तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 22 July 2017

बॅनरबाजीवर खर्च केल्यापेक्षा मदत करा प्रा.आनंद निकम...


प्रतिनिधी शांताराम मगर...

वैजापुर तालुक्यातील अंचलगाव येथील जिल्हा परीषद शाळेत मा.मुख्यमंञी आजित पवार यांच्या  वाढदिवसानिमित्त पंचायत समिती सदस्य सै.योगिता निकम यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन  वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आनंद निकम तर प्रमुख पाहुणे म्हणुन शांताराम मगर गोरख झाल्टे होते.सरपंच सरुबाई नंनावरे शालेय समितीचे बाबासाहेब कोकाटे भाऊसाहेब जाधव भागिनाथ कोकाटे संतोष जाधव टी. आर.देवरे मनोज सोनावणे जी.पी.दुधभाते यांची प्रमुख उपस्थितीची होती.
यावेळी प्रा आनंद निकम म्हणाले वाढदिवस साजरे करतांना बॅनरबाजी करून खर्च केल्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे
दिवसेंदिवस शाळेचा खर्च अवाढव्य स्वरूप वाढत चालला आहे. वाढीव खर्चाचा बोजा गरीब विद्यार्थ्यांवर पडत आहे. शिकण्याची आवड आहे, शाळेत हुशार आहे, पण घरची गरिबी असल्याने शिकता येत नाही. अशी बरीच उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. हा प्रकार कमी करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर आपण काय प्रयत्न करू शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.विद्यार्थ्यांना वह्या पेन मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर निरागस समाधान पसरलेले पाहून मा मुख्यमंत्री आजित पावारांचा वाढदिवस योग्य कामासाठी खर्ची लागल्याचे समाधान मिळाले.आसल्याचे आनंद निकम यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना सागितले
दुर्गम डोंगरी व आदिवासी भागात सोई सुविधांचा
अभाव असतो. गोर गरिबांची मुले घरच्या परिस्थितीमुळे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांत मोफत शिक्षण मिळत असल्याने शिक्षण घेतात. खासगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांच्या प्रवेश बरोबरीने जिल्हा परिषदेच्या शाळांत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळयला हवे. तरच दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या रोखण्यास मदत होणार आहे
आपल्या जिवनांत शिक्षण व शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे. अशावेळी एखाद्या  जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा मानला जातो. समाजातील अनेक पिढय़ा त्यांच्या हाताखालून जात असतात. या पिढय़ांना माणूस म्हणून घडवताना शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.
स्पर्धेच्या  युगात जिल्हा परिषदेच्या शाळा मागे नाहित कारण इतर कोणत्याही खाजगी शाळे पेक्षा आपल्या शाळेत अधिक गुणवत्ता पूर्ण चांगले शिक्षण आपल्या शाळेत उपलब्ध आहे यामुळे लोकांचा शिक्षकांवरचा विश्वास अधिक वाढला आणि त्यामुळे गावातील प्रत्येक पालकाला आपले मुल शाळेत पाठवावे असे वाटले पाहीजे येथील शाळेसाठी सर्व प्रकारच्या मदतिस मी  कटिबद्ध असल्याचे प्रा.आनंद निकम यांनी सांगितले कार्यक्रमाचे सुञसंचालन मनोज सोनावणे यांनी केले तर आभार बाबासाहेब कोकाटे यांनी मानले.

रुग्णांना वाऱ्यावर सोडून तिन दिवसाची रजा टाकून डॉॅक्टर गेले आठवडा भराच्या सुट्टीवर.


