तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 8 July 2017

लग्न लावून वर मंडळीला लुटणारी टोळीचा पडदाफाश...पाच जना विरुध्द गुन्हा दाखल

अरुणा शर्मा

पालम :- वधूच्या शोधात असलेल्या कुटुंबियांना गाठून लग्न लावून देत या कुटुंबियांना रुपयांना लुटणारया टोळीचा पर्दाफाश झाला असून पालम पोलीस ठाण्यात पाचजना विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींची संख्या कमी झाल्याचा फायदा उचलत दलाली करण्याचा नवा धंदा या टोळीने सुरू केला होता. धुळे शहरातील देवीदास कॉलनीतील शिवाजी पुणा बडगुजर वय 50 वर्ष याचा मुलगा उमेश शिवाजी बडगुजर वय 28 वर्ष असून तो अपंग आसल्यामुळे उमेश यास लग्नकरीता मुलगी मिळत नव्हती. म्हणुन शिवाजी बडगुजर हे मुलाचे लग्न करण्यासाठी मुलगी पाहत होते. त्या वेळेस चुलत मेव्हणाच्या सुनाने सांगीतले कि चिंता करुनका तुमच्या मुलासाठी आमच्या गावाकडे मुलगी पाहते तेथे भरपूर मुली आहे असे सांगीतले. व लगेच काही दिवसाने सांगीतले की तुमच्या मुला करीता मुलगी मिळाली ती मुलगी सातेगाव ता.पालम येथील आहे. पण त्या साठी 100000/- रू. दागीने व इतर लग्नाचा खर्च करावा लागेल. कारण होणारी नवरी हिची घरची परीस्थीती गरीबीची आहे असे सांगितले. मुलाचे वडील तयार झाले. त्यावरून त्याचा मोठा मुलगा (नवरदेव), नवरदेवाची आई, मेव्हण्याची सुन, व तीचा पती, नवरदेवाचे मामा असे सर्व दिनांक 6 जुन रोजी सातेगाव येथे सकाळी 8 वाजता आले. तेथे मदन गिरी रा. सातेगाव व नांदेड येथील राहुल बंडु ढवळे रा. नांदेड यांनी एक मुलगी नामे संगीता खंडोजी काळे या मुलीस घेऊन येऊन मदन गिरी यांनी सांगीतले की हि मुलगी माझी आहे. ती लग्नास पात्र आहे. त्यानंतर त्यांनी लग्नाच्या आगोदर नवरदेवाच्या वडीला कडुन 100000/- रूपये घेऊन नंतर मदन गिरी यांच्या घरामध्ये त्याच्या मुलगा उमेश याच्या सोबत संगीता हीचे लग्न लावुन दिले. लग्न झाल्या नंतर नवरीला सोबत घेऊन ते आपल्या गावाकडे केले. व गेल्या नंतर दोन दिवसानी राहुल ढवळे व आत्या सुनीता जाधव हे दोघे त्या नवरीला घेण्यासाठी केले असता तेव्हा त्या नवरदेवाच्या वडिलांनी आताच पाठविणार नाहीत. मघ ते दोघे परत केले. त्याच नंतर चार ते पाच दिवसाने नवरी घरात कोनालाही न सांगता निघुन गेली. त्यामुळे तिचा शोध घेण्याकरीता धुळे येथील शिवसेनेच्या महानगराध्यक्ष हेमलता विजय हेमाडे, उज्ज्वला काटकर, प्रतिभा सोनवणे, यशवंत काटकर यांना हा प्रकार माहीती झाल्या नंतर त्यांनी नांदेड येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, शरद पवार यांना माहीती दिली.  व हे सर्वजन सातेगाव येथे दिनांक 5 जुलै रोजी मदन गीरी याच्या घरी आले. तेव्हा त्याच्या घरात दोन ते तीन मुली होत्या व राहुल ढवळे, सुनीता जाधव, उत्तम कदम हे होते. तेव्हा त्यांना विचार पुस केली कि नवरी संगीता कोठे आहे. तेव्हा मदन गीरी यांनी त्यांना सांगीतले कि तिचे दुसरया सोबत लग्न करून दिले आहे. व आमच्या कडे तीन मुली आहेत. त्यापैकी एका मुली सोबत परत लग्न लावुन देतो परत 100000/- रूपये दया हा आमचा व्यावसाय आहे. व तुम्ही कोनाला कळवीले तर जिव मारण्याची धमकी दिली. तेव्हा केलेल्या मंडळी ने या प्रकाराची गावात विचार पुस केली आसता त्यांना समजले की हे सर्वजन मिळून ज्या मुलांच्या लग्न करीता मुलगी मिळत नाही अशा मुलांचा शोध घेवुन लग्न करीता नवरदेव पार्टीकडुन रक्कम घेवुन विशासघात करून ठकबाजी करून फसवनुक केली जाते अशा प्रकारे बरेच लोकांची फसवणुक केल्याचे समजले त्याच वरून तेव्हा शिवसैनिकांनी दोघांनाही चांगलाच चोप देऊन पालम पोलीसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी शिवाजी पुणा बडगुजर यांच्या फिर्यादीवरून आरोपी मदन गिरी सातेगाव, राहुल बंडू ढवळे नांदेड, सुनीता राजु जाधव, उत्तम कदम, संगीताबाई या पाचजना विरूध्द पोलीस स्टेशन पालम येथे  गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपी विरूध्द कलम 420, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक 6 जुलै रोजी आरोपी मदन गिरी व राहुल ढवळे यांना न्यायालय समोर उभे केले असता त्यांना 10 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पो.नि. महेश शर्मा याच्या मार्गदर्शना खाली बिट जमादार एन.यू. राठोड हे तपास करीत आहे.

