तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 15 July 2017

कृउबा उपसभापती विरोधात अविश्वास ठराव दाखल

प्रतिनिधी
पाथरी:-येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरुन उर्फ बाळासाहेब कोल्हे यांच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती अनिलराव नखाते,एकनाथराव शिंदे,माधवराव जोगदंड यांच्या सह १२ संचालकांनी परभणी येथील जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.
गत अडीच वर्षा पुर्वी झालेल्या निवडणुकीत राकाँला १८ पैकी पंधरा ठिकाणी विजय मिळाला होता तर आघाडीला तीन जागा मिळाल्या होत्या त्या नंतर सभापती उपसभापती निवडी नंतर काही दिवसात तत्कालीन उपसभापती इंगळे यांचे -हदय विकाराने निधन झाल्या नंतर अरून उर्फ बाळासाहेब कोल्हे यांची बाजार समितीच्या उप सभापती पदी निवड करण्यात आली होती.त्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत अरुन कोल्हे आणि लहू घांडगे यांना राकाँ उमेदवारा विरोधात प्रचार केल्याने त्यांची जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रांनी यांनी पक्षातून हाकाल पट्टी केली होती या नंतर या दोन संचालकांचे राजीनाम्या वरुन वाद मंत्रालया पर्यंत गेला या ठिकाणी या दोन संचालकांचे पद कायम ठेवण्यात आले होते. त्या नंतर आता सभापती अनिलराव नखाते यांच्या सह१२ संचालकांनी अरुन कोल्हे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या कडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.

भारताची वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धडक, न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय.


_________________________

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 186 धावांनी दणदणीत विजय मिळवला.भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव79  धावात संपुष्टात आला.  न्यूझीलंड विरुद्धचा हा सामना भारतासाठी 'करो या मरो' होता. राजेश्वरी गायकवाडने आठ षटकात 15 धावा देत न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. भारताने या विजयासह उपांत्यफेरी गाठली असून, उपांत्यफेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल.  न्यूझीलंडच्या सॅटरवेटचा (26) अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. डीबी शर्माने दोन, झुलन गोस्वामी, पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारताने कर्णधार मिथाली राजचे शानदार शतक (109) आणि वेदा कृष्णमुर्तीची स्फोटक फलंदाजी (70) यांच्या बळावर न्यूझीलंडला विजयासाठी 266 धावांचे लक्ष्य दिले होते.या महत्वाच्या सामन्यात एस.मनधाना (13) आणि पूनम राऊत (4) यांची सलामीची जोडी अपयशी ठरली. त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार मिथाली राजने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत एच. कौरच्या साथीने तिस-या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली. कौरने अर्धशतक फटकावताना (60) धावा केल्या. कौर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या डीबी शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या वेदा कृष्णमुर्तीने स्फोटक फलंदाजी केली. 45 चेंडूत (70) धावा फटकावल्या. तिच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
मिथालीसह तिने पाचव्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली. वर्ल्डकप मध्ये खो-याने धावा काढणा-या मिथाली राजने 123 चेंडूत (109) धावांची शतकी खेळी केली. तिने 11 चौकार लगावले.सलग दोन पराभवांमुळे खचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघापुढे महिला विश्वचषक क्रिकेटची उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज शनिवारी न्यूझीलंडवर विजय नोंदविण्याचे आव्हान होते. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या भारतालाउपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार होता. पाठोपाठ चार विजय नोंदविल्यानंतर द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. इंग्लंड, द. आफ्रिका तसेच गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.