जितू चोले
माहूर /प्रतिनिधी
तालुक्यातील आष्टा या दुर्गम व आदिवासी प्रवण खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.आर.के.चव्हाण हे  तिन दिवसांची रजा टाकून सुट्टीवर गेले खरे परंतु आठवडा लोटला तरी आपल्या कर्तव्यावर हजर झाले नसल्याने या केंद्राशी निगडीत असलेल्या गोर्-गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भिसे यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा  भ्रमणध्वनि बंदच आहे,तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी  शिंदे यांना आमच्या प्रतिनिधीचा भ्रमणध्वनी घेण्यास वेळच नाही.
           माहूर पासून 9 की.मी.अंतरावरील आष्टा या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.आर.के.चव्हाण यांनी आठवड्या पूर्वी तिन दिवसाची रजा टाकली परंतु ते अद्याप आपल्या कर्तव्यावर हजर झाले  नसल्याने या केंद्रा अंतर्गत येणाऱ्या 6 उप केंद्र व  25    खेड्यातील गोर्-गरीब रुग्णांची प्रचंड हेळसांड होत असल्याची माहिती सरपंच कु.अर्चना पांडुरंग बेडारे,ग्राम पंचायत सदस्य बाबाराव जाधव,दत्ता शंकर लेकुळे व नागरिक जितेश जाधव यांनी प्रत्यक्ष  प्राथमिक आरोग्य केंद्रातच  माहिती घेण्यासाठी गेलेल्या आमच्या प्रतिनिधीला  दिली.

बरजळा लोखंडे येथे आ.संतोष दानवे मित्र मंडळ व पवनपुत्र सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने केले वृक्षरोपन

भोकरदन

भोकरदन तालुक्यातील बराजळा लोखंडे येथे आ.संतोष दानवे मित्र मंडळ व पवनपुत्र सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सदस्य ड्रॉ.चंद्रकात  पाटील साबळे यांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.यावेळी राजू सहाणे,माजी जिल्हा परिषद सदस्य रामलाल गोठवाल,पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी  इंजिनियर सदाशिव लोखंडे,कम्प्युटर इंजिनियर प्रदीप लोखंडे,सरपंच प्रभाकर लोखंडे,उपसरपंच समाधान लोखंडे,ग्रा.सदस्य बालाजी लोखंडे, केशव खांडवे,आपासाहेब लोखंडे,व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री संत शिरामेणी नामदेव महाराज यांच्या ६६७ वा पुण्यतिथी कार्यक्रम सोहळा सम्पन्न


               (कलिदास अनंतोजी)
नांदेड़  (प्रतिनिधि) : श्री संत नामदेव शिंपी समाज धर्माबाद आयोजित विश्व प्रसिध्द श्री संत नामदेव महाराज यांच्या ६६७ वा पुण्यतिथी निमित्त श्री ह.भ.प. परमेश्वर गिरी महाराज रुद्रापुरकर यांचा नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्रावर कीर्तन झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन धर्माबाद नगर परिषद चे नगराध्यक्ष श्री सत्तार साहेब, नगर परिषद चे सभापती श्री निलेश पाटील साहेब, सभापती अशोक पाटील साहेब वार्ड मेंेबर श्री अशोक पाटील,श्री राजु सुरकुटवार, वरिष्ठ अभियंता श्री अशोक पाटील साहेब, श्री माकणे साहेब, आणि सा. इन्द्रधनुष्य टाईम्स चे मुख्य संपादक श्री सुधिर येलमे साहेब हे होते.या कार्यक्रमा निमित्ताने नगर परिषद तर्फे बसविण्यात आलेले मोटारीचे शुम्भारंभ नगराध्यक्ष श्री सत्तार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धर्माबाद तालुक्यातील समस्त समाज बांधव आणि प्रमुख पाहुणे तसेच समाजाचे अध्यक्ष श्री पी.जी. कोटूरवार उपाध्यक्ष श्री मनोज रामगिरवार, सचिव श्री सतिश रेनगुटवार सभासद सदस्य श्री रामेश्वर गंदलवार श्रीनिवास लोसरवार, श्री राजेश्वर लोसरवार, श्री गंगाधर संगेवार, श्री रमाकान्त कोटूरवार, श्री नंदकुमार लोसरवार, यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आला आहे. आणि वृक्ष लावुनच नव्हे तर त्यांचे संगोपन आणि वाढ करण्याचे संकल्प ही या वेळी करण्यात आला आहे .कार्यक्रमाचे संचालन पी.जी. कोटूरवार यांनी केले आणि या कार्यक्रमासाठी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मदत केलेले कार्यकर्ताचे आभार आणि धन्यवाद व्यक्त केले.
कलिदास अनंतोजी
नांदेड़ 9921404070