बदलत्या जगाच्या बदल प्रक्रियेचा स्वीकार पालकांनी करायला हवा! -मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर

जिंतूर: 
          जग झपाटय़ाने बदलत चालले आहे. बदलत्या जगाच्या बदल प्रक्रियेचा स्वीकार आजच्या पालकांनी करायला हवा. आजच्या मुलांना असंख्य प्रश्न पडत आहेत. या प्रश्नांची उत्तरे पालक शिक्षकांना द्यावी लागणार आहेत. त्यासाठी पालकांनी मुलांशी चर्चा करायला हवी. मुलांशी चर्चा म्हणजे मुलांपुढे पत्करलेली शरणागती नव्हे, तर समजूतदार पालकाने घेतलेला पुढाकार आहे, असे प्रतिपादन मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह येथे स्पार्टन आयोजित १० वीच्या मुलांसाठीच्या विशेष पालक सभेत ते बोलत होते, कार्यक्रम अध्यक्षस्थानी जेष्ठ नाटककार ज्योतिराम भोसले उपस्थित होते.

       येथील स्पार्टन व क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृह तर्फे आयोजित  ‘१०वीच्या मुलांशी कसे वागाल?’ या विषयावर पालकांसाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उपेंद्र दुधगावकर म्हणाले, तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे पालकत्व आणि आजचे पालकत्व यात भरपूर फरक आहे. आजच्या मुलांना समजून घेताना पालकांना अनेक क्षेत्रांवर काम करावे लागणार आहे. आम्ही आमच्या मुलांची जबाबदारी आयुष्यभर घेणार, या पालकांच्या वृत्तीत आजही फरक पडलेला दिसत नाही. आजची मुले बहुपदरी विचार करतात. या मुलांमध्ये अनेकाग्रता दिसून येते. पालकांना मुलांमधील एकाग्रता व अनेकाग्रता यामधील समतोल साधता आला पाहिजे.

      ते म्हणाले, सध्या माणसासमोरची उद्दिष्टे, पर्याय वाढत चालले आहेत. माणसाच्या महत्वाकांक्षा वाढत चालल्याने व्यक्तिवाद अस्तित्वात आला आहे. मला पुढे जायचे आहे ही भावना आजच्या पिढीत दिसून येते. समविचारी माणसे आज एकत्र येत आहेत. यातूनच घरच्या कुटुंबाच्या बाहेर एक वेगळं कुटुंब अस्तित्वात येत आहे. आजच्या पालकांनी मुलांना या व्यापक कुटुंबात आणणे गरजेचे आहे. मुलांना ज्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी पालकांनी मुलांशी चर्चा करणे गरजेचे आहे. परंतु मुलांशी चर्चा करण्याच्या प्रयत्नात पालकांचे मुलांशी इगो युद्ध सुरू होते. ते पालकांनी टाळणे गरजेचे आहे. छोटय़ा-छोटय़ा गोष्टीतील निर्णय घेताना, त्यात मुलांना पालकांनी सामील करून घेणे गरजेचे आहे.