आज मालेगावात शिबीर, रुग्णांनी लाभ घ्यावा -देविदास खराद

सुभाष मुळे...
-----------
गेवराई, दि. 16 __ संत एकनाथ आयुर्वेदिक रुग्णालय शेवगाव व ग्रामपंचायत मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच देविदास खराद यांनी केले आहे.
        गेवराई तालुक्यातील मालेगाव येथील
जिल्हा परिषद शाळेत रविवार, दि.16 जुलै 2017 रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या या उपक्रम अंतर्गत संत एकनाथ आयुर्वेदिक रुग्णालय शेवगाव व ग्रामपंचायत मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात विविध आजारावर तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन व उपचार करतील. शिबीरामध्ये तसेच संत एकनाथ आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णासाठी आवश्यक तपासणी व आयुर्वेदिक औषधे मोफत दिली जातील. दंतव्यंगोपचार, कॅन्सर व काही अवघड शस्त्रक्रियासाठी रुग्णांना सुसज्ज शस्त्रक्रियागृह व तज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध असलेल्या लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात पाठविण्यात येईल. त्यासाठी कार्यरत समाजसेवक मार्गदर्शन करतील. शिबीरात स्त्री रोग विभाग, बालरोग विभाग, कार्यचिकित्सा विभाग, शल्य विभाग, शालाक्य विभाग, पंचकर्म विभाग, दंतचिकित्सा विभाग, अर्धागवायु उपचार केन्द्र, फिजिओथेरपी उपचार केन्द्र या सर्व विभागाचे डाॅक्टर उपस्थितीत असणार आहेत.
      पंचक्रोशीतील गोरगरीब गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच देविदास खराद, शिवाजी अण्णा खराद, अण्णासाहेब गोरे व गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद.


_________________________

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात पाकिस्तानी सैन्याने शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेले लान्स नायक मोहम्मद नासीर यांचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. शनिवारी पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट आणि बालाकोट सेक्टर मध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीश मेहता यांनी दिली. पाकिस्तानने दुपारी 1.40 च्या सुमारास गोळीबार सुरु केला. छोटया स्वयंचलित शस्त्रांनी पाकिस्तानने भारतीय सैन्य चौक्यांना लक्ष्य केले.

सबसेतेज,तेेजन्यूज हेडलाईन्स

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

'चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा' आता 'महाराष्ट्र ओपन' होणार; पुण्यात बालेवाडी मध्ये होणार या स्पर्धेचे आयोजन.

औरंगाबादेत वीज चोरीचे रिमोट रॅकेट उघड; पंधराजण ताब्यात.

मीरा-भाईंदर महापालिकेसाठी 20 ऑगस्टला मतदान.

समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेणंअयोग्य : उद्धव ठाकरे

व्हिनस विलियम्सला नमवून स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझाने जिंकले विम्बल्डनच्या महिला एकेरीचे जेतेपद.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने पुढच्या पाच वर्षात 70 लाख नोक-या देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

नागपूर = नगर सेवकाच्या मानधनात वाढ,दरमहा 20 हजार मिळणार अगोदर 7500 मिळत होते.

महिला क्रिकेट विश्वचषक - भारताचे न्यूझीलंडला विजयासाठी दिले 266 धावांचे लक्ष्य, भारताच्या 7 बाद 265 धावा , न्यूझीलंड विरुद्घच्या सामन्यात भारताच्या मिथाली राजच नाबाद शतक.

राजौरी मध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद.

नागपुरातील गोमांसाच्या संशयावरुन एकाला मारहाण प्रकरण, फॉरेन्सिकच्या अहवालात गोमांस असल्याच निष्पन्न.

सोलापूर = अकलूज येथे 20 स्कूल बसवर आर टी ओ ची कारवाई, 50 हजाराचा दंड, 5 स्कूल बसचे परवाने 30 दिवसासाठी रद्द.

हिंगोली = कर्तव्यात कसूर केल्याने हिंगोली सज्जाचे तलाठी आर. डी. दराडेयांना उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडकर यांनी केले निलंबित.

यवतमाळच्या साई नगर पिपळगाव येथे घराच्या अंगणात उभी असलेली अॅक्टीवा स्कूटर बॅटरीचा स्फोट होऊन जळून खाक झाली.

पुणे = इंदू सरकार चित्रपटातील इंदिरा गांधी यांच्या जीवनातले आक्षेपार्ह प्रसंगाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने हॉटेल क्राऊन प्लाझा समोर तीव्र आंदोलन.

जम्मू काश्मीर = कुलगाम येथे दहशतवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला, ग्रेनेड हल्ला केला असून एक जवान जखमी.

नाशिक = घोटी-सिन्नर महामार्ग एक महिन्यासाठी बंद.

रत्नागिरी = चेतन शशीकांत मोहीते या व्यक्तीचा जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःच्या पोटात चाकू खुपसून आत्महत्येचा प्रयत्न. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल.