भारत- इंग्लंड यांच्यात आज अंतिम सामना;भारताची ऐतिहासिक विश्वविजेतेपदावर नजर.


_________________________

भारतीय महिला क्रिकेट संघाची नजर आज, रविवारी इंग्लंड विरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून ऐतिहासिक विश्वविजेतेपद पटकविण्यावर असेल.मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची आतापर्यंतची वाटचाल स्वप्नवत राहिली. सहापैकी चारवेळा चॅम्पियन राहिलेल्या आॅस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत 36 धावांनी लोळवून स्वत:ची क्षमता सिद्ध केली. स्पर्धेतील कठोर मेहनतीचे फळ विश्वविजेतेपदाच्या रूपाने मिळावे, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघ 2005 मध्ये देखील या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. आजचा सामना जिंकल्यास महिला क्रिकेटकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोनच बदलून जाईल. भारतीय पुरुष संघाने 1983 मध्ये लॉर्डस्वर बलाढ्य वेस्ट इंडीजला नमवीत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय क्रिकेटची ताकद जगात वाढलीच शिवाय या खेळाचा आर्थिक विस्तारही झाला. भारताने आज विजय मिळविल्यास महिला क्रिकेट मध्येही असा क्रांतिकारी बदल शक्य आहे.मिताली आणि झुलन या दोघी 2005 च्या विश्वचषकाचाअंतिम सामना खेळलेल्या संघातील खेळाडू संघात कायम आहेत. विश्व चॅम्पियन बनण्याची या दोघींकडे शक्यतो अखेरची संधी असेल. जेतेपदा पर्यंतच्या वाटचालीत भारताला सांघिक कामगिरीचा लाभ झाला. मितालीने या सर्वच सामन्यात 392 धावा ठोकून आॅस्ट्रेलियाची अॅलिस पेरीपाठोपाठ (404)धावा नोंदविणारी दुसरी खेळाडू ठरली. सलामीची स्मृती मानधना मात्र पहिल्या दोन सामन्यांतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयशी ठरली आहे. हरमनप्रीतने उपांत्य सामन्यात 171 धावांचा झंझावात केला. भारताने साखळीत इंग्लंडचा 35 धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात स्मृतीने 90 धावा ठोकल्या. गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड आणि झुलन यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांची अक्षरश: कोंडी केली होती.दुसरीकडे सलामीला भारताकडून पराभूत झाल्यानंतर इंग्लंडने मुसंडी मारून सामने जिंकले. उपांत्य सामन्यात द. आफ्रिकेला दोन गड्यांनी पराभूत करीत हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. संघाला यष्टिरक्षक- फलंदाज सारा टेलरतसेच नताली शिवर यांच्या कडून मोठ्या अपेक्षा आहेत. कर्णधार हीथर नाईट हिचे मत असे की, आमच्यासंघाने अद्याप सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली नाही. अंतिम सामन्यात सर्वशक्तिनिशी खेळ करू.’

