामे करत आहेत. एवढेच नव्हे तर इतर शेतकऱ्यांकडे मोलमजुरी करून पाटील कुटुंब घरची शेती कसतात. दरम्यान, कर्जाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी सध्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना दिसत आहे. परंतू असे असताना पाटील मात्र जगण्यासाठी शेतीत घाम गाळत आहे. त्यांची ही बाब कौतुकास्पद असल्याने त्याची नोंद ठेवणेगरजेचे आहे.


वालुर ग्रामपंचायतला पडला सन त्योहाराचा विसर कब्रस्तान समोर पसरले घानिचे साम्राजय


अनवर पठान,वालुर
मुस्लिम बांधवांचा त्योहार ईद हे दोन दिवसा नंतर येत आहे.कब्रस्तान परीसरात घानिचे साम्राजय पसरलेले आहे व ईदच्या नमाजिसाठी मुस्लीम बांधवाना ईदगाहला जान्यासाठि हा प्रमुख रस्ता असुन या ठिकानी पावसाचे पाणी भरपुर प्रमानात साठवले असल्याने व याच ठिकानी 'ग्रापंचायतचे पाणी पुरवठा करण्याचे मुख्य वाल' असल्याने या घानिने तलावाचे रुप धारन केले आहे.
ईदच्या दिवशि मुस्लिम बांधवाला मयताच्या प्रार्थने साठी कब्रस्तान मध्ये जावे  लागते व मुख्यरस्त्यावर घानी चे साम्राज्य पसरल्याने मुस्लिम बांधवाकडुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी ग्रामपंचायतने लवकरात लवकर लक्ष देऊन घान उचलून सहकार्य करावे  अशी मागनी मुस्लिम समाजाच्या वतिने केली जात आहे.

तेजन्युज हेडलाईन्स वेब वाहिनी प्रतिनिधी,वालुर
मो.नं.8888375846

आष्टीत (ता.परतूर) येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

आशिष धुमाळ
परतूर
तालुक्यातील आष्टी येथे कर्जबाजारी पणास कंटाळून शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडास केबल च्या वायरने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे आष्टीत खळबळ माजली असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे या मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

आष्टी येथील रोहिदास विठोबा शिंदे वय 45 यांना आष्टी शिवारात गट क्र. ६१८ मध्ये दोन एक्कर शेती असून शेती व मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी , दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी त्यांनी आपल्या शेतात कपाशी लागवड केली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे लागवड केल्या पासून एकही पाऊस न पडल्याने ते चिंतेत होते महागा मोलाची बिबियाने खरेदी करून बियाणे न उगवल्याने व  दुबार पेरणीच्या संकटा मुळे ते चिंतेत होते तसेच त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेतलेले होते दुबार पेरणी झाल्यास पैश्यांची विवंचना तसेच मुलीस उच्च शिक्षणासाठी लागत असलेल्या पैश्या मुळे चिंताग्रस्त अवस्थेत ते काल रात्री शेतात गेले मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडास विद्युत पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल वायरने गळफास घेवून आत्महत्या केली . आज पहाटे शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या हा प्रकार लक्ष्यात आल्याने तात्काळ त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली घटना समजताच गावातील शेकडो नागरिकांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली या बाबत त्यांचे बंधू अरुण विठ्ठलराव शिंदे यांच्या माहितीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून या बाबत पंचनामा केला आहे .अधिक तपास सहाय्यक फौजदार प्रवीण देशमुख करीत आहेत .       

आष्टीत (ता.परतूर) येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

आशिष धुमाळ
परतूर
तालुक्यातील आष्टी येथे कर्जबाजारी पणास कंटाळून शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडास केबल च्या वायरने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे आष्टीत खळबळ माजली असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे या मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

आष्टी येथील रोहिदास विठोबा शिंदे वय 45 यांना आष्टी शिवारात गट क्र. ६१८ मध्ये दोन एक्कर शेती असून शेती व मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी , दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी त्यांनी आपल्या शेतात कपाशी लागवड केली होती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे लागवड केल्या पासून एकही पाऊस न पडल्याने ते चिंतेत होते महागा मोलाची बिबियाने खरेदी करून बियाणे न उगवल्याने व  दुबार पेरणीच्या संकटा मुळे ते चिंतेत होते तसेच त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेतलेले होते दुबार पेरणी झाल्यास पैश्यांची विवंचना तसेच मुलीस उच्च शिक्षणासाठी लागत असलेल्या पैश्या मुळे चिंताग्रस्त अवस्थेत ते काल रात्री शेतात गेले मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी शेतात असलेल्या लिंबाच्या झाडास विद्युत पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल वायरने गळफास घेवून आत्महत्या केली . आज पहाटे शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या हा प्रकार लक्ष्यात आल्याने तात्काळ त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली घटना समजताच गावातील शेकडो नागरिकांनी त्यांच्या शेताकडे धाव घेतली या बाबत त्यांचे बंधू अरुण विठ्ठलराव शिंदे यांच्या माहितीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून या बाबत पंचनामा केला आहे .अधिक तपास सहाय्यक फौजदार प्रवीण देशमुख करीत आहेत .       