कल्याण = परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणींना फसविणाऱ्याला अटक. मोहम्मद खान असं आरोपीचं नाव. आरोपीकडून 26 पासपोर्ट आणि अनेक खोटी नियुक्ती पत्रं जप्त.

नवी दिल्ली = महिलांवरील बलात्कार वक्तव्या प्रकरणी रुपा गांगुली यांच्यावर गुन्हा दाखल.

दिल्ली मध्ये टाकी साफ करताना श्वास कोंडला गेल्याने चौघा स्वच्छता कामगारांचा मृत्यू.

परभणी शहरातील कारेगाव रोड परिसरातील दारुचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला़.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांशी तेजस्वी यादव यांच्याबद्दल बोलणं टाळलं. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं.

श्रीनगर = दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू.

मुंबई = रामनाथ कोविंद यांनी फोनवरून उद्धव ठाकरेंचेे मानले आभार. राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिल्याने मानले आभार.

लाल-लाल टमाट्याने पार केली हिरवी शंभरी ! पाऊस वेळेवर न आल्याचा परिणाम


जावेद खान
मोताळा:- तुम्हाला जर किलो भर लाल टमाटे घ्यायचे आहेत तर त्या साठी हिरवी शंभरी त्यावी लागेल अशी स्थिती सध्या भाजी बाजारात पाहायला मिळत आहे पाऊस लाबल्याने सर्वच भाजी पाल्याची आवक घसरली आहे त्यामुळे कोणतीही भाजी घ्यायची असल्यास प्रतिकिलो किमान 60 ते 80रु मोजावे लागत आहे मात्र टमाटे प्रति किलो 100 रु भावांने घ्यावे लागत असल्याने सामान्याची चांगलीच कोडी झाली आहे
         जिल्ह्यात बहुतांश शेती ही कोरडवाहु असल्याने व सिंचनाची सोय मोजकीच असल्याने मान्सुनच्या पाऊसावर खरीपात पेरणी व भाजी पाल्याचे उत्पादन निर्भय राहते मात्र जुन च्या पहिल्या आठवड्यात होणारे मॉन्सून चे आगमन अद्यपही न झाल्याने जिल्ह्यातील भाजी पाल्याचे उत्पादन घटले आहे
             त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमानात घसरली असुन आपल्या रोजच्या जेवनात टोमटो कोबी साभार या भाजीपाल्याची आवर्जुन गरज भासत असल्याने त्यांची मागणी सुद्धा अधिक असते गत आठवड्यापर्यत  टोमटो 40 ते 60 रूपये प्रमाणे मिळत होते परतुं रविवार पासुन त्यांची आवक 75 टक्कयानी  घसरली असल्यामुळे आता बुलढाणा जिल्हा वासियाना लाल टोमटो घेण्यासाठी प्रतिकिलो 100 रु मोजावे लागत आहे
------------------
भाजीपाला        दर(प्रती किलो)
सभार                 300रु
टोमटो                100 ते120 रु
फुलकोबी             80 ते 100 रु
पानकोबी             60 ते 80 रु
भेड़ी।                    50 ते 60 रु
ढेंमसे।                  60 ते 80 रु
गिल्की                  50 ते 60 रु

खासगी सुरक्षा व्यवस्था बाजारातही बाबा रामदेव.


