तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 1 July 2017

भोकरदन तालुक्यातील रूग्ण अतिसाराने परेशान...    शनिवारी ग्रामिण रूग्णालयात मोठी गर्दी

   प्रतिनिधी : सोयगाव देवी

भोकरदन तालुक्यात अतिसाराचा प्रकोप वाढला असून भोकरदन ग्रामिण रूग्णालयात शनिवारी २८० रूग्णांची तपासणी करण्यात आली .त्यापैकी ३० रूग्ण हे अतिसार व उलट्या होणारे होते. तालुक्यातील प्राथमिक केंद्रातही अतिसाराचे रूग्ण आढळुन येत आहेत.

भोकरदन तालुक्यातील ग्रामीण परिसरात अतिसाराचा प्रमाण वाढले आहे.भोकरदन,कुंभारी,आलापुर,बरंजळा,कोदोली,सोयगाव देवी,दानापुर पिंपळगाव रेणुकाई, आणि अन्य गावातील ३० रूग्ण भोकरदन येथील ग्रामिण रुग्णालयात भरती झाले होते. हागवण आणि उलटीचे लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांनी रूग्णालयात धाव घेतली.  भोकरदन ग्रामिण  रूग्णालयातील जनरल वार्डमध्ये मध्ये रूग्णांवर उपचार करण्यात आले.यावेळी वैद्यकिय अधिकारी वैभव वानखेडे,अजय देशमुख,शेख युसुफ सह आरोग्य सेविका,सेवक हे रूग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रर्यंत करत आहे.

  कोट : पाणी साठा दुषित झाल्याने अतिसाराचे,थंडी,ताप,खोकला अदि पेशंटची संख्खा वाढली असुन नागरीकांनी पाणी निरजंतुनाशक पाणी प्यावे.दमट वातावरण असल्याने जंतुंना हे पोशक असुन हे जंतु माणसाच्या शरिरासाठी घातक आहेत.शक्यतो पाणी उकळुन किंवा फिल्टरचे पाणी प्यावे.

  वैभव वानखेडे : वैद्यकिय अधिकारी

   फोटो ओळी : आशा पध्दतीने जागा नसल्याने एका बेडवर दोन जनांना झोपावे लागले

भोकरदन तालुक्यातील रूग्ण अतिसाराने परेशान...    शनिवारी ग्रामिण रूग्णालयात मोठी गर्दी


   प्रतिनिधी : सोयगाव देवी

भोकरदन तालुक्यात अतिसाराचा प्रकोप वाढला असून भोकरदन ग्रामिण रूग्णालयात शनिवारी २८० रूग्णांची तपासणी करण्यात आली .त्यापैकी ३० रूग्ण हे अतिसार व उलट्या होणारे होते. तालुक्यातील प्राथमिक केंद्रातही अतिसाराचे रूग्ण आढळुन येत आहेत.

भोकरदन तालुक्यातील ग्रामीण परिसरात अतिसाराचा प्रमाण वाढले आहे.भोकरदन,कुंभारी,आलापुर,बरंजळा,कोदोली,सोयगाव देवी,दानापुर पिंपळगाव रेणुकाई, आणि अन्य गावातील ३० रूग्ण भोकरदन येथील ग्रामिण रुग्णालयात भरती झाले होते. हागवण आणि उलटीचे लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांनी रूग्णालयात धाव घेतली.  भोकरदन ग्रामिण  रूग्णालयातील जनरल वार्डमध्ये मध्ये रूग्णांवर उपचार करण्यात आले.यावेळी वैद्यकिय अधिकारी वैभव वानखेडे,अजय देशमुख,शेख युसुफ सह आरोग्य सेविका,सेवक हे रूग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रर्यंत करत आहे.

  कोट : पाणी साठा दुषित झाल्याने अतिसाराचे,थंडी,ताप,खोकला अदि पेशंटची संख्खा वाढली असुन नागरीकांनी पाणी निरजंतुनाशक पाणी प्यावे.दमट वातावरण असल्याने जंतुंना हे पोशक असुन हे जंतु माणसाच्या शरिरासाठी घातक आहेत.शक्यतो पाणी उकळुन किंवा फिल्टरचे पाणी प्यावे.