जयभवानीच्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित तर उपाध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 22__येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वपुर्ण बैठक होऊन चेअरमनपदासाठी आ. अमरसिंह पंडित तर व्हाईस चेअरमन पदासाठी जगन्नाथ शिंदे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवडणुक अविरोध जाहिर केली. नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
        जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर शनिवार, दि. २२ रोजी कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला संचालक सर्वश्री भाऊसाहेब नाटकर, भास्करराव खरात, पाटीलबा मस्के, शेषेराव बोबडे, प्रकाश जगताप, जगन्नाथराव शिंदे, अप्पासाहेब गव्हाणे, श्री रामचंद्र आरगडे, राजेंद्र वारंगे, शेख मन्सूर शेख मुनीर, पांडूरंग गाडे, विठ्ठलराव गोर्डे, रमेशलाल जाजू, अर्जुनराव खेडकर, तुळशीदास औटी, शिवाजी कापसे, सौ.संध्या आसाराम मराठे, सौ.शकुंतला संदीपान दातखीळ, श्रीहरी लेंडाळ, साहेबराव पांढरे हे उपस्थित होते.
      जयभवानी कारखान्याच्या चेअरमन पदासाठी आ. अमरसिंह पंडित यांच्या नावाची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा नुतन संचालक भाऊसाहेब नाटकर यांनी मांडली, तर त्यास माजी सभापती तथा ज्येष्ठ संचालक पाटीलबा मस्के यांनी अनुमोदन दिले. चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे आ.अमरसिंह पंडित यांची चेअरमनपदी अविरोध निवड झाली. सिरसदेवी जिल्हा परिषद गटाचे माजी जि.प.सदस्य तथा ज्येष्ठ संचालक जगन्नाथराव शिंदे यांच्या नावाची सूचना माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे यांनी मांडली, तर त्यास ज्येष्ठ संचालक श्रीराम आरगडे यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी त्यांचाही एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे जगन्नाथराव शिंदे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी विकास माने यांनी जाहिर केले.
     जयभवानीच्या चेअरमनपदी आ.अमरसिंह पंडित व व्हाईस चेअरमनपदी जगन्नाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, उपसभापती शाम मुळे, खरेदी विक्री संघाचे सभापती डिगांबर येवले, उपसभापती फुलचंद बोरकर, माजी सभापती कुमार ढाकणे आदींनी आ. अमरसिंह पंडित यांचे स्वागत केले. कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक क्षीरसागर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी विकास माने, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी केशव घुले, ठोसर यांचे स्वागत केले. कारखान्याच्या वतीने अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी आ. अमरसिंह पंडित यांचे स्वागत केले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

दुकानदारांनो...सामांन्यांची काळजी घ्या, मी तुमची घेतो - आमदार पवार

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 22 __ स्वस्त धान्य दुकानदार हा महत्त्वाचा घटक आहे. जनसामान्य माणसांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून दुकानदारांनो...सामांन्यांची काळजी घ्या, मी तुमची घेतो असा आपलेपणाचा विश्वास आमदार लक्ष्मणराव पवार यांनी दुकानदारांना यावेळी दिला.
     स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतिने 1 ऑगस्ट पासून संप पुकारला आहे. त्याअनुषंगाने गेवराई तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतिने राज्य दक्षता समितीचे सदस्य तथा आ. लक्ष्मणराव पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले, यावेळी आ. लक्ष्मणराव पवार यांनी सांगितले की, बायोमॅट्रीक प्रणाली सुरू करण्यात आली असल्याने स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मानधनात पाच पटीने वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात येईल. तुम्ही सर्व माणसांची काळजी घ्या, मी तुमची काळजी घेईल. स्वस्त धान्य दुकानदारांचे इतर प्रश्न सरकार दरबारी मांडून त्याची सोडवणूक देखिल करु असेही आ. लक्ष्मणराव पवार यांनी सांगितले.
       यावेळी संघटनेचे अध्यक्ष हाराळे, सुरेश रसाळ, पिंटू हादगुले, सय्यद मुस्तखिम, संतोष वनवे, .उपनगराध्यक्ष दादासाहेब गिरी, याहीया खाॅन, बाबा वाघमारे, सागर ठाकूर, नितिन नाईकवाडे, गणेश सुर्डीकर आदि उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