अर्धामसला ग्राम पंचायत आरक्षण सोडत जाहीर

सुभाष मुळे...
------------
गेवराई, दि. 24 ___ : बीड जिल्ह्य़ाच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला वार्ड रचना तसेच आरक्षण सोडत गुरूवारी जाहीर करण्यात आली.
   अर्धामसला या ग्राम पंचायतचे सरपंच पद हे एस्सी महिलेसाठी राखीव झाले आहे. प्रभागनुसार आरक्षण खालील प्रमाणे - वार्ड क्र 1 - एस्सी महिला, सर्वसाधारण पुरूष, सर्वसाधारण महिला. वार्ड क्र 2 - ओबीसी पुरूष, सर्वसाधारण पुरूष, सर्वसाधारण महिला. वार्ड क्र 3 - ओबीसी महिला, सर्वसाधारण पुरूष, सर्वसाधारण महिला अशा पध्दतीने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
     या वेळी मंडळ अधिकारी पुरणकर, तलाठी नेवाळे, ग्रामसेवक चव्हाण, सरपंच अशोक राऊत, उपसरपंच आरेफ शेख, कैलास उघडे, राजु खळगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

पालावरच्या मुलांसाठी वसतिगृह स्थापन करणाऱ्या - सत्यभामा


अनिल घोरड
बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड : जिल्हा हा ऊसतोड कामगार जिल्हा मुलींची कमी संख्या असणारा  व्यसन असणारा जिल्हा यामुळे ऊसतोङीचा पैसा हा दारूत जात असल्याने याचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक घटकांवर होताना दिसत आहे त्यामुले मुली वाचल्य पाहीजेत पण त्य शिकल्याही पाहिजेत आणि माणुस म्हणून जगल्या पाहीजेत यासाठी वरवरचे धोरण समाजाची उदासीनता यामुळे आज शाळाबाह्य मुलांमध्ये मुलींचे प्रमाण अतिशय भयानक आहे पालांवर रहाणार्या मुली मुलांना तर भंगार वेचायचे भीक मागायचे आणि यातुन आई वडलांना पैसे पैसे द्यायचे यातुन वडील दारू पिणार आणि आईने गोवा पुड्या तंबाखू खाणार आणि ही मुले सुद्धा व्यसन करणार यामुळे या मुलांचे बालपण हिराउन घेतले जात आहे पालांवरील या मुलांना गेल्या वर्षी कपडे वह्या शैक्षणिक साहित्य देऊन शाळेत प्रवेश मिळवुन दिले मात्र ही मुले  'हजरी पटावर हजर आणि भीक मागती रस्त्यावर ' असे सतत निदर्शनास आले याचबरोबर फक्त दारू बंद न करता ते भागणार नाही तर यासाठी प्राॅपर उपाययोजना करणे गरजेचे आहे  तसेच एकल महिलांच्या बाबतित आहे व्यसनामुळे त्यांच्या वर एकटे रहण्याची वेळ येत आह यांचे प्रमाण ही वाढत आहे यांच्या सोबत असणारी मुले ही सुद्धा मजुरी रानात करतात ,अर्ध्या कोयत्याचे काम करतात मुली फडावर लेकऱ सांभाळायचे कोपटावर सरपण गोळा करायचं काम करतात  यासाठी या लेकरांसाठी निवासी सोय करण्याचा हा मला वाटतं बीड जिल्ह्यातील पहिला प्रयोग आहे असे सत्यभामा सौदरमल म्हणाल्या . . . पण हे एकट्याचे काम नसून ही शासन समाजाची आपली सर्वांची जबाबदारी आहे या पिढ्या घडवायची आपल्या मदतीची गरज आहे आपली कोणतीही मदत या मुलांचे भविष्य घडवेल अशी माहिती त्या नि तेज न्युज हेडलाईन वृत्तवाहिनीला दिली

वर्ल्ड हॉकी लीग : भारताकडून पाकिस्तानचा 6-1 ने धुव्वा.