  वैभव वानखेडे : वैद्यकिय अधिकारी

   फोटो ओळी : आशा पध्दतीने जागा नसल्याने एका बेडवर दोन जनांना झोपावे लागले

संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्राचार्यांच्या हस्ते वृक्षरोपन..

प्रतिनिधी : भोकरदन

   भोकरदन तालुक्यातील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हसनाबाद येथे जवखेडा खु. केंद्रप्रमूख गंगाधर अदमाने  व प्राचार्य मानिक दानवे यांच्या हस्ते  वृक्षारोपन करण्यात आले.या शाळेभोवती मोकळ्या जागेत जांबुळ,कदंब,लिंब,शेवरी, अदि झाडे लावली या प्रसंगी उपस्थित श्याम तुपकर, संदिप सिंगारे.  जाधव विनोद. बकाल ज्ञानेश्वर  .गणेश साळवे.व विद्याथीॅ उपस्थीत होते. ...

मुंबईत मोठ्या कॉम्प्लेक्सचा ओला कचरा पालिका उचलणार नाही.


____________________________

मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण संकुलातील ओला कचरा दोन ऑक्टोबर पासून महापालिका उचलणार नाही. घनकचरा व्यवस्थापन खात्याला मुंबई महापालिकेने तसे आदेश दिले आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्सचा एकूण एरिआ हा 20 हजार स्क्वेअर मीटरकिंवा त्यापेक्षा जास्त आहे, तसंच ज्या संकुलांमधून दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माणहोत आहे, अशा संकुलांनी आपापल्या परिसरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट संकुलातच लावायची आहे. तसे आदेश यापूर्वीच महापालिकेने संबंधित संकुलांना दिले होते. आता याबाबत पुन्हा एकदा नोटीस देण्याचेही आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित संकुलांना तांत्रिक मार्गदर्शना बाबत जी काही मदत लागेल ती महापालिकेद्वारे देण्याचेही आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. विभाग स्तरावर सुक्या कचऱ्याचा लिलाव कशा प्रकारे करता येईल..? याबाबत पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयुक्तांना लवकरात लवकर नियोजन करायचं आहे.

आयसीसी महिला विश्वचषकात टीम इंडिया पाकशी , तर पुरुष संघ वेस्ट विंडीजशी भिडणार.


____________________________

महिला क्रिकेट वर्ल्डकप मध्ये आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे तर भारताच्या पुरुष संघाचा वेस्ट विंडीज विरुद्ध चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना होईल. महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यां मध्ये भारतीय महिला संघानं जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवले आहेत. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज, स्मृती मंधाना आणि पुनम राऊत या जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. तर पाकिस्तानची कर्णधार साना मिर, बिसमाह मारुफ, नैन आबिदी यांच्याकडे सामना खेचून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघात 2005 ते 2017 या बारा वर्षांत केवळ नऊ एकदिवसीय सामने झाले आहेत. यात पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या कामगिरीच्या तुलनेत पाकिस्तानी संघ दुबळा वाटत असला तरी, पाकिस्तानची कर्णधार साना मिर, बिसमाह मारुफ, नैन आबिदी यांचा अनुभव आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी बघता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाकिस्ताननं वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. दक्षिण आफ्रिके विरुद्ध पाकला पराभव स्वीकारावा लागला, तर इंग्लंडनंही त्यांना नमवलं आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना भारता विरुद्ध चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

सीए व्हायचंय...? 100 मार्कांचा जीएसटीचा पेपर तर द्या...!