      उपेंद्र दुधगावकर म्हणाले, कोणतेही पालक दोन पिढींची नेहमी तुलना करतात. आजची पिढी आमच्यासारखी नाही ती चंचल आहे, हे वाक्य अनेक पालकांच्या तोंडी असते. पण याच पिढीचे प्रतिनिधीत्व
करणा-या अनेक तरुण-तरुणी आज कला, साहित्य, संगीत, चित्रपट यासह अनेक क्षेत्रात आपले नाव कमावत आहेत. त्यामुळे नवीन पिढीविषयीचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.  जिंतूर शहर तथा परिसरातील १० वीच्या पालकांनी या पालक सभेत यशस्वी सहभाग नोंदवला.

दुधना नदी पात्रात उडी घेऊन वृधाची आत्महत्या 

आशिष धुमाळ
परतुर 

तालुक्यातील रोहिणा येथील दुधना नदी पात्राच्या पूलावरून मंठा तालुक्यातील खवणे देहगाव येथील रामराव गोविंद जोशी वय 90 वर्ष यांनी दिनांक 8 जुलै शनिवार रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान पुला वरून नदी पात्राच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपविले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मुतदेह ताब्यात घेत परतुर येथील ग्रामीण रूग्णालयात आणले व त्याचे शेवविच्छेदन करून मृतदेह देह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.जोशी यांचे आत्महतेचे कारण समजु शकले नाही केली.

श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्सव व वृक्षारोपण

महादेव हरणे
मालेगाव :-- तालुक्यातील मुंगळा येथे आज शनिवार 8 जुलै रोजी श्री हनुमान मंदिर सभागृहात श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे गत 2 वर्षापासून शैलेंद्र वानखडे व सौ. वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी राऊत, ज्ञानेश्वरी राऊत व किशोर राऊत हे श्री स्वामी समर्थ केंद्र अखंड पणे सुरु आहे. श्री स्वामी समर्थ केंद्र हे स्थानीक हनुमान मंदिर सभागृहात आहे. केंद्रामध्ये गत 2 वर्षापासून सेवेकर्याच्या माध्यमातून भक्ताचे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक समस्या विनामूल्य सोडविण्याचे काम अव्यातपणे सुरू आहे. तसेच वर्षभरात अनेक धार्मिक, सामाजिक कार्यकम राबविण्यात येतात. त्यामध्ये गुरूपौर्णिमा उत्सव या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले जाते.
आज सकाळी 8 वाजता पासुनच श्री हनुमान मंदिर सभागृहातच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर व सभागृहात आकर्षक भव्य रांगोळी काढली व सजावट केली होती. सकाळी 9 वाजता भुपाळी, आरती, रूद्राभिषेक नंतर 10:30 वाजता नैवेद्य आरती व गुरू पद स्वीकारण्याचा शपध विधी कार्यक्रम, स्वामी चरित्र पारायण व नाम जप घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या 4  कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत वृक्ष लागवड महोत्सवानिमीत्त श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या पुढाकाराने श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने उपस्थित महिला मंडळी व युवतीच्या हस्ते औदुंबर वृक्ष लावुन वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वैष्णवी राऊत, ज्ञानेश्वरी राऊत, प्रतिक्षा राऊत, शारदा राऊत, मंगल लाव्होरे, वैशाली राऊत, ऋतुजा हमाने,  निता घुगे, शैला पाठक, रेश्मा राऊत, गिता राऊत, रेखा राऊत, नंदा गायकवाड, कौशल्या राऊत, पुजा दळवी, अर्चना चांडे, रूपाली भांदुर्गे, नम्रता मोरे, पुष्पा घुगे आदी महिला वर्गाची उपस्थिती होती. श्री स्वामी समर्थ केंद्र अखंड पणे सुरू राहावे यासाठी पांडुरंग राऊत हे सतत परिश्रम घेतात.

महादेव हरणे
9922224889

एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमास सुरूवात


सोनपेठ / प्रा. डॉ. संतोष रणखांब येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबवण्यात येतो, या शैक्षणिक  वर्षाच्या उपक्रमास प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांच्या हस्ते सुरूवात झाली आहे.
पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या वतीने एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबवण्यात येतो, या उपक्रमास आज प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते यांच्या हस्ते सुरूवात   करण्यात आली. यावेळी बी. एस्सी. द्वितीय वर्षाच्या 27 विद्यार्थ्यांना वड,  पिंपळ, मोहगणी, करंजी व उंबर इ. वृक्षांचे वाटप करण्यात आले असून वर्षा अखेर त्याचा अहवाल घेण्यात येतो,  मागील वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 320 वृक्षांपैकी 297 वृक्षांचे संगोपन करण्यात यश मिळाले असल्याचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख मुकुंदराज पाटील यांनी सांगितले.
यावेळी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.  एम. डी.  कच्छवे, प्रा.  व्ही. एस. मुलगीर, प्रा. जगदीश भोसले, संतुक परळकर, चंद्रपाल पटके यांच्यासह प्राध्यापक,  शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सानप