____________________________

वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पाचव्या-आठव्या स्थानासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6-1 ने धुव्वा उडवला. पाचव्या स्थानासाठी भारताचा सामना आता कॅनडाशी होईल. 25 जून रोजी हा सामना होणार आहे.पाकिस्तान विरोधात भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. साखळी सामन्यात 18 जूनला भारताने पाकिस्तानवर 7-1 ने मात केली होती.भारतीय खेळाडूंनी सुरुवाती पासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मजबूत ठेवली. पाकिस्तानला विजयाच्या आशाहीदिसू दिल्या नाही. पाकला केवळ एका गोलवर समाधान मानावं लागलं. सामन्याच्या 41 व्या मिनिटाला पाकिस्तानला पहिला गोल करता आला. या स्पर्धेनंतर वर्ल्ड हॉकी लीग फायनल आणि हॉकी विश्वचषक या स्पर्धा भारतात होणार आहेत. या स्पर्धेतील कामगिरीचा भारताच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, यजमान देश म्हणून भारताचा दोन्ही स्पर्धांमधला प्रवेश निश्चीत आहे. मात्र अखेरच्या सामन्यात विजय मिळवत आत्मविश्वासाने भारतात परतण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.

मराठवाडयातील एकमेव रिंगण सोहळा

                              अनिल घोरड जिल्हा प्रतिनिधी
बीड
भर पावसातही अंबाजोगाईतील रिंगण सोहळ्यास भाविकांची प्रचंड गर्दी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात शनिवारी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्टेडियम मैदानावर पाच पालख्यांचा एकत्रितरित्या रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. पडत्या पावसाच्या सरीतही शहरवासियांनी रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. मराठवाडयात एकमेव असणाऱ्या या रिंगण सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ, महिलांच्या फुगडया, संत ज्ञानेश्वरांनी भिंत अशा विविध उपक्रमांचे सादरीकरण यावेळी झाले.

यावेळी रिंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, अध्यक्ष दिलीप सांगळे, कार्याध्यक्ष बाबामहाराज जवळगांवकर, उपाध्यक्ष दिलीप गित्ते, कृउबाचे सभापती मधुकर काचगुंडे, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पं.स.चे उपसभापती तानाजी देशमुख, पं. उद्धवराव आपेगावकर, वैजनाथ देशमुख, बळीराम चोपने, अनंत अरसुडे, अभिजीत जोंधळे, महादू मस्के, बाळा पाथरकर, मुन्ना सोमानी, योगेश कड़बाने, पंकज लोमटे यांनी पालखी प्रमुखांचे स्वागत केले.