____________________________

आज सीए अर्थात चार्टर्ड अकाऊण्टण्ट दिन आहे. चार्टर्ड अकाऊण्टण्ट होणं काही सोपं नाही. अत्यंत अवघड अशी ही परीक्षा आणि त्याहुन कठीण आर्टिकलशिपचा काळ. आॅडिटला जावून जावूनच अनेक सीए होऊ पाहणारे दमून जातात. आता त्यांची अजून परीक्षा पाहणारे खडतर दिवस पुढेच आहेत. पुढच्या वर्षीपासून जीएसटीचा 100 मार्कांचा पेपर सीए परीक्षेत द्यावा लागणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेतही 10 मार्क जीएसटी विषयावर आधारित प्रश्नांना असतील असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच जाहीर केलंआहे.जीएसटीचा आर्थिक सामाजिक परिणाम होणार असताना पुढच्या काळात सीए होणाऱ्यांना त्याचा परीपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे असं वाटल्यानं हा बदल करण्यात येत आहे. इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊण्टण्ट आॅफ इंडियानंही या बदलाला पाठिंबा दर्शवला आहे. एवढंच नव्हे तर सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल अशातिन्ही परीक्षेत बदल करण्याचे सुतोवाच ही या संस्थेनं केलं आहे.त्यामुळे येत्या काळात सीएची परीक्षा अधिक कठीण होणार हे उघड आहे.

कार्यकारी अभियंता धारासुरकर सेवानिवृत्त


         (,कलिदास अनंतोजी)
नांदेड (प्रतिनिधी) - शासकीय सेवेत 32 वर्षे सेवा बजावून सध्या हिंगोली येथून कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या पदावरून ते दि. 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी हिंगोलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात प्रदीर्घ अशी आपली 32 वर्षे सेवा यशस्वीरित्या पार केली असून विशेषत: नांदेड जिल्ह्यात त्यांनी 17 वर्षे विविध ठिकाणी सेवा बजाविली.
कार्यकारी अभियंता विजयकुमार धारासुरकर हे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड या विभागामार्अत जिल्ह्यात 17 वर्षे सेवा केली असून यामध्ये भोकर येथे 4 वर्षे सेवा केली. यामध्ये त्यांनी गोदावरी नदीवरील बनविण्यात आलेले मोठे तीन पुल, तसेच 2008 मधील गुरू-ता-गद्दी कार्यक्रमाअंतर्गत शिवाजीनगर उड्डाणपुल, वाजेगाव येथील बायपास याचबरोबर मराठवाड्यातील आदर्श असा बनविण्यात आलेली डॉ. शंकरराव चव्हाण मेडीकल कॉलेज प्रशासकीय इमारत ही त्यांच्यात काळात झाली असून त्यांच्या काळातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत ही एक आदर्श इमारत म्हणून संपूर्ण राज्यभर ओळखली जाते. हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकास कामांत त्यांनी मोठा हातभार लावला. हिंगोली जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या उपस्थितीत विजयकुमार धारासुरकर यांना एका समारंभपूर्व कार्यक्रमात निरोप देण्यात
कलिदास अनंतोजी
नांदेड़ 9921404070

मोप येथे कृषी महाविद्यालय रिसोडच्या वतीने वृक्षारोपन १ जुलै

.रिसोड महेंद्र महाजन जैन

                   आज १जुलै रोज शनिवार कृषी दिनाचे औचित्य साधुन श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मोप येथे वृक्षारोपन करण्यात आले.
               आजच्या या निसर्गाच्या लहरीपणाला जबाबदार म्हणजे असंख्य वृक्षतोड झालेली आहे.वृक्ष लावणे व त्याचे संवर्धन करणे आज काळाची गरज आहे.वृक्ष लागवडीचे महत्व लक्षात घेऊन कृषी महाविद्यालय रिसोड येथील विद्यार्थ्यानी प्रा.ए.बी.फुके यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मा.डाॅ.गोपीकिसन सिकची अध्यक्ष शिक्षण समिती मोप यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.त्याच बरोबर श्री.वरघट सर मुख्याध्यापक जि.प.मोप,प्रा.समाधान गायकवाड,श्री.संतोष भुरकाडे सर,श्री.अतुल राजुरकर सर,श्री.विशाल बोडखे सर,श्री.सिकवाल बाबुजी,श्री.बंडुजी केचकर बाबुजी शिवाजी विद्यालय मोप,श्री.काळे सर जि.प.मोप सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.डाॅ.गोपीकिसन सिकची साहेब यांनी वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्व यावर कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.
         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.ए.बी.फुके यांच्या मार्गदर्शनाखाली भुवनेश रेड्डी,विश्वजीत देशमुख,जगदिश कुमार, विजय चंन्द्रा,किरण कुमार राजु इ.विद्यांर्थ्यानी परिश्रम घेतले.