हनुमंत खेड्यातील अल्पवयीन मुलीची हत्या करणार्याला कठोर शिक्षा द्या.....सर्व पक्षाची मागणी

जितू चोले
माहूर/प्रतिनिधी
   सोयगांव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील बंजारा समाजाच्या अल्पवयीन शाळकरी मुलीची हत्या करणार्या आरोपिला त्वरीत अठक करुण कठोर शिक्षा देण्यात यावी या साठी वाई बाजार कडकडीत बंद ठेवण्यात आले.व्यापार्यासह सर्व राजकिय पक्षाणी पाठीबां देवुन या बंद मध्ये सहभाग घेतला.

  वाई बाजार येथील सर्व व्यापारी वर्गाने आप आपली प्रतिष्टाने बंद करुण येथील मेन चौकामध्ये श्रध्दाजंली सभा घेण्यात आली. या ठिकाणी शिवसेनेचे ता.प्रमुख दिपक कन्नलवार,व्यापारी सघटनेचे अध्यक्ष अनिल रुणवाल,भा.ज.पा.चे सुमित राठोड,शि.से.ता.संघटक सुदर्शन नाईक,वाई ग्र.प.सदस्य उदय नाईक,शेषेराव चांदेकर,के.जी.राठोड,भा.ज.पा.चे मनिष राठोड,राष्ट्रवादीचे युवा मा.अध्यक्ष.आमजद खान,नामदेव जाधव,अंकुश जाधव,पञकार सुभाष खडसे,कार्तिक बेहेरे,अमजद पठान व आदी पक्षाच्या सर्व कार्यकरत्यांनी श्रध्दाजंली अर्पण करुण मनोगत व्यक्त केले,सर्व पक्षीय नेत्यांनी या घडलेल्या क्रूर हत्याची तातडीने चौकशी करुन त्या आरोपीला तात्काळ अटक करुन हे प्रकरण फास्टट्रक न्यायालयात चालविण्यात यावे व पिडित परिवारास शासनाने न्याय मिळवुन द्यावे,अशी मागणी आपल्या भाषणातुन केली..

   वाई बाजार बंदसाठी युवा सेनेचे आकाश सातव,संतोष जाधव,पवन मोरे,माईकल राठोड,युवा सेनेचे विभाग प्रमुख अानंद सोनुले,अामन खान,ओंमकार सातव,सिदार्थ खडसे,ओम सोनटक्के,आदी पक्षाच्या सर्व कार्यकरत्यांनी प्रयत्न केले.या श्रध्दाजंली सभेचे सुञसंचलन सुभाष खडसे यांनी केले तर अाभार प्रदर्शन के.जी.राठोड यांनी केले.

  या ठिकाणी कोनताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन सिंदखेडचे स.पो.नी.ठाकुर यांनी आपल्या सर्व कर्मचार्या सह कडक बदोबस्त ठेवला होता.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य भाजपा माहूर तर्फे श्री रेणुकामातेची महाआरती !


जितू चोले
माहूर/प्रतिनिधी
 मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य आज दि.२२ रोजी श्री रेणुकादेवी संस्थान माहूर भाजपा तर्फे रेणुकामातेस विश्वत भवानिदास भोपी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महाआरतीचे पौराहित्य विश्वस्त संजय काण्णव, चंद्रकांत भोपी, यांनी केले.व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आई जगदंबा उदंड आयुष्य देओ आशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी माहूरचे उद्योजक सुमित राठोड, दत्तात्रय शेरेकर यांनी कॉंग्रेसमधून  डॉ अशोक पाटील सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत . भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.  
            या वेळी भाजपा नेते डॉ.अशोक पाटील सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष देवकुमार पाटील, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय आमले, भाजयुमो चे तालुकाध्यक्ष सागर राठोड, भाजपा तालुका आदिवासी आघाडीचे  नितीन तोडसाम,अपील बेलखोडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष विनोद सुर्यवंशी पाटील,  भाजप शहर सरचिटणीस प्रमोद सोनकर, साईनाथ नागरगोजे, हरीश मुंडे, विलास पाटील चौधरी, जीवन अग्रवाल संत्तोष पवार, संजय उकंडे, पंकज जाधव चैनसिंग महाराज, अमोल मडावी, संजय षडमाके, पवन शर्मा आआदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माहूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  भाजपा नेते डॉ.आशोक पाटील सुर्यवंशी  यांच्या कडे ५१ हजार रु. भाजपा तालुकाध्यक्ष देवकुमार पाटील यांनी सुपूर्द केले. तसेच माहूर बसस्थानक परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात भारताच्या चौदाव्या राष्ट्रपती पदी भाजप आघाडीचे रामनाथ कोविंद विजय झाल्या बद्दल  फटाक्याची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. 