गुटखा माफियांना प्रशासनाचे पाठबळ, गुटखा विक्री जोरात

   प्रतिनिधी : भोकरदन

  राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटख्यामुळे माफियांचे मोठे फावले आहे. गुटख्याच्या हप्तेबाजीत सर्वांचेच हात ओले होत असल्याने माफियांनी प्रशासन पोलिसांना सुगीचे दिवस आणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विशेष पथकाने माफियांना नाकीनऊ आणल्याने आता अन्न औषध प्रशासन विभागाचे काही अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळत असून माफियांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे झाल्याने गेल्या आठवड्यात गुटख्याचे ठप्प झालेले व्यवहार चोरट्या मार्गाने पुन्हा सुरु झाले आहेत.
अन्न औषध प्रशासन विभागाचे काही अधिकाऱ्यांचे आणि गुटखा माफियांचे साटेलोटे आहे. तुम्ही पोलिसांचे बघून घ्या, आमची चिंता करू नका असाच संदेश सर्रास होत असलेल्या गुटखा विक्रीतून दिसून येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने काही प्रमुख गुटखा माफियांविरोधात कारवाया केल्या. त्यावरून पोलिस ठाण्यांना ज्याप्रमाणे मॅनेज केल्या जात आहे. त्याचप्रमाणे विशेष पथकाला मॅनेज करण्याचा प्रयत्न माफियांना चालवला आहे. जालना जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे यांचे पथकाला मॅनेज करण्यात माफियांना अपयश येत आहे. त्यातच जालण्याचे एलसीबीचे राजेंद्रसिंग गौर यांनी धडाकेबाज गुटखा व अवैद्य दारू माफियांविरुद्ध उघडलेल्या मोहीमेने माफिया त्रस्त झाले आहेत. किती दिवस धंदा बंद ठेवायचा म्हणून पुन्हा चार दिवसांपासून शहरात गुटख्याची आवक वाढली आहे. काही संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीतच मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीचे केंद्र असताना एकही कारवाई स्थानिक पोलिसांनी केली नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांना गुटखा माफियांचा हप्ता वेळेवर पोहचत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
पान टपारील्याकडे सहजासहजी गुटखा : पानटपरी सहजासहजी मिळत असलेल्या गुटख्यावरून गुटखा बंदी आहे, असे कधी जाणवतही नाही. या पान टपर्याल्यांवर कुठून गुटखा येतो. कोण आणून देतो. त्यांचे दलाल कोण हे शोधण्याचा प्रयत्न आजपर्यंत अन्न औषध प्रशासनाने कधी केला नाही. एकाही पानटपरीची तपासणी या विभागाच्या नावावर नाही.
गुटखा बंदी झाली तेव्हा पान टपरीवाले कागदाच्या पुडीत गुटखा बांधून देत होते. आता तर तीही भीती नसल्याने खुलेआम गुटखा मिळत आहे.
विशिष्ट पोलिस ठाण्यांतर्गतच गुटख्याचे केंद्र
शहरात राजरोसपणे गुटखा मिळतो. शहरातील काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गुटख्याचे गोडावून असल्याचे यापूर्वीच्या कारवायांवरून सिद्ध झाले आहे. मात्र ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नेहमी कारवाया होतात. त्या पोलिसांनी गुटखा विरोधी एकही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. सर्व कारवाया विशेष पथक किंवा स्थानिक गुन्हे शाखेने केल्या आहेत. गुटखा विक्रेत्यांकडून पोलिसांना हजारो रुपयांचे हप्ते मिळत असल्याचे आरोप अनेकदा होत आहेत. मात्र पोलिस कारवाया करीत नसल्याने हप्तेबाजीला पाठबळ मिळत आहे. ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार गुटखा पकडल्या जातो. त्या पोलिसांवर आजपर्यंत कोणतीही प्रशासकीय कारवाई केल्याचे ऐकीवात नाही. आता तरी जिल्हा पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भोकरदन ग्रामिण रूग्णालयावर सी.सी.टिव्ही नजर,रूग्णालयाच्या परिसरात बसवले कॅमिरे...

   प्रतिनिधी : भोकरदन

   शासनाच्या योजनेतुन भोकरदन ग्रामिण रूग्णालयात सी.सी.टिव्ही कॅमिरे बसवले असुन यामुळे या परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही व रूग्णांची व्यवस्थित सेवा मिळावी या हेतुने हे कॅमिरे बसवले आहेत.
   भोकरदन ग्रामिण रूण्णालयात सर्वच चांगल्या सुविधा दिल्या जात आहे.व या सुविधा अजुन कशा प्रकारे चांगल्या देता येईल यासाठी शासन प्रर्यत्नशिल असुन ग्रामिण भागातील रूग्णांना चांगली सेवा मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.
    या ठिकाणी बवले आहेत कॅमिरे जनरल वार्ड,प्रसुती कक्षा बाहेर,नवजात शिशु कक्ष,मेन गेटवर असे एकुन ११ ठिकाणी कॅमिरे बसवले असल्याने या ग्रामिण रूग्णालयाच्या परिसरावर लक्ष राहाणार आहे.

   छाया : मधुकर सहाने

भोकरदन ग्रामिण रूग्णालयावर सी.सी.टिव्ही नजर,रूग्णालयाच्या परिसरात बसवले कॅमिरे...

   प्रतिनिधी : भोकरदन

   शासनाच्या योजनेतुन भोकरदन ग्रामिण रूग्णालयात सी.सी.टिव्ही कॅमिरे बसवले असुन यामुळे या परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही व रूग्णांची व्यवस्थित सेवा मिळावी या हेतुने हे कॅमिरे बसवले आहेत.
   भोकरदन ग्रामिण रूण्णालयात सर्वच चांगल्या सुविधा दिल्या जात आहे.व या सुविधा अजुन कशा प्रकारे चांगल्या देता येईल यासाठी शासन प्रर्यत्नशिल असुन ग्रामिण भागातील रूग्णांना चांगली सेवा मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.
    या ठिकाणी बवले आहेत कॅमिरे जनरल वार्ड,प्रसुती कक्षा बाहेर,नवजात शिशु कक्ष,मेन गेटवर असे एकुन ११ ठिकाणी कॅमिरे बसवले असल्याने या ग्रामिण रूग्णालयाच्या परिसरावर लक्ष राहाणार आहे.

   छाया : मधुकर सहाने