महेंद्र महाजन जैन रिसोड
9960292121

गढीच्या जयभवानी विद्यालयात नाईक जयंती निमित्त वृक्ष दिंडी

सुभाष मुळे...
-------------
गेवराई, दि. १ ___ : हरित क्रांतीचे जनक व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त गढी येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भव्य वृक्ष दिंडी काढुन वृक्षारोपण करण्यात आले
           या वेळी प्राचार्य डॉ. एस. डी. पटेल, उपप्राचार्य आर. एस. सानप, पर्यवेक्षक के. एन. गायकवाड, वृक्षारोपण विभाग प्रमुख एच.एम. कोकाट यांच्यासह सर्व शिक्षक  विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.डी. खामकर, वैजिनाथ मोरे, राजभाऊ काळे, अंकुश बनसोडे, कल्याण सानप, देविदास गिरी, दिपक शिंदे, दत्तात्रय बांगर, श्रीमती आशा वराट यांनी परीश्रम घेतले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

____________________________

जीएसटीचा जल्लोष करणाऱ्यांनो, मुंबईत दुसरा कसाब घुसणार नाही याची खबरदारी घ्या: शिवसेना

या कठोर निर्णयांचे राजकीय पक्षाला काय परिणाम भोगावे लागतील, याची मला जाणीव आहे; पण देशासाठी कुणालातरी हे काम करावेच लागेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

क्रिकेट मध्ये अनुसूचित जातींना 25 टक्के आरक्षण द्या : रामदास आठवले

नियमित कर्ज भरणाऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. नेहमी कर्ज भरतात त्यांना कमीत कमी 25 हजार किंवा रक्कमेच्या 25% कर्जमाफीची मदत मिळणार होती. पण आता त्यांना कमीत कमी 15 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

लष्कर ए तोयबाचा कमांडर बशीर लष्करीचा खात्मा, जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत भारतीय लष्कराकडून कंठस्नान.

भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण, कारागृह अधीक्षक मनिषा पोखरकर यांच्यासह पाच जणांना अटक.


गेल्या 11 वर्षात केवळ 25 CA वरच कारवाई, फक्त 25 जणांनीच घोटाळे केले का...? - पंतप्रधान नरेंद्र मोदी

10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई असल्याचं केवळ देशातील 25 लाख लोक मान्य करतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नोटाबंदीनंतर 3 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत कंपन्यांची देवाणघेवाण चौकशीच्या फेऱ्यात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

काळ्या पैशांविरोधातील मोहिमेचं यश स्विस बँकेच्या ताज्या आकडेवारीतून दिसते - पंतप्रधान नरेंद्र मोदी

चार्टर्ड अकाऊंटंट्सना संसदेन पवित्र अधिकार दिला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोकणातील बागायतदार आणि मच्छिमारांच्या कर्जमाफीसाठी पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणारअसल्याची घोषणा, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेत घोषणा.

सांगली = राजू शेट्टी-जयंत पाटील ऐक्याचे संकेत जिल्हा परिषद निवडणुकीतच : सदाभाऊ खोत

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण, गुन्हे शाखेकडून पहिली अटक. भायखळा कारागृहातील आरोपी गार्ड बिंदू नाइकोडेला विशेष पथकाकडून अटक. 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी.

वर्धा = 4 जण महाकाळी धरणात बुडाले, गौरव गुल्हाणे, श्वेता नेहारे, शीतल प्रधान, सोनल नाईक मृतांची नावं.

भायखळा जेलमधील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण, आमदार रमेश कदमचा साक्ष देण्यास सत्र न्यायालयात विनंती अर्ज.

नागपूर = सावनेर येथील पेट्रोलपंपवर पेट्रोलियम विभाग आणि गुन्हे शाखेची धाड.

बोरिवली = रिक्षावर झाड कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू. साईबाबा नगर येथील घटना.