गेवराई तालुक्यात धाडसी चोऱ्या

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 22 __ मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी धुडगूस घालून गेवराई तालुक्यातील सावरगाव, आंधळे वस्ती व भडंगवाडी भागात धाडसी चोऱ्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
     याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्य़ाच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही पासून जवळच असलेल्या सावरगाव, आंधळे वस्ती व भडंगवाडी भागातील अनेक वस्त्यांवर अज्ञात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. येथील घरातील महिलांसह पुरुषांना देखिल बेदम मारहाण करण्यात आली. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच घरातील रोकडसह अन्य साहीत्य चोरटय़ांनी लंपास केले. परिणामी या भागातील ग्रामस्थ हतबल झाले असून भितीने वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी दिल्या असून तपासाची चक्रे गतिमान केली आहे. याकामी श्वान पथकास पाचारण करण्यात आल्याने चोरटय़ांचा शोध तिव्रतेने हाती घेण्यात आला आहे. भडंगवाडी वस्तीवरील शिवाजी निकम यांच्या घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये घुसून 36 वर्षिय पुष्पा निकम यांना मारहाण करित यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे मनी मंगळसुत्र, दागिने हिसकावून घेतले. शिवाजी निकम व दिलिप निकम या भावंडांना देखिल मारहाण करण्यात आली. दिलिप यांच्या डोक्याला जबर जबर मार लागला असून हात फॅक्चर झाला आहे. येथून जवळच असलेल्या आंधळे वस्तीवरील संदिप राधाकिसन आंधळे व शहादेव जगन्नाथ आंधळे यांच्या घरी असलेल्या सुनिता आंधळे यांनाही घरात घुसून मारहाण करित सोन्याचे दागिने लुटले आहे.
      दरम्यान भडंगवाडी वस्तीवरील शिवाजी निकम यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरटय़ा विरोधात 394 कलमान्वये गेवराई येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

सकल मराठा समाजाची रविवारी सेनगांव येथे नियोजन बैठक


विश्वनाथ देशमुख सेनगांवकर
सेनगांव:- सकल मराठा समाजाच्या वतीने देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे दिनांक ९ आॅगस्ट २०१७ रोजी होणार्‍या "मराठा क्रांती मोर्चाच्या" पार्श्वभूमीवर परतूर तालुकास्तरीय पुर्व नियोजन बैठक रविवार दिनांक २३ जुलै रोजी येथील हाँटेल सुरुची मध्ये दुपारी ०१-०० वाजता आयोजित केली आहे.
या बैठकीसाठी सर्वस्तरातील आधिकारी, कर्मचारी,शेतकरी, डाॅक्टर्स, इंजिनियर्स,वकील,प्राध्यापक, शिक्षक,शेतमजुर,आडते,व्यापारी,व्यावसायिक,उद्योजक,सर्व राजकिय पक्ष-सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी यासह सेनगांव तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी या बैठकीसाठी आवर्जुन उपस्थित राहुन मोर्चा नियोजनात सक्रिय सहभाग घ्यावा.असे आवाहन सेनगांव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.