गेवराई, दि. 8 ( प्रतिनिधी ) साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 97 व्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवानेते बाळासाहेब सानप यांची निवड करण्यात आली आहे.
      शुक्रवार, दि. 7 रोजी गेवराई येथील नगर परिषद सभागृहात ओबीसी सेलचे अध्यक्ष दादासाहेब घोडके यांच्या अध्यक्षतेखाली व न. प. उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभूवनकर, माजी नगराध्यक्ष विनोद सौंदरमल, सभापती राहुल खंडागळे, याहिया पठाण, सभापती गायकवाड, नगरसेवक धम्मपाल सौंदरमल, माजी नगरसेवक एजाज, मुन्ना शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली. सदरील बैठकीचे आयोजन जयंती उत्सव समितीचे समन्वयक युवा कार्यकर्ते रजनी सुतार यांनी केले होते. निवडण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून बाळासाहेब सानप, उपाध्यक्ष बब्बु बारूदवाले, धम्मा भोले, सचिव शेख मन्सूर, मोसीन शेख, कोषाध्यक्ष धम्मपाल कांडेकर, कार्याध्यक्ष विनोद सौंदरमल यांची निवड करण्यात आली आहे.
      यावेळी नगरसेवक मंजुर बागवान, नगरसेवक धम्मपाल सौंदरमल, विलास सुतार, राजेंद्र डी. सुतार, शरद मोटे, बंडू नाना पवळे, आण्णासाहेब राठोड, जुनेद बागवान, सुनिल सुतार, दिपक सुतार, नवनाथ सुतार, अमोल कारके, विशाल थोरात, गणेश सुतार, मंगेश नाडे, पांडू वाव्हळ, राम सुतार, विकास सुतार, पप्पू कांबळे, सुमेद भोले, विकास कारके, विजय सोळुंके, विशाल आरे, विशाल पांजगे, गजानन हातागळे, प्रदीप सुतार, जितेश रोकडे, शेख खाजा, राजन सुतार, अमोल सुतार, प्रकाश साळवे, विजय सुतार, नितीन साळवे, रंजीत शिंदे,गजानन हातागळे, बबलू सौंदरमल, सखाराम सौंदरमल, निलेश सुतार, विकास थोरात, रोहीत सराटे, मुरली सुतार, अमोल हातागळे, लक्ष्मण सोनवणे, बाबासाहेब सुतार, राम चक्रे, गणेश कांडेकर, किरण जाधव यांची उपस्थिती होती. या बैठकीचे सूत्रसंचलन राघव वाव्हळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार मानवी हक्क अभियानचे दिपक सुतार यांनी मानले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

दलीतवस्तीच्या निधीचा दुरुपयोग करुन निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविणार्‍याविरुध्द कारवाई कराः चांभई येथील गावकर्‍याची मागणीः गटविकास अधिकारी यांना निवेदन


फुलचंद भगत
  मंगरुळपीरः तालुक्यातील चांभई येथील दलीतवस्तीमधील रस्ता दलीत वस्तीत न बांधता ईतर ठीकाणी बनविण्यात आला असुन तो रस्ता पुर्णता निकृष्ट दर्जाचा केला आहे या रस्त्याचे बांधकाम करणार्‍यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चांभई येथील ग्रामस्थानी दि 8 रोजी दिलेल्या निवेदनातुन केली आहे                                                चांभई येथील वार्ड क्र 1 मधील दुर्गादेवी मंदीरापासुन ते अरुण फुके याच्या प्लाॅटपर्यतचा रस्ता हा दलीत वस्तीच्या निधीतुन बनविण्यात आला आहे या संपुर्ण रस्त्यालगत एकाही दलीताचे घर नाही कींवा प्लाॅट नाही त्यामुळे ग्रामपंचायत त्यामूळे ग्रामपंचायतने निधीचा गैरवापर करुन शासनाची दिशाभूल केली आहे तसेच कंञाटदाराने ग्रामपंचायत सोबत संगनमत करुन अंत्यत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे.याठिकाणी रोडची कोणती दबाई आणी लेवल  न करता व लोखंडी गजाचा वापर न करता शासकीय निधीचा गैरवापर करुन फसवणूक केली आहे.या बोगस कामाची त्वरीत चौकशी करुन सबंधित दोषींवर योग्य कारवाई करावी व तोपर्यत सदर कामाचे देयक काढू नये अशा मागणीचे लेखी निवेदन गटविकास अधिकारी यांना प्रितम भगत आणी अरुण फुके यांनी दिले आहे.