चंद्रपूर = बल्लारपूर पोलिसांनी 11 लाख 47 हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव = बलात्कार प्रकरणातील पोलीस कॉन्स्टेबल परवेज शेख व त्याचा फौजदार पिता रईस अब्दुल शेख या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी स्वाती गरुड यांना 35 हजार रुपयांची लाच घेताना अटक, लाच लुचपत विभागाची कारवाई, बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न करण्यासाठी मागितली होती लाच.

अकोला = बाळापूर तालूक्यातल्या वाडेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी संदिप नानोटी यांची विष प्राशन करून आत्महत्या, 3 एकर शेतात दुबार पेरणीच्या वैफल्यातून आत्महत्या केल्याची कुटूंबियांची माहिती.

लातूर = शहरातील मंगळसूत्र चोराकडून सोने खरेदी करणा-या सराफा राजेंद्र सुराणा याला स्थानिक गुन्हेगार शाखेच्या पोलिसांनी शनिवारी केली अटक.

नरखेडचे नगराध्यक्ष अभिजीत गुप्ता यांच्यावर अवैध बांधकाम प्रकरणी नरखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, पद रद्द करण्यासाठी मुख्याधिकारी यांचे जिल्हाधिका-यांना पत्र.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी 22 जुलैला होणार पुढील सुनावणी.

मुख्याध्यापक, लिपीक व सेवक २० हजाराची लाच घेतांना चर्तुभुज


 परभणी : प्रतिनिधी
  गेल्या सहा महिन्याचे वेतनाची रक्कम काढण्यासाठी २० टक्के रक्कम द्यावी अशी मागणी कामेल उर्दु हायस्कूलच्या मुख्याध्यापीका शहाना बेगम शे. गुलजार या संस्थेचे सचिव तथा लिपीक मो. मुश्ताक अहेमद आणि सेवक बळीराम मस्के हे तिघे ६५ हजाराची लाच घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
    सविस्तर माहीती अशी की कामेल उर्दु हायस्कूल ये़थील एका सहशिक्षकास त्याचे पाच महिन्याचे वेतन येणे बाकी होते याच संधीचा फायदा घेत मुख्याध्यापीका शहाना बेगम शे. गुलजार या संस्थेचे सचिव तथा लिपीक मो. मुश्ताक अहेमद आणि सेवक बळीराम मस्के या तिघांनी मिळणाºया रकमेतून २० टक्के म्हणजेच ६५ हजार रुपये दिले तरच वेतन काढले जाईल असे सांगीतले. वारंवार मागणी करूनही वेतनाची रक्कम अदा केली जात नाही. शेवटी वेतन काढण्यासाठी ६५ हजार एवढी रक्कम आनायची कोठून ये विचारात असलेल्या तक्रारदाराने अखेर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी या विभागाकडे केलेल्या तक्रारीत हे तिघेजण ६५ हजार रु. मागत आहे. त्यापैकी आज २० हजाराची रक्कम सेवक बळीराम मस्के याच्याकडे देण्यास सांगीतले आहे. या तक्रारीवरून सचिव मो. मुश्ताक अहेमद मो. अली यांच्या घरी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या तिघांच्या विरोधात नवा मोंढा ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. दरम्यान सापळा यशस्वी करण्यासाठी नांदेडचे लाचलूचपत विभागाचे प्रभारी पो.अ.संजय लाटकर, पो.उप अधिक्षक एन.एम.बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अनिल गव्हाणकर ,दिनकर गावंडे, लक्ष्मण मुरकुटे, भारती, लक्ष्मण उपलंचवार, सचिन गुरसुडकर,शेख मुखीद तसेच श्रीकांत कदम, शिवाजी बोडले, सारीका टेहरे,बोके रमेश चौधरी यांनी कामगीरी यश्स्वीरित्या पार पाडली. तपास पो.नि.अनिल गव्हाणकर करीत आहे.या प्रकरणावरून शैक्षणिक वर्तुळात चालत असलेल्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्यास मदत झाली.