_________________________

योगगुरू रामदेव बाबा यांनी ग्राहक वस्तू (एफएमसीजी) आणि आयुर्वेदिक उत्पादनाच्या व्यवसायाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न चालविला असून, आता 40 हजार कोटी रुपये उलाढाल असलेल्या खासगी सुरक्षा व्यवस्था बाजाराकडे लक्ष वळविले आहे. बाबांनी ‘पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची नवी कंपनी स्थापन केली असून, ही कंपनी तरुणांना खासगी सुरक्षारक्षक बनण्यास प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षक म्हणून निवृत्त लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांची सेवा घेणार आहे. रामदेव बाबा यांनी एक निवेदन जारी करून आपल्या नव्या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘पराक्रम सुरक्षा, आपकी रक्षा’ असे आपल्या नव्या कंपनीचे घोषवाक्य आहे. पतंजलीने योग, आयुर्वेद आणि स्वदेशी याबाबत लोकांना संवेदनशील बनविले आहे. आता लोकांना सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.अलीकडील वर्षांत खासगी सुरक्षा व्यवस्था व्यवसायाने उत्तम वृद्धी मिळविल्याचे दिसले आहे. ‘फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ने (फिक्की) केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. अभ्यासानुसार खासगी सुरक्षा व्यवस्था उद्योगाची वार्षिक उलाढाल सध्या 40 हजार कोटी आहे. 2020 पर्यंत या व्यवसायाचा महसूल 80 हजार कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.पतंजली योगपीठाच्या सूत्रांनी सांगितले की, कंपनीच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण पतंजलीच्या हरिद्वार येथील केंद्रात सुरू झाले आहे. येथे दर महिन्याला 100 तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कॉर्पोरेट आॅफिसेस, व्यक्ती आणि शॉपिंग मॉल यांना सुरक्षा पुरविण्याचे काम कंपनी करेल.

गेवराई येथील पंचायत समिती सदस्या 'पुजा' झाली इंजिनिअर

सुभाष मुळे...
-----------
गेवराई, दि. 15 __ येथील पंचायत समिती सदस्या पुजा अशोक मोरे या अभियांत्रिकी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत.
        पुजा अशोक मोरे या अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना झालेल्या आग्रहावरुन मध्यंतरी गेवराई येथील पंचायत समिती निवडणुक लढवली. झालेल्या निवडणुकीत सर्वात कमी वयात सर्वाधिक मतदान घेऊन विजयश्री मिळवली. परिक्षेचं शेवटचं वर्ष आणि निवडणूक यात खूप कमी अंतर होतं. सहपरीवाराच्या आशा, अपेक्षा या लक्षात घेतल्या तर पुजा समोर खूप मोठं आव्हान उभं होतं. असं असताना देखील कठोर परिश्रम घेऊन पुजा मोरे हीने झालेल्या या अभियांत्रिकी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होऊन दाखवले. तिच्या इंजिनिअर झाल्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

गेवराईत तरुणाची आत्महत्या

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 15 __ शहरातील गणेशनगर भागात राहणारे अमोल परशुराम राठोड या 27 वर्षिय तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना आज गेवराईत घडली आहे. झालेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सदरिल घटना ही नैराश्यातूनच झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

हवामान खात्याविरोधात FIR; पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.

काश्मीर प्रश्नावर भारत-पाकिस्तानने चर्चेतून तोडगा काढावा: संयुक्त राष्ट्रसंघ.

अहमदनगर जिल्ह्यातील "समृद्धी' महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम पूर्ण.

जेल मध्ये बदली आणि बढत्यांसाठी अर्थपूर्ण व्यवहार. धुळे कारागृहाच्या कर्मचाऱ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट. जेलचे अधिकारी आणि कैंद्या मध्येही साटंलोटं असल्याचं समोर.

2011 वर्ल्डकपची फायनल मॅच फिक्स होती, रणतुंगांचा आरोप.

बीएमसीचे 60 हजार कोटी कर्जमाफीसाठी द्या : अजित पवार

बिफ खाण्याचा सर्वांना अधिकार, गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हावी: रामदास आठवले

दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघ परतले, 2018च्या आयपीएल मध्ये खेळणार.

नाशिक = दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 12 हजार क्युसेक पाण्याच विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

येत्या 48 तासांत दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हमामान खात्याचा अंदाज.

भ्रष्टाचारा विरोधात नितीश कुमार यांची भूमिका स्पष्ट आहे. ते याबाबती कधीह तडजोड करणार नाहीत - के.सी. त्यागी, जेडीयू नेते

जम्मू-काश्मीर = काश्मीर खो-यातील मोबाईल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

कल्याणच्या काळू नदीवरील पूल पाण्याखाली, काळू नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा आदेश, सुमारे 15 गावांचा संर्पक तुटला.

राज्यात ओपन स्कूल बोर्ड सुरु होणार, मुक्त शाळे अंतर्गत दहावी आणि बारावीचं शिक्षण घेता येणार.

अरुणाचल प्रदेशातील पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी केंद्र सरकारने दिली 51.30 कोटींची मदत.