फुलचंद भगत
9763007835

पाथरी शहरा सभोवताली हजारो ब्रॉस वाळूचा अवैद्य साठा

आ मोहन फड यांनी केली होती धक्का बंद करण्या साठी तक्रार

विभागीय पथकाकडून इटीएस मोजनी करण्याची मागणी

पाथरी/प्रतिनिधी:-मरडसगाव येथिल वाळू धक्क्या वरून चाळीस,चाळीस फुट खोल खड्डे करून बेसुमार वाळू उपसा करून या ठिकाणची वाळू आता प्रशासनाशी लगट करून पाथरी शहर आणि पोखर्णी मार्गा लगतच्या मदशाच्या पश्चिम बाजूला हजारो ब्रॉस वाळूचे साठे वेगवेगळे टाकल्याचे पाहावयास मिळत आहे.
गोदावरी नदीवर तीन ठिकाणी दिल्या गेलेल्या ठेक्यावर शासनाने ठरऊन दिलेल्या निकशा प्रमाणे खोली घेऊन वाळू रेती उचलने अपेक्षीत आहे मात्र हे सर्व निकष महसुल विभागाशी साटे लोटे करत पायदळी तुडवले गेले असल्याचे एटीएस मोजनी आणि प्रत्यक्षातील गोदावरी नदी पात्रातील पोकलेन मशीनच्या साह्याने होत असलेली रेती उपसा पाहिल्या नंतर लक्षात येेते त्या मुळे यात मोठी साशंकता असल्याचे रेती तस्कर करत असलेल्या अनेक ठिकाणच्या अवैद्य रेती साठ्या वरुन लक्षात येत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने आता रेतीचे भाव दाम दुप्पट झाले आहेत शासनाने ठरऊन दिलेला कोठा केव्हाच संपला आहे. या विरोधात नागरीक आणि पाथरी विधानसभा मतदार संघाचे सत्ताधारी भाजपाचे आ मोहनराव फड यांनी ही १२जुन रोजी जिल्हा अधिका-यांना तक्रार देऊन मरडसगाव येथिल वाळूचा ठेका बंद केल्या नंतर ही ठेकेदार नजीबऊद्दीन हबीबुद्दीन यांनी खोटी माहीती देऊन या ठेक्यातील ११०० ब्रॉस वाळू शिल्लक आहे असे पाथरीच्या महसुल प्रशासनाला हाताशी धरत दरशवले होते प्रत्यक्षात ९ शे ते हजार ब्रॉस वाळू ही दरदिवशी पोकलेन मशीनच्या साह्याने उपसा करून शेकडो हायवा ट्रक व्दारे वाहतून करून बेसुमार वाळू उपसा केला आहे. त्या मुळे गोदापात्रात मोठमोठे खड्डे पडले अाहेत या मुळे पर्यावरणाचे नुकसान तर होत आहेच पण शासनाचा महसुल ही बुडत असल्याचे आ फड यांनी जिल्हाअधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते. मरडसगाव वाळू धक्याची चौकशी तरून दोशीवर कार्यवाही करावी असे निवेदन दिल्या नंतर ही कुठलीच कार्यवाही झालेली दिसून आली नाही. ज्या माजलगाव येथील ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला आहे त्याने अडीच महिण्या नंतर त्याच भावाला म्हणजे ५६ लक्ष रुपयांना हा ठेका पाथरीच्या नगरसेवकाला विक्री केला आहे. या ठिकाणी भुमिअभिलेख कार्यालया कडून इटीएस मोजनी होत असते यात ठेकेदाराचे हित जोपासत वरिष्ठांना अहवाल सादर केल्या जातो.मरडसगाव येथील धक्यावर प्रत्यक्ष पाहाणी केल्यास प्रचंड मोठे खड्डे पडलेले दिसून येतात त्या मुळे प्रत्यक्ष मोजनी आणि पात्रातील खड्डे पाहिल्यास मोठी शाशंकता दिसुन येते.या तस्करांनी आता पाथरी शहरातील तहसीलदार राहात असलेल्या घराच्या आजू बाजूला ही छोटे छोटे वाळू साठे करून शेकडो ब्रास वाळू साठवली आहे असे नागरीक सांगतात या भागात बांधकामे होत असल्याने कोणाला शंका येणार नाही हा या मागचा उद्देश असावा तर पोखर्णी कडे जाणा-या रस्त्या लगत असलेल्या मदरसाच्या पश्चिम बाजुला हजारो ब्रास वाळूचा साठा केलेला दिसुन येतो या वरुन गोदावरी नदी पात्रात काय अवस्था असेल हे लक्षात येते.पाथरीचा महसुल विभाग सामान्यांची कामे करण्या पेक्षा वाळूतस्कर ,रॉकेल , राशन माफिये यांचे हीत जोपासत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे. या मुळेच आ बाबाजानी दुर्रांनी यांनी पाथरीचे तहसीलदार वासूदेव शिंदे हे सर्वसामान्यांची कामे करत नसल्याने अशा अकार्यक्षम तहसीलदारांची बदली करण्याचे निवेदन २७ मार्च २०१७ रोजी परभणी जिल्हाअधिका-यांना दिले होते. त्या मुळे आता या विषयी विभागीय पथकाने गोदापात्रातील खड्यांचे मोज माप करून दुध का दुध पाणी का पाणी केल्यास यातील खरे सत्य समोर येणार आहे.
★प्रशासन आणि वाळू माफियांची मिलीभगत-प्रभाकर काळे
मरडसगाव येथिल धक्क्या वरील वाळूची ठेकेदाराने निकश डावलून उपसा केल्याने चाळीस फुटा पर्यंत पात्रात खड्डे केले आहेत. या विषयी विचारणा केल्यास संबंधीता कडून धमक्या मिळतात पात्रात पडलेल्या खड्यां मुळे ग्रामस्थांच्या जिवितास भविष्यात धोका आहे. या ठिकाणी ठरऊन दिलेला वाळूचा कोठा केव्हाच संपला असून दिवस रात्र होणा-या शेकडो वाळूंच्या हायवा वाहनां मुळे रस्त्याची पुरती वाट लागली असून मरडसगाव- गोपेगाव डांबरी रस्ता चार फुट खोल गेला आहे. या सर्व प्रकारास पाथरीचा महसुल विभाग जबाबदार असुन तहसीलदारां सह, मंडळ अधिकारी, तलाठी आणि ठेकेदार यांची मिलीभगत असून हा ठेका तात्काळ बंद करावा आणि विभागिय इटीएस पथका कडून मोजनी करून दोषीं वर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी मरडसगाव येथिल ग्रामस्थ प्रभाकर काळे यांनी केली आहे.