बालाजी संस्थानच्यावतीने राजे भोसले यांचा सत्कार


विनोद तायडे
वाशीम : छंत्रपती शिवाजी महाराज यांचे  13 वे वंशज नागपूर येथील राजे मुधोजी भोसले यांचे आज वाशीम येथे एका कार्यक्रमानिमीत्त आगमन झाले.  यावेळी त्यांनी वाशीमचे आराध्य दैवत बालासाहेब यांचे मंदिरातून येवून दर्शन घेतले.  यावेळी बालाजी संस्थानचे वहिवाटदार विश्वस्त ज्ञानेश्वर काळू यांच्याहस्ते शाल,श्रीफळ व बालाजीची प्रतिमा देवून त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.  सोबतच तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी  यांनी सुध्दा सन्मानचिन्ह देवून राजे भोसले यांचा सत्कार केला.  यावेळी आबासाहेब काळू, ऍड. राम काळू, ऍड. भवानीपंत काळू, विवेक वैद्य, महादेवराव फुके, शरदराव देशमुख, राजेश शर्मा  आदिंची उपस्थिती होती. यावेळी वहिवाटदार ज्ञानेश्वर काळू यांनी राजे भोसले यांना संस्थानची संपूर्ण माहिती दिली.  याप्रसंगी भोसले यांनी आपण संपूर्ण परिवारासह वाशीमच्या बालाजीच्या दर्शनाकरीता येणार असल्याचे स्पष्ट  केले. 

शिर्डी संस्थानकडून दिशाभूल झाल्याचा आरोप


           (कलिदास अंसन्तोजी)
अहमदनगर - साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याला आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिला असूनही संस्थान विश्‍वस्त मंडळ काही निर्णय घ्यायला तयार नाही. केवळ कागदाचा खेळ करून विश्‍वस्त मंडळ धूळफेक करत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. समाधी शताब्दी सोहळ्याचे नियोजन संस्थानने काय केले याचा खुलासाही संस्थान अद्याप करू शकलेनाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष उफाळून आला आहे.

कोर्टाच्या आदेशानुसार साईसंस्थानवर त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीकडून कोणत्याही प्रकारे कामे झाली नाही. साईभक्‍तांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून न देता फक्‍त टाईमपास केल्याने शिर्डी विकासापासून वीस वर्षे मागे गेली, असे ग्रामस्थांचे मत आहे.

गेल्या वर्षी सरकारने डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेत नवीन विश्‍वस्त मंडळ साईसंस्थानवर नेमले. परंतु वर्षाचा कालावधी लोटूनही फक्‍त घोषणाबाजी करण्यातच या विश्‍वस्त मंडळाचा वेळ गेला आहे. ग्रामस्थांनी संस्थान प्रशासन आणि विश्‍वस्तांना वेळोवेळी भेटून निवेदने दिली आहेत. साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचे जागतिक पातळीवर नियोजन करून भाविकांसाठी शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

समाधी शताब्दी वर्षाची प्रसिध्दी करण्यासाठी अमिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध राज्यातील कलाकारांना नेमण्याची शिर्डी ग्रामस्थांची मागणी अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही.साईसमाधी शताब्दी निमित्त भाविकांसाठी दर्शनबारी, पायाभूत सुविधा आतापर्यंत निर्माण होणेगरजेचे होते. पण अद्यापपर्यंत या कामाला मुहूर्तच लागलेला नाही. स्वागत कमानी, चौकांचे सुशोभिकरण, प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, हॉस्पिटलसाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या नेमणुका, रस्त्यांची निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय, लेझर शोप्रकल्प, गार्डन हेप्रकल्प पूर्णकरण्याची शिर्डी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झालेली नाही.

आता अवघ्या नव्वद दिवसांवर साईसमाधी शताब्दी सोहळा येवून ठेपला असतानाही विश्‍वस्त आणि प्रशासन काही करायला तयार नाही. संस्थान काय कामे करणार याचा खुलासाही करायला तयार नसल्याने शिर्डी ग्रामस्थांमध्येप्रचंड संताप व्यक्‍त होत आहे.

कलिदास अनंतोजी
नांदेड़ 9921404070