यवतमाळ = येळाबारा जवळ असलेल्या वाघाडी धरणावर युवकाचा मृतदेह आढळला, मानेवर कु-हाडीचे घाव घालून त्याला ठार मारले असल्याचा पोलिसांचा अंदाज, 30 ते 35 वयोगटातील या युवकाच्या मारेक-याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक दाखल.

देशात मुस्लीम व मागासवर्गियांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात माजलगाव मध्ये जमियत उल हिंद व भारीप बहूजन महासंघाचा आक्रोश मोर्चा, राष्ट्रपतींनी केंद्र सरकार बरखास्त करावे अशा मागणीचे तहसिलादारांना दिले निवेदन.

सोलापूर = वाळू उपशावरून भीमा पात्रता दोन गटात हाणामारी, कर्नाटकचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल.

धुळे महापालिकेचे सहायक आयुक्त व अतिक्रमण विभाग प्रमुख नंदु बैसाणे यांना 10 हजारांची लाच घेताना सायकाळी पाच वाजता पकडले.

मुंबई = आदिवासी भागातील सरकारी आश्रम शाळांच्या दुरावस्थेवरुन हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं, 11 ऑगस्ट पर्यंत सुविधा पुरवण्याचे सरकारला निर्देश.

घोटी जवळील सिन्नर महामार्गावर असलेल्या देवळे गावाच्या धोकादायक पुलाला अखेर भगदाड. सिन्नरकडून मुंबईला जाणारी सर्व वाहतूक खोळंबली.

औरंगाबाद = वाळूज महानगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेस लाच घेताना अटक.

मंजुळा शेटये हत्याप्रकरण: जेलर मनीषा पोखरकर सहित सहाही आरोपीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठड़ी.

महागठबंधनाचा वाद मिटवण्यासाठी सोनिया गांधींची नितीश कुमार आणि लालू यादव यांच्या सोबत चर्चा, राष्ट्रपती निवडणुकीनंतर तेजस्वी यादव राजीनामा देण्याची शक्यता.

मुंबई = आरेतील मेट्रो कारशेडला शिवसेनेचा कायम विरोध, मोकळ्या मैदानांचं आरक्षण बदलू देणार नाही,महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं वक्तव्य.

कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, कणकवली-ओरस दरम्यान ट्रॅकवर माती हटविली.

अमरनाथ दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

इगतपुरी तालुक्यातील दारणाधरण 71 टक्के भरल्याने 500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू.

विश्व हिंदू परिषदेची मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद, अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा केला निषेध. जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी बजरंग दलाचे 10 हजार कार्यकर्ते 30 जुलैला काश्मीर खो-यात उतरणार असल्याची माहिती विहिंपचे क्षेत्रमंत्री शंकरराव गायकर यांनी दिली.

गेवराईची स्वच्छता व बचत गटाच्या कामकाजाचा पथकाकडून आढावा

सुभाष मुळे...
-----------
गेवराई, दि. 14 __ शहराला स्वच्छता पुरस्कार मिळाल्यानंतर गेवराई शहराची पाहणी करण्यासाठी पथकाने पुनश्च अचानक भेट देऊन गेवराईची स्वच्छता व बचत गटाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
     गेवराई शहर हागनदारी मुक्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडुन स्वच्छता पुरस्कार मिळाल्याने या गेवराई शहराची पाहणी करण्यासाठी शुक्रवार, दि.१४ रोजी मुंबई येथील ऑल ईडिया इन्स्टिटुट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे अधिकारी अलोक गोगटे, कस्तुरी जोशी, पवन लहाने, दर्शना सोनवने हे आले होते.व त्यांनी शहरातील कोरबु गल्ली येथे बचत गटाशी चर्चा करून येथील प्रत्यक्ष स्वच्छतेची पाहणी केली.
     यावेळी गेवराई न.प.चे प्रकल्प अधिकारी राघव वाव्हळे, या भागातील बचत गटाचे सामाजिक कार्यकर्त्या रेणुका मोरे, सौ. संभाहरे यांसह याहिया खान, जुनेद बागवान, सरवर पठाण, उस्मान शेख, शोहेब अत्तार, अनवर बागवान, सय्यद कौसर, शेख राजु यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