लातूरचे जिल्हाधिकारी ठरले आजीबाईंसाठी ‘श्रावणबाळ’..!


_________________________

लातूर = एखाद्या सिनेमात शोभावा असा प्रसंग लातुरात एका आजीबाईंना अनुभवयास मिळाला. एकुलता एक मुलगा सांभाळत नसलेल्या या आजीबाईंना लातूर-उदगीर रस्त्यात ‘श्रावणबाळ’ भेटला. तो ‘श्रावणबाळ’ दुसरा-तिसरा कुणी नसून लातूरचे जिल्हाधिकारी ‘जी.श्रीकांत’ हे होय.
6 जुलैचा प्रसंग. जळकोट तालुक्यातीलधोंडवाडीत राहणाऱ्या आपल्या लेकीला भेटून आजीबाई आपल्या घरी म्हणजे उदगीर तालुक्यातील अंजनासोंडा पाटीवर गावी परतत होत्या. लेकीच्या घरातून निघाल्यावर त्या रस्त्यात गाडीची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी एका गाडीला आजीबाईंनी हात दाखवून थांबवलं. प्रवासी कार समजून आजीबाई कारमध्ये बसल्या आणि एका अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात झाली. मुळात आजीबाई घरी पोहोचेपर्यंत त्यांच्यासाठी यात ‘अविश्वसनीय’ असं काहीच नव्हतं. कारण त्यांच्या समजुती प्रमाणे त्या एका ‘प्रवासी कार’मध्ये बसल्या होत्या. आपण नक्की कुणाच्या गाडीत बसलो आहोत, याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.ज्या व्यक्तीच्या गाडीत आजीबाई बसल्या होत्या, त्या गाडीतील सूट-बुटातील एका व्यक्तीने आजीबाईंची विचारपूस केली. अत्यंत आस्थेने सारी चौकशी केली. त्यानंतर गाडीतल्या त्या व्यक्तीला आजीबाईंची सारी माहिती कळली.आजीबाईंचा एकुलता एक मुलगा त्यांना सांभाळत नाही. त्यामुळे घरची स्थिती हालाखीची. मुलीचाच काय तो आजीबाईंना आधार होता. अशी एकंदरीत हृदयद्रावक कथा आजीबाईची होती.आपलं खाच-खळग्याचं जगणं सांगत आजीबाई आणि त्या कार मधील व्यक्तीचा प्रवास आजीबाईंच्या गावापर्यंत येऊन ठेपला. आजीबाई उतरल्या आणि घरी गेल्या.
त्याच वेळी तिकडे प्रशासनात वेगवान हालचाली सुरु झाल्या. या प्रसंगाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी आजीबाईंच्या घरी तलाठी येऊन धडकले. त्यांनी ‘श्रावणबाळ’ योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रं आजीबाईंकडून जमा केले आणि लवकरच अनुदान सुरु होण्याचा विश्वास दिला. त्यावेळी तलाठ्यांनीच आजीबाईंना सांगितलं की, काल ज्यांच्या सोबत तुम्ही प्रवास केलात, ते दुसरे-तिसरेकुणी नसून, लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत होते.आजीबाईंना स्वत:चे अश्रू अनावर झाले. एकुलता एक मुलगा सांभाळत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या रुपाने देवाने आपल्यासाठी दुसरा मुलगा पाठवून दिल्याच्या भावना आजीबाईंनी भरल्या डोळ्यांनी व्यक्त केल्या.जी. श्रीकांत हे लातूर मध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्याआधी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि संवेदनशील माणूस म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या याच गुणांचा अनुभव पुन्हा एकदा पाहावयास मिळाला.

मंगरुळपीर येथे जाॅयफुल लर्नरचे ऊद्घाटन


फुलचंद भगत
मंगरुळपीर-शहरातील बाबरे ले आऊटमध्ये दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते जाॅयफुल लर्नर्सचे ऊद्घाटन सोहळा पार पडला.
या ऊद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र पाटणी तर प्रमूख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा डाॅ.गझाला यास्मीन मारुफ खान,लाॅ.वसंतराव धाडवे,नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे,अनिल गावंडे,सचिन पवार,तसेच श्याम खोडे आदी मान्यवरांची ऊपस्थीती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेचे ऊद्घाटन करन्यात आले.तद्नंतर ऊपस्थीत  महिलांना साडी वाटप करन्यात आले.यावेळी जाॅयफुल लर्नर्स स्कुलचे महत्व विशद करतांना चंचल खिराडे म्हणाल्या,या धावपळीच्या युगामध्ये चिमूकल्या मूलांवर दडपण लादनारे शिक्षण व घोघपंट्टीमुळे नकोसे वाटत असलेल्या शिक्षणातुन दुर काढून आनंददायीपणाने शिक्षण देवुन शिक्षणात रस वाटावा या ऊद्देशाने या शाळेची निर्मीती केली आहे.या कार्यक्रमाचे संचलन प्रविण धाडवे तर आभार कल्याणी व्यवहारे यांनी मानले.या शाळा ऊद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रशांत धाडवे,सत्यपाल चक्रे,संगिता निकम,निता भगत,स्नेहा हिवरकर,विद्या काकडे,रिना गायकवाड,आरती इंगळे,शितल इंगळे या शाळेतील शिक्षिका व कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला.

फुलचं भगत
9763007835

🖌ऋतु चक्राच्या बदलामुळे मानवी


महेंद्र महाजन  जैन रिसोड रिसोड
८ जुलै
      महाराष्ट्रात गेल्या दोन तीन वर्षामध्ये अतिवृष्टी पुर तर खुपच कमी पाऊस यांनी शेतकऱ्याचे अतिशय नुकसान झालेले आहे.शेतकऱ्याला त्याच्या या दुष्काळग्रस्थ परिस्थीतीमध्ये सरकार खेरीज अन्य यञंणा मदतीसाठी नाही त्यामुळे सरकारवर मोठीच जबाबदारी पडते.पंरतु फार मोठी चर्चा विविध आंदोलने झाल्याशिवाय सरकार मदत करीत नाही.मदत जाहीर झाली तरी ती गरजेच्या व नुकसानीच्या मानाने अतिशय तुटपुंजी असते.त्यातही काही अधिकारी शेतकऱ्यानां मिळालेली मदत वेळेवर देत नाही.मदतीच्या कार्यक्रमातही शेतकऱ्याकडुन पैसे काढणारे अधिकारी सुध्दा खुप आहेत.
            गेल्या दोन तीन वर्षापासुन जी दुष्काळग्रस्थ परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला मानवच जबाबदार आहे.
पुर्वीचा निसर्गाकडे पाहण्याचा व आताचा मानवाचा स्वभावच बदललेला आहे.दुष्काळग्रस्थ परिस्थितीचे कारण म्हणजे भयंकर वृक्षतोड झाली आहे.जगंलेच्या जगंले मानवाने नष्ट केले आहेत.मानव आपल्या वैयक्तिक स्वार्थापायी जगंल तोड करत आहे.भयंकर जगंल तोडीने आज डोगंरही ओस पडले आहे.डोगंरावर दगडमाती शिवाय काहीही शिल्लक राहीले नाही.
        आज पृथ्वीवरील नैसर्गिक बदलामुळे सतत नैसर्गिक सकंटानां तोंड द्यावे लागत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे आपण पर्यावरणाकडे केलेले दुर्लक्ष,प्रचंड वृक्षतोड,पाण्याचा अमर्याद उपसा,जल,वायु,ध्वनी यांचे प्रदुषण तर पर्यावरणाला घातकच आहे.विज्ञानाच्या युगामध्ये मानवासाठी कितीही सुधारणा झाल्या तरी निसर्गाचा समतोल राखला नाही तर त्याचा  विपरीत परिणाम होणारच आपल्या जीवनातील निसर्गाचे अन्यनसाधारण महत्व मानव विसरला आहे.त्यामुळे दुष्काळ,अतिवृष्टी अशा अनेक सकंटानां त्याला सामोरे जावे लागत आहे.ही संकटे परतवुन लावायची असेल तर निसर्ग वाचवणे काळाची गरज आहे.निसर्गाशिवाय मनुष्य आपली प्रगती करुच शकत नाही.हे अनेक वेळा निसर्गाने सिध्द करुन दाखवले आहे.पावसाने थोडीही दांडी मारली तरी शेतकऱ्याच्या संपूर्ण हंगामाची मेहनत वाया जाते.त्याचा परिणाम सर्वच जीवसृष्टीवर पडल्याशिवाय राहात नाही त्यामुळे मानवाला आजच निसर्गाचा विचार करावा लागणार आहे.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आजच प्रयत्न करणे अत्यंत जरूरीचे आहे.जग आज वेगाने बदलत आहे.झाडांच्या जगंलाऐवजी सिमेटची जगंले वाढत आहे.त्याचा परिणाम आज समोर येऊ लागला आहे.आज ऋतुचक्राचे बदलते स्वरुप पहावयास मिळते आहे.
           आज मानवाने निसर्गाचे वेळीच महत्व समजुन घ्यायला पाहीजे.निसर्गाचा विचार करुन प्रदुषण रोखणे सोपे आहे.अनेक उपायातुन आपण निसर्गाचे संतुलन राखु शकतो.झाडे तोडु नये,साडंपाणी कचरा यांची विल्हेवाट लावावी.नाइलाजाने एखादे झाड तोडावे लागले तरी नंतर लगेच नविन झाड लावुन त्याचे जतन करावे.पण मानव आज हे करण्यास तयार आहे का? मानव आज मतलबी झाला आहे.त्याला सुखात राहायचे आहे व हे सुख त्याला निसर्गाकडुन विनातक्रार पाहीजे.तो निसर्गाला काही देणार नाही मात्र निसर्गाकडुन पाहीजे ते हिसकावुन घेणार हे कुठे तरी थांबले पाहीजे आज ना उद्या हे थांबवावे लागणार आहे.
                 विकास पाहीजे पण तो निसर्गाला रोखुन नव्हे.आज जो ऋतु बदल दिसत आहे पावसाळ्यामध्ये उन्हाळा व हिवाळ्यामध्ये पावसाळा ,कधी अति पाऊस तर कधी पाऊसच नाही हे जे ऋतुचक्रातील बदल दिसत आहेत.ही निसर्गाने मानवाला येणाऱ्या धोक्याची सुचना दिलेली आहे.निसर्गाच्या कुशीतच मानव सुरक्षित आहे.तो निसर्गापासुन दुर जाऊन आपले जीवन जगुच शकत नाही.आदिम काळापासुन निसर्ग मानवाचा मित्र राहीला आहे.पुढेही तो तसाच राहण्यासाठी मानवाने आजच प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.
                    समाधन  गायवाड
                              
        !! झाडे लावा झाडे जगवा !!

महेंद्र महाजन जैन रिसोड 
9